Tumgik
#विद्यापीठाच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा Savitribai Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मात्र प्रथम सत्र परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पहिले वर्ष वगळता दुसऱ्या ते चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जही भरले आहेत. परंतु, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाले आहेत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर
महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं.
****
आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ॲप भूतान, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि फ्रान्स या सात देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जं त्यांच्या हस्ते देण्यात येतील तसंच योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले –
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना झाले
****
दरम्यान, स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंती पर्यंत राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात चालणारं हे अभियान “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले.
****
२७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’म्हणून साजरा केला जातो. ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज नं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा आज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत न���ण्यात आली.
****
0 notes
6nikhilum6 · 23 days
Text
Pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
एमपीसी न्यूज – संशोधन चलित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक (Pune)बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष…
0 notes
kvksagroli · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर ऊस शेतीचे नियोजन करावे; डॉ अंकुश चोरमले ऊस शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते यासाठी सूक्ष्म सिंचनाचा योग्य वापर व पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे व ना म कृषी विद्यापीठाचे कृषी कीटक शास्त्रज्ञ तथा ऊस पिक तज्ञ डॉ. अंकुश चोरमले यांनी शुक्रवार (ता.९) रोजी सगरोळी येथील आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवात शेतकऱ्यांना सांगितले. शेतामध्ये निघणारा केर कचरा हा जमिनीतच टाकल्यास सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. जमिनीचा पोत सुधारतो व जमिनीवर कचऱ्याचे आच्छादन तयार झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन लवकर होत नाही व ओलावा जास्त काळ टिकून राहतो त्यामुळे पाण्याची बचत होते, ऊस पिकासाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होते. शेतीसाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठाचा खर्च कमी होऊन ऊसशेती फायदेशीर ठरू शकते. यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे. सेतूफार्म अॅपवर पिकांची लागवड ते काढणीपर्यंतची सविस्तर माहिती दिली आहे, ह्या अॅपचा वापर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करावी असे आवाहन केले. व ना म कृषी विद्यापीठाच्या मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती याविषयी मार्गदर्शन करताना, जैविक निविष्ठांचा योग्य वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर न करता दशपर्णी, अमृतपाणी, अग्नीअस्त्र यासारख्या स्थानिक जैविक निविष्ठा तयार करून पिकांसाठी वापराव्यात म्हणजे भाजीपाला व इतर पीके जास्त काळ टिकून राहतात व जमिनीचे आरोग्य सुधारते असे सांगितले. गत बारा वर्षांपासून येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. दरवर्षी तंत्रज्ञान महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी कृषी ज्ञान व माहितीची शिदोरी घेऊन जात आहेत, ह्याचा परिणाम दिसत असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे कार्य असल्याचे गौरवोद्गार बिलोली - देगलूर मतदार संघाचे आमदार जीतेश अंतापूरकर यांनी काढले. सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुनील देशमुख, सरपंच गोदावरी उस्केलवार, संजीव सगरोळीकर, डॉ माधुरीताई रेवणवार आदींची उपस्थिती होती. तीन दिवसीय तंत्रज्ञान महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. #agriculture #Krushived2024 #kvksagroli #sugarcanefarming #SugarcaneFarmers #icar #कृषिवेद२०२४ #climatesmartagricultur
0 notes
darshanpolicetime1 · 8 months
Text
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
पुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादीत नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी समुदाय आणि एक समृद्ध राष्ट्रनिर्मितीची किल्ली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस  यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२३ व्या पदवीप्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक
मुंबई, दि. २२ : आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करत सर्वसाधारण सुवर्ण पदक पटकावले असून या स्पर्धेत विद्यापीठास प्रथम क्रमांक मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय विद्यापीठ संघातर्फे (एआययु) १६ आणि १७ मार्च २०२३ रोजी गणपत विद्यापीठ,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vinodtawde · 2 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन विभागाचे शिक्षकगण, विद्यार्थी दिल्लीत अभ्यास दौऱ्यानिमित्त आले असताना माझी सदिच्छा भेट घेतली. वर्तमान राजकीय परिस्थिती, बदलते माध्यम क्षेत्र, सोशल मीडिया या विषयांवर विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद झाला.
