Tumgik
#साहित्य अकादमी युवा पुरस्कार
studycarewithgsbrar · 2 years
Text
दो कन्नड़ लेखकों ने केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार जीते - टाइम्स ऑफ इंडिया
दो कन्नड़ लेखकों ने केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार जीते – टाइम्स ऑफ इंडिया
बैंगलोर: प्रख्यात युवा लेखक दादापीर जिमेन और उपन्यासकार तमन्ना बेगरा 2022 के लिए केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित किया गया। साहित्य अकादमी युवा पुरस्कार अपने लघु कहानी संग्रह ‘नीलाकुरिंजी’ के लिए, तमन्ना बीग्रा ने अपने बच्चों के उपन्यास ‘बावली गुहे’ के लिए ‘चिल्ड्रन लिटरेचर अवार्ड’ जीता है। तमन्ना बेगरा बल्लारी तालुक के हागरी बोमनहल्ली के रहने वाले एक बैंगलोरवासी, जैमन ने अपनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
विविध भाषातील २३ युवा लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
मराठीमध्ये देविदास सौदागर, भारत सासणे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार नवी दिल्लीः इंग्रजी लेखक के वैशाली आणि हिंदी लेखक गौरव पांडे व मराठीचे देविदास सौदागर यांना यावेळी साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. साहित्य अकादमीने शनिवारी विविध भाषांमधील प्रतिष्ठित युवा पुरस्कार प्राप्त 23 लेखकांची नावे जाहीर केली. याशिवाय 2024 च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी 24…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटनासह, साडे ३० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन 
मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकसित भारत संकल्प यात्रेत आत्तापर्यंत १२ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवल्याची केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांची माहिती
आणि
मोहाली इथं झालेल्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर सहा गडी राखून विजय
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नाशिक इथं सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. विकसित भारत ॲट ट्वेंटी फोर्टी सेवन : युवा के लिए, युवा के द्वारा’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. त्यानंतर पंतप्रधान मुंबईतल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करतील. त्याचबरोबर ३० हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजनही त्यांच्या हस्ते होईल. नमो महिला सशक्तीकरण अभियान त्यांच्या हस्ते सुरू केलं जाणार आहे. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन याद्वारे सक्षम केलं जाणार आहे.
****
मराठवाडा म्हणजे दुष्काळ ही ओळख पुसली गेली पाहिजे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथं काल गंगापूर उपसा सिंचन योजनेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गंगापूर तालुक्यात ४० गावांमधल्या ३० हजार एकर क्षेत्राला या सिंचन योजनेचा लाभ होणार आहे. गेल्या दीड वर्षापासून मराठवाड्यातल्या अनेक प्रकल्पांना सरकारने मंजूरी दिली असून, छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातल्या सिंचनाच्या कामांना मंजूरी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘५१ कोटी रुपयाची सुधारित मान्यता आपण त्याठिकाणी दिली. ज्यातलं मराठवाड्यामध्ये ४ लाख ६९ हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे, म्हणजे जवळपास पाच लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली आणण्याचा काम यातून त्याठिकाणी करतो आहे.’’
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, ग्रामविकास मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रशांत बंब यावेळी उपस्थित होते.
****
राज्यात काल कोविड १९ च्या १४४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात जेएन-वन या प्रकारानं बाधित रुग्णांची संख्या २५० झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल कोविडचे दोन रुग्ण आढळले असून, जिल्ह्यात सध्या २६ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३१ जानेवारीपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं सुरुवात होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे अधिवेशन नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
****
२०२३ चा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मराठीसाठी विशाखा विश्वनाथ यांच्या, ‘स्वत:हाला स्वत:विरुद्ध उभे करतांना’, या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. आज कोलकाता इथं या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारं बातमीपत्र आजपासून येत्या २२ तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत आत्तापर्यंत १२ कोटीपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी दिली. ते काल मुंबईत भायखळा इथं या यात्रेत बोलत होते. या यात्रे��्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांचे लाभ तळागाळातल्या गरजू नागरिकांपर्यंत पोहचत असल्याचं ते म्हणाले.
**
या यात्रेचं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केलं. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
**
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचं उद्घाटन झालं.
