Tumgik
#सात्विक साईराज रंकीरेड्डी
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
आयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता २४ तासांहूनही कमी कालावधी शिल्लक असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्त राज्यासह देशभरात  विविध ठिकाणी अनेक धार्मिक-सांकृतिक-सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. अयोध्येच्या सीमांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे संपूर्ण शहराची टेहळणी सुरू आहे. यवतमाळमध्ये श्रीरामभक्त जुगल तिवारी यांनी  अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, ह्या मंदिराच्या दर्शनासाठी रामभक्त गर्दी करीत आहेत . कोल्हापूर इथं  सकल हिंदू समाजातर्फे  ऐतिहासिक दसरा चौकात उभारलेल्या श्रीरामांच्या १०८ फुटी प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. याप्रसंगी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार  धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती.
****
त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांच्या आज स्थापना दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यांच्या स्थापना दिनाबद्द्ल या राज्यातील नागरीकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राज्यांनी भविष्यात प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित करावे असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या नांदखेडा भागामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे काल शासकीय योजनांचे लाभ देण्यात आले तसंच जनजागृती करण्यात आली. शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते यावेळी आयुष्यमान भारत योजना लाभार्थ्यांना पत्र वितरण करण्यात आलं. सोबतच आरोग्य विभागाच्या शिबीराद्वारे आरोग्य तपासणीसह उपचार करण्यात आले. नागरिकांनी आकाशवाणीशी बोलताना विकसित भारत संकल्प यात्रेचे महत्व अधोरेखित केले. 
****
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या उद्या ऐवजी परवा मंगळवारी २३ जानेवारी रोजी  प्रसिध्द केल्या जाणार आहेत. उद्या जाहिर झालेल्या सार्वजनिक सुटीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला इथं पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात काल मतदान विषयक कार्यशाळा झाली. भावी मतदार असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम बनवण्यात आला असून तो शिकवण्यासाठी शाळा - महाविद्यालयांत मतदान प्रक्रीया साक्षरता मंडळांची  स्थापना करण्याचे निर्देश  निवडणूक आयोगानं दिले आहेत. सुदृढ लोकशाही प्रक्रिया आणि मतदानाबाबत जाणीवजागृती करण्याचा यामागचा उद्देश असल्याचं मतदार नोंदणी अधिकारी अनिता भालेराव यांनी सांगितलं. यासंदर्भात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि शाळांनी प्रयत्न करावे, असं  त्या म्हणाल्या.
****
अहमदनगर इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण कामाचं उदघाटन राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झालं. महापालिकेतर्फे हा पुतळा बांधण्यात येत आहे. इंदूमिल इथल्या बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीस वेग देण्यात आला असून डिसेंबर,२०२४ पर्यंत त्याचं काम पूर्णत्वास नेण्यासह  भीमा कोरेगाव इथंही डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचं बनसोडे म्हणाले. अहमदनगर शहरात भव्य बुद्धविहार उभारणीसाठीही निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या इंडियन ओपन सुपर बैडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी पुरुष दुहेरीची अंतिम फेरीत गाठली आहे. आज दुपारी त्यांचा सामना दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या गुरुकुल महागामीमध्ये शार्ङ्गदेव महोत्सवात आज मणिपुरी नृत्यगुरू डॉ दर्शना झव्हेरी यांना शार्ङ्गदेव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. आज मांगनियार लोकगीत गायन तसंच ओडिशी नृत्य सादर होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोही पिंपळगाव इथं एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला हा आपल्या संस्कृतीला लागलेला कलंक  असल्याचं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. त्यांनी अत्याचारित मुलीच्या परिवाराची भेट घेतली, त्यावेळी चिखलीकर बोलत होते. अशा प्रवृत्तींना कायद्यानं वेळीच लगाम लावला पाहिजे, असं ते म्हणाले. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईसाठी आरोपपत्र तयार करावं, अशी सूचना चिखलीकर यांनी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या नमो चषक क्रीडा स्पर्धांमध्ये काल कबड्डी, धनुर्विद्या , शूटिंग बॉल, फुटबॉल, बॅडमिंटन आदी स्पर्धा आकर्षणाचं केंद्र होत्या. आज या स्पर्धेत खो- खो, कुस्ती, मल्लखांब आणि रस्सीखेच या खेळांचा थरार अनुभवता येणार आहे.
****
0 notes
insidebharatnews · 9 months
Text
गेंदबाज मोहम्मद शमी का नाम अर्जुन पुरस्कार के लिए हुआ फाइनल
भारतीय टीम में अपनी गेंदबाजी से लोगों को अपना दिवाना बनाने वाले और भारतीय टीम को अहम मौके पर विकेट दिलाने वाले तेज गेंदबाज मोहम्मद शमी को अर्जुन पुरस्कार मिलेगा। इसके साथ ही बैडमिंटन खिलाड़ी सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी को प्रतिष्ठित खेल रत्न सम्मान पुरस्कार दिया जायेगा। इन खिलाडियों सहित 26 खिलाड़ियों कोे अर्जुन पुरस्कार दिया जायेगा। जिसकी पुष्टि खेल मंत्रालय ने वार्षिक खेल पुरस्कारों के लिए नामांकन करते हुए की हैं।
Tumblr media
0 notes
sharpbharat · 9 months
Text
sports Award- चिराग-सात्विक को खेल रत्न, मोहम्मद शमी को मिलेगा अर्जुन अवॉर्ड
