#संघाला
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहिर करतील.
देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्ष अखेरीपर्यंत एक लाख ५७ हजाराच्या वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशातल्या क्रीडा संस्थांमधली एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून कठोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिल��ल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना ��ूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं.
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 या पोर्टलचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी सुरू करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह, शाळांमधली स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, असंही शिंदे यांनी सूचित केलं.
गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचंही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं साडे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आगामी तीन महिन्यात देशभरात तरुणांसाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहेत, अशी ��ाहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. आयोगातर्फे काल पुण्यात हम तुम या विवाहपूर्व समुपदेशन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर बोलत होत्या.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन या योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
Text
Pune : मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत स्काय रेंजर्सला विजेतेपद
एमपीसी न्यूज : विदुर पेंढारकर यांनी केलेल्या (Pune) दुहेरी कामगिरीच्या जोरावर स्काय रेंजर्स संघाने प्रौढांच्या पुणे मास्टर्स टेबल टेनिस लीग स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी स्पार्टन्स संघाला 3-1 असे पराभूत केले. टॉस अकादमीने आयोजित केलेल्या या स्पर्धेस शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे शारदा समूहाचे प्रायोजकत्व लाभले होते. अंतिम सामन्यातील पहिला लढतीत स्काय रेंजर्स संघाचे नचिकेत…
0 notes
Text
रोहित शर्माच्या रहस्यमय जगाचे अनावरण: एक व्यापक मराठी मार्गदर्शक
क्रिकेटच्या क्षेत्रात रोहित शर्माइतकी काही नावं चमकत आहेत. चित्तथरारक शतकांपासून ते उल्लेखनीय नेतृत्वापर्यंत, शर्माने भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. तथापि, मैदानावरील त्याच्या कारनाम्यांपलीकडे, या प्रतिष्ठित खेळाडूबद्दल, विशेषतः मराठी भाषिक चाहत्यांसाठी शोधण्यासारखे बरेच काही आहे.
रोहित शर्माचा प्रवास शोधत आहे: 30 एप्रिल 1987 रोजी महाराष्ट्रातील बनसोड येथे जन्मलेल्या रोहित शर्माचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी नाही. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या शर्मा यांची प्रतिभा लहानपणापासूनच दिसून आली. त्यां��े सुरुवातीचे संघर्ष आणि सर्व अडचणींवर यशस्वी होण्यासाठी चिकाट�� या कथा आहेत ज्या मराठी संस्कृतीशी खोलवर प्रतिध्वनी करतात, जिथे लवचिकता आणि दृढनिश्चय हे अत्यंत मौल्यवान गुण आहेत.
स्टारडम वर उदय: शर्मा यांचा स्टारडमचा उदय हा उल्काच होता. त्याच्या मोहक स्ट्रोकप्ले आणि सातत्याने मोठी धावसंख्या करण्याच्या क्षमतेने त्याला प्रशंसा आणि जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. 2007 मध्ये त्याच्या संस्मरणीय पदार्पणापासून ते एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मध्ये तीन द्विशतके झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू बनण्यापर्यंत, शर्माची कारकीर्द अनेक टप्पे देऊन सजली आहे.
कर्णधार आणि नेतृत्व: मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यावर शर्मा यांचे नेतृत्वगुण समोर आले. उदाहरणादाखल, त्याने संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले, ज्यात अनेक आशिया चषक विजय आणि 2013 मधील प्रतिष्ठित ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद यांचा समावेश आहे. त्याचे शांत वर्तन आणि रणनीतिकखेळ कौशल्यामुळे तो मैदानावर आणि मैदानाबाहेर एक आदरणीय नेता बनतो.
मैदानाबाहेरचे व्यक्तिमत्व: क्रिकेटच्या पलीकडे, रोहित शर्माच्या मैदानाबाहेरील व्यक्तिमत्त्वानेही चाहत्यांना मोहित केले आहे. त्यांचे परोपकारी प्रयत्न, विशेषत: वंचित मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवणे, समाजाला परत देण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते. शर्माची नम्रता आणि त्याच्या वाढत्या यशानंतरही त्याच्या पायाभूत स्वभावामुळे तो क्रिकेटपटू आणि व्यक्तींसाठी एक आदर्श बनतो.
