#वागलं
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भूतदया, माणूसधर्माला काळीमा; कुत्रा आणि त्यांच्या पिलांशी असं कुणीच वागलं नसेल
भूतदया, माणूसधर्माला काळीमा; कुत्रा आणि त्यांच्या पिलांशी असं कुणीच वागलं नसेल
भूतदया, माणूसधर्माला काळीमा; कुत्रा आणि त्यांच्या पिलांशी असं कुणीच वागलं नसेल भोपाळ : माणूस माणुसकी विसरून चालला असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर भूतदया दाखवणाऱ्या लोकांचीही संख्या कमी होत चालली आहे. उलट लोक आता प्राण्यांना दूर लोटण्यासाठी त्यांच्यावर निर्दयी हल्ले करू लागले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भूतदयेला धक्का देणारा निंदनीय प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराने माणुसकी धर्मालाही…
View On WordPress
0 notes
vidyamsdiary7 · 8 months ago
Text
Post 10
Facebook उत्तम माध्यम आहे  आपली कला सादर करायला , व्यक्त व्हायला. वपू बोलतात तसं कोणी चोवीस तास एका भूमिकेत नसतं. उदाहरण कवी चोवीस तास कवी नसतो किंवा कोणताही कलाकार. कलाकार आवडला म्हणजे त्याच्यातल्या माणसाला आपण ओळखतो असं कुठे असतं. म्हणून ती व्यक्ती कशी आहे हे प्रत्यक्ष भेटल्याशिवाय ती चांगली आहे का वाईट ह्याच�� अंदाज बांधणे योग्य नाही वाटतं. संवादा पेक्षा देहबोली ८०% बोलकी असते म्हणून भेटीगाठी करून माणूस ओळखणं उत्तम . आपण चांगलं वागलं म्हणजे दुसरी व्यक्ती चांगली वागेल हे गृहीत धरूच नये. चुकातून शिकत जायचं इतकंच माणसांच्या हाती असतं. इथे कोणी वाईट बोललं तर लगेच screenshot घेणार समोरची व्यक्ती. मग बदनामी व्हायला किती वेळ लागतो. Social media वर सगळे सावध पणे बोलतात.चांगल्या पण मोजक्याच व्यक्तीं सोबत मैत्री झाली तर आपलं नशीब समजायचं . जे आपले नाहीत त्यांना सरळ निरोप द्यायचा कायमचा. प्रत्येका सोबत wavelength जुळायलाच हवी असा अट्टहास नसावा.  #vidyamslife
0 notes
shrikrishna-jug · 9 months ago
Text
ही उपरोधिक टीका दूर्लक्षीत करून चालणार नाही.
माझी आणि श्री.समर्थांची काल तळ्यावर फेऱ्या घालत असताना,“मानव आणि त्याच्यावर पर्यावरणाची कळत- नकळत पडलेली जबाबदारी”ह्या विषयावर चर्चा झाली. मी म्हणालो,“मानवतेने निसर्गाशी समेट करणं आवश्यक आहे मला असं वाटतं की मानवजात निसर्गाच्या संबंधात सहिष्णुतेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.आपल्या अस्तित्वाचा मर्यादित घटक असणाऱ्या इतर प्रजातींशी आपण समजुतीने वागलं पाहिजे.नैसर्गिक तर्कशुद्धता सुरू करण्याचा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 15 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसद सुरक्षा भंग प्रकरणी विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी, सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, अध्यक्षांसमोरच्या हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. खासदारांना निलंबित केल्याचा मुद्दा देखील या सदस्यांनी उपस्थित केला. सुरक्षेच्या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी त्यांनी केली. गदारोळ वाढतच गेल्यानं लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्यसभेतही हेच चित्र पहायला मिळालं. सुरक्षेच्या मुद्यावर चौकशी सुरु असल्याचं सांगून, सभापती जगदीप धनखड यांनी, विरोधी पक्षांनी दिलेला स्थगन प्रस्ताव फेटाळला. मात्र तरीही विरोधकांचा गदारोळ सुरुच राहील्यानं राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
दरम्यान, सुरक्षेचं प्रकरण गंभीर असून, विरोधकांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात, आज संसदेबाहेर निदर्शनं केली.
****
राज्यात अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी कृती दल स्थापन केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. सगळ्याच जिल्ह्यात याअंतर्गत हा गट स्थापन केल्याचं ते म्हणाले. ललित पाटील प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येत असून, चार पोलिस अधिकार्या��ना बडतर्फ केल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलं. आमदार रोहीत पवार, अस्लम शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
महिला अत्याचारासंबंधीचा शक्ति फौजदारी कायदा मंजूर होण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु असल्याचं, फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
परिक्षेमुळे येणार्या ताणाचं रुपांतर यशात करणं आणि परिक्षार्थींनी हसतखेळत ध्येयप्राप्ती करणं हा परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमासंदर्भात केलेल्या एक पोस्ट मध्ये त्यांनी, परिक्षा पे चर्चा २०२४ ची माहिती दिली. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. याबद्दलची अधिक माहिती इनोव्हेट इंडिया डॉट माय जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
परदेशात नोकरी देण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारणारे एजंट्स, नोकरीची खोटी हमी, आणि बेकायदेशीर भरती, या प्रकारांना आळा घालण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये परदेशात नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींनी केवळ नोंदणीकृत एजंटच्या सुरक्षित आणि कायदेशीर सेवांचा लाभ घ्यावा, अशी विनंती केली आहे. स्थलांतरित कामगारांनी आपल्याला ज्या देशात जायचं आहे, तिथल्या परिस्थितीची आधीच माहिती घ्यावी, असंही या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. सरकारनं नोंदणीकृत एजंट्सना स्थलांतरित कामगारांसाठी प्रवासी भारतीय विमा योजना खरेदी करणं बंधनकारक केलं आहे.
