#संध्याकाळी मोदी मन की बात
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 28.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या अखेरचा दिवस-अनेक मतदार संघात प्रमुख पक्षांकडून उमेदवारीची अद्याप प्रतीक्षा
महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून काही उमेदवारांची घोषणा
औरंगाबाद पूर्व मतदार संघात काँग्रेसपाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीत बदल
सायबर घोटाळ्यांच्या प्रतिबंधासाठी प्रत्येकानं जागरुक राहण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून व्यक्त
आणि
दीपोत्सवाला आजपासून प्रारंभ-खरेदीसाठी ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्या संपत आहे. महायुती तसंच महाविकास आघाडीसह अनेक पक्षांनी अद्यापही काही ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत महायुतीकडून २३५ उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये भाजपचे १२१, शिवसेनेचे ६५, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४९ उमेदवारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून आतापर्यंत २५९ उमेदवार घोषित झाले असून, यामध्ये काँग्रेसचे ९९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ८४, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ७६ उमेदवारांचा समावेश आहे.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारांची तिसरी यादी काल जाहीर केली. यात बीड जिल्ह्यातल्या गेवराईतून व���जयसिंह पंडित, तर अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेनं २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये हदगाव मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड दक्षिण - आनंद तिडके पाटील, परभणी - आनंद भरोसे, वरळी - मिलिंद देवरा, कुडाळ - निलेश राणे, तर रिसोड मतदारसंघातून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनं १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यामध्ये नांदेड उत्तर मधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून दिलेला उमेदवार बदलला आहे. आता या मतदार संघात काँग्रेसकडून मधुकर देशमुख यांच्याऐवजी आता लहू शेवाळे निवडणूक लढवणार आहेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून आता विकास दांडगे ऐवजी अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप, परळी - राजेसाहेब देशमुख, तर अणुशक्तीनगरमधून फहद अहमद, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. भोकर मतदारसंघातून - साईप्रसाद जटालवार, नांदेड उत्तर - सदाशिव आरसुळे, तर परभणी मतदारसंघातून श्रीनिवास लाहोटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर घोटाळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकानं जागरुक राहण्याची आवश्यकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून संवाद साधत होते. सायबर घोटाळ्याविरोधातल्या मोहिमेत सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं आवाहन त्यांनीयावेळी केलं. समाजातल्या सगळ्यांच्या प्रयत्नानेच या आव्हानाचा सामना करू शकतो, असं सांगताना, पंतप्रधानांनी या प्रकारापासून सावध राहण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं...
Byte…
सुलेखन, लोककला, शास्त���रीय नृत्यकला, संरक्षण, अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या यशस्वी वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला. फिट इंडिया अभियानाच्या अनुषंगाने त्यांनी विविध मुद्यांच्या माध्यमातून व्यायामाचं महत्त्व विशद केलं.
उद्याच्या 'जागतिक ॲनिमेशन दिवसाच्या निमित्तानं बोलतांना, पंतप्रधानांनी ॲनिमेशनच्या जगात ‘मेड इन इंडिया’ आणि ‘मेड बाय इंडियन्स’ ह्यांचा प्रभाव असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, भारताला जागतिक ॲनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. आपल्या आसपासच्या परिसरातल्या नवीन शोधाबाबत किंवा स्थानिक स्टार्ट-अपबाबत आत्मनिर्भर इनोव्हेशन ह्या हॅशटॅगसह सामाजिक संपर्क माध्यमांवर लिहिण्याचं त्यांनी आवाहन केलं.
सरदार पटेल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवात सहभागी होण्याचं तसंच सरदार वन फाईव्ह झिरो तसंच बिरसामुंडा वन फाईव्ह झिरो या हॅशटॅगसह या दोन्ही राष्ट्रपुरुषांबाबतचे विचार सामाजिक संपर्क माध्यमांवरून सामायिक करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी ३१ ऑक्टोबरला होणारी राष्ट्रीय एकता दौड यं���ा दिवाळीमुळे २९ ऑक्टोबरला होणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सर्व देशवासियांना दीपावली आणि छट पूजेसह सर्व सणांच्या शुभेच्छा देतांना, vocal for local चा मंत्र लक्षात ठेवत, या सणांसाठीची खरेदी स्थानिक दुकानदारांकडूनच करण्याचं आवाहन करत, पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप केला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
आनंद आणि उत्साहाचं पर्व असलेल्या दीपोत्सवाला आज वसुबारसेच्या पूजनाने प्रारंभ होत आहे. सवत्स धेनु अर्थात गाय आणि वासराची पूजा करून दिवाळीला घरोघरी सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा, आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
****
मुंबईत वांद्रे टर्मिनसवर काल पहाटे प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली, यात नऊ जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस, इथल्या फलाट ��्रमांक एक वर वांद्रे-गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या कामगारांचा या गर्दीत समावेश होता.
दरम्यान, दिवाळीनिमित होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर यासह रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री येत्या आठ नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट इथल्या सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात काल युवा संसद, पालकांना संकल्प पत्र आणि मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. युवा संसद कार्यक्रमात नवमतदारांचं स्वागत करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातल्या दोन हजार १६५ मतदान अधिकारी आणि कर्मचार्यांचं प्रथम प्रशिक्षण काल निलंगा इथं पार पडलं. निवडणुकीमध्ये सर्वसाधारण समस्यांच्या अनुभव कथनातून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातल्या सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी सहा आणि विधानसभेसाठी सहा अशा १२ मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे.
****
बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असून, नागरीकांनी रक्तदान करण्याचं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी केलं आहे. या रुग्णालयात आपत्कालीन अपघात विभाग, शस्त्रक्रिया विभाग, त्याचबरोबर जिल्हाभरातून हेमोफिलिया, थैलेसिनियाचे काही बाल रुग्ण सुद्धा आहेत. त्यांना आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला रक्त द्यावंच लागतं, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात दररोज ४० ते ४५ रक्त पिशव्यांची आवश्यकता असते, असं थोरात यांनी सांगितलं.
****
महिला क्रिकेटमध्ये, दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला न्य���झीलंडकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. काल झालेल्या सामन्याय न्यूझीलंडच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात ९ बाद २५९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलग करताना भारतीय महिला संघ ४८ व्या षटकात १८३ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, शेवटचा सामना उद्या अहमदाबाद इथं होणार आहे.
* ***
बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पक्षाने या मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी काल फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले बॅनर फाडले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 28 July 2024
Time 01.00 to 01.05PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोद��� यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या एकशे बाराव्या भागातून आज देशवासीयांशी संवाद साधला.
त्यात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकावण्याची संधी देतात. या स्पर्धेसाठी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं सर्वोत्तम कामगिरी नोंदवत चार सुवर्ण, एक रौप्यपदक पटकावत पहिल्या सर्वोत्तम पाच संघात स्थान मिळवल्याचं त्यांनी नमूद केलं. या स्पर्धेत यशस्वी झालेले पुण्यातील आदित्य वेंकट गणेश आणि सिद्धार्थ चोप्रा, मुंबईचा ऋषिल माथुर, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, गुवाहाटीचा आनंदो भादुरी आणि नोएडाचा कणव तलवार यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी दुरध्वनीवरुन संवाद साधत त्यांचे अनुभव जाणून घेतले. पंतप्रधानांनी देशातील इतर युवकांना त्यांच्यापासून गणित विषयातून आंनद घेण्याची प्रेरणा मिळेल असं सांगितलं.