मराठी अभिमान: मराठी भाषिक चाहत्यांसाठी रोहित शर्मा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांची महाराष्ट्रातील मुळे आणि त्यांच्या सांस्कृतिक वारशाची त्यांनी सतत केलेली पावती मराठी संवेदनांशी खोलवर रुजलेली आहे. शर्मा यांच्या मराठीतील मुलाखती आणि संवादातून त्यांची भाषेबद्दलची आवड आणि वैयक्तिक पातळीवर चाहत्यांशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.
अधिक माहितीसाठी:-
नेहा पांडसे मालिका
मराठी मध्ये मगरमच्छ
0 notes
Text
सुपर आरएसएस बना; जिजाऊसृष्टीवरुन पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा समाजाला आवाहन
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : आजवर जे घडले ते होऊन गेले. जुने उगाळत बसण्यापेक्षा नव्याने चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावे ठेवण्यापेक्षा सुपर आरएसएस बना. पुनरुज्जीवित होऊन कामे करा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे ��ंस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त श���क्रवारी सिंदखेडराजात जिजाऊसृष्टी परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमातील शिवधर्म पीठावरून मार्गदर्शन…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/8b55aaf449a8002aed6fbd38b5ad1e48/bf9ddb0f4fa6eb19-7c/s75x75_c1/0ce466f44040b18284ddaca93e6ae8f8bc70c877.jpg)
View On WordPress
#buldhana news#jijau srishti#Maratha Community#purushottam khedekar#rss#राष्ट्रीय स्वयंसेवक संघ#सिंदखेडराजा विकास आराखडा
0 notes
Text
बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला शुभेच्छा
https://bharatlive.news/?p=165984&wpwautoposter=1697206255 बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला ...
0 notes
Text
Asia Cup 2023, IND Vs SL : रोहित शर्माची अपवाद सर्वाधिक 53 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यासिवाय ईशान किशन 33 आणि केएल राहुल याने 39 धावांचे योगदान दिले. वेलाल्लागे याने अचूक टप्प्यावर मारा करत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना बाद केले. वेल्लालागे याने पाच विकेट घेतल्या. भारताचा संपूर्ण डाव 213 धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला विजयासाठी 214 धावांचे आव्हान आहे. भारतासाठी रोहित शर्मा आणि गिल यांनी 80 तर इशान किशन आणि केएल राहुल यांनी 63 धावांची भागिदारी केली. या दोन भागिदारीचा अपवाद वगळता एकही मोठी भागिदारी झाली नाही. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलंबोची खेळपट्टी पाहून रोहित शर्माने टीम इंडियात अक्षर पटेल याला संधी दिली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी सावध सुरुवात केली. दोघांनी 80 धावांची भागिदारी केली.
0 notes
Text
*‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात 10 भाषांमधून प्रसिद्ध होणार!*
_भारतीय 9 भाषांसह सर्व 10 भाषांमधील ट्रेलर नुकताच प्रसिद्ध_
*मराठी ट्रेलर लिंक:*
youtube
भारतात सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय हॉलीवूड फ्रेँचायझी फिल्म विविध 10 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होते आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडर-मॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडर-मॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स्पायडर-मॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे ही एक पॅन-इंडिया फिल्म झाली असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.
इंग्रजीशिवाय, ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ ही फिल्म हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे. 10 भाषांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित होणे मुळात हाच एक मापदंड असून त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव अनेक भाषांमध्ये, तो देखील स्वत:च्या आवडीनुसार करता येईल.
*सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल (एसपीआरआय), इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात,* " स्पायडर-मॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपर-हिरो आहे, आणि कोणताही स्पायडर-मॅन सिनेमा म्हणजे संपूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. 'नो वे होम' या शेवटच्या स्पायडर-मॅन सिनेमाने स्पायडर-मॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे, भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःची भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. 10 भाषांमध्ये 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' रिलीज केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताला स्पायडर-मॅन आवडतो आणि पवित्र प्रभाकर या भारतीय स्पायडर-सह अनेक भारतीय घटकांची ओळख करून देणारा हा आमच्यासाठी अधिक खास आहे. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते."