****
युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार राहण्याच्या उद्देशानं निर्णय प्रक्रियेतील वेळ कमी करण्याकरता हवाई दलातील विविध विभागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे, अशी माहिती वायू दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली. पुण्यात काल सावित्रीबाई फुले विद्यापीठात, जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वार्म ड्रोन बनवण्यात आले असून, आतापर्यंत ८०० कोटी रुपयांच्या ड्रोन खरेदीसाठी मागणी नोंदवण्यात आली असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
छत्तीसगडमधल्या राजनांदगांव जिल्ह्यात मोहला आणि मानपूर तालुक्यातल्या बोधीटोला गावाजवळ झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी काल दोन नक्षलवाद्यांना ठार केलं. यातील एका नक्षल्याचं नाव दुर्गेश वट्टी असून, एक ��े २०१९ रोजी कुरखेडा गावाजवळ नक्षल्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटाचा तो मुख्य सूत्रधार होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.
****
दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदाकाठी होणारा कुंभमेळा २०२६-२७ मध्ये होणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यांचा समावेश असलेली शिखर समिती नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय उच्चाधिकार समिती, जिल्हास्तरीय समिती, आणि जिल्हास्तरीय कार्यकारी समिती अशा अन्य तीन समित्यांची रचना घोषित करण्यात आली आहे.
****
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
आ.रवी राणा आणि आ. बच्चू कडु यांनी समजदारीने वागलं पाहिजे : आ. श्र��कांत भारतीय
आ.रवी राणा आणि आ. बच्चू कडु यांनी समजदारीने वागलं पाहिजे : आ. श्रीकांत भारतीय
शिंदे-फडणवीस सरकारमधील आ. बच्चू कडू आणि आ.रवी राणा या दोन आमदारांमध्ये सद्या वाक युद्ध सुरु आहे. त्यांच्यावर भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपली प्रतिक्रीया दिली असून दोघांनीही बोलतांना महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती जपावी, असा सल्ला आमदार भारतीय यांनी दिला आहे. दोन्ही नेते जनतेतून निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता ही राजकीय संस्कृती समजणारी जनता आहे.त्यामुळे दोन्ही नेत्यांनी समजदारीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
wordspower · 2 years ago
Text
घुसमट : समजुतीच्या मुखवट्यामागची
https://bluepad.in/share/m2Q1FnXhmo88AHMC6 माणूस माणसाला समजून घेतो तेंव्हाच माणूसकी त्याच्या अंगी जन्म घेते. आपण इतरांना मदत करणे, जितकी आपली ताकद तितकं इतरांचं भले करणे. कुणी कितीही कसही वागलं तर समजूतदार व्यक्ती समजूनच घेते. अशावेळी प्रश्न पडतो इतकी सहनशीलता अशा माणसांच्या ठायी येते तरी कुठून? खरंच समजूतदार असणे म्हणजे नेमकं काय? समजूतदारपणा दाखवणे म्हणजेच का दयाळू असणे? आपण हे सर्व जाणून घेऊ…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Text
लग्न समारंभ पुढे ढकला , अंत्यसंस्कारालाही गर्दी करु नका
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन
मुंबई :  कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी आता सर्वांच्याच एकजुटीची गरज आहे, ही लढाई एकट्याची नाही. सगळ्यांनीच संयमाने आणि सामाजिक भान राखून वागलं पाहिजे. आपल्या घरात जर लग्न समारंभ असेल तर ते पुढे ढकला, घरात अंत्यसंस्कारालाही गर्दी करु नका असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ आहे पण…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
'महापौरांना महिलांसोबत कसं वागलं पाहिजे याचे धडे मनसे देणारं'
‘महापौरांना महिलांसोबत कसं वागलं पाहिजे याचे धडे मनसे देणारं’
मुंबईच्या महापौरांनी त्यांचा निषेध करणाऱ्या महिलेचा हात पिरगळल्याचे प्रकरण मनसेने लावून धरलं आहे. महापौरांवर महिलेचा हात पिरगळल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केल्यानंतर आता मनसेने महापौरांना महिलांसोबत कसं वागलं पाहिजे याचे धडे देणारं एक पुस्तक भेट म्हणून पाठवलं आहे.
आज मनसेकडून महापौरांना ‘शिवछत्रपतींची स्त्री निती’ हे पुस्तक भेट म्ह‌णून पाठवण्यात आलं आहे. प्रत्यक्ष…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना,  राज्य सरकारनं निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं नवीन कृती दल
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध - कृषी आयुक्त सुनील चव्हाण
अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती तसंच रमजान ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं महावितरणचं आवाहन
जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकं
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय
सविस्तर बातम्या
देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून व्यवस्था अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्रातून केली आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागानं कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी नव्या कृती दलाची स्थापना केली असून निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर,  डॉक्टर बिशन स्वरुप गर्ग, यांच्यासह ८ जणांची या कृती दलाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, एक दिवस त्याचा विस्फोट होईल, असंही मंत्री भुमरे यांनी म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना यंदा आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण अविचलपणे जनतेसाठी काम करीत राहू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मात्र रुग्णांना तातडीने इतरत्र नेण्याची गरज पडल्यास हवाई रुग्णवा��िकेची सोयही उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलत होते. धर्माचं राज���ारण केल्यानं भविष्यात राज्यात दंगली होतील, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले…
Byte…
महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का की दंगली घडवायच्या?  असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर याठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतंय की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटीव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटीव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.