आसाममधील आहोम राजघराण्यातील लोकांची स्मृतिस्थळे असलेल्या मोईदम्सचा युनोस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश झाला आहे. याविषयी पंतप्रधान मोदी यांनी ९ मार्च रोजी आहोम राजा लसिथ बोरफुकन यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण क��ण्याचा बहुमान मिळाल्याची आठवण सांगतानाच देशवासीयांनी भविष्यात प्रवासाच्या योजनांमध्ये या स्थळांचा आवर्जुन समावेश करावा, असं आवाहन केलं.
पब्लिक आर्ट ऑफ इंडिया म्हणजेच परी प्रकल्प हा उदयोन्मुख कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्याचं प्रमुख माध्यम बनलं आहे. देशातील रस्त्यांच्या कडेला, भितींवर आणि भुयारी मार्गांवर खूप सुंदर चित्रे दिसतात. त्या कलाकृती परी संस्थेच्या संबंधित कलाकारांनी बनविलेल्या आहेत. त्यातून आपली कला आणि संस्कृती लोकप्रिय होण्यास मदत होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरियाणातील उन्नती बचत गटाबद्दल सांगतानांच त्या माध्यमातून महिलांच्या जीवनात समृद्धीचे रंग भरण्यात येत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.
****
पॅरीस ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी भारताचा विविध खेळ प्रकारात यश मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. बॅडमिंटमध्ये महिला एकेरीत पी. व्ही. सिंधुचा गट साखळीतला सामना थोड्या वेळापूर्वीच सुरु झाला आहे. तर, पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयचाही सामना होत आहे.
नेमबाज मनू भाकर महिला दहा मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत दुपारी साडेतीन वाजता पदकासाठी खेळणार आहे. तर, दहा मिटर एयर राइफल्स खेळात महिलांमध्ये रमिता जिंदल आणि एलावेनिल वलारिवान तर, पुरुषांमध्ये संदीप सिंह आणि अर्जुन बाबूता सहभागी होत आहे. मुष्टीयुध्दात महिला पन्नास किलो वजनी गटात निखत जरीन पहिला सामना पावणेचार वाजता खेळेल.
रोइंगमध्ये पुरुष एकल स्कल्स रेपेचेज प्रकारात बलराज पंवारचा सामना थोड्याच वेळात दुपारी सव्वा वाजता आहे. टेबल टेनिसमध्ये पुरुष एकेरीत शरथ कमलचा सामना दुपारी तीन वाजता, त्यानंतर हरमीत देसाई तसंच महिला एकेरीत श्रीजा अकुला त्यापुढे मनिका बत्रा यांचेही सामने असणार आहेत. धनुर्विद्या प्रकारात दीपिका कुमारी, अंकिता भकत और भजन कौर यांचा संघ संध्याकाळी पावणेसहाला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील.
टेनिसच्या पुरुष एकेरीत सुमित नागल तर, पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि श्रीराम बालाजी ही जोडी पहिल्या फेरीचा सामना खेळतील. जलतरणमध्ये भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू धिनिधि देसिंघु महिला दोनशे मीटर फ्रीस्टाइल आणि पुरुष शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये श्रीहरी हा खेळाडू खेळणार आहे.
****
राज्य विधिमंडळातील विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत ११ सदस्यांचा शपथविधी समारंभ आज सकाळी पार पडल��. या सदस्यांना पद आणि गोपनियत��ची शपथ उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे यांनी दिली. शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एक आमदाराचा समावेश आहे.
****
आज, विदर्भासह मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश तसंच कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच गोवा, कर्नाटकमध्ये जोरदार पाऊस होणार असल्यांचंही हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरीप हंगाम-२०२४ पिक स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.
पिक उत्पादन वाढवण्यासाठी होणाऱ्या विविध प्रयोगांसाठी शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, मिळणाऱ्या प्रोत्साहनातून अधिक उमेदीनं नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी होईल. याचं मार्गदर्शन परिसरातील अन्य शेतकऱ्यांना होऊन त्यांचाही लाभ होईल या उद्देशानं राज्य कृषि विभागातर्फे ही पिक स्पर्धा घेण्यात येते.
या स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा, राज्य अशा स्तरावरील विविध गटात रोख रकमेचं बक्षीस मिळणार आहे.
****
संत गजानन महाराजांची श्री क्षेत्र पंढरपूरहून शेगावकडे परतीचा प्रवास करणारी पालखी आज बीड इथं दाखल झाली. रिमझीम पावसात शहरवासीयांनी पालखीचं दर्शन घेतलं. शहरात कंकालेश्वर मंदिरात मुक्कामी असलेली ही पालखी उद्या इंथून प्रस्थान ठेवणार असून, शेगावला ११ ऑगस्टला पोहोचणार आहे.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका- राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
२०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात विका�� तसंच आर्थिक एकत्रीकरण अशा दोन्हींचं उद्दिष्ट उत्तम प्रकारे साध्य करण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीतारामन आज मुंबईत दौऱ्यावर असून, त्यांनी अर्थसंकल्पासंदर्भात भागधारकांशी संवाद साधला. विकासावर लक्ष केंद्रीत करून सातत्याने अर्थव्यवस्थेची वाढ करणाऱ्या देशांमध्ये, जगातील एखाद दुसरा अपवाद वगळता भारतच आहे. ही वाढ अशीच चालू ठेवण्यासाठी दहा लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
***
ई-लिलावाद्वारे गव्हाची दुसरी विक्री येत्या १५ फेब्रुवारी रोजी देशभरात होणार आहे. भारतीय अन्न महामंडळाने एक आणि दोन फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या ई-लिलावातल्या सर्व विजेत्या बोलीदारांना देशभरातल्या संबंधित डेपोमधून ताबडतोब साठा उचलण्याचे निर्देश दिले आहेत. ई-लिलावात विकला जाणारा गहू उचलल्यानंतर आणि आटा बाजारात उपलब्ध झाल्यानंतर किमती आणखी घसरतील, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितलं.
***
पुणे जिल्ह्यातल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा मतदारसंघातून हेमंत रासने यांना, तर चिंचवड इथून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
***
मुंबई महानगरपालिकेचा २०२३ - २४ या आर्थिक वर्षाचा ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आज सादर केला. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी एक हजार ७२९ कोटीची अंदाजी तरतूद करण्यात आली आहे. २०३० पर्यंत मुंबई शहराला पायाभूत सुविधांनी युक्त आनंदी शहर बनवण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचं चहल यांनी सांगितलं. पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अंमलात आणली असून, वातावरण कृती आराखडा तयार करण्याचं काम प्रगती पथावर आहे. तसंच स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी 'मुंबई वायू प्रदूषण कृती योजना' आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागासाठी माय जी ओ व्ही अॅपद्वारे एक नाद मधुर कविता अर्थात जिंगल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. समजायला सोपी आणि आपलंसं करेल अशी २५ ते ३० सेकंदांची धून या स्पर्धेसाठी अपेक्षित आहे. सर्वोत्कृष्ट जिंगलला अकरा हजार रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका देता येतील.
***
सध्या केवळ पुणे-अहमदनगर मार्गावर सुरु असलेल्या ‘शिवाई’ या एस टी महामंडळाच्या ई-गाड्यांची सेवा, लवकरच पुणे ते - दादर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापूर या मार्गांवर सुरु होणार आहे. याकरता आणखी ५० शिवाई गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार असून, संबंधित आगारांकडे त्यांचं वाटप झाल्यानंतर ही सेवा सुरु होणार आहे. तसंच एस टी महामंडळाच्या पुणे विभागात १५ वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या गाड्यांचा वापर लवकरच बंद केला जाणार असून, त्यांच्या जागी नव्या शिवाई गाड्या दाखल होणार आहेत.
