#वाटला
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : १७
मित्रांबरोबर शुक्रवारची सकाळची चहा, खाणं आणि गप्पांची मैफिल संपवून अनंत घरीं परतला तो एक आवडतं जुनं गाणं गुणगुणतच! 'आपण पक्के बेसुरे आहोंत' याची पुरेपूर जाणीव असल्याने तो कधी तोंड उघडून गायच्या वगैरे फंदात पडत नसे. तथापि जुन्या, लोकप्रिय गाण्यांची मनापासून आवड असल्याने खुशीत असला की एखादं आवडीचं गाणं हलकेच गुणगुणायची त्याची संवय शुभदाला माहीत असल्याने 'आज काय खुशीचं कारण?' या विचाराने तिचंही कुतूहल जागृत झालं! त्यांतच अनंतने येतांना आणलेलं नेहमींपेक्षा मोठं पार्सल तिच्या हातांत देतांना "आधी मी काय-काय आणलं आहे ते बघ आणि मग जोडीला काही लागेल ते बनव!" असं सांगितल्याने ती चकीतच झाली. कपडे बदलण्यासाठी बेडरूममधे जाणा-या अनंतकडे कौतुकाने हंसून बघत ती स्वतःशीच पुटपुटली, "आज एवढं खुश व्हायला काय झालं आहे, कुणास ठाऊक!"
रोजच्याप्रमाणे दुपारी एक वाजेपर्यंत अनंतने स्नान करून देवपूजा वगैरे नित्यक्रम उरकले आणि डायनिंग टेबलापाशी येऊन बसत तो म्हणाला, "मला आज संध्याकाळीं ५ वाजतां आमच्या ग्रुपच्या मनोहर भोसलेंबरोबर बाहेर जायचं आहे!" "अरे, वा! आज संध्याकाळीं तुमच्या 'खाबु ग्रुप'ची पुन: बैठक आहे वाटतं? म्हणून कां स्वारी एवढी खुश आहे?" शुभदाने केलेली चेष्टा ��क्षांत न येऊन अनंत म्हणाला, "अग, सकाळी झाली की आमच्या ग्रुपची बैठक! आज संध्याकाळी फक्त मी आणि भोसले दोघेच जाणार आहोंत! तुला आठवतंय् कां, मध्यंतरी भोसलेंनी आपल्याला काय ऑफर दिली होती?" ही प्रस्तावना म्हणजे कुठल्यातरी खोड्यांत स्वत:ला अडकवण्याची नांदी असल्याचा दाट संशय येऊन शुभदा सावधपणे म्हणाली, " तुमच्या 'खाबु ग्रुप'मधील मित्रांच्या ऑफर्स ना, तुमचा रिकामा वेळ जाण्यासाठी, तुमच्यापुरत्या असतात! मला माझी नेहमींची भरपूर कामं आहेत, दुसर्या कुठल्या फंदात पडण्यापेक्षा! रिटायर झाल्यापासून तुम्हांला आराम आहे, पण माझी कुठली कामं कमी झाली आहेत ते सांगा!" आपल्याच नादांत अनंत पुढे सांगू लागला,"बरं शुभदा, माझा रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी समज! मनोहर भोसलेंना सामाजिक कार्यामधे रस आहे;-- म्हणून मी त्यांना कांही समाजकार्य माझ्यासाठी सुचवा असं सांगितलं होतं! त्या संदर्भात त्यांनी आज मला एका लहान मुलांच्या अनाथाश्रमाबद्दल सुचवलं आहे---' "म्हणजे?"
"लोहगांव परिसरात, एअरपोर्टच्या जवळ लहान मुलांचा हाॅस्पिटलवजा अनाथाश्रम आहे. तिथे विशेषत: अपंग लहान मुलांवर, नाममात्र दरांत वा कधी मोफतही उपचार केले जातात. एका ट्स्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या या 'स्वयंसिद्ध' नामक अनाथाश्रमाला थोडीफार सरकारी मदत मिळते;-- पण बव्हंशी याचा कारभार लोकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो. 'त्यांचे हिशोब तपासण्याचं काम कराल कां' असं मला भोसलेंनी विचारलं आहे! तुला काय वाटतं?" "मला विचारताय् म्हणजे हे काम विनामोबदला असणार ना?" शुभदाने खडा टाकला. "तसंच कांही नाहीं! मी विनामोबदला नाही म्हटलं, तर 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून नाममात्र मोबदला देईलही ट्रस्ट!" म्हणत 'नरो वा, कुंजरो वा' थाटात अनंतने आपलं घोडं पुढे दामटलं. "चांगल्या कामाला हातभार लागणार असेल तर एकतर पूर्णत: विनामूल्य करा नाहीतर पूर्णत: योग्य मोबदला घ्या असं मला वाटतं! दिखाव्यापुरता नाममात्र मोबदला नको!" "कसं माझ्या मनातलं बोललीस! अजून मी भोसलेंना कांहीच शब्द दिलेला नाहीं. 'आधी अनाथाश्रम तर बघावा' म्हणून मी त्यांच्याबरोबर आज संध्याकाळी जाणार आहे. एकदां ट्रस्टचं प्रत्यक्ष कामकाज बघितलं, विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींशी बोललो की एकुण कसं-काय चाललं आहे त्याची कल्पना येईल! सगळा कारभार पारदर्शी आणि चोख वाटला तरच मी हो म्हणेन!" "तुुमचे ते मनोहर भोसले काय काम करतात अनाथाश्रमा��ाठी?" "ते ट्रस्टसाठी जमेल तशा देणग्या गोळा करतात! यंदा दिवाळीपर्यंत त्यांनी सुमारे पंधरा लाख गोळा केल्याचं म्हणाले! त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत गाजावाजा न करतां काम करीत राहणारे! बरं, आज तूंही येशील कां आमच्यासोबत? " नको, --आज तुम्ही एकटेच जा! एकदा तुम्ही अनाथाश्रमाचं काम अंगावर घेतलंत, तर मग माझंही येणं होईलच! बघुंया, जमेल तशी मदत मीही करीन!"
३ नोव्हेंबर २०२२
0 notes
Text
18. ‘सत’ आणि ‘असत’
श्रीकृष्ण म्हणतात, सत कधी (सत्य/कायम) संपत नाही आणि असत (असत्य/क्षणिक) अस्तित्वातच नसते. या दोन्ही मधला फरक ओळखू शकतो तो ज्ञानी असतो (2.16).
सत आणि असत यांच्यातील फरक दाखवून देण्यासाठी अनेक संस्कृतींमध्ये दोरी आणि साप यांचे उदाहरण देण्यात येते. एक मनुष्य सायंकाळी आपल्या घरी परतला आणि प्रवेशद्वारापाशी त्याला एक साप गुंडाळी करून बसलेला दिसला. प्रत्यक्षात त्याच्या मुलांनी खेळता खेळता सोडून दिलेली ती एक दोरी होती मात्र, सायंकाळच्या अंधुक प्रकाशात त्याला तो साप वाटला. येथे दोरी हे सतचे तर साप हे असतचे प्रतिक आहे. जोपर्यंत तो सत, उदाहरणार्थ दोरी, काय आहे हे जाणून घेत नाही, तोपर्यंत तो असतला- येथे काल्पनिक साप- कसे हाताळावे याचाच विचार आणि कृती करत राहील. तो त्याला काठीने मारेल, पळून जाईल किंवा खरे काय हे जाणून घेण्यासाठी तो विजेरीच्या प्रकाशाचा झोत त्यावर टाकेल. आपले आकलन जेव्हा असत असते तेव्हा उत्तमातील उत्तम योजना आणि कौशल्ये वाया जातात. असतचा जन्म सतमधूनच होतो, जसे दोरीशिवाय साप अस्तित्वात असूच शकत नाही. सतमुळेच असतचे अस्तित्व असल्याने, ते आपल्याला दु:स्वप्नासारखे भासू शकते आणि त्यामुळे आपल्या शरीराला झोपेत घाम फुटावा तसे होऊ शकते.
