#विद्यापीठाचा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 01 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
रेल्वे तिकिटांचं आरक्षण आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस आधी करता येणार आहे. भारतीय रेल्वे विभागानं आजपासून, म्हणजेच १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू केला आहे. काल ३१ ऑक्टोबरपर्यंत आरक्षित केलेल्या तिकिटांमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात येणार नाही. विदेशी पर्यटकांना रेल्वे तिकिटं ३६५ दिवस आधी, अर्थात १ वर्ष आधी आरक्षित करावी लागतात. यातही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. या नवीन आरक्षण प्रणालीमुळे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आणि संग्रह कमी होईल, प्रवाशांसाठी अधिक तिकिटं उपलब्ध राहतील आणि तिकिटं रद्द होण्याचं प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असं रेल्वे विभागानं म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार, पद्मश्री विवेक देबरॉय यांचं आज सकाळी निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर, देबरॉय यांनी सप्टेंबर महिन्यात कुलपतीपदाचा राजीनामा दिला होत���.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देबरॉय यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘देबरॉय हे ज्ञानी व्यक्तिमत्व होतं. अर्थकारण, इतिहास, संस्कृती, अध्यात्म अशा विविध विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून देशाची ध्येयधोरणं ठरवण्यात ते पारंगत होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांचा आज स्थापना दिन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चारही राज्यातल्या नागरिकांना सामाजिक माध्यमांवरील संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
****
१९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज ६२ रुपयांची वाढ झाली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. विमानाचं इंधन, म्हणजेच ATF च्या किमतीत ३ हजार रुपये प्रति किलो याप्रमाणे वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ किंवा कपात झालेली नाही.
****
शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतले माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी, आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून कदापि माघार घेणार नाही, असं आज पुन्हा म्हटलं आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून, भारतीय जनता पक्षानं त्यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भात वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही, असं सरवणकर यांनी सांगितलं.
****
शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते व्यवस्थित वाळवावं, त्यातलं आर्द्रतेचं प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची, तसंच ते सोयाबीन एफ-ए-क्यू दर्जाचं असल्याची खात्री करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने केलं आहे. विक्रीकरिता आणलेलं सोयाबीन जास्त आर्द्रतेमुळे परत नेण्याची वेळ येऊ नये, यासाठी सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आर्द्रता तपासावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती आणि अधिमान्यता परिषद-नॅकच्या वतीनं काल अपेक्षित गुणनिकष पूर्ण केल्याबद्दल 'ए-प्लस' मानांकन जाहीर करण्यात आलं आहे. मराठवाड्यात बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन विद्यापीठ पुढे जात असून, आगामी काळात देखील विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करू अशी भावना, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी व्यक्त केली आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जात आहे. सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत न्युझीलंडच्या तीन बाद १२५ धावा झाल्या आहेत. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवामान कोरडं राहील, असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळी, तर सांगलीत आज सकाळी जोरदार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि पलूस तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी आज सकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे.
****
0 notes
Text
Pune : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
एमपीसी न्यूज – संशोधन चलित शिक्षण, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि शैक्षणिक (Pune)बाबींसाठी उद्योगांसमवेत सहयोग या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बाबी लागू करण्याचा सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काढले. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष…
0 notes
Text
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा १२३ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न
पुणे दि.१७- गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादी�� नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी समुदाय आणि एक समृद्ध राष्ट्रनिर्मितीची किल्ली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२३ व्या पदवीप्रदान समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु…
View On WordPress
0 notes
Text
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ
https://bharatlive.news/?p=107236 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त समारंभ
अमरावती ...
