#वहिनी घरी आहेत
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : ४५
घरी परतल्यावरही भाऊसाहेब भकास चेहर्याने एका खुर्चीवर अंग चोरून बसून होते. त्यांच्या जवळ जाऊन भोसलेंनी विचारलं, "भाऊसाहेब, आपली मित्रमंडळी येईपर्यंत तुम्ही थोडा वेळ पडतां कां? बेडवर आडवे होऊन विश्रांती घेेतलीत तर तुम्हांला बरं वाटेल, तरतरी येईल!" भाऊसाहेबांनी यांत्रिकपणे मान हलवली तशी भोसलेंनी त्यांना ऊठण्यासाठी आधार दिला आणि बेडरूमकडे घेऊन गेले! विकलपणे हळुहळु पावलं टाकीत जाणाऱ्या त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे भरल्या डोळ्यांंनी बघत मनोरमा म्हणाली, "दहा तासांत दहा वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे वाटतात ग! सत्तरी पार केल्यावरही त्यांच्या अंगात सतत केवढा उत्साह असायचा, शुभदा! तसे बोलघेवडे नव्हते, पण जे कांही मोजकं बोलायचे ते अगदी मार्मिक. चेहरा कायम प्रफुल्लित. त्यांना कधी चिंताक्रांत वा दुर्मुखलेलं पाहिल्याचं आठवतच नाहीं. त्यामुळे त्यांची ही अवस्था अधिकच केविलवाणी वाटते ग!" " जबर मानसिक धक्क्यामुळे ते खचले आहेत, मनोरमा!" शुभदा तिला समजावीत म्हणाली, "थोडी विश्रांती मिळाली की आपोआप भानावर येतील! तूं म्हणतेस तसा त्यांचा मूळ स्वभावच आनंदी आणि उत्साही असला, तर मित्रमंडळींशी बोलून मन मोकळं केल्यावर ते नक्की पूर्वपदावर येतील!" "येतीलच आमची मित्रमंडळी एवढ्यांत!" कीचनमधे येत भोसले म्हणाले, "आम्ही एकुण तेरा जण असूं! दोघे कांही वैयक्तिक कारणाने येणार नसल्याचं अनंतराव म्हणाले. तुम्ही दोघी ब��हेर आलांत तर पटकन सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था बघून घेऊं. मला वाटतं कीचनमधल्या कांही खुर्च्या बाहेर न्याव्या लागतील!"
भाऊसाहेबांना भेटण्यासाठी एकत्र जमलेल्या आपल्या मित्रमंडळींना उद्देशून भोसले म्हणाले, "मी आतां भाऊसाहेबांंना घेऊन येतो. आपणां सर्वांना त्यांचा मितभाषी स्वभाव ठाऊकच आहे;-- पण आज तरी त्यांनी मनांत जे कांही आहे ते सगळं घडाघडा बोलून मोकळं होणं आवश्यक आहे. त्यांना बोलकं करण्यासाठी आपणां सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील! फक्त एका वेळी एकानेच बोलावं आणि तेही शक्य तेवढ्या सौम्य भाषेत असं वाटतं!" दहा- बारा मिनिटांतच भोसलेंबरोबर भाऊसाहेब बाहेर आले! त्यांचा गंभीर पण शांत चेहरा पाहून त्यांच्या मित्रमंडळींना हायसं वाटलं! आल्या आल्या हात जोडून भाऊसाहेब म्हणाले, "माफ करा मित्रांनो, आजच्या पार्टीचा माझ्या पत्नीमुळे विचका झाला!" चटकन पुढे होऊन भाऊसाहेबांनी जोडलेले हात स्नेहभराने आपल्या हातीं घेत एक ज्येष्ठ मित्र म्हणाले, "माफी कसली मागताय्, भाऊसाहेब! अहो,आजच्या एका पार्टीचं काय घेऊन बसलाहांत;--आपण तर सतत पार्ट्या करीतच असतो की! आधी वहिनी कशा आहेत ते आम्हांला सांगा!" "तुम्हां सर्वांच्या सदिच्छांमुळे तिला कसलीही गंभीर इजा झालेली नाही!" एवढया साऱ्या मित्रांच्या उपस्थितीमुळे भारावलेले भाऊसाहेब म्हणाले. "म्हणजे धोका टळला ना!" दुसरे एक ज्येष्ठ मित्र भाऊसाहेबांना घट्ट आलिंगन देत म्हणाले, "जिवावर बेतलेलं शेपटीवर निभावलं!" आपल्या दोन्ही ज्येष्ठ मित्रांना आपापल्या जागेवर बसण्याची खूण करीत भोसले भाऊसाहेबांना त्यांच्यासाठी रिकाम्या ठेवलेल्या जागेपाशी घेऊन गेले. भाऊसाहेबांना आग्रहाने तिथे बसवून भोसले म्हणाले, "भाऊसाहेब, वहिनी सुखरूप आहेत हे ऐकून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला किती बरं वाटलं असेल ते शब्दांत सांगण्याची गरज नाहीं! मात्र 'हे जिवावरचं संकट वहिनींनी कां ओढवून घेतलं' ते तुम्ही सर्वांना सांगणं अतिशय गरजेचं आहे!"