**
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या खानापूर फाटा इथल्या रेखा उबाळे आणि विजय टाक यांनी त्यांना मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
****
आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी काल हिंगोली इथं आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचा आढावा घेतला. जिल्ह्यात औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव या दोन ठिकाणी दररोज आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
शेटे यांनी काल परभणी इथंही आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेतला. या योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार असून, राज्यात येत्या दोन महिन्यात आणखी तीनशे पन्नास रुग्णालयं सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथल्या यात्रेसाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. नांदेड प्लॉगर्सच्या वतीनं प्लास्टिक मुक्तीसंदर्भात पथनाट्याद्वारे जनजागृती केली जात आहे. तसंच प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी ग्रामसेवक संघटंनानी मोहीम हाती घेतली आहे. या यात्रेत काल अश्व आणि विविध पशु प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते झालं. तर आज या यात्रेत भव्य कुस्त्यांची दंगल होणार आहे.
****
धाराशिव इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. १८ तारखेला देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठा होऊन शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे.
****
भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान काल मोहाली इथं झालेल्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर सहा गडी राखत विजय मिळवला. अफगाणिस्ताननं दिलेलं १५९ धावांचं लक्ष्य भारतानं चार गड्यांच्या मोबदल्यात अठराव्या षटकात पूर्ण केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं नमो चषक क्रीडा स्पर्धा येत्या १९ ते २४ तारखेदरम्यान होणार असल्याची माहिती, छत्रपती संभाजीनगर ऑलंम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी दिली आहे. ही स्पर्धा उद्यापासून सुरु होणार होती, मात्र स्पर्धेत खेळाडूंचा वाढता प्रतिसाद आणि सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नांदेडहून सुटणारी नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज सकाळी साडे नऊ ऐवजी दुपारी चार वाजता सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
0 notes
sharpbharat · 2 years
Text
Jamshepur- national teacher award-कदमा टाटा वर्कर्स यूनियन प्लस टू हाईस्कूल की शिक्षिका को मिलेगा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, झारखंड से एकमात्र चयनित शिक्षिका
Jamshepur- national teacher award-कदमा टाटा वर्कर्स यूनियन प्लस टू हाईस्कूल की शिक्षिका को मिलेगा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार, झारखंड से एकमात्र चयनित शिक्षिका
जमशेदपुर: पूर्वी सिंहभूम जिला के जमशेदपुर के लिए बुधवार और गुरुवार का दिन गौरव भरा रहा जब दोनों ही दिनों में राष्ट्रीय स्तर पर पुरस्कार जमशेदपुर की झोली में आया. जहां बुधवार को भरा रहा जब बुधवार को  बारीगोड़ा निवासी सालगे हांसदा को साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2022 के लिए चुने गए. वहीं गुरुवार को कदमा स्थित टाटा वर्कर्स यूनियन प्लस टू हाईस्कूल की विज्ञान शिक्षिका शिप्रा मिश्रा का चयन राष्ट्रीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
navabharat · 2 years
Text
क्षमा शर्मा को बाल साहित्य, भगवंत अनमोल को युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिलेगा
क्षमा शर्मा को बाल साहित्य, भगवंत अनमोल को युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिलेगा
नयी दिल्ली. साहित्य अकादमी ने हिंदी में क्षमा शर्मा को बाल साहित्य पुरस्कार तथा भगवंत अनमोल को युवा साहित्य पुरस्कार दिये जाने की बुधवार को घोषणा की. अकादमी ने उर्दू में जÞफर कलामी और अंग्रेजी में अर्शिया सत्तार समेत कुल 22 भाषाओं के लेखकों-लेखिकाओं को बाल साहित्य पुरस्कार 2022 दिए जाने की घोषणा की है जबकि 23 भाषाओं के लेखक-लेखिकों को युवा साहित्य पुरस्कार प्रदान किए जाएंगे अकादमी के सचिव के…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
नमिता गोखले, ब्रात्य बसु साहित्य अकादमी 2021 के विजेता | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
नमिता गोखले, ब्रात्य बसु साहित्य अकादमी 2021 के विजेता | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
