#सैन्यदलाचे
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आज विजयादशमी-सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो बौध्द अनुयायी दाखल
नवी मुंबई विमानतळाची वायूदलाकडून चाचणी यशस्वी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैमानिकांचा सत्कार
नाशिकच्या देवळाली छावणी तोफ गोळा स्फोट प्रकरणी सैन्यदलाचे कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
आणि
भारत-बांगलादेश टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज तिसरा आणि अखेरचा सामना
****
दसरा अर्थात विजयादशमीचा सोहळा आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र सरस्वती पूजन, शस्त्रपूजन आणि रावणदहनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. घटस्थापनेनं प्रारंभ झालेल्या नवरात्रोत्सवाची आज घटोत्थापनेनं सांगता होत आहे. काल ठिकठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये होमहवन आदी धार्मिक विधी पार पडले.
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आराध्य भवानी मातेची, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी यादव यांचा शिवमुद्रा आणि तलवार देऊन सत्कार केला.
****
तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते सपत्निक शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. दुर्गा सप्तशती, तुळजा सहस्त्रनाम, भवानी सहस्त्रनाम आणि नवग्रहांचं हवन करण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सप���्निक होम हवन करून पूर्णाहुती दिली. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर दुपारी एक वाजता श्री योगेश्वरी देवीच्या पालखीची मिरवणूक, सीमोल्लंघनासाठी मंदिरातून निघणार आहे.
****
माहूर इथं रेणुकादेवीच्या दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेला भेट देण्याऱ्या महिला आणि मुलांची संख्या लक्षणीय आहे.
****
दसऱ्यानिमित्त आज बीड जिल्ह्यात २ ठिकाणी मेळावे होत आहेत. पाटोदा तालुक्यातल्या सावरगांव इथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांचा मेळावा होत असून, कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत. श्री क्षेत्र नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे.
****
नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोज��त दीपश्री संगीत महोत्सवाचा काल समारोप झाला. देगलुर इथले युवा बासरीवादक अनहद वारसी आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शुभदा पराडकर यांचं यावेळी सादरीकरण झालं, या महोत्सवाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
****
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सध्या साजरा होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के राधाकृष्णन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. या सोहळ्यापूर्वी आज सकाळी स्वयंसेवकांचं पथसंचलन झालं, नागरिकांनी या संचलनाचं स्वागत केलं.
****
नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवर कालपासूनच हजारो बौध्द अनुयायी दाखल झाले आहेत. बौध्द अनुयायांना प्रशासनाकडून विविध आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, आर्य भदंत सुरई ससाई यांच्या उपस्थितीत अनेक उपासक आणि श्रामणेर यांना धम्मदीक्षा देण्यात येत आहे. आर्य भदंत सुरई ससाई यांच्या हस्ते काल पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.
��त्रपती संभाजीनगर इथंही बुद्धलेणी परिसरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई विमानतळावर चार टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर काल वायू दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी अवतरण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले...
हे एअर पोर्ट जे आहे, हे देशातलं नंबर एकच एअरपोर्ट आहे. यामध्ये वर्षाला नऊ कोटी लोक प्रवास करतील. आणि जवळपास टू पॉईंट सिक्स दशलक्ष टन कार्गोमध्ये वाहतूक होईल. याच्या दोन एअरस्ट्रीप पॅरलल चलणार आहेत. आणि हे देशातलं सर्वात मोठं एअरपोर्ट ठरेल.
सुखोई-३० या लढाऊ विमानानेही यावेळी फ्लायपास्ट अर्थात हवाईपरेड केली. या विमानांना वॉटर कॅनन अर्थात जलतोफांची सलामी देण्यात आली. या विमानाच्या वैमानिकांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते.
****
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षणासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या करारामध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना, राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या संशोधन आणि विकास केंद्र यांच्यासाठी थ्री डी प्रिंटिंग आणि सहाय्यक तंत्रज्ञानाचा समावेश आहे.
****
राज्यात विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या विकासकामांचं भूमिपूजन काल झालं. यामध्ये २४ जिल्हे आणि ४४ विधानसभा मतदारसंघात १२ हजार ७६८ कोटी रुपये किंमतीच्या १ हजार ४८० किलो मीटर लांबीच्या दु-पदरी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांचं भूमिपूजन झालं.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात निळकंठेश्वर तसंच महापुरुष मार्ग या ६८६ कोटी रुपये खर्चाच्या दोन नवीन राज्य महामार्गांचा आणि धाराशिव तालुक्यातील तेर ते तुळजापूर दरम्यानच्या ४२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामांचाही यात समावेश आहे.
****
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक नोएल टाटा यांची एकमतानं निवड झाली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र बंधू असलेले नोएल टाटा सध्या टाटा स्टील आणि व्होल्टाससह इतरही कंपन्यांच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
****
बँकांसह आर्थिक व्यवहार सेवा प्रदात्या कंपन्यांनी डिजिटल व्यवहारांमध्ये दिव्यांगांच्या सुविधेकडे लक्ष देण्याचं आवाहन रिजर्व्ह बँकेनं केलं आहे. पॉईंट ऑफ सेल यंत्रांमध्ये दिव्यांग अनुकूल बदल करावेत, तसंच यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याची सूचनाही रिजर्व्ह बँकेनं केली आहे.