"माझ्या मुलीच्या शिक्षिका म्हणून मी ज्यांना ओळखतो, त्या मनमिळाऊ आणि हंसतमुख सप्रेमॅडम एवढं टोकाचं पाऊल उचलुं शकतील हे मला अजूनही खरं वाटत नाहीं!" अनंत शांत पण आग्रही स्वरांत म्हणाला, "त्यामागे तसंच कांही गंभीर कारण असलं पाहिजे;-- आणि ते तुम्ही सांगीतल्याविना कुणालाही ओळखतां येणार नाहीं! भाऊसाहेब, अगदी तुमचे जवळचे मित्र असलेल्या मनोहरपंतांनाही!! "अनंतराव म्हणाले ते १०० टक्के खरं आहे!" भोसले म्हणाले, "तुमच�� हा मित्रपरिवार इथे जमला आहे तो फक्त तुमची समस्या जाणून घेऊन तिच्यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी! पण मूळांत समस्याच समजली नाहीं, तर उपाय कसा शोधणार?" भोसलेंच्या कळकळीच्या आवाहनात जाणवणाऱ्या मित्रपरिवाराच्या आपुलकीने भाऊसाहेबांना भरून आलं! ते सद्गदित स्वरांत म्हणाले, "घराघरांत घडणारं महाभारतच या घटनेमागे आहे! जास्त लांबण न लावतां एवढंच सांगतो की आमचे दोन्ही चिरंजीव गिरीश आणि शिरीष आम्ही त्यांच्या सोबत रहावं म्हणून मागे लागले होते;-- पण सुहासिनीला ते अजिबात मान्य नव्हतं!" "पण ते दोघे तर स्वतंत्र राहतात ना?" कुणीतरी शंका उपस्थित केली. " हो! लग्न झाल्यावर नोकरीच्या सोयीसाठी दोघे आमच्या संमतीने वेगळे राहूं लागले!" नजिकच्या भूतकाळातील आठवणी जागवीत भाऊसाहेब सांगू लागले, "सगळं कसं सुरळीत चाललं होतं;-- पण अचानक २ महिन्यांपूर्वी पॅरॅलिसिसचा झटका सुहासिनीच्या दरवाजावर टकटक करून गेला! ऐनवेळी लक्षणं ओळखून डाॅक्टरांनी योग्य ते उपचार तांतडीने केल्यामुळे पॅरॅलिसिसमधून ती वाचली;-- पण तिच्या एकुण हालचालींवर खुप मर्यादा आल्या! ते समजल्यापासून चिरंजीवांनी 'तुम्हांला एकटं राहूं देण्याचा धोका आम्हांला पत्करायचा नाहीं!' असा धोशा लावला! आम्ही खुप विरोध केला, पण दोघे आतां हट्टालाच पेटले आहेत! येत्या २-४ दिवसांत आम्हांला इथून घेऊन जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे! हे समजल्यावर कमालीची हतबल होऊन बहुधा सुहासिनीने करूं नये ते केलं असावं!"
२९ जून २०२३
0 notes
Text
भाभी जी घर पर हैं मधील तिवारी जी रोहिताश्व गौर यांनी पुष्पाला ताप दिला
भाभी जी घर पर हैं मधील तिवारी जी रोहिताश्व गौर यांनी पुष्पाला ताप दिला
भाभी जी घर पर हैं तिवती जी उर्फ रोहिताश्व गौर श्रीवल्ली व्हिडिओ: अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाचा ताप अजूनही लोकांच्या डोक्यावर चढत आहे. सामान्य जनताच नाही तर बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटीही ‘पुष्पा’च्या स्टाईलची कॉपी करताना दिसत आहेत. ‘तिवारी जी’ म्हणजेच ‘भाभी जी घर पर हैं’मधील रोहिताश्व गौर देखील पुष्पाच्या रंगात दिसला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या गाण्यापासून ते त्याच्या संवादापर्यंत सोशल…
View On WordPress
#rohitashv gaur funny video on पुष्पा#rohitashv गौर व्हायरल व्हिडिओ#अल्लू अर्जुन#अल्लू अर्जुन पुष्पा#अल्लू अर्जुन पुष्पा चित्रपट#चित्रपट पुष्पा#तिवारी जी उर्फ रोहिताश्व गौर#पुष्पा#पुष्पा वर rohitashv गौर महाकाव्य व्हिडिओ#भाभी जी घर पर हैं#रोहितश्व गौर#रोहिताश्व गौर#रोहिताश्व गौरची अभिनय कारकीर्द#वहिनी घरी आहेत
0 notes
Text
कॉलेजचे प्रथम वर्ष...
१९८३ साली मराठवाड्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाले. त्यावेळेस लातूरच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. कॉलेजचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे बर्याच सुविधांचा अभाव होता. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल तशा तशा सुधारणा होत होत्या. गेस्ट लेक्चरर्स बोलावून एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे. कॉलेजची स्वतंत्र बिल्डींगही नव्हती. सायन्स कॉलेजच्या इमारतीवर चौथा अन पाचवा असे दोन मजले बांधले होते. तिथेच वर्ग भरायचे. पायर्या चढण्या उतरण्याचा मस्त व्यायाम व्हायचा. केमिस्ट्री, फिजिक्सचे प्रॅक्टीकल्स सायन्स कॉलेजच्या लॅबमध्येच व्हायचे. वर्कशॉप अजून तयार झाले नव्हते. जुन्या बिल्डींगच्या एका भागात कारपेंटरी, ब्लॅकस्मिथी, वेल्डींग, इलेक्ट्रीकल काम असे गटा गटाने शिकवले जायचे. रंधा मारतांना हाताला गोळे यायचे. लेथ मशीनवर हात कपडे काळे व्हायचे. शिकणारेही अन शिकवणारे दोघेही नवीन. सगळीच मजा होती. पण हळुहळू सुधारणा होत होती.
कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या मुलांनी प्रवेश घेतला होता. मुलगी मात्र एकच होती, पण ती फर्स्ट इयर नंतर पुन्हा कधी दिसली नाही. सुरुवातीला जीन्स, टीशर्ट अशा वेशभुषेतील मुलांसमोर बेलबॉटम, ओपन शर्ट अशा अवतारात वावरणार्या मला थोडे बुजल्यासारखे व्हायचे. शर्ट इन करायची कधी सवयच नव्हती. पण जसे जसे मित्र नवीन बनत गेले तसे मी त्या वातावरणात समरसून गेलो. दक्षिण भारतीय व हिंदी भाषिक मुलांबरोबर भाषेची देवणघेवाण करतांना मजा यायची.
त्यावेळी मोठा भाऊ (दिलीप) लातूरलाच एम.एस.ई.बी.त सहाय्यक अभियंता होता. वहिनी, लहान पुतण्या व भावासोबतच मी त्याच्या सरस्वती नगरातल्या घरात रहायचो. पुतण्याला जवळच्याच एका बालवाडीत घातले होते. भावाची फिरायची ड्युटी असल्यामुळे बर्याचदा त्याच्यासोबत आम्ही सगळेच जायचो. काही वेळेस त्याच्या साईट्सवर जायचो. सिव्हिलची कामे कसे चालतात हे तो सांगायचा. अर्थात सगळं डोक्यावरुन जात होतं ही गोष्ट वेगळी म्हणा! पण खूप मजा यायची.