असतचा शोध घेण्यासाठी श्रीकृष्णानेच एक कसोटी घालून दिली आहे. ती अशी की, असत हे भूतकाळात अस्तित्वात नव्हते आणि भविष्यात ते असणार नाही. भौतिक सुखांचे उदाहरण घेऊ���ा. ती पूर्वी अस्तित्वात नव्हती आणि भविष्यातही राहणार नाहीत. तेच दु:खाचे किंवा सर्वच द्वंद्वांचे आहे. यातून सूचित हे होते की असत हे काळावर अवलंबून असते तर सत हे शाश्वत आहे.
सत हा अंतरात्मा आहे, जो शाश्वत आहे आणि अहंकार हे असत आहे जे अंतरात्म्याच्या आधाराने टिकून असते. ज्या दिवशी आपण आपल्या अंतरात्म्याला (दोरी) ओळखू शकू, त्यादिवशी अहंकार (साप) आपोआप नाश पावेल.
0 notes
Text
Pradip: मला तुझी आठवण आली कि,
मी तुझा फोटो बघतो.
मुलगी: अय्या, आणि माझा आवाज
ऐकावासा वाटला तर तू काय करतोस?
Pradip: शेजारच्या कुत्रीला दगड मारतो.
0 notes
Text
नुकतंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या श्री शारदा मंदिर प्राथमिक शाळेमध्ये ६६ व्या बालक सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात बक्षीस वितरण करताना तेथील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली. छ. संभाजीनगरमधील सर्वात जुन्या शिक्षण संस्थेने अद्यापही मराठी माध्यम टिकवून ठेवले आहे, हे विशेष. साधी, सोपी शाळा... मुलांच्या सर्वांग��ण विकासावर भर देणारी... इथे रांगोळी स्पर्धेत मुलांनीही बक्षिसे मिळवली. सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुलींनीच केलेलं...! मातृभाषेतून संवाद, लिखाण, बक्षीस वितरण... धमाल अनुभव.. त्या पालकांचंही मनोमन कौतुक वाटलं, ज्यांनी आपल्या पाल्यांना इथे शाळेत घातलंय. मार्कांपेक्षाही मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास त्यांना जास्त गरजेचा वाटला.
मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा टोपे मॅडम, शिक्षकवृंद व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार!
Contact us for more- 8087382763
https://careercounselingonline.in/
Akshar Handwriting Analysis, Sambhaji Nagar (Aurangabad), Maharashtra-431001
#akshar#children#counseling#aptitude#career#education#handwriting#fingerprinting#session#school#parenting#stateboard#icse board#cbseboard#aurangabad#maharashtra#marathwada#rightcareeratrighttime#expert says#sambhajinagar#counselingcentre
1 note
·
View note
Photo
I ❤️ Fish le... कोकणी माणूस 😋 तुमका काय वाटला फराळाचो फोटो हा😁😁 . ✍️@dajitales 🚩™️ @mechakarmani . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #fishtherapy #malvanicusine #pomfretfry #fishmarket #konkanfoodie #malvanimasala #foodlover #lovefood #fishlover #malvanifood #dajitales #foodlifestyle #agri #pomfretfish #koli #gabit #india_gram #foodgasm #kokanifishcurry #fishcurry #foodie #seafish #fishfryfriday #malavanimasale #fryrice #fry #curry #foodcoma ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा @mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Harnai Dapoli Beach) https://www.instagram.com/p/CpOyeV9I6jE/?igshid=NGJjMDIxMWI=
#me_chakarmani#fishtherapy#malvanicusine#pomfretfry#fishmarket#konkanfoodie#malvanimasala#foodlover#lovefood#fishlover#malvanifood#dajitales#foodlifestyle#agri#pomfretfish#koli#gabit#india_gram#foodgasm#kokanifishcurry#fishcurry#foodie#seafish#fishfryfriday#malavanimasale#fryrice#fry#curry#foodcoma
0 notes
Text
शेतकऱ्याला भाव मिळाला नाही , 200 क्विंटल कांदा मोफत वाटला
शेतकऱ्याला भाव मिळाला नाही , 200 क्विंटल कांदा मोफत वाटला
शेतकऱ्याला भाव मिळाला नाही , 200 क्विंटल कांदा मोफत वाटला शेतकऱ्याला राजा म्हणतात ह्याचे प्रत्यय आज पाहायला मिळाले ब���लढाण्यात एका शेतकऱ्याने आपल्या उदारतेचा परिचय दिले आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेगावच्या गणेश पिं��ळे नावाच्या शेतकऱ्याने हतबल होऊन आपला 200 क्विंटल कांदा अक्षरश: लोकांना फुकट वाटला. लोकांनी देखील मोफतचा कांदा घेण्यासाठी गर्दी केली…
View On WordPress
0 notes
Text
का ..माहित अगदीच !
नुसतेच आज बोलता बोलता का, माहित तुझ्याच नावाचा उपचार कुठेतरी झाला आणि अलगद मान तिथं वळली पण विषय कुठला भलताच दुसरा तरी होता..
का माहित... बोलताना subject तुझा वाटला होता, पण title माझे होते आणि तरी ही topic आपला तयार झाला...
ह्मम.... जसे दुसऱ्या गोष्टीवर आपले title असावे तसे....
1 note
·
View note
Text
ll वानप्रस्थ ll : १०
अनंत,शुभदा आणि सावंतसाहेब यांची भेट जवळजवळ २ तास रंगली! अनंतकडे गुंतवणूकीसाठी लौकरच उपलब्ध होणारी रक्कम लक्षांत घेऊन सावंतसाहेबांनी केवळ विविध पर्याय सुचवले नाहींत तर प्रत्येक पर्यायातले फायदे आणि धोकेही विस्ताराने समजावले! "व्यक्तीशः तुुमची अंतिम शिफारस काय आहे?" असा प्रश्न अनंतने उपस्थित केल्यावर ते स्मित करीत उत्तरले: "मी शेवटी एक व्यावसायिक एजंट आहे! गुंतवणुकीच्या कुठल्याही प्रकारावर मला ठरलेल्या दरानं कमिशन मिळतं! त्यामुळे मी मला जास्त कमिशन देणाऱ्या पर्यायांचा उदोउदो करणार हे गृहीत धरलं जातं! म्हणूनच आर्थिक सल्लागार या नात्यानं मी कुठलीही वैयक्तिक शिफारस करीत नाही!" आपल्या उत्तरानं अनंत गोंधळल्याचं जाणवून त्यांनी अधिक खुलासा केला, "प्रत्यक्षांत रक्कम गुंतवण्यापूर्वी हाती असलेल्या वेळांत मी सुचवलेल्या विविध पर्यायांचा सारासार विचार करा आणि तुम्हांला अपेक्षित असलेल्या मासिक उत्पन्नानुसार योग्य पर्याय निवडा! 'दिसणारा फायदा जेवढा अधिक तेवढा त्या गुंतवणुकीत धोका जास्त' हे कायम ध्यानांत ठेवा! एवढंच नव्हे तर तुमचे कांही निवृत्त झालेले मित्र आणि आप्तेष्ट असतील त्यांचे अनुभवसुद्धां विचारांत घ्या असं मी सुचवीन!" "ठीक आहे, सावंतसाहेब! प्रत्यक्ष रक्कम हातीं येईपर्यंत तुमच्या सर्व ञसुचना लक्षांत ठेवून आम्ही योग्य वाटेल तो निर्णय ठरवूं आणि पुन: तुम्हांला भेंटूं!" असं म्हणून अनंतने त्यांचा साभार निरोप घेतला!