****
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचं नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप’ कृषी विभागानं तयार केल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.
****
राज्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पेऱ्यांची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबंधित  जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संबंधीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची समिती गठित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या समितीनं कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, याबाबत शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी आणि  सात - बारा उताऱ्यावर  त्याची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणित केलेले सात - बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. समितीनं आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे.
****
‘उडान अर्थात उडे देश का आम नागरिक' या योजनेच्या पाचव्या टप्प्याला काल सुरुवात झाली. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ��ुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वाढवणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हेलीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैदी, त्यांच्या मुलांना, तसच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटू शकणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
****
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी एक चार पाच सहा सात या क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या नि:शुल्क मदतवाहिनीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार आदी बाबींची माहिती तसंच मदत देण्यात येते
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
विविध क्षेत्रातल्या नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पाठ्यवृत्ती अर्थात फेलोशिप उपक्रम राबवणार आहे. राज्याचा पर्यटन विकास साधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महामंडळानं केलं आहे. २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतली प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहेत. gm@maharashtra tourism.gov.in आणि dgm@maharashtra tourism.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करता येतील.
****
साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण , भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची ��यंती तसंच ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल देशभरात साजरा झाला. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे काल दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात आले. केदारनाथ धाम इथलं मंदिर २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं, ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मिरवणुक काढण्यात आली तर  महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समिती आणि अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
****
ईद-उल-फित्रच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणा सुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
****
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. वीज वाहिन्या, रोहित्र, वीज वितरण पेट्या किंवा फीडर फिल्डरच्या जवळ कचरा जाळल्यामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला आग लागल्यामुळे विजेच्या भूमिगत तारा आणि इतर वीज यंत्रणा नादुरुस्त झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगींमुळे महावितरणच्या नुकसानीसोबतच ग्राहकांना वीज पुरवठा अनिय���ित होतो आहे.  अशा घटनातून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास एक नऊ एक दोन किंवा १८००-२१२-३४३५ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १२ वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ही माहिती दिली, ते काल मानकुरवाडी इथं ऊस तोडणी कामगारांना ओळख पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. मानकुरवाडी परिसरातील ऊसतोड कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
जागतिक ग्रंथ दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे , भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.
****
तुर्की इथं झालेल्या प्रथम स्तर जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत. ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीनं मिश्र दुहेरीत चिनी तैपेई जोडीचा १५९ विरुद्ध १५४ गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने महिलांच्या कंपाउंड प्रकारात कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीवर १४९ विरुद्ध १४६ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायन्टसवर ७ धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं २० षटकात ६ गडी गमावत १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल लखनऊ सुपर जायन्टस संघ मात्र २० षटकांत सात गड्याच्या बदल्यात केवळ १२८ धावा करू शकला.
या स्पर्धेतल्या अन्य सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत २०१ धावाच करु शकला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक; पहिल्या वीर बाल दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विधीमंडळात विरोधक आक्रमक; राज्य सरकार उद्या ठराव मांडणार.
व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक.
आणि
कचनेर इथून पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणारी टोळी जेरबंद.
****
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या ४ पुत्रांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद के��ं. ते म्हणाले ��
साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो अतीत से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कायर्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले –
क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
दरम्यान, मुख्यमंत्री आज दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सरकारकडून ठराव मांडण्यात आला नाही. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात हा मुद्दा गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले –
हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कर्नाटक स���कार, तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?
विधानसभेतही विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी करत, सरकारने ठोस भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले –
उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
महाराष्ट्राची एक इंचही जमीन कोणाला देणार नसल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर उद्या प्रस्ताव मांडणार असल्याचं सांगितलं. अधिवेशनात आजचं काम सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं. 
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला २०१२ मधे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचं कर्ज देताना अनियमितता झाल्याच्या आरोपांविषयी सीबीआय ही चौकशी करत आहे.
****
औरंगाबाद ज��ल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपी मध्य प्रदेशातील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून मुर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत आज ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. १९८२ पासून विद्यार्थ्यांना ४० रुपये विद्यावेतन मिळत असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही महाजन यावेळी म्हणाले. नांदेड जिल्ह्यात हंगरगा आणि दापका या दोन गावच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं होतं, या विरोधात आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचं निलंबन केल्यासंदर्भात सदस्य राजेश पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला महाजन उत्तर देत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील मुरूम उपसा प्रकरणी एका महिन्याच्या आत चौकशी करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला विखे पाटील उत्तर देत होते.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका टेकडीची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी विशेष चौकशी समिती -एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली. मंदा खडसे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर केला होता. सर्व प्रकारचे नियम उल्लंघन करून याबाबतच्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आणि सुमारे चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
आ.रवी राणा आणि आ. बच्चू कडु यांनी समजदारीने वागलं पाहिजे : आ. श्रीकांत भारतीय
आ.रवी राणा आणि आ. बच्चू कडु यांनी समजदारीने वागलं पाहिजे : आ. श्रीकांत भारतीय
शिंदे-फडणवीस सरकारमधील आ. बच्चू कडू आणि आ.रवी राणा या दोन आमदारांमध्ये सद्या वाक युद्ध सुरु आहे. त्यांच्यावर भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी आपली प्रतिक्रीया दिली असून दोघांनीही बोलतांना महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती जपावी, असा सल्ला आमदार भारतीय यांनी दिला आहे. दोन्ही नेते जनतेतून निवडून आलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता ही राजकीय संस्कृती समजणारी जनता आहे.त्यामुळे दोन्ही नेत्यांनी समजदारीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 August 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      मुंबईत विधान भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ केल्याचाही आरोप
·      राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार
·      नांदेडचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानभवनात गौरव  
·      शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल केलेल्या याचिकांवरच्या आजच्या सुनावणीबाबत अस्पष्टता
·      मुंबईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अडोतीस कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
·      मराठी भाषेतल्या बाल साहित्यासाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार ९१३ रुग्ण, मराठवाड्यात ४९ बाधित  
आणि
·      नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं निधन
****
 सविस्तर बातम्या
विधान भवन परिसरात काल सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. विधानभवनाच्या पायर्रांवर सत्ताधारी शिंदे गटातले आणि महाविकास आघाडीचे आमदार घोषणा देत आमनेसामने उभे राहीले. त्यावेळी या दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. विरोधी पक्षाचे लोक रोज आमच्या विरोधात घोषणाबाजी करत असतात, आज आम्ही घोषणाबाजी केली तर त्यांनी धक्काबुक्की केल्याचं, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं, तर, सत्ताधारी पक्ष सदनात आमचा आवाज उमटू देत नाही आणि सदनाच्या बाहेरही आमचा आवाज बंद करतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी केला. यावेळी एका आमदाराने शिवीगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांना शांत करत सभागृहात घेऊन गेले.