नयी दिल्ली: भारतीय बैडमिंटन स्टार सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी को मेजर ध्यानचंद खेल रत्न अवार्ड दिया जाएगा. यह भारत का सर्वोच्च खेल सम्मान है. इसके साथ ही वनडे विश्व कप में शानदार प्रदर्सन करने वाले तेज गेंदबाज मोहम्मद शमी को अर्जुन अवॉर्ड से दिया जाएगा. शमी ने वर्ल्ड कप 2023 में 7 मैचों में सबसे ज्यादा 24 विकेट लिए थे. (नीचे भी पढे) अवॉर्ड समारोह 9 जनवरी 2024 को होगी. सात्विक-चिराग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
सात्विक-चिराग की जोड़ी ने बनाया रिकॉर्ड, पहली बार बनी इंडिया ओपन चैम्पियन
सात्विक-चिराग की जोड़ी ने बनाया रिकॉर्ड, पहली बार बनी इंडिया ओपन चैम्पियन
Satwiksairaj Rankireddy And Chirag Shetty Won India Open Doubles Title: सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी इंडोनेशिया के तीन बार के विश्व चैंपियन मोहम्मद अहसान और हेंड्रा सेतियावान की जोड़ी पर सीधे गेम में शानदार जीत दर्ज करते हुए रविवार को योनेक्स-सनराइज इंडिया ओपन जीतने वाली देश की पहली पुरुष युगल जोड़ी बन गई. विश्व रैंकिंग में 10वें स्थान पर काबिज इस भारतीय जोड़ी ने शीर्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mrdevsu · 3 years
Text
Tokyo Olympics: टोक्यो ओलंपिक में आज ऐसा रहा भारत का प्रदर्शन, जानिए किसे मिली हार और किसे जीत
Tokyo Olympics: टोक्यो ओलंपिक में आज ऐसा रहा भारत का प्रदर्शन, जानिए किसे मिली हार और किसे जीत
टोक्यो ओलंपिक 2020: प्लग-इन में आज का भारत के लिए कुछ विशेष नहीं है। खेल में खुश करने के लिए खुशियाँ और पहली बार महिला सिंगल में मनिका बत्रा की भूमिका में खुश होकर आउट हो जाएँ।।।।।।।।।।।।।।।।।।,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, फिर भी, खुश होगी, और,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, होंगी।,,,,,,,,,,,,,,,,,, होंगी और,,,,,,,,,,,, होंगी इसके️️ बैडमिंटन️ बैडमिंटन️ बैडमिंटन️…
View On WordPress
0 notes
rnewsworld · 3 years
Text
BWF वर्ल्ड टूर फाइनल: सात्विक- चिराग की पहली भारतीय पुरुष जोड़ी ने किया क्‍वालिफाई
BWF वर्ल्ड टूर फाइनल: सात्विक- चिराग की पहली भारतीय पुरुष जोड़ी ने किया क्‍वालिफाई
Hindi News Sports Badminton News: Indian Shuttlers Satwik And Chirag Shetty Qualify For Bwf World Tour Finals इंडोनेशिया30 मिनट पहले कॉपी लिंक भारतीय शटलर सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी BWF वर्ल्ड टूर फाइनल के लिए क्वॉलिफाई कर लिया। वर्ल्ड टूर फाइनल इंडोनेशिया में 1 से 5 दिसंबर के बीच खेला जाना है। सात्विक और चिराग BWF वर्ल्ड टूर फाइनल में पहुंचने वाली भारत की पहली पुरुष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 3 years
Text
दीपिका , अंकिता और कोमलिका की तिकड़ी ने भारत को दिलाया दूसरा गोल्ड Divya Sandesh
#Divyasandesh
दीपिका , अंकिता और कोमलिका की तिकड़ी ने भारत को दिलाया दूसरा गोल्ड
पेरिस दीपिका कुमारी, अंकिता भकत और कोमलिका बारी की भारतीय महिला रिकर्व टीम ने रविवार को के तीसरे चरण के फाइनल में मैक्सिको को हराकर स्वर्ण पदक जीता।
भारतीय तिकड़ी ने खिताबी जीत के साथ ही इस महीने की शुरुआत में ओलिंपिक के आखिरी क्वालीफायर में पहले दौर की हार की निराशा को कुछ हद तक दूर किया। उनकी 5- 1 की जीत से भारत को विश्व कप के तीसरे चरण में दूसरा स्वर्ण पदक मिला।
पीएम ने दीपिका सहित कई खिलाड़ियों का किया जिक्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’ में रविवार को ओलंपिक में भाग लेने वाले खिलाड़ियों के बारे में बात की। उन्होंने और प्रवीण जाधव, हॉकी खिलाड़ी नेहा गोयल, मुक्केबाज मनीष कौशिक, पैदल चाल खिलाड़ी प्रियंका गोस्वामी, भालाफेंक एथलीट शिवपाल सिंह, बैडमिंटन खिलाड़ी चिराग शेट्टी एवं उनके साथी सात्विक साईराज रंकीरेड्डी और तलवारबाज सीए भवानी देवी के जिंदगी के संघर्षों का जिक्र किया।
पीएम ने कहा, ‘हमारे देश में तो अधिकांश खिलाड़ी छोटे-छोटे शहरों, कस्बों, गांवों से निकल कर आते हैं। तोक्यो जा रहे हमारे ओलिंपिक दल में भी कई ऐसे खिलाड़ी शामिल हैं, जिनका जीवन बहुत प्रेरित करता है।’
पीएम ने इसके जरिए देश के संबोधन में कहा, ‘तोक्यो जा रहे हर खिलाड़ी का अपना संघर्ष रहा है, बरसों की मेहनत रही है। वो सिर्फ अपने लिए ही नहीं जा रहें बल्कि देश के लिए जा रहे हैं।’ उन्होंने कहा, ‘इन खिलाड़ियों को भारत का गौरव बढ़ाना है और लोगों का दिल भी जीतना है और इसलिए मेरे देशवासियों मैं आपको भी सलाह देना चाहता हूं, हमें जाने-अनजाने में भी हमारे इन खिलाड़ियों पर दबाव नहीं बनाना है, बल्कि खुले मन से, इनका साथ देना है, हर खिलाड़ी का उत्साह बढ़ाना है।’
अभिषेक वर्मा ने दिलाया था पहला गोल्ड इससे पहले शनिवार को कंपाउंड व्यक्तिगत स्पर्धा में अभिषेक वर्मा ने भारत के लिए पहला स्वर्ण पदक जीता था। कंपाउंड तीरंदाज अभिषेक वर्मा ने अमेरिकी दिग्गज क्रिस शाफ को शूटऑफ में हराकर चैंपियन बनने का गौरव हासिल किया।
बराबरी के फाइनल मुकाबले में दोनों ने सिर्फ दो दो अंक गंवाए। दोनों 148-148 का स्कोर करके बराबरी पर थे। दुनिया के पांचवें नंबर के तीरंदाज शाफ ने नौ के साथ शूटऑफ शुरू किया जबकि वर्मा ने परफेक्ट दस अंक बनाए।
वर्मा का विश्व कप व्यक्तिगत स्पर्धा में यह दूसरा स्वर्ण है। उन्होंने 2015 में व्रोक्लॉ में विश्व कप के दूसरे चरण में भी पीला तमगा जीता था। इससे पहले उन्होंने रूस के अंतोन बुलाएव को 146-138 से हराकर फाइनल में जगह बनाई थी।
0 notes
khabarhimachal · 5 years
Photo
Tumblr media
फ्रेंच ओपन: शटलर सात्विक-चिराग की जोड़ी सेमीफाइनल में भारतीय शीर्ष पुरुष युगल जोड़ी सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी ने फ्रेंच ओपन के सेमीफाइनल में किया प्रवेश, साइना नेहवाल और पी वी सिंधु की चुनौतियां हुई समाप्त.