रस्त्याला लागल्यावर मनगटावरील घड्याळात वेळ बघून अनंतने शुभदाला विचारलं, "एक वाजून गेला आहे! आतां घरी जाऊन तू स्वयंपाक करण्यापेक्षा जवळच एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमधे पोटपूजा करुंया कां?" "हो,चालेल!" म्हणत शुभदानं सहमती दर्शवली. वर्दळीचा भाग असल्याने चांगलं रेस्टॉरंटही चटकन् द्रष्टिक्षेपात आलं. एका बाजूचं निवांत टेबल निवडून स्थानापन्न होत अनंत म्हणाला, "शुभदा, मला खुप बरं वाटलं इतक्या मोकळेपणानं तूं मनातल्या सर्व शंका सावंतसाहेबांना विचारल्याबद्दल!" "ते सगळं इतकं छान आणि ��विस्तर सांगत होते की माझाही धीर चेपला! त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांचं निरसन किती व्यवस्थित केलं ना!" शुभदा कौतुकानं उद्गारली. "त्यांचा व्यवसायच असा आहे की सर्व शंका फिटल्याखेरीज कुणी त्यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणारच नाही! 'संपूर्ण शंकानिरसन' हा त्यांच्या व्यवसायाचा पायाच आहे!" "तुमची आणि सावंतसाहेबांची ओळख कशी काय झाली?" शुभदानं कुतूहलानं विचारलं "तूं टवाळी करतेस त्या आमच्या 'खाबू ग्रुुप'च्या रवींद्र पाध्यांनी मी सहज गुंतवणुकीविषयक चौकशी करीत होतो, तेव्हां सावंतसाहेबांचं नांव केवळ सुचवलं नाहीं, तर आमचा परिचयही करून दिला!" तिला खिजवीत अनंत सांगू लागला,"पहिल्या भेटीतच माणूस जाणकार आणि विश्वासार्ह वाटला म्हणून मग आणखी दोन वेळां भेटून थोडी जास्त माहिती विचारली!" "ओह्,म्हणजे तुमच्या 'खाबू ग्रुप'वर अशा उपयुक्त गप्पाही होतात म्हणायच्या तर!" चेष्टेची संधी शुभदानंही सोडली नाही. "तुला खोटं वाटेल शुभदा, पण गप्पांच्या ओघांत सहज जिव्हाळ्याचे विषय निघतात आणि उपयुक्त माहिती कानांवर पडते!आमच्या नग्रुपवरील दोघांनी ऐंशी पार केली आहे;- पण कशी ठणठणीत प्रकृती आहे दोघांचीही! त्यांच्या बोलण्यांत प्रकृती उत्तम राखण्याच्या घरेलु टिप्स हमेशा येतात!" "पण तुम्ही त्या कधी अंमलात आणतांना तर दिसत नाहीं?" "प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, शुभदा! आतां नोकरीनिमित्त होणारे श्रम कमी झाल्यावर, वाढत्या उतारवयात आहार आणि वागण्यांत योग्य ते बदल करावेच लागतील! त्याबाबत येत्या शुक्रवारी दोघां ऐंशीबहाद्दरांचाच सल्ला विचारणार आहे!"
१५ सप्टेंबर २०२२
0 notes
Text
कट्टा ..
परवा बऱ्याच दिवसांनी कट्ट्याला भेटलो.. जरा थकलेला वाटला ..म्हणून चार शब्द बोललो.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या .. पाऊस पाणी विचारलं त्याने चौकशी केल्यावर मग मात्र थबकलो ..
आहेत का आठवणी ?? खूप आहेत .. आठवणीतच राहत नाही ना?? नाही नाही..निवांत आहे .. सगळे भेटतो ..मस्त आहे
फक्त आजकाल जरा अघळपघळ चालत नाही.. जबाबदाऱ्या वाढल्यात त्यामुळे वेळ पाळावी लागते.. आधीसारखा कधीही तुझी आठवण आली कि भेटायचं असं होत नाही .. सुदैवाने वेळ पाळणारेच झालोय आम्ही.. तुझ्या आशीर्वादाने वेळ साधणारे नाही झालो..
आधी तुला secrets सांगायचो ..तेव्हा तू ऐकून घ्यायचास आणि खांद्यावर हात ठेवून हसायचास .. आता पण आमची ती सवय टिकून आहे . फक्त त्या secrets ला आम्ही आमचे judgments लावतो .. आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते लोकांच्या जिव्हारी लावतो..
न पटणाऱ्या गोष्टींचा बागुलबुवा नव्हता आधी.. आता मात्र आम्ही पटल्या तरच गोष्टी करतो..
आधी एकमेकांची गाऱ्हाणी तोंडावर ऐकलेत आम्ही . आता मात्र हे ओझं आम्ही एकमेकांच्या पाठीवर लादतो .. आणि आज काल आमच्या पाठी पण खूप ताठ आणि कडक झाल्यात.. त्यामुळे ती गाऱ्हाणी अजिबात आत झिरपत नाहीत .. कशाला नसते ताप..
आधी आमचे दीडदमडीचे problems आम्ही तुला सांगायचो ..पण आजकाल आम्ही सगळे बच्चन झालोय.. मनात ठेवतो . अपेक्षा करतो.. कुढतो.. आणि मग आपली दुखरी नस आपल्या ego खाली दाबतो मस्त ..
तुझ्याब��ोबर असताना आम्ही आमचे marks पण कधी compare नाही केले.. पण आजकाल आम्ही आमचे problems मात्र नक्कीच compare करतो
पण तुझ्यामुळे आतली वीण अजून तरी घट्ट आहे असा वाटतंय .. स्वतःच्या मस्त घरात राहून त्याचा EMI देताना तुझ्या शेजारी बसून खाल्लेल्या पेप्सी कोला चं अप्रूप अजून टिकून आहे .. Bistro आणि spice kitchen मध्ये बसलेलो असताना पण ५० रुपयांमध्ये ७ भेळ यायच्या हा हिशोब आतून हसवत असतो..
आमचे judgements आमच्या आतल्या ओलाव्यापेक्षा मोठे झालेत थोडे.. बघू.. निघू का ? परत जायचंय ..
ठीक आहे म्हणाला तो.. पण एवढं सगळं सांगून सुद्धा परत detached वाटला तो . म्हणाला , मी पण गेली ७० वर्षे आहे इथे .. गावातल्या बाकीच्या कट्ट्याच्या पण गोष्टी कळतात ..माहित असतात गोष्टी.. काळजी घ्या..