****
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांना धक्काबुक्की होणं हे दुर्दैवी असून, हे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी आणि जनतेचा अपेक्षाभंग होईल, असं काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आंदोलन करणं हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे, पण आता सत्ताधारीच आंदोलन करत आहेत. सत्ताधारी पक्षाने जबाबदारीने वागलं पाहिजे, असंही थोरात यांनी नमूद केलं.
****
राज्यात कुटुंब न्यायालयांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. पाच वर्षांच्या कालावधीसाठी स्थापन करण्यात आलेल्या, लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, आदी ठिकाणची प्रत्येकी एक, याप्रमाणे एकूण चौदा कुटुंब न्यायालयं कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली.
****
राज्यातल्या गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ही माहिती दिली. पोलीस दलात मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. एका अधिकाऱ्यांस एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यातल्या वीज वितरण यंत्रणेतल्या फिडर सेपरेशनचं काम प्राधान्यानं ठराविक कालाव��ीत पूर्ण करणार असल्याची माहिती, फडणवीस यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. लातूर जिल्ह्यात सिंगल फेज रोहित्र दुरूस्त करून अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मौजे सकनेवाडी शिवारात उच्चदाब वाहिनीच्या विद्युत खांबाचा ताण तुटून खांब पडल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात तत्काळ वस्तुस्थिती तपासून कारवाई करण्यात येणार असल्याचं, त्यांनी जाहीर केलं.
लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सगळ्या संबंधिता��ची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल असं मंत्री दीपक क��सरकर यांनी, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
****
राज्यात धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आहे, त्यात काही त्रुटी असतील तर त्या दूर करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांनी दिलं आहे. सदस्य नितेश राणे यांनी मांडलेल्या एका लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही चर्चेत भाग घेतला होता.
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या दोषमुक्तीच्या, कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात, वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याच्या विधि आणि न्याय विभागाच्या निर्णयाला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारात स्थगिती दिल्याची माहिती, फडणवीस यांनी दिली. हे प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याच्या कायदेशीर तरतुदी पडताळून पाहू, वेळप्रसंगी महाधिवक्त्यांचं मत घेऊ आणि कायदेशीर कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
****
विधानभवनाच्या प्रवेशद्वारासामोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे उस्मानाबादचे शेतकरी सुभाष देशमुख यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका, कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनंती करत, शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीनं सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही पवार यांनी त्यांना दिलं. देशमुख यांनी परवा विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
****
नांदेडचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त काल विधानभवनात त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कष्टकरी, कामगार आणि दीनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे धोंडगे, यांना दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या. धोंडगे यांनी आपल्या कार्यातून विधिमंडळाची परंपरा अधिक समृद्ध केली, असे गौरवोद्गार, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी काढले.
धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेत काल अर्ध्या तासांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, हरीभाऊ बागडे यांची त्यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे केली.  
****
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं राज्यातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल केलेल्या विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुनावणी होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. न्यायालयाच्या दैनंदिन कामकाजात या याचिकांवरच्या सुनावणीचा आजच्या कामकाजात समावेश करण्यात आला नसल्यामुळे ही अस्पष्टता निर्माण झाली आहे. मात्र घटनापीठ ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस घेऊ शकते. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये हे प्रकरण पाच न्यायाधीशां��्या पीठाकडे सोपवण्यात आलं  होतं. त्याचवेळी यावरची सुनावणी गुरुवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
****
मुंबईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये अडोतीस कोटी रुपयांच्या फसवणूक आणि घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मुंबई महापालिकेनं मुंबईतल्या वेगवेगळ्या जंबो कोविड केंद्रांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी काढलेल्या निविदा मिळवण्यासाठी, जाणीवपूर्वक कंपनीच्या भागीदारीची बनावट कागदपत्रं सादर केली, आणि वरळी तसंच दहिसर जम्बो कोविड केंद्राचं कंत्राट प्राप्त केलं, यासह इतर आरोप सोमय्या यांनी या तक्रारीत केले आहेत.