0 notes
newsindiax · 5 years
Link
खेल डेस्क. ऑल इंग्लैंड बैडमिंटन ओपन सुपर सीरीज आज से शुरू हो रही है। यह टूर्नामेंट 15 मार्च तक चलेगा। कोरोनावायरस के कारण कई बैडमिंटन टूर्नामेंट रद्द हो रहे हैं। ऐसे में टोक्यो ओलिंपिक के लिए कोटा हासिल करने के लिए भारतीय खिलाड़ियों के पास बहुत कम मौके बचे हैं। ओलिंपिक में ब्रॉन्ज जीतने वाली साइना नेहवाल और पूर्व वर्ल्डनंबर-1 किदांबी श्रीकांत अभी तक टोक्यो ओलिंपिक के लिए क्वालिफाई नहीं कर पाए हैं। पीवी सिंधु, साईं प्रणीत और सात्विक साईराज और चिराग शेट्टी की जोड़ी ओलिंपिक के लिए पहले ही क्वालिफाई कर चुकी है।
सिंधु के लिए यह टूर्नामेंट अहम सिंधु पिछले साल वर्ल्ड चैम्पियनशिप में गोल्ड जीतने के बाद से ही खराब फॉर्म से जूझ रही हैं। पिछले साल सितंबर में वे फ्रेंच ओपन और इस साल जनवरी में इंडोनेशिया मास्टर्स के क्वार्टरफाइनल तक ही पहुंच पाईं। लिहाजा, भारत की इस स्टार शटलर के लिए ऑल इंग्लैंड बैडमिंटन सीरीज बेहद अहम हो जाती है। अगर वेयहां फाइनल तक पहुंचती हैं तो टोक्यो का टिकट पक्का हो सकता है। सिंधु ने कहा है कि कोरोनावायरस से बचने के लिए ऐहतियात के तौर पर वो इस टूर्नामेंट में हाथ मिलाने की बजाए नमस्ते करेंगी।
भारत के 7 प्लेयर्स ने नाम वापस लिए कोरोनावायरस की वजह से 7 भारतीय शटलर्स ने इस टूर्नामेंट में न खेलने का फैसला किया है। इनमें एचएसप्रणय, वर्ल्ड नंबर 10 चिराग शेट्टी और एस, रंकीरेड्डी शामिल हैं। बैडमिंटन एसोसिएशन ऑफ इंडिया के मुताबिक, इन प्लेयर्स के अलावा मनु अत्री, बी. सुमित रेड्डी, समीर वर्मा और सौरव वर्मा भी इस टूर्नामेंट में शामिल नहीं होंगे। साइना नेहवाल, पीवीसिंधु,किदांबी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, एनएसरेड्डी और प्रणव चोपड़ा शिरकत करेंगे।
ये टूर्नामेंट रद्द हुए कोरोनावायरस की वजह से बैडमिंटन के 4 ओलिंपिक क्वालिफाइंग इवेंट स्थगित हो चुके हैं। ये हैं- लिंगशुई चाइना मास्टर्स (25 फरवरी-1 मार्च), वियतनाम इंटरनेशनल चैलेंज ( 24-29 मार्च), जर्मन ओपन( 3-8 मार्च) और पोलिश ओपन (26- 29 मार्च)।
Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
पीवी सिंधु अगर ऑल इंग्लैंड बैडमिंटन चैम्पियनशिप जीतती हैं तो टोक्यो ओलिंपिक के लिए क्वॉलिफाई करना आसान हो जाएगा। (फाइल)
from Dainik Bhaskar https://ift.tt/3cH1A4m
0 notes
vartha24-blog · 5 years
Text
फ्रेंच ओपन: शटलर सात्विक-चिराग की जोड़ी सेमीफाइनल में
फ्रेंच ओपन: शटलर सात्विक-चिराग की जोड़ी सेमीफाइनल में
भारतीय शीर्ष पुरुष युगल जोड़ी सात्विक साईराज रंकीरेड्डी और चिराग शेट्टी की जोड़ी ने फ्रेंच ओपन के सेमीफाइनल में किया प्रवेश, साइना नेहवाल और पी वी सिंधु की चुनौतियां हुई समाप्त.
सात्विक साईराज और चिराग शेट्टी की जोड़ी ने मेंस डबल मुकाबले में डेनमार्क ���ी जोड़ी किम अस्ट्रप और एंडर्स स्कारुप रासमुसेन की जोड़ी ने 21-13, 22-20 से हराकर सेमीफाइनल में अपनी जगह पक्की कर ली है। 
भारतीय शटलर साइना…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 15 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १५ जून २०२३ दुपारी १.०० वा.****
बिपरजॉय चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं सज्जता केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक अतुल करवल यांनी काही वेळापुर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तटवर्ती भागातल्या एक लाखापेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. गुजरातमध्ये अठरा पथकं तैनात करण्यात आली आहेत. तीन राज्यांमध्ये राखीव पथकं सज्ज ठेवण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या चक्रीवादळाचा आज मुंबईत परिणाम दिसत असून समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. आज संध्याकाळच्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात जखाऊ बंदराला हे चक्रीवादळ धडक़ण्याची शक्यता असून या वादळामुळं मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
पर्यटन मंत्रालयातर्फे गोव्यात १९ ते २२ जून दरम्यान दरम्यान चौथी जी- २० पर्यटन कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक होत आहे. पर्यटन सचिव, व्ही. विद्यावती यांनी याची माहिती दिली आहे. भारताच्या जी- २० पर्यटन क्षेत्राअंतर्गत, पर्यटन कार्यगट परस्परांशी संबंधित असलेल्या पाच प्राधान्य क्षेत्रांवर काम करत आहे. यामध्ये हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य, पर्यटन सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आणि पर्यटनस्थळ व्यवस्थापनाचा समावेश आहे. पर्यटन कार्य गटाला दोन प्रमुख गोष्टी करायच्या आहेत. यामध्ये शाश्वत विकासाची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम तयार करणं आणि जी -२० पर्यटन मंत्र्यांचं घोषणापत्राचा समावेश आहे. पर्यटन कार्यगटाची ही बैठक आणि गोव्यातल्या पर्यटन मंत्रीस्तरीय बैठकीचा उद्देश आर्थिक विकासाला बळकटी देणं, सांस्कृतिक वारसा जतन करणं आणि पर्यटनाला चालना देणं तसंच प्रदेशाचा शाश्वत विकास करणं असल्याचं विद्यावती यांनी सांगितलं.
****
कोल्हापूर इथंल्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा यावर्षीचा  'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी २६ जूनला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची 'शैक्षणिक दिनदर्शिका' जाहिर केली आहे. परीक्षा, दीक्षांत समारंभ आणि युवक महोत्सवाच्या तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार आजपासून चार नोव्हेंबरपर्यंत हे सत्र सुरू राहील. केंद्रिय युवक महोत्सव १४ ते १७ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे. १३ ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या दरम्यान प्रथम सत्राच्या परीक्षा होतील.२८ नोव्हेंबर ते २५ एप्रिल या काळात द्वितीय सत्र असेल. २६ मार्च ते २५ एप्रिल या दरम्यान द्वितीय सत्राच्या परीक्षा होतील. विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ डिसेंबर महिन्यात होणार असल्याचंही घोषित करण्यात आलं आहे .
****
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेत तळ्याचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे. ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. यापूर्वी मागेल त्याला शेततळं योजनेतून वैयक्तिक शेततळ्यांचा लाभ दिला जात होता आणि अधिकाधिक ५०हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत होतं.
****
भारताच्या किदांबी श्रीकांतनं जकार्तामध्ये सुरू इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं आज दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याच देशाच्या लक्ष्य सेनचा सहज पराभव केला. महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधूला मात्र पराभव सहन करावा लागला. अन्य भारतीय खेळाडू एच. एस. प्रणय आणि प्रियांशू राजावत तसंच पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे सामनेही आज होणार आहेत. 