***
औरंगाबाद महापालिकेने व्यावसायिक नळांच्या अधिकच्या पाणी वापरास लगाम लावण्यासाठी मिटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या प्रभाग कार्यालयनिहाय याद्या तयार करून तातडीने सादर करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहे. येत्या आठ दिवसात व्यावसायिक नळांना मिटर बसवण्याचं काम सुरू केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
***
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय एकात्मता यात्रा आज औरंगाबाद इथं संध्याकाळी पाच वाजता दाखल होणार आहे. ईशान्य भारतातील तरुण आणि इतर राज्य��ंमधील बंधुत्वाची भावना वाढवण्याच्या उद्देशानं या अंतरराज्य छात्र जीवनदर्शन यात्रेचं आयोजन करण्यात येतं. औरंगाबाद शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ही यात्रा दाखल होणार असून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद पंचायत समितीमधल्या अशोक खेडकर या कृषी अधिकाऱ्यास चार हजार रुपये लाच घेताना काल पकडण्यात आलं. कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता आणि कृषी दुकानाचा मासिक तपासणीचा अनुकूल अहवाल कृषी अधीक्षकांना पाठवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
***
नांदेड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातल्या शुन्य ते १८ वर्षे वयापर्यंतची बालकं आणि किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी नियोजन केलं आहे. या मोहिमेसाठी सुमारे ३०० वैद्यकीय तपासणी पथकं तयार करण्यात आली असून, उपलब्ध मनुष्यबळ आणि जिल्ह्यातल्या आरोग्य सेवा-सुविधा यांचा यात अंर्तभाव करण्यात आला असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतल्या सुमारे ३८ हजार ८०० कोटी रुप���ांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण, भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे - कुर्ला संकुलातल्या एम एम आर डी ए मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. मेट्रो मार्गिका दोन - अ आणि सात चं लोकार्पण, बृहन्मुंबई महापालिकेच्या २० नव्या ‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी, महापालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन, सुमारे ४०० किलोमीटर रस्त्यांचं कॉंक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन असे विविध कार्यक्रम यावेळी होणार आहेत. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे मुंबई दौर्याची माहिती दिली असून, या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
***
पंतप्रधान मोदी येत्या २९ जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
दरम्यान, मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग एप्रिल मध्ये प्रसारित होणार आहे. याचं बोधचिन्ह तयार करण्यासाठीचे अर्ज सरकारनं मायगव्ह डॉट इन यावर एक फेब्रुवारीपर्यंत मागवले आहेत. सर्वोत्कृष्ट बोधचिन्हाला एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे.
***
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाला स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. ऑलम्पिक आणि राष्ट्रकूल स्पर्धेतल्या पदक विजेत्यांसह कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांवर ७२ तासांत उत्तर देण्याचे निर्देश क्रीडा मंत्रालयानं दिले आहेत. बृजभूषण सिंह यांनी हे आरोप फेटा��ून लावले असून, चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, या आरोपानंतर लखनऊ इथलं महिला राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिरात ४१ पहिलवान १३ प्रशिक्षक सहभागी होणार होते, अशी माहिती भारतीय क्रीडा प्राधिकरणाने दिली आहे.
***
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्रामनिमित्त हिंगोली इथं जिल्हा परिषदेच्या वतीनं हर घर नर्सरी अभियानाची काल सुरुवात झाली. जिल्हाधिकाती जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाअंतर्गत शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच खाजगी जागा इत्यादी ठिकाणी नर्सरी तयार करण्यात येणार असून, हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या घरी सुद्धा वृक्षारोपण करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.
***
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथला महसूल सहायक सुभाष कोंडलवार याला १२ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गायरान जमीन खरेदी विक्री करण्यासाठी शासनाच्या आदेशाची प्रत देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
***
संगीतकार, गायक, अभिनेते पद्मभुषण मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं आजपासून दोन दिवसीय संगीत महोत्सवाला सुरुवात होणार आहे. याच महोत्सवात फुलंब्रीकरांच्या १२६ व्या जयंती दिनी म्हणजेच उद्या २० जानेवारीला संत सावता माळी शैक्षणीक संकुलात फुलंब्रीकरांच्या नावानं उभारण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पण भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे. फुलंब्री इथल्या संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाच्या प्रांगणात संध्याकाळी साडे सहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
***
मुंबई - गोवा महामार्गावर कणकवलीजवळ हळवल फाट्यावर लक्झरी बस पलटून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले. पुण्याहून गोव्याच्या दिशेनं जाणार्या या बसला आज पहाटे हा अपघात झाला.
***
ओडिशामध्ये सुरू असलेल्या एफ आय एच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना वेल्ससोबत होणार आहे. भुवनेश्वर इथल्या कलिंग मैदानावर हा सामना होईल. इतर तीन सामन्यांमध्ये मलेशियासमोर न्युझीलंडचं आव्हान असेल, नेदरलँड्स आणि चिली आमनेसामने असतील तर स्पेन आणि इंग्लंड यांच्यात लढत रंगेल.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.****
राज्यसभेत आज भारत - चीन मुद्यावर गदारोळ झाला. आज सदनाचं कामकाज सुरु होताच काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलासह इतर विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली. चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नावर विस्तारानं चर्चा झाली पाहिजे, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचं, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. मात्र या मुद्यावर बोलण्यासाठी कालच वेळ दिला होता, असं उपसभापती हरीवंश यांनी सांगितल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.
****
सर्व खासदारांनी जी ट्वेंटीशी संबंधित कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे, कारण हा कार्यक्रम केवळ सरकारचा नसून देशाचा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी ��िल्ली इथं आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. जी - 20 श�� संबंधित कार्यक्रमांमध्ये नागरीकांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं सर्व खासदारांनी उपाय सुचवावे, असं त्यांनी सांगितलं.
****
जी २० च्या विकास कार्य समुहाच्या मुंबईत सुरु असलेल्या बैठकीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विविध देशांचे प्रतिनिधी शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीसाठी चर्चा करत आहेत. परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा यांच्या व्हिडिओ संदेशाने या बैठकीला सुरुवात झाली. उच्च-स्तरीय तत्त्वे, अन्न, ऊर्जा आणि आर्थिक बाजारपेठेतील सध्याच्या व्यत्ययांवर बैठकीच्या या सत्रात चर्चा होत आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये सुधारणा करणं, यावर या बैठकीत भर देण्यात आला आहे.
****
राज्यातलं शिंदे - फडणवीस सरकार साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. फ्रॅक्चर्ड फ्रिडम या पुस्तकाच्या अनुवादाला मिळालेला पुरस्कार रद्द केल्याच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचं ते म्हणाले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुरेश द्वादशीवार यांची निवड होणार होती, मात्र राजकीय दबावामुळे ही निवड रोखण्यात आली, असा आरोपही पवार यांनी केला. प्रत्येकाला आपली मतं मांडू द्यायला पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २५ डिसेंबरला आकाशवाणीवर्च्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ९६वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीक आपले विचार किंवा सूचना, नमो अॅपवर आणि माय जीओव्ही फोरमवर तसंच एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर पाठवू शकतात.
****
गोवर-रुबेलावर विशेष लसीकरण मोहीम राज्यात उद्यापासून २५ तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातल्या मुलांना एमआर-वन आणि एमआर-टू लसी देण्यात येतील. लसीकरण आवश्यक असलेल्या मुलांचा शोध आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे प्रत्येक जिल्ह्यात घेतला जात आहे.