****
चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर विभागाला आतापर्यंत १३ लाख ५७ हजार कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये ७ लाख कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकर आणि ६ लाख कोटी रुपये औद्योगिक प्राप्तीकराचा समावेश आहे. कालपर्यंत प्राप्तीकरखात्यानं सुमारे दोन लाख ३१ हजार कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
****
नाशिक जवळील देवळाली छावणीत तोफ गोळा स्फोट प्रकरणी सैन्यदलानं कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. काल सकाळी झालेल्या या स्फोटात दोन अग्निवीरांचा मृत्यू झाला. तोफ चालवण्याचं प्रशिक्षण घेत असताना हा स्फोट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळव��ं आहे. या दुर्घटनेत अन्य एक अग्निवीर जखमी असून त्याच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
****
भारत आणि बांगलादेश टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना आज हैदराबाद इथं खेळवला जात आहे. मालिकेत भारतानं दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
आयसीसी महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची लढत उद्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.
****
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेऊन संवाद साधला, त्यापूर्वी नांदेड विमानतळावर खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि अन्य मान्यवरांनी राज्यपालांचं स्वागत केलं.
दरम्यान, राज्यपाल परवा १४ तारखेला लातूर दौऱ्यावर येत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य उल्हास शिंदे यांचं काल हृदयविकारानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे ह��ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ��राठवाडा विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे ते माजी अधिष्ठाता होते. धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथं उल्हास शिंदे यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात विशेष पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वाळूमाफियांवर कारवाई न करता त्यांच्याकडून वसुली करत असल्याची बाब उघडकीस आली, याप्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि चार अंमलदाराना निलंबित करण्याचे आदेश नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
****
0 notes
Text
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार?
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार?
विश्लेषण : सैन्यदलात प्रवेशाची अग्निपथ योजना कशी आहे? सैन्यदलाचे संख्याबळ आक्रसणार? – अन��केत साठे सैन्यदलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी संरक्षण मंत्रालय सैन्य भरतीसाठी अग्निपथ प्रवेश (टूर ऑफ ड्यूटी) या नव्या योजनेला अंतिम स्वरूप देण्याच्या मार्गावर आहे. त्याअंतर्गत युवकांना तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती केले जाईल. जगातील चौथ्या क्रमांकाचे बलाढ्य व मोठे लष्कर म्हणून…
View On WordPress
0 notes
Text
Indian Army | महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख
#Indian Army | महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख #Army #India #NewDehli
Indian Army | नवी दिल्ली, दि. 19 : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत असून ले.जनरल मनोज पांडे हे ३० एप्रिल २०२२ रोजी त्यांचा पदभार स्विकारतील. केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार ले.जनरल पांडे…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख
महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनंट जनरल मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख
नवी दिल्ली, दि. १८ : केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख महाराष्ट्राचेच सुपुत्र जनरल मनोज मुकुंद नरवणे सेवानिवृत्त होत असून ले.जनरल मनोज पांडे हे ३० एप्रिल २०२२ रोजी त्यांचा पदभार स्विकारतील. केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार ले.जनरल पांडे यांची देशाचे…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख
महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख
नवी दिल्ली : केंद्रशासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनन्ट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे त्यांचा पदभार स्विकारतील.
श्री. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे. यापदावरील ते दुसरे मराठी अधिकारी असतील.…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
२५ वा कारगिल विजय दिवस देशभरात विविध कार्यक्रमांनी साजरा
गौरी गणपतीनिमित्त राज्यात १ कोटी ७० लाखावर नागरिकांना आनंदाचा शिधा
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून तीन दिवसीय तरंग शेतकरी मेळाव्याचं आयोजन
आणि
बांग्लादेशचा दारूण पराभव करत भारतीय महिला संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत दाखल
****
२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.
****
कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत, त्यांचे शौर्य कायम स्मरणात ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. या युद्धात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा सैनिकांचं त्यांनी स्मरण केलं. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटूंबीयांप्रती राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंही या युध्दातल्या हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कारगील युद्धात सक्रिय असलेले सैनिक प्रल्हाद गोपीनाथ पठारे यांच्यासह तीन वीर मातांचा तसंच सहा वीर पत्नींचा, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या प्रमुख मेजर एस फिरासत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पठारे यांनी युद्धातील आठवणीला उजाळा ��िला.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन शहिदांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी माजी सैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचं सांगितलं.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करून झाली.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलतांना, केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं सांगितलं. त्यापूर्वी राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं. तर खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता.
लोकसभेत त्यानंतर अर्थसंकल्पावर चर्चा झाली, काही सदस्यांनी अशासकीय विधेयकं सादर केली, डॉ श्रीकांत शिंदे यांच्या, बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यात सुधारणा सुचवणाऱ्या गैरसरकारी विधेयकाचा समावेश आहे. राज्यसभेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
****
यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना "आनंदाचा शिधा" वितरीत करण्यात येणार आहे. प्रतिसंच १०० रुपये या सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या या "आनंदाचा शिधा" संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असणार आहे. या शिध्याचं वाटप १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे.