एकदा वहिनी माहेरी गेल्या होत्या. आम्ही दोघेच घरी होतो. दौर्यावरुन भाऊ रात्री उशीरा आला. आत बेडरुममध्ये झोपायला गेला. बेडरुमच्या खिडकीत माझे एक वाद्य ठेवलेले होते. मी सहज म्हणालो ‘खिडकीतले वाद्य हात घालून कुणी रात्री वाजवेल बरं!’ तो हसला आणि कपडे बदलून झोपला. काही वेळाने हळूच बाहेरच्या खोलीत येऊन झोपला. अर्थात एकट्याला झोप येत नव्हती म्हणून तो बाहेर आला, पण त्या वाद्य वाजवण्याशी त्याचा संबंध जोडून दुसर्या दिवशी आम्ही खूप हसलो.
त्याच्याकडे अल्विन पुष्पक स्कुटर होती. पण मला चालवता येत नव्हती. एका मित्राने दयानंद कॉलेजच्या ग्राऊंडवर त्याची स्वतःची स्कुटर मला चालवायला शिकवली. मलाच पेट्रोल भरुन द्यावे लागायचे. दोन चकरा झाल्या की तो म्हणायचा पेट्रोल संपले, आता उद्या. असे म्हणून दोन तीन दिवस त्याने मला शिकवायच्या निमित्ताने मजा करुन घेतली.
स्कुटर शिकल्यामुळे अधुनमधून अल्विन पुष्पक चालवायला मिळायची. एकदा वहिनीला बाजारात काही काम होते. त्यांना स्कुटरवर घेऊन गेलो. भावाची जीप बिघडली होती म्हणून ऑफीसला जायच्या वेळेच्या आत परत यायला त्याने सांगितले. पण परत यायला उशीर झाला. आम्ही येईपर्यंत तो निघून गेला होता. बहुतेक कुणीतरी घ्यायला आले असावे. स्कुटर देण्यासाठी मी त्याच्या ऑफिसला गेलो. पाहिले तर काय! समोरच माझी सायकल! तो म्हणाला ‘जीप नाही, स्कुटर तुम्ही घेऊन गेलात, मग काय करणार! आलो सायकलवरच!’ त्याच्या स्टाफला या प्रकाराची खूप गम्मत आणि आश्चर्य वाटले. या साधेपणामुळेच सर्व स्टाफ त्याला खूप मानायचा. थोडावेळ तिथे बसून सायकल घेऊन घरी आलो.
माझे बरेच मित्र घरी यायचे. भाऊ सिव्हील इंजिनिअर असल्यामुळे आमच्या सोबत गप्पा मारायला, आम्हाला शिकवायला त्याला खूप आवडायचे. अभ्यास कसा करावा हे तो सांगायचा. वाचून समजून घ्यायचे, मग सोप्या भाषेत त्याचे नोट्स काढायचे असे सांगायचा. त्यावेळी मी वेंकट नावाच्या एका मित्राकडे अभ्यासाला जायचो. बहुतेक वेळा तिथेच झोपायचो. त्याने हे नोट्सचे खूप मनावर घेतले. पुस्तकच्या पुस्तक शब्दश: लिहुन काढले. पान नंबरसहीत! पुस्तक वाचले काय अन नोट्स वाचले काय, दोन्ही सारखेच! कागदाचे गठ्ठेच गठ्ठे तयार झाले होते. पुस्तकांची हस्तलिखित कॉपीच तयार असल्यामुळे एकच पुस्तक असले तरी आमचे दोघांचेही भागायचे!
अभ्यास, कॉलेज, ट्यूशन असा आमचा व्यस्त दिनक्रम सुरु होता. ड्रॉईंग बोर्ड, ड्राफ्टर, कोरे कागद तसे��� काही पुस्तके भावाचेच मला मिळाले होते. त्याच्या इंजिनिअरिंगच्या वेळेसचे 1975-76 साल��े त्याने जपून ठेवलेले हे साहित्य कामाला येत होते.
सायकल हेच त्यावेळचे वाहन होते. टु व्हिलर वगैर लाड नव्हते. ड्रॉईंग बोर्ड काखेत पकडुन एका हाताने सायकल चालवत कसरत करत आम्हाला कॉलेजला जावे लागायाचे. असेच एकदा आम्ही मित्र मिळून जात असतांना अशोक हॉटेलच्या चौकात एक मित्र हाताला अवघड झाल्यामुळे रस्त्यातच पाय टेकवून ड्रॉईंग बोर्ड व्यवस्थित करत होता. आम्ही चार पाचजण त्याच्या बाजूला थांबलो. काही वेळाने मागे पाहिले तर ही भली मोठी गाड्यांची रांग! समोरच्या बाजूनेही काही गाड्या, रिक्षा थांबल्या होत्या. एवढ्या गाड्या कशाला थांबल्या हे आधी लक्षातच आले नाही. मग एकदम आमच्या लक्षात आले की आम्ही थांबलोय म्हणजे सिग्नल असेल असे समजून बाकीचेही थांबले आहेत. हळूच सायकली रस्त्याच्या बाजूला घेतल्या. जसे आम्ही बाजूला झालो तसे एक एक गाडीवाले, आम्ही काही खोडसाळपणा केला आहे अशा नजरेने रागा रागाने आमच्याकडे पहात निघाले. खरं म्हणजे आमच्या ध्यानीमनीही नव्हते की असे काही होईल म्हणून! हा प्रकार पाहुन आजुबाजूचे लोक हसायला लागले. आम्ही खाली मान घालून तिथुन सटकलो.
