#शरद पवार मराठी बातमी
Explore tagged Tumblr posts
Text
आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स!
आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स!
आम्ही दहशतीत, तुम्ही धीर द्या! बेळगावातल्या मराठी भाषिकांचे शरद पवार यांना मेसेज, आणखी काय अपडेट्स! पुणेः बेळगावातील (Belgaum) मराठी भाषिकांवर (Marathi) सातत्याने अन्याय होत असून गेल्या आठवड्यापासून ही स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. आम्ही सध्या प्रचंड दहशतीत आहोत. येथील जिल्हाधिकारीदेखील आमच्या मागण्यांची दखल घेत नाहीयेत, तुम्ही कृपया आम्हाला धीर द्या, अशी विनंती बेळगावमधील मराठी भाषिकांनी केली…
View On WordPress
#अपडेट्स#आजच्या प्रमुख घडामोडी#आणखी#आम्ही#काय?#तुम्ही#दहशतीत#द्या#धीर#पवार#बातमी आजची#बेळगावातल्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भाषिकांचे#मराठी#मेसेज#यांना#राजकारण#राजकारण लेटेस्ट#शरद#शासन#सरकार
0 notes
Text
अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्याकडे पत्राचाळ प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्याकडे पत्राचाळ प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरूवातीपासून सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केला आहे. याप्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी…
View On WordPress
#atul bhatkhalkar marathi news#sanjay raut patrachawal case#sharad pawar patrachawal case#अतुल भातखळकर ताजी बातमी#अतुल भातखळकर पत्राचाळ प्रकरण#अतुल भातखळकर शरद पवार#अतुल भातखळकर शरद पवार पत्राचाळ प्रकरण#मराठी बातमी#महाराष्ट्र बातम्या#शरद पवार ताज्या ��ातम्या#शरद पवार मराठी बातमी#शरद पवार मराठी बातम्या#शरद पवारांवर अतुल भातखळकर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 August 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** औरंगाबाद जिल्ह्यात आज आठ कोरोना विषाणू बाधित रूग्णांचा मृत्यू ** परभणी जिल्ह्यात चहाची दुकानं, पानपट्टी, उपाहारगृहांना अटी आणि शर्तींवर व्यवसायाची परवानगी ** मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई तसंच नाशिक इथं आंदोलन आणि ** येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा **** औरंगाबाद मध्ये आज आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दीपनगर हडको एन ११ इथला ४६ वर्षीय पुरुष, जटवाडा हर्सूल परिसरातला ७० वर्षीय पुरुष, वाळूज इथल्या समता कॉलनीतला तीन वर्षाचा मुलगा, हडको एन १३ मधला ४९ वर्षीय पुरुष, फुलंब्री तालुक्��ातल्या मारसावळी इथली ७० वर्षीय महिला, घाटशेंद्रा कन्नड इथला ७१ वर्षीय पुरुष, रांजणगाव वाळूज इथल्या २७ वर्षीय तसंच बजाज नगर इथल्या ८५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात या संसर्गानं एकूण मृतांची संख्या आता ५९७ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बधित रुग्णांची एकूण संख्या अठरा हजार ८०१ झाली असून यापैकी तेरा हजार आठशे ८४ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात चार हजार तीनशे अठ्ठावीस रुणांवर उपचार सुरु आहेत. **** परभणी शहरासह जिल्ह्यातील चहाची दुकानं, पानपट्टी, उपाहारगृह आणि स्वयंपाकघरातून घरपोच खाद्य पुरवण्याकरिता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे. यासंबधी आज एक आदेश जारी करण्यात आला. सर्व हॉटेल्स, लॉजवर वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांसाठी आरोग्य विषयक आवश्यक ती खबरदारी घेवून स्वतःच्या उपहारगृहात खाद्यपदार्थ बनवून देण्याकरता ही परवानगी असेल, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणी महापालिका प्रशासनानं मनपा हद्दीत दहा ठिकाणी विलगीकरणासाठी एक हजार १८२ खाटांची व्यवस्था केली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. **** अहमदनगर जिल्ह्यातल्या राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात खासदार शरद पवार यांच्या नावानं १ हजार खाटाचं कोविड देखभाल केंद्र उभारण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज या देखभाल केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. आगामी काही महिन्यात युके आणि सिरम संस्थेच्या वतीनं तयार करण्यात येणारी कोविड संसर्गाची लस उपलब्ध होणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. **** परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सुधाकरराव सोळंके याचं कोरोना विषाणू संसर्गानं पुणे इथं आज सकाळी उपचारादरम्यान निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. मागील १५ दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. **** मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक निशिकांत कामत यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं, पीटीआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. आज दुपारी कामत यांच्या निधनाची बातमी वृत्तसंस्थेनं अभिनेता जयवंत वाडकर यांच्या हवाल्यानं दिली होती, मात्र ही बातमी चुकीची असून, कामत सध्या कृत्रीम श्वसन य��त्रणेवर असल्याचं, संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. कामत यांचे मित्र, दिग्दर्शक मिलाप झव्हेरी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यकृताच्या विकारानं गंभीर असलेल्या कामत यांच्यावर हैदराबाद इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आताच आलेल्या माहितीनुसार कामत यांचं निधन झालं आहे. हैदराबाद इथल्या एआयजी रुग्णालयानं पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. **** मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदान इथं आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली तर नाशिक इथं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, न्यायालयात मराठा समाजाची बाजू सक्षमपणे मांडली जात नाही तसचं वकील आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विनायक मेटे यांनी यावेळी केला. मराठा आरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील नेमण्यात आलेली समिती निष्क्रीय आहे. त्यांच्याऐवजी इतर सक्षम मंत्र्यांकडे उपसमितीचं नेतृत्व द्यावं, सारथी संस्थेचं रखडलेलं काम सुरू करावं इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. **** सोलापूर जिल्ह्यात आज दूध दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. दरम्यान, सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथंही भाजपच्या वतीनं दूध दराच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये प्रती लिटर अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावं तसंच दूध भुकटीच्या निर्यातीसाठी पन्नास रुपये प्रति किलो अनुदान द्यावं अशा मागण्यांचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलं आहे.. **** जालना जिल्ह्यात आज पहाटेपासून संततधार पाऊस सुरू असून या पावसामुळे कुंडलिका नदीला पूर आला आहे. या नदीवरील रोहनवाडी इथल्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीवरून जाणारे दोन युवक आज पुराच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होते, या दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. **** बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे एकोणीस दरवाजे उघडले असून २२ हजार ५५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पाण्याची आवक पाहून पाणी विसर्गाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. **** पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणाचे सर्व दहा दरवाजे उघडून १६ हजार ८०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी पूर्णा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे. **** औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील च���्हाण यांची बदली करण्यात आली आहे. मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले चव्हाण यांनी, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून, यापूर्वी ठाणे महापालिका आयुक्त, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तसंच वीज महावितरण कंपनीच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं आहे. उदय चौधरी यांची मंत्रालयात बदली झाल्यानं, औरंगाबाद जिल्हाधिकारी पद रिक्त होतं. **** पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी राजेश कुलकर्णी यांची बदली करण्यात आली आहे. कुलकर्णी सध्या मुंबईत हाफकिन संस्थेत व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत आहेत. नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाल्यानं, पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होतं. **** शिवसेनेचे नेते खासदार संजय रा��त यांनी डॉक्टरांसंबंधी केलेलं वक्तव्य डॉक्टर बांधवांच्या भावना दुखावणारं असल्याचं, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. कोविड प्रादुर्भावाच्या काळात डॉक्टर वर्ग अत्यंत कठीण परिस्थितीत काम करत असताना, त्यांच्याबद्दलचं हे वक्तव्य भावना दुखावणारं असल्याचं, फडणवीस यांनी म्हटलं आहे. **** जालना इथं आज राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी एकदिवसीय कामबंद आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातल्या सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या शासनानं तात्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी संघटनेचे राज्य सचिव केशव कानपुडे यांनी यावेळी केली. **** जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उद्या साजरा होणारा बैलपोळा शेतकऱ्यांनी सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच किंवा शेतात साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास तसंच मंदिराच्या ठिकाणी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ****
0 notes
Text
अजीम ओ शान शेहेनशाह एसएस ९७ या गाण्यावरून भाजपने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
अजीम ओ शान शेहेनशाह एसएस ९७ या गाण्यावरून भाजपने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे देशभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात लावण्यात आलेल्या एका गाण्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे, असा टोलाही भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला…
View On WordPress
#bjp महाराष्ट्र बातम्या#नरेंद्र मोदींवर शरद पवार#भाजपचा शरद पवारांवर हल्लाबोल#भाजपाची शरद पवारांवर टीका#राष्ट्रवादी अधिवेशन#शरद पवार ताज्या बातम्या#शरद पवार बातमी#शरद पवार बातम्या#शरद पवार मराठी बातमी#शरद पवार मराठी बातम्या#शरद पवार राष्ट्रवादी अधिवेशन#शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल बातम्या#शरद पवारांचा भाजपावर हल्ला
0 notes
Text
फलटण येथे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल
फलटण येथे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल
भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यपणे निशाणा साधला आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेमधील घराणेशाहीवर सुद्धा टीका केली आहे. एखादा बैल अवताला बसला तर त्याला आपण बाजारात नेतो. मात्र, हा बैल २५ वर्षे झालं बसलायं, आता तरी बदला, अशा शब्दांत जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…
View On WordPress
#jakumar Gore marathi news#जयकुमार गोरे#जयकुमार गोरे पवार परिवार#जयकुमार गोरे बातम्या#जयकुमार गोरे मराठी बातम्या#जयकुमार गोरे यांचा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर हल्ला#जयकुमार गोरे रामराजे नाईक निंबाळकर#जयकुमार गोरे शरद पवार#रामराजे नाईक निंबाळकर मराठी बातमी
0 notes
Text
राष्टपती निवडणूक, पुन्हा शरद पवार यांचे नाव चर्चेत
राष्टपती निवडणूक, पुन्हा शरद पवार यांचे नाव चर्चेत
राष्टपती निवडणूक, पुन्हा शरद पवार यांचे नाव चर्चेत देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाली आहे. देशातील सर्वच राजकीय पक्ष उमेदवार कोण असावा याबाबत विचार करत असतानाच राष्ट्रवादी … राष्टपती निवडणूक, पुन्हा शरद पवार यांचे नाव चर्चेत आणखी वाचा The post राष्टपती निवडणूक, पुन्हा शरद पवार यांचे नाव चर्चेत appeared first on Majha Paper. देशात राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी…
View On WordPress
#आजची खबर#आजच्या घडामोडी#चर्चेत!#ठळक बातम्या#नाव#निवडणूक#पवार#पुन्हा#बातम्या#भारत लाईव्ह#भारत लाईव्ह मीडिया#मराठी बातमी#मराठी समाचार#यांचे#राष्टपती#शरद
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 January 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि. **** २०१९ च्या निवडणुकीनंतर घुसखोरांना वेचून देशाबाहेर पाठवणार - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची स्पष्टोक्ती माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी संस्थेची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार - माहिती प्रसारण मंत्री राज्यात काल दर्पण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय **** २०१९च्या निवडणुकीनंतर देशातल्या घुसखोरांना वेचून देशाबाहेर पाठवलं जाईल, असं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदार संघातल्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा काल लातूर इथं घेण्यात आला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. देशातल्या घुसखोरांविषयी कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. २०१९ची निवडणूक ही पानीपतच्या तिसऱ्या लढाई सारखी असून या निवडणुकीत विजय मिळाला तर पुढची ५० वर्ष आपल्या विचाराचं सरकार केंद्रात सत्तेत राहील, असा विश्वास शहा यांनी यावेळी व्यक्त केला. शहा यांनी शहरातल्या मान्यवरांशीही संवाद साधला. विचारांची ताकद तसंच विकासाचा दृष्टीकोन नसल्यानं काँग्रेसनं सत्ताकाळात लोकशाही संपुष्टात आणली, असं शहा यांनी यावेळी नमूद केलं. **** ‘नागरिक सुधारणा विधेयकाला’ संसदेत विरोध करणार असल्याचं शिवसेनेनं काल जाहीर केलं. आसाम गण परिषदेनं केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेनं हा निर्णय घेतल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. आसामच्या जनतेनं जात, धर्म, पंथ बाजूला ठेवत प्रस्तावित कायद्याला विरोध केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आसामी जनतेच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भाषिक ओळखीला तसंच अस्मिता जपण्याच्या प्रयत्नाला या विधेयकामुळे बाधा पोहोचेल असं राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदीची संपूर्ण प्रक्रियाच यामुळे निरर्थक ठरेल, असं राऊत यांनी नमूद केलं. **** आगामी लोकसभा निवडणुक���ंच्या पार्श्वभूमीवर माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकार खाजगी संस्थेची सेवा घेणार असल्याचं वृत्त निराधार असल्याचा