****
एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना युपीआय, क्यु आर कोड, आदी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकिट काढता येणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली. या 'डिजिटल' प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशी पाच हजार ॲण्ड्राईड तिकिट यंत्रं महामंडळानं घेतली आहेत. चन्ने यांच्या हस्ते महामंडळाच्या मुख्यालयात काल या तिकीट यंत्रांचा शुभारंभ करण्यात आला. ही डिजिटल तिकीट वाटप यंत्र पहिल्या  टप्प्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर तसंच भंडारा या विभागांना वितरीत करण्यात आली आहेत.
****
साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. मराठी भाषेतल्या बाल साहित्यासाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीची निवड झाली आहे. विविध २३ भाषांमधल्या साहित्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. मराठीसाठी साहित्याची निवड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत सासणे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर आणि साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांच्या समितीनं केल्याचं, अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. यंदाचे युवा साहित्यिक पुरस्कारही अकादमीनं जाहीर केले, मात्र मराठी भाषेसाठीचा पुरस्कार काल जाहीर झाला नाही. हा पुरस्कार स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असं अकादमीकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या गणेश चतुर्थीपूर्वी शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांचे पगार देण्याबाबत वित्त विभागानं काल शासन निर्णय जारी केला. यंदा गणेशचतुर्थी ३१ ऑगस्टला असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचं वेतन २९ ऑगस्टपूर्वी व्हावं याकरता शिक्षक भारती या संघटनेनं वित्त आणि शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला होता, अशी माहिती या संघटनेनं एका पत्रकाद्वारे दिली आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार ९१३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ८९ हजार ३८९ झाली आहे. काल या संसर्गानं राज्यात पाच ��ुग्णांचा मृत्यू झाला, तर एक हजार १८५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख २८ हजार ६०३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १२ हजार ५७८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात नांदेड जिल्ह्यातल्या १२, लातूर ११, उस्मानाबाद दहा, औरंगाबाद आठ, जालना चार, बीड दोन, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  
****
लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायती प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्याचा निर्णय, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कचरा विघटन तज्ज्ञ रामदास कोकरे आता लातूर जिल्ह्याच्या नगर परिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी काल निलंगा नगर परिषद आणि शिरूर अनंतपाळ नगर पंचायतीपासून या कामाची सुरुवात केली. येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनी ही शहरं कचरा मुक्त होतील, असं नियोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमधून कचरा मुक्ती अभियान सुरू होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटावरुन एक फुटावर स्थिर करुन नऊ हजार ४३२ आणि सांडव्यद्वारेदेखील नऊ हजार ४३२, असं एकूण १८ हजार ८६४ घनफूट प्रतिसेकंद वागेनं  पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर आता औरंगाबाद जिल्हा परिषद देखील, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन - एम के सी एल सोबत करार करत, व्यवसाय व्यवस्थापन शाखा - बीबीए च्या १५ उमेदवारांना, इंटर्नशिपची संधी देणार आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी यास पात्र असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली. हे उमेदवार जिल्हा परिषदेतल्या जुन्या अधिकारी कर्मचाऱ्यांना टेक्नोसेव्ही म्हणून सहाय्य करतील, या काळासाठी त्यांना किमान दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार असल्याचं, गटणे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बापूसाहेब ऊर्फ श्रीनिवासराव देशमुख गोरठेकर यांचं काल रात्री निधन झालं, ते ७४ वर्षांचे होते. गोरठेकर हे दोन वेळा भोकर विधानसभा मतदार संघातून निवडून आले होते. ते नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं.
****
सीटूशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र ऊसतोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं, बीड जिल्ह्यात माजलगाव इथं राज्यस्तरीय ऊसतोडणी कामगार परिषदेला कालपासून प्रारंभ झाला. शहरातून मोटारसायकल फेरी काढून परिषदेला सुरुवात झाली. सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्यासह अन्य नेते या परिषदेला उपस्थित आहेत. प्रदीर्घ संघर्षानंतर ऊसतोडणी कामगारांचं कल्याणकारी महामंडळ घोषित झालं, पण त्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी, तसंच या कामगारांच्या इतर प्रमुख मागण्यांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता या खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांसाठी, येत्या एकतीस ऑगस्टपूर्वी इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचं, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य कृषी विभागातर्फे ही पीक स्पर्धा योजना राबवण्यात येते.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरग्याचे तहसीलदार राहुल पाटील याला वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल अटक केली. तक्रारदाराच्या घराच्या बांधकामासाठी लागणारी चार ट्रक वाळू मध्यस्थामार्फत देण्यासाठी आणि त्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      विधान भवन परिसरात आंदोलनादरम्यान सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की.
·      नद्या रुंदीकरण आणि खोलीकरणासंदर्भात राज्यस्तरावर धोरण आखण्यात येणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा.
·      एसटी प्रवासाचं तिकीट युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून काढता येणार.
·      साहित्य अकादमीचे बालसाहित्य पुरस्कार; संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीची निवड.
आणि
·      लातूर जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायती कचरा मुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय.
****
विधान भवन परिसरात आज सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे आमदार घोषणाबाजी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांनी तिथे येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी या दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. विरोधी पक्षाचे लोक रोज आमच्या विरोधात घोषणाबाजी करत असतात, आज आम्ही घोषणाबाजी केली तर त्यांनी धक्काबुक्की केल्याचं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं, तर, सत्ताधारी पक्ष सदनात आमचा आवाज उमटू देत नाही आणि सदनाच्या बाहेरही आमचा आवाज बंद करतो, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी केला.
