#सुप्रिया सुळे
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 February 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उद्या साजरी होणार असून, त्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव ब्रुद्रुक इथं साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसर्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेउद्या होणार आहे. शिवजयंती महोत्सव समितीतर्फे उद्या सकाळी लालमहालातून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा ही मिरवणुक काढण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या सप्ताहादरम्यान शोभायात्रा, व्याख्यान, चित्र आणि पुस्तकांचं प्रदर्शन, शिवकालीन वस्तूंचं प्रदर्शन तसंच किल्ले, गडकोट आणि दुर्ग स्वच्छता मोहीम इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे शिवरायांची भव्यदिव्य अशी प्रतिकृती साकारली होती. ९९५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. नांदेड इथं उद्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने "जय शिवाजी- जय भारत पदयात्रा" काढण्यात येणार आहे. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने क्रांती चौक परिसरात शिवोत्सव सुरु असून, आज यात ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि महाराष्ट्र शासनाच्या दुर्ग संवर्धन समितीचे मुख्य मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे यांचं ‘शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरप��च संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असतील, तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मस्साजोग इथं आज देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा असून, त्यांनी या प्रकरणात विशेष लक्ष द्यावं, याप्रकरणी त्यांची भेट घेणार असल्याचं सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, २५ फेब्रुवारी पर्यंत या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा देशमुख कुटुंबियांसह मस्साजोग ग्रामस्थांनी दिला आहे.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतल्या टिळक भवनमध्ये मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार, मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातल्या ग्रामसेवक संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून असहकार आंदोलन सुरू केलं आहे. जिल्ह्यातल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचं मागील पाच वर्षापासून रखडलेलं वितरण तातडीने करावं, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, डोंगरकडा इथल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या कामाचं मूल्यांकन करावं, वैद्यकीय प्रतिपूर्तीची देयकं तातडीने निकाली काढावीत, मुद्रांक शुल्काची परिपूर्ण माहिती द्यावी, आदी मागण्या संघटनेनं केल्या आहेत. सुमारे ३०० ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. जगातल्या सर्वात मोठ्या मानवी मेळाव्यात आतापर्यंत सुमारे ५३ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दिल्ली इथं होणार्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे इथून साहित्यरसिकांना दिल्लीला घेऊन जाणारी विशेष रेल्वे उद्या दुपारी निघणार असून, परवा २० तारखेला रात्री दिल्लीला पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान मराठी साहित्ययात्री संमेलन भरवलं जाणार आहे. या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं असून, प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावं दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात‌’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.
महाकुंभमेळ्यासाठी असलेल्या औरंगाबाद-पाटणा-औरंगाबाद या विशेष रेल्वेला परतूर रेल्वे स्थानकावर तात्पुरता थांबा जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष गाडी औरंगाबाद इथून १९ आणि २५ फेब्रुवारीला सुटेल, तर परतीच्या प्रवासात पाटणा इथून २१ आणि २७ फेब्रुवारीला सुटेल.
राज्यातल्या अनुसूचित जातीच्या २५ हजार विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, माहूर आणि हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आयोजित चौदाव्या जागतिक धम्म परिषदेत ते बोलत होते.
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण , पोलिसांना बोलण्याचा अधिकार आहे मारण्याचा नव्हे
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण , पोलिसांना बोलण्याचा अधिकार आहे मारण्याचा नव्हे
परभणी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू ही हत्या आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परभणीत केलेला आहे.  सुप्रियाताई सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी देखील भेट दिली आणि आंदोलकांशी देखील संवाद साधला.  सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की…
0 notes
6nikhilum6 · 6 months ago
Text
Pune : शिक्षणात मातृभाषेविषयी प्रेम, अस्मिता, आस्था आणि राज्य व देशाविषयीचा इतिहास असावा - सुप्रिया सुळे
Pune : शिक्षणात मातृभाषेविषयी प्रेम, अस्मिता, आस्था आणि राज्य व देशाविषयीचा इतिहास असावा – सुप्रिया सुळे – MPC…
0 notes
automaticthinghoagiezine · 8 months ago
Video
youtube
अजित दादा बदलले सुप्रिया सुळे यांचा खुलासा..
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
भुजबळ-जरांगे यांची जुंपली, सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे
https://bharatlive.news/?p=184456 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : सुप्रिया ...