1 note
·
View note
Text
ह्या ३ स्टेजेस मध्ये अभ्यास केल्याने त्यांच्या concepts क्लिअर होतात
हॅलो , अनेक दिवस झाले पोस्ट करायची होती. एक शिक्षक आणि counselor असल्यामुळे समाजात जे घडत आहे ते मनाला चटका लावून जाते. त्याबद्दल थोडेसे आपल्या viewers साठी. अभ्यास आणि मुलं हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा. कारण प्रत्येक घरात त्यावरून वाद आणि संवाद होतच असतात. पण आपण एक पालक म्हणून एक गोष्ट समजून घायला हवी की प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि म्हणूनच त्याच्याशी डील करायची पद्धत पण वेगळीच असणार. एक counselor म्हणून जेव्हा विविध मुलांना भेटते तेव्हा एक गोष्ट जाणवते कि दर वेळी मुलांची चूक नसते आणि पालकांची हि नसते. चूक हि अभ्यास पद्धतीत असते. काही मुले खूप अभ्यास करतात पण मार्क मिळत नाहीत.अभ्यास करणं जितक महत्वाचं तितकाच तो योग्य पद्धतीने करणं पण महत्वाचं . ह्यामुळे knowledge आणि मार्क यांची सांगड घालता येईल. अभ्यास हा ३ स्टेजेस मध्ये करावा: १) reading २) learning ३) writing without seeing
ह्या ३ स्टेजेस मध्ये अभ्यास केल्याने त्यांच्या concepts क्लिअर होतात. आणि कायम स्वरूपी ते त्यांच्या लक्षात राहते. पालकांनी मुलांबरोबर बसून अभ्यासाचे schedule वरच्या ३ stages लक्षात घेऊन करावे. ८वी ते १०वी मधील मुलांनी केवळ होमवर्क सोडून सेल्फ स्टडी २ तास व्हावा ह्यावर भर द्यावा. मुलं बऱ्याचदा अभ्यास आणि होमवर्क (एका वहीतून दुसऱ्या वहीत उतरवणे ) ह्याला अभ्यास म्हणतात. त्यामुळे अभ्यास पद्धतीत चूक होते. आपण ९th CBSE च्या मुलाचे उदाहरण घेऊया. (See the image)
अश्या प्रकारे ह्या ३ स्टेजेस कव्हर झाल्या कि अभ्यास, मुलं आणि पालक सगळेच खुश राहतात. ह्या आणि अश्या काही टिप्स आणि अनुभव ऐकायला आवडतील का ? हा लेख कसा वाटला ते comment मध्ये नक्की लिहा. पुढच्यावेळी नवीन विषय घेऊन परत भेटूया ना ? नक्की सांगा.
2 notes
·
View notes
Text
तुझ्याशिवाय......
वाट पाहत होतो रात्रभर सूर्य डोळे उघडायची....
सकाळ होताच परत सारखं सारखं तुला पाहायची.....
गाडीचा आरसा मुद्दामून सारखं set करू वाटला...
मन फक्त तुझा प्रेमात धुक होऊन दाटला....
इच्छा होती मंदिरात दोन पावलं तुजसोबत चालायची....
माझी तुझी भेट झाली म्हणून धन्यवाद त्याला द्यायची.....
फोटो काढताना वाटल.. तुझी प्रत्येक अदा photo मध्ये टिपायची....
पण फोटो पेक्षा डोळ्यातच तुझी आठवण ठेवायची.....
दिवसभर तुला फक्त चोरून चोरून पहायचं होत....
तुझ्या प्रत्येक हसण्यावर मनाला मस्त कलंदर होऊन रहायच होत....
जसा जसा सूर्य मावळत होता .. भीती वाटत होती मनाला तू दूर जायची......
पण राहिलेला वेळ फक्त तुजसोबतच गप्पा करत बसायची.....
तुजासोबत चा तो एक चहा... आजूनही आठवतोय फार....
मुद्दामच करत तो चहा सारखा सारखा मी गार....
शेवटचा तुला bye म्हणायला धीर काही मनाचा होत नव्हता....
सूर्य जसा चांदण्याना see you soon... म्हणून, मागे वळून पाहत होता.....
वाटलं नाही कधी आयुष्यात कोणावर हि एवढ प्रेम करावं....
रोज रोज तुझा आठवणीत थोड थोड जगावं.....
....@AbhijitPG
.... १९/०१/२०१९ ४.४५
1 note
·
View note
Text
माझी आज्जी!
हा माझा मराठी मध्ये पहिला blog. कारण आज्जी म्हटलं की तिचे किस्से आणि तिच्या बद्दल सांगण्यातली मजा इंग्रजीतल्या grandmother किंवा grandfather मध्ये नाही. माझे आजोबा तर मी जेव्हा पासून ओळखते तेव्हा पासून शांत होते. म्हणून काय जास्त सांगायला नाही. पण स्पष्टं सांगावं तर माझी आज्जी एखाद्या grandmother सारखी किंवा बाकीच्यांच्या आज्जी सारखी सोज्वळ आणि शांत मुळीच नव्हती. उलट ही आज्जी आपल्या काळाच्या फारच पुढे होती. एका आज्जी-नातीचं नातं बाजूला ठेऊन पाहिलं तर ती मैत्रिणी पेक्षा कमी नव्हती. म्हणूनच आमच्यात खूप भांडणं व्हायची आणि तिचे खूप किस्से आहेत.
तर माझी आज्जी कशी होती?
एखाद्या लहान मुलाने असावं इतकी हट्टी आणि खोडकर होती. ती निर्भीड होती. स्वतःच्या भावंडांशी एवढी भांडली नसेल जेवढ्या आम्ही दोघी भांडलो. तशी तिची घरात सगळ्यांशी भांडणं व्हायची पण आम्ही परत सगळे पूर्वपदावर यायचो. भांडताना ‘माझी बाकी नातवंड मला कधीच असं बोलली नाहीत फक्त तूच अशी बेशिस्त’ म्हणून मला रडवायची. तेव्हा मला त्यांचा खूप राग यायचा. मनात नेहमी यायचं ‘त्यांना राहून दाखवायला सांग तुझ्या बरोबर.’ पण आता वाटतं माझ्याकडे तिच्या ज्या शेवटच्या गमतीदार आठवणी आहेत त्या त्यांच्या कडे नाहीत. ती खळखळून हसणारी होती, भांडखोर म्हणाल तर तशी ही होती आणि वेळ पडलीच तर मदत करणारीही होती. तिच्या मदतीची आठवण खूप लोकांनी जपली आणि ज्यांना कदर होती ते आजही न विसरता तिचा उल्लेख करतात.
मी लहान असताना ती माझ्यासाठी सूप करायची. आजही ते माहित असणारे, मी कशी ‘बाटला’ भर सूप प्यायची सांगताना माझी लाज काढतात पण माझ्या आज्जी ने दिलेली ही एक स्वादिष्ट आठवण. आमच्या बिल्डिंग मध्ये सगळ्या बाय���ांना ताई, मावशी, मामी, काकी अशी नावं पडलेली. कशी कोणास ठाऊक पण एकाच वयाच्या बायका नावा पुढे मावशी आणि मामी लावून एकमेकांना हाका मारायच्या. तर आमच्या कडे मावशी होती आणि ही मधुबाला नसेल एवढी फेमस होती. सगळ्यांच्या घरी जाऊन बसायची आवड फार. आणि काही लोकं तिला खरंच मदती साठी बोलवायचे. आज्जी बँकेत नोकरी करायला होती तर ती तिथे सुद्धा ‘मरुडकर बाई’ म्हणून पॉप्युलर. हा एक रंग तिचा. तशी तिला नावं कैक; मारुडकर बाई, सुलू, बेबी आत्या, मावशी इत्यादी. काही लोकांना तिचा राग पण होता पण खरं सांगायचं तर गरज पडली की बरोबर यायचे तिच्या क���े. तिने काय जास्त मनाला लावलं नाही. ती बरोबर वसूल करायची आणि म्हणून खरं तर कधी कोलमडली नाही या जगातल्या लोकांसमोर. हा तिचा स्वभाव असला तरी तिच्यातला स्वतःला लाभदायक असा एक गुण होता. तो स्वभाव कितीही स्वार्थी वाटला तरी शेवटी माणसाला तारणारा असतो. दुर्दैवाने मी तो तिच्या कडून शिकले नाही. तिचं ‘मला हे पण हवं आणि ते पण हव’ असं होतं.
