#स्थानिक गुन्हे शाखा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 18 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १८ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार असून, महायुतीने प्राध्यापक राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. ते आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि महायुतीच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवादाची या राज्याला दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याची आणखी प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्याचं उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं. त्यानंतर ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आणि अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ते आज पाचव्या स्थानापर्यंतचा भारताचा प्रवास जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांच्या टप्प्यात अविश्वसनीयपणे वेगवान वाढीचा आहे, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांनी व्यक्त केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नीती आयोग, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘भारताच्या बहुविध संक्रमणांवर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या अनुषंगाने ते बोलत होते. सर्वात उत्तम अर्थव्यवस्था आपल्याला व्हायची असेल तर गुंतवणूक वाढली पाहिजे, या संदर्भात या कार्यशाळेत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वातावरणातील बदल आणि नागरिकीकरण ही महत्वाची आव्हानं असताना आमची भूमिका ही पुढचे दहा वर्ष कसे असतील ही असल्याचं बेरी यांनी नमूद केलं.
लोकसभेत काल ८७ हजार ७६२ कोटी रुपयां��्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या. भारत हा जगात सर्वाधिक वृद्धी दर नोंदवणारा देश आहे. गेले तीन वर्ष देशाचा वृद्धीदर सरासरी ८ पूर्णांक ३ दशांश टक्के होता, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भातल्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं. केंद्र सरकारनं ११ लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च पायाभूत सुविधांवर करायचा ठरवला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल, असं त्या म्हणाल्या. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या तुलनेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात किरकोळ, खाद्य आणि इंधन महागाई मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
करदात्यांना अधिक सेवा देण्याच्या उद्देशानं चार नव्या उपक्रमांची घोषणा केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार अगरवाल यांनी केली. या चार उपक्रमांमध्ये नागरिकांची सनद, संपूर्ण करसंबंधित माहितीसाठी सुविधा केंद्र, सूचना करण्यासाठी व्यवसाय सुलभता टॅब आणि कर भांडारासाठी सी बी आय सी संग्रह यांचा समावेश आहे. यामुळे करसेवेमध्ये पारदर्शकता आणि विश्वास वाढीस लागेल. करदात्यांना सक्षम बनवून आणि त्यांच्या सूचनांचा समावेश करून, एक सुलभ प्रणाली तयार केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
नागपूरमधल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून एक हजार ५४७ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. विधानभवनातल्या मंत्रिमंडळ सभागृहात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळेल, असं फडणवीस यांनी सांगितलं. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँक आणि यूरोपीयन इन्वेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण तीन हजार ५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा करण्यात येणार आहे.
धुळे जिल्ह्यातल्या पळासनेर जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी मध्यप्रदेशमधल्या खंडवामधून चौघांना अटक केली आहे. जादूटोणा कायदा कलमान्वये तक्रारदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात येत्या २१ ते २७ डिसेंबर दरम्यान ��ंधारे मोहीम आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात बंधारे बांधण्यासाठी अंगणवाड्या, युवक क्रीडा मंडळ, बचतगट, स्वयंसेवी संस्था, विविध कर्मचारी संघटना आणि ग्रामस्थांना सहभागी करुन घेतलं जाणार आहे. गेली सहा वर्ष कुडाळ पंचायत समिती कोणत्याही शासकीय निधीशिवाय केवळ लोकसहभागातून बंधारे मोहीम राबवत आहे.
ग्रामीण भागातल्या नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, या उद्देशानं राज्य शासनानं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात एक हजार १०० कामं मंजूर असून, ही कामं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
राज्यात सध्या थंडीचा प्रचंड कडाका जाणवत असून, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
0 notes
Text
रोहिलागड शिवारातुन 4 किलो 154 ग्रॅम गांजासह एक जण पोलिसांच्या ताब्यात. One person with 4 kg 154 grams ganja in police custody from Rohilagad Shivara.