0 notes
mhlivenews · 2 years
Text
राज्य क्रीडा महोत्सवाचे डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते थाटात उद्घाटन - महासंवाद
राज्य क्रीडा महोत्सवाचे डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते थाटात उद्घाटन – महासंवाद
औरंगाबाद, दि.३ : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दोन हजार खेळाडूंच्या उपस्थितीने रंगणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन थाटात करण्यात आले. राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती व हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीने हा सोहळा नेत्रदीपक ठरला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फुटबॉल मैदानावर हा सोहळा झाला. केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.ना.डॉ.भागत कराड यांच्या हस्ते मशाल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी कसे सहमत? ; संभाजीराजे आक्रमक
Tumblr media
मुुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे छत्रपती श���वाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक झाले आहेत. राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे . संभाजीराजे यांनी कडक शब्दांत ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, सरकार राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करतेय का, असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच! या ट्विटमध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून ते गडकरींपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले. राज्यपालांच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. मात्र सरकारने याबाबत अद्याप काहीही केले नसल्याने संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान आणि फडणवीसांनी उत्तर द्यावे राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आधीही केली होती. Read the full article
0 notes
kokannow · 2 years
Text
बॅ. नाथ पै महाविद्यालयाचे विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश
बॅ. नाथ पै महाविद्यालयाचे विद्यापीठाच्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश
कुडाळ : बॅ. नाथ पै बी.ड महाविद्यालयाच्या बी.एड प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल अनुक्रमे ९८ % व १०० % लागला असून प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेसाठी एकूण २५ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या यात अश्विनी सागर परब ७३.३० % गुण प्रथम, तन्वी प्रणव सावंत ७२.९० % गुण द्वितीय, शर्वरी शिवशंकर पाटणकर ७२.८० % गुण तृतीय आणि पूजा प्रदिप सडवेलकर ७१.७० % गुण मिळवून चतुर्थ क्रमाकांने उत्तीर्ण झाल्या.तसेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार Health Sciences Examinations: विद्यापीठामार्फत १४० पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा जवळपास १४ हजार उमेदवारांनी दिली होती. ३ नोव्हेंबरला विद्यापीठाच्या वेबसाइटवर या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेदरम्यान अनेक उमेदवार डमी बसल्याचा संशय स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. अशा १५…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी-काँग्रेस पक्षाचा विरोध
चांद्रयान-४, व्हिनस ऑर्बिटर तसंच रबी हंगामासाठी खतांच्या अनुदालाही केंद्राची मान्यता
राज्यभरात ३१ ऑक्टोबरपर्यंत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन
आणि
गणपती विसर्जनानंतर मुंबईत सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्याचं संकलन
****
एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात यासाठीचं विधेयक संसदेत सादर केलं जाणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा तसंच स्थानिक स्वराज्य संस्था अशा दोन टप्प्यात निवडणुका होतील, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
इसका इम्पिमेंटेशन दो फेजेस्‌ में होगा। फर्स्ट फेज मे लोकसभा और असेंब्लीज के इलेक्शन्स को कराने प्रयास है। और उसके सेकंड फेज मे लोकल बॉडी इलेक्शन विधीन हंड्रेड डेज ऑफ जनरल इलेक्शन के करवाना है। जिससे की एक बार में सारे इलेक्शन का प्रोसेस कंप्लीट हो और अगले पांच साल मे सब के सब देश के निर्माण मे लगे रहे। जो कमिटी की रिकमेंडेशन्स है, उनको पुरे देश भर मे डिस्कशन किया जायेगा। मल्टीपल इसके जो इंम्पॅक्टस्‌ है, उन सब के उपर डिस्कशन्स करें। और एक इम्प्लिमेंटेशन ग्रुप इसके बाद मे डेव्हलप किया जायेगा, जिससे लीगल प्रोसेस से इसको इंम्प्लिमेंट करे।
काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेतले विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा लोकशाहीवर घाला असल्याचं सांगत, देशात जेव्ह�� जेव्हा आवश्यकता भासेल, तेव्हा तेव्हा निवडणूक घ्यावी लागेल, असं खरगे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, आज केंद्रीय मंत्रिमंडळानं महत्त्वाचे इतरही अनेक निर्णय घेतले. चंद्रावरुन पृथ्वीवर परतण्याचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चांद्रयान-४ तसंच व्हिनस ऑर्बिटर अर्थात शुक्र कक्षा मोहिमेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रबी हंगामासाठी फॉस्पेट आणि पोटॅश खताकरता २४ हजार कोटी रुपये अनुदान, पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण योजना सुरू ठेवणं, ७९ हजार १५६ कोटी रुपयांचं पंतप्रधान आदिवासी उन्नत ग्राम अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली.
ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस् आणि गेमिंग संदर्भात एका राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला तसंच जैवतंत्रज्ञान संशोधन नवाचार आणि उद्योगविकास योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेचा आज शुभारंभ झाला. नवी दिल्ली इथं झालेल्या या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नागपूर जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग होता. नागपूरमधल्या बेलतरोडी इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी या सोहळ्याचं दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीनं ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांमध्ये सुमारे दीड हजार रुग्णालयांचा समावेश असणार आहे. वैद्यकीय शिक्षण संस्था, धर्मादाय रुग्णालयं, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि लोक सहभागातून ही आरोग्य शिबीरं घेतली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित या शिबीरांच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक ठिकाणी ४० लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्यांचं उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं छावणी भागात महिला आणि बालकांसाठी १०० खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात आलं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर तसंच मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात महिला आणि बारा वर्षापर��यंतच्या सर्व मुलांवर आधुनिक पद्धतीनं उपचार केले जातील, तसंच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवभोजन व्यवस्था करण्यात आल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं.
****
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धमकी देणारे भाजपा खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
स्वच्छता ही सेवा पंधरवड्याला आजपासून नवी मुंबईत सुरूवात करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं काल विविध चौपाट्यांवर, समुद्र किनारी विशेष स्वच्छता मोहीम राबवून ३६३ मेट्रिक टन तर नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांवरून एकूण सुमारे ५५० मेट्रिक टन निर्माल्य संकलित केलं. या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जाणार असून, महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये हे वापरण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या ४६ गणेश मूर्ती संकलन केंद्रावर एकूण २८ हजार ३२ मूर्ती संकलित करण्यात आल्या, यापैकी २४ हजार २८४ मूर्तींचं विसर्जित करण्यात आलं तर दान स्वरुपात स्वीकारलेल्या तीन हजार ७४८ मूर्ती, विविध १६ मूर्तीकारांकडे सोपवण्यात आल्या. मूर्ती तसंच सुमारे ३३ टन निर्माल्य दान करणाऱ्या भाविकांना महानगरपालिके मार्फत प्रमाणपत्र तसंच सेंद्रीय खत देण्यात आलं. सुमारे १० टन सेंद्रीय खताचं काल वितरण करण्यात आलं.
****
जालना शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समारोप झाला. सार्वजनिक गणेश मंडळाचे ४१३ तर सुमारे २४ हजारावर घरगुती गणेश मूर्तींचं इथे विसर्जन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात सुमारे २५ हजार गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेशमूर्तीचं विसर्जन आज सकाळपर्यंत तर पुण्यातलं गणपती विसर्जन आज दुपारपर्यंत सुरू होतं.