एका शब्दात सांगावं तर ती ‘भन्नाट’ होती. ती जशी होती त्याला शाहिद कपूर ने एक dialogue म्हणून ठेवला आहे ‘तुम्हे उठाकर museum में रखना चाहिये…’ आणि तशीच होती ती. तिला बोलायला खूप आवडायचं आणि कोणी चालायचं. कुठून ही ओळखी काढून गप्पा मारायची. मी सावंतवाडीची तुम्ही वेंगुर्ल्याचे करून व्हायच्या तिच्या ओळखी. आमच्या शेजारी राहणारी मुलगी लहान होती, तेव्हा आज्जी तिला ‘सोनू सोनू’ म्हणून घरी आणायची. तिने चक्क आज्जीचं नाव ‘सोनू आज्जी’ असं ठेवलं. एकदा आज्जी ने तिला तू माझी चिमणी असं म्हटलं तर तिने आज्जीला लगेच तू माझा कावळा म्हणत आज्जीच्या मांडीवर बसली. मुद्दा असा की ती कुठल्या ही वयाच्या लोकांशी मिसळायची. शेवटची २ वर्षं तिला काही ऐकू यायचं नाही पण ती फोन करून स्वतःच बोलायची. समोरच्याला बोलायलाच द्यायची नाही. म्हणजे समोर कोणी फोन ठेऊन दिला आणि स्वतःच्या कामाला लागलं असेल तरी कळणार नाही तिला. तेव्हा आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा की ही फोन लावतेच का? असच फोन उचलून बोलत सुटायचं. पण ती काय तितकी वेडी नव्हती. शेवटी आई ने फोन incoming केला कारण लोकांना त्रास होऊ नये. ती न विसरता सगळ्यांना ‘Happy Birthday’ साठी फोन करायची आणि ‘तुम जियो हजारो साल’ असं गाणंच सुरु करायची सकाळी ६-७ वाजता. तेव्हा आम्ही मागून बस झालं असं ओरडत असायचो. माझ्या वाढदिवसाला तर चक्क ��िने हा घे चेक म्हणून दिला. खूप कंजूस होती ती म्हणून मला आश्चर्य वाटलं. आई बाबा गोव्याला होते म्हणून मी ‘तो पर्यंत तुझ्या कडे ठेव, मग घेईन’ म्हणून तिला दिला. तो काय परत माझ्या कडे आला नाही. मी तिला शेवट पर्यंत ‘आज्जी तू मला गिफ्ट म्हणून धोका दिलास, मला माझा चेक हवा’ असं चिडवत राहिले पण तिने मस्त हसून, डोळे मारून मला आणि एक आठवण दिली. तसं तिने मला खूप दिलं. म्हणजे मी आणि माझी बहीण ‘तिचं कपाट तू घे आणि आतलं मला दे’ इतपत चर्चा करायचो मजेत.
रद्दी भरली आणि रद्दीवाला आला की मी आणि आज्जी त्या पैश्यांसाठी भांडायचो. १०-२० रुपये पण तिला सोडवत नव्हते. तो मी नसताना आला आणि मला रद्दी गायब दिसली का तिला कळायचं मग हळूच मला १५-१८ रुपये आले सांगायची. एकदा मी म्हटलं ‘मागच्या वेळी ही तूच घेतलेस आज मला दे’. तर बोलली त्याची भेळ खाऊया आपण दोघी. मी पण कमीची नाही, तिला म्हटलं ‘बघ हां खरंच द्यायचे पैसे’. तर हो बोलली. मी मागवली भेळ आणि तिच्या कडून काढला माझा रद्दीचा हिस्सा. मुळात काय तर तुला देईन पण मला पण हवेत. त्या नंतर तिने परत भेळ म्हणायचीही हिम्मत केली नाही. पण मज्जा यायची. बाबा दोघींना ही ओरडायचे. मला तर काय दम दिला की मी तशीच गप्प. पण तिला जेव्हा ‘काय तू आई, बँकेत नोकरी करून retire झालेली १०-२० रुपयांसाठी तिच्याशी भांडते’ असे ओरडले कि मला भारी आनंद व्हायचा.
तिला कधीच कुठल्या गोष्टीची लाज नाही वाटली किंवा भीती तर मुळीच नव्हती. पण हां, घाबरट होती हे नक्की म्हणेन. जरा काही झालं की डॉक्टरला बोलवा, हॉस्पिटल मध्ये चला करायची. तिला एकाच गोष्टीची भीती वाटली आणि ती म्हणजे मरण. पण तेही तिला हवं तसच आलं आणि तिला काय आम्हालाही कळलं नाही.
पिक्चर आणि सिरीयल पाहायची खूपच आवड होती. खरं तर सिरीयल ती बघायची नाही पण तिची एक जिवलग मैत्रीण होती जी आमच्या खालच्या मजल्यावर राहायची. ती इतकी जिवलग होती की मला शाळेतून आल्यावर घरी जायच्या आधी त्यांची बेल मारून आज्जीला बोलवायला लागायचं. तिने आज्जीला मावशी ‘ही छान आहे सिरीयल’ आणि कौतुकाने ‘माऊ त्यात हे झालं’ म्हणत वेड लावलं आणि आज्जीने मला. त्या दोघी आणि आम्ही ही दोघी बसून सिरीयल बघायचो. हे वेड इतकं होतं की तिला कोणी फोन केला की ती ‘चार दिवस सासूचे संपल्यावर करते सांग’ असं सांगायला लावायची आम्हाला. आणि ते वेड असं काही लागलं की शेवटी हॉस्पिटल मध्ये असताना सुद्धा तिने ‘उद्या पिंजरा बघ आणि काय झालं ते सांग मला येऊन’ असं शेवटचं माझ्याशी बोलली. तेव्हा पण मी तिला ‘ए चल ते कोण बघेल. तू आल्यावर स्वतः बघ’ असं धुडकावून लावलं. विषय असा की शेवटचे ३-४ वर्ष ती बेड वर होती कारण ती घरात पडली. आता ‘कशी?’ असा प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर द्यायला ती नाही म्हणून मी देते. नाहीतर ‘मी कशी पडले’ हे तिने सगळ्यांना सांगितलं. बरं तर ती कशी पडली ह्याचं उत्तर ‘सिरीयल वेड’! त्याचं झालं असं की तिला सिरीयल बघताना waffers खावेसे वाटले म्हणून ऍड लागताच ती घाईत किचन मध्ये आली. घाई कसली तर ‘साता जन्माच्या गाठी’ लागेल आणि २ सेकंड चुकेल ह्याची. तर मग ती घाईत किचन मध्ये आली आणि वरून waffers ची बरणी काढायला गेली आणि ती पडत असलेली बरणी झेलताना स्वतःच पडली आणि मोडली. मग ती, बेड , walker आणि आमचा छळ असा संसार होता. एक तर एरव्हीच तिचा स्वभाव बडबडा त्यात स्वतः उठू शकत नाही म्हटल्यावर दर ५ मिनीटांत हाका मारत बसायची. मला माझ्याच नावाचा कंटाळा आला होता. हद्द इतकी की बाबा तिची पाण्याची बाटली भरून ठेवायचे बाजूला तर ती त्यांना ही ओरडायची. ‘आता प्यायले परत काय भरली’. तिला इतकं समजवायचो की तू नको पिऊस. तहान लागली की पी, तर म्हणायची ‘आता भरलं तर प्यावं लागतं’. काय गणित होतं तिचं तिलाच माहित. पण ती मुळात एका जागेवर बसून सैरभैर झाली होती. आणि आमच्या वर केस उपटायची वेळ आणली होती.