****
परळी वैजनाथ - मिरज एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. उद्यापासून ही गाडी परळीहून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि संध्याकाळी साडेसहा वाजता मिरजला पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी बँकेस रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, त्यात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तीन कोटी तीन लाख रुपये मिळणार आहेत. या रकमेमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उर्जितावस्था निर्माण होण्यास मदत होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
साहस आणि धैर्यासमवेत युवकांनी व्यक्तीमत्व जडण-घडणावर अधिक लक्ष देण्याची गरज, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केली आहे. मुगट इथं माता साहिब गुरूद्वारा परिसरात, राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिराच्या समारोप समारंभात काल ते बोलत होते. राष्ट्रीय छात्रसेना ही एकता आणि अनुशासन या ब्रिदवाक्याला अनुसरून शालेय शिक्षणापासून युवकांसाठी मोलाचं कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात जबाबदारीची भावना निर्माण करणं, सैन्यदलाविषयी आवड निर्माण करणं, तसंच साहसी युवक तयार करण्यात छात्रसेनेचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल असंही ते म्हणाले.
****
कोलंबियामध्ये बोगोटा इथं आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलंपियाडमधे भारतानं सहा सुवर्णपदक जिंकत अग्रस्थान पटकावलं आहे. भारताच्या अरित्रा मल्होत्रा, राजदीप मिश्रा, देवेश पंकज भैय्या, बनिब्रत माजी आणि अवनीश बन्सल या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. प्रयोगिक स्पर्धेत अरित्रा, अवनीश आणि राजदीप या तिघांच्या संघानं दुसऱ्या संघासोबत संयुक्तरित्या रौप्यपदक पटकावलं.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना चट्टग्राम इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या ४१ षटकात चार बाद १३४ धावा झाल्या होत्या.
//**********//
0 notes
Text
पंतप्रधान मोदी मन की बात लाईव्ह अपडेट्स संबोधित राष्ट्र, मन की बात शेतकरी विरोधक कोरोनाव्हायरस निवडणूक विरोधी पक्ष बी.जे.पी.
पंतप्रधान मोदी मन की बात लाईव्ह अपडेट्स संबोधित राष्ट्र, मन की बात शेतकरी विरोधक कोरोनाव्हायरस निवडणूक विरोधी पक्ष बी.जे.पी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मनाविषयी बोलत आहेत – फोटो: अमर उजाला ग्रा��िक्स अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित काला��धी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! विशेष गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या अभिभाषणाची सुरुवात माघ पूर्णिमा उत्सवापासून केली. ते म्हणाले की माघाचा महिना विशेषत: नद्या,…
View On WordPress
#आज दुपारी मोदी मन की बात लाइव्ह#आज दुपारी मोदी मोदी की बात 2021#आज दुपारी मोदींचा पत्ता#आज दुपारी मोदींना देशाला संबोधित#इंडिया न्यूज इन हिंदी#कोरोना विषाणू#कोरोनाविषाणू#कोरोनाव्हायरस लसीकरण#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#नरेंद्र मोदी#पंतप्रधान मोदी थेट#पीएम मोदी#भावनांचे महत्व#मन की बात#रेडिओ कार्यक्रम#विचारांचे महत्व#विधानसभा निवडणूक 2021#शेतक .्यांचा निषेध#संध्याकाळी मोदी मन की बात
0 notes
Text
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यापूर्वी 'मन की बात' म्हणण्यापूर्वी तुम्हाला धैर्य असेल तर शेतकरी आणि नोकरीबद्दल बोला
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्यापूर्वी ‘मन की बात’ म्हणण्यापूर्वी तुम्हाला धैर्य असेल तर शेतकरी आणि नोकरीबद्दल बोला
अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ले करत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी दरमहा महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ वर खिल्ली उडविली. ते म्हणाले आहेत की जर तुमच्यात हिम्मत असेल तर शेतक the्यासाठी…
View On WordPress
#आज दुपारी मोदी मन की बात#इंडिया न्यूज इन हिंदी#कॉंग्रेस#ताज्या इंडिया न्यूज अपडेट्स#नरेंद्र मोदी#नोकरी#भावनांचे महत्व#मन की बात#मन की बात आज#राहुल गांधी#रेडिओ कार्यक्रम#रोजगार#विचारांचे महत्व#शेतक .्यांचा निषेध#संध्याकाळी मोदी मन की बात
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
जी - ट्वेंटी परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी भारताला मिळाली असून, या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा आज ९५वा भाग प्रसारित झाला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताला इतक्या मोठ्या समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानं, ही बाब अधिकच खास झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जी - ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक आणि अभिमान बाळगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जी-20 मध्ये सामील व्हा, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांनी जी-20 शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
स्वदेशी अंतराळ स्टार्ट अपच्या माध्यमातून भारतानं पहिलं रॉकेट विक्रम एसचं यशस्वी उड्डाण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. भारतातल्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय असून, आत्मविश्वासाने भर��ेल्या नव्या युगाची ही सुरुवात असल्याचं ते म्हणाले. ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात असल्याचं सांगुन पंतप्रधानांनी, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती, त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत असल्याचं नमूद केलं. अलिकडच्या वर्षांत, आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला असून, आपण भारतीय, विशेषत: आपली तरुण पिढी आता थांबणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या आठ वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात वाढली असून, यावरून भारतीय संस्कृती आणि संगीताचं वेड जगभरातच वाढलं आहे, हे लक्षात येत असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. विविध देशांमध्ये भारतीय संगीताबद्दलची आत्मियता त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून यावेळी विषद केली.
भारत देश जगातल्या सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आपण खूप अभिमान बाळगतो. त्यामुळे आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं, ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशात सध्या शिक्षणाचं क्षेत्र उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, उत्तर प्रदेशचे जतिन ललितसिंह आणि झारखंडचे संजय कश्यप या दोन शिक्षकांच्या कार्याची माहिती दिली.
आज प्रत्येक देशवासी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे, देशावासियांच्या या प्रयत्नांना नमन करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसि हे येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत. इजिप्तच्या राष्ट्रपतींची प्रजासत्ताक दिनाच्या येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि इजिप्तमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून, दोन्ही देश या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. भारताच्या जी-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला 'अतिथी देश' म्हणून आमंत्रित करण्यात आलं असल्याचं, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं.
****
स्पेन मध्ये झालेल्या जागतिक युवा मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतानं चार सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकासह एकूण ११ पदक जिंकत दुसरं स्थान पटकावलं आहे. काल स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सुरेश विश्वनाथ, वंशराज, देविका घोरपडे आणि रविना यांनी सुवर्ण पदक जिंकलं. भावना शर्मा, कीर्ति आणि आशिष यांनी रौप्य, तर तमन्ना, कुंजरानी देवी, लशु यादव आणि ��ुस्कान यांनी कांस्य पदक जिंकलं.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता जपान विरुद्ध कोस्टारिका, संध्याकाळी साडे सहा वाजता बेल्जियम विरुद्ध मोरोक्को, रात्री साडे नऊ वाजता क्रोएशिया विरुद्ध कॅनडा, तर रात्री साडे बारा वाजता स्पेन विरुद्ध जर्मनी हे सामने होणार आहेत.
काल या स्पर्धेत अर्जेंटिनानं मेक्सिकोचा दोन - शून्य असा, तर फ्रान्सने डेन्मार्कचा दोन - एक असा पराभव केला. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियानं ट्यूनिशियाचा एक - शून्य असा, तर पोलंडनं सौदी अरेबियाचा दोन - शून्य असा पराभव केला.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु झाल्यानंतर लगेच पावसामुळे खेळ काही वेळ थांबवण्यात आला, नंतर सामना २९ षटकांचा घेण्याचा निर्णय झाला. मात्र पाऊस सुरुच राहील्यानं सामना रद्द करण्यात आला. मालिकेत पहिला सामना जिंकून न्यूझीलंड एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 October 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या नियमापेक्षा कितीतरी पटीने जास्तीची नुकसानभरपाई दिलेली असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड इथं अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री नागपूरहून रवाना झाले. दिवाळी सारख्या सणाला आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या ,आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करणं समाधानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात सर्व शहरांमधून आज सायंकाळी सुर्यास्तावेळी खंडग्रास सुर्यग्रहण अनुभवता येणार आहे. दिवाळी निमित्त पृथ्वीवर दीपोस्तवाची रोषणाई सोबतच आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळण���र असल्याची माहिती, एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. या सूर्यग्रहणाला साधारण सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. ग्रहण मध्य संध्याकाळी पाच वाजून ४२ मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकणार आहे. पश्चिम आकाशात सुर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. नंतर ग्रहण सुटण्याआधीच संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त होतांनाचं सूंदर दृष्य दिसणार असल्याचं औंधकर यांनी सांगितलं.
