#सिंदखेडराजा विकास आराखडा
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 10 months ago
Text
सुपर आरएसएस बना; जिजाऊसृष्टीवरुन पुरुषोत्तम खेडेकर यांचे मराठा समाजाला आवाहन
म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : आजवर जे घडले ते होऊन गेले. जुने उगाळत बसण्यापेक्षा नव्याने चिंतन करण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नावे ठेवण्यापेक्षा सुपर आरएसएस बना. पुनरुज्जीवित होऊन कामे करा, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त शुक्रवारी सिंदखेडराजात जिजाऊसृष्टी परिसरात आयोजित विशेष कार्यक्रमातील शिवधर्म पीठावरून मार्गदर्शन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी- मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं आवाहन
** सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी आता ८ ते १८ मार्च दरम्यान
** औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा मुख्यमत्र्यांकडून आढावा
आणि
** इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचं तर वीज बील माफीसाठी भाजपचं राज्यभरात आंदोलन
****
मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी, असं आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं आहे. आज यासंदर्भात सर्वोच्च न्यायलयात झालेल्या सुनावणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणी आता ८ ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग -एसईबीसी आरक्षणासंदर्भात १८ मार्च रोजी महान्यायवादी यांनी भूमिका मांडावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत केली, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने संवैधानिक संरक्षण द्यावं, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्राने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती संवैधानिक तरतूद करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी, राज्यसरकारने सुनियोजित धोरणानिशी न्यायालयात उभं राहणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ते आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी सध्या सुरु असलेली आंदोलनं राज्य सरकारच्या निष्क्रियते विरोधात असून, आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ती चालू राहणार असल्याचं, पाटील यांनी नमूद केलं.
****
राज्यात बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या सर्व वसतीगृहांना यापुढे मातोश्री असं नाव देण्यात येणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. ते आज नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातल्या मातोश्री वसतीगृहाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. राज्य सरकारचा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार गेल्या ५ वर्षांपासून देण्यात आलेला नाही, हे प्रलंबित पुरस्कार रामटेक इथं पुढच्या महिन्यात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात एकाचवेळी देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची राज्यात ४ उपकेंद्रं स्थापन करण्यात येणार असून, मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी प्रस्ताव ठेवण्यात येईल अशी माहितीही सामंत यांनी दिली.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची पाहणी केली. लोणार सरोवराच्या विकासाचा आराखडा तयार करावा, त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर हे सरोवर पर्यटनासाठी नावारूपास येईल, असं मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं. ‘मातृतीर्थ सिंदखेडराजा’ चा ही विकास करण्यात येईल, तिथेही आपण लवकरच भेट देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
लोणार सरोवराच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री औरंगाबाद इथं दाखल झाले. औरंगाबाद पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दिल्ली दरवाजा परिसरात बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या कामाची पाहणी करुन, त्यांनी शहरातल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
राज्यातल्या १९ जिल्हा परिषदा आणि २७ पंचायत समित्यांमधल्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ फेब्रुवारीला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती तसंच सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ५ मार्च रोजी छापील मतदार याद्या अंतिम तसंच अधिप्रमाणित करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १० मार्चला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
****
इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं आज सर्वत्र केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जालना इथं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत इंधन दरवाढीचा निषेध करत पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली.
परभणी इथं जिल्हाप्रमुख विशाल कदम, यांच्यानेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी, सायकल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले.
हिंगोली इथं जिल्हाप्रमुख आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर नियंत्रित करावेत अन्यथा आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला.
लातूर इथं जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. इंधनाचे दर कमी करण्याच्या मागणीची केंद्र सरकारने दखल न घेतल्यास, शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवंशी यांनी दिला
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर, पैठण इथं आंदोलन करत, इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
उस्मानाबाद इथं गाड्यांना धक्का देऊन आंदोलन करण्यात आलं. अन्यायकारक असलेली इंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी आंदोलनात सहभागी शिवसैनिकांनी केली, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी ��ाले होते.
****
कोविड काळातलं वीज बील माफ करावं, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यानेतृत्वात उस्मानाबादसह परंडा, उमरगा, भूम, तुळजापूर, लोहारा या सर्व तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत निदर्शनं केली.
औरंगाबाद इथं शहर जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वात शहरात विविध आठ ठिकाणी तर जिल्ह्यात पैठण, खुलताबाद इथंही आंदोलन करत, वीजबिल माफीची मागणी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात औसा इथं आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लातूर शहरात सरचिटणीस मनिष बंडेवार यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं. माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
परभणी जिल्ह्यात परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा तसंच गंगाखेड इथंही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
अहमदनगर जिल्ह्यात राहता इथं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात हल्लाबोल आंदोलन करून वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. शंभर युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
****
औरंगाबाद इथल्या व्हिडियोकॉन कंपनी कामगारांच्या थकीत पगाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज निवेदन देण्यात आलं. याप्रकरणी शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत कामगारांच्या मागण्या जाणून घेतील, आपणही या प्रकरणी लक्ष घालू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं शिष्टमंडळाकडून सांगण्यात आलं.
****
उस्मानाबाद इथं आज निर्मला सखी आधार संस्थेच्या वतीने निराधार एकल महिलांसाठी विशेष मेळावा घेण्यात आला. या महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या मेळाव्यातून करण्यात आलं. या महिलांना विविध विषयावर मान्यवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आलं.
****
हिंगोली नगरपालिकेने प्लास्टिक पिशव्या जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. आज हिंगोली शहरात विविध आस्थापनांवर छापे मारून जवळपास दोन क्विंटल प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या प्लास्टिक पिशव्यांची किंमत बाजारभावानुसार दहा लाख रुपयांच्या जवळपास असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली
****
आपले गाव स्वच्छ, सुंदर, आणि प्लास्टिकमुक्त होण्यासाठी परभणी जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने माझा गाव सुंदर गाव या अभियानात सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. परभणी तालुक्यात आर्वी इथं झालेल्या संवाद बैठकीत ते बोलत होते. ��ावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच वृक्ष लागवड मोहिमेत पुढाकार घेतलेल्या युवकांचा टाकसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
हिंगोली  जिल्ह्यात आज कोविड बाधित दोन नवे रुग्ण आढळले, ४ जण कोविड संसर्गातून मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता कोविड बाधितांची संख्या ३ हजार ७६६ झाली असून, आतापर्यंत ३ हजार ६६५ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नई इथं आजपासून सुरु झाला. आज पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या, तीन बाद २६३ धावा झाल्या. जसप्रित बुमराहनं दोन तर रविचंद्रन अश्विननं एक गडी बाद केला.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 January 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि. ****
·      राज्यात येत्या शुक्रवारी कोविड लसीकरणाची रंगीत तालीम; देशात लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज.