तिचं आणि हिंदी भाषेचं गणित जरा वेगळच होतं. हिंदी जास्त कळायची नाही पण हिंदी सिरीयलच्या प्रत्येक dialogue चा ती अर्थ विचारायची. कठीण! पण मज्जा ही जाम यायची. कारण ती जे वाचायची त्याला मराठीत भाषांतर करून आम्हाला करमणुकीचं साधन द्यायची. विलासराव देशमुख तिला खूप आवडायचे. काही कारणास्तव त्यांना त्यांचं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं. न्यूज मध्ये सगळीकडे ‘विलासराव देशमुख अपनी सफाई देने सोनिया गांधी के घर दिल्ली पहुंचे’ असं येत होतं. तर बिचारी माझी नाराज आज्जी जोरात ओरडली ‘आता हा कशाला तिच्या घरची सफाई करायला दिल्ली पर्यंत गेला?’ २ मिनिटं आमच्या कडे शांतता पसरली. आम्हाला त्या दिवशी देशमुख घराण्याचा सगळा वारसा पाण्यात वाहून जाताना दिसला. आणि मग जे वेड्या सारखे मी आणि आई हसलो ते आम्हाला तिला त्याचा खरा अर्थही सांगता येईना. आम्ही दोघी आजही ते आठवून हसतो आणि बाबांना सांगतो. ते तिच्या बरोबर जास्त बसायला येतच नव्हते कारण उगाच वाद घालायची आणि संकटात सापडायची. ती वेड्यासारखं बोलायची आणि ते मुळातच चिडखोर असल्यामुळे मग तिच्याशी भिडायचे. मग तिची तंतरायची आणि ते काही ��ांत व्हायचे नाही. ती आम्हाला हातवारे करून लांबून सांगायची ‘मी अडकले’. मग आम्हाला तिला लांबून तू गप्प बसून रहा सांगावं लागायचं. पण दुरून. त्यांच्यात कोण पडेल. मग बाबा रागात आत निघून गेले की आम्ही तिला तासायचो. आम्ही सगळेच बाबा घरातून कधी बाहेर जातात याची वाट पाहायचो. मग ती आम्हाला विचारायची आज तो जाणार का आणि आम्हाला हसायला यायचं पण त्यांना विचारायची काही हिम्मत नव्हती. ती तर नंतर जास्तच वाट पाहायला लागलेली कारण एका जागेवर बसून ती वेडी झालेली आणि तिचं कौतुक करून बाबा आणि वेडे झाले होते. मग स्वतः हळूच पिल्लं सोडायची ‘आज जाणार का?’ आणि जर ते हो बोलले तर तिला एखाद्या लहान मुलाला होतो तसा आनंद व्हायचा. आणि तिच्यामुळे मी पण तो आनंद उपभोगायचे. माझ्या सारखी ती ही बाबांना घाबरायला लागली होती नंतर. तिला diabetes होता म्हणून जखमा होऊ नये ह्याची आम्ही काळजी घ्यायचो. पण तिला हातात आम्ही nailcutter दिला नाही तर ती स्वतः कातर घेऊन बसायची आणि मग ती कातर लागायची आणि घळाघळा रक्त व्हायचं. मग मी तिच्या काळजी खातर तिला ओरडायचे तर लगेच बोलायची ‘अगं ओरडू नको त्याला कळलं तर तो बाहेर येईल आणि चवताळेल’. किती वेळा ते कंटाळून ‘मी गोव्याला जाऊन राहतो थोडे दिवस’ म्हणायचे आणि एकदा दोनदा गेले सुद्धा पण लगेच ती एकटी आहे म्हणून परत यायचे. तिचे हात, कान, पाय सगळे बरोबर असतानाची गोष्ट आहे. आई मी शाळेतून आले का विचारायला ऑफिस मधून फोन करायची. घरी कोणच नसल्यामुळे आज्जीला रान मोकळं मिळायचं. तासंतास फोन वर गप्पा मारायची आणि त्यात भात, डाळ, भाजी गॅसवर ठेऊन विसरून जायची आणि मग स्वतःच सांगायची ‘आज हे जळलं’. तर तिचे बहुतेक त्या वेळचे फोन ठरलेले असायचे. एके दिवशी आईने फोन केला आणि आज्जीचा अंदाज चुकला. समोर कोण आहे हे कळून न घेताच सुरु झाली. ‘आता हिची शाळेतून यायची वेळ झाली मी तुझ्याशी नंतर बोलते’ म्हणून फोन ठेवला. आई मला नंतर सांगून हसत होती. आणि आम्हाला आजही नाही माहीत की ते कोण होतं आणि तिला काय असं बोलायचं होतं. पण तिचे असे secret कॉल खूप होते. फोन वर बोलताना बाजूला बसलेल्याला कळणार नाही ती कोणाबरोबर कशाबद्दल बोलते आहे. मग मुद्दाम तिला कोण होतं असं विचारण्यात वेगळाच आनंद.
एक तर ती खूप practical होती त्या मुळे तिच्या गमती ही तशाच होत्या. एकदा ‘मुगल ए आजम’ बघताना असाच गमतीशीर किस्सा घडला. शेवटच्या scene मध्ये अनारकलीला ‘दीवर मे चुनवा दो’ असं अकबर हुकूम देतो. मी लहान होते आणि त्यांची दीवार बांधायची राहिली होती. असच कुतूहल म्हणून तिला विचारलं खरंच अनारकलीला भिंतीमागे घातलं का? तर तिचं उत्तर ऐकून ��कबर बेशुद्ध पडला असता. तिने मला ‘नाही ग तिला तिथल्या लोकांनी मागून काढलं असणार’ चक्क असं सांगितलं. आणि मला कळेच ना की हे खरं की खोटं. माझी आई मागून हसायला लागली तेव्हा कळलं की हा तिने तिचा common sense वापरला. मी डोक्यावर हात मारला. ‘आज्जी मी खरं असं झालेलं का विचारते आहे?’ असं म्हणताच तीच हसायला लागली. त्यामुळे आज्जी कडून कुठल्या प्रश्नांची कशी उत्तरं मिळतील याचा काही नेम नव्हता.