****
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की होणं हे दुर्दैवी असून, हे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी आणि जनतेचा अपेक्षाभंग होईल, असं काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. आंदोलन करणं हा विरोधी पक्षांचा अधिकारच आहे, पण आता सत्ताधारीच आंदोलन करत आहेत. सत्ताधारी पक्षाने जबाबदारीनं वागलं पाहिजे, असंही थोरात यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी एक ट्विट करत, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकड�� केली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी विनंतीही सुळे यांनी या संदेशातून केली आहे.
****
राज्यातल्या सगळ्या नद्यांमधला गाळ काढणं, तसंच रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात धोरण आखण्यात येणार असून यासंदर्भातली कार्यवाही युद्ध पातळीवर करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. चिपळूण इथे वशिष्ठी नदीला आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना भरपाई देण्यासंदर्भात सदस्य सुनील राणे यांनी प्रश्न उपस्थित केला, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वर्षी नदीतून गाळ काढण्याचं काम झाल्यानं गेल्या वर्षींच्या तुलनेत यावर्षी चिपळूणमध्ये पाणी शिरलं नाही, त्यामुळे भविष्यात राज्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूणच्या धर्तीवर उपाययोजना करण्यात ये��ल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
लातूर विमानतळाच्या विकासाबाबत लवकरच सगळ्या संबंधितांची बैठक घेतली जाईल आणि तोडगा काढला जाईल असं मंत्री दीपक केसरकर यांनी आज, याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
****
राज्यात कुटुंब न्यायालयांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. पाच वर्षांच्या कालावधी साठी स्थापन करण्यात आलेल्या लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आदी ठिकाणची प्रत्येकी एक प्रमाणे एकूण चौदा कुटुंब न्यायालयं नियमित किंवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
****
एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना युपीआय, क्युआर कोड, आदी डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून तिकिट काढता येणार आहे, महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली. या ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकिट खरेदी करता येईल अशी पाच हजार ॲण्ड्राईड तिकिट यंत्रं महामंडळानं घेतली आहेत. चन्ने यांच्या हस्ते महामंडळाच्या मुख्यालयात आज या तिकीट यंत्रांचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे एसटी प्रवासात रोखीने व्यवहार कमी होण्यास मदत होणार असून सुट्या पैशांची समस्याही कायमस्वरुपी सुटणार आहे. ही डिजिटल तिकीट वाटप यंत्र पहिल्या टप्प्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर तसंच भंडारा या विभागांना वितरीत करण्यात आली आहेत.
****
साहित्य अकादमीचे बालसाहित्यासाठीचे पुरस्कार आज जाहीर झाले. मराठी भाषेतल्या बाल साहित्यासाठी संगीता बर्वे यांच्या ‘पियुची वही’ या कादंबरीची निवड झाली आहे. विविध २३ भाषांमधल्या साहित्यासाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. मराठीसाठी साहित्याची निवड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत सासणे, प्राध्यापक प्रवीण बांदेकर आणि साहित्यिक प्रेमानंद गज्वी यांच्या समितीनं केल्याचं अकादमीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. यंदाचे युवा साहित्यिक पुरस्कारही आज अकादमीनं जाहीर केले, मात्र मराठी भाषेसाठीचा पुरस्कार आज जाहीर झाला नाही. हा पुरस्कार स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल, असं अकादमीकडून सांगण्यात आलं आहे.
****
पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातून एक हजार २८८ किलो वनस्पती तुपाचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. संबंधित दुकानातून वनस्पती तुपाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात हे वनस्पती तूप मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे निदर्शनास आलं. त्यानंतर या वनस्पती तुपाचा सात लाख ३८ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध व्हावं आणि आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या वनस्पती तुपाची खरेदी विक्री करू नये, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे.
****
देशाच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येनं आज दोनशे दहा कोटी अठ्ठावन्न लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातल्या बारा ते चौदा वर्षं वयोगटातल्या चार कोटींहून जास्त मुलामुलींना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे, तर, अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटाच्या चौदा कोटी तीस लाखांहून जास्त नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे.
राज्यात आज सकाळपासून एकतीस हजारपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांना आतापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ५४ लाखाच्या वर गेली आहे.
दरम्यान, कोविड लसीची पहिली मात्रा परदेशात घेतलेल्या नागरिकांना भारतात दुसरी मात्रा किंवा खबरदारीची मात्रा घेता येणार आहे. उपलब्ध लसींपैकी कोणतीही एक लस घेण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे. उस्मानाबादच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायती प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी घेतला आहे. जागतिक कीर्तीचे कचरा विघटन तज्ज्ञ रामदास कोकरे आता लातूर जिल्ह्याच्या नगर परिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांनी काल निलंगा नगर परिषद आणि शिरूर अनंतपाळ नगर पंचायती पासून या कामाची सुरुवात केली. येत्या सतरा सप्टेंबरला म्हणजे मराठवाडा मुक्ती दिनी ही शहरं कचरा मुक्त होतील असं नियोजन करण्यात आलं आहे. रामदास कोकरे यांनी यापूर्वी विविध शहरांमध्ये राबवलेल्या शून्य कचरा मोहिमांची दखल जगानं घेतली असून तशीच मोह��म ते आता लातूर जिल्ह्यात राबवणार आहेत. या पद्धतीत कचऱ्याचं सतरा प्रकारात वर्गीकरण होतं आणि प्रत्येक प्रकारापासून नगरपरिषदेला उत्पन्नही मिळू शकतं. या मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी सहाआयुक्त कोकरे जिल्ह्यातल्या प्रत्येक शहराला भेट देणार असून उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमधून कचरा मुक्ती अभियान सुरू होणार आहे.