****
संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या राजौरी भागात सीम��वरील सैन्य तळाला भेट दिली आणि कर्तव्य बजावण्यासाठी तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. व्हाईट नाइट कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यावेळी उपस्थित होते. सीडीएस चौहान यांनी नौशेरा सेक्टरमधल्या युद्धस्मारक नमन स्थळावर पुष्पहार अर्पण करुन देशसेवेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २३ हजार ७९१ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५६ लाख ६५ हजार ५९८ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, काल देशात ८६२ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हाजर ५०३ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २२ हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
****
प्रत्येक बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी महिला आणि बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचं या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. मुंबईत माटुंगा इथल्या द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन आणि श्रद्धांनंद बालगृह या संस्थांना भेट देऊन लोढा यांनी तिथल्या बालकांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या प्रत्येक बालकाला निरामय आरोग्य लाभावं, यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत, बालकांचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
तीन लाख ८० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर डाक विभागातल्या पोस्ट अधिकाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘पंढरीची वारी’या नावाने पोस्टकार्ड छपाईचा अधिकार नसताना एका खासगी कंपनीकडून ती करून घेणं, त्या कार्डांच्या विक्रीद्वारे जमा झालेले पैसे, झालेली छपाई यामध्ये साधर्म्य नसल्याने आर्थिक अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सन २०१९ पासून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने पंढरपूर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात करण्यात आली होती.
****
फ्रान्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत सुरवातीच्या फेरीत आज भारताच्या लक्ष���य सेन आणि किदांबी श्रीकांत यांच्यात सामना होणार आहे. महिला एकेरीत सायना नेहवालचा सामना जर्मनीच्या यवोने ली सोबत होणार आहे.
****
0 notes
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
प्रादेशिक बातम्या****
नवभारताची संकल्पना फक्त देशासाठी नाही तर बलिदान, प्रेम, सदाचार, प्रतिभा, साहस, हिंमत आणि शांततेचं एकत्रीकरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज कारगिल इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी ते बोलत होते. सीमेवर येऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणं ��ी आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असून, सर्व सैनिक स��मेवरील कवच असल्याचं ते म्हणाले. देशभक्ती ही देवाच्या भक्तिप्रमाणेच असते, असं नमूद करत पंतप्रधानांनी सशस्त्र दलांचं कौतुक केलं. भारतासाठी युद्ध हा कधीही पहिला पर्याय नव्हता, युद्ध ही आपल्यासाठी सदैव शेवटचा पर्याय आहे, तसे आपल्यावर संस्कार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. आपल्या सेनेकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे, कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहात असेल तर आपले सैनिक जशास तसे उत्तर देण्यास समर्थ असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
दीपोत्सावाच्या मंगल पर्वात आज नरक चतुर्दशी पाठोपाठ लक्ष्मीपूजनाचा सण सर्वत्र चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे. आज संध्याकाळी घरोघरी, तसंच व्यापारी पेठांमध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी पूजन केलं जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा पवित्र सण अंधारातून प्रकाश आणि तेजाकडे जाण्याचा संदेश देतो, यानिमित्ताने हे पर्व आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरं करा, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
****
दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘सिडको’ च्या नवीन महागृहनिर्माण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य��ंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर इथं परवडणाऱ्या दरात ७ हजार ८४९ सदनिका उपलब्ध होणार आहेत. इच्छुक नागरिकांनी या सोडतीचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पिवळ्या आणि केशरी झेंडूच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे ७०० किलो पाना फुलांच्या वापरातून ही मनमोहक आरास साकारण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही मनमोहक आरास पाहून समाधान व्यक्त केलं जात आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ४२ हजार ८६४ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५६ लाख ४१ हजार ८०७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
राज्यातल्या शासनमान्य ग्रंथालयांना २०२३-२४ या वर्षापासून निकषानुसार ६० टक्के अनुदान देण्यार येईल, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते काल कोल्हापूर इथं जिल्हा ग्रंथालय संघाच्या ५३व्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. नव्या वर्षात दर्जावाढीसोबत नवीन ग्रंथालयांना देखील मंजूरी देण्यात येईल, त्यांना पहिल्याच दिवसापासून अनुदान लागू करण्यात येईल, असंही पाटील यांनी सांगितलं.
****
साखर विक्रीचा किमान हमीभाव तीन हजार १०० रुपयांवरुन ��ीन हजार ५०० रुपये करावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीनं पंढरपूर इथं काल झालेल्या ऊस परिषदेत केली आहे. सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतकऱ्यांना खाजगी काट्यावरून वजन करून आणण्याची मुभा द्यावी, देशाला आवश्यक आहे तेवढीच साखर निर्मिती करावी बाकीची इथेनॉल निर्मिती करावी, यावर्षी उसाची पहिली उचल दोन हजार ५०० रुपये मिळाली पाहिजे, असे ठराव या परिषदेत करण्यात आले.
****
स्पेनमध्ये सुरू असलेल्या २३ वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमन सेहरावत यानं सुवर्ण पदक पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात तुर्कस्तानच्या अहमत दुमान याचा १२ - चारनं पराभव केला. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय मल्ल ठरला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं उघडीप दिली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे धरणाच्या विसर्गात घट करण्यात आली असून, धरणाचे दहा दरवाजे आता दोन फुटावरुन दीड फूट उंचीवर स्थिर करण्यात आले आहेत. धरणातून आता २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
****
अमरावती नजिक टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे २० डब्बे रुळावरून घसरल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. काल रात्री ही घटना घडली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
· राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात सांगलीच्या संकेत सरगरला रौप्यपदक.
· अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
· राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात केलेल्या विधानाचा विविध मान्यवरांकडून निषेध.
आणि
· शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांची शिंदे गटात जाण्याची घोषणा.
****
सांगलीच्या संकेत सरगरने बर्मिंगघम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं आहे. प्रतिकूल परिस्थितीत आणि दुखापतग्रस्त असताना सुद्धा त्याने ही चमकदार कामगिरी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी हरियाणात पंचकुला इथं झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत संकेतची लहान बहीण काजल सरगर हिने सुद्धा भारोत्तोलन प्रकारात महाराष्ट्राला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. संकेतच्या या कामगिरीबद्दल काजल हिने या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या –
आता इंग्लंडमध्ये होत असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने भारताला पहिलं सिल्व्हर मेडल घेऊन दिलं. पूर्ण भारतीय लोकांना यावर गर्व आहे. त्यानं केलेल्या कष्टाचं जे चीज झालं, त्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहोत.
संकेतच्या कामगिरीनंतर सांगलीत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी संकेतचं अभिनंदन केलं आहे.