0 notes
Text
स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल – पालकमंत्री मुनगंटीवार
स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. २३ : आशिया खंडातील महिलांचे एकमेव विद्यापीठ असलेले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे (एस.एन.डी.टी.) उपकेंद्र विसापूर (ता.बल्लारपूर) येथे साकारण्यात येत आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासोबतच जिल्ह्यातील महिला रोजगाराभिमुख होतील. त्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग आणि स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार एस.एन.डी.टी विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण…
View On WordPress
0 notes
Text
43 अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर
43 अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर
नवी दिल्ली: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) या वर्षी देशभरात नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये स्थापन करण्यासाठी किमान 43 प्रस्ताव मंजूर केले आहेत, ज्यात पुद्दुचेरी येथील एका केंद्रीय विद्यापीठाचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. गेल्या वर्षी, BVR रेड्डी समितीने – अभियांत्रिकी शिक्षणाची दुरुस्ती करण्याचे मार्ग शोधण्यासाठी तांत्रिक शिक्षण नियामकाने स्थापन केले होते – 2024…
View On WordPress
0 notes
Text
महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील : कुलगुरु माधुरी कानिटकर
महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील : कुलगुरु माधुरी कानिटकर
नाशिक: आरोग्यशास्त्र महाविद्यालयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी विद्यापीठाच्या वर्धापन दिन समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 24 वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर समवेत…
View On WordPress
0 notes
Text
'माझे फ्लाइट सुटले, लवकर पैसे हवे' असे सांगून १०० हून अधिक प्रवाशांची फसवणूक...
‘माझे फ्लाइट सुटले, लवकर पैसे हवे’ असे सांगून १०० हून अधिक प्रवाशांची फसवणूक…
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर, पोलिसांनी आंध्र प्र��ेशातील एका नामांकित विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे भासवून विमान हरवण्याच्या बहाण्याने प्रवासासाठी लोकांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीला अटक केली. व्ही दिनेश कुमार असे त्याचे नाव असून तो आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या चार ते पाच वर्षात त्यांनी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध - पंतप्रधानांचं प्रतिपादन
देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला उद्यापासून प्रारंभ-गांधी जयंतीला समारोप
मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर योजनांबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा आरोप
उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-दहा दिवसीय गणेशोत्सवाचीही उद्या सांगता
आणि
आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर मात करत भारत अंतिम फेरीत दाखल
****
ग्रीन फ्युचर आणि नेट झीरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांच्या आधारावर देशाचं भविष्य घडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं, त्यांनी सांगितलं. पीएम सूर्यघर योजनेच्या यशाबद्दल कौतुक करत, योजनेमुळे भविष्यात देशातलं प्रत्येक घर ऊर्जा निर्मिती केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २१ व्या शतकाच्या इतिहासात भारताच्या सौर क्रांतीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यातल्या तीन वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद, पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या गाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमात सहभागी झाले. कोल्हापूर स्थानकावर यावेळी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते. कोल्हापूर-पुणे वन्दे भारत एक्स्प्रेसच्या शुभारंभाच्या या गाडीतून प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मिरज स्थानकापर्यंत मोफत प्रवास, अल्पोपहार आणि टोप्या रेल्वेकडून देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आठव्या ‘भारत जल सप्ताहा’ला उद्यापासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या नवी दिल्लीत भारत मंडपम इथे या सप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात चाळीस देशांतल्या दोनशे प्रतिनिधींसह सुमारे चार हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात, जलक्षेत्रात काम करणारे शंभरहून अधिक स्टार्टअप्स आपापल्या संकल्पना मांडतील.
****
देशभरात उद्यापासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरूवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर, जलाशय, प्राणीसंग्रहालयं, अभयारण्यं आणि सार्वजनिक स्वच्छतागृहं यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत.
मराठवाड्यातही बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून, उद्या सगळ्या गावांमधून शुभारंभ करुन स्वच्छता प्रतिज्ञा घेतली जाणार आहे, नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी ही माहिती दिली.
****
मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी राज्य सरकारनं एक वर्षापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या वर्षी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासकामांच्या शंभरहून अधिक घोषणा करण्यात आल्या मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
****
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथे झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. जनसामान्यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास वृद्धिंगत करण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचं मत, न्यायमूर्ती खन्ना यांनी व्यक्त केलं. या समारंभात एकशे तेरा स्नातकांना विधी पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांचं तर सुवर्णपदक विजेत्यांना सुवर्णपदकांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
****
दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांनाही चित्रपटांचा आनंद घेता यावा, यासाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये आता अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. या निमित्त मराठवाड्यातला मुख्य ध्वजारोहण समारंभ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथल्या सिध्दार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणीही करणार आहेत.
परभणी इथं राजगोपालाचारी उद्यानात पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे.
****
दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची उद्या, अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गणेश विसर्जनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आठ विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह सात कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. या सगळ्या ठिकाणी आरोग्य पथकांसह महापलिकेचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी मूर्ती दानाचा उपक्रम महापालिका राबवणार असून, यासाठी शहरात ४६ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत.