****
आदर्शगाव योजनेअंतर्गत सहभाग घेण्यासाठी पात्र इच्छुक गावांनी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन नांदेडच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे. इच्छूक गावानं ग्रामसभा बोलावून कार्यकारी समितीनं ठरवून दिलेल्या नमुन्यात आपला अर्ज नमूद केलेल्या समिती कार्यालयाकडे सादर करावा अशी माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
//************//
0 notes
Text
मैं और सिक्की सही रास्ते पर हैं : अश्विनी पोनप्पा has been published on PRAGATI TIMES
मैं और सिक्की सही रास्ते पर हैं : अश्विनी पोनप्पा
नई दिल्ली, (आईएएनएस)| अंतर्राष्ट्रीय बैडमिंटन में भारत की युगल वर्ग में असफलता जगजाहिर है, लेकिन महिला युगल खिलाड़ी अश्विनी पोनप्पा को विश्वास है कि वह अपनी जोड़ीदार एन. सिक्की रेड्डी के साथ मिलकर इस स्थिति को बदल देंगी और सफलता हासिल करेंगी।
अश्विनी और सिक्की की जोड़ी विश्व चैम्पियनशिप के दूसरे दौर में डेनमार्क की कामिला रयतर जुहल और क्रिस्टिना प्रेडेसन की जोड़ी से हुए मुकाबले में हार गई थीं। अश्विनी का मानना है कि नए जोड़ीदार के साथ तालमेल बिठाने में समय लगता है। अश्विनी इससे पहले ज्वाला गुट्टा के साथ महिला युगल में खेलती थीं। दोनों ने मिलकर भारत को कई सफलताएं दिलाईं थीं। अश्विनी ने आईएएनएस से कहा, “सिक्की और मुझे एक साथ खेलते हुए आठ महीने हो गए हैं और इन आठ महीनों में हमने अन्य जोड़ियों की ही तरह कई बार अच्छा प्रदर्शन किया है और कई बार बुरा प्रदर्शन किया है।” उन्होंने कहा, “एक नई जोड़ी होने के नाते मैं कहूंगी कि हमने अच्छा प्रदर्शन किया है और हम सही रास्ते पर हैं।” अश्विनी (27) और ज्वाला (33) ने भारत को राष्ट्रमंडल खेल 2010 में कांस्य पदक दिलाया था। साथ ही यह जोड़ी 2011 में विश्व चैम्पियनशिप में कांस्य पदक जीतने में सफल रही थी। लेकिन, जब से इन दोनों ने अपनी जोड़ी तोड़ी है, भारत को महिला युगल में निराशा हाथ लगी है। अश्विनी ने कहा, “कुछ नए युगल खिलाड़ी हैं जो अच्छे हैं। उनमें से काफी लोग नए हैं, लेकिन उनके पास अनुभव नहीं है। अच्छा होगा कि उन्हें कुछ समय दिया जाए क्योंकि युगल खिलाड़ी होना उस देश में आसान नहीं है, जहां युगल मुकाबलों पर शुरुआत में ज्यादा ध्यान नहीं दिया जाता।” उन्होंने कहा, “कई खिलाड़ी अपनी युवा अवस्था निकल जाने के बाद युगल वर्ग में ध्यान देते हैं, जिससे अंतर्राष्ट्रीय स्तर पर उन खिलाड़ियों के सामने प्रदर्शन करना मुश्किल हो जाता है जो युगल वर्ग में खेलकर बड़े हुए हैं।” महिला युगल के अलावा अश्विनी मिश्रित युगल में भी खेलती हैं। वह हाल ही में बी. सुमिथ रेड्डी के साथ विश्व चैम्पियनशिप के दूसरे दौर में हार गइर्ं थीं। जब उनसे पूछा गया कि क्या वह मिश्रित युगल में सुमिथ के साथ बनी रहेंगी तो उन्होंने कहा कि वह आने वाले टूर्नामेंट में सात्विक साईराज रंकीरेड्डी के साथ कोर्ट पर उतरेंगी।
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यात ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन, एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ देशभरातल्या सर्व राजभवनांमध्ये सर्व राज्यांचे स्थापना दिन साजरे करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
राज्यात आजपासून आपला दवाखाना सुरु होणार
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांना संमिश्र यश
आकाशवाणीवरील शंभराव्या मन की बातच्या भागाचं श्रवण करणाऱ्या देश- विदेशातील जनतेचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आभार
राज्य शासनाच्या वतीनं आजपासून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध
मराठवाड्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस
महाविकास आघाडीची आज मुंबईत वज्रमूठ सभा
आशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीला अजिंक्यपद
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज तसंच मुंबई इंडियन्स संघांचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
****
राज्याचा ६३ वा स्थापना दिवस ‘महाराष्ट्र दिन’ आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुंबईत हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्मायांना आदरांजली वाहिली. ‘महाराष्ट्र दिना निमित्तानं राज्यभर ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा सोहळा देशभरातल्या राजभवनांमधेही साजरा केला जाणार आहे. देशातल्या सर्व राज्यांचे स्थापना दिन सर्व राज्यांमधे साजरे करावे, असं केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेच्या समर्थनार्थ हा निर्णय घेण्यात आला असून, २० राज्यं आणि आठ केंद्रशासित प्रदेशांनी तो स्वीकारला आहे.
या अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरातचा स्थापना दिन आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राजभवनांमधे साजरा करण्यात येईल. उभय राज्यातल्या सोहळ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं  नियोजन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आज ऑनलाईन पद्धतीनं राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्‌घाटन होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या, पाच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्��ातही आज आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ होणार आहे. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असून, गर्भवती माता संदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. आरोग्य मंत्री. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून ही योजना राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक आपला दवाखाना सुरु होणार आहे.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करून, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं, आज मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सर्व जिल्ह्यात ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी काढून, मुक्तीसंग्राम लढ्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात येणार आहे.
****
महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून राज्य पर्यटन विकास महामंडळानं, राज्यात ७५ स्थळांच्या यात्रेची विशेष योजना जाहीर केली आहे. या यात्रेला आजपासून सुरुवात होत असून, राज्यातले सहा जागतिक वारसा स्थळं, गड किल्ले, व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री तसंच सातपुडा पर्वत रांगा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, सांदण दरी, अजिंठा आणि वेरुळ लेण्या आदी स्थळांची सफारी करता येणार आहे. या योजनेत पर्यटकांना निवास, भोजन आणि मूलभूत सुविधा प्राप्त होणार आहेत.
****
राज्यातल्या निवडणूक झालेल्या काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला, तर काही ठिकाणी मतदान झालं. निकाल लागलेल्या बाजार समित्यांमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी संमिश्र यश संपादन केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री, लासूर, गंगापूर बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीचा विजय झाला. फुलंब्री बाजार समितीत भाजप शिंदे गटानं १८ पैकी १४ जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीला एक जागा जिंकता आली. लासूर स्टेशन बाजार समितीत आमदार प्रशांत बंब आणि रमेश बोरनारे यांच्या शेतकरी बळीराजा विकास पॅनलचे १४, तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन उमेदवार विजयी झाले. गंगापूर बाजार समितीतही शेतकरी बळीराजा विकास पॅनलनं १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला.