एके दिवशी कॉलेजहुन परत येतांना टाऊन हॉलसमोर पोलिसांनी सायकली अडवल्या. शेकडो सायकली तिथल्या मैदानात जप्त करुन ठेवत होते. मलाही अडवले. नगरपालिकेचे परमिट असेल तरच सायकल परत मिळणार होती. आता आली का पंचाईत! मी आणि एक दोन मित्र थांबलो होतो. आम्ही पाहिले की फक्त मुलांच्याच सायकली पकडणे चालू होते, मुलींच्या नाही. त्या आरामात जात होत्या. मला रागच आला. मी पोलिसाला म्हणालो ‘तुम्ही असा दुजाभाव का करताय? मुलींना आणि मुलांना वेगळा न्याय कसा काय?’ यावर तो म्हणाला ‘आम्हाला जे सांगितले आहे ते करतोय. तुम्ही साहेबांना बोला.’ मी सरळ तिथे खूर्चीवर बसलेल्या इंस्पेक्टरकडे गेलो आणि तोच प्रश्न विचारला. ते लगेच म्हणाले ‘नाही असं काही सांगितलेलं नाही. सायकली त्या सायकलीच. मग मुलींच्या असो वा मुलांच्या. सर्वांना सारखाच नियम आहे.’ आणि त्यांनी जोरात ओरडून पोलिसांना सर्वांच्या सायकली पकडायचा आदेश दिला. ज्या पोलिसाने आमची सायकल पकडली होती तो तरुण होता. आता मुलींच्या सायकली पकडायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला होता. त्या आनंदातच त्याने हळूच आमच्या सायकली बाहेर काढून दिल्या आणि वर आम्हालाच ‘थँक्यू’ म्हणाला. आमचे काम फत्ते झाले. सायकलवर टांग मारून भर्रर्रकन तिथून निघून गेलो.
वेंकटच्या रुमवर आम्ही दिवसरात्र अभ्यास करायचो. एकदा तो गावाला गेला होता. दोन ��िवसांनी आला. मला घ्यायला घरी आला. वहिनींनी मस्त चहा नाष्टा दिला. नाष्टा करत सहज पेपरला बातमी वाचली की एका घरात सासूने सुनेला कित्येक महिन्यापासून तळघरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी तिला सोडवले तेव्हा ती मरणासन्न अवस्थेत होती वगैरे वगैरे. आम्ही त्यावर चर्चा करत, त्या सासूला शिव्या घालत खात खात बोलत होतो. बातमीच्या शेवटी त्या घराचे वर्णन आणि फोटो होता. ते पाहुन आम्ही उडालोच! ते घर म्हणजे तेच, जिथे वेंकटची रुम होती! ताडकन उठून आम्ही सायकलवरुन रुमकडे गेलो. तिथे सगळा सन्नाटा होता. दुसर्या एका भाडेकरुकडून समजले की पोलिसांनी रात्रीच घरातल्या सर्वांना पकडुन नेले आहे. इतरही सविस्तर माहिती त्यांनी दिली. एवढ्या दिवसांपासून तिथे राहून आम्हाला कुणालाच माहित नव्हते की त्या घराला तळघर आहे. कधी कसला आवाजही आला नव्हता की शंका येण्यासारखे काही दिसलेही नव्हते. आता त्या घरात रहाणे शक्यच नव्हते. आमची आम्हालाच किळस वाटू लागली. त्याच दिवशी वेंकटने सामान उचलले आणि दुसर्या एका मित्राच्या रुममध्ये तात्पुरता शिफ्ट झाला!
दरम्यान भावाची औरंगाबादला बदली झाली. काही दिवसातच त्याचे सर्व सामान शिफ्ट झाले, आणि पहिल्यांदाच मी स्वतंत्रपणे रुम करुन राहू लागलो. रूम पार्टनर अर्थातच वेंकट...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note
·
View note
Text
इतर ट्रिप्स
भरतपूर पक्षी अभयारण्यातून आल्यापासून मुले पक्षी बघायला शिकली आहेत. मारुंजीच्या आवारात, संध्याकाळी फिरायला गेल्यावर, ट्रेकिंगला गेल्यावर मुलांचे पक्ष्यांकडे, त्यांच्या आवाजाकडे लक्ष असते. अदितीपण घरी आल्यावर जेव्हा सकाळी आम्ही कॉफी घ्यायला बागेत बसतो, तेव्हा झाडावर दिसणारे पक्षी आवर्जून आम्हाला दाखवते. विशेष मुलांचे असे निसर्गाशी व आजूबाजूच्या जगाशी जोडले जाणे बघून मला खूप समाधान मिळते.
बांधवगड जंगलातील सफर –
सलग पाच वर्षे हिमालयात ट्रेकिंगला नेऊन आणल्यावर मुलांना इतरही अनुभव द्यावेत असे वाटत होते. कुठे न्यावे याबद्दल विचार करताना मुलांना प्राणी बघायला जंगलात घेऊन जावे, असे वाटले. अॅडव्हेंचर क्लब मेंबरशी चर्चा करताना मध्यप्रदेशातील बांधवगडच्या जंगलात नेऊया, असे ठरले. या जंगलात वाघाचे दर्शन होतेच व इतरही प्राणी आहेत अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही २०११ साली बांधवगडला जायचे ठरवले. नेहमी प्रमाणेच नक्की कार्यक्रम कसा करता येईल हे ठरल्यावर पालकांशी मीटिंग घेऊन त्यांना पूर्ण कार्यक्रम समजावू��� सांगितला. अनेक पालकांनी मुलांना पाठवण्याबाबत उत्सुकता दाखवली. २७ मे ते ४ जून असा हा कार्यक्रम ठरविला, कारण या दिवसात जंगलामध्ये वाघ व इतर प्राणी बघायला मिळण्याची शक्यता जास्त असते. रेल्वेने सकाळी ११ पर्यंत जबलपूरला पोहोचलो. नाष्टा वाटेतच घेतला होता. येथे एका हॉटेलमध्ये आमची एका दिवसापुरती राहायची सोय केलेली होती. फ्रेश होऊन आम्ही जेवायलाच गेलो. हॉटेलमधील कर्मचारी खूप चांगली मदत करत होते. जेवण झाल्यावर आम्ही बेढाघाट बघायला गेलो. बेढाघाटला पोहोचेपर्यंत सूर्यास्त व्हायला आला होता. त्या सूर्यकिरणामध्ये बेढाघाट येथील धबधबा फार सुंदर दिसत होता. तेथे आम्ही सर्वांनी नर्मदा नदीमध्ये बोटींग केले व नंतर रात्री तेथेच साऊंड अॅड म्युझिक शो बघितला. मुलांना हे सर्व अनुभव नवीन होते. मुले थकलेली असूनसुद्धा खूप उत्साहाने हे सर्व अनुभव घेत होती.