****
कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ २० सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज परभणी इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड जिल्ह्यात २५ महाविद्यालयांमध्ये या केंद्रांची स्थापना होणार आहे. युवकांनी या योजनेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या जवळच्या महाविद्यालयामध्ये उपस्थित राहावं, असं आवाहन कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
सोलापूर इथं येत्या २५ सप्टेंबर रोजी या योजनेचा वचनपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा व्यवस्थित मिळतील याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काळजीपूर्वक घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात नेवासे इथं उभारण्यात येणाऱ्या संत ज्ञानेश्वर सृष्टीचा प्रकल्प आराखडा आणि अहिल्यादेवी स्मारकाच्या जागेबाबत प्रस्ताव त्वरित सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. ते आज अहमदनगर इथं याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२४ या कालावधीत होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली होती. याचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी उद्या १९ सप्टेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयात स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या मेलवर आक्षेप नोंदवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 24 days
Text
Pune : व्यसनाधीनतेमुळे आयुष्य दिशाहीन होते - डॉ. शशिकांत दुधगावकर
एमपीसीन्यूज – व्यसनाधीनतेमुळे आयुष्यात कशाचाच ताळमेळ (Pune)लागत नाही. अंमली पदार्थ मेंदूवर सर्वात जास्त परिणाम करतात. यामुळे मेंदूची काम करण्याची पद्धत प्रभावी होत असून याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात होते. आयुष्य दिशाहीन होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी…
0 notes
kvksagroli · 8 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही डॉ. इंद्र मणी, सगरोळीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान, खाद्य महोत्सव व विविध उपक्रम पाहण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी… मातीतील सेंद्रिय घटक संपले आहे, परंतु यामध्ये बदल केल्यास पुन्हा आपली जमीन सदृढ बनवू शकतो यासाठी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच एकात्मिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन वनाम कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले. कृषी पूरक उद्योगांची कास धरावी यासाठी शासन विशेष प्रयत्न करीत आहे. कृषी विज्ञान केंद्राने उभे केलेले प्रात्यक्षिक प्रकल्प वाखाणण्याजोगे आहेत. येथील प्रत्येक कोपरा शिकण्यासारखा असून शेती शिवाय समृध्द राष्ट्र होणे शक्य नाही असेही ते म्हणाले. बदलते हवामान व बिघडते आरोग्य यासाठी शेती व आहारात बदल करणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वी सारखेच भरड धन्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळ इत्यादी पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करावी यासाठी बीजप्रक्रिया व खताचे नियोजन करावे असे डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरड धान्याचे आहारातील महत्व आणि सुधारित तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले. गणपत पवार यांनी भरडधान्य प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने प्रयत्न करावा असे आवाहन केले. जिल्ह्यातील उद्योजक महिला तथा बचत गटांनी खाद्य महोत्सवात सहभाग नोंदविल असून आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. नाबार्ड, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद, कृषी विज्ञान केंद्र व विद्यापीठाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी बचत गट व महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम केले, महिलांना स्वावलंबी बनविले अशा सर्व उद्योजक महिला व बचतगटांनी या खाद्य महोत्सवात सहभाग घेतला आहे. महोत्सवात शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, शेती अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, भूजल सर्वेक्षण, भरड धान्य व पदार्थ, विविध यंत्र इत्यादी पन्नासहून अधिक विविध कंपन्यांनी आपले स्टॉल उभारले असून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतीतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करण्यासाठी महाराष्ट्रातील नाविन्यपूर्ण कृषी प्रकल्प स्पर्धा-२०२४ आयोजन केले होते. या स्पर्धा मध्ये विद्यार्थ्याना प्रथम व द्वितीय पारितोषिक देण्यात आले #kvksagrolli #krushived2024 #climatechange #agriculture
0 notes
darshanpolicetime1 · 8 months
Text
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न
पुणे, दि. 16 : भारताला 2047 पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनविण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरित झालेली येथील बुद्धीवान युवा पिढी पुन्हा भारताकडे स्थलांतर करील, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला. चऱ्होली बु. येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात राज्यपाल श्री. बैस बोलत होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
इथे बघा आरोग्य विद्यापीठा भरती प्रक्रिया लेखी परीक्षेचा निकाल.....
इथे बघा आरोग्य विद्यापीठा भरती प्रक्रिया लेखी परीक्षेचा निकाल…..
नाशिक: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवरील गट-ब, गट-क व गट-ड संवर्गातील शिक्षकेतर पदांकरीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला आहे. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या आस्थापनेवर रिक्त शिक्षकेतर पदांकरीता नुकत्याच घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला असून तो…
View On WordPress
0 notes