खुलासा माहिती आणि प्रसारण मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेनं नुकतीच याबाबत बातमी प्रसारित केली होती, त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासाठी गेल्या महिन्यात निविदा काढल्याचा आरोप झाला होता. इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांच्या बातम्यांचा संग्रह करण्यासाठी याआधीही असे उपाय करण्यात आल्याचं राठोड यांनी सांगितलं. यावेळी केवळ समाज माध्यमांचा यात समावेश केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसिद्धी माध्यमांमधला लोकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सरकारी धोरणांबाबत जनतेची मतं तसंच प्रतिक्रिया सरकार जाणून घेऊ इच्छितं. सरकारी धोरणांमध्ये सुधारणेसाठी हे आवश्यक असल्याचं राठोड यांनी सांगितलं. **** साखरेचा किमान विक्री दर सध्याच्या प्रतिकिलो २९ रूपयांवरुन ३४ रुपये करावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रातून पवार यांनी, देशातल्या ऊस उत्पादकांच्या समस्या आणि त्यांना दिलासादायक उपाययोजना सूचवल्या आहेत. विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे दर कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे कारखाने ऊस उत्पादकांचे पैसे वेळेवर देऊ शकत नाहीत, त्यामुळे साखरेचे दर वाढवल्यास, कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिक अनिश्चिततेमुळे छोटे आणि मध्यम ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अस्वस्थता दूर होईल, या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज पवार यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. ***** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राज्यात काल दर्पणदिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. उस्मानाबाद इथं या दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं. तुळजापूर तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय तुळजाभवानी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अंबादास पोफळे यांना प्रदान करण्यात आला. लातूर इथं आम आदमी पक्षाच्या वतीनं पत्रकारांचा गौरव करण्यात आला. जालना इथं काल दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी विविध माध्यमात कार्यरत पत्रकारांशी संवाद साधला. तसंच पत्रकारांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देऊन, पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर इथं काल जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं दर्पण दिन साजरा करण्यात आला. नांदेड इथं जिल्हा माहिती कार्यालय आणि महात्मा गांधी मिशनच्या वृत्तपत्र विद्या आणि म��ध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज “दर्पण दिन” विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद, बीड, हिंगोली, परभणी इथंही दर्पण दिन उत्साहात साजरा झाला. **** क्रिकेटः भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या सिडनी इथं सुरु असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पाचव्या दिवशीही खेळ पावसामुळे उपाहारापर्यंतही सुरू होऊ शकला नाही. काल चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांत गुंडाळून ‘फॉलोऑन’ दिला. कुलदिप यादवनं भेदक मारा करून यजमान संघाचा निम्मा संघ बाद केला. मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अंधुक प्रकाशामुळं काल खेळ थांबवण्यात आला तेंव्हा ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावा झाल्या होत्या. चार कसोटी सामन्यांच्या या बॉर्डर- गावसकर चषक मालिकेत भारतानं २-१ अशी आघाडी घेतली आहे. **** शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा जालन्यातला कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या बहुजन संघटनांच्या कार्यकर्त्यांवर काल पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. राजेंद्र प्रसाद मार्गावरच्या आर्य समाज मंदिरात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी घोषणाबाजी करणाऱ्या या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना हा लाठीमार करावा लागला. यावेळी जवळपास ५६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. कार्यक्रम संपेपर्यंत या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. **** राज्य शासनानं मराठा समाजाला, दिलेलं आरक्षण न्यायालयीन पातळीवर गांभीर्यपूर्वक हाताळलं जात असल्याचं ग्रामविकास आणि महिला, बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात वडवणी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खरेदी संकुलाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. कालमर्यादेत हा विषय सोडवण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. **** नांदेड जिल्ह्यातल्या क्षेत्र माळेगाव यात्रेत काल जिल्हां परिषदेच्या् कृषि विभागानं उत्कृ्ष्टक शेती करणाऱ्या जिल्ह्यातल्या १७ शेतकऱ्यांना कृषिनिष्ठि