नई दिल्ली: अंग्रेजी उपन्यासकार नमिता गोखले, बंगाली नाटककार ब्रात्य बसु, और लेखक अंबाई, जॉर्ज ओनाक्कूर और वली मोहम्मद कश्तवारी उन 20 लेखकों में से थे जिनकी कृतियों को गुरुवार को के विजेता घोषित किया गया साहित्य अकादमी 2021 के लिए पुरस्कार। 20 भाषाओं में फैले पुरस्कारों में कविता की सात पुस्तकें, दो उपन्यास, पांच लघु कथाएँ, दो नाटक और एक जीवनी, आत्मकथा, महाकाव्य कविता और आलोचना शामिल हैं। साहित्य…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद
१४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा; साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी होणार संवाद
मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या वतीने दि. 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी  आणि वाचनसंस्कृती, भाषा आणि जीवन  यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही…
View On WordPress
0 notes
a-2-z-news · 2 years
Text
विशेष साक्षात्कार: लेखक और इतिहासकार मनु एस पिल्लई 'झूठे सहयोगी' पर, राजा रवि वर्मा, ब्रिटिश राज के दौरान भारतीय राजघराने, और बहुत कुछ - टाइम्स ऑफ इंडिया
विशेष साक्षात्कार: लेखक और इतिहासकार मनु एस पिल्लई ‘झूठे सहयोगी’ पर, राजा रवि वर्मा, ब्रिटिश राज के दौरान भारतीय राजघराने, और बहुत कुछ – टाइम्स ऑफ इंडिया
लेखक और इतिहासकार मनु एस पिल्लई को किसी परिचय की आवश्यकता नहीं है। उनकी पहली गैर-फिक्शन किताब, ‘द आइवरी थ्रोन’ ने उन्हें 2017 में साहित्य अकादमी युवा पुरस्कार दिलाया। उनकी दूसरी कृति, ‘रिबेल सुल्तान्स’, दक्कन की कहानी 13वीं शताब्दी के अंत से लेकर भारत की शुरुआत तक बताती है। 18 वीं सदी। पिल्लई की तीसरी पुस्तक ‘द कर्टेसन, द महात्मा एंड द इटालियन ब्राह्मण’ में भारत के अतीत की विभिन्न परतों के…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
साहित्य अकादमीकडून तरुण लेखकांचा सन्मान ; किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांना पुरस्कार
साहित्य अकादमीकडून तरुण लेखकांचा सन्मान ; किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांना पुरस्कार
साहित्य अकादमीकडून तरुण लेखकांचा सन्मान ; किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांना पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कारांची गुरुवारी घोषणा झाली. यामध्ये २२ प्रादेशिक भाषांसाठी युवा पुरस्कार घोषित करण्यात आले The post साहित्य अकादमीकडून तरुण लेखकांचा सन्मान ; किरण गुरव, प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांना पुरस्कार appeared first on Loksatta. मुंबई : गेल्या दशकभरात नावारुपाला आलेल्या आणि लिहित्या तरुण…
View On WordPress
0 notes
jknewsinfo · 3 years
Photo
Tumblr media
साहित्य अकादमी का वार्षिक युवा पुरस्कार प्राप्त करने वाली पहली डोगरा युवा कवयित्री बनीं सहायक प्रोफ़ेसर गंगा शर्मा साहित्य अकादमी, नई दिल्ली द्वारा भारतीय विद्या भवन, बेंगलुरु, कर्नाटक में 17 - 19 अक्तूबर 2021 तक आयोजित "युवा पुरस्कार अर्पण समारोह- 2020" के अंतर्गत डोगरी भाषा का युवा पुरस्कार सहायक प्रोफ़ेसर गंगा शर्मा को प्रदान किया गया । साहित्य अकादमी के अध्यक्ष चंद्रशेखर कंबार की अध्यक्षता में आयोजित इस समारोह के मुख्य अतिथि प्रोफेसर अरुण कुमार थे । इस अवसर पर अकादमी के सचिव के.श्रीनिवास राव भी मौजूद रहे । युवा कवयित्री गंगा शर्मा को यह पुरस्कार उनकी वर्ष 2018 में छपी 29 कविताओं के संग्रह " मनै दा बुआल" के लिए प्रदान किया गया । पुरस्कार के अंतर्गत उनको एक ताम्र फलक, प्रशस्ति पत्र व ₹५०,००० का चेक प्रदान किया गया । गंगा शर्मा जी के मंच पर पुरस्कार प्राप्त करते ही पूरा सभागार तालियों से गूंज उठा । ज्ञातव्य है कि जम्मू कश्मीर के कठुआ ज़िले की हीरानगर तहसील के गांव करवाल में रहने वाले राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कारों से सम्मानित सेवानिवृत्त लेक्चरर श्रीमान राजकुमार एवं राज्य पुरस्कार द्वारा सम्मानित सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती गीता देवी की सुपुत्री गंगा शर्मा वर्तमान समय में राजकीय महिला कॉलेज के डोगरी विभाग की विभागाध्यक्ष एवं सहायक प्रोफ़ेसर के पद पर कार्यरत हैं । उनको इस पुरस्कार से पहले "स्वामी ब्रह्मानंदतीर्थ सम्मान " व "डुग्गर रत्न" जैसे पुरस्कारों से भी सम्मानित किया जा चुका है । पुरस्कार प्राप्त होने के बाद सभागार में अपने संबोधन में उन्होंने बेटियों की शिक्षा में गुणवत्ता लाने पर और अपनी मातृ भाषा को प्राराभिक शिक्षा से ही सिखाने पर ज़ोर दिया । https://www.instagram.com/p/CVO_j3jhjGC/?utm_medium=tumblr
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या ३१ जानेवारीपासून सुरवात.