****
विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी विनंती याचिका शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. व्हिप न पाळणाऱ्या या आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती न्यायालयात केली ��सल्याचं, पक्षाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीसोबत वाटाघाटींसाठी राज्य तसंच मुंबई स्तरावर दोन विशेष समित्यांचं गठन केलं आहे. पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या खडकवासला धरणातून विसर्गासंदर्भात पाटबंधारे विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी समन्वय साधावा आणि यापुढे अशी दुर्घटना होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, पुण्यातल्या पूरग्रस्त भागातील घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची, महापालिका तसंच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचं तसंच शेतीच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
****
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखं चित्र आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. चित्रकार शैलेश आचरेकर यांनी सहा महिन्यांच्या प्रयत्नातून हे चित्र साकारलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना ते भेट देण्यात आलं.
****
लातूरचे काँग्रेस खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी आज दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मतदार संघातील प्रमुख महामार्ग आणि रस्त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. प्रामुख्यानं लातूर - कुर्डूवाडी- टेंभुर्णी या महामार्गाचं चौपदरीकरण तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी काळगे यांनी केली. हे सर्व विषय प्राधान्यक्रम लावून सोडवले जातील, असं आश्वासन गडकरी यांनी दिल्याचं खासदार काळगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून ‘तरंग, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तीन दिवसीय मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. जालना रस्त्यावर पाटीदार भवन इथं २९ जुलैपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी या मेळाव्यात सहभागी होऊन विविध उत्पादनांची खरेदी करावी असं, ��वाहन नाबार्ड मार्फत जिल्हा विकास अधिकारी सुरेश पटवेकर यांनी केलं आहे. नाबार्ड मार्फत देशातील ५० शहरांत हा मेळावा होणार आहे.
****
भारतीय महिला संघाने आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बांग्लादेश संघाचा दणदणीत पराभव केला. बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित २० षटकांत आठ बाद ८० धावा केल्या. भारतीय संघाच्या शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनं हे लक्ष्य अवघ्या ११ षटकांत साध्य केलं. चार षटकांपैकी एक षटक निर्धाव देत १० धावांच्या बदल्यात तीन बळी घेणारी रेणुका सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरली.
या स्पर्धेचा उपांत्य फेरीचा दुसरा सामना सध्या श्रीलंका आणि पाकिस्तानच्या संघात सुरू आहे. यामध्ये जिंकणाऱ्या संघासोबत भारतीय संघाचा परवा रविवारी अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.
****
नांदेड महापालिकेने पर्यावरण दिनापासून सुरू केलेल्या हरित नांदेड अभियानांतर्गत आतापर्यंत दहा हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मनपा आयुक्त डॉ. महेशकमार डोईफोडे यांनी ही माहिती दिली. पुढच्या दोन महिन्यात शहरांमध्ये २५ हजार झाडं लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं
****
जालना शहरात दुचाकींची चोरी करून विक्री करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
Text
Agnipath : अग्निपथ’ योजना मोदी सरकारचा तुघलकी निर्णय, सैन्यदलाचे मनोबलाचे खच्चीकरण करणारी योजना
Agnipath : अग्निपथ’ योजना मोदी सरकारचा तुघलकी निर्णय, सैन्यदलाचे मनोबलाचे खच्चीकरण करणारी योजना
Agnipath : अग्निपथ’ योजना मोदी सरकारचा तुघलकी निर्णय, सैन्यदलाचे मनोबलाचे खच्चीकरण करणारी योजना अग्निपथ योजनेमुळे रोजगाराची संधी वाढेल असा सरकारचा दावा खोटा आहे. दरवर्षी 80 हजार जवानांची भरती केली जाते. अग्निपथ योजनेत दरवर्षी 40 हजार जवानांची भरती केली जाणार आहे. यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या 17 लाख जवानांची संख्या कमी होऊन 6 लाखांवर येईल. सैन्यदलातील प्रशिक्षण ही कायम चालणारी प्रक्रिया असून…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड https://prasidhipramukh.in/?p=8986
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
२५ वा कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. या निमित्त राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही सैन्यदलाचे आभार व्यक्त करत हुतात्मा सैनिकांना अभिवादन केलं. समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात त्यांनी, कारगील युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं बलिदान देशाच्या प्रत्येक नागरिकाला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देईल असं म्हटलं आहे.
****
कारगिलमध्ये २५ वर्षांपूर्वी आपण केवळ युद्धच जिंकलं नाही तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अद्भुत दर्शन घडवल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल मधल्या द्रास इथं युद्ध स्मारकाला भेट देऊन, हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली, त्यानंतर ते बोलत होते. भारत शांततेसाठी प्रयत्न करत होता, मात्र पाकिस्ताननं आपला अविश्वासी चेहरा समोर आणला, असं ते म्हणाले. विकासापुढे येणारी आव्हानं मोडून काढली जातील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करत आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असं म्हटलं आहे. २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज त्यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचं स्मरण केलं. त्यावेळी ते मुंबईत बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकारने अनेक पिकांच्या किमान हमीभावात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या लाभासाठी निर्णय घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या अनेक वर्षात गव्हासह इतर पिकांचं सरकारकडून खरेदीचं प्रमाण वाढलं असून, खतांवरच्या अनुदानातही भरघोस वाढ केल्याचं चौहान यांनी नमूद केलं.
****
राज्यसभेत शून्य काळात खासदार सुधा मूर्ती यांनी, हॉटेल व्यावसायिकांकडून अन्नपदार्थात वापरल्या जाणाऱ्या सिन्थेटिक रंग, सिन्थेटिक व्हिनेगर तसंच टेस्टिंग पावडरच्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं.