दुसऱ्या दिवशी नाष्टा झाल्यावर आम्ही ते हॉटेल सोडले. चार तास बसने प्रवास करून आम्ही बांधवगड जवळच जंगलाला लागूनच असणाऱ्या हॉटेलवर पोहोचलो. हॉटेल फारच छान होते. एकंदर व्यवस्थापन समाधानकारक होते. सर्वांना कॉटेजेस् ताब्यात मिळून सामान लावेपर्यंत दुपारी जेवणाची वेळ झाली. दुपारचे जेवण फारच स्वादिष्ट होते. सगळ्यांनीच जेवणावर मस्त ताव मारला. दुपारी अनेकांनी आराम केला. अर्थात विशेष मुलांबरोबर फार शांततेत काही होत नाही. त्यांची चुळबूळ चालूच राहाते. मुलींच्या कॉटेजमध्ये मात्र काही मुलींना घेऊन आम्ही मस्त पत्त्याचा डाव टाकला. संध्याकाळी चहा बिस्किटे घेऊन झाल्यावर सर्वजण मिळून थोड्यावेळ क्रिकेट खेळलो. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था बागेमध्येच केली होती. जंगलामध्ये चांदण्याच्या प्रकाशात जेवायची मजा काही औरच. जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेलो, कारण उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला जंगल सफारीला जायचे होते. पहाटे ५.३० वाजता सगळेजण आवरून, फ्रेश होऊनच चहा बिस्किटे घ्यायला भेटलो. नाष्टा जंगल सफारीहून आल्यावर केला. येथूनच जीपने आम्ही जंगल सफारीला निघालो. येथे जंगल सफारीचे नियोजन सकाळी व संध्याकाळीच करतात, कारण याचवेळी पक्षी व प्राणी दिसायची शक्यता जास्त असते.
एका उघड्या जीपमध्ये सहाजण बसतील अशी व्यवस्था होती. आम्ही पाच मुले व एक स्वयंसेवक असे सहाजण एकेका जीपमध्ये बसलो. यानंतर दोन दिवसांत सकाळ संध्याकाळ असे ��िळून चार वेळा जंगल सफारीमध्ये आम्ही अनेक अद्भुत अनुभव घेतले. जंगलामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे ��क्षी दिसत होते. एका पाणवठ्यावर माकडे पाणी पिताना दिसली. आम्ही हे दृश्य बघतच होतो एवढ्यात हरणे, नीलगाय व रानडुकरे येथे पाणी प्यायला आली. संध्याकाळी जंगलात जीपमधून फिरताना अनेकांना वाघाने दर्शन दिले. ज्या मुलांना आज वाघाचे दर्शन झाले ते उत्साहाने, त्यांना जमेल तसे हा सगळा अनुभव सांगायचा प्रयत्न करत होते. ज्यांना आज वाघाचे दर्शन झाले नाही, ते जरा नाराजच होते. मुले या जंगल सफारीचा पुरेपूर आनंद घेत होती. रात्रीच्या जेवणावर सगळेजण खुश होते. रात्री जेवण झाल्यावर सगळ्यांनी एकत्र जमून कँप फायरचा कार्यक्रम केला. यामध्ये नाच, गाणी, चिठ्ठ्या उचलून त्यामध्ये जी सूचना लिहिलेली असेल त्याप्रमाणे करून दाखवणे, यामध्ये माझ्यापासून सगळ्यांनाच ते करायचे होते. मुलेसुद्धा जमेल तसे करत होती. काही वेळा सादरीकरण करताना इतकी गडबड व्हायची की, ते बघून सगळ्यांची हसून हसून पुरेवाट लागायची. हीच तर या ट्रिप्सची मजा असते. कँप फायरच्या वेळी घ्यायच्या पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी अनघाने घेतली होती व तिने याचे खूप छान नियोजन केले होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे परत आम्ही जंगलात निघालो. आज सकाळी नाष्टा झाल्यावर अमोल माझ्याजवळ आला व मला दहा रुपये दिले व म्हणाला, ‘मॅडम, तुम्ही या पैशाचे चॉकलेट घेऊन खा.’ म्हटले, ‘कशाबद्दल मला चॉकलेट?’ तर म्हणतो कसा, ‘मॅडम, तुम्ही आमच्याकरता किती करता म्हणून तुम्हाला बक्षीस.’ तेवढ्यात राजही तिथे आला व म्हणाला, ‘मॅडम थँक्यू सो मच, आम्हाला प्राणी दाखवायला आणल्याबद्दल.’ चला म्हणजे मुले एकदम खुश होती.
दुसऱ्या दिवशीही अनेक पक्षी, प्राण्यांनी दर्शन दिले. त्यामध्ये अस्वल, लांडगा व तरस असे काही काल न दिसलेले प्राणी दिसले. आमच्या जीप ड्रायव्हरला, जवळून गेलेल्या एका जीप ड्रायव्हरने सांगितले की, एका गुहेमध्ये वाघ बसलाय. वाघ दिसला तर हे ड्रायव्हर लगेच एकमेकांना सांगतात, कारण त्यांचीही मनापासून इच्छा असते की जंगल सफारीला आलेल्या प्रत्येकाला वाघ दिसावा. जीप जंगलामध्ये वेगवेगळ्या मार्गाने जात असतात. आमच्या जीप ड्रायव्हरने जीप तिकडे वळवली. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आमच्या सर्व जीपस् तेथे पोहोचलेल्या होत्या व सर्वजण एका दिशेने बघत होते. आम्हीपण त्या दिशेने बघायला लागलो आणि चक्क आरामात गुहेंच्या दाराशीच बसलेला वाघ दिसला. त्याला सर्व जगाची, बघणाऱ्या लोकांची काही फिकीर नव्हती. सगळेजण तृप्त नजरेने हे दृश्य बघत होते. बांधवगडला जंगल सफारीला आल्याचे सार्थक झाले, असे सगळ्यांना वाटत होते. विशेषतः सर्व स्वयंसेवक व मुले पण वाघ दिसला म्हणून खुश होती. थोड्यावेळानंतर आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाटेमध्ये एका पाणवठ्यावर एक मोर पूर्ण पिसारा फुलवून नाचत होता व त्याच्या ��जूबाजूला लांडोर मस्त दिमाखात फिरत होती. पाण्यामध्ये काही बदके पोहत होती, तर काही बदके किनाऱ्यावर फिरत होती. हे दृश्य खरंच बघतोय का हे स्वप्न आहे असे वाटावे, इतके ते सुंदर दृश्य होते.