·      कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढण्यास मुभा.
·      कोरोना लसीकरण बंधनकारक करण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी.
·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘नामविस्तार दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा.
आणि
·      उस्मानाबाद इथं ड्रोनच्या सहाय्यानं पिकावरील फवारणी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन सत्रात चालणाऱ्या या अधिवेशनाचं पहिलं सत्र ३१ जानेवारी ते ११ फे‍‍‍ब्रुवारी दरम्यान तर दुसरं सत्र १४ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत चालेल. १ फे‍‍‍ब्रुवारीला २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
****
केंद्र तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यातून एकूण जमा निधीपैकी एक लाख रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. मेडिकल क्लेम अंतर्गत कर्मचाऱ्यांना हे पैसे काढता येणार असून यासाठीच्या नियमात लवकरच बदल करण्यात येणार आहे. भविष्य निर्वाह निधी कार्यालयानं यासंदर्भात एक पत्रक जारी केलं. ईपीएफओ सदस्य कोणतीही कागदपत्रं सादर न करता त्यांच्या पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकणार असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे.
****
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कायदेशीर दृष्टीने बंधनकारक करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. लसीकरण ऐच्छिक असल्याने अनेकजण लस घ्यायला टाळाटाळ करत असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
राज्यात १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन गट, ६० वर्षांपुढील ज्येष्ठांचा गट, आणि आरोग्य कर्मचारी तसंच आघाडीच्या कोविड योद्ध्यांचा तिसरा गट, असं तीन गटांना लसीकरण सुरू आहे. राज्यात कोविड लसींच्या मात्रांचा तुटवडा जाणवत असून, ९८ लाख लोक लसीच्या पहिल्या मात्रेपासून वंचित आहेत.
लसीकरणाला गती मिळावी याकरता कोविशिल्ड लसीच्या ५० लाख आणि कोवॅक्सिन लसीच्या ४० लाख मात्रांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. राज्यात लहान मुलांचं ४० टक्के लसीकरण झालं असून अशीच गती राहिल्यास १५ दिवसांत लसीकरण पूर्ण होईल असंही टोपे म्हणाले.
****
राज्य सरकारच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला आजपासून प्रारंभ झाला. २८ जानेवारीपर्यत चालणाऱ्या या पंधरवड्यांतर्गत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा लेखकांशी संवाद, तरुण कवींचं संमेलन, ‘मराठी खऱ्या अर्थानं ज्ञानभाषा होईल का?’ या विषयावर आभासी परिसंवाद, तसंच ‘मी काय वाचतो?’ या विषयावर आभासी व्याख्यानाचं आयोजन केलं जाणार आहे. २८ जानेवारीला साहित्य अभिवाचनानं या पंधरवड्याचा समारोप होईल.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा ‘नामविस्तार दिन’ आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या’ नामविस्ताराच्या निर्णयाने राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम झाला, असं पवार यांनी म्हटलं आहे.
 नामांतर आंदोलनात मराठवाड्यात अनेकांच्या घरा-दाराची राख झाली. मात्र, फिनिक्स पक्षाप्रमाणे नवीन समतावादी पक्षांची पिढी उभी राहिल्याचं, मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीचे प्राध्यापक मंगेश बनसोड यांनी म्हटलं आहे. नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्याख्यानात ‘नामविस्तार आणि सामाजिक न्यायाची अपेक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाचा नामविस्तार ही सामाजिक आणि राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना असून, समतेचं आंदोलन आता खूप पुढे गेलं असल्याचं डॉ.बनसोड यांनी नमूद केलं.
 विद्यापीठ नामविस्तारासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा सैनिकांच्या स्मारकाचं भूमिपूजन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते आज करण्यात आलं. विद्यापीठ प्रवेशद्वाराचं नूतनीकरणही करण्यात येणार असल्याचं कुलगुरुंनी यावेळी सांगितलं. नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंबेडकर अनुयायी अभिवादन करत आहेत.
