Tumgik
#साथीदारांनाही
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण;लोकसभेत आज दोन तरुणांची घुसखोरी;लातूरच्या तरुणाचा समावेश
राज्यातल्या आरोग्य विभागाच्या विविध प्रश्नावरून विधानसभेत विरोधक आक्रमक
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
आणि
केंद्रीय पथकाकडून आज छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव जिल्ह्यात नुकसानाची पाहणी
****
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्ष पूर्ण झाली. हा दहशतवादी हल्ला मोडून काढताना धारातिर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आज देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. संसद भवन परिसरात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
दरम्यान, लोकसभेत आज दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानं, सदनात एकच गदारोळ झाला. शून्य प्रहराचं कामकाज सुरु असतांना प्रेक्षक दीर्घेतून उभ्या असलेल्या दोघांनी सभागृहात खासदारांच्या बाकांवर उडी मारली, काही खासदारांनी या दोघांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. या दोघांसह संसद भवन परिसरात असलेल्या त्यांच्या साथीदारांनाही सुरक्षा रक्षकांनी अटक करून पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केलं. यापैकी एक तरूण लातूर जिल्ह्यातला असल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले. चौकशीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल, तसंच संसदेची सुरक्षा अधिक चोख करण्यात येईल, असंही बिर्ला यांनी सांगितलं आहे.
****
विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेतल्या घुसखोरीबाबत माहिती दिली.
यापैकी दोघांनी प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसंच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तसेच सभागृहात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरूणाचं नाव सागर असल्याचं समोर आलं आहे. तर संसदेबाहेर स्मोक कँडल पेटवणारा अमोल शिंदे हा तरूण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याचं समोर येत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंग असल्याचं समोर येत आहे. अजून पुढचा तपास त्याठिकाणी चालू आहे.
या घुसखोरांपैकी अमोल शिंदे या लातूर जिल्ह्यातल्या झरी इथल्या तरुणाच्या घरी पोलिस दाखल झाले असून त्याच्या कुटुंबियांची कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे.
****
राज्यातल्या आरोग्य विभागातल्या विविध प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेत आज आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार प्रणिती शिंदे यांनी आरोग्य विभागातले विविध प्रश्न उपस्थित केले. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात आरोग्य व्यवस्था ढासळल्याचा आरोप करत, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्यानं, विरोधकांनी सभात्याग केला.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधानसभेत काल सुरू झालेली चर्चा आज पुढे सुरू झाली. आशिष शेलार, राजेश टोपे, नाना पटोले, छगन भुजबळ, भास्कर जाधव आदी मान्यवर सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली.
****
राज्यातील हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हलाल प्रमाणपत्रावर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली असून महाराष्ट्रातही अशी बंदी आणावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली, या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिले.
****
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढयांमध्ये रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र-ॲलिकॉट मशीन येत्या महिन्याभरात बसवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. राज्यात ३१ रक्तपेढ्यांपैकी सध्या फक्त ८ रक्तपेढ्यांध्ये तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी फक्त ३ ठिकाणी ॲलिकॉट यंत्र उपलब्ध आहे.
****
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, आदी मराठी चित्रपटांसह नायक, सिंघम यासह अनेक हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्राचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
****
डॉ. मोहन यादव यांनी आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तर छत्तीसगढचे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांनी आज शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे इतर ज्येष्ठ नेते, यावेळी उपस्थित होते.
****
संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच सोलापूर जिल्ह्यात पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात मोहहिरा, बोनवाडा, खांबखेडा, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर तसंच धनवट या गावात पाहणी करून, पथकाने कापूस, तूर आणि मका पिकांचं झालेलं नुकसान जाणून घेतलं.
धाराशिव तालुक्यातल्या ताकविकी आणि करजखेडा या गावात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. खरीप हंगामात सोयाबीन पेरणी, खर्च, जनावरांच्या चाऱ्याची सोय यासंदर्भात या पथकाने माहिती घेतली.