सकाळी जंगल सफारीहून आल्यावर मुलांनी स्विमिंग पूलमध्ये, पाण्यात खेळण्याचा व काही जणांनी पोहण्याचा आनंद घेतला. याही रात्री कँप फायरचा कार्यक्रम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर हॉटेलच्या बाजूला असलेल्या जंगल परिसरात फिरून जंगलामध्ये स्वच्छता मोहीम व जंगलाची माहिती असा कार्यक्रम झाला. आम्हाला जंगलाची माहिती सांगणारा गाईड पुण्यातीलच होता. त्यामुळे तो मराठीमधून बोलत होता. त्यामुळे मुलांना पण त्याने सांगितलेली माहिती समजायला सोपे जात होते. पूर्वीच्या लोकांना जंगलात फिरताना वारुळाचे तोंड कुठल्या दिशेला आहे यावरून नदी कोठे आहे हे कळायचे. वारुळाच्या आत उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून मुंग्या विशिष्ट रचना करून वारूळ बांधतात. अनेक पक्ष्यांची घरटी आम्ही बघितली. पक्षी आता बदललेल्या परिस्थितीनुसार प्लॅस्टिकचा वापर घरटे तयार करण्याकरता कसे करायला लागले आहेत, हे बघितले. अशा अनेक निसर्गातील गमतीजमती आम्हाला या गाईडमुळे समजल्या. हा परिसर जंगलात फिरायला सुरक्षित होता, म्हणून हा जंगल वॉक आम्ही करू शकलो. जंगल सफारीमध्ये जंगलात जीपच्या खाली उतरायला, जोरात बोलणे, मोबाईलचा वापर, कचरा फेकणे, खायचे पदार्थ जंगलात नेणे व प्राण्यांना खायला देणे या सगळ्याला सक्त बंदी होती. जंगल सफारीच्या गाईडने जंगलात फिरतानाचे हे सर्व नियम पाळल्याबद्दल मुलांचे खूप कौतुक केले. एकंदर बांधवगड जंगल सफारी हा नितांत सुंदर अनुभव होता.
थायलंडची ट्रिप –
मुलांची बांधवगड जंगलाची सफर झाल्यानंतर मुलांना परदेशी ट्रिपला न्यावे, असे मनात यायला लागले. खरं म्हणजे हा विचार अनेकदा मनामध्ये येत होता, पण त्यामधील अडचणी डोळ्यांसमोर आल्यावर तो विचार मागे पडायचा. २०१२मध्ये या विचाराने परत उचल खाल्ली व यावेळी विचार पक्का झाला की, यावर्षी मुलांना परदेश वारी करावयाची. या ट्रिपमुळे मुलांना विमानात बसायला मिळेल. याशिवाय दुसऱ्या देशातील लोक दिसतात कसे, तेथील हवामा�� कसे असते, तेथील घरे कशी असतात, एकंदर दुसरा देश कसा असतो याची ओळख तरी मुलांना होईल, असे वाटत होते.
मुख्य अडथळा मुलांचे पासपोर्ट. अनेक मुलांचे पासपोर्ट नव्हते व विशेष मुलांचे पासपोर्ट मिळायला त्रास होतो, असे ऐकले होते. मुलांना कुठल्या देशाला न्यावे हे आर्थिक बाबींवर ठरणार होते. सिंगापूर, थायलंड व मलेशिया असे तीन पर्याय समोर होते. अशा ट्रिप्सचे आयोजन करणाऱ्या अनेकांना जाऊन भेटलो. साईदत्त टुरिझम यांनी सुचविलेला थायलंडचा पर्याय बरा वाटला. चार रात्री व पाच दिवसांसाठी त्यांनी सां��ितलेले ट्रिपचे बजेटसुद्धा योग्य वाटले. या ट्रिपसाठी ठरावीक संख्येने लोक असतील तर काही सवलती असतात व ट्रिपचा खर्चपण थोडा कमी होऊ शकेल, असे आम्हाला साईदत्त टुरिझमच्या शेवडे यांनी सांगितले. आम्ही सर्व माहिती मिळाल्यावर मुलांना नियमितपणे आमच्याबरोबर ट्रिप व ट्रेक्सला पाठवणाऱ्या पालकांची मीटिंग बोलावली. पालकांना ट्रिपच्या खर्चाचा अंदाज देऊन बाकी सर्व माहिती सांगितली. सर्व ऐकून घेतल्यावर पालकांच्या प्रतिक्रया फार उत्साहवर्धक होत्या. आपली मुले परदेशी ट्रिपला जाणार या कल्पनेनेच ते भारावून गेले होते. विशिष्ट संख्या होण्यासाठी आम्ही काही पालकांनाही थायलंड ट्रिपला बरोबर येता येईल, असे सांगितले. पालकांना ट्रेक्सला नेत नाही कारण त्यांना ट्रेकिंगची सवय नसते. त्यामुळे त्यांची मदत होणार नसते. या ट्रिपला फारसे चालायचेही नव्हते, त्यामुळेच आम्ही ठरावीक पालकांना घेऊन जाऊ शकत होतो. यावेळी माझी वहिनी मंजू व तिची मैत्रीण आमच्याबरोबर येणार होत्या. एकदाची मुलांची व त्याबरोबर येणाऱ्या पालकांची यादी तयार झाली. नवक्षितिजमधून किती सहकाऱ्यांना न्यायचे ते नक्की केले, कारण त्यांचेही पासपोर्ट काढायला हवे होते. अॅडव्हेंचर क्लब सदस्य अॅडव्होकेट सुनील कदम व अॅडव्होकेट सुदेश हाडके यांचे कुटुंबीय आमच्याबरोबर येणार होते. सर्व मिळून ४४ जणांचा ग्रुप तयार झाला.