एकुण 93 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही.. जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना जालना जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कार्यवाही करण्याचे सुचना दिल्या होत्या. दिनांक. 12/04/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे अवैध धंद्याची माहिती घेत असतांना,…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-robbery-plot-was-foiled-the-two-were-picked-up-near-the-malwata-phata-bridge/
0 notes
Text
स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीणची कारवाई
ट्रक चालकास गावठी कटटा दाखवून लुटणारी आंतरजिल्हा टोळी 48 तासात जेरबंद दि. 13/08/2023 रोजी फिर्यादी नामे हनुमान सुखदेव गीते रा. पिंप्री खुर्द ता. जिंतूर जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे गंगापूर गुरन- 375/2023 कलम-395 भा.द.वी प्रमाणेे गुन्हा दाखल होता. *मा. मनिष कलवानीया पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस* ठाणे गंगापूर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा नमुद गुन्हयांचा समांतर तपास…
View On WordPress
0 notes
Text
दीड लाखांचा सुगंधित तंबाखू साठा जप्त, सागर गोपलानीविरुद्ध गुन्हा दाखल https://www.rebelbulletin.com/2023/06/16669/.html
0 notes
Text
पुण्यात शिंदे गटाची सर्वांत मोठी दहीहंडी; दिग्गजांच्या उपस्थितीत शिंदे गट करणार शक्तिप्रदर्शन
पुणे : यंदा जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा जल्लोष बघायला मिळणार आहे. यंदा पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीत राजकीय खेळी बघायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तयारीला सगळेच पक्ष लागले आहेत आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षाकडून दहीहंडीत मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यात सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाचे नगरसेवक नाना उर्फ प्रमोद भानगिरे यांच्या मंडळाच्या माध्यमातून होणार आहे. पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.या दहीहंडी उत्सवाला शिंदे गटाचे दिग्गज नेते मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाने उठाव केल्यानंतर हा पहिलाच सार्वजनिक सण असणार आहे. या माध्यमातून जनतेपर्यंत पोचण्याचा त्यांच्या प्रयत्न असणार आहे. पुण्यातील सगळ्यात मोठी दहीहंडी शिंदे गटाकडून होणार असल्याने शहरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दहीहंडीत महिला पथकांचा समावेश पुण्यातील हांडेवाडीमध्ये धर्मवीर आनंद दिघे दहीहंडीचा मोठा जल्लोष साजरा होणार आहे. दरवर्षी पुण्यात अनेक ठिकाणी गोविंदा मोठ्या संख्यने उपस्थित राहत आणि मोठे थर करत दहीहंडी साजरी करतात. यंदा मात्र भानगिरे यांच्या दहीहंडीत काही महिला पथकांचा देखील समावेश असल्याचे भानगिरे यांनी सांगितले आहे. या माध्यमातून लाखोंचे बक्षिससुद्धा दिलं जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. यंदा दहीहंडी ‘दहाच्या आत’ कोरोनामुळे दोन वर्षानंतर दहीहंडी महोत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. मात्र यासाठी देखील पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. याच नियमानुसार यंदा गोविंदांना दहीहंडी साजरी करता येणार आहे. यंदा रात्री १० वाजेपर्यंत जल्लोष करता येणार आहे. दहीहंडी उत्सव होणार आहे. यामुळे पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. मोठा फौजफाटा शहरात तैनात केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर एसआरपीएफची तुकडी, शीघ्र कृती दल, होमगार्ड, दामिनी पथके, गुन्हे शाखा विशेष शाखेचा साध्या वेशातील बंदोबस्त असणार आहे. दरवर्षी या म��ोत्सवात कोणताही गुन्हा घडू नये यासाठी पोलीस तत्पर असतात. या वर्षी हा जल्लोष दोन वर्षांनी होणर आहे. त्यामुळे गोंिवदांमध्ये जास्त उत्साह बघायला मिळत आहे. त्यामुळे अधिक बंदोबस्त ठेवण्याच्या तयारीत पुणे पोलीस आहेत. Read the full article
0 notes
Text
शेंडी चौकात ' तो ' आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
शेंडी चौकात ‘ तो ‘ आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
नगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ अवघ्या काही दिवसांपूर्वी चुकून गावठी कट्टा याचा ट्रीगर दाबला गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. नगर जिल्ह्यात गावठी कट्टा बाळगणारे यांचे प्रमाण वाढलेले असून स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून आहे. अशाच एका प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका युवकाला औरंगाबादवरून नगर येथे येत असताना ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडून तब्बल चार गावठी कट्टे…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून सतरा वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नायजेरिया दौरा आहे तर गयानाला १९६८ नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. ब्राझीलमध्ये रियो दे जानेरो इथं उद्या १८ तारखेला जी-२० शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळं या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरीक भागीदारीचं नवं द्वार उघडेल, असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत.