जिल्ह्यात पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल ९४ पूर्णांक ८९ शतांश टक्के, तर पाचोड बाजार समितीसाठी सुमारे ९४ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. याठिकाणी आज मतमोजणी होणार आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड, आष्टी बाजार समितीवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला आहे. अंबडमध्ये आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्त्वात भाजपाचे १८ पैकी १५ उमेदवार विजयी झाले. आष्टी बाजार समितीवर भाजपाचे १८ पैकी १६ उमेवार विजयी झाले. परतूर बाजार समितीवर भाजपानं आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत महाविकास आघाडी करत विजय मिळवला आहे. घनसावंगी बाजार समितीत आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचे सर्व १८ उमेदवार विजयी झाले. मंठा बाजार समितीवर महाविकास आघाडीचे १२ तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवार विजयी झाले.
हिंगोली जिल्ह्यातल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलनं १६, तर शेतकरी विकास पॅनलनं दोन जागा जिंकल्या. कळमनुरी बाजार समितीत महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलनं १२ जागा जिंकल्या.
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी आणि सोनपेठ बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा विजय झाला.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव बाजार समितीत आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाने विजय मिळवला. पाटोदा बाजार समितीनं सुरेश धस गटानं १७ पैकी १२ जागांवर, तर आमदार बाळासाहेब आजबे गटानं पाच जागांवर विजय मिळवला.
लातूर जिल्ह्यातल्या दहा पैकी पाच बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं, तर पाच बाजार समित्यांवर भाजपनं विजय मिळवला.  निलंगा बाजार समितीत भाजप - शिवसेना युतीनं सर्व १८ जागा जिंकल्या. देवणी इथं १८ पैकी १६ जागांवर भाजप शिवसेना युतीनं, तर दोन जागांवर महाविकास आघाडीनं विजय मिळवला. औराद शहाजनी बाजार समिती भाजप महायुतीनं १८ पैकी १६ जागा जिंकल्या. रेणापूर बाजार समितीत महाविकास आघाडीनं सर्व १७ जागा जिंकल्या. जळकोट बाजार समितीत महाविकास आघाडीनं १८ पैकी १५ जागांवर, तर अहमदपूर बाजार समितीत १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला.
नांदेड जिल्ह्यात नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीनं १७ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली.
****
आकाशवाणीवरील मन की बात च्या शंभराव्या भागाचं श्रवण करणाऱ्या देश- विदेशातील जनतेचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. जनतेनं दाखवलेल्या उत्साहामुळे आपण भारावून गेल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. कार्यक्रम ऐकतांनाची आपली छायाचित्र नमो ॲप किंवा एमकेबी हंड्रेड डॉट नरेंद्र मोदी डॉट इन या लिंकवर पाठवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
दरम्यान, काल मोदी यांनी आपल्या मन की बात या जनतेसोबतच्या विशेष संवाद कार्यक्रमाच्या १०० भागात देशवासियांनी केलेल्या सेवेचा आणि त्यांच्या सामर्थ्याबाबत माहिती दिली. मन की बातच्या, आतापर्यंतच्या भागात संवाद साधलेल्या काही नागरिकांशी, पंतप्रधानांनी या भागातही संवाद साधत, सेल्फी विथ डॉटर, स्वच्छ भारत अभियान, हर घर तिरंगा, आदी विषयांवर चर्चा केली.
देशभरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वरुपात लोकांनी मोठ्या संख्येनं, मन की बातचा कालचा शंभरावा भाग ऐकला. मुंबईत विलेपार्ले इथं केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मन की बातचा शंभरावा भाग ऐकला.
स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो इथल्या विश्वधर्म संमेलनातल्या भाषणातून, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या माध्यमातून, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, असे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. मुंबईत राजभवनात झालेल्या मन की बात सार्वजनिक श्रवण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, 'डिक्की'चे संस्थापक मिलिंद कांबळे, राज्यातले पद्म पुरस्कार विजेते, मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातले युवक, विद्यार्थी तसंच नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधानांनी मन की बातच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रयोगशील लोकांना समोर आणून इतरांना प्रेरणा देण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली. ते म्हणाले…
‘‘आज राजभवनमध्ये प्रधानमंत्री यांच्या मन की बात चा जो शंभरावा कार्यक्रम आहे, तो ऐकण्याचा योग आला. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शंभराव्या एपिसोडचा प्रवास सगळा सांगितला. या कार्यक्रमामधून प्रधानमंत्री यांनी ग्रामीण भागातील जे अतिशय चांगले प्रयोग करणारे जे लोक आहेत, इनोव्हेटर्स आहेत, किंवा ज्यांना अनसंग हिरोज्‌ असं म्हटलं जातं, अशा सगळ्यांना जनतेच्या समोर त्यांच्या कार्याला आणणं, त्यातून लोकांना प्रेरणा देणं, हे खूप मोठं काम या मन की बात मधून सुरू आहे.’’
मन की बातमध्ये हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनाची गाथा पंतप्रधानांनी सांगितली, याबद्दल या गावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या….
१६ एप्रिल २०१६ ला हिवरे बाजारच्या पाणी व्यवस्थापनावर लोकसहभाची चर्चा त्यांनी मन की बात मध्ये केली होती. खरं म्हणजे आज राष्ट्र उभारणीमध्ये छोटी छोटी माणसं जे गावामध्ये, शहरांमध्ये आपापल्या क्षेत्रात काम करतात, त्यांच्या कामावर जर चर्चा झाली, तर एक मोठी चळवळ निर्माण होऊ शकते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तीनशे एक्कावन्न ठिकाणी, मन की बातचा शंभरावा भाग सार्वजनिकरित्या ऐकवण्यात आला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सहकारमंत्री अतुल सावे यांनी, पूर्वांचल वसतीगृह इथं हा भाग ऐकला. गरवारे कम्युनिटी सेंटर इथं, अनेक नागरिकांनी मन की बातचा शंभरावा भाग सामुहिकपणे ऐकला.
जालना शहरात गोपीकिशननगर आणि मुक्तेश्वरद्वार सभागृहात, मन की बातचं थेट प्रसारण करण्यात आलं. रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान मनमोकळेपणाने आपल्याशी संवाद साधतात, ही भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचं, दानवे म्हणाले. या निमित्ताने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतल्या विजेत्यांना, दानवे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं.
आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे माजी राज्य अध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे यांनी, तर आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रात आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी, मन की बातचा शंभरावा भाग ऐकला. या भागानिमित्त धाराशिव जिल्ह्यात येडशी इथं १०० गायींचं पूजन तसंच मन बात कार्यक्रमाच्या सार्वजनिक श्रवण कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नांदेड जिल्ह्यात मन की बात कार्यक्रमाचं एक हजार ठिकाणी सार्वजनिक प्रसारण करण्यात आलं. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पावडेवाडीत जनसमुदायासमवेत हा भाग ऐकला.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं खोलेश्वर माध्यमिक शाळेत, आमदार नमिता मुंदडा, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत, मन की बातचा शंभरावा भाग ऐकण्यात आला.