कचरा प्रक्रिया केंद्रावर निर्माल्य दान करणाऱ्यां नागरिकांना अर्धा किलो खताचं पाकीट भेट म्हणून दिलं जाणार असल्याचं महापालिकेनं कळवलं आहे.
नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. शहरात सव्वीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रं उभारण्यात आली आहेत.
जालना इथंही महापालिका प्रशासनासह पोलीस प्रशासनानं आवश्यक नियोजन केलं आहे. घरगुती गणेश मूर्तींचं पर्यावरण पूरक विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रिम हौद तयार कण्यात आला आहे, तर सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात आज चारशे दहा गणेश मूर्तींचे विसर्जन झालं, तर उद्या अनंत चतुर्दशीला सुमारे ��क हजार गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यात ईद-ए-मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं १९ सप्टेंबर रोजी तर परंडा इथं परवा १८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे.
****
चीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज उपान्त्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला चार एकनं पराभूत केलं. या विजयासोबतच भारतीय संघ या स्पर��धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. कर्णधार हरमनप्रितसिंहने दोन, तर जर्मनप्रितसिंह आणि उत्तमसिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. उद्या भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे.
****
लातूर जिल्ह्यात उद्या ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. झाड लावल्यानंतर त्या झाडासोबतचं आपलं छायाचित्र merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
Text
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न
पुणे, दि. 16 : भारताला 2047 पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनविण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरित झालेली येथील बुद्धीवान युवा पिढी पुन्हा भारताकडे स्थलांतर करील, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला. चऱ्होली बु. येथील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या आठव्या पदवीदान समारंभात राज्यपाल श्री. बैस बोलत होते.…
View On WordPress
0 notes
Text
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा १७ वी दीक्षांत सोहळा आज ; असे आहे यंदाच्या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा १७ वी दीक्षांत सोहळा आज ; असे आहे यंदाच्या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा १७ वी दीक्षांत सोहळा आज ; असे आहे यंदाच्या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. १७ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठ आवारात होत आहे. तब्बल पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना पदवी प्रदान होणार . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असून, त्यांची या सोहळ्याला ऑनलाईन…
View On WordPress
#“आज#१७#असे#आहे#खास#चव्हाण#दीक्षांत#बातम्या#महाराष्ट्र#मुक्त#यंदाच्या#यशवंतराव#विद्यापीठाचा#वी#वैशिष्ट्य#सोहळा#सोहळ्याचे
0 notes
Text
जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र
जूनपासून बल्लारपूर येथे सुरू होणार एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र
मुंबई, दि. 1 : महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात एसएनडीटी विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक का��्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून येथे रोजगारभिमुख आणि कौशल्याधारित…
View On WordPress
0 notes
Text
युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
युवकांचा निवडणूक प्रक्रियेतील टक्का वाढण्याची गरज – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
‘लोकशाही मूल्यांची रुजवण’ कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम पुणे, दि.५ : आज लोकसंख्येत १८ ते १९ वयातील युवा साडेतीन टक्के असले तरी प्रत्यक्ष मतदार यादीमध्ये मात्र केवळ एक टक्का युवक नोंदणी आहे. त्यामुळे पुढील काळात युवकांचा मतदार यादीतील टक्का वाढविण्याबरोबर त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्ये रुजविण्याच्यादृष्टीने…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच��या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
Text
मोठी बातमी... महाविद्यालयीन तासिका 1 ऑक्टोबरपासून; डॉ.बा.आ.म. विद्यापीठाचा निर्णय. https://beed24.in/college-periods-from-october-1-dr-b-a-m-university-decision/
0 notes
Text
स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल – पालकमंत्री मुनगंटीवार
स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल – पालकमंत्री मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. २३ : आशिया खंडातील महिलांचे एकमेव विद्यापीठ असलेले श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे (एस.एन.डी.टी.) उपकेंद्र विसापूर (ता.बल्लारपूर) येथे साकारण्यात येत आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासोबतच जिल्ह्यातील महिला रोजगाराभिमुख होतील. त्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग आणि स्थानिक उद्योगांच्या आवश्यकतेनुसार एस.एन.डी.टी विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण…
View On WordPress
0 notes