आता पुढची मुख्य तयारी पासपोर्ट. पालकांना पासपोर्टच्या तयारीला लागा असे सांगितले व लागेल ती मदत आम्ही करू, असे आश्वासन दिले. पासपोर्टसाठी मतिमंदत्वाच्या दाखल्याबरोबरच इतर बरीच कागदपत्रे लागणार होती. एकदा मी व विश्वस्त अॅड. सुदेश हाडके पासपोर्ट ऑफिसमधील ऑफिसरला भेटून थायलंड ट्रिप व नवक्षितिजबद्दल माहिती सांगून आलो होतो. हळूहळू मुलांच्या पासपोर्ट मुलाखतीच्या तारखा मिळू लागल्या. विशेष मुलांना त्या पासपोर्टच्या रांगेमध्ये थांबायला लावणे म्हणजेसुद्धा एक परीक्षाच होती. या मुलांसाठी विशेष व्यवस्था करायला हवी, असे मला प्रकर्षाने जाणवले. म्हणजे त्यांना रांगेमध्ये फारवेळ थांबायला लागणार नाही.
लवकर विमानाची तिकिटे काढली तर स्वस्त दरात मिळतात. म्हणून २८ जून ते ३ जुलै ही ट्रिपची तारीख ठरवून तिकिटे बुक केली. विमानाच्या तिकिटात सवलत मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले, पण ती काही मिळाली नाही. ट्रिपची बाकी तयारी सुरूच होती. साईदत्तचे संचालक शेवडे एकदा संस्थेमध्ये पालकांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन करण्याकरता आले होते. परत एकदा मीटिंग बोलावून स्वयंसेवकांचे कामाचे स्वरूप काय आहे, हे आमच्याबरोबर येणारे सर्वजण व नवक्षितिजच्या सहकाऱ्यांना मी समजावून सांगितले. पूर्ण प्रवासात सतर्कतेने मुलांकडे लक्ष पाहिजे, मुलांबरोबर जाताना खरेदीसारखी गोष्ट दुय्यम असते. त्यांना सुरक्षित नेणे व आणणे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची, हे त्यांना परत परत पटवून ��ेत होते. मुलांप्रमाणेच अनेक पालक व माझ्या सर्व सहकाऱ्यांची ही पहिली परदेशवारी होती. त्यामुळे तेथे पोहोचल्यावर लक्ष विचलित व्हायची शक्यता जास्त. असे होऊ नये म्हणून हे सारखे सांगावे लागत होते. पालक म्हणून असलेल्या भूमिकेपेक्षा स्वयंसेवकांची भूमिका वेगळी असते. त्याला पडेल ते काम करायची मानसिक तयारी ठेवावी लागते. म्हणून पालकांना स्वयंसेवकांची भूमिका समजावून सांगावी लागत होती.
ट्रिपला एक दिवस राहिला तरी दोन पासपोर्ट मिळेनात, त्यामध्ये एक अदितीचा पासपोर्ट होता. आता मात्र सगळ्यांनाच जरा टेन्शन आले. मी स्वतः परत जाऊन पासपोर्ट ऑफिसमधील प्रमुख मॅडमना भेटून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. हे समजून घेतल्यावर मॅडमने सहकार्याचे आश्वासन दिले व आजच पासपोर्ट मिळतील असे सांगितले आणि चक्क संध्याकाळी हातात पासपोर्ट मिळाले. पण ऑफिस संपेपर्यंत काही सह्या राहिल्या आहेत म्हणून एक सहकारी सुभाषचा पासपोर्ट मिळालाच नाही. हे समजेपर्यंत मॅडम ऑफिसमधून गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला निघायचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून नवक्षितिजचे व्यवस्थापक वायाळ व अजून एक सहकारी पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊनच बसले. दुपारी तीन वाजले तरी पासपोर्ट तयार होईनात व तयार झाल्यावर येथून ते जीपीओला जाणार व तेथून पोस्टाने घरी येणार. आता आम्हाला हे सगळे करायला वेळच नव्हता. चार वाजायला आले तरी अजून पासपोर्टचा पत्ता नाही. या सहकाऱ्याचे, सुभाषचे सामान आम्ही तयारच ठेवले होते. पण याला आमच्याबरोबर येत येणार की नाही, अशी चलबिचल सगळ्यांच्याच मनात सुरु होती. आम्ही सर्वजण चिंतेतच होतो. एवढ्यात फोन वाजला की पासपोर्टस् हातात मिळाला. सगळ्यांनी एकच जल्लोष केला. पासपोर्ट ऑफिसमधील मॅडमने आमची असहायता समजून पासपोर्ट जीपीओला न पाठवता तेथेच आमच्या ताब्यात दिला. चला म्हणजे आता सर्वजण थायलंडला जाणार येऽऽऽ असे मलाही आनंदाने ओरडावेसे वाटले. ट्रिपला जाऊन आल्यावर मुद्दाम जाऊन मॅडमला मनापासून धन्यवाद देऊन आले. इतक्या वर्षांनंतर पण हा अनुभव लिहिताना अंगावर रोमांच आले आहेत.
नऊ वाजता आम्ही बसने मुंबईला जायला निघालो. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरातच प्रवास सुरु झाला. सर्वांना जायला मिळतंय म्हणून सगळेच आनंदात होते. पहाटे आम्हाला थायलंडला जाणाऱ्या विमानात बसायचे होते. मुंबई विमानतळावर आम्हाला महेश हे साईदत्तचे ग्रुप लीडर भेटले. ते पूर्ण प्रवासात आमच्याबरोबर असणार होते. विमानतळावर मुले आश्चर्याने सगळीकडे बघत होती, कारण सगळे वातावरणच अनोळखी होते, पण मुले शांत होती. सुरक्षा तपासणी झाली व आम्ही विमानात जाऊन बसायची वाट बघत लॉऊंजमध्ये जाऊन बसलो. आम्ही व्हिसा पण येथूनच काढून घेतला होता, कारण विशेष मुलांबरोबर थायलंडला पोहोचल्यावर आम्हाला काही प्रॉब्लेम नको होते. विमानात बसण्याची घोषणा झाली. एक एक जण विमानात चढू लागले. मला खूप मस्त वाटत होते. चला अनेक अडचणींवर मात कर���न एकदाचे आम्ही मुलांना घेऊन परदेश वारीला निघालो होतो. वॉ...व!