****
पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर आता औरंगाबाद जिल्हा परिषद देखील महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन - एमकेसीएलसोबत करार करत व्यवसाय व्यवस्थापन शाखा - बीबीए च्या १५ उमेदवारांना इंटर्नशिपची संधी देणार आहे. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी यासाठी पात्र असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 April 2020 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ एप्रिल २०२० सायंकाळी ६.०० ****
·      टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन.
·      टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी.
·      कोरोना विषाणूविरुद्ध स्वसंरक्षण उपकरणांच्या निर्मितीमधे वाढ.
आणि
·      औरंगाबादमधे आणखी एका कोरोना विषाणू बाधीत रुग्णाचा ��ृत्यू.
****
कोरोना विषाणू महामारीमुळे देशात लागू टाळेबंदीचे सकारात्मक परिणाम झाले असून देश गेल्या दीड महिन्यांत हजार��� लोकांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधताना त्यांनी कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यामधे केंद्र सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशांचं राज्यांनी काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. लाल क्षेत्रांचं रुपांतर केशरी आणि त्यानंतर हरित क्षेत्रामध्ये करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन आणि वरिष्ठ अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते. देशात आतापर्यंत दोन वेळा टाळेबंदी करण्यात आली असून आता पुढं काय आणि कसं करायचं याचा विचार करण्याची वेळ आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. अर्थव्यवस्था आणि कोरोना विषाणू विरोधातल्या लढ्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं तसंच त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं कराव्या लागलेल्या टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. गेल्या दीड महिन्यात आपण हजारो लोकांचे जीव वाचवू शकलो, असं ते म्हणाले. आणखी काही महिने कोरोना विषाणूचा परिणाम जाणवत राहील असं तज्ञांचं मत असून त्यामुळे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणं आणि मास्क लावणं कायम ठेवणं पुढचा काही काळ आवश्यक राहणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या निमित्त पुन्हा एकदा जनतेला केलं आहे.
****
पंतप्रधानांशी संवाद साधताना बहुतांश मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी केल्याचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री व्ही.नारायणसामी यांनी म्हटलं आहे. तीन मे पर्यंत लागू टाळेबंदी उठवताना सावध भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी एकमतानं पंतप्रधानांना सांगितलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूचे देशातील रुग्ण वाढत असल्यामुळे टाळेबंदी उठवण्याबाबत काय करावं, यावर पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याचं पुदुचेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारांसाठी लागणाऱ्या स्वसंरक्षण वैद्यकीय उपकरणांची देशभरातील निर्मिती क्षमता एक लाखांपेक्षा जास्त झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आतापर्यंत देशभरात साधारणपणे दहा लाखांपेक्षा जास्त उपकरणांचं उत्पादन झालं असून, प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार ही उपकरणं पुरवली जात आहेत, तसंच हा पुरवठा सुरळीत होण्याकरता, उत्पादक आणि विविध औद्योगिक संस्थांशी समन्वय राखत, पुरवठा यंत्रणेतले अडथळे दूर करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे लागू टाळेबंदीच्या काळात युवक बेजबाबदारपणे वागले तर ते या विषाणूचा संसर्ग कुटुंबातील ज्येष्ठांना देतील, असा इशारा औरंगाबाद महापालिका आयुक्त ��स्तिककुमार पांड्ये यांनी दिला आहे. सामाजिक संपर्क माध्यमातून या संदर्भातील माहिती प्रसारित करताना त्यांनी आज याची आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोना विषाणू बाधीत बहुतांश रुग्ण २१ ते ४० वर्षे वयोगटातील असून त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, असं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. औरंगाबाद शहरातील ५१ रुग्णांपैकी केवळ दोन जण विदेशात प्रवास करून आलेले आणि एक राष्ट्रीय पातळीवर प्रवास केलेला आहे. त्यातील दहा रुग्ण या विषाणूचे रुग्ण आढळलेल्या भागातील असून ३८ रुग्ण प्रवास केलेल्यांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग झालेले असल्याचं औरंगाबाद महापालिका आयुक्त पांड्ये यांनी नमूद केलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या किलेअर्क परिसरातल्या साठ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत महिलेचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीमधे उपचारां दरम्यान मृत्यू झाला. या महिलेला मधुमेह, मूत्रपिंड विकार आणि उच्च रक्तदाब होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी दिली आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे औरंगाबादमधली कोरोना विषाणू बाधीत मृतांची संख्या सहा झाली आहे.
****
औरंगाबादमधील एका १७ वर्षीय कोरोना विषाणू बाधीत रूग्णाला आज यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. शहरातल्या बायजीपुरा परिसरात राहणारा हा मुलगा मुंबईहून आला होता. औरंगाबादमधे आतापर्यंत एकूण २३ कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरे झाले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय तसंच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीत २४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याचं जिल्हा सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत करण्यात आलेल्या ३४ रुग्णांच्या तपासणीवेळी हे स्पष्ट झालं असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकूर यांनी दिली आहे. उदगीर इथं ३०, अंबाजोगाई इथल्या दोन रुग्णांच्या चाचण्या आज घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
****
पालघर इथल्या हत्याकांडामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या चालक निलेश तेलगाडे यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणासह त्यांची संपूर्ण जबाबदारी लातूरमधील भाजप जिल्हाध्यक्ष रमेश कराड आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी घेतली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या पाणी टंचाई सदृश्य भागांना गरज पडल्यास औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांड्ये आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांच्याशी संवाद साधून पालकमंत्री देसाई यांनी याची शक्यता पडताळून पाहिली. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. तरीही शहरातील २० ते २५ टक्के विभागांत पाणी पुरवठा करण्यामधे अडचणी येत असून अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला ��ात असल्यानं ही शक्यता पडताळून पाहिली जात आहे.