·      कोविड काळात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार.
·      राज्याचा कोविडमुक्तीचा दर सुमारे ९५ टक्के; मराठवाड्यात नव्या २३८ रुग्णांची नोंद.
·      परभणी जिल्ह्यात विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांत कमाल २५ उपस्थितांना परवानगी.
·      आज दर्पण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन.
·      जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला प्रारंभ.
·      नांदेड विभागातून पहिली किसान रेल्वे काल आसाममधल्या गुवाहाटीकडे रवाना.
आणि
·      यष्टीरक्षक के एल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर.
****
राज्यभरात सर्व जिल्हे तसंच सर्व महानगरपालिका हद्दीत परवा आठ जानेवारीला कोविड लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने उद्या आरोग्य विभागाची दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून एक बैठक होणार आहे. दरम्यान, या लसीकरण मोहिमेसाठी औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली आहे.
****
देशात पुढच्या दहा दिवसांत कोविड लसीकरण अभियान सुरू करण्यास आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव आर भूषण यांनी सांगितलं आहे. आरोग्य मंत्रालयानं काल दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लसीकरणाच्या तयारीबाबत माहिती दिली. पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांना लसीकरणासाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही, असं केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितलं.
****
कोरोना संक्रमण काळात राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी मोलाचे कार्य केलं असल्याचं, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना - मार्डच्या वतीनं राज्यातल्या ५० निवासी डॉक्टरांचा काल राजभवनात राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. सर्व निवासी डॉक्टरांनी समर्पण भाव आणि निष्ठेने काम केल्यामुळेच कोरोना संसर्ग नियंत्रणात आला, नव्या कोरोना विषाणूवरही आपण निश्चितपणे विजय मिळवू, असा आशावाद राज्यपालांनी व्यक्त केला.
****
राज्यात काल तीन हजार १६० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख ५० हजार १७१ झाली आहे. काल ६४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ४९ हजार सातशे ५९ झाली आहे. तर मृत्यू दर सध्या दोन पूर्णांक ५५ शतांश टक्के इतका कायम आहे. काल दोन हजार ८२८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ५० हजार एकशे ८९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, राज्याचा कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ८७ शतांश टक्के इतका आहे. सध्या राज्यात ४९ हजार ६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २३८ रुग्णांची नोंद झाली. मृत रुग्णांमध्ये बीड जिल्ह्यातल्या ३, जालना, नांदेड, तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे ६० कोविडग्रस्त आढळले, नांदेड जिल्ह्यात ५९, लातूर ५४, बीड ३०, जालना २६, परभणी ६, तर हिंगोली जिल्ह्यात काल ३ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली.
****
परभणी जिल्ह्यात यापुढे विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांना २५ हून अधिक लोक जमा करू नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केली आहे. शहरातल्या मंगल कार्यालयांच्या संचालकांची जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठक घेतली. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी या मोहिमेत सहभागी होत, नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना आता हे अर्ज १८ जानेवारीपर्यंत भरता येणार आहेत.
****
महिला आणि बालविकास विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. अनाथ उमेदवारांना शिक्षण तसंच राज्य शासकीय, निम शासकीय विभागात नोकरीमध्ये एक टक्का समांतर आरक्षण आहे. मात्र महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत सहाय्यक तसंच बहुउद्देशीय कर्मचारी, बालकल्याण समिती तसंच बाल न्याय मंडळात डाटा एन्ट्री ऑपरेटर, तसंच वन स्टॉप सेंटर मधली विविध पदं कंत्राटी पद्धतीने भरली जातात. राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या बालगृहातून वयाची १८ वर्ष पूर्ण करून बाहेर पडलेल्या सुमारे दहा हजार अनाथ युवक युवतींना या निर्णयाचा लाभ होऊ शकतो.