यासंदर्भात नियंत्रणासाठी देशभरात शंभरावर अन्न परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचं, अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांनी सांगितलं.
खासदार रजनी पाटील यांनी कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत होणाऱ्या विलंबाकडे सदनाचं लक्ष वेधलं. पासवान यांनी यावर उत्तर देतांना, तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया लांबत असल्याचं सांगत, सरकार या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून सदर प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं.
****
सर्वसामान्य नागरिकांना सरकारकडून आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सहज सुलभरित्या उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या सुविधांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात ६३ प्रकारच्या तर जिल्हा रुग्णालयात १३४ प्रकारच्या चाचण्या मोफत केल्या जात असून, विविध आजारांसाठीच्या औषधांचं मोफत वितरण केलं जात असल्याचं नड्डा यांनी सांगितलं. जिल्हा रुग्णालयात डायलिसीसची सुविधा दिली जात असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.
दरम्यान, शून्य प्रहराच्या प्रारंभी, कर्नाटकच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होऊन, गदारोळ सुरू झाल्यानं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नांदेड शहर आणि ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत तीन लाख ७० हजार अर्ज दाखल झाले आहे. जिल्हा यंत्रणेने पात्र उमेदवारांची निवड पुढील काही दिवसात पूर्ण करावी, आणि चावडी वाचनाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिकचं आज औपचारिक उद्घाटन होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री ११ वाजता हा सोहळा सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून, अंदाजे दहा हजारावर खेळाडू संचलनात सहभागी होणार आहेत. आयफेल टॉवर परिसरात संचलनाची सांगता होऊन ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी. व्ही. सिंधू करणार आहेत.
****
महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेतले आतापर्यंतचे सर्व सामने जिंकून भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून होणारा विसर्ग १० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं वाढवून ४० हजार घनफूट प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठी असणारी मंदिर पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
सैन्यदलाचे विविध शौर्य पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या राज्यातल्या खेळाडूंचा विधीमंडळात गौरव
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत सादर
आणि
वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीची नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्टला
****
सैन्यदलात अतुलनीय शौर्यासाठी दिले जाणारे कीर्तिचक्र तसंच शौर्यचक्र पुरस्कार आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज प्रदान केलेल्या पुरस्कारांपैकी मरणोत्तर सात कीर्तिचक्र तसंच मरणोत्तर नऊ शौर्यचक्रांचा समावेश होता. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हे पुरस्कार स्वीकारले.
****
विश्वविजेत्या क्रिकेट संघातल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा आज विधानभवनात सत्कार करण्यात आला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम् दुबे, यशस्वी जयस्वाल, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे तसंच संघ व्यवस्थापक अरुण कानडे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच विधीमंडळाच्या दोन्ही सदनांचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा, सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी एक कोटी रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यापूर्वी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानीही मुख्यमंत्र्यांनी या खेळाडूंना सन्मानित केलं.
****
स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक आज विधानसभेत मांड��्यात आलं. शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना या कायद्यातील तरतुदी लागू असतील. परीक्षेत अयोग्य मार्गांचा वापर करणाऱ्यांना ३ ते ५ वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपये दंड करण्याची तरतूद या विधेयकात आहे. तसंच परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेला एक कोटी रुपये पर्यंत दंड आणि परीक्षेचा खर्च वसूल करण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित संस्थेला पुढची ४ वर्ष कोणतीही स्पर्धा परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी दिली जाणार नाही. सेवा पुरवणाऱ्या संस्थेच्या दोषी कर्मचाऱ्यांनाही ३ ते १० वर्ष तुरुंगवास आणि १ कोटी रुपये दंड आकारला जाणार आहे. दरम्यान, पेपर फुटीच्या प्रकारांची चौकशी आता पोलिस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केली जाणार आहे.
****
बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे महाराष्ट्रालाही विशेष दर्जा किंवा विशेष पॅकेज मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याजावर राज्य सरकारचा ५८ टक्के खर्च होतो. भविष्यात हा खर्च वाढत जाणार असल्यानं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेच लागणार असल्याचं ते म्हणाले. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केल्याचं पवार यांनी नमूद केलं.
दरम्यान, हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधान परिषदेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत ते आज बोलत होते. वीजदेयकात सवलत देणाऱ्या कृषी संजीवनी योजनेसह शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत त्रुटी असल्याचं सांगत, शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश शिलाईच्या प्रक्रियेवर दानवे यांनी आक्षेप घेत, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करावं, अशी मागणी दानवे यांनी केली.
मराठवाड्यासाठी घोषीत ४६ हजार कोटी रुपयांची घोषणा गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या बैठकीत करण्यात आली होती, मात्र अर्थसंकल्पात यासंदर्भात काहीही ठोस उल्लेख नसल्याचं, तसंच छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी ७३४ कोटी रुपयांची आवश्यक असतांना, सरकारकडून काहीही मदत केली गेली नसल्याचं, दानवे यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या जवळपास ३० लाख फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण आखण्याची गरज, काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा केला, राज्याने तशा��्रकारे फेरीवाला धोरण आखणं अपेक्षित होतं, परंतु १० वर्षानंतरह��� राज्यात फेरीवाल्यांसाठी ठोस धोरण नाही, असं पटोले म्हणाले. पावसाळा सुरु असताना फेरीवाल्यांवर कारवाई करणं अन्यायकारक असून, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. या मुद्द्यावर मंगळवारी चर्चेचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील उपाहारगृहात “भरडधान्य महोत्सव” घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.