****
केपटाऊन कसोटी क्रिकेट सामना दक्षिण आफ्रिकेनं सात गडी राखून जिंकला. विजयासाठी भारतीय संघाने दिलेलं २११ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने आज सामन्याच्या चौथ्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासोबत दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघासोबत झालेली तीन कसोटी सामन्यांची ही मालिकाही जिंकली आहे. दरम्यान दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना येत्या बुधवारी १९ जानेवारीला होणार आहे.
****
उस्मानाबाद इथं ड्रोनच्या सहाय्यानं पिकावरील फवारणी तंत्रज्ञानाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या ड्रोन प्रात्यक्षिकाचा उस्मानाबाद जवळील पळसवाडी शिवारात केलेला प्रयोग यशस्वी झाला. फक्त १२ लिटर पाणी आणि २०० मिलीलिटर औषधामध्ये १० मिनिटांपेक्षा कमी वेळेत अर्धा एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर फवारणी करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, पाणी याची बचत होणार आहे, कीड अथवा रोगांचा प्रार्दुभाव निदर्शनास येताच, लगेच फवारणी करणंही शक्य होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण इथल्या नियोजित मोसंबी रोपवाटिका “सिट्रस इस्टेट” या योजनेसाठी ३६ कोटी ४४ लाख ९९१ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी ही माहिती दिली. ही तरतूद टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं. पैठण केंद्रबिंदू मानून १०० किलोमीटर परिघात या रोपवाटिकेचं कार्यक्षेत्र राहणार आहे. मराठवाड्यात सुमारे ३९ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर मोसंबी उत्पादन घेतलं जातं. त्यापैकी औरंगाबाद जिल्हात २१ हजार ५२५ हेक्टर आणि जालना जिल्हात १४ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रावर हे उत्पादन घेतलं जातं.  
****
जालना जिल्ह्यात आज नवे १६३ तर नांदेड जिल्ह्यात आज नवीन ५५३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात आज २३ रुग्णांना तर नांदेड जिल्ह्यात १२८ रूग्ण बरे होऊन घरी परतले. जालना जिल्ह्यात सध्या ४८२ तर नांदेड जिल्ह्यात सध्या एक हजार ८६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
                                ****
0 notes
sharpbharat · 2 years
Text
jharkhand-proud- हजारीबाग के मिहिर वत्स को मिला अंग्रेजी के युवा साहित्य अकादमी पुरस्कार, आईआईटी दिल्ली में हैं टीचिंग असिस्टेंट
jharkhand-proud- हजारीबाग के मिहिर वत्स को मिला अंग्रेजी के युवा साहित्य अकादमी पुरस्कार, आईआईटी दिल्ली में हैं टीचिंग असिस्टेंट
रांची: हजारीबाग पर यात्रा वृतांत लिखने वाले मिहिर वत्स को इस वर्ष अंग्रेजी का युवा साहित्य अकादमी पुरस्कार के लिए चुना गया है. मिहिर इन दिनों आईआईटी दिल्ली में टीचिंग असिस्टेंट हैं और उनकी लिखी पुस्तक “टेल्स ऑफ हजारीबाग: एन इंटिमेट एक्सप्लोरेशन ऑफ छोटानागपुर प्लैटो” काफी चर्चित रही है. बुधवार को 23 भाषाओं के लिए साहित्य अकादमी पुरस्कारों की घोषणा की गयी. मिहिर वत्स ने पुरस्कार के लिए चुने जाने पर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
अकादमी पुरस्कार पाने के लिए दो साहित्यकार
अकादमी पुरस्कार पाने के लिए दो साहित्यकार
BHUBANESWAR: ओडिशा के दो साहित्यकारों रामचंद्र नायक और चंद्रशेखर होटा को उनकी साहित्यिक कृतियों के लिए साहित्य अकादमी के बाल साहित्य पुरस्कार 2020 और युवा पुरस्कार 2020 के लिए चुना गया था। नायक को उनकी कहानियों के लिए ‘बाल साहित्य पुरस्कार’ ‘बाना देउला रे सुन नेला’ मिलेगा, जबकि होटा को उनके निबंध ‘चेतनारा अन्वेशन’ के संग्रह के लिए ‘युवा पुरस्कार’ मिलेगा। बाल साहित्य पुरस्कार 2020 के लिए 11 ओडिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार
‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ला मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली, 31  : किरण गुरव लिखित ‘बाळुच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथा संग्रहाला साहित्य अकादमीचा सर्वोत्तम मराठी कलाकृतीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. संजय वाघ लिखित ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादंबरीस मराठीतील सर्वोत्तम बालसाहित्याचा तर प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी मराठीभाषेकरिता युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने गुरुवारी वर्ष 2021च्या मुख्य पुरस्कारासह, युवा…
View On WordPress
0 notes
Text
अकादमी पुरस्कार पाने के लिए दो साहित्यकार
अकादमी पुरस्कार पाने के लिए दो साहित्यकार
BHUBANESWAR: ओडिशा के दो साहित्यकारों रामचंद्र नायक और चंद्रशेखर होटा को उनकी साहित्यिक कृतियों के लिए साहित्य अकादमी के बाल साहित्य पुरस्कार 2020 और युवा पुरस्कार 2020 के लिए चुना गया था। नायक को उनकी कहानियों के लिए ‘बाल साहित्य पुरस्कार’ ‘बाना देउला रे सुन नेला’ मिलेगा, जबकि होटा को उनके निबंध ‘चेतनारा अन्वेशन’ के संग्रह के लिए ‘युवा पुरस्कार’ मिलेगा। बाल साहित्य पुरस्कार 2020 के लिए 11 ओडिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
onlinekhabarapp · 4 years
Text
लेख्नको निम्ति हामीसंग नेपालमा भन्दा धेरै विषय छन्
वर्ष २०७६ मा नेपाल र भारतको नेपाली साहित्यमा ‘फातसुङ’ उपन्यास चर्चित रह्यो । युवा आख्यानकार छुदेन काविमोको यो उपन्यासले पश्चिम बंगालका लेप्चा जनजातिको कथा बोलेको छ । सन् २०१८ मा प्रकाशित कथासंग्रह ‘१९८६’ (नाइन्टिन एटिसिक्स) का लागि काविमोले ‘युवा अकादमी पुरस्कार’ जितेका थिए ।
लेप्चा भाषामा ‘फातसुङ’को अर्थ माटोको कथा भन्ने हुन्छ । उपन्यासमा त्यही माटोको कथा र त्यहाँ हुने राजनीति, जातीय असमानता र वर्गीय शोषणलाई मुख्य विषय बनाइएको छ । भारतको सिलगुढी बस्ने काविमोसँग उनको साहित्यिक जीवन र समकालीन साहित्यबारे विशाल नाल्बोले गरेको कुराकानीः
लेखनका प्रारम्भिक दिनहरू कस्ता थिए तपाईंका । रोचक घटना पनि छन् ती दिनका ?
सन् २००७ तिर म बाग्राकोट हाइस्कुलमा पढ्थें । स्कुलमा गजबको माहोल थियो, जहाँ हामी आफैं भित्तेपत्रिका निकाल्थ्यौं । त्यो ‘सुनचरी’ पत्रिकाको जमाना थियो । एकदिन ‘सुनचरी’ पढ्दै गर्दा साथी लीलबहादुर छेत्रीले ‘चित्र कविताको निम्ति कस्तो राम्रो नक्सा दिएको रहेछ, तिमी प्रेम लेख्ने मान्छे, लेख्ने कोसिस गरी हेर न’ भने ।
मैले नक्सा हेरें । समुद्र किनारमा तरुण जोडी उभिएको थियो । म रोमाञ्चित भइहालें । उतिबेला म डायरीमा गजल लेख्थें । त्यो कुरा लीलबाहेक अरूलाई थाहा थिएन । उसले देखाएको नक्सा हेरेपछि गजलको तीन शेर फुरिहाल्यो । मैले त्यही गजल पोस्ट गरिदिएँ ।
अचम्म भो, चित्र कविता प्रतियोगिता त्यही गजलले जितेछ, पुरस्कार स्कुलमै आइपुग्यो । त्यसपछि त लगातार गजल लेख्न थालें । दैनिक सात वटासम्म गजल लेख्थें त्योबेला । अहिले सम्झिँदा लाज लाग्छ ।
त्यस्तैमा अचानक एकदिन मैले लामो कथा लेखें, जुन ‘हिमालय दर्पण’मा छापियो । छापिएको त्यो कथा सागर सरले क्लासमा नै पढेर सुनाइदिनुभयो । अनि भावुक बन्दै अन्तिममा जोडिदिनुभयो, ‘यति सुन्दर कथा मैले जीवनमा पढेकै थिइनँ ।’
अब त स्थापित लेखक भइसक्नु भो । समाजलाई कतिको उपयोगी चिज दिइरहेछु जस्तो लाग्छ ?