माइल्स मोरालेस ऑस्कर®-विजेत्या स्पायडर-व्हर्स गाथा, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्सच्या पुढील अध्यायासाठी परतले. ग्वेन स्टेसी समवेत पुन्हा एकत्र आल्यानंतर, ब्रुकलिनचा पूर्ण-वेळ, मैत्रीपूर्ण शेजार यांच्यासह स्पायडर-मॅन मल्टीव्हर्समध्ये पोहोचला आहे, जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो. जिथे त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करण्याचा आरोप ठेवण्यात येतो. या चित्रपटाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरची पहिल्यांदाच थेट ओळख मुंबॅटनच्या रस्त्यावर होते.
आता आम्हाला प्रचंड आवडणाऱ्या या जाळं विणणाऱ्या सुपरहिरोला भेटण्याची आतुरता आहे, कारण तो सगळ्याच भाषांमधून आपल्या भेटीला येतो आहे!
*सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया निर्मित 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' 2 जून 2023 पासून इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होतो आहे. फक्त सिनेमागृहांमध्ये.*
0 notes
Text
IPL 2022: CSK आणि RCB विरुद्ध जाण्यापूर्वी खेळाडूंनी मैत्री दाखवली, धावत जाऊन विराट कोहलीला मिठी मारली; व्हिडिओ पहा - आयपीएल 2022: सामन्यात सामना करण्यापूर्वी विराट कोहलीने चेन्नई-बंगळुरूच्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला मिठी मारली; व्हिडिओ पहा
IPL 2022: CSK आणि RCB विरुद्ध जाण्यापूर्वी खेळाडूंनी मैत्री दाखवली, धावत जाऊन विराट कोहलीला मिठी मारली; व्हिडिओ पहा – आयपीएल 2022: सामन्यात सामना करण्यापूर्वी विराट कोहलीने चेन्नई-बंगळुरूच्या खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाला मिठी मारली; व्हिडिओ पहा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे संघ आमनेसामने असतील. हा सामना 12 एप्रिल रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजेपासून खेळवला जाणार आहे. मात्र, एकमेकांविरुद्ध विजयासाठी उत्सुक असलेल्या संघांच्या खेळाडूंमध्ये सामन्यापूर्वी जोरदार सौहार्द निर्माण झाला होता. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दोन्ही…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/89f25855292f0a31662853126a035abc/4d832796982303eb-11/s540x810/c86d011946fcbb8bfe1922d46dfbd8f0fa39687b.jpg)
View On WordPress
#CSK RCB खेळाडू#csk rcb जुळत#CSK RCB सामना#csk vs rcb#CSK विरुद्ध RCB#faf du pleasures भेटले CSK संघ#RCB IPL 2022#आयपीएल २०२२#एमएस धोनी#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#घसा#चेन्नई सुपर किंग्ज#चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सामना#चेन्नई सुपर किंग्स#चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना#डीजे ब्राव्हो#फाफ डु प्लेसिस#फाफ डु प्लेसिस CSK संघाला भेटला#मिठी#मैत्री#रवींद्र जडेजा#रॉयल चॅलेंजर्स बंगलोर#विराट कोहली#विराट कोहली रवींद्र जडेजा#व्हिडिओ पहा
0 notes
Text
U19 विश्वचषक 2022: अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीचे भारतीय संघासाठी आलेले ट्विट
U19 विश्वचषक 2022: अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीचे भारतीय संघासाठी आलेले ट्विट
IND vs ENG U19 विश्वचषक फायनल 2022: अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला अवघे काही तास उरले आहेत. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 6.30 वाजता होणाऱ्या या सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचे युवा संघ सज्ज झाले आहेत. जिथे इंग्लंड संघ (इंग्लंड U19 संघ) दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याच वेळी, भारतीय संघ (भारत U19 संघ) पाचव्यांदा ही ट्रॉफी…
View On WordPress
#INDU19 वि ENGU19#अंडर 19 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध इंग्लंड#अंडर-19 वर्ल्ड कप अपडेट#अंडर-19 वर्ल्ड कप बातम्या#अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला#अंडर-19 विश्वचषक फायनल 2022#क्रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#भारत-इंग्लंड अंडर-19 वर्ल्ड कप फायनल#विराट कोहलीचे ट्विट#विराट कोहलीने भारतीय U19 संघाला शुभेच्छा दिल्या#विराट कोहलीने भारतीय अंडर-19 संघाला शुभेच्छा दिल्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 20 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २० जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन • स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये आजपासून होणार विविध क्षेत्रासंबंधी सामंजस्य करार • शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा वर्षभरात उपलब्ध करुन देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन • पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाला अजिंक्यपद आणि • दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ कार्यक्रम मालिकेच्या ११८ व्या भागात नागरिकांशी संवाद साधत होते. भारतीय प्र��ासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने, संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण पंतप्रधानांनी श्रोत्यांना ऐकवलं… ‘‘जब संविधान सभा ने अपना काम शुरू किया, तो बाबासाहब आंबेडकर ने परस्पर सहयोग को लेकर एक बहुत महत्वपूर्ण बात कही थी | “Our difficulty as I said is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today, take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity.” ये audio डॉ. राजेंद्र प्रसाद जी का है - “हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है| अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे |” अब मै आपको डॉ. श्याम प्रसाद मुखरजी की आवा��� सुनाता हूं| ’’
येत्या २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा पराक्रम दिवस, २५ जानेवारीला साजरा होणारा राष्ट्रीय मतदार दिन, भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचा अंतराळात दोन उपग्रह परस्परांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनीकडून देशातल्या पहिला खाजगी उपग्रहाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण, स्टार्टअप उपक्रमाची यशस्वी वाटचाल, वन्यजीव संवर्धन, आदी विषयांवर पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. महिला बचत गटांच्या प्रेरणादायी यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना ऐकवल्या. यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करुन, हा कुंभमेळा डिजीटल माध्यमांतून जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असल्याचा, प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं.
स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंच २०२५ ला प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी होणार असून, ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत दा��ोस इथं दाखल झाले आहेत. या दौऱ्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे. ज्या सदस्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर आधार कार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत, असे सदस्य त्यांच्या प्रोफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिल अथवा आईचं नाव, रुजू झाल्याचा दिनांक, समाप्ती दिनांक आदी तपशील कुठल्याही कागदपत्रांशिवाय अपलोड करू शकतात. या सुविधेचा लाभ तीन लाख ९० हजार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी धारकांना होणार असल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्रालयानं दिली आहे.
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा येत्या वर्षभरात उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेषोपचार रुग्णालयाचं उद्घाटन आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी विविध सुविधांचं भूमिपूजन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ‘‘या हॉस्पिटलमध्ये गरीब लोकं येतात. जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाडा लगतच्या जिल्ह्यांतील गरीब माणसं इथं येतात. त्यांना बाहेरच्या दवाखान्यात, खाजगी दवाखान्यात पैसा देणं परवडत नाही. त्यांचीसुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणं अतिशय आवश्यक आहे. खाजगी दवाखान्यामध्ये तिकडे लोकांचा कल जास्त असतो पैसे भरायचा. पण मी म्हणतो आपण शासकीय रूग्णालयांमध्ये किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, लिवर ट्रान्सप्लांट अशा सुविधा इथे का निर्माण करू शकत नाही. आणि म्हणून माझं हे स्वप्न आहे की अशा शासकीय महाविद्यालयांमध्ये या सुविधा वर्षभरामध्ये सुरू केल्याशिवाय मी राहणार नाही.’’
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी सांगितलेल्या सर्व सुविधांचा विकास करणं ही जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार, अशी घोषणा शिरसाट यांनी केली.
नांदेड जिल्ह्यातल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातले संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजाराम माने आणि डॉक्टर झोयेक शेख यांच्या गटानं केलेल्या संशोधनाला, अमेरिकेचं पेटंट प्राप्त झालं आहे. या संशोधनाद्वारे मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थांची निर्मिती करुन त्याचा वापर हायड्रोजन ऊर्जा निर्मितीसाठी करता येत असल्याची माहिती विद्यापीठातर्फे ��ेण्यात आली. या यशाबद्दल डॉ. माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी अभिनंदन केलं आहे.
पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य ठरले. दिल्लीत इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा ७८ विरुद्ध ४० असा, तर भारतीय पुरुष संघानेही नेपाळचाच ५४ विरुद्ध ३६ असा पराभव केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होते. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिनेदिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साउंड डिझायनर पद्मश्री रसुल पुकुट्टी, राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालकधनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा पद्मविभुषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांना काल प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम अशा स्वरुपाचा हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी के देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतांना डॉ कांगो म्हणाले.. ‘‘माझा सत्कार हा माझा व्यक्तीश: सत्कार नसून, माझं सतत म्हणणं आहे की माझ्याबरोबर जे कार्यकर्ते होऊन गेले, त्या कार्यकर्त्यांनी मला मदत केली, अनेक कार्यकर्ते आहेत जे अजुनही माझ्याबरोबर काम करत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळेच मी काहीतरी करु शकलो. आणि म्हणून त्यांचाही हा सत्कार आहे.’’
बीड तालुक्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ काल सकाळी एसटी बसच्या धडकेत तीन युवकांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारे युवक दिसले नाहीत, असं चालकाचं म्हणणं आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच परभणी इथं कोठडीत निधन झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर काल शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच अंमलबजावणी महाशिबीर घेण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं.
हिंगोली इथल्या बौद्ध संस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचं उद्घाटन क���ल प्रसिद्ध व्याख्याते डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते झालं. चळवळीच्या पुनर्मांडणीची गरज-अर्थात चळवळी बांधारे, या विषयावर बोलताना कांबळे यांनी, समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन लढे उभे केल्यास चळवळ उभी राहील, असं मत व्यक्त केलं.
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं दगावलेले कावळे 'एव्हीयन इन्फल्युएन्झा एच 5 एन 1' विषाणुजन्य रोगामुळं मृत झाल्याचं, तपासणीत आढळलं आहे. यामुळं उदगीर शहरातला संबंधित परिसर हा अलर्ट झोन - सावधानता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातल्या कोंबड्यांच्या सर्वेक्षणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत.
0 notes
Video
youtube
माजी नगर सेवक रामभाव तायडे यांनी,भिक्षु संघाला कार्तिक दान दिले,जयभीम नग...
0 notes
Text
रणजी ट्रॉफी समकक्ष नियोजित
रणजी ट्रॉफी समकक्ष नियोजित
कै. शेखर गवळी मेमोरियल भव्य दिमाखदार स्पर्धा नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर भव्य दिमाखदार प्रमाणावर कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. ६ ते १० डिसेंबर दरम्यान सदर टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. विजेतेपदासाठी रुपये एक लाख एक हजार व उपविजेत्या संघाला एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. नाशिकमध्ये प्रथमच…
View On WordPress
0 notes
Text
कणकवली मतदार संघाला आता खऱ्या अर्थाने "अच्छे दिन"
कणकवली मतदार संघाला आता खऱ्या अर्थाने “अच्छे दिन”
उद्धव ठाकरेंच्या काळात सर्वात जास्त कणकवली मतदारसंघाला त्रास आमदार नितेश राणे यांचा आरोप कणकवली भाजपा युतीचे राज्यात सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाला. आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास कणकवली मतदार संघाला दिला गेला.…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/06766de31ab9927da27517dfb6cb3b3e/3dc967c6b5bc7a53-04/s540x810/9d6fcd7207d31e15062208e163961efee6901c63.jpg)
View On WordPress
0 notes
Text
बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला शुभेच्छा
https://bharatlive.news/?p=165984 बेळगाव : म्हैसूर दसरा मुख्यमंत्री कप क्रीडा स्पर्धेसाठी महिला संघाला ...
0 notes
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
मुंबई, दि. २७ : कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ : महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ विजयी
मुंबई, दि. २७ : कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम…
View On WordPress
0 notes