****
विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने या निवडणुकीसाठी आता मतदान होणार असल्याचं स्पष्ट झालं ���हे. एकूण ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून, १२ जुलै रोजी मतदान होऊन त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनं पहिल्या पसंतीची २३ मतं मिळवणं आवश्यक आहे.
****
वैद्यकीय शिक्षणासासाठीची पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी परीक्षा येत्या ११ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे, याबाबत राष्ट्रीय वेद्यकीय शिक्षण परीक्षा परिषदेने एक परिपत्रक जारी केलं असून, ११ ऑगस्टला दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा परिषदेने गेल्या २२ जून रोजी नियोजित असलेली ही परीक्षा पुढे ढकलली होती.
****
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी - एसएनडीटी महिला विद्यापीठाने आपली आंतरराष्ट्रीयस्तरावर 'दृश्यता' वाढवण्यासाठी एक प्रदर्शन केंद्र तसंच विद्यार्थ्यांसाठी ‘आऊटरीच सेंटर निर्माण करावं, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केली आहे. विद्यापीठाचा १०९वा स्थापना दिवस आज मुंबईत राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. देशी बियाणांच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपरे या कार्यक्रमाला विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. माती वाचवली तर पिढ्या वाचतील असं सांगून विद्यार्थिनींनी पुस्तकासोबत निसर्गाचं देखील ज्ञान घ्यावं, असं आवाहन राहीबाई पोपरे यांनी यावेळी केलं.
****
कांदा आणि दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर इथं आज खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. बस स्थानक जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सहभाग घेतला.
****
बीड जिल्ह्यातल्या शिरूर-कासार तालुक्यातल्या रेल्वे मार्गावरील गावांमध्ये उड्डाण पूल उभारण्यात यावेत, यासाठी बीडचे ��मदार संदीप क्षीरसागर यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन हा प्रश्न रेल्वेमंत्र्यांशी बोलून मार्गी लावण्याची विनंती केली आहे. रेल्वेमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने क्षीरसागर यांनी पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी कळवलं आहे.
****
धनगर आरक्षणासाठी लातूर इथं सुरू असलेल्या आंदोलनाकडे आमदार धीरज देशमुख यांनी विधानसभेचं लक्ष वेधलं. शासनानं एक शिष्टमंडळ पाठवून या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्याची विनंती देशमुख यांनी केली. धीरज देशमुख यांच्या या सूचनेची दखल घेण्याचे निर्देश तालिका अध्यक्षांनी दिले.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृध्दी गाव अभियानाला आजपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत गावातील जलस्त्रोतांच्या पुर्नभरणावर भर दिला जाणार असल्याचं, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड माँ के नाम उपक्रम राबवण्याचं आवाहन केलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वन विभागाच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयासाठी मोफत रोपटे वितरित करण्यात येत असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.
****
समस्यांचं समाधान म्हणजेच संशोधन असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजेंद्र लडकत यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं, ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या प्रकल्पाअंतर्गत हर्सुल इथल्या महापालिकेच्या शाळेत ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, याच अनुभवातून समस्येचं उत्तर नक्की मिळतं, असं लडकत यांनी सांगितलं.
****
0 notes
Text
महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज पांडे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड https://prasidhipramukh.in/?p=8986
0 notes
Text
नागपूरकर पांडे नवे देशाचे लष्कर प्रमुख; महाराष्ट्राला सलग दोनदा सैन्यदलाचे प्रमुखपद मिळण्याची पहिलीच वेळ
नागपूरकर पांडे नवे देशाचे लष्कर प्रमुख; महाराष्ट्राला सलग दोनदा सैन्यदलाचे प्रमुखपद मिळण्याची पहिलीच वेळ
नागपूरकर पांडे नवे देशाचे लष्कर प्रमुख; महाराष्ट्राला सलग दोनदा सैन्यदलाचे प्रमुखपद मिळण्याची पहिलीच वेळ नागपूर : भारतीय सैन्य दलाच्या प्रमुखपदी जनरल मनोज पांडे यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. पांडे मूळचे नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांना सैन्यदलाच��� सर्वोच्च पद मिळाल्याने नागपूरकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ते जनरल मनोज नरवने यांची जागा घेतील. सैन्यदलाचे प्रमुखपद सलग दोनदा महाराष्ट्राला…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 November 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ नोव्हेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. **** ** राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या शपथ घेणार ** शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर घटक पक्षांचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या स्थापनेची घोषणा ** सरकार कोणाशीही सुडबुद्धीनं वागणार नाही- उद्धव ठाकरे ** सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा आणि ** देशभरात संविधान दिन उत्साहात साजरा **** राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या २८ नोव्हेंबरला शपथ घेणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या आमदारांची काल सायंकाळी मुंबईत बैठक झाली, या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडीतले इतर घटकपक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लोकभारती आणि अपक्ष यांची महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाल्याची घोषणा करण्यात आली. आघाडीमध्ये समन्वयासाठी एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती, दुर्लक्षित घटकांच्या समस्या, यासारख्या मुद्यांवर काम करण्यासाठी आघाडीची समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं किमान समान कार्यक्रमात नमूद करण्यात आलं आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करण्याचा ठराव मांडला, या ठरावाला तिन्ही पक्षांनी अनुमोदन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. सगळ्यांच्या संमतीनं ही जबाबदारी स्वीकारत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. आपलं सरकार कोणाशीही सुडबुद्धीनं वागणार नाही, असं सांगत त्यांनी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन वेगळ्या विाचरधारेचे पक्ष एकमेकांवर विश्वास ठेऊन देशाला वेगळी दिशा देत असल्याचं सांगितलं. गेले ३० वर्ष ज्या पक्षासोबत राहीलो त्यांनी नाही, तर ज्यांच्यावर