****
घरकामगार महिलांच्या कल्याणार्थ योजनांचा आराखडा तयार करण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून सूचना मागवणार असल्याचं, कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या महिलांच्या कल्याणासाठी घरकामगार कल्याण मंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची सूचना महिला आणि बालविकास मंत्री विधीज्ञ यशोमती ठाकूर यांनी या बैठकीत केली. ८ जानेवारी हा दिवस घरकामगार दिन म्हणून पाळला जातो त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घरकामगार महिलांना दिलासा देणारी ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आज दर्पण दिनानिमित्ताने ठिकठिकाणी ऑनलाईन कार्यशाळा, परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्याच्या कंधार इथल्या दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानचे पत्रकारिता पुरस्कार आज प्रदान करण्यात येणार आहेत.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई पत्रकार संघाचे पुरस्कार काल जाहीर झाले. भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बीड इथले पत्रकार अशोक देशमुख यांना तर धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बीड इथले पत्रकार प्रताप नलावडे यांना जाहीर झाला आहे. आज सायंकाळी अंबाजोगाई इथं नगर परिषदेच्या सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
पत्रकारांनी ज्ञान माहितीचे वाहक होण्याचं आवाहन, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या दर्पण दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. ‘कोरोनानंतर उस्मानाबाद जिल्हा व्हिजन२०२१’ या विषयांवर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी गाव तिथे पाणवठा, गाव तिथे देवराई, पुरातन स्थळांचा विकास, शेत रस्ते, तसंच स्थानिक गरजानुरूप मूलभूत विकास कामं करण्याचा मानस व्यक्त केला. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पत्रकारांना विमा ���वच पॉलिसी वाटपही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला काल जालना रेल्वे स्थानकापासून सुरुवात झाली. १६२ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग विदर्भातल्या देऊळगावराजा, सिंदखेडराजा, जळगाव-जामोद, चिखली आणि खामगाव तालुक्यांमधून जाणार आहे. पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक पुढचे पाच दिवस या भागात उद्योग - व्यवसाय, कृषी, शैक्षणिक आणि अन्य कारणामुळे होणाऱ्या प्रवासी वाहतुकीची सविस्तर माहिती घेऊन या मार्गाच्या उपयुक्ततेचा अभ्यास करणार आहेत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन महिन्यात अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाईल. या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाव्यतिरिक्त सुमारे तेराशे कोटी रुपये खर्च अ��ेक्षित आहे
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड मतदारसंघात विविध विकासकामांसंदर्भात महसूल तसंच ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांची काल भेट घेतली. जळगाव सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा घाटात रखडलेलं रस्त्याचं काम, तसंच दलित वस्ती विकास कार्यक्रम तत्काळ मार्गी लागण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासंदर्भात दोन्ही मंत्र्यामध्ये चर्चा झाली. अजिंठा तसंच चौका घाटातलं काम, वन विभागाच्या परवानगीअभावी तीन महिन्यापासून रखडलं आहे, याकडेही सत्तार यांनी लक्ष वेधलं.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पाला काल बारामती, पुरंदर आणि कर्जत तालुक्यातल्या महिला शेतकरी तसंच महिला बचत गटाच्या सदस्यांनी भेट दिली. कृषी क्षेत्रात पशु शक्तीचा योग्य वापर आणि योजने अंतर्गत केलेलं संशोधन हे, शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांसाठी बहुमूल्य असल्याचं मत शारदा महिला समुहाच्या अध्यक्ष सुनंदा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. प्रकल्पाच्या प्रमुख डॉ.स्मिता सोलंकी यांनी या प्रकल्पा अंतर्गत विकसित बैलचलित अवजारं, पापड  - शेवया यंत्र, बीज वर्गीकरण यंत्र, यांचं प्रात्यक्षिक दाखवून सविस्तर माहिती दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं काल पहिली किसान रेल्वे नाशिक जिल्ह्यातल्या नगरसोल इथून आसाममधल्या गुवाहाटीकडे रवाना केली. बावीस डब्यांची ही गाडी सुमारे ५२२ टन कांदा घेऊन निघाली आहे. गुवाहाटीपर्यंतचं अडीच हजार किलोमीटरचं अंतर सुमारे ५० तासात पार करून ही गाडी उद्या रात्री नऊ वाजता गुवाहाटीला पोहोचेलं. या रेल्वेतून कांदा वाहतुकीसाठी माल भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद शहरात आस्थापना परवाना शुल्काबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्यापारी महासंघाशी चर्चा करण्याचं आश्वासन महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिलं आहे. आस्थापना परवाना शुल्क वसूल करू नये, या मागणीसाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळाने काल प्रशासक पाण्डेय यांची भेट घेतली. आस्थापना परवाना शुल्काबाबतचा निर्णय महापालिकेच्या कार्यकारिणीनं घेतला असल्याचं, मनपा प्रशासकांनी सांगितलं. मात्र कर संकलनावरच महापालिकेचं कामकाज चालेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
****
नांदेड इथले आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते काँग्रेसचे माजी नगरसेवक कचरू थोरात यांचं काल निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. थोरात यांनी दी��्घकाळ इंटक या कामगार संघटनेचं नेतृत्व केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नांदेड इथं गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायंतींपैकी ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात वैजापूर तालुक्यातल्या सर्वाधिक ९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सिल्लोड तालुक्यात ६, सोयगाव, फुलंब्री आणि गंगापूर तालुक्यात प्रत्येकी चार, औरंगाबाद आणि कन्नड तालुक्यात प्रत्येकी ३, तर पैठण तालुक्यात २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
****
लातूर जिल्ह्यात निवडणुका होत असलेल्या ४०८ ग्रामपंचायतीपैकी फक्त २५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. अहमदपूर तालुक्यात ४९ पैकी सात, लातूर तालुक्यात २, तर औसा तालुक्यात फक्त एक ग्रामपंचायत बिनविरोध निवडली गेली. जिल्ह्यात आता ३८३ ग्रामपंचायतींसाठी ६ हजार ६८८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार १३ ग्रामपंचायतींपैकी १०३ ग्राम पंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर हे चित्र स्पष्ट झालं. जिल्ह्यातल्या उर्वरित ९१० ग्राम पंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या साष्टपिंपळगाव इथले गावकरी २० जानेवारीपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर काल साष्टपिंपळगाव इथं बैलगाडी, ट्रॅक्टर आणि मोटारसायकलवरून संदेश फेरी काढण्यात आली. येत्या २५ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं न्यायालयात योग्य बाजू मांडून आरक्षण मिळवून द्यावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी नागरिकांना कोविड संसर्गापासून बचावासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक के एल राहुलला दुखापत झाल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. ‘बीसीसीआय’ने काल ही माहिती दिली. शनिवारी सराव करत असताना राहुलच्या डाव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीतून पूर्ण बरे होण्यासाठी त्याला जवळपास तीन आठवडे लागतील. या मालिकेतले पुढचे दोन कसोटी सामने अनुक्रमे तिसरा सामना ७ ते ११ जानेवारी आणि चौथा सामना १५ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहेत. चार सामन्यांचा मालिकेत दोन्ही संघ एक एक कसोटी जिंकून बरोबरीत आहेत.
****
लातूर जिल्ह्यात ‘सुंदर माझं कार्यालय’ या उपक्रमाला आजपासून स्वच्छता मोहीम राबवून सुरुवात करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेतल्या अंगणवाड्यांच्या विकासाला गती देण्याचं काम सध्या सुरु असल्याचं गोयल यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्हा परिषदेच��या वतीनंही जिल्हाभरात सुंदर माझं कार्यालय अ��ियान राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे या अभियानांतर्गत आपली कार्यालयं स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
****
तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बेशिस्त वर्तन करणाऱ्या आठ पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनानं तीन महिने मंदिर प्रवेशास बंदी घातली आहे. तर १६ पुजाऱ्यांना, पुजेची पाळी नसतानाही गाभाऱ्यात प्रवेश केल्या प्���करणी सहा महिन्यांसाठी मंदिर प्रवेशास बंदी का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
****
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी काल पालघरहून औरंगाबादकडे येणाऱ्या बसच्या पाटीवर छत्रपती संभाजीनगर अशी पट्टी लावली. येत्या २६ जानेवारीपर्यँत औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झालं नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
****
नांदेड- अमृतसर- नांदेड सचखंड विशेष रेल्वे दिल्लीमध्ये सुरू शेतकरी आंदोलनामुळे अंशतः रद्द करण्यात आली आहे. आज नांदेडहून निघणारी रेल्वे दिल्ली ते अमृतसर दरम्यान धावणार नाही, उद्या ही गाडी दिल्लीहूनच नांदेडकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 July 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० जुलै २०२० सकाळी ७.१० मि. ****
·      औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अँण्टीजेन चाचण्या आणि संस्थात्मक विलगीकरणाची संख्या तातडीनं वाढवण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, शहरात मध्यरात्रीपासून जनता संचारबंदीच्या अंमलबजावणीला प्रारंभ.
·      ‘सारथी’ संस्था कदापिही बंद होणार नाही, स्वायत्तताही कायम राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण.
·      राज्यात आणखी सहा हजार ८७५ नवे रुग्ण तर दिवसभरात २१९ रुग्णांचा मृत्यू.
·      औरंगाबाद जिल्ह्यात विक्रमी ३३४ कोरोना विषाणूचे रुग्ण तर उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू.
·      नांदेड आणि जालना शहरातही प्रत्येकी एकाचा मृत्यू तर लातूर, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ.
आणि
·      राज्यातले पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीनं तर दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीनं सुरू होणार- शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अँण्टीजेन चाचण्या आणि संस्थात्मक विलगीकरणाची संख्या तातडीनं वाढवण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल जिल्हा प्रशासनाला दिले. त्यांनी काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटी इथं लवकरच प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धत सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  
खाजगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर शासनानं ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक आहे, त्यावर प्रशासनानं प्रभावी नियंत्रण ठेवावं. रूग्ण बरे होण्यामध्ये आयसीयु केअर हा घटक सर्वाधिक महत्वाचा आहे, त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सर्व आवश्यक खबरदारी घेऊन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं टोपे यावेळी म्हणाले.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी, कोरोना विषाणू संसर्गात मृत्यू दर शून्यावर आणण्याचे आव्हान समोर असून त्यादृष्टीने विलगीकरण कक्षांची, आरोग्य सुविधांची वाढ करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
****
��ोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद शहरात मध्यरात्रीपासून जनता संचारबंदीच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. या संचारबंदीच्या काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक बाबी मर्यादीत स्वरूपात आणि निर्बंधासह सुरू राहणार आहेत, ज्यामध्ये दुध विक्रेते यांना घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते साडे आठ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. सर्व खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा सुरू राहतील, कोणतेही रूग्णालय टाळेबंदीचा आधार घेऊन रूग्णांना सेवा नाकारणार नाही. न्यायालय आणि राज्य तसंच केंद्र शासनाची कार्यालयं, शासकीय पेट्रोलपंप आणि कंपनी संचलित पेट्रोल पंप सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहतील आणि केवळ शासकीय वाहनं आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनास इंधन पुरवठा करतील. स्वयंपाकाचा गॅस सेवा घरपोच सुरू राहिल, शासकीय स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील, कृषी, बि-बियाणे, खते, किटकनाशक औषध, चारा दुकाने सुरू राहतील. याची वाहतूक चारचाकी वाहनातूक करण्यास परवानगी राहिल. दुचाकी वाहनास परवानगी असणार नाही, असं पांडेय यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जनता संचार बंदीच्या या कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी आणि शर्तींच्या अधीन परवानगी असणार असल्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं.
त्यानुसार जिल्ह्यात औषध आणि अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग, त्यांचे पुरवठादार चालु राहणार, यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसंच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं.
औद्योगिक वसाहतीमधील आणि शहराव्यतिरिक्त ईतर खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे उद्योग समुह कामगारांची दहा दिवस कारखान्यात निवास व्यवस्था करणार आहे, त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगही चालु राहणार आहेत. आरोग्याबरोबरच आर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या १३ अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीच्या शिफारशींना केंद्रबिंदू मानूनच पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य शासनान�� घेतला आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
राज्यातली कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावा��ी सद्यस्थिती पाहता राज्यातलं कोणतंही विद्यापीठ परीक्षा घेऊ शकत नाही, अशी शिफारस विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य समितीनं केली असल्याचं सामंत यांनी सांगितलं. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेणं शक्य नाही, असं ते म्हणाले. परीक्षा नं घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे कळविलं होतं. अनुदान आयोगालाही पत्र पाठविण्यात आलं होतं. पत्रव्यवहार करून देखील आयोगाकडून उत्तर आलं नसल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था- ‘सारथी’ कदापिही बंद होणार नाही तसंच तिची स्वायत्तताही कायम राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं.
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात विशेष बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली. ‘सारथी’ संस्थेला उद्याच तातडीने आठ कोटी रूपयांचा निधी दिला जाईल. समाज बांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन दोन हजार वीस ते तीस असा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशी घोषणाही उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
दरम्यान, इतर मागास बहुजन कल्याण विभागानं कालचं या संस्थेला सात कोटी ९५ लाख रूपयांचा निधी देण्यात आल्याचं कळवलं आहे.
****
राज्यात काल आणखी सहा हजार ८७५ नवे रुग्ण आढळले तर दिवसभरात २१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यातली एकूण रुग्ण संख्या दोन लाख ३० हजार ५९९ एवढी झाली आहे. तर या आजारानं मृत पावलेल्यांची संख्या नऊ हजार ६६७ एवढी झाली आहे. काल चार हजार ६७ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून आतापर्यंत एक लाख २७ हजार २५९ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ९३ हजार ६७३ रुग्णांवर रुग्णालयात तर ६ लाख ४९ हजार २६३ रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंतचे सर्वाधिक ३३४ रुग्ण काल आढळले. यात महापालिका हद्दीतील २०४ तर ग्रामीण भागातील १३० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आता सात हजार ६७२ झाली आहे. यापैकी चार हजार १६२ रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या तीन हजार १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात काल आठ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यात पैठण इथला ५६ वर्षीय पुरुष, कन्नड तालुक्यातला देवगाव रंगारी इथला ५५ वर्षीय पुरुष तर गंगापूरच्या ५२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. औरंगाबाद शहरातल्या गणेश कॉलनी इथली ८० वर्षीय तर कैलासनगरमधील संत एकनाथ सोस��यटीतली ५९ वर्षीय महिला, सिल्लेखानातला ४२ वर्षीय, अरिश कॉलनीतला ७४ वर्षीय तर पडेगावमधल्या ४८ वर्षीय पुरुष रुग्णांचा मृतांत समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ३३८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल ४३ रूग्ण कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक १७ रूग्ण मुखेड तालुक्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यात एकूण बाधित रूग्णांची संख्या ५४१ झाली आहे. नांदेड शहरातील ७५ वर्षीय बाधित रूग्णाचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या आजारामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २४ रूग्ण मृत्यू पावले आहेत. उपचारानंतर बरे झाल्यामुळे काल १२ रूग्णांना घरी सोडण्यात आलं. या आजारातून आतापर्यत जिल्ह्यात ३५३ रूग्ण बरे झाले आहेत तर सध्या १४७ रूग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं १५ जुलै नंतर दहा दिवसांची टाळेबंदी जाहीर करावी अशी मागणी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापौर दीक्षा धबाले यांनी केली आहे. काही नगरसेवक आणि नागरिकांचाही या मागणीला पाठिंबा आहे.
****
जालना शहरातल्या दु:खीनगर भागातल्या एका ४२ वर्षीय पुरुषाचा काल जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या आता ३६ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल आणखी ११ जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची एकूण संख्या ८५२ झाली आहे. काल आढळून आलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातल्या वेगवेगळ्या भागातील नऊ तर जाफ्राबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात ५१२ जण या आजारातून बरे झाले असून, बाधित असलेल्या २७३ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू संचारबंदीच्या कालच्या चौथ्या दिवशी जालना शहरातल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. शहरात वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात काल ५३ जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची संख्या ६०९ वर पोहोचली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या २९ झाली आहे. तर १८ रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाली असल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यात काल १३ नवे रुग्ण आढळून आले. परभणी शहरातील गांधी पार्क, सोनार गल्ली, जागृती मंगल कार्यालय परिसर, सरफराज नगर, काद्राबाद प्लॉट, पोलीस वसाहत, पोस्ट कॉलनी, परसावत नगर, जवाहर कॉलनी आदीं वसाहतीमधील हे रुग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या १९४ झाली असून आतापर्यंत १११ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तर ७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही शहरामध्ये प्रतिबंधीत क्षेत्रात कडक उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे. त्याचबरोबर परभणी महानगरपालिका हद्दीसह ५ किलोमीटर परिसरात तसंच सर्व नगर परिषद आणि पंचायत हद्दीसह ३ किलोमीटर परिसरात आज दुपारी ३ वाजल्यापासून १२ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल सहा जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं निदान झालं. यामुळे जिल्ह्यातली रुग्णसंख्या १९० वर पोहोचली आहे. पैकी ११७ जण यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बीड शहरात लागू असलेली संचारबंदी उठवून ती फक्त काही भागातच लागू करण्याचा आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला. त्यामु���े आता शहरातल्या रुग्ण आढळलेल्या इंद्रप्रस्थ कॉलनी, आसेफनगर, बीड मामला, थिगळे गल्ली जवळील काही परिसर, पांडे गल्ली, बालाजी मंदिरा जवळील परिसर अशा अकरा ठिकाणीचं पूर्ण वेळ संचारबंदी लागू झाली आहे. हा भाग वगळता शहरातील अन्य भाग आणि बाजारपेठ ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सात वाजल्यापासून रात्री सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल तीन जणांचे अहवाल बाधित आले आहेत. यामध्ये एका बाधितांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणी अहवालाचा समावेश आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३३३ झाली आहे. पैकी २१३ रुग्ण या आजारातून बरे झाले असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उस्मानाबाद नगर परिसर क्षेत्रात १३ ते १९ जुलै दरम्यान संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंढे यांनी जारी केले आहेत. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन कोरोनाविषाणू बाधितांची वाढ झाली. यामध्ये हिंगोली इथल्या गांधी चौकातल्या आणि वसमत तालुक्यातल्या वापटी इथल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातली रुग्णसंख्या ३१६ झाली आहे. काल जिल्ह्यात आठ जणांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २७१ रुग्ण बरे झाले आहेत.
****
मुंबईत काल एक हजार २८२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ही ८८ हजार ७९५ एवढी झाली आहे. त्याचबरोबर ६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, मुंबईत आतापर्यंत या आजारानं मृत्यू पावलेल्यांची संख्या पाच हजार १२९ एवढी झाली आहे. ठाण्यात एक हजार ७९३ नवे रुग्ण आढळले तर ५०हून अधिक रुग्णांचा काल मृत्यू झाला. पुण्यात एक हजार १३०, नाशिकमध्ये १७३, धुळ्यात ५, रायगड ४११, रत्नागिरीत २५, सिंधुदुर्गमध्ये दहा, अहमदनगरमध्ये ४५, सोलापूर १५०, नंदुरबारमध्ये ७, वाशिममध्ये २०, जळगावमध्ये २९२, सांगलीत २७, बुलडाणा १७ रूग्ण नव्यानं आढळले आहेत.
****
राज्य सरकार कोरोना विषाणू संसर्गाशी लढाई करत नव्हते तर रुग्ण संख्या कमी करण्यासाठी लढाई करत होते. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
****
राज्यातले पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीनं तर दहावी आणि बारावीचे वर्ग पाच ऑगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्यक्ष पद्धतीनं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिली. ते काल अमरावती इथं आयोजित बैठकीत बोलत होते. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करून शिक्षण सुरू करणे गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या खासगी शाळांनी सर्व वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे, यामुळे खासगी आणि शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक विषमता वाढेल. यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाच्या शाळाही सुरू होणे गरजेचं असल्याचं कडू यांनी सांगितलं.
****
भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा-आयसीएसई च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी तीन वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रिझल्ट डॉट सी आय एस सी ई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर हे निकाल पाहता येतील.
****
औरंगाबाद शहरातील प्रियदर्शनी उद्यान परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवनाचं काम तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा काल त्यांनी आढावा घेतला. विविध रस्त्यांची कामं, शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाजांची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असून तीन पुलांच्या कामाकरता जिल्हा नियोजन समितीअंतर्गत मान्यता देण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. समांतर पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यस्थापन, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, सफारी पार्क, शिक्षण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजना, शहर सुशोभिकरण आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
****
राज्यात कालपासून निवासी हॉटेल्स, ‍लॉजिंग आणि अतिथीगृह सुरू झाली आहेत. राज्य सरकारनं वेगवेगळे नियम आणि अटी घालत हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नांदेड शहरात या अटी आणि नियमांचं पालन करण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्ह्यात पोलीस विभागांची संयुक्त पथकं गठीत केली आहेत.
***
नांदेड आणि परभणी शहरासह जिल्ह्यात काल रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. पूर्णा, परभणीत जोरदार तर अन्य ठिकाणी दमदार पाऊस झाला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर शहर आणि परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. तब्बल महिन्यापासून दडी मारलेल्या पावसामुळे तुळजापूर इथं जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबिनसह अन्य पिकांच्या वाढीला दिलासा मिळाला आहे. उस्मानाबाद शहर आणि परिसरातही काल दिवसभर पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. हा पाऊस खरिप हंगामातील सोयाबीनसह उडीद मूग या पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त मानला जात आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या आरणी इथं शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून सामूहिक शेततळी अर्थात जल बँक निर्माण केली आहे. त्यात मत्स्य उत्पादन घेतलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मत्स्य उद्योग हा शेतीपूरक व्यवसाय सुरू झाला आहे. याविषयी अधिक मा��िती देत आहेत आमचे वार्ताहर ..
पिकांना बारमाही पाण्याची सोय या जलबँकेमुळे झाली आहे.  शेततळ्याच्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना पाईपलाईन तसंच स्पिंकलर, ठिबक, तुषार सिंचन यातून फळबाग लागवड आणि इतर शेतीपिकांच्या लागवडीसाठीही याचा उपयोग होतो आहे. मत्सपालन आणि फळबाग लागवड यातून बारमाही पिके असं दुहेरी वर्षभर शाश्वत उत्पन्नाचे स्रोत सामुहिक शेततळ्यांमुळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे सामुहिक शेततळं शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर शहरात कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सात दिवस कडेकोट जनता संचारबंदी लागू करण्याची मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हे गरजेचं असल्याचं या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी प्रमोद मुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आठ दिवसांसाठी उस्मानाबाद शहरात टाळेबंदी लागू करण्याचा ठराव नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचं नगरपालिका प्रशासनानं सांगितलं.
****
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाला तुळजापूर तालुक्यातल्या तामलवाडी इथल्या बालाजी अमाइन्स या केमिकल कंपनीनं दोन उच्च वहन क्षमतेचे ऑक्सिजन यंत्र भेट दिले आहेत. कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी या यंत्रांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती.
****
केंद्र सरकारनं नांदेड जिल्ह्यात नव्याने ८० व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले असल्याची माहिती नांदेड जिल्हा भाजपचे प्रवक्ते प्रल्हाद उमाटे यांनी दिली आहे. हे व्हेंटिलेटर जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर मध्ये स्थापित करण्यात येणार आहेत. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता.
****
राज्यातल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रशासनासह सरकारनं वेठीस धरल्याच्या निषेधार्थ परभणी इथल्या सिड्स फर्टीलायझर अॅन्ड पेस्टीसाईड डिलर्स असोसिएशने आजपासून तीन दिवस लाक्षणिक बंद पुकारला आहे. बियाण्यांची उगवण आणि गुणवत्ता या निकषाच्या पुर्तेतेसाठी प्रशासनाने कृषी निविष्ठा विक्रेत्यांना वेठीस धरल्याचा आरोप या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेशराव देशमुख आणि जिल्हा सचिव डी.एम.शिरफुले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला असून याला विरोध करण्याकरता हा संप पुकारण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० जून २०१८ सकाळी ६.५० मि. ****  जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांची शिफारस  आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचीच सत्ता - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ४ जुलै ते २० जुलै दरम्यान नागपूर इथं होणार आणि  मराठवाड्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी काल पावसाची जोरदार हजेरी **** जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. राजभवनच्या प्रवक्त्यानं काल श्रीनगर इथं ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षानं काल पीपल्स डेमॉक्रेटिक पक्षाचा पाठिंबा काढून घेत, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. परिणामी सरकार अल्पमतात आल्यामुळे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. राज्य सरकारला दहशतवाद विरोधी लढ्यात केंद्र सरकारनं पूर्ण पाठिंबा दिला होता, मात्र काश्मीर खोऱ्यात दहशतवादाचा प्रश्न हाताळण्यात तसंच राज्यातली स्थिती सुधारण्यात मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अपयशी ठरल्यामुळे, सरकारमध्ये राहणं अशक्य असल्याचं, भाजपकडून सांगण्यात आलं. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीशी आघाडी करण्याची शक्यता काँग्रेसनं फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेही इतर कोणा बरोबर हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी काल राज्यपाल एन एन वोरा यांची भेट घेऊन राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता देशभरातल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी ही माहिती दिली. २०२२पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांबाबत ते शेतकऱ्यांशी यावेळी चर्चा करतील, अशी माहिती त्यांनी दिली. या संवादाचं थेट प्रसारण कृषी विज्ञान केंद्रामधे, सामान्य सेवा केंद्रा बरोबरचं , सामान्य सेवा दूरदर्शन, डीडी किसान आणि आकाशवाणीवरुन देशभरात केलं जाणार आहे. **** आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचीच सत्ता येईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढवण्याचे संकेत दिले. मुंबई इथं काल शिवसेनेचा ५२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जम्मू काश्मीर सरकारमधून पाठिंबा काढल्या बद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक धोरणांवर टीका केली. दरम्यान, या मेळाव्यात बोलताना लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांनी, इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले मात्र, शिवसेनेला राज्यात आजपर्यंत एकहाती सत्ता मिळाली नाही, याची कारणं शोधण्याची गरज, व्यक्त केली. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार केला. **** विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन ४ जुलै ते २० जुलै या कालावधीत नागपूर इथं होणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शासकीय कामकाजाच्या नियोजनावरही चर्चा झाली. **** मराठा समाजातल्या तरुणांना उद्योग उभारणीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत सुलभपणे कर्ज मिळावं, यासाठी बँकांनी तातडीनं कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री तथ�� मराठा आरक्षण संदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत कर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. या योजनेसंदर्भातील बँकांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन करून कर्ज पुरवठा सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. **** राज्यपाल कुलपती सी. विद्यासागर राव यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना उद्या २१ जून रोजी विद्यापीठांमध्ये तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत. विद्यापीठांनी योग दिवस साजरा करताना सर्वसामायिक योग प्रणाली तसेच योग प्रार्थनेचा समावेश करावा आणि प्रतिष्ठित नागरिकांना निमंत्रित करण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर केवळ एक दिवसाचं कार्यक्रमाचं आयोजन न राहता वर्षभरासाठीचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी विद्यापीठांना दिले आहेत. **** राज्यातल्��ा मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना प्रकल्प उभारण्यात येणाऱ्या अडचणींबाबत नवीन धोरण तयार करुन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं. मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था यांच्या प्रलंबित अनुदान, केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी, राष्ट्रीय अनुसूचित जाती आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी, सफाई कामगारांच्या पाल्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आदींबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. मागासवर्गीयांच्या औद्योगिक सहकारी संस्थांप्रमाणे वैयक्तिोक लाभाच्या योजना सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं निर्यातदारांना ५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी मागणी केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्रात कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, मात्र उत्पादन वाढलं की दर कोसळतात. या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला चालना देताना पाच टक्के निर्यात प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी डॉ भामरे यांनी निवेदनात केली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** संगीत नाटक अकादमी पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्यदिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल संध्या पुरेचा यांचा गौरव करण्यात येणार असून ३४ कला��रांची २०१७ साठीच्या बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. **** मराठवाड्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी काल पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरासह जिल्ह्यात वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नडसह सर्वत्र काल पावसानं हजेरी लावली. बीड शहर आणि परिसरात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील परळी तालुक्यात एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातही काल तुरळक पाऊस पडला. लातूर शहराच्या काही भागात काल जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यवतमाळ बुलडाणा तसंच अहमदनगर जिल्ह्यातही काल सर्वत्र जोरदार पाऊस झाला. मृग नक्षत्राचा पाऊस बरसल्यानं, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव परिसरात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस झाला, जिल्ह्यात इतरत्र मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. परभणी, हिंगोली, तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र आठ दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यानं, शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, येत्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. **** इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या दरवाढीच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण गेट, गंगापूर आणि सिल्लोड तहसील कार्यालय तसंच फुलंब्री तालुक्यातल्या आळंद इथं हे आंदोलन होणार असल्याची माहिती भाकपचे शहर सचिव कॉ. भास्कर लहाने यांनी दिली आहे. **** आठवं अंबाजोगाई साहित्य संमेलन येत्या २३ आणि २४ तारखेला आयोजित करण्यात आलं आहे. अंबाजोगाई रोटरी क्लब आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या अंबाजोगाई शाखेतर्फे आयोजित या संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, माहेरवाशिणींचा मेळावा तसंच विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे. **** वीजदेयकं थकवल्या प्रकरणी, जालना जिल्ह्यातल्या ५२ गावांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यातल्या २८ तर, अंबड तालुक्यातल्या १२ गावांचा समावेश आहे. सुमारे दोन कोटी रुपयांची देयकं थकवल्यानं, ही कारवाई करण्यात आली. **** संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी वारीसाठी काल शेगावहून मार्गस्थ झाली. नगर परिक्रमेनंतर या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं. विदर्भातल्या अनेक दिंड्या आणि वारकऱ्यांसह निघालेली ही पालखी खामगाव, मेहकर, सिंदखेडराजा, जालना, बीड, आदी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत, पंढरपूरला पोहोचेल. दरम्यान, पैठण इथल्या संत एकनाथ महाराज यांची पालखी येत्या पाच जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती नाथवंशज योगीराज महाराज गोसावी यांनी दिली. *****
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 April 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि. **** • माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना, भारतात परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार - केंद्र सरकार • तोंडी तलाकची प्रथा दीड वर्षात बंद करण्याची मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाची तयारी • संरक्षित सिंचन व्यवस्था वाढण्यासाठी येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामं हाती घेण्याचे मुख्यमंत्र्याचे निर्देश आणि • जालना सीड पार्क प्रकल्पासाठी ३० हेक्टर जागा निश्चित   **** माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना, भारतात परत आणण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणार असून, सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत निवेदन करतांना सांगितलं. पाकिस्ताननं जाधव यांना मृत्यूदंड दिल्यास दोन्ही देशाच्या द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परीणाम होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जाधव यांच्या सुटकेसाठी प्रसंगी कायदेशीर मार्गाव्यतिरिक्त इतर पर्यायांचाही वापर करण्यात येईल, असं त्यांनी या निवेदनात स्पष्ट केलं. जाधव यांना पाकिस्तानातल्या रावळपिंडी लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचा मुद्दा काल संसदेच्या दोन्ही सभागृहात उपस्थित झाला. लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिाकार्जुन खरगे, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, तृणमुल काँग्रेसचे सौगत रॉय, यांच्यासह अनेक नेत्यांनी सरकारनं पाकिस्तानविरोधी कठोर कारवाई करून कुलभूषण यादव यांना परत आणण्याची मागणी केली. राज्यसभेतही अनेक सदस्यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं. दरम्यान, जाधव मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याच्या विरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेच्या तीव्र भावना, स्वराज यांना पत्र पाठवून कळवण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या आमदारांच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याप्रकरणी निवेदन दिलं. त्यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जाधव यांना या निर्णयाविरोधात ६० दिवसांच्या मुदतीत दाद मागण्याचा अधिकार असल्याची माहिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काल पाकिस्तानच्या संसदेत दिली. **** देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही बाब नमूद केली. मात्र शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत असल्याचं गंगवार यांनी सांगितलं. तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पकालीन पीक कर्जावरच्या व्याज दरात सवलत देण्याची योजना सरकार राबवत असल्याचं ते म्हणाले.   दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. या अधिवेशनात वस्तू आणि सेवा करासह विविध विधेयकं मंजूर झाल्यानं, हे अधिवेशन यशस्वी ठरल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत नमूद केलं. **** तोंडी तलाकची प्रथा दीड वर्षात बंद करू, असं मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सय्यद सादिक यांनी म्हटलं आहे. ते काल लखनौ इथं बोलत होते. या प्रकरणी सरकारनं हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं त्यांनी नमूद केलं. लखनौ इथं येत्या शनिवारपासून, मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळाच्या कार्यकारणीची बैठक सुरू होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत तोंडी तलाक आणि अयोध्येतल्या राम मंदिरासह अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तोंडी तलाक ��्रथेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल असून, यावर ११ मे पासून सुनावणी होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आपलं म्हणणं सादर केलं असून तीन तलाक, निकाह हलाल आणि बहुपत्नित्वामुळे मुस्लिम महिलांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे. यामुळे महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचं केंद्रानं नमूद केलं आहे. **** महाराष्ट्रासह, पाच राज्यांत टाटा तसंच अदानी पॉवर कंपन्यांना वीज दरवाढ करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. काल या संदर्भात झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं, या कंपन्यांनी राज्य सरकारांसोबत झालेल्या करारांचं पालन करण्याचे निर्देश दिले. इंडोनेशियात कोळशाच्या किंमतीत वाढ झाल्याच्या कारणावरून या कंपन्यांनी, डिसेंबर २०१६ मध्ये केलेली वीज दरवाढीची मागणी, केंद्रीय वीज नियामक आयोगाने मान्य केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पाच राज्यांतल्या वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. **** महाराष्ट्रात हवाई वाहतूक तसंच सायबर सुरक्षा क्षेत्रात गुंतवणुकीस ब्रिटीश कंपन्या उत्सुक असल्याचं ब्रिटनचे संरक्षण मंत्री मायकेल फालन यांनी म्हटलं आहे. फालन यांनी काल शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी पोषक वातावरण तसंच साधनसामुग्री असल्यानं ब्रिटीश कंपन्यांनी इथं गुंतवणूक केल्यास राज्य शासन सहकार्य  करेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. **** राज्यात संरक्षित सिंचनाची व्यवस्था वाढण्यासाठी येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं व्हावी, यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरावर तातडीनं बैठका घेऊन आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य जल परिषदेची तिसरी बैठक काल मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचा एकात्मिक जल आराखडा तयार करताना सर्व खोऱ्यांचं एकत्रीकरण करण्यात यावं, तसंच गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक जल आराखड्यानुसार राज्यातल्या इतर खोऱ्यांचे  जल आराखडे तयार करण्याच्या दृष्टीनं कालबध्द नियोजन करावं, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जालना इथल्या प्रस्तावित सीड पार्कला गती देण्याचे निर्देश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. जालना इथं सिंदखेडराजा रस्त्यावर शासकीय मालकीची सुमारे ३० हेक्टर जागा या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक विकास महामंडळानं, ही जागा ताब्यात घेऊन तिथं तातडीनं काम सुरु करणं आवश्यक असल्याचं, लोणीकर यावेळी म्हणाले. **** औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद नगर परिषद उघड्यावर शौचास जाण्यापासून शंभरटक्के मुक्त ��ाली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करून, राज्यशासनानं याबाबतचं पत्र नगर परिषदेला दिलं आहे. नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन के पाटील यांनी ही माहिती दिली. नगर परिषदेच्या विविध विकासकामांसाठी शासनाकडून एक कोटी रुपये निधी टप्प्याटप्प्यानं मिळणार असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. **** छत्रपती शिवाजी महाराज यांना काल पुण्यतिथीनिमित्त तसंच थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना काल जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात तसंच विधान भवनात शिवाजी महाराज तसंच महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी सह मराठवाड्यात सर्वच ठिकाणी शिवाजी महाराज तसंच महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्यात आली. **** महात्मा फुले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा असल्याचं मत, ज्येष्ठ विचारवंत डॉ कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केलं. काल औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात, फुले शाहू आंबेडकर विचार परंपरा या विषयावर ते बोलत होते. कुलगुरू डॉ बी ए चोपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महात्मा फुले यांच्यावरील ग्रंथाला पुढच्या वर्षापासून विद्यापाठाकडून पुरस्कार देण्याची घोषणा कुलगुरूंनी यावेळी केली. **** औरंगाबाद इथं बीड बायपास रस्त्यावर काल दुपारी झालेल्या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. **** लातूर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांची माहिती ट्रू वोटर ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली. मतदारांनी मतदानापूर्वी आपल्या उमेदवारांची माहिती जाणून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, परभणी आणि लातूर महापालिकेसाठी पुढच्या बुधवारी १९ तारखेला मतदान होणार आहे. या पार्श्वभूम���वर या दोन्ही शहरात राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, तसंच प्रचार फेऱ्यांना वेग येत आहे. **** लातूर इथं येत्या शनिवारी आणि रविवारी सातव्या अखिल भारतीय मराठी शरण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वनाथ निगुडगे यांनी काल ही माहिती दिली. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण चार विषयांवर परिसंवाद, शरणकवी संमेलन, यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. **** जालना जिल्हा पोलीस भरतीत मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या ८०२ उमेदवारांची यादी जालना पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयानं प्रसिद्ध केली आहे. ही यादी पोलीस अधीक्षक कार्यालयात तसंच जालना पोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येईल. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा येत्या रविवारी जालना इथं ��ोणार आहे. //*******//
0 notes