****
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नाशिक इथं आढावा बैठकीत बोलत होते. राज्य शासन जनतेप्रती संवेदनशील असल्यामुळे थेट विभागस्तरावर जावून विकास कामांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पावसाळ्यात शासकीय विभागांनी समनव्यय साधून काम करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
मालेगाव इथं २०५ पोलीस निवासस्थानं तसंच नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाला. पोलिसांसाठी राज्यात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, नाशिक इथून मुख्यमंत्री आज औरंगाबाद इथं येत आहेत. आज संध्याकाळी वैजापूर तालुक्यात महालगाव इथं शिवसेनेची जाहीर सभा, उद्या रविवारी सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात, अतिवृष्टी आणि पीक आढावा बैठकीनंतर, ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुपारी सिल्लोड इथं शिवसेनेच्या सभेसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रात्र��� उशिरा ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं औरंगाबाद इथं काळे झेंडे दाखवून स्वागत करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं बातमीदारांशी बोलत होते. राजकीय स्वार्थासाठी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यात आलं आहे. त्यामुळे याविरोधात काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार असल्याचं खासदार जलील म्हणाले. राज्यात एकनाथ शिंदे आणि भाजपचं सरकार स्थापन होवून एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच असणारे मंत्रिमंडळ हे देशात कुठेच नसल्याची टीका खासदार जलील यांनी केली. शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. त्यामुळे किमान कृषी मंत्र्यांची तरी नेमणूक करावी अशी मागणी खासदार जलील यांनी केली.
****
ज्या सामान्य जनतेनं इंग्रजांना घरी पाठवलं, तीच जनता, देशाचे मालक समजणाऱ्यांनाही घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही, असं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुनर्बांधणीच्या निमित्ताने पवार आज धुळे दौऱ्यावर आले असता, बोलत होते. सत्ताधारी लोक आपण देशाचे मालक आहोत अशा पद्धतीने वागत आहेत हे योग्य नाही असं ते म्हणाले. सत्तेचा गैरवापर वाढतच चालला आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात जावून शेवटच्या घटका पर्यंत पोहोचून राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि मराठी माणसासंदर्भात केलेल्या विधानाचा विविध मान्यवरांनी निषेध केला आहे.
महाराष्ट्राच्या विकासात आणि ��र्थिक वाटचालीत मराठी माणसाचंच योगदान सर्वात मोठं योगदान असून, राज्यपालांच्या या विधानाशी सहमत नसल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज दोंडाईचा इथं बोलत होते. राज्यपालांचे वक्तव्य हे तत्कालीन स्थितीवरून असल्याचं सांगताना, राज्यपालांच्या मनात मराठी माणसाबद्दल आदर असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी, असं म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण विद्यमान राज्यपालांना नाही याची खंत ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यपालांचं हे वक्तव्य दुर्दैवी स्वरूपाचं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेड इथं महात्मा फुले पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
****
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज जालना इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनं, परिवारासाठी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. जालन्यातल्या साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही, मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरु करण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी दिलं आहे. त्यामुळे आपण त्यांना समर्थन जाहीर करत असल्याचं खोतकर यांनी सांगितलं. आजपर्यंत पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करत आलो असल्याचं सांगून जिल्ह्यातल्या सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही भेट झाल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
****
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या कुरूंदा, कौठा तसंच कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा इथल्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. दुपारनंतर नांदेड जिल्ह्यातही ते नुकसानाची पाहणी करणार असल्याचं वृत्त आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परवा एक ऑगस्टला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृहात दुपारी साडेबारा वाजता विशेष व्याख्यानाचं अयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथल्या देगलूर महाविद्यालयातले प्राध्यापक दुडुकनाळे राजेश्वर हे अण्णा भाऊंच्या साहित्यातील परिवर्तनवाद या विषयावर व्याख्यान देतील.
दरम्यान, औरंगाबाद इथल्या बलवंत वाचनालयाचा एकशे दोनावा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगानं एक ते तीन ऑगस्ट दरम्यान ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, लोकमान्य टिळक यांचं चरित्र ग्रंथ आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे ग्रंथ ठेवणार असल्याची माहिती बलवंत वाचनालयाचे अध्यक्ष विपीनकुमार बाकलीवाल यांनी दिली.
****
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार गुरुराजा पुजारी याने भारोत्तोला प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
· राष्ट्रपतींबाबत अधीररंजन चौधरी यांच्या आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज आजही बाधित.
· तंबाखू उत्पादनांच्या वेष्टणावरच्या आरोग्यविषयक इशाऱ्यात बदल; सुधारित नियमावली १ डि��ेंबर पासून लागू होणार.
· जालना इथं वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ४७ शालेय बसवर दंडात्मक कारवाई.
· �� जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठी कपात; सध्या सुमारे साडे नऊ हजार घनफुट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू.
आणि
· राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीच्या तलवारबाजी संघात औरंगाबादच्या दोन खेळाडूंची निवड
****
काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. राज्यसभेत कामकाज सुरू होताच, सत्ता पक्षाच्या सदस्यांनी चौधरी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्याला विरोधकांनी सभापतींसमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजीने प्रत्युत्तर दिलं. त्यावर उपसभापतींनी सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. कामकाज पुन्हा सुरू होताच, सत्ताधारी सदस्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, यासाठी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेस सदस्यांनी पुन्हा हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे उपसभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
लोकसभेतही असंच चित्र पहायला मिळालं. याच मुद्यांवर सुरू झालेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं.
****
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जून २०२२ अखेरपर्यंत देशभरात एक लाख २० हजार आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. देशभरात दीड लाख आरोग्य उपकेंद्रं तसंच ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकार शक्य ती सर्व मदत करत असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं.
****
सर्व तंबाखू उत्पादनांच्या वेष्टणावरच्या आरोग्यविषयक इशाऱ्यात बदल करून याबद्दलची सुधारित नियमावली केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अधिसूचित केली आहे. ही सुधारित नियमावली १ डिसेंबर पासून लागू होणार आहे. त्यानुसार १ डिसेंबर २०२२ रोजी अथवा त्यानंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या सर्व तंबाखू उत्पादनांवर ‘तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो’ हा आरोग्यविषयक इशारा संबंधित प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असेल, असं आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तसंच, पुढील वर्षी १ डिसेंबर नंतर उत्पादित अथवा आयात करण्यात आलेल्या उत्पादनांवर ‘तंबाखू सेवन करणारे तरुणपणी मरतात’ हा आरोग्य विषयक इशारा प्रतिमेसह प्रदर्शित करणं बंधनकारक असल्याचं यात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान मोदी परवा आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९१वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या आणि परवा दोन दिवस औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी वैजापूर तालुक्यात महालगाव इथं शिवसेनेची जाहीर सभा, परवा रविवारी सकाळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी आणि पीक आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुपारी सिल्लोड इथं शिवसेनेच्या सभेसह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहतील. सायंकाळी औरंगाबाद इथं छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून, रात्री उशिरा ते विमानाने मुंबईला प्रयाण करतील.
****
शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी राज्यात पीकस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. खरीप हंगामातल्या भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भूईमूग, सूर्यफूल, मूग आणि उडीद या ११ पिकांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ३०० रुपये प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क भरून एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख मूग आणि उडीद पिकासाठी ३१ जुलै तर इतर पिकांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत असून यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
जालना शहरातल्या वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या ४७ शालेय बसवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या पथकानं आज अचानक शालेय बसची तपासणी केली त्यात ही कारवाई करण्यात आली. पालकांनी परवानाधारक बसमधूनच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावं, तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं बस चालकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन परिवहन अधिकारी काठोळे यांनी यावेळी केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे करण्यात येणाऱ्या विसर्गात आज कपात करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता धरणाची १८ दारं एक फुट उंचीवरुन अर्ध्या फुटावर स्थिर करुन गोदावरी नदी पात्रात आता नऊ हजार ४३२ घनफुट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सध्या जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्याद्वारे ५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे.