****
राज्य शासनाच्या वतीने आजपासून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्याच्या नायगाव इथं, राज्यातल्या पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वाळू विक्री ऑनलाइन प्रणालीचं लोकार्पण होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
****
मराठवाड्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सिल्लोड, गंगापूर, सोयगाव परिसरात जोरदार पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं काल मेघगर्जनेसह पाऊस पडला. हिंगोली शहरासह जिल्ह्यात काल पाऊस झाला. कनेरगाव नाका परिसरात गारपीट झाली.
दरम्यान, मराठवाड्यात चार मे पर्यंत अवकाळी पाऊस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल मैदानाबर सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होणार आहे.
****
भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या बॅडमिंटन पटूंच्या जोडीने आशिया बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाच्या जोडीचा १६-२१, २१-१७, आणि २१-१९ असा पराभव केला.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा चार गडी राखून पराभव केला. चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी करत चार गडी गमावत दोनशे धावा केल्या, पंजाब संघानं सहा गडी गमावत अखेरच्या चेंडूवर हे लक्ष्य साध्य केलं.
या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात, मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघानं निर्धारित २० षटकात सात बाद २१२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करत मुंबई इंडियन्स संघानं २० षटकात तिसऱ्या चेंडूवर २१४ धावा करुन विजय मिळवला. 
****
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी शासन स्तरावरून सर्वोतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. औसा तालुक्यात टेंबी इथं वीज कोसळून मरण पावलेले शौकत इस्माईल यांच्या कुटुंबाची महाजन यांनी काल भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या कोल्हापूर इथं अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 October 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
दिल्ली- बंगळुरू विमान दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत. दिल्ली विमानतळावरून उड्डाण करताना इंडिगो कंपनीच्या या विमानाच्या इंजिनला आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळीच बाब लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. विमानातले १७७ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, हे प्रवाशी दुसऱ्या विमानाने बंगळुरूला रवाना झाले.
****
जागतिक स्तरावरील बदलतं युद्धतंत्र लक्षात घेऊनच अहमदनगर इथल्या आर्मर्ड कोर सेंटर आणि स्कूलमध्ये वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. या केंद्रातील प्रशि��्षण आणि अन्य युद्धतंत्राविषयी माहिती देण्याच्या हेतूनं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात ही माहिती देण्यात आली. प्रामुख्यानं रणगाड्याच्या बांधणीपासून ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरील कारवाईपर्यंतच्या अभ्यासाचा या विशेष प्रशिक्षणात समावेश आहे. अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेचा प्रत्यक्ष युद्धभूमीवर कसा प्रभावी वापर करायचा, याबद्दलही संबंधित रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.
****
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही तसंच आपण कोणत्याही चौकशीला जाणार नसल्याचं, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित इमारतीच्या परिसरात नेऊन वस्तुस्थिती मांडली. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात येणारे आरोप हा दबाव तंत्राचा भाग असून त्याला आपण बळी पडणार नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या . मुंबई पोलिसांनी काल पेडणेकर यांची चौकशी केली. त्यांना आजही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ३१ ऑक्टोबर ते सहा ��ोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे. या��तंर्गत ३१ ऑक्टोबरला सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे उप अधिक्षक मारुती पंडित यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात, भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
****
पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीच्या निमित्तानं दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा चार नोव्हेंबर रोजी होत असून यात्रा कालावधीत पंढरपुरात सुमारे आठ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता आहे
****
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पानं विकसित केलेली तुरीची दोन वाणं राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आली आहेत. नवी दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. फुले तृप्ती आणि फुले कावेरी अशी या दोन वाणांची नावं आहेत. ही वाणं अधिक उत्पादनक्षम, लवकर तयार होणारी आणि मर तसंच वांझ रोगाचा प्रतिकार करण्याची क्षमता विकसित केलेली  आहेत. राज्यात खरीप हंगामात तूर हे महत्त्वाचं पीक असून या पिकाखाली असलेल्या राज्यातल्या सुमारे १२ लाख हेक्टर क्षेत्रामधून सुमारे साडेबारा लाख टन उत्पादन मिळतं.
****
३२ व्या किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला आज सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये प्रारंभ होत आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातून महाराष्ट्राच्या संघाव्यतिरिक्त विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ सहभागी होत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी या स्पर्धांचं उद्घाटन होईल . महाराष्ट्राच्या किशोर गटाचा सलामीचा सामना झारखंड तर किशोरी गटाचा सलामीचा सामना उत्तराखंडबरोबर होणार आहे.
****
फ्रेंच खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने पुरुष दुहेरी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सात्विक चिराग जोडीने गेल्या वेळच्या विजेत्सर जपानच्या ताकुरा होकी आणि युगो कोबायाशी जोडीचा २३-२१, २१-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. काल अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या सर्व संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. भारताचा पुढचा सामना उद्या दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 January 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत १५० कोटी मात्रा देण्याचा विक्रम करत दे�� या मोहिमेत पुढे वाटचाल करत आहे. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      राज्यात शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल- आरोग्य मंत्री राजेश टोपे
·      कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा
·      राज्यात ओमायक्रॉनचे आठ तर कोविडचे ४१ हजार ३२७ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन हजार ५२३ बाधित  
·      हिंगोली जिल्हात कुरुंदा गावात कोविड बाधितांची संख्या वाढल्यामुळे सात दिवस टाळेबंदी लावण्याचा प्रशासनाचा निर्णय
·      प्रसिद्ध कत्थक नर्तक पंडित बिरजू महराज यांचं निधन
·      उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका  
·      कवी वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा पुरस्कार
आणि
·      भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला पुरुष एकेरीचं, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला पुरुष दुहेरीचं विजेतेपद
****
राज्यात बंद करण्यात आलेल्या शाळा सुरू करण्याबाबत १५ दिवसांनी आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल जालन्यात बोलत होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं ते म्हणाले. सध्या वाढती रुग्ण संख्या पाहता, राज्यातल्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कोविड रुग्ण नाहीत तिथे पन्नास टक्के क्षमतेनं शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी होत आहे. ते म्हणाले,
 पालकवर्गाचे दोन मतप्रवाह आहे, की बाबा काही मुलांना पाठवा असं म्हणणारे पालक देखील आहेत, काही मुलांच्या काळजीच्या दृष्टीकोनातून शाळा बंद ठेवावी, असं म्हणणारे देखील पालक आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटते एकंदर हॉस्पिटलायझेशन कमी आहे, एकंदर मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण कमी आहे, भरपूर चर्चा कॅबिनेट मध्ये सुद्धा झाली, आणि या चेर्चेच्या अंती एवठंच ठरलं की आठ ते पंधरा दिवसाचा एक विंडो जो आपण बंद केलेला आहे, तेवढा आपण विंडो ठेऊया, पुन्हा आपण त्याचा पुनर्विचार करुया आणि नंतर माननीय मुख्यमंत्री मोहोदयांच्या विचारांच्या अंती आणि पंधरा दिवसांच्या नंतर होऊ घातलेली जी काही परिस्थिती आहे, त्या अंती पुन्हा शाळा चालू ठेवायच्या की बंद करायच्या यासंदर्भातला योग्य तो निर्णय पुन्हा एकदा विचारांती घेण्यात येईल.