जिला घरी राहायला मुळीच आवडत नव्हतं ती मात्र पडल्या नंतर कधी वाटेल तेव्हा बाहेर पडू शकली नाही. बोलायची आवड होती पण पार बहिरी झाली आणि समोरच्याने बोललेलं ऐकू येईना झालं. मला आजही आठवतं ती तिच्या पायावर असल्यापासूनच तिला कानाचा प्रॉब्लेम होता. तिच्या बरोबर एकदा डॉक्टर कडे गेले असताना तो डॉक्टर म्हणाला जोपर्यंत तिच्या बहिरेपणाचा तुमच्या घशाला त्रास होत नाही तो पर्यंत मशीनची गरज नाही. पण तिला डॉक्टरचं सगळं बोललेलं खरं करायची इतकी आवड होती की तो दागिनाही तिच्या मालकीचा झाला. तिची स्मरणशक्ती फार उत्तम होती. लोकांचे telephone नंबर तिला पाठ असायचे आणि सगळे मराठीत सांगायची. पंचात्तर चाळीस सोळा… म्हणजे मला तिला सांगावं लागायचं आज्जी इंग्लिश please. तिला नाचायला आवडायचं, गायला आवडायचं, चित्र काढायला आवडायचं आणि आम्हाला छळायला आवडायचं. आत्या, बाबा आणि आई मला नेहमी सांगतात की ती मटण छान बनवायची. मला काही करून दिलं नाही म्हणून माझा विश्वास नाही. पण प्रेमळ होती. घरी काही गोड बनवलं की आधीच सांगायची अजितला काढून ठेव. म्हणजे माझे काका. त्यांना गोड खूप आवडतं. तिला आई किती सांगायची ताजं बनवून देऊ, नाही आले तर तसंच राहील. आता तिचं प्रेम की योगायोग का ती फोन करून बोलवायची कोण जाणे पण ते १-२ दिवसात ते खरंच यायचे. त्यांची आणि आज्जीची भांडणं बघण्यात पण मज्जा यायची. त्यांच्यात प्रचंड वाद झाले की मग काका हात जोडून ‘आता या वर चर्चा नको’ असं म्हणायचे. म्हणजे झाली समाप्ती. पण ते ‘चर्चा नको’ ऐकल्या शिवाय आम्ही पण वाद संपला असं मानत नव्हतो. माझ्या काकाचं आणि आज्जीचं नातं म्हणजे ‘तुझ्याशी जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असं होतं. त्यांना फोन करून बोलवायची ‘जरा घरी येऊन जा’ आणि ते तिला ओरडायचे ‘मला वेळ नाही’. मग झालं सुरु. ‘त्याला इथे तिथे जायला वेळ आहे पण मला भेटायला वेळ नाही’. पण संध्याकाळी २ बेल वाजल्या की लगेच हाक मारायची ‘जा उघड दार बघ अजित आला’. काका आले की तिच्या कडून जोरात अथर्वशीर्ष आणि स्तोत्र म्हणून घ्यायचे आणि सांगून जायचे नेहमी ‘रोज म्हण म्हणजे वेळ जाईल’. ती कसली ��्हणते. एकही दिवस म्हणायची नाही पण एकदा चुकून काका न सांगता आले की ती जोरात सुरु व्हायची म्हणजे त्यांना कळलं पाहिजे की मी रोज म्हणते. ते ही तिला चांगलं ओळखायचे. मग मी कुसकेपणा करून जोरात म्हणायचे, ‘आज्जी उगाच हां रोज काय म्हणत नाही’. एकदा ती एका जखमेवर मलमाच्या जागी चक्क चुकून बाम लावणार होती. तेव्हा काका इतके भडकले. ‘अगं आणि एक उपद्व्याप करून ठेवशील आमच्यासाठी.’ मी आणि बाबा इतके हसत होतो बसून, मग काका आणि आज्जीलाही हसायला आलं. तिचं काकाशी वेगळंच नातं होतं म्हणून बहुतेक ती गेली तेव्हा काका एकटेच होते तिच्या बाजूला. आणि गेली तेव्हाही पेचात पाडूनच. रात्री १२ च्या ठोक्याला डॉक्टर ने ती गेली असं सांगितलं आणि आम्ही कुठली तारीख आणि तिथी धरायची हा प्रश्न सोडवत अक्खी रात्र काढली. तिच्या घराशी तिचं नातं इतकं घट्ट होतं की तिला घर आणि घराला तिला सोडवत नव्हतं. रात्रभर तिला हॉल मध्ये ठेवलेलं. तिला इतकं शांत आणि संथ बघताना विश्वासच बसत नव्हता. असं वाटलं आता उठून बसेल आणि बोलायला लागेल. त्यात आपल्या आजूबाजूला इतकी लोकं जमली हे पाहून तिला एरव्हीच किती आनंद व्हायचा आणि कोणाशी बोलू आणि कोणाशी नको अस व्हायचं. पण त्या दिवशी सगळे तिच्यासाठी जमलेले आणि ती निघून गेली होती. आयुष्यभर ती ‘मी ७२ रोगांची मालकीण आहे’ असं थाटात म्हणत राहिली पण शेवटी एकही रोगाचं कारण नव्हतं.
तिच्या बरोबर जन्मा पासून राहिले मी पण तिची धमक काही घेऊ शकले नाही. मात्र हो, तिच्या इतक्या आठवणी माझ्या शिवाय कोणा कडेच नाहीत याचा मात्र मला अभिमान आहे. आज्जी असताना तिला खूप ओरडायचे पण आता तिची आणि तिच्या किश्श्यांचीआठवण आली की डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत आणि हसल्या शिवाय तिच्या आठवणींची मज्जा नाही.
3 notes
·
View notes
Text
सलमान रश्दी 20 सेकंदात "10-15 वेळा" हिट झाला: प्रत्यक्षदर्शींनी हल्ल्याची नोंद केली
सलमान रश्दी 20 सेकंदात “10-15 वेळा” हिट झाला: प्रत्यक्षदर्शींनी हल्ल्याची नोंद केली
लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी न्यूयॉर्क शहराजवळ चाकूने वार करण्यात आल्यानंतर लोकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. लेखक सलमान रश्दी यांना शुक्रवारी न्यूयॉर्क राज्यातील एका कार्यक्रमात चाकूने वार केले गेले, या हल्ल्यात “10 ते 15” वार झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यापैकी एकाने सांगितले की तिला सुरुवातीला हा “स्टंट” वाटला. “हा माणूस प्लॅटफॉर्मवर धावत गेला आणि श्रीमान रश्दींना…
View On WordPress
0 notes
Text
कसा वाटला चित्रपट, आवडला का? थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करत नागराज मंजुळेंनी विचारला प्रेक्षकांना प्रश्न
कसा वाटला चित्रपट, आवडला का? थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करत नागराज मंजुळेंनी विचारला प्रेक्षकांना प्रश्न
कसा वाटला चित्रपट, आवडला का? थिएटरमध्ये सरप्राइज एण्ट्री करत नागराज मंजुळेंनी विचारला प्रेक्षकांना प्रश्न दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट ४ मार्च र���जी प्रदर्शित झाला आहे. अजूनही काही थिएटरमध्ये हा चित्रपट हाऊसफुल आहे. अशाच एका चित्रपटात नागराज आणि आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांना सरप्राइज एण्ट्री देत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला…
View On WordPress
#आवडला#एण्ट्री#करत#कसा#का?#चित्रपट…”#थिएटरमध्ये#नागराज#प्रश्न#प्रेक्षकांना#बातम्या#मंजुळेंनी#वाटला#विचारला#सरप्राइज
0 notes
Text
अमिताभ ..... एक दिवसाचा म्हातारा !
-जगदीश देवरे
मित���रांनो, फक्त हे शिर्षक वाचून लगेच लेखकाला शिव्या घालायला सुरुवात करू नका. मला हे चांगलं माहिती आहे की, अमिताभला म्हातारा वगैरे असं काही म्हटल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांच्या भावना दुखावतील. परंतु, अगदी शिर्षकापासूनच मी अमिताभला एक दिवसाचा म्हातारा का म्हणतो आहेॽ हे समजून घेतांना तुमच्या भावनांना आवर घाला
मागच्या वाढदिवसाच्या दिवशी जसं सगळयांना समजलं की, अमिताभ ७९ वर्षाचा पुर्ण झालाय म्हणून तसं आता ११ ऑक्टोबर २०२२ ला चाहत्यांना हे समजणार आहे की अमिताभ ८० वर्षांचा झालाय म्हणून. या दोन तारखांच्या मधल्या काळात त्याचा आणि वयाचा काहीही संबंध आलेला नाही. या कालावधीत अमिताभचं वय मोजायची किंवा त्याबद्दल जाणून घ्यायची हिम्मत कुणीच केली नाही. शिवसेनेतले आमदार गुवाहाटीला ��ेल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाव "गुगल" प्लॅटफॉर्म वर सर्च करण्याचा काहीतरी विक्रम झाला होता म्हणे. वर्षभरात अमिताभच्या वयाचा असा 'सर्च' फारसा कुणी घेतला नसावा.