****
येत्या ९ ते २० ऑगस्ट दरम्यान लंडन इथं होणाऱ्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत कॅडेट ज्युनिअर आणि सिनिअर गटातील स्पर्धेसाठी औरंगाबादच्या दोन खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. कशीश भराड आणि श्रेयस जाधव अशी या खेळाडूंची नावं असून कटक इथं झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी तलवारबाजी स्पर्धेत या दोघांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघात त्यांची निवड करण्यात आली आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडीजवर तीन - शून्य असा विजय मिळवला आहे.
****
राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय यांच्या वतीनं आज चंद्रपूर इथं व्याघ्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव आणि केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री यादव यांनी जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगल सफारी केली तसंच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकां��ी संवाद साधला. उपजीविकेच्या निमित्तानं या व्याघ्र प्रकल्पात राहणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं.
****
सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक किशोर चंडक यांना जाहीर झाला आहे अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. एक ऑगस्ट ला मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ ज��न २०२२ दुपारी १.०० वा. ****
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होत आहे. एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्ष आपआपल्या आमदारांना मुंबईत मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी पक्षांचे प्रमुख रणनीती आखत आहेत. गुप्त पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे मत फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष अधिक काळजी घेत आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीत काही अपक्ष आमदारांची मते फुटली होती, ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दुपारी पक्षाच्या प्रत्येक आमदार आणि अपक्ष आमदारांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर आता अशा प्रकारची कोणतीच चूक होऊ नये यासाठी आमदारांना मतदान कसं करावं याबाबत मार्गदर्शन आणि त्याबाबतची रंगीत तालीम देखील घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठकही होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील पक्षाच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत.
****
मुंबई आणि परिसरात आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली. दादर परिसर आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला तर पालघर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र समुद्र किनारपट्टीच्या काही भागात सकाळी चांगला पाऊस पडला. आज पहाटे चेंबूरच्या आरसीएफ न्यू भारतनगर या डोंगराळ झोपडपट्टीमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग तालुक्यात रिमझिम पाऊस पडला. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख २४ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९६ कोटी १४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १२ हजार ८०० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, १५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ८ हजार ५१८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ७२ हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
सध्या बदलत्या जीवन शैलीशी संबंधित आजार वाढत आहेत, अश्या परिस्थितीत या काळात, विशेषत्वानं युवा पिढी��ध्ये योगाचं महत्व आणखीन वाढलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज ट्वीटर वर योग संदर्भातला एक व्हिडिओ जारी करुन चांगलं स्वास्थ्य आणि निरोगी राहण्यासाठी योग अंगीकारला पाहिजे असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २६ तारखेला आकाशवाणी वरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम शृंखलेचा हा ९० वा भाग असेल. नागरिकांनी आपले विचार किंवा सूचना My Gov या NaMo ॲप च्या माध्यमातून मांडाव्यात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर नागरिकांना आपले संदेश हिंदी किंवा इंग्रजीत ध्वनिमुद्रित करता येणार आहेत. १ ९ २ २ या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर प्राप्त झालेल्या एस एम एस मधल्या लिंक वर देखील नागरिक आपल्या सूचना पाठवू शकणार आहेत.
****
औरंगाबाद शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करताना सर्वांना समान पाणी मिळण्याच्या दृष्टीनं प्रशासन उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्यावसायिक नळांना वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत औरंगाबाद शहरात ४०० मीटर्स बसवण्यात आले असून आणखीन १५०० व्यावसायिक नळांना मीटर बसवण्यात येणार आहेत.
****
कोल्हापूरहून आळंदीला वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला टेम्पोनं पाठीमागून जोरात धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एक वारकरी ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्यातल्या शिरवळ महामार्गावर आज पहाटे हा अपघात झाला. या अपघातात इतर २६ जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
****
0 notes
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 23.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 April 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ एप्रिल २०२२ सायंकाळी ६.१०
****
· लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर.
· सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजक निर्माण झाल्याचा भाजपचा आरोप.
· बीड जिल्ह्यात रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी.
आणि
· आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत, गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांना दंड.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. उद्या संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत होणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहतील. या सोहोळ्यात पंतप्रधान मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरु करण्यात आलेला हा पुरस्कार यापुढे दरवर्षी राष्ट्र उभारणीमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८८ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
सत्ताधारी शिवसेनेच्या दहशतीमुळे राज्यात अराजकाची स्थिती निर्माण झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी भाजपा प्रदेश कार्यालया�� पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी आंदोलकांना तातडीने पकड��्यात आलं, मात्र भाजपच्या पोलखोल यात्रेवरचा हल्ला, भाजप कार्यकर्ते मोहित कंभोज यांच्या वाहनावर तसंच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरावर हल्ला करणारे मात्र मोकाट आहेत, हल्लेखोरांना वेगळा न्याय का असा सवालही या पत्रकार परिषदेतून करण्यात आला.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेलं आहे.
****
देश २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त होण्याच्या दिशेनं जलद गतीनं वाटचाल करत आहे. असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि चांगल्या प्रकारे आरोग्याची काळजी घेणं यामुळं हे ध्येय साध्य होणार आहे. २०१५ या वर्षी एक लाख लोकांमागे क्षयरोग ग्रस्त रुग्णांची संख्या २१७ होती तर २०२० मध्ये तीच संख्या कमी होवून १४२ झाली असून मृत्यूदरातही घसरण झाली आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.आतापर्यंत १८७ कोटी ४६ लाखांहून अधिक लसीकरण झालं आहे. काल १९ लाख १३ हजार २९६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८७ कोटी ४६ लाख ७२ हजार ५३६ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ५२७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक हजार ६५६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १५ हजार ७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यातील लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रस्ता अपघातात सात जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले. आज सकाळी सायगाव जवळ हा अपघात झाला. लातूर जिल्ह्यातील आर्वी इथलं एक कुटुंब अंबाजोगाई तालुक्यातील राडी इथं घरगुती कार्यक्रमासाठी जात असतांना समोरुन येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि चालकाचा समावेश असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही. जखमींना अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन जखमीवर तातडीने आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
दरम्यान, याच ठिकाणी यापूर्वी बस आणि ट्रक चा देखील भीषण अपघात झाला होता, त्यामुळे या मार्गावर अधिक खबरदारीची उपाय योजना करावी अशी मागणी नागरिकांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील खंडाळा देवी गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. खाजगी बस आणि एक चारचाकी वाहन यांच्यात समोरासमोर धडक होवून हा अपघात झाला.