समाज बिनाको साहित्य हुँदैन । यो समयमा भारतेली नेपाली साहित्य पहिलेभन्दा बढी समाजमुखी बनिरहेको अनुभव म गर्छु । रक्सी खाएर वा चुरोट तान्दै कोठामा बसेर साहित्य गरिन्छ भन्ने भ्रम कसैले नराखे हुन्छ । साहित्य अब रिसर्चमा निर्भर भइसक्यो । त्यसैले साहित्यमा धेरै समाज नै आइरहेको छ ।
यस्तो बेला मेरो कोसिस समाजको तल्लो वर्गको कथा पनि भन्नसक्नुपर्छ भन्नेमा हुन्छ । हाम्रो समाज महाश्वेता देवीको कथा ‘हजार चौरासीकी मा’ जस्तै छ । माथिबाट हेर्दा सबै ठीकठाक देखिन्छ, तर भित्र धेरै कुरा मिलेको छैन । त्यही नमिलेका थोकहरू देखाउने कोसिस म आफ्नो लेखनमा गरिरहेको हुन्छु ।
भारतमा नेपाली साहित्य पहिचानको संकटमा छ ?
भारतेली नेपाली साहित्यको मूल स्वर नै पहिचानको मुद्दा हो । यसका निम्ति हरेक पुस्ताका लेखकले काम गरिरहेका छन् । तर, पहिचान भनेको डाइनामिक कुरा हो । पहिचान भन्नासाथ हामी राष्ट्रिय पहिचानलाई धेरै ‘फोकस’ गर्ने अनि यसका धरातलहरूलाई साइड लगाइरहेका हुन्छौं ।
कहिलेकाहीं त हामी राजनीतिले सिकाएको नारा नै पहिचानको नाममा साहित्यमा लेखिरहेका हुँदा रहेछौं । राजनीतिले गर्ने काम नै हामीले पनि दोहोर्‍याउने हो भने साहित्यको अलग महत्व के रह्यो र !
यो संकटलाई साहित्यले कसरी सम्बोधन गर्छ ?
राष्ट्रिय स्तरको गोर्खे पहिचानको धरातल निर्माण गर्ने पहिचानका अन्य स–साना मुद्दाहरू छन् । ती मुद्दाहरू पनि नेपाली साहित्यको आवाज बन्नु पर्‍यो ।
जस्तो, म नेपाली भाषी गोर्खासंगै एकजना जनजाति पनि हुँ । मेरा केही गोर्खा साथी दलित पनि छन् । जनजाति र दलित पनि हाम्रो पहिचान हो । फेरि आर्थिक वर्गीकरणले पनि मान्छेको पहिचान तय गर्छ । मसंग कविता कर्म गर्न रूचाउने गोर्खे श्रमिक साथीहरू पनि छन् ।
यीबाहेक महिला पहिचानको अलग ‘डिस्कोर्स’ छ । यी सब जोड़िएर राष्ट्रिय स्तरमा गोर्खा पहिचान बन्ने हो । त्यसो हुँदा सबैको मुद्दालाई नेपाली साहित्यले समेट्न सक्नुपर्छ ।
यी सबै मुद्दा बलियो बन्नु भनेको नै राष्ट्रिय पहिचानको सवाल बलियो बन्नु हो । यसैले नेपाली साहित्यमा यी मुद्दाहरूलाई अझै टड्कारोसँग ल्याउनुपर्छ भन्ने मेरो मत छ ।
फातसुङले समाजमा गतिलो स्वागत पायो । केहीले दार्जिलिङका नेपालीहरूको दुःख ठीकसँग लेख्न सकेन पनि भने । यसमा तपाईंको मत के छ ?
फातसुङले यति धेरै प्रेम पाउँछ भनेर मैले सोचेको थिइनँ । यसको निम्ति म हरेक पाठकलाई धन्यवाद भन्न चाहन्छु । समीक चक्रवर्तीले यसलाई बंगलामा अनुवाद गरेका छन् । अब अंग्रेजी र हिन्दी अनुवाद पनि बजारमा आउला ।
फातसुङमार्फत पाएको हरेक पाठकको प्रेम मेरा निम्ति विशेष छ । मलाई यहाँ एक जना बंगला पाठकको सन्दर्भ झिक्न मन लाग्यो ।
कलकत्तामा ‘पिपल्स लिटरेरी फेस्टिभल’ थियो, कार्यक्रम सकेर हलबाट निस्किँदै गर्दा एक युवक आएर सुस्तरी भने, ‘गोर्खाल्याण्ड आन्दोलन हुँदा म जन्मिएको थिइनँ । मेरा परिवार एक समयका कट्टर सीपीएम हुन् । त्यही भएर होला, गोर्खा भन्नसाथ मलाई घृणा लाग्थ्यो । फातसुङ पढेपछि मेरो त्यो नजरिया बदलियो । म एकचोटि दार्जीलिङ पुग्न चाहन्छु ।’
अब भन्नुस्, कथा कसको निम्ति लेख्ने ? जसले हाम्रो पीड़ा बुझेकै छैन, उसलाई बुझाउन कि जसले नबुझेको अभिनय गरिरहन चाहन्छ, उसको निम्ति ? फातसुङ दार्जिलिङको नेपाली समाजको कथा होइन भने कसको हो त ?