अमिताभबद्दल लिहीण्याची ही प्रांसगिकता यासाठी की, 'कौन बनेगा करोडपती' चा नवा सिझन सुरू झालाय. छोटया पडद्यावरचे काही कार्यक्रम असे तयार होवून जातात की ज्यावर फक्त विशीष्ट लोकांचाच ठप्पा मारलेला असतो. म्हणजे बघा, सिध्दार्थ काक आणि रेणूका शहाणे यांचा एकत्रीत फोटो जर आपण बघितला तर आपल्याला आठवतो तो दूरदर्शनवरचा 'सुरभी' नावाचा टीव्ही शो झी टीव्ही वरची 'अंताक्षरी' आठवली की अन्नु कपूर आठवल्याशिवाय रहातच नाही, 'आप की अदालत' हा टी.व्ही.शो रजत शर्मा ऐवजी दुसरा कुणीतरी होस्ट करतोय असा फक्त विचार करून बघा, नाही पटणार मनाला. 'बिनाका गीतमाला' या प्रचंड लोकप्रिय रेडीओ कार्यक्रमाला अमिन सायानी यांच्याशिवाय कुणाचाही आवाज परफेक्ट वाटलाच नाही. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. 'कौन बनेगा करोडपती' हे एक त्यातलेच उदाहरण. या शो च्या मालकांनी एकदा अमिताभच्या ऐवजी शाहरूख खानला हॉट सीटच्या समोर बसवून बघितलं. प्रेक्षकांना त्यावर्षीचा 'कौन बनेगा करोडपती' म्हणजे गु-हाळात रस काढून फेकलेल्या उसाच्या चोथ्यासारखा वाटला.
नेहमीप्रमाणे एखाद्या तरूणालाही लाजवेल असे काम अमिताभ पुन्हा या सिझनमध्येही रिपीट करील यात शंका नाही. हा खेळ खेळून पैसे जिंकायला इथे कमी येतात त्यापेक्षा जा��्त स्पर्धक अमिताभसमोर बसून त्याची छबी बघायला आलेले असतात. अमिताभ सुध्दा या स्पर्धकांसोबत कधी तरूण होऊन जातो हे कुणालाही कळत नाही. खास करून, या शो मध्ये येणा-या महिला स्पर्धकांशी बोलतांना कार्यक्रमाची रंगत वाढावी म्हणून अमिताभच्या बोलण्यातला खास असा नटखटपणा कधीच त्याच्या वयाआड येत नाही. ही अमिताभच्या अॅंकरींगची खासियत आहे आणि हेच या कार्यक्रमाच्या यशाचे सर्वात मोठे गणित आहे. मागच्याच सिझनमधल्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धक तरूणीला "व्हर्चुअल डेट" वर घेवून जातांनाचे दृश्य निर्माण करतांना अमिताभने आपल्या अभिनयात कुठलीही कसर सोडली नाही. त्याचे वय त्या एपिसोडमध्ये कुठेही आडवं आलं नाही. ही अमिताभची ताकद आहे. हे कुणालाच जमलेलं नाही आणि कदाचित पुढची अनेक दशकं कुणाला जमणार देखील नाही.
अमिताभ कधी मोठया पडद्यावर येईल, कधी छोटया पडद्यावर येईल, काहीच सांगता येत नाही. तरुण वर्गाला हेवा वाटेपर्यन्त काम करीत राहील. तुम्ही टी.व्ही. वरचे कितीही चॅनल्स बदलून बघा, त्याची एक तरी जाहीरात नाही (किमान म्हणतोय मी ....) असे चॅनल तुम्हाला शोधून सापडणार नाही.
तुमने हमे पूज पूज कर पत्थर कर डाला,
वे जो हमपर जुमले कसते हैं, हमें जिंदा तो समझते है.
कमलापसंद या प्रकरणात अमिताभ पुन्हा एकदा तरूण झाला. असं म्हणतात की तो एका जाहिरातीचे पाच ते दहा करोड मोजून घेतो. कॅडबरीपासून जस्ट डायल पर्यन्त आणि गुजरात टूरीझम पासून तनिष्क पर्यन्त असंख्य मोठया ब्रॅण्डसचा तो अॅम्बॅसेडर आहे. अर्धे अधिक बॉलीवूड, नशापाणी करण्याच्या मर्यादा ओलांडतांना सध्या दिसतंय. नजिकच्याच काळात घडून गेलेल्या काही प्रकरणांनी तर या बॉलीवूडच्या चेह-याला डांबर फासलंय. अशा परिस्थीतीत अमिताभने चाहत्यांच्या भावनांचा सन्मान राखून जाहीरात मागे घेण्याचा दाखविलेले तारूण्य वेगळे आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात बच्चन साहेबांनी ७० कोटी रूपयांचा इन्कम टॅक्स भरला असल्याची माहिती गुगल तुम्हाला देईल. आपल्याकडे वयाच्या साठाव्या वर्षापर्यन्त रिटायर झाल्यानंतर पुढे पेन्शन वर गुजारा करण्यात किंवा साठ��ेल्या संचयाच्या व्याजावर मौज मारण्याची प्रथा आहे. बच्चनचा प्रवास असा नाहीच. आपण आपले वय एक वर्षापासून मोजायला सुरूवात करतो. बच्चनचे वय मोजतांना कदाचित सव्वाशे पासून उलटी गिनती सुरू करावी लागेल इतका त्याचा जीवनपट अफाट आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता त्याच्यात ठासून भरलीय. 'दिवार' चित्रपटात शशी कपूर अमिताभचा सहनायक होता. "मेरे पास बंगला है, गाडी है....." असे म्हणणा-या अमिताभला "मेरे पास माँ है" असे प्रत्युत्तर देणा-या शशीकपुरकडे दमदार डॉयलॉगबाजी होती. त्याला मिळालेला रोल अमिताभपेक्षाही दमदार होता. परंतु, प्रत्यक्ष पडद्यावर बाजी मारली ती अमिताभनेच. हीच परंपरा अमिताभने पुढे कायम ठेवली आणि एक दिवस असा आला की पुढचे सगळे चित्रपट फक्त अमिताभला डोळ्यासमोर ठेवून लिहीले जावू लागले. त्याने इंडस्ट्रीच बदलून टाकलीएक दिवसाचा म्हातारा असलेला अमिताभ अनंत काळाचा सुपरस्टार आहे आणि तो असाच रहावा याच शुभेच्छा.
#AmitabhBachchan
#kaunbanegacrorepati
#KBC
#superstar
#Amitabh
1 note
·
View note
Text
सर्पदंश : काळजी आणि उपचार | विषारी, निमविषारी आणि बिनविषारी साप
सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जीवाला धोका वाटला तरच स्वरक्षणासाठी ते दंश करतात. इतरवेळी ते मनुष्यापासून लांबच राहतात. साप ही निसर्गाची एक सुंदर व अत्यंत उपयोगी रचना आहे. पण आपले समज, गैरसमज व भीतीमुळे…
View On WordPress
0 notes