पुरस्कांर देऊन गौरवलं. राज्यााचे माजी मुख्यपमंत्री खासदार अशोक चव्हा ण यांच्या् हस्तेक हे पुरस्कातर देण्यात आले. **** तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त काल पहाटेपासून देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला. येत्या १४ जानेवारीला सोमवारी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईल. या उत्सवातला प्रमुख कार्यक्रम असलेली जलकुंभ यात्रा १८ जानेवारीला होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** लातूर जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या ३१२ कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी सामितीनं काल मान्यता दिली. या प्रारूप आराखड्यातल्या निधीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केलं. **** जालना इथल्या नाथ्रेकर प्रतिष्ठानच्यावतीनं काल औरंगाबाद इथं गीता जयंतीच्या अनुषंगानं संस्कृत पंडित सखारामपंत नाथ्रेकर स्मृती संस्कृत पठण स्पर्धा घेण्यात आली. विविध वयोगटातल्या स्पर्धकांनी यावेळी सुभाषितं, गीतं तसंच कथा सादर केल्या. येत्या रविवारी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. **** औरंगाबाद इथं काल पंडित जितेंद्र अभिषेकींच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीत महोत्सव घेण्यात आला. यात, भोपाळच्या सत्येंद्र सोळंकींचं संतूर वादन तर कर्नाटकातल्या हसंगी इथले पंडित गणपत भट यांचं शास्त्रीय गायन सादर झालं. तरंगिणी सांस्क़ृतिक प्रतिष्ठानसह ध्यास परफॉरमिंग आर्टसनं याचं आयोजन केलं होतं. **** औरंगाबाद इथं आज पाचदिवसीय श्रीराम महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ होत आहे. अकरा जानेवारपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक-सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** ** तिहेरी तलाकवर बंदी आणण्यासंदर्भातल्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी ** संसदेच्या हिवाळी अधिवेशनास प्रारंभ; पहिल्याच दिवशी विविध मुद्यांवरून राज्यसभेत गदारोळ ** कापसावरच्या बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर करण्याचं कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं आश्वासन आणि ** येत्या २४ आणि २५ डिसेंबरला अंबाजोगाई इथं मराठवाडा साहित्य सम्मेलन **** तिहेरी तलाकवर बंदी आणण्यासंदर्भातल्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळानं, २००० रुपयांपर्यंतच्या डिजिटल व्यवहारांवर लागणारं शुल्क - एमडीआरची भरपाई सरकार करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१७ लाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. **** संसदेचं हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर आलेल्या नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. त्यानंतर तीन आजी आणि सात माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करुन अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज सोमवार पर्यंत स्थगित केलं. राज्यसभेतही पंतप्रधानांनी नवीन मंत्र्यांचा परिचय करुन दिला. सभापती व्यंकय्या नायडू यांनी जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि पक्षाचे नेते अली अन्वर यांना पक्षानं पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरुन अपात्र घोषित केल्यानंतर त्यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द केल्याचं सांगितलं. या मुद्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला. यामुळे सभापतींनी कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब केलं. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानी शिष्टमंडळाची भेट घेतल्याचा आरोप केल्याच्या मुद्यावरुन राज्यसभेत काल विरोधकांनी गदारोळ केला. यामुळे कामकाज वारंवार तहकुब करावं लागलं. दुपारी अडीच वाजता कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली, मात्र उपसभापती पी जे कुरीयन यांनी ती मान्य न केल्यानं काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. **** मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशमधल्या कापूस पिकावर बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल विधानसभेत केली. कापूस बियाणे विक्री के��ेल्या कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई वसूल केली जाईल आणि अशा कंपन्यांवर धाडी टाकल्या जातील असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी, बोंडअळी बाधीत झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी २५ हजार, तर धानावर तुडतड्या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. **** शिवजयंती दोनदा साजरी होण्याच्या मुद्यावरुन विधानसभेत काल विरोधकांनी गदारोळ केला. सरकारतर्फे शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनी तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यात येते, मात्र महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावी अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी लाऊन धरली. यावरुन विरोधकांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. **** मराठा समाजाला आरक्षण आणि अन्य सुविधा देण्याच्या संदर्भात शासनाची भूमिका सकारात्मक असून त्यासाठी अनेक योजना सुरु केल्या असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य शरद रणपीसे यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** येत्या २४ आणि २५ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं होणाऱ्या एकोणचाळीसाव्या मराठवाडा साहित्य सम्मेलनाचं उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे, असं स्वागतअध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. बडोदा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे या संमेलनाचे अध्यक्ष असून, खासदार रजनीताई पाटील, पद्मश्री ना. धो.महानोर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल, असं देशमुख यांनी सांगितलं. **** महिलांच्या मानवाधिकारासाठी सद्य:स्थितीत खूप आव्हानं असली तरी आज महिला आपल्या मानवाधिकारासाठी संघर्ष करत असल्याचं समाजसेविका रझिया पटेल यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं काल एमजीएम पत्रकारिता आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या वतीनं ‘मानवी हक्क आणि महिला’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्या बोलत होत्या. देशात स��्वच जाती धर्माच्या स्त्रियांना न्याय देणारे कायदे निर्माण होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. **** शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल अश्या सुलभ तंत्रज्ञान निर्मितीला उद्योजकांनी प्राधान्य द्यावं, असं आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. जालना इथं आयोजित तीन दिवसीय ‘रोटरी जालना एक्स्पो २०१७’चं उद्घाटन काल खोतकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालन्यात राष्ट्रीय पातळीवरील औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारणीची स्थानिक उद्योजकांची मागणी असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रस्ताव सादर केल्यास मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईलं, अशी ग्वाही खोतकर यांनी यावेळी दिली. **** उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीनं आयोजित ‘राज्यस्तरीय अंधकल्याण शैक्षणिक सप्ताहा’चं उद्घाटन नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ बारड यांच्या हस्ते झालं. राज्यातल्या २२ अंध शांळांमधले ३०० विद्यार्थी या सप्ताहानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. यानिमित्त आज उस्मानाबाद इथं अंधांच्या क्षमतांची प्रात्यक्षिकं दाखवणारी जनजागृती फेरी काढली जाणार आहे. **** आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक बातमी….. मी दिनेश जगंनाथ वाघ.राहणार साकली रोड धुळे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अपंगांना दिव्यांग हे नाव देणे व त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी म्हणून दिव्यांग्यांचे नवे बायोमेट्रिक आयडी युनिक कार्ड तयार करणे. हि आम्हा अंपंगासाठी खुप फायदेशीर गोष्ट आहे. पुर्वी हे आमचे अपंग ओळखपत्र महाराष्ट्रा पुरते मर्यादित होते.आता युनिक कार्ड मुळे अम्हा अपंगाना संपूर्ण देशात अपंगत्वाचे लाभ घेणे सोपे होईल. शासकिय कार्यालय, रेल्वे स्टेशन, अशा अनेक सार्वजनिक स्थानी अपंगाना रेम्प ,व्हिल चेयर, ब्यॉटरी चलीत वाहणे लिफ्ट, स्वतंत्र स्वच्छतालय उभारली जात आहेत. वर्तमान सरकारच्या नव्या धोरणा मुळेच हा बदल होत आहे. नविन अपंग कायद्या मुळे दिव्यांग व्यक्तीचे जिवन अधिक सुखकारक होईल. व कोणीही दिव्यांग लाभापासून वंचीत राहणार नाही.या सर्व बदला बद्दल आम्ही दिव्यांग नागरीक भारतसरकारचे रुणी आहोत. धन्यवाद जय हिंन्द, जय भारत. **** नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथली यात्रा आजपासून सुरु होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं काल ग्राहक जागरण पंधरवाड्यानिमित्त विद्यार्थी ग्राहक रॅली काढण्यात आली. तहसिलदार महेश सावंत यांनी या रॅलीचा शुभारंभ केला. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना ग्राहक कायद्याचं ज्ञान मिळणं आवश्यक असल्याचं सावंत यांनी यावेळी सांगितलं. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग इथं होणाऱ्या बालमहोत्सवाचं उदघाटन आज राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातल्या अनाथ तसंच दिव्यांग बालकांसाठी विविध स्पर्धा होणार आहेत. **** नाशिकमधल्या चांदवड इथं मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी शस्रास्रांचा मोठा साठा काल जप्त केला असून याप्रकरणी, तिघांना अटक करण्यात आली आहे. २५ बंदुका १९ रिव्हॉल्वर्स आणि ४ हजार १४० जिवंत काडतुसं या तिघांकडून जप्त करण्यात आल्याचं नाशिक ग्रामीण पोलिसांनी सांगितलं. *****
0 notes