दरम्यान, नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नायजेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुण्यातून जळगावला जाणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. ��रवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि ��मआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. जवळपास चार किलो सोनं आणि ३४ किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, परवा दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचार सभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळं एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. दर्यापूर मतदार संघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे, या ठिकाणी महायुतीमध्ये दोन गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला, यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकातकाल प्रचार सभा झाली.
आजच्या दोन वर्षानंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरु केलेल्या या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा असून प्रती पंढरपूर म्हणून भालेगावच्या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे.
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ��ातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ संशयीतांना अटक करण्यात आली. तर १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ४७ गुन्हे नोंदवून ३९ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यामावर प्रसारित झाली आहे. याबद्दीलची तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमांवर टाकलं. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
Text
शेंडी चौकात ' तो ' आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
शेंडी चौकात ‘ तो ‘ आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
नगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ अवघ्या काही दिवसांपूर्वी चुकून गावठी कट्टा याचा ट्रीगर दाबला गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. नगर जिल्ह्यात गावठी कट्टा बाळगणारे यांचे प्रमाण वाढलेले असून स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून आहे. अशाच एका प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका युवकाला औरंगाबादवरून नगर येथे येत असताना ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडून तब्बल चार गावठी कट्टे…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/two-tractors-transporting-illegal-sand-seized-action-of-local-crime-branch-team/#google_vignette
0 notes
Text
शेंडी चौकात ' तो ' आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
शेंडी चौकात ‘ तो ‘ आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
नगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ अवघ्या काही दिवसांपूर्वी चुकून गावठी कट्टा याचा ट्रीगर दाबला गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. नगर जिल्ह्यात गावठी कट्टा बाळगणारे यांचे प्रमाण वाढलेले असून स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून आहे. अशाच एका प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका युवकाला औरंगाबादवरून नगर येथे येत असताना ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडून तब्बल चार गावठी कट्टे…
View On WordPress
0 notes
Text
टिप्पर पळविणार्या चार आरोपींना अटक
गोंदिया : तालुक्यातील निलज येथे १७ मार्च रोजी चारचाकी वाहनाने आलेल्या ५ ते ६ अज्ञात इसमांनी एमएच बीजी ६५९७ क्रमांकाचा टिप्पर अडवून बळजबरीने चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी संदीप मस्के यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक निर्देशानुसार रावणवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वेगवेगळ्या पथकाद्वारे तपास सुरु केला. तपासादरम्यान…
View On WordPress
0 notes
Text
शेंडी चौकात ' तो ' आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
शेंडी चौकात ‘ तो ‘ आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
नगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ अवघ्या काही दिवसांपूर्वी चुकून गावठी कट्टा याचा ट्रीगर दाबला गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. नगर जिल्ह्यात गावठी कट्टा बाळगणारे यांचे प्रमाण वाढलेले असून स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून आहे. अशाच एका प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका युवकाला औरंगाबादवरून नगर येथे येत असताना ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडून तब्बल चार गावठी कट्टे…
View On WordPress
0 notes
Text
शेंडी चौकात ' तो ' आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
शेंडी चौकात ‘ तो ‘ आला अन पोलिसांनी अक्षरश: पाठलाग करून धरला
नगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ अवघ्या काही दिवसांपूर्वी चुकून गावठी कट्टा याचा ट्रीगर दाबला गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. नगर जिल्ह्यात गावठी कट्टा बाळगणारे यांचे प्रमाण वाढलेले असून स्थानिक गुन्हे शाखा पथक देखील अशा व्यक्तींवर नजर ठेवून आहे. अशाच एका प्रकारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका युवकाला औरंगाबादवरून नगर येथे येत असताना ताब्यात घेतलेले असून त्याच्याकडून तब्बल चार गावठी कट्टे…
View On WordPress
0 notes