विमानात बसल्यावर मुले थोडीशी घाबरली होती. अदिती माझ्याजवळच होती. विमाने रनवेवर जोरात धावायला लागल्यावर तिने माझा हात घट्ट धरून ठेवला होता. जसे विमान उंचावर जाऊन स्थिर झाले तसा तिने माझा हात सोडला व ती रिलॅक्स झाली. बऱ्याच मुलांची हीच अवस्था होती. विमानातून खाली दिसणारी दृश्ये बघण्याइतके नंतर रिलॅक्स झाले. प्रवास संपवून आम्ही सुवर्णभूमी या बँकॉकमधल्या भव्य विमानतळावर आलो. खरंच खूप भव्य व सुंदर आहे हा विमानतळ. सामान ताब्यात घेऊन आम्ही बाहेर आलो, तेथे आम्हाला नेणारी बस व आमचा इकडचा ग्रुप लीडर, गाईड आमच्या स्वागताला उभाच होता.
यांच्याबरोबर आमची अद्भुत थायलंड वारी सुरु झाली. आम्ही ‘बँकॉक’ व ‘पटाया’ या दोन शहरांना भेट देणार होतो. बँकॉकहून बसने आम्ही लगेचच पटायाला गेलो. पटायाला जातानाच वाटेमध्ये जेवण घेतले. एका पंजाबी माणसाचेच ते हॉटेल होते. येथे अगदी भार���ीय पद्धतीचे जेवण आम्ही घेतले. पटायाच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या एका सुंदर हॉटेलमध्ये आमची राहायची सोय होती. एका रुममध्ये तिघेजण असणार होते. एक स्वयंसेवक व दोन मुले असे नियोजन आधीच केले होते. त्याप्रमाणे खोल्यांचे वाटप झाले. नंतर आम्ही ‘अल्काझार’ हा प्रसिद्ध शो बघायला गेलो. या थिएटरवर खूपच गर्दी होती. मुलांना व्यवस्थित सांभाळतच आम्ही आत गेलो. कलाकारांनी दोन तास डान्स व गाण्यांचे जे सादरीकरण केले, ते अद्भुत होते. सगळ्यात धक्कादायक होते ते हे की, सुंदर दिसणारे कलाकार स्त्रिया नसून तृतीयपंथी होते. यांनी स्त्रियांच्या वेशात सर्व डान्सेसचे सादरीकरण अतिशय कलात्मकतेने केले होते. रात्री बाहेरच्या हॉटेलमध्ये जेवूनच आम्ही हॉटेलवर गेलो. सर्वजण दमले होते त्यामुळे लगेच सगळे झोपायला गेले.
सकाळी सर्वजण आवरूनच नाष्ट्याला आले. नाष्ट्यामध्ये ब्रेडचे अनेक प्रकार, केकस्, कॉर्नफ्लेक्स, ऑमलेट, ज्युस व चहा, कॉफी शिवाय इडली सांबारही होते. साधारण अशाच प्रकारचा नाष्टा रोजच होता. आम्ही पटायाच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅरॅसेलिंग केले. यासाठी किनाऱ्यावरून पाण्यातून चालत जाऊन थोड्या अंतरावर असलेल्या बोटीत बसायचे होते, काही मुलांच्या दृष्टीने हे सुद्धा एक धाडसच होते. ही बोट खोल समुद्रात पॅरॅसेलिंगसाठी, दुसऱ्या बोटीवर घेऊन जाणार होती. बोटीचा हा प्रवाससुद्धा मस्त होता. मुलांनी अलिबाग जवळील नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर पॅरॅसेलिंग केलेले होते. त्यामुळे त्यांना भीती वाटत नव्हती. पण येथे समुद्रावर जास्त उंचावर नेऊन ते खाली आणत होते. सर्वांनीच पॅरॅसेलिंग केले व धाडसी क्रीडाप्रकारामधील थ्रिल अनुभवले. फक्त अदितीला तेथील माणसाने ��रवानगी दिली नाही. आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की ही करू शकेल, पण तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अदिती थोडी नाराज झाली, कारण असे धाडसी अनुभव घ्यायला तिला खूप आवडते. पॅरॅसेलिंग झाल्यावर आम्ही बोटीमध्ये बसून मला सर्वात आवडलेला उपक्रम सी वॉकिंग, समुद्र तळाशी चालणे हा उपक्रम करायला गेलो. राज व श्रेयस या दोन मुलांनी सी वॉकिंग केले, याचे मला फार कौतुक वाटले. कारण २२ किलोचा ऑक्सिजन सिलेंडर डोक्यावर घेऊन समुद्राच्या पाण्यामध्ये तळाशी जायचे. तो सिलेंडर डोक्यावर घेताना भीती वाटते व तो घेऊन समुद्राच्या तळाशी जायचे हे सोपे नव्हते. हे मी अनुभवाने सांगते. या दोघांना पोहतापण येत नव्हते. पोहता येत नसेल तर पाण्यात जायची भीती वाटते व इथे तर समुद्राच्या तळाशी जायचे होते. अर्थात, समुद्र तळाशी चालताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची असते ती अशी की पाण्यात पोहायचे नाही तर चालायचे असते, कारण डोक्यावर असलेला ऑक्सिजन सिलेंडर आडवा झाला तर तोंडामध्ये असलेल्या नळीतून ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन गंभीर प्रसंग येऊ शकतो. इन्स्ट्रक्टरने दिलेल्या सर्व सूचना आम्ही दोघांना समजावून सांगितल्या. एकमेकांचे हात धरून चालणे, समुद्राच्या तळाशी चालायचे, पोहायचा प्रयत्न करायचा नाही म्हणजे पाण्यात आडवे व्हायचे नाही व श्वास घ्यायला काही अडचण वाटली तर हात वर करून इन्स्ट्