दरम्यान, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टिस असोसिएशन - 'मेस्टा' या संघटनेनं, आजपासून राज्यभरातल्या शाळा सुरु करणार असल्याचं सांगितलं आहे. काल नागपूर इथं या संदर्भात एक बैठक घेण्यात आली, त्यानंतर संघटनेच्या वतीनं, डॉ. निशांत नारनवरे यांनी ही माहिती दिली. पालकांच्या सहमतीनं, कोरोना नियमांचं संपूर्ण पालन तसंच सविनय कायदेभंग करत शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. संपूर्ण राज्यात मेस्टा संघटनेच्या १८ हजार शाळा असून, त्यापैकी किमान ५० टक्के शाळा सुरू होण्याची शक्यता नारनवरे यांनी व्यक्त केली.
****
कोविड १९ प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेला काल एक वर्ष पूर्ण झालं. १६ जानेवारी २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं होतं. देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली आहे. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.
लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेशी संबंधित सर्वांचं कौतुक केलं आहे. कोविड १९ विरुद्धच्या लढ्याला या मोहिमेतून मोठं बळ मिळालं, अनेकांचे प्राण वाचले, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या सुमारे १४ कोटी ३० लाख नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा मिळाली असून, पावणे सहा कोटींहून अधिक जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. राज्याच्या लोकसंख्येचा विचार करता ९० टक्के जणांना लसीची पहिली मात्रा, तर ६५ टक्के नागरिकांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. राज्यात आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना, कोविड लसीचा बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात झाली आहे. सुमारे सव्वा तीन लाखांहून अधिक जणांनी याचा लाभ घेतला आहे. १५ ते १८ वयोगटातल्या राज्यातल्या ४२ टक्क्यांहून अधिक, म्हणजे २५ लाखांपेक्षा अधिक मुलामुलींनी, लसीची पहिली मात्रा घेतली आहे. तरी ज्या ठिकाणी लसीकरणाचं प्रमाण कमी आहे, तिथे लसीकरण वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
राज्यात काल ओमायक्रॉनचे आठ रुग्ण आढळले. हे सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातले असून, पाच पुणे महापालिका हद्दीतले, तर तीन पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले आहेत. यामुळे राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या एक हजार ७३८ झाली आहे. यापैकी ९३२ रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४१ हजार ३२७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७२ लाख ११ हजार ८१० झाली आहे. काल २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४१ हजार आठशे आठ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. काल ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६८ लाख ९०० रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ३ दशांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख ६५ हजार ३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार ५२३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात काल ६५८ रुग्ण आढळले. त्यात महानगरपालिका क्षेत्रातले ५१९, तर ग्रामीण भागातले १३९ रुग्ण आहेत. नांदेड जिल्ह्यात ६४३, लातूर ५४३, उस्मानाबाद १९४, जालना १८५, बीड १२५, परभणी १०१, तर हिंगोली जिल्ह्यात काल ७४ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
हिंगोली जिल्हाच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, जिल्हा प्रशासनाने या गावात सात दिवसांसाठी टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात आजपासून सात दिवसांसाठी सर्व व्यापारी आस्थापना, बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी सूचनेचं पालन करुन सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर मास्कचा वापर करणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सॅनिटायझरचा वापर करणं, आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत.
****
प्रसिद्ध कत्थक नर्तक पंडित बिरजू महराज यांचं काल रात्री उशीरा दिल्ली इथं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते.
पंडित बिरजू महाराज यांचं मूळ नाव हे ब्रिजमोहन मिश्रा, असं होतं. ते कथ्थक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक आहेत. कथक नर्तकांच्या महाराज घराण्याचे ते वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका  शंभू महाराज आणि  लच्छू महाराज  आणि त्यांचे वडील आणि गुरु, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्याचे पहिले प्रेम असले तरी ते  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा  अभ्यासक होते. एक गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे.
वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली. भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कत्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य नाट्य संस्था सुरु केली.
शतरंज के खिलाडी,  देवदास, उमराव जान,  बाजीराव मस्तानी  इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आलं आहे.
****
खतांच्या वाढलेल्या किंमती पूर्ववत करण्याची मागणी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांना एका पत्राद्वारे केली आहे. रब्बी हंगामा�� अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातलं लागवड योग्य क्षेत्र वाढल्यानं, खतांची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढवल्यानं, महागडी खतं घेणं शेतकऱ्यांना परवडणारं नाही. याप्रकरणी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलून, खतांच्या दरांचा ताबडतोब आढावा घ्यावा, आणि खतांच्या दरातील वाढ मागे घेण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करावेत, अशी मागणी भुसे यांनी आपल्या पत्रात केली आहे.
****
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेमुळे राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. काल परभणीत किमान तापमान १२ पूर्णांक चार, तर औरंगाबादमध्ये १५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ढगाळ वातावरण आणि शीत लहरींमुळे थंडीचा कडका वाढत आहे.
****
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे २०२०-२१ या वर्षाचे बाल वाङमय पुरस्कार काल जाहीर झाले. बाल कवितेचा पुरस्कार वीरा राठोड यांच्या ‘हाडेल हप्पी, जादूची झप्पी’ या पुस्तकाला, बाल कथा संग्रहाचा पुरस्कार, प्रा. सुहास बारटक्के यांच्या ‘बांधामधला धामण’ या पुस्तकाला, बाल एकांकिकेचा पुरस्कार प्रभाकर शेळके यांच्या, 'कोरोना राक्षस' या पुस्तकाला, बाल कादंबरीचा पुरस्कार नागेश शेवाळकर यांच्या, 'समूदादा' या पुस्तकाला, शैक्षणिक साहित्याचा पुरस्कार डॉ. नीलिमा गुंड यांच्या, 'भाषेची भिंगरी' या पुस्तकाला, तर विज्ञानविषयक पुरस्कार ,डॉ. सुनील विभुते यांच्या 'अजब शास्त्रज्ञांच्या गजब कथा' या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मुलांनी लिहिलेल्या साहित्याचा पुरस्कार मुग्धा घेवरीकर हिच्या ‘मुग्धाच्या कविता’ या पुस्तकाला, तसंच पीयुष गांगुर्डे याच्या ‘काळजातली माया’ पुस्तकाला जाहीर झाला आहे.