****
राज्य सरकारच्या निर्देशांनुसार नांदेड जिल्हा प्रशासनानं काही अटींवर कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रासायनिक खतं, बी-बियाणांची दुकानं पूर्ववत सुरू झाली आहेत. नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील आडगावचे प्रगतशील शेतकरी दिगंबरराव क्षीरसागर यांनी आज रासायनिक खतांची खरेदी केली असून पेरणी पूर्वतयारी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा इथं खासदार हेमंत पाटील यांनी उप कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीनं ५०० गरजू नागरिकांना धान्य पाकिटांचं वाटप केलं. खासदार पाटील यांनी जिल्ह्यात विविध संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून गरजूंना सॅनिटायझर, मास्क, धान्याची पाकिटं तसंच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना फळांचं वाटप केलं.
****
औरंगाबाद शहरातील ज्योतीनगर इथं गरजूंना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नगरसेवक ऋषिकेश खैरे यांनी अन्नधान्य आणि किराणा साहित्याचं वितरण केलं आहे. गुलमंडी, औरंगपुरा इथंही त्यांच्यावतीनं अन्न धान्य, किराणा वितरण करण्यात आलं. आमदार प्रदीप जैस्वाल तसंच किशनचंद तनवाणी यावेळी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील दिडशे गरजू कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतकं अन्नधान्य आणि किराणा साहित्य वाटप करण्यात आल्याचं खैरे यांच्या कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. एका ४५ वर्षीय महिलेला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती जिल्ह्यधिकारी एम प्रदीपचंदन यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच जिल्ह्यातील गराडा आणि मेंढा या गावाला नियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
सातारा जिल्ह्यातला चौथा कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरा झाला असून त्याला शासकीय क्रांतीसिंह रुग्णालयातून आज सुटी देण्यात आल्याची माहिती शल्य चिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे. पुढील १४ दिवस या रुग्णाला घरीच विलगीकरणात राहावं लागणार आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ३३ आहे.
****
कोरोना विषाणूच्या साथीमुळं धुळे शहरात कडकडीत संचारबंदी लागू असताना महापालिका व्यापारी संकुलातील मोबाईल दुकानात आज चोरी झाली. यात हजारो रुपयांचे मोबाईल आणि साहित्य चोरी गेल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.  
****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 November 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.०० ****
राज्याचं मुख्यमंत्रीपद हे आपल्यासमोर एक आव्हान असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विधीमंडळ वार्ताहर संघटनेकडून त्यांचा आज सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. एक तर हे सरकार तीन पक्षांचं असून महागाई, टंचाई, भ्रष्टाचार ही राज्यासमोरची आव्हानं असून त्यांचा आपल्याला सामना करायचा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या पूर्ण कामाचं परीक्षण केल्यानंतरच हे काम केलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं. पत्रकारांनी सरकारचे नाक, कान, डोळे व्हावं तसंच प्रश्र्न मांडताना ते सोडवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. हे सरकार जनतेशी नम्रपणे वागलं पाहिजे तसंच जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही, यावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह नवीन शपथविधी झालेल्या मंत्र्यांनी तत्पूर्वी मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी नव्या मंत्रिमंडळातील मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदींसह महाराष्ट्र विकास आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते.
****
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी आज एका संदेशात ही टीका केली आहे. मग बहुमताचे दावे कशासाठी, या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का, नियमबाह्य पद्धतीनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी, स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का, असे प्रश्नही फडणवीस यांनी या संदेशात उपस्थित केले आहेत.
****
तरुण साहित्यिकांनी भयमुक्त साहित्य निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत ज्येष्ठ नाटककार तथा ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी व्यक्त केलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातल्या चार गुणवंतांचा यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातले दोन लाख नव्वद हजार नऊशे बत्तीस शेतकरी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मिळवून एकशे सहा कोटी एकोणसत्तर लाख शेहचाळीस हजार रुपयांचं अनुदान जमा करण्यात आलं आहे. आजपर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या ‘पीएम किसान पोर्टलवर’ अद्ययावत करण्यात येत असून, अनुदान रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असं जालना जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्यातल्या तहसिल कार्यालयात आजपासून केंद्र सरकारच्या भारतनेट या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्याला जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या प्रमुक उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. भारतनेट-महानेट प्रकल्प महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत असून या प्रकल्पाद्वारे परभणी जिल्हातली चार तहसिल कार्यालयं आणि त्याअंतर्गत येणाऱ्या चारशे अठ्ठावीस ग्रामपंचायतींना ऑप्टीकल फायबर नेटवर्कनं जोडण्यात येणार आहेत.
****
परभणी शहरातील धारमार्ग परिसरात रस्��्यांवर पडलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, असे आदेश महापौर अनिता सोनकांबळे यांनी दिले आहेत.
****
कापूस पणन महासंघातर्फे परभणी जिल्ह्यात पाथरी तसंच गंगाखेड इथं सोमवार दिनांक दोन डिसेंबर २०१९ पासून केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस खरेदी सुरू होणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कापूस शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असं आवाहन कापूस पणन महासंघाचे परभणी विभागाचे संचालक पंडितराव चोखट तसंच विभागीय व्यवस्थापक ए.डी.रेणके यांनी केलं आहे.
****
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातल्या गावातील शेतकऱ्यांचे बासस्ट हेक्टर शेतातील धानाचे पुंजके जळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज याची पाहणी करून मोबदला देण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत.
****
0 notes