****
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या औरंगाबाद इथं तीन हजार ��२ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा होणार आहे. यामध्ये सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या प्रथम चरणाचं लोकार्पण आणि पैठण - औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा समावेश आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ही माहिती दिली. शहरातल्या बीड बायपास जवळील जबिंदा लॉन्स इथं सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएल प्रशासन परिषदेने दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, दिल्लीचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि दिल्लीचे फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांना दंड ठोठावला आहे. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामनाच्या शेवटच्या षटकात नो बॉलवरून दिल्ली कॅपिटल्स संघाने पंचांशी वाद घातला. ऋषभ पंतला त्याच्या मॅच फीच्या १०० टक्के, शार्दुल ठाकूरला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठवण्यात आला आहे. तर, प्रवीण आम्रे यांना त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड आणि एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
****
मंगोलिया इथं सुरू असलेल्या आशिआई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे रवी कुमार दाहिया, बजरंग पुनिया आणि गौरव बालियान अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. ५७ किलो वजनी गटात रवी दाहियानं उत्कृष्ट खेळ करत मंगोलियाच्या झनबजार झंदानबूदला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर ६५ किलो वजनी गटात भारताच्या बजरंग पुनियानं बहरिनच्या हाजी मोहम्मद अलीला पराभूत केलं आणि ७९ किलो वजनी गटात गौरव बालियानही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
आज जागतिक पुस्तक दिन. जगातील सर्व लेखकांच्या महान कार्याबद्दल हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था- युनिस्कोनं १९९५ पासून हा दिवस पुस्तक आणि वाचन यासाठी आरेखित केला असून नागरिकांमध्ये वाचनाचा आनंद आणि आवड निर्माण होणं हा यामागचा उद्देश आहे. २३ एप्रिल हा प्रसिद्�� लेखक विल्यम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन इंग्रजी भाषा दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
****
उदगीर इथं भरलेल्या ९५ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचं दालन उभारण्यात आलं आहे. या दालनात महासंचालनालयाची विविध प्रकाशनं उपलब्ध आहेत. अधिकाधिक वाचकांनी या दालनास भेट द्यावी असं आवाहन लातूरच्या जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
****
परभणी जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा २०२२ चं आज जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. आज आणि उद्या या स्पर्धा चालणार आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 April 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशाच्या विकासासाठी पंचायत राज संस्था सक्षम करण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांचं स्थानिकीकरण या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. या परिषदेनं आजपासून पंचायत राज उत्सवाची सुरुवात झाली. राष्ट्रीय स्तरावर शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी गावांचा विकास आवश्यक असून, ग्रामीण विकासासाठी जोडणी, पायाभूत सुविधा आणि सिंचन महत्त्वाचं असल्याचं उपराष्ट्रपतींनी नमूद केलं. प्रशासनाचं डिजिटल मिशन पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना समान व्यासपीठावर आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
****
थोर समाजसुधारक, विचारवंत महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती. राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासा��ेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा केला जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी यानिमित्त पथनाट्य आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे. महात्मा फुले हे सामाजिक न्याय आणि जनतेच्या इच्छा आकांक्षांचे प्रेरणास्रोत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद इथल्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय आणि महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात आज संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नावनोंदणी सुरू झाली. ही यात्रा ३० जूनपासून सुरू होणार असून, ११ ऑगस्टपर्यंत चालेल. जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक, येस बँक आणि भारतीय स्टेट बँकेच्या विविध शाखांमध्ये भाविक नावनोंदणी करू शकतील, असं श्री अमरनाथजी तीर्थस्थान मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वरकुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. विशेष वेबसाइट आणि मोबाईल ऍपच्या माध्यमातूनही नावनोंदणी करता येणार आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दोन लाख ४४ हजार ८७० नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८५ कोटी ७४ लाख १८ हजार ८२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या ८६१ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ९२९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ११ हजार ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ एप्रिलला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८७वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार २२ एप्रिल पर्यंत माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर आपले विचार रेकॉर्ड करता येतील किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आलेल्या लिंक वर एस एम एस करुन नागरीक आपले विचार मांडू शकतात.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तालुकास्तरीय मेडिकल कॅम्पचं आयोजन करण्यासाठी केंद्र शासनानं एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. खासदार इम्तियाज जलिल यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ग्रामीण भागातल्या नागरिकांची तज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार, रक्त चाचण्या आणि विविध आरोग्य संबंधी योजनांचा लाभ या अभियानाअंतर्गत देण्यात येतो. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा यासाठी संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथं काल रामनवमीच्या शोभायात्रेत पोलीस प्रशासनाच्या आडमुठेपणाविरोधात आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल सायंकाळी रामनवमीच्या शोभायात्रेच्या आधी पोलीसांनी बँड ताब्यात घेत उशिरा सोडला होता. त्यामुळे शोभायात्रेसाठी वेळच मिळत नसल्याचं सांगत रामभक्तांनी शोभायात्रा रद्द करुन तीन तासांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केलं होतं. कालच्या घटनेच्या निषेधार्थ हिदुत्ववादी संघटनांनी मोर्चाचं आयोजन देखील केलं आहे.
****
जागतिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल या जोडीनं इंग्लंडचा पराभव करत मिश्र दुहेरीचं सुवर्णपदक पटकावलं आहे. स्क्वॅश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं हे पहिलंच सुवर्ण पदक आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशातली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं मार्च २०२० मध्ये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित केली होती. आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं कठोर पालन केलं जाईल. जगभरात झालेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीमुळे आणि योग्य त्या सल्लामसलतीनंतर अनुसूचित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंत्रालयानं घेतला आहे.
****
जागतिक आरोग्य संघटनेचं पारंपरिक औषधांचं जागतिक केंद्र गुजरातमधल्या जामनगर इथं स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भातल्या सामंजस्य करारावर आयुष सचिव राजेश कोटेजा आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महानिदेशक अधानम गैब्रेयसिस यांनी स्वाक्षऱ्या केल्या. औषधांचं हे जागतिक केंद्र भारतात स्थापन करण्याबाबतच्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८२ कोटी ८७ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २५ लाख ८१ हजारांपेक्षा जास्त नागरीकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वयोगटातल्या एक कोटी पाच लाखांहून अधिक किशोरवयीन मुला मुलींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २४ लाख पाच हजार २२७ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
अतिसामान्य माणसाला समजेल अशा शैलीत लिखाण करणारे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे मराठीतले एकमेव विचारवंत असल्याचं मत, प्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. अमेरीका स्थित महाराष्ट्र फाऊंडेशनचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार चपळगावकर यांना सुधीर रसाळ यांच्या हस्ते आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे. शासन किंवा समाजातल्या अनेक वाईट प्रवृत्तींचा दबाव समाजावर पडत असतो. त्याची वाईट फळं समाजाला भोगावी लागतात. या सगळ्यातून सावरायचं असेल तर समाजाला मार्गदर्शन करणारे विचारवंत सतत निर्माण होत राहीले पाहिजे, असं मत रसाळ यांनी यावेळी व्यक्त केलं. लोकशाही टिकवायची असेल तर समाजामध्ये ही प्रगल्भता येणं आवश्यक असल्याचं चपळगावकर यावेळी म्हणाले.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती-जमाती आयोगाची बैठक काल पार पडली. विद्यापीठात मागासवर्गीयांकरता असलेल्या तक्रार निवारण समितीनं तक्रार नोंदवण्यासाठी महिन्यातला निश्चित एक दिवस ठरवावा, असा सल्ला महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी यावेळी दिला. कृषि विद्यापीठ करत असलेले संशोधन कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, आदिवासी शेतकरी बांधवासाठी असलेले उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्यात येत असल्याचं ते म्हणाले.
****
नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशातील कामगार २८ आणि २९ मार्चला संपावर जाणार आहेत. या संपात सुमारे पाच लाखांहून अधिक बॅंक कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्पलॉईज फेडरेशनचे सचिव देविदास तुळजापूरकर यांनी दिली आहे. त्यामुळे २६ आणि २७ मार्चला सुटी असल्यानं बँका चार दिवस बंद राहणार आहेत. राज्यातील सात हजार बँक शाखातून काम करणारे जवळपास तीस हजार बँक अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. बँक खाजगीकरण, बॅंकामध्ये विविध पदांची भरतीसाठी कंत्राटी पद्धतीचा अवलंब करुन कामगारांचं शोषण, जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे आदि मागण्यासाठी हा संप असल्याचं देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार, युक्रांदचे संस्थापक आणि पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना आज औरंगाबाद इथं प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. व्यक्तिरंग या त्यांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथावर नांदेड इथले पत्रकार संजीव कुलकर्णी हे भाष्य करणार आहेत. मसापच्या औरंगाबाद इथल्या डॉ. ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ आजपासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर आज पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे.
****
0 notes