****
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांना अभिवादन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचं रक्षण करत स्वराज्यविस्तार केला. युध्दनिपुण, प्रकांड पंडित छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाला आणि शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो, तसंच राज्यातल्या जनतेला या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो, असंही पवार यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचं काल पहाटे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. बालवाङमय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर त्यांची पुस्तकं प्रकाशित आहेत. जाखडे यांनी ‘पद्मगंधा’ प्रकाशनाच्या माध्यमातून, अनेक मान्यवर लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. याशिवाय जगभरातलं तत्त्वज्ञान, आणि ललित कथांचे मराठी भाषेत अनुवादही प्रकाशित केले. त्यांच्या संपादनात ‘पद्मगंधा’ आणि ‘आरोग्य दर्पण’ हे दिवाळी अंक प्रकाशित होत. जाखडे यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.
****
भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेननं पुरुष एकेरीचं, तर सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेननं जगज्जेता लोह कीन यू याचा, २४-२२, २१-१७ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने, अव्वल मानांकित मोहम्मद एहसान आणि हेण्ड्रा सेतियावान या इंडोनेशियाच्या जोडीचा, २१-१६, २६-२४ असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ जुलै २०२१ सायंकाळी ६.१० ****
राज्यात कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त तळई इथली शोधमोहीम स्थानिकांच्या विनंतीवरून थांबवली.
·      राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कायम स्वरूपी ठेवणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.
·      विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज बाधित; गदारोळातच काही विधेयकं मंजूर.
आणि
·      राज्यात कोविड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या एक कोटीवर.
****
रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त तळई इथली शोधमोहीम थांबवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या तसंच बेपत्ता नागरिकांच्या नातेवाईकांनी केलेल्या विनंती वरुन शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला असून, शोधपथकांना घटनास्थळावरून परत बोलावण्यात आल्याचं, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तळई इथल्या ३१ व्यक्ती अद्यापही बेपत्ता असून, त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे तळई इथल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या ८४ झाली आहे.
****
तळई गावातल्या दरड दुर्घटनेतल्या जखमींची वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज जे.जे. रुग्णालयात भेट देऊन विचारपूस केली. दुर्घटनेतल्या १६ जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासन करणार असून, अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी रुग्णांना दिली.
****
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफच्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कायम स्वरूपी ठेवल्या जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवा�� यांनी केली आहे. सांगली इथं पूरस्थिती आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सतत येणारा पूर आणि भूस्खलन यासारख्या घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचं एक केंद्र कराड इथं तर दुसरं रायगड किंवा रत्नागिरी इथं सुरू केलं जाईल, असं पवार यांनी सांगितलं. पूरनियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन या कामावर देखरेख करण्यासाठी नोडल अधिकारी प्रत्येक जिल्ह्यात नेमले जातील, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही, असं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्यात कोयनानगर दौऱ्यावर जाऊन पाहणी करणार होते, मात्र, मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर मुसळधार पावसामुळे पुणे इथं परत नेण्यात आलं.
****
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला. कुरखेडा तालुक्यात लवारी गावानजीकच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके पोलिसांनी शोधून निकामी केली. उद्यापासून सुरु होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्व��ूमीवर, पोलिसांची ही कारवाई मोठी मानली जात आहे.
****
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाला आज सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली होती. दरम्यान, या आगीत कोणत्याही सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही.
****
पेगासस हेरगिरी, कृषी कायद्यांना विरोध आणि इतर कारणांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज चार वेळा तहकूब केल्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा सुरू झालं, तेव्हाही विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात येऊन फलक झळकावत, घोषणाबाजी करत गदारोळ केला. तालिका अध्यक्ष रमादेवी यांनी या गदारोळातच फॅक्ट्रिंग वि-नियमन सुधारणा विधेयक, राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योग तसंच व्यवस्थापन संस्था विधेयक चर्चेविना मतदानाला घेतलं. सदस्यांनी हात उंचावत मतदान करून ही विधेयकं संमत केली, त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
 राज्यसभेचं कामकाज दिवसभरात पाच वेळा तहकूब करावं लागलं, दुपारी तीन वाजता कामकाज सुरू झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ सुरूच होता. उपसभापतींनी या गदारोळातच समुद्र सहायता विधेयकावर चर्चा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ सुरुच राहिल्यानं, सदनाचं कामकाज आधी चार वाजेपर्यंत आणि नंतर पाच वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. मात्र त्यानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं, तालिका सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाचा सामना जर्मनीच्या संघासोबत होत आहे. टेबल टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताचा अचंत शरत कमल तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. उद्या त्याचा सामना चीनच्या मा लोंग याच्याशी होणार आहे. महिला एकेरीत मात्र मनिका बत्राचा ऑस्ट्रीयाच्या सोफियानं पराभव केला. बॅटमिंटनमध्ये पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीनं पराभव केला. तिरंदाजीत प्रवीण जाधव, अतनु दास आणि तरुणदीप राय या संघाचा दक्षिण कोरियाच्या संघानं उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला.
****
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने एक कोटींचा टप्पा पार केला आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाचं कौतुक केलं आहे.
****
औरंगाबाद इथं आज दोन कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, जिल्ह्यात कोविडने दगावलेल्या रुग्णांची संख्या आता तीन हजार ४८३ झाली आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता एक लाख ४७ हजार १८० झाली असून, यापैकी एक लाख ४३ हजार ३९० रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात नऊ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार ४०० झाली आहे. कोरोना विषाणूमुक्त झालेल्या १२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ६० हजार १६८ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या एका कोविड लसीकरण केंद्रावर शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या प्रकरणी भाजपचे ओबीसी मोर्चाचे शहरजिल्हा अध्यक्ष गोविंद केंद्रे यांना शिवसेनेचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या अंगारकी चतुर्थीला जालना जिल्ह्यातलं राजूर इथलं गणपती मंदीर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. प्रशासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक व्यापाऱ्यांनीही एक दिवस जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शनासाठी येणं टाळावं, असं आवाहन भोकरदनचे तहसीलदार संतोष गोरड यांनी केलं आहे.
****
विद्यार्थ्यांनी शंका न बाळगता भारतीय सेनेत दाखल व्हावं, असं आवाहन कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी केलं आहे. कारगील विजय दिनानिमित्त आज औरंगाबाद इथं कारगील स्मृतीवनात हुतात्म्यांना अभिवादन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमदार अतुल सावे, स्मृतिवन समितीचे पंकज भारसाखळे यावेळी उपस्थित होते. युद्ध अथवा रणांगण म्हणजे मृत्यू नव्हे. आपण स्वतः दहा वर्षे भारतीय सेनेत सेवा दिली असून, १९७१ च्या युद्धात सीमेवर तोफखान्याचा प्रमुख म्हणून काम केलं. सीमेवर उभे राहून देशसेवा करण्यासारखं समाधान नसल्याचं कॅप्टन सुर्वे यांनी नमूद केलं.  
****
पदोन्नती मधील मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचं आरक्षण कायम करण्यात यावं या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीनं आक्रोश आंदोलन करण्यात आलं.
****
0 notes