सोलापूर जिल्ह्यात या पथकाने माळशिरस तालुक्यात सुळेवाडी इथं शेती पिकाची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली.
****
छत���रपती संभाजीनगर इथल्या नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. क्रीडा विद्यापीठ अनुषंगिक बाबींची शिफारस करणं, क्रीडा विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिफारस करणं अशी या समितीची कार्यकक्षा असणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या ७१ गावांमध्ये पोहोचली असून, गावागावात नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जनजागृती या माध्यमातून होत आहे. गुळहाळ्ळी गावात नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - सचिन गोडखे आणि
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज लातूर जिल्ह्यात अहमदपूर, औसा, चाकूर, जळकोट, निलंगा तालुक्यातल्या विविध गावांमधून मार्गक्रमण करत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरात आज ही यात्रा पोहोचली. नागरिकांनी केंद्र सरकार च्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात निमटोक इथं या यात्रेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विषयक आणि कृषी विषयक माहितीत ग्रामस्थांनी विशेष रस दाखवला.
****
'विकसित भारत संकल्प यात्रा' उद्या परभणी जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील वागदरा, मालेवाडी, बनवस, गिरधरवाडी, सूरपिंपरी, तामसवाडी, चारठाणा, धनेगाव आणि निपाणी टाकळी या गावात यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज रस्ता अपघातात दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले. माजलगाव रस्त्यावर भेंडेखुर्द फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला. हे सर्वजण प्रवास करत असलेल्या चार चाकी गाडीने ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सर्व विभागात कार्यरत असलेल्या यंत्रसामुग्री तसंच वाहनांचं आज दिमाखदार पथ संचलन करण्यात आलं. महानगरपालिकेची कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता शहरवासियांना माहिती व्हावी, या उद्देशाने प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे पथसंचलन करण्यात आलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Shrikant Tyagi arrest : पत्नीला फोन करून श्रीकांत त्यागीला पकडले, पोलिसांनी त्याचा तीन साथीदारांनाही उचलले
Shrikant Tyagi arrest : पत्नीला फोन करून श्रीकांत त्यागीला पकडले, पोलिसांनी त्याचा तीन साथीदारांनाही उचलले
Shrikant Tyagi arrest : पत्नीला फोन करून श्रीकांत त्यागीला पकडले, पोलिसांनी त्याचा तीन साथीदारांनाही उचलले नोएडाच्या सोसायटीतील महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी फरार असलेल्या श्रीकांत त्यागी याला त्याच्या तीन साथीदारांसह अटक करण्यात आली आहे.याआधी शुक्रवारी पत्नी मनू त्यागीला ताब्यात घेण्यात आले होते.मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांतने पत्नीला फोन केला … नोएडाच्या सोसायटीतील महिलेसोबत गैरवर्तन…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 OCT. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक  ०२ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
**** जनतेनं एकत्र काम केल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज स्वच्छ भारत अभियानाला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धांच्या बक्षिसा���चं वाटप करण्यात आलं. स्वच्छता अभियानात अधिकाधिक लोक सहभागी झाले असून, माध्यमांनीही या अभियाचा योग्य रितीनं प्रचार प्रसार केल्याचं पंतप्रधान म्हणाले. स्वच्छता ठेवणं ही आता देशवासियांची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. स्वच्छता ही सेवा अभियानाचा समारोपही आज होत आहे. **** जम्मू काश्मीरमधल्या पुंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळच्या सुमारास लष्करी तळ आणि रहीवाशी भागांवर गोळीबार केला, यात एक लहान मुलगा आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर १२ नागरिक जखमी झाले. बराच वेळ या परिसरात दोन्ही बाजुनं गोळीबार सुरु होता. **** एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवरचं अंशदन पुढच्या वर्षी मार्च पर्यंत बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाअंतर्गत ही वाढ करण्यात आली आहे. **** लष्कर आणि तत्सम सेवांमधल्या नोकऱ्यांमध्ये दलितांसाठी आरक्षण ठेवण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याप्रकरणी आपण लवकरच संरक्षण मंत्र्यांना भेटणार असल्याचं आठवले यांनी पुणे इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. निवडणुकीपूर्वी आम्ही ज्या घोषणा दिल्या होत्या, आश्वासनं दिली होती, त्यांची पूर्तता होण्यासाठी कालावधी लागेल, असं सांगतानाच आठवले यांनी, केंद्राच्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम नजीकच्या काळात दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला. **** मराठी साहित्यातले ज्येष्ठ लेखक ह मो मराठे यांच्या पार्थिव देहावर पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठे यांचं आज पहाटे दिर्घ आजारानं निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. **** स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत आज जालना इथं महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, खासदार रावसाहेव दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी हीरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थीनी, सामाजिक संस्था, नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. **** राज्यातल्या जिल्हा परिषदांमध्ये सध्या शुन्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान गतिमान झालं असून, ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिकार्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ करावीत, असं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मिशन अंत्योदय अंतर्गत हे अभियान पंधरा ऑक्टोबर पर्यंत राबवलं जाणार असलं, तरी अनेक जिल्हा परिषदांनी आधीच स्वच्छतेचं काम सुरू केलं असल्याचं त्या म्हणाल्या. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना गौरवण्यात येणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं. **** कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची न्यायालयीन कोठडी सत्र न्यायालयानं १३ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सध्या कासकर अटकेत आहे. या बरोबरच इकबालच्या आणखी दोन साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. **** मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित ५२वं अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या यजमान पदाचा मान सिंधुदुर्ग मधल्या नेरूरपार इथल्या वसुंधरा विज्ञान केंद्राला मिळाला आहे. येत्या १६, १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या या विज्ञान अधिवेशनाचं उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार असून समारोपाला वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. **** जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात राज्यात कोकण विभागात सरासरीच्या १० टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात १७ टक्के अधिक, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या २३ टक्के कमी पाऊस झाला. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात सरासरीच्या ७० ते ८० टक्के पाऊस पडला. तर विदर्भात अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झाला नसल्याचं यात सांगण्यात आलं. **** पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग काल दुपारी बंद करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर पाण्याची आवक वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जात होता. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 September 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ सप्टेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
अतितीव्र कुपोषित बालकांसाठी वेगळे दिशानिर्देश लवकरच जारी केले जातील, असं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. पूरक पोषणासंदर्भातल्या नव्या मार्गदर्शक सूचना येत्या काही दिवसांत जारी केल्या जातील, असंही त्या म्हणाल्या. बालकांच्या सुरक्षेसोबतच पोषण महत्वाचं असल्याचं सांगत, गांधी यांनी, गर्भवती महिलांना किमान एक हजार उष्मांक, तर बालकांना सहाशे उष्मांकयुक्त आहार मिळणं गरजेचं असल्याचं नमूद केलं. **** केंद्र सरकारचा सागरमाला कार्यक्रम राज्यात राबवण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. त्याअंतर्गत प्रकल्पासाठी राज्याचा ५० टक्के निधी, पुरवणी मागणीद्वारे देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यासाठी विविध स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांवर शासकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यास आणि अभियानाच्या अंमलबजावणी संदर्भात सहकार्य करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये महाराष्ट्र पर्यटन धोरणाशी सुसंगत सुधारणा करायलाही यावेळी मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची मुंबई, पुणे, नागपूर इथं पुढच्या दोन वर्षासाठी खंडपीठं स्थापन करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यासाठी आता एकूण परिषद सदस्यांपैकी किमान द��न पंचमांश सभासदांनी लेखी विनंती करणं आवश्यक करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. **** कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे सत्र न्यायालयानं आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी तीन साथीदारांसह काल ठाणे पोलिसांनी अटक केली. त्याच्या साथीदारांनाही पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इक्बाल यानं खंडणीपोटी चार सदनिका घेतल्या असून, अधिक सदनिकांची मागणी केल्यावर संबंधित व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. इक्बाल यानं आणखी काही व्यावसायिकांकडूनही खंडणी मागितल्याचं ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. **** राज्यात आज जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात दुपारी मुसळधार पाऊस सुरु झाला. सातारा, कोकणातही सगळीकडे आज मुसळधार पावसाचं वृत्त आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस सुरु असून, राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज दुपारी काही वेळ जोरदार पाऊस झाला. पुढच्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. **** पवन ऊर्जेपासून एक हजार २७५ मेगावॅट वीज निर्मिती होत असून, त्यामुळे औरंगाबाद शहरातलं भारनियमन तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. नगरसेवकांसोबत बैठक घेऊन वीज चोरी बंद करण्यासाठी जनजागृती करण्याकरता अभियान राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. **** येत्या गुरुवारी परवापासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून, नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवासाठी संस्थानची तयारी पूर्ण झाल्याचं तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सांगितलं. नऊ दिवसांत दहा लाखांहून अधिक भाविक गडावर दर्शनासाठी येत असल्यानं सर्व चोख बंदोबस्त केल्याचं वरणगावकर यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. **** नाशिक सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्तांनी अवसायकांची नियुक्ती केली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेची सुमारे दीडशे कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं जिल्हा बँकेने या साखर कारखान्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत सभासदांनी विरोध केला असून, आता या बँकेवरील पाच सदस्यीय प्रशासक मंडळ हटवण्यात आलं असून, दोन अवसायक नियुक्त करण्यात आले आहेत. **** अखिल भारतीय एसएनडीटी आंतर महाविद्यालयीन महिला क्रीडा स्पर्धा उद्यापासून औरंगाबाद इथं सुरु होत आहेत. यात देशभरातले २५ महिला संघ सहभागी होणार आहेत. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांच्या हस्ते उद्या सकाळी नऊ वाजता विभागीय क्रीडा संकुल इथं या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र १९ सप्टेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
**** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं आर्थिक वाढीला गती देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांवर चर्चा करण्यासाठी आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि अधिकाऱ्यासोबत बैठक घेणार आहेत. चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उप्तन्न गेल्या तीन वर्षांपेक्षा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. **** आदर्श गृह निर्माण घोटाळ्याप्रकरणी, खटला भरण्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय पक्षपाती असून, तो राजकीय हेतूनं घेण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. या निर्णयाला अशोक चव्हाण यांनी, मुंबई उच्च न्यायालया�� आव्हान दिलं आहे. काल या यासंबधीच्या याचिकेची सुनावणी सुरू झाली असून, पुढील सुनावणी आज होणार आहे. **** कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणी मागितल्याप्रकरणी काल ठाणे पोलिसांनी अटक केली. इक्बाल याच्या तीन साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इक्बाल यानं खंडणीपोटी चार सदनिका घेतल्या असून, अधिक सदनिकांची मागणी केल्यावर संबंधित व्यावसायिकानं केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. **** जालना जिल्ह्यात २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकांचा खर्च सादर न करणाऱ्या, ५४ उमेदवारांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. जालना नगरपालिका प्रशासनानं काल हे आदेश जारी केले. अपात्र उमेदवारांमध्ये जालना, अंबड, भोकरदन आणि परतूर इथल्या उमेदवारांचा समावेश आहे. **** जालना-बुलडाणा मार्गावर आनंदगड घाटात, भरधाव बसनं दोन दुचाकींना धड़क दिल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक दाम्पत्य गंभी�� जखमी झालं. काल रात्री नऊ वाजता ही दुर्घटना घडली. **** ग्रामविकास विभागाच्या वतीनं १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामसमृद्धी आणि स्वच्छता पंधरवाडा साजरा होणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसंच ग्रामपंचायतींनी झीरो पेंडन्सी आणि कार्यालयांची स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. ****
0 notes