टीका केली त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असंही ठाकरे यांनी नमूद केलं. या बैठकीनंतर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, महाराष्ट्र विकास आघाडीला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्रही त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सोपवलं. त्यानंतर राज्यपालांनी ठाकरे यांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं आणि ३ डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं. **** तत्पूर्वी, काल सकाळी सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस यांना आज बुधवार सायंकाळपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वा��ाली सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं, या याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याच्या राजकारणात काल वेगानं घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. वैयक्तिक कारणावरून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. पवार यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहावं, असं राज्यपालांनी फडणवीस यांना सांगितलं. त्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी, राजीनामा देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे आपल्याकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसं संख्याबळ राहिलेलं नाही, इतर पक्षांचे आमदार फोडण्याची किंवा घोडेबाजार करण्याची आपल्या पक्षाची भूमिका नसल्यानं, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. अवघ्या चार दिवसात फडणवीस सरकार कोसळल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी फडणवीस यांचा राजीनामा हा राज्यातल्या अकरा कोटी नागरिकांचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. **** दरम्यान, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांनी काल सायंकाळी शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. कोळंबकर आज विधानसभेच्या उर्वरित दोनशे सत्त्याऐंशी नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. सकाळी आठ वाजेपासून विधानसभेच्या या सत्राला प्रारंभ होईल. **** काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. काल मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. **** २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काल अकरा वर्ष झाली. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजॉय मेहता, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संसदेनं संविधान स्वीकारण्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहा��ची काल संयुक्त सभा घेण्यात आली. या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, संविधानानं दिलेल्या हक्कांचा वापर करण्यासोबतच संविधानानं नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिट जारी करण्यात आलं. दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभेवर बहिष्कार टाकत, संसद भवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष तसंच द्रविड मुनेत्र कळघमच्या खासदारांचा समावेश होता. **** ७० वा संविधान दिन राज्यातही विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. औरंगाबाद इथं, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले सभागृहात संविधानातल्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन केलं. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या वतीनं संविधान जनजागृतीपर दुचाकी फेरी काढण्यात आली. जालना नगरपालिका आणि संविधान बचाव कृती समितीच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. परभणी महानगर पालिकेच्या महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे यांनी महापालिकेतले पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संविधानाची शपथ दिली. जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, मानवत, सेलू, पालम, गंगाखेड, सोनपेठ आदी ठिकाणी विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला. लातूर इथं तिरंगा फेरी काढून संविधान दिन साजरा झाला. संविधानदिनानिमित्त ठिकठिकाणी व्याख्यान तसंच माहितीपर अन्य कार्यक्रमही घेण्यात आले. याशिवाय राज्यभरात अनेक शाळा महाविद्यालयांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केलं. भारत हा सार्वभौम लोकशाही असणारे गणराज्य असून इथली शांतता आणि बंधुतेच्या वातावरणात सर्व धर्म शांततेने नांदत आहेत असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी केलं. नांदेड शहरात संविधान जागर यात्रा काढण्यात आली होती. जिल्हा शासकीय ग्रंथालय अधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचं सामुहिक वाचन, संविधान आणि त्यासंबंधीत साहित्य, ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागातल्या सर्व महत्व���च्या रेल्वे स्थानकांवर आणि नांदेडच्या विभागीय रेल्वे कार्यालयातही संविधान दिन साजरा करण्यात आला. **** औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, राज्य किसान आंदोलन - स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं काल संविधान दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर कष्टकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. माथाडी कायद्याची काटेकोर अंमबलबजावणी करावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावं, शेतीमालास खर्चाचे दीडपट हमी भाव द्यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 November 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक -२६ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** संविधानातले आदर्श अंगिकारण्यासाठी निरंतर प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. संसदेनं संविधान स्वीकारण्याला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संसदेच्या दोन्ही सभागृहांची आज संयुक्त सभा घेण्यात आली. या संयुक्त सभेला राष्ट्रपती संबोधित करत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी, संविधानाने दिलेल्या हक्कांचा वापर करण्यासह संविधानाने नेमून दिलेल्या कर्तव्यांचं पालन करणं आवश्यक असल्याचं नमूद केलं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात कर्तव्य पालनातूनच हक्कांची सुरक्षा शक्य असल्याचं सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष नाणी तसंच टपाल तिकिट जारी करण्यात आलं. दरम्यान, विरोधी पक्षांनी मात्र महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या संयुक्त सभेवर बहिष्कार टाकत, संसद भवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष तसंच द्रविड मुनेत्र कळघमच्या खासदारांचा समावेश होता. **** संविधान दिवस आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होत आहे. लातूर इथं तिरंगा फेरी काढून संविधान दिन साजरा झाला. गडचिरोली इथं संविधान जनजागृती फेरी काढ���्यात आली. संविधानदिनानिमित्त ठिकठिकाणी व्याख्यान तसंच माहितीपर अन्य कार्यक्रमही घेण्यात आले. याशिवाय राज्यभरात अनेक शाळा महाविद्यालयांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही करण्यात आलं. **** राज्यसरकारची बहुमत चाचणी उद्या बुधवारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका परवा रविवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, या याचिकेवर आज निर्णय सुनावताना, न्यायालयानं उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि त्यानंतर लगेचच बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हंगामी अध्यक्षांद्वारेच ही चाचणी घेण्यात यावी, त्यासाठी नियमित अध्यक्ष निवडीची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं. ही चाचणी गुप्त मतदान पद्धतीद्वारे न घेता, या प्रक्रियेचे थेट प्रसारण करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. **** या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेस तसंच शिवसेनेच्या सदस्यांनी आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू असा विश्वास व्यक्त केला. ***** भारतीय जनता पक्ष उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गिरीश महाजन तसंच आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात आली. आज सायंकाळी भाजपच्या सर्व आमदारांची मुंबईत बैठक होणार असल्याचं, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. **** काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आज मुंबईत काँग्रेस आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी या बैठकीत थोरात यांची विधीमंडळ गटनेते पदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. **** २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज अकरा वर्ष होत आहेत. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजॉय मेहता, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली. **** औरंगाबाद इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, राज्य किसान आंदोलन - स्वराज्य आंदोलन आणि मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं आज संविधान दिन हा कष्टकरी आत्मसन्मान दिन म्हणून पाळण्यात येत आहे. ****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
राज्यसरकारची बहुमत चाचणी उद्या बुधवारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका परवा रविवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती, या याचिकेवर आज निर्णय सुनावताना, न्यायालयानं उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि त्यानंतर लगेचच बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. हंगामी अध्यक्षांद्वारेच ही चाचणी घेण्यात यावी, त्यासाठी नियमित अध्यक्ष निवडीची आवश्यकता नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं. ही चाचणी गुप्त मतदान पद्धतीद्वारे न घेता, या प्रक्रियेचे थेट प्रसारण करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. **** २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज अकरा वर्ष होत आहेत. हा हल्ला मोडून काढताना वीरमरण आलेले पोलिस, सैन्यदलाचे जवान आणि हल्ल्यात बळी पडलेले सर्वसामान्य नागरिक यांना आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं. मुंबई पोलिस जिमखान्यात पोलिस स्मारक परिसरात झालेल्या या अभिवादन सभेत, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्य सचिव अजॉय मेहता, पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस महानिरीक्षक संजय बर्वे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभागी होत, आदरांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्वीट संदेशाच्या माध्यमातून या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला आपण प्रणाम करतो, त्यांचं बलिदान राष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील, असं नायडू यांनी या संदेशात म्हटलं आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्यात १६६ भारतीय तसंच परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ३०० नागरिक जखमी झाले होते. **** नांदेड इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायण पांडूरंग चन्नावार यांचं काल सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षे वयाचे होते. चन्नावार हे नांदेड कापड व्यापारी संघटना तसंच, नांदेड मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपानंतर अंत्यसंस्कार होणार आहेत. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 August 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि. **** आमच्या सर्व श्रोत्यांना ७२ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. लक्ष विचलित करणाऱ्या प्रश्नांमध्ये अडकून उद्दिष्टांपासून भरकटू नये - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं आवाहन सैन्यदलाचे शौर्य पुरस्कार जाहीर; हुतात्मा व्रह्मपालसिंह यांना सर्वोच्च कीर्ती चक्र; मेजर आदित्य कुमार, हुतात्मा औरंगजेब, हुतात्मा रवींद्र धनावडे यांच्यासह अठरा जणांना शौर्य चक्र लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुकांसाठी कायदेशीर तरतूद आवश्यक - मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी आता १०० टक्के अनुदान आणि औरंगाबाद इथं वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नसल्याचा पोलिस आयुक्तांचा निर्वाळा **** देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, आपलं काम निष्ठापूर्वक करणारे नागरिक, स्वातंत्र्याच्या आदर्शांचं पालन करत असल्याचं प्रतिपादन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, ती उद्दीष्टं आता दृष्टीपथात आली असल्याचं सांगतानाच, लक्ष विचलित करणाऱ्या प्रश्नांमध्ये अडकून पडू नये तसंच निरर्थक वादविवादात उ��ी घेऊन, उद्दिष्टांपासून भरकटू नये, असं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं. महात्मा गांधीजींचे अहिंसा आणि स्वदेशीचा वापर हे विचार आजही महत्त्वाचे असल्याचं, ते म्हणाले. कृषी, महिला सक्षमीकरण, युवककल्याण, या विषयांवरही राष्ट्रपतींनी भाष्य केलं. गरीबी, निरक्षता, आणि असमानता दूर करणं, ही फक्त सरकारची नव्हे, तर सर्वांची जबाबदारी असून, या दिशेनं सुरू असलेले आपले प्रयत्न यशस्वी व्हावेत, यासाठी सरकारी योजनांचा पुरेपूर वापर करावा, देशाचं काम हे स्वत:चं काम समजावं, असंही राष्ट्रपती म्हणाले. **** सैन्यदलाचे शौर्य पुरस्कार काल जाहीर झाले. हुतात्मा व्रह्मपालसिंह यांना सर्वोच्च कीर्ती चक्र जाहीर झालं आहे. शौर्य चक्र विजेत्या अठरा जवानांमध्ये मेजर आदित्य कुमार, हुतात्मा औरंगजेब, हुतात्मा रवींद्र धनावडे यांचा समावेश आहे. याशिवाय ९३ सेना पदकं, अकरा नौ सेना पदकं तर तीन वायुसेना पदकंही काल जाहीर झाली. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, सुधारक सेवा, अग्निशमन दल तसंच पोलिस सेवेसाठीची ९४२ पदकं काल जाहीर झाली. महाराष्ट्रातल्या आठ पोलिसांना शौर्यपदकं, तीन कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकं तर ४० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदकं जाहीर झाली आहेत. **** देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण सोहळा नवी दिल्लीत साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशाला संबोधित करतील. सकाळी सात वाजून पाच मिनिटांपासून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे, तर नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे हुतात्मा जवान किरण थोरात यांच्या कुटुंबियांना आज, स्वातंत्र्यदिनी औरंगाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते पंचवीस लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत, थोरात यांना वीर मरण प्राप्त झालं होतं. **** लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी तशी कायदेशीर तरतूद करणं आवश्यक असल्याचं, मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे, ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. विधानसभांच्या कार्यकाळात कपात किंवा वाढ करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. एकत्रित निवडणुकांसाठी व्ही व्ही पॅट यंत्रांसह अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा भासण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. दरम्यान, २०२४ साली देशातल्या सर्व सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी घेणं शक्य असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे, ते काल नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. **** केंद्र पुरस्कृत योजनांच��� अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांनी यासंबंधीचा परिपूर्ण आराखडा १५ दिवसात सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. शिष्यवृत्ती, मानधनाच्या रकमा लाभार्थ्यांच्या खात्यात त्या त्या महिन्याच्या निश्चित तारखेस जमा केल्या जाव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. **** गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. काल झालेल्या सुनावणी दरम्यान, गोंड आणि गोवारी हे दोन स्वतंत्र समाज असल्याचं खंडपीठानं नमूद केलं. या निर्णयामुळे समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा, या मागणीसाठी गोवारी समाजाचा गेल्या तेवीस वर्षांपासून लढा सुरू होता. या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर गोवारी बांधवांनी मोर्चा काढला होता, यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारींचा मृत्यू झाला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबवण्यात येणारी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना, आता १०० टक्के अनुदानाची करण्यात आली आहे. याबाबतचं परिपत्रक शासनानं जारी केलं आहे. अधिक माहितीसाठी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** राज्यातल्या दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेशाची मुदत आता ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. **** आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ब्याण्णवावं संमेलन, यवतमाळ इथं होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काल ही औपचारिक घोषणा केली. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा, डॉक्टर वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय संयुक्तपणे हे संमेलन आयोजित करणार आहे. निमंत्रक संस्थांच्या आमंत्रणावरून संमेलन स्थळ निवड समितीनं, पाच ऑगस्टला यवतमाळला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर काल ही घोषणा करण्यात आली. **** औरंगाबाद इथं नऊ ऑगस्टला वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नसल्याची बाब तपासात समोर येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी ��िली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ५३ जणांना अटक करण्यात आली असून या तोडफो���ीचा सखोल तपास करूनच आरोपींना अटक करत असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. **** राज्यात १६ जिल्ह्यांमध्ये ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमाद्वारे जगनजागृती करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढल्याचं या अभियानाचे सुकाणू अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितलं. ते म्हणाले……. यामध्ये ग्रामीण पातळीवर मुलीच्या जन्माचे स्वागत बालिका दिन साजरा करणे, बालिका पंधरवाडा साजरा करणे आणि त्या अनुषंगाने मुलीच्या जन्म दर वाढविण्यासाठी आणि सोबतच मुलीचे शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमाचे कालबद्ध कार्यक्रम मागील वर्षामध्ये राबवण्यात आला. आणि याचंच यश म्हणून हिंगोली जिल्ह्यातील मुलीच्या जन्म दरामध्ये एक चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. पुर्वीचा ९१६ असलेला जन्मदर हा ९२४ वर पोहचलेला आहे. **** माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त लातूर महानगरपालिकेत काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. लातूरचे महापौर सुरेश पवार यांनी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठवाड्यात अनेक ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. **** औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बजाज कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून उभारलेल्या इन्क्यूबेशन सेंटरचं उद्घाटन काल झालं. बजाज कंपनीचे कार्यकारी संचालक प्रदीप श्रीवास्तव यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. भविष्यातल्या उद्योजक निर्मितामध्ये हे केंद्र महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास कुलगुरू डॉ.बी.ए.चोपडे यांनी यावेळी व्यक्त केला. **** औरंगाबादचे छायाचित्रकार बैजू पाटील यांना तामिळनाडूतल्या कोइंबतूर इथं आयोजित डीजे स्मृती वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. या स्पर्धेत ३२ देशांतल्या आठ हजार ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र असं पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराचं स्वरुप आहे. **** नागपंचमीचा सण आज साजरा होत आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथं साजऱ्या होत असलेल्या नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. ६३ नागमंडळांवर नऊ पथकांच्या माध्यमातून १०० वन आणि पोलीस कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत. *****
0 notes