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
शरद पवारांना धमकी | शरद पवारांना काही झालं तर गृहखातं जबाबदार : सुप्रिया सुळे
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
"...तर अमित शाहांशी चर्चा करावी लागेल" अतुल भातखळकरांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm 97
“…तर अमित शाहांशी चर्चा करावी लागेल” अतुल भातखळकरांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | supriya sule rection on atul bhatkhalkar allegations on sharad pawar patrachal scam rmm 97
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर न्यायालयाने पुन्हा राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. दरम्यान, ईडी अर्थातच सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंही नाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र: 'ओ भोगी, योगींकडून काही तरी शिका', अमृता फडणवीस यांनी घेतली ठाकरे सरकारची खरडपट्टी, मग जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर
महाराष्ट्र: ‘ओ भोगी, योगींकडून काही तरी शिका’, अमृता फडणवीस यांनी घेतली ठाकरे सरकारची खरडपट्टी, मग जाणून घ्या सुप्रिया सुळेंनी काय दिले उत्तर
शरद पवार यांची कन्या अमृता फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आज (29 एप्रिल, शुक्रवार) खासदार सुप्रिया सुळे (NCP) यांनी अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला आपली प्रतिक्रिया दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे (राज ठाकरेमशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्यासाठी वित्तीय संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद • वाढीव मतदार प्रकरणी महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी • रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात २५ बेसीक पॉईंटची कपात • राज्यशासनाच्या वाङ्ममय पुरस्कारांची घोषणा-ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर मसापला मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धन पुरस्कार आणि • अजिंठा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष झा��बड यांना पोलिस कोठडी
राज्यातल्या नदीजोड प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्यासाठी विविध वित्तीय संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, कोरियन एक्झिम तसंच एएफडी बँकेशी यासंदर्भात बैठक घेतली. मराठवाडा वॉटरग्रीड योजना, नारपार सिंचन प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेसह समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. तापी रिचार्ज योजनेबाबतही मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
देशातली सर्वात मोठी औद्योगिक इकोसिस्टीम विदर्भात गडचिरोलीला केंद्रस्थानी ठेऊन तयार होत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल नागपूर इथं, अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५ या औद्योगिक महोत्सवात ते बोलत होते. वर्धन लिथियम��्या ४२ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे विदर्भात एक पथदर्शी इकोसिस्टीम तयार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंख्या वाढल्याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी महाविकास आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही मागणी केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारसंख्या ३९ लाखांनी कशी वाढली असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. आपल्याला या मतदार यादीबाबत माहिती देण्याची मागणी गांधी यांनी केली, ते म्हणाले… ‘‘हमने इलेक्शन कमिशन को पांच बार बोला है, की हम आरोप नही लगा रहे है। हम आपसे सिर्फ महाराष्‍ट्र की वोटर्स लिस्ट मांग रहे है। लोकसभा की फाईनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। विधानसभा की फायनल वोटर लिस्ट। नेम, ॲड्रेस, फोटोग्राफ। तीनों राजनेतीक पार्टीयां, विपक्ष की पार्टींयां महाराष्‍ट्र की पब्लिकली आपसे सवाल पूछ रही है। मैने पार्लमेंट मे बोला, हमारे सब नेतोओं ने बोला इलेक्शन कमिशन हमे लिस्ट नही दे रही। उनकी जिम्मेदारी बनती है, की जल्दी से जल्दी लोकसभा, विधानसभा महाराष्ट्र की लिस्ट वो एन सी पी, शिवसेना अँड काँग्रेस पार्टी को पकडा दे। क्यों की हम इस इन्वेस्टीगेशन को एंड तक ले जाना चाहते है।’’
गांधी यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची तपशीलवार लेखी उत्तरं दिली जातील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. लोकशाहीत राजकीय पक्ष हा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं तसंच त्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत असं आयोगानं सामाजिक संपर्क माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसला दिल्ली निवडणुकीत पराभवाची भीती वाटत असल्यानं राहुल गांधी विनाकारण असे प्रश्न उपस्थित करत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी पराभवाबद्दल आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाच्या मोजणीनं या प्रक्रियेला प्रारंभ होईल, दुपारपर्यंत सर्व ७० जागांचे कल हाती येण्याची शक्यता आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर असलेल्या रेपोदरात २५ बेसीक पॉईंटची कपात केली असून, रेपो दर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे. बँकेचे ��व्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल मुंबईत बॅंकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. जागतिक पातळीवरच्या अस्थिर परिस्थितीचं कारण देत रिझर्व्ह बँकेनं काल आर्थिक वृद्धीदरांच्या अंदाजातही कपात केली. चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर सहा पूर्णांक चार दशांश टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यशासनाचे विविध वाङ्गमय पुरस्कार काल जाहीर झाले. या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव उर्फ रा रं बोराडे यांना जाहीर झाला आहे. श्री.पु. भागवत पुरस्कार, पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशनला, डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ.रमेश सूर्यवंशी यांना आणि मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेलाही भाषा संवर्धनासाठी मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. इतर पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये रेखा बैजल यांना साने गुरूजी पुरस्कार, सुनीता सावरकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २७ तारखेला मुंबईत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाला ‘कवितांचे गाव’ म्हणून, रत्नागिरी जिल्ह्यात कवी केशवसूत यांच्या मालगुंड या गावाला ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
वीट भट्यासाठी मोकळया हायवामधून होणारी राखेची अवैध वाहतुक प्रदुषण वाढवणारी असून, ती वाहतुक बदं हायवामधून होईल याकडे संबधितांनी लक्ष घालून तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत. त्या काल बीड इथं एका बैठकीत बोलत होत्या. चिमणीपासूनचं प्रदुषण नियत्रंणात असलं तरी राख उचलणे हे संबधित अधिका-यांचे कर्तव्य आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. राखेचे अनाधिकृत साठे सील करावेत, वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत, राखेची वाहतुक मुख्य रस्त्यांवरून न करता ती बाह्य मार्गाने करावी, असंही मुंडे म्हणाल्या.
छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या ९७ कोटी ४१ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आणि बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांना न्यायालयानं १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. झांबड यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं, वर्षभराहून अधिक काळापासून झांबड फरार होते.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ पन्नालाल पापडीवाल यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र राज्य तीर्थक्षेत्र समितीच्या अध्यक्षपदासह विविध संस्थांवर महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. आदिवासी समाजासाठी त्यांनी सुमारे दोन दशकं उल्लेखनीय कार्य केलं होतं.
नांदेड इथल्या साध्वी गार्गी देशपांडे यांचं काल हिमालयातल्या उत्तरकाशी इथे निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. नांदेड जिल्ह्यातल्या गोरठा मधल्या संत दासगणू प्रतिष्ठानमध्ये त्यांनी ४० वर्ष देवा केली. गार्गी देशपांडे यांच्या पार्थिव देहावर आज उत्तरकाशी इथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काल प्रथमच देहदानाची नोंद झाली. शहरातील एका नागरीकाने आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांचा देह महाराष्ट्र ॲनाटोमी ऍक्ट अंतर्गत शासकीय वैद्यकीय महावि���्यालयाला दान केला. दानात मिळालेल्या या मृतदेहांचा वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र विभागातल्या विद्यार्थांना शिक्षणासाठी उपयोग होतो. परभणी जिल्ह्यात देहदानासंदर्भात जनजागृती सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यातल्या कौडगाव औद्योगिक वसाहतीत होवू घातलेल्या टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमध्ये उद्योग उभारण्यासाठी इच्छुक उद्योजकांना राज्य सरकारच्या खास धोरणांचा मोठा लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. ते काल धाराशिव इथं बोलत होते. औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून देशातील नामांकित निर्यातदार कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आमंत्रित करण्याबाबत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी निर्णायक भूमिका घेतली असून, त्यामुळे दहा हजार रोजगार निर्मितीचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट आता सुकर झाले आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यातल्या शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्याचा लाभ कायम रहावा यासाठी ई-केवायसी आणि मोबाईल सिडींग करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या पाच लाख ६५ हजार लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित असून, ई केवायसी पूर्ण करून घेण्यासाठी गाव निहाय शिबीरं घेण्यात येत आहे. शिधापत्रिका धारकांनी या शिबिराचा लाभ घ्याव, असंही चौधर यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात १० फेब्रुवारीपासून हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम सुरू केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली.
0 notes
nagarchaufer · 5 months ago
Text
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणीताई लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल,  सुप्रियाताई म्हणाल्या की ?
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणीताई लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल,  सुप्रियाताई म्हणाल्या की ?
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खासदार सुप्रिया सुळे यादेखील तसेच खासदार निलेश लंके हे देखील यावेळी उपस्थित होते. खासदार निलेश लंके यांनी यावेळी बोलताना , ‘ पारनेरच्या बाजारतळावर आता ऐतिहासिक सभा होत आहे. माझ्या माता भगिनींनी मला दिल्लीत पाठवले आहे तर राणी लंके यांना देखील सर्वाधिक मताधिक्याने विधानसभेत पाठवल्याशिवा��…
0 notes
automaticthinghoagiezine · 9 months ago
Video
youtube
मतदानाच्या दिवशी पैसे वाटले सुप्रिया सुळे..
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
"आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
https://bharatlive.news/?p=179918 "आपलं नाणं मार्केटमध्ये खणखणीत चालतंय", काय म्हणाल्या सुप्रिया ...
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
संसदेत 98 टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो? सुप्रिया सुळे यांचा सवाल
संसदेत 98 टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो? सुप्रिया सुळे यांचा सवाल
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा झटका बसला. न्यायालयाच्या आजच्या निर्णयानं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याची आशाही मावळली आहे. त्यानंतर त्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत, केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
"मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी..."; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान | Supriya Sule Says I believe in Amit Shah He will surely give justice in pratap sarnaik ed case slams bjp too scsg 91
“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान | Supriya Sule Says I believe in Amit Shah He will surely give justice in pratap sarnaik ed case slams bjp too scsg 91
“अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील,” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये रविवारी सायंकाळी हे विधान केलं. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीसंबंधित ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes