#श्रेणीत
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर
मकोकाअंतर्गत अटकेतील आरोपी वाल्मीक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आणि
बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा दहावा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या मोहिमेअंतर्गत देशात आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या १ लाख ७२ हजार झाली आहे, तर सरकारच्या डायलिसीस मोहिमेचा साडेचार लाख रुग्णांना लाभ झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले –
नॅशनल हेल्थ मिशन के द्वारा जिस प्रकार के ऐतिहासिक टार्गेटस् को मिट करने का काम गत दस वर्षों मे माननीय प्रधानमंत्रीजी के नेतृत्व मे हुआ है, लगबग बारा लाख हेल्थ केअर्स के वर्कर्स 2021 से 22 के बीच मे नॅशनल हेल्थ मिशन के साथ जुडे। दो सौ बीस करोड से अधिक कोविड-19 के वॅक्सिन डोसेज् देशभर मे दिये गये। 2023-24 तक 1,72,000 आयुष्��मान आरोग्य मंदिर सेंटर्स खुल चुके है।
२०२५-२६ च्या पणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल तीनशे पंधरा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे कच्च्या तागाला यावर्षी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल, असा किमान हमी भाव मिळेल. या निर्णयाचा ईशान्य भारतातल्या सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांना फायदा होईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं.
****
निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाण-घेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार जाहीर झाला असून सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी, राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
केईएम रुग्णालय हे मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांचा आधारवड असून, रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचा नव्याण्णवावा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या कार्याचा शिंदे यांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
****
मैत्री कायद्याला अधिक बळकट करण्यासाठी राज्यसरकार एक विशेष पोर्टल तयार करत असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते आज दावोस इथून पत्रकारांशी बोलत होते. या पोर्टलबाबत अधिक माहिती देतांना सामंत म्हणाले –
हे पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळेमध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे. देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे, की ॲप्लीकेशन कसं करायचं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर ते ॲप्लिकेशन नक्की कुठे आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या आठ दिवसांमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे.
अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेला आज एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागपूर इथे आजच्या या दिनाच्या निमित्तानं जयस्तुते फाउंडेशनतर्फे महाल परिसरात अकरा हजार दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून धनुष्यबाण, शंख, गदा, कलश आणि स्वस्तिक अशी मंगलचिन्हं साकारण्यात आली होती.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं, आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाला नमन, अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
नागपूरहून ते गोव्यापर्यंत जाणाऱ्या आणि कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठं जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठीच्या भूसंपादनाला आता गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरात राज्य परिवहन महामंडळ-एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास एक ��ोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकास ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बस स्थानकाला २५ लाख रुपये बक्��ीस दिलं जाणार आहे.
****
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका खाली अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला आज बीड जिल्हा सत्र न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. दरम्यान, केज इथल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.
****
जालना इथल्या प्रसिद्ध योग शिक्षक संगीता आलोक लाहोटी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा नोकर भीमराव धाडे याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. १४ डिसेंबर २०२१ रोजी लाहोटी यांची राहत्या घरी हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी या खटल्याचं काम पाहिलं.
****
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेचा दहावा वर्धापनदिन आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.
प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीनं असायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाभरात मानसिक स्वास्थ्य आणि कौशल्य विकास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी रेखा काळम यांनी यावेळी दिली.
नाशिक तसंच धुळ्यातही आज बेटी बचाव बेटी पढाओ’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानात मुलींचं संरक्षण, शिक्षणाला प्रोत्साहन, लिंगभेद निर्मूलन यासाठी जनजागृतीपर उपाय करण्यात येणार आहेत.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे. कोलकाता इथल्या ईडन गार्डन मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. तसंच भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून बाहेर येऊन या सामन्याद्वारे पुनरागमन करत आहे.
****
राज्यस्तरीय ग्राफलिंग शालेय कुस्ती स्पर्धेत धाराशिवची महिला मल्ल पौर्ण��मा खरमाटे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली. १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक इथं या स्पर्धा पार पडल्या. या विजयामुळे पौर्णिमाची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे
****
0 notes
Text
बाटलीबंद पाणी सर्वाधिक धोकादायक श्रेणीत , ‘ थर्ड पार्टी ‘ साठी चरण्याचं कुरण ?
सर्वाधिक सुरक्षित पाणी म्हणून बाटलीबंद पाणी नागरिक पिणे पसंत करतात त्यामुळे पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार सध्या खूप कमी झालेले असले तरी केंद्राच्या एका निर्णयाने बाटलीबंद व्यवसायिकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. भारतीय अन्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांनी सर्वाधिक धोकादायक अन्नपदार्थांच्या श्रेणीत चक्क बाटलीबंद पाण्याचा समावेश करण्याचा निर्णय…
0 notes
Text
Oppo A3x 5G: Oppo ने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅ���रीसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
Oppo ने गुपचूप आणखी एक स्वस्त 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H बॉडी सह येतो, या फोनचा लूक आणि डिझाईन आयफोन सारखा दिसतो. Oppo ने हा फोन भारतीय बाजारात खासकरून बजेट यूजर्ससाठी लॉन्च केला आहे. हा फोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. या किमतीच्या श्रेणीत, ते POCO, Redmi, Vivo, Infinix, Motorola सारख्या ब्रँडच्या स्वस्त फोन्सना टक्कर देणार आहे.
0 notes
Text
पाटोदा ग्रामपंचायतीचा देशभर डंका, कार्बन न्युट्रल श्रेणीत द्वितीय क्रमांक,गावाची पुरस्कारातून ४ कोटींची कमाई
https://bharatlive.news/?p=88389 पाटोदा ग्रामपंचायतीचा देशभर डंका, कार्बन न्युट्रल श्रेणीत द्वितीय ...
0 notes
Text
Oscars 2023 | ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला ऑस्कर पुरस्कार
मुंबई | कलाविश्वातील प्रतिष्ठेचा आणि तितकाच महत्त्वाचा मानला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर (Oscar). या पुरस्कार सोहळ्याला 90 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांची परंपरा आहे. 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा (academy awards) लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या गाण्यानं ‘बेस्ट ओरिजनल सॉन्ग’ या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारताचा बोलबाला पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऑस्कर विजेत्यांचे आभार मानले आहेत. असाधारण नाटू नाटू गाण्याची लोकप्रियता वैश्विक आहे. हे एक असं गाणं आहे, जे येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत प्रत्येकाच्या लक्षात रा��िल. एमएम कारावनी, चंद्रा बोस आणि इस प्रतिष्ठित सम्मान��साठी संपूर्ण टीमला शुभेच्छा, असं मोदी म्हणालेत. महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
Link
0 notes
Text
अवघड जागेच दुखणं
lockdown सुरु होऊन ३ हप्ते पूर्ण होत आले होते आता शेवटचा दिवस म्हणजे १४ ला लोकडोवन संपणार होत,
रामू : चला १० वाजले ... मोदीजी lockdown वर लोकाले भाषण देणार हाय
दामू : हो मले पण ऐकायचं आहे ते, कटाळा आला लय आता त ह्या सगळ्याचा, माय दुकान बंद झालं अन मायावर उपासमार आली
रामू: हो बाप्पा , लय अवघड जागेच दुखणं होऊन बसलं हे त, सहन बी होत नाही अन सहन केल्याशिवाय दुसरं काही नाही , चला लावा आता दूरदर्शन (संबोधन ऐकत बसले) दामू : वाटलं तर होतच वाढणार मनुन
रामू: वाटलं तर होत पण आता काय करायचं दुकान अजून १५ दिवस बंद .......... कॉरोन नाही उपास मारीनंच मरणार वाटत आता, दुकान तर उघडावं लागनच ..
दामू : . पण फुलाचं दुकान कुठं उघडता येते, (कुसितपणे बोलत) ते थोडी ना प्राथमिक गरजेच्या श्रेणीत येत
रामू :. दुसऱ्याच माहित नाही पण मायात पहिल्याच गरजेत येते, माय पोट त तेच भरते मंग मी काहून नाही उघडू माय दुकान... तसाही ह्या परीस्तीतून तर देवाचं वाचवू शकते आपल्याले.. मंग त्याच्या पूजे साठी फुल लागणच.... (मनाशी काहीतरी निर्धार करून) असं मराच त तस मरू
(आणि मोबाइ वर कॉल करतो) रामू :. भाऊ मले उद्या साठी फुल पाहिजे, देसान का बाप्पा?
राजू :. हो देऊ त शकतो, तसही रोज फुल तोंडूनच फेकतो, तोडायची मजुरी उरावर बसते, कमीत कमी मी दोन पैसे त येईन त्या फुलाचे, पण तुले कोण दिली परमिशन ?
रामू: परमिशन नाही भाऊ जाऊन उघडतो आता, होते ते पैसे त संपले सारेच, बसतो जाऊन,, आलं कोणी त करतो धंदा नाही त हाय आपलं रोजच पडून राहणं ...
(mobile वर कॉल लावून) राजू .: मजूर नाही फुल तोडायले, तू येत का? ये वावरत अन तोडून घेऊन जा
रामू :. हो येतो अन जातो घेऊन (वावरातून फुल तोडून आणून दुकान उघडले अन हार करत बसले)
(मनातल्या मनात विचार करत) कशी आली वेळ, फुल वावरातून तोडून आणावं लागून राहिले, जेवढा पाहिजे माल तेवढा भेटणं , पण गिर्हाइकी पाहिजे!! कमीत कमी आजच्या जेव��यची सोय एवढी कमाई झाली तरी झालं .... (एवढ्यात गिर्हाईक आले ) (न जाणो कुठून एवढे जमले गिर्हाईक कि सोसिअल डिस्टन्सची तर पार वाट लावली, हे पाहून पोलीस वॉल तिथं येतो) पोलिसवाला : कायले उघडलं बे दुकान ? एवढ्या वेळा सांगून बी नाही समजत का तुमाले ..
रामू :. समजते हो बाप्पा ... काऊन नाही समजत!! पण काय करू पैसे संपले होते माये मनून उघडलं दुकान साहेब ... तुम्ही माराल जास्तीत जास्त मनल ... तसही भुके पायी मरत आहो... मार खाऊन अजून लवकर मरावं मनल..... आता भीती नाही राहिली तुमची भुके पुढं साहेब ...
पोलिसवाला: भीती आमची (गालात हसून कुसितपणे ) , आमची भीती नका वाटू द्या, corona ले त भ्या .... corona ले ...... तुमि तुमची तबियत त कराल खराब पण दुसऱ्याची पण कराल ... अन त्याचा त हिशोबच नाही ..... उपासमारीन त फक्त तुमीच मराल पण अश्यान लय मरतील हो (रागानं ओरडून ) दुकानदार ... चला करा बंद आता ... नाही त करतो अंदर ...... मग हाणू सोटे ..... करा पहिले ते बंद... काऊन घरी कोणी नाही का ?
रामू : . आहे ना साहेब माय आहे फक्त ... घरी खा ची सोय नव्हती मनून बायको केव्हाचीच सोडून गेली माहेरी .... लेकरं बाळ पण घेऊन गेली ....(हळूच मनात बोलत) बर झालं घेऊन गेली ते .... नाही त इथं काय सोय लागली असती ....
पोलिसवाला: हो समजू शकतो मी, हे घे ठेव १०० रुपये .. याच्या पेक्षा जास्त ऐपत नाही मायी ... पण हा घे नंबर (mobile नॉम्बर देतो).... ते लोक जेवण वाटते रोज ... सांग तैले तुझा प्रॉब्लेम आणून देतील जेवण रोज.... जर नसणं सोय त ...
रामू :. नाही साहेब पैसे नको मले .... थोडी फार झाली कमाई मायी आज !! तेवढ्यात भागवतो ..नाहीच झालं त.. करतो फोन संस्थेले .. मनजे खाची त सोय होईन ... साहेब धन्यवाद ...
पोलिसवाला : हां ठीक आहे पण, तू आता दुकान उघडू नको नाही तर पहा पुढच्या खेपेला अंदर टाकीन ....
रामू : (घरी जाताना एकट्यातच विचार करत) पोलिसवाल्यानं बोलता बोलता एक गोष्टत बरोबर बोलली... उपाशी आपण एकटे मरू पण बाहेर निघालो त माहित नाही किती जनाले घेऊन मरू ...... मनून घरातच राहू बाप्पा .. होईन थोडा त्रास पण करू सहन ... काय सांगावं corona नंतर लोक रोज देवाच्या पूजेले फुल विकत घेऊन वाहतील.. कोणाच्या झाडाचे तोडून नाही .... (स्वगत हसत)
2 notes
·
View notes
Text
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
���ाष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले. येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी…
View On WordPress
0 notes
Text
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
राष्ट्रपतींच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी विविध श्रेणीत महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली, 14 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खासगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीत राज्याला राष्ट्रीय पुरस्काराने राष्ट्रपती यांनी सन्मानित केले. येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी…
View On WordPress
0 notes
Text
तुषार गोसावी याला पखवाज विशारद पदवी
तुषार गोसावी याला पखवाज विशारद पदवी
पोईप : श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचा विद्यार्थी तुषार गोसावी याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून घेतल्या जाणाऱ्या पखवाज विशारद परीक्षे मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तुषार मालवण तालुक्यातील वराड गावात राहतो. गुरुवर्य पखवाज अलंकार श्री. महेशजी सावंत यांच्याकडे तुषार २०१५ पासून पखवाजचे धडे घेत आहे.तुषार गोसावी याने श्री. महेश सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं, त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आल�� आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, अकोल, वाशीम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाने १९ षटकात ३ खेळाडू बाद ८० धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने भारताने जिंकले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आली तेंव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात २ बाद ८२ धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
अग्नीवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात कारकून तसंच सामान्य श्रेणीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावी इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर इथं दोन जानेवारी २०२५ पासून नऊ जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकाचे भाऊ, माजी सैनिक, तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. साडे सतरा ��े २१ वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र ��सतील. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भुईमुग पिकावर टीका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्याने रब्बीच्या भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
0 notes
Text
JEE Advanced 2022 टॉपर्स: IIT दिल्ली झोनच्या तनिष्का काबरा मुलींच्या श्रेणीत अव्वल
JEE Advanced 2022 टॉपर्स: IIT दिल्ली झोनच्या तनिष्का काबरा मुलींच्या श्रेणीत अव्वल
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बेने जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर केला आहे. IIT दिल्ली झोनची तनिष्का काबरा ही महिला टॉपर आहे जिने JEE Advanced 2022 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तनिष्का काबरा हिने IIT प्रवेश परीक्षेत 360 पैकी 277 गुण मिळवून 16 वा क्रमांक मिळविला आहे. IIT मद्रास झोनची पल्ली जलजाक्षी ही 24 रँक मिळवून दुसरी टॉपर आहे, त्यानंतर IIT बॉम्बेची जलाधि जोशी 32 रँक मिळवून तिसरी टॉपर…
View On WordPress
0 notes
Link
1 note
·
View note
Text
MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राणांचा VVIP श्रेणीत समावेश
MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राणांचा VVIP श्रेणीत समावेश
MP Navneet Rana: खासदार नवनीत राणा याना वाय प्लस दर्जाची सुरक्षा; राणांचा VVIP श्रेणीत समावेश अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. या निर्णायामुळे आता खासदार राणा यांचा व्हीव्हीआयपी श्रेणीत समावेश झाला आहे. या सुरक्षा व्यवस्थेत एस पी ओ, एन एस जीचे कमांडो, सी एस एफ चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा…
View On WordPress
#&8216;वाय&8217;#navneet#rana#vvip#खासदार#दर्जाची#नवनीत#प्लस#बातम्या#यांना#राणा#राणांचा#श्रेणीत#समावेश!#सुरक्षा
0 notes
Text
नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय नाविन्य निर्देशांक २०२१’ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर
नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतीय नाविन्य निर्देशांक २०२१’ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर
नवी दिल्ली : नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नाविन्य (Innovation) निर्देशांक 2021 मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र 16.6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. येथील नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक 2021’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य…
View On WordPress
0 notes
Text
महागाई रोखण्यासाठी साखरेच्या निर्यातीवर सरकारचे निर्बंध
नवी दिल्ली: केंद्र सरकारने मंगळवारी 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची उपलब्धता वाढवणे आणि साखरेच्या किमतीत होणारी वाढ रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 1 जून 2022 पासून साखरेची (कच्ची, शुद्ध आणि पांढरी साखर) निर्यात प्रतिबंधित श्रेणीत ठेवण्यात आली आहे, असे परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. एका निवेदनात सरकारने म्हटले आहे की,…
View On WordPress
0 notes