२०१८ मा तपाईको पहिलो आख्यान ‘१९८६’ ले ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ पायो । प्रतिष्ठित पुरस्कारपछि एउटा लेखकको जीवनमा कस्��ो भिन्नता आउने रहेछ ?
पुरस्कारले मात्र लेखकको साहित्यिक जिम्मेवारी बढाउने होइन । साहित्य अकादमी नपाउने राजनारायण प्रधानले जीवनको अन्तिम समयमा पनि लेखिरहे । उनलाई आज पनि हामी प्रेमपूर्वक पढिरहेका छौं ।
हाम्रा केही राष्ट्रिय पुरस्कार बिजेताहरू पुरस्कृत भएपछि हराएका पनि छन् । राम्रो किताब बनोस् भनेर रातारात खट्ने सम्पादकहरूको जिम्मेवारीको कथा अलग छ, जो सधैं अनदेखा हुन्छन् ।
जस्तो– सुधीर छेत्री, सञ्जय विष्टहरूलाई हाम्रौ आँखा अगाडि छन् । यहाँबाट निस्किने धेरैजसो किताबको सम्पादन उनीहरू गरिरहेका हुन्छन् । उनीहरुले पाउने चाहिँ धन्यवाद मात्र हो । तैपनि उनीहरूले आफ्नो जिम्मेवारी छाड़ेका छैनन् । खासमा साहित्यप्रतिको जिम्मेवारी भाषा–साहित्यप्रतिको प्रेमले तय गर्ने हो ।
राष्ट्रिय पुरस्कार पाएपछि मैले मनमनै संकल्प गरेको थिएँ– अब नेपाली पाठकलाई किताबको संख्या होइन, किताब नै दिने कोसिस गर्नेछु ।’ पुरस्कारले दिलाएको सबै भन्दा ठूलो जिम्मेवारी यही पो हो कि !
साहित्यमा गुटबन्दीलाई कुन हिसाबले लिनुहुन्छ ? फरक–फरक साहित्यिक अभियानको रूपमा वा वैचारिक मतभेदको रूपमा ?
यसलाई साहित्यिक अभियानकै रूपमा लिन सकिन्छ, किनकि यसरी नै साहित्यको विकास हुँदै जाने हो । कहिलेकाहीँ आफ्नो गुटका सबै उत्कृष्ट, अर्को समूहको जम्मै बेकार भन्ने सोंच बोक्नेहरू निस्किदिँदा भने समस्या हुदो रहेछ ।
त्यस्तोबेला गुटबाजीले गलत बाटोतिर पो धकेल्ने हो कि भन्ने लाग्छ, तर सामूहिक प्रतिस्पर्धाले नेपाली साहित्यलाई नयाँ उचाइमा पुर्‍याउने हो ।
नयाँ किताब लेख्नुहुँदैछ भन्ने सुनिएको छ । कुन विषयमा छ ?
भारतेली नेपाली साहित्य लेख्नेहरूका निम्ति कन्टेन्टको कमी छैन । हामीसंग नेपालमा भन्दा धेरै विषयहरू छन् । समस्या के छ भने, हामीले नेपालका लेखकहरूले झैं लेखनको निम्ति संघर्ष गर्न सकिरहेका छैनौं । त्यसैले उनीहरूले झैं राम्रा किताब दिन सकिरहेका छैनौं !
अबको किताबमा भूगोल पनि थोरै अलग ल्याउने कोसिस गर्नेछु । रिसर्चको काम केही मात्रामा गरिसकेकोछु । ल्यापटप नभएर लकडाउनमा लेख्न सकिन । मूर्तिकार अमीर सुन्दासले ल्यापटप पठाएर काम खुलाइदिएका छन् ।
यतिबेला म नयाँ सिर्जनाको जरामा नै छु, त्यसैले अहिले नै फल वा फूलको कुरा नगरि हालुम् होला । लेखिसक्नै एकदुई वर्ष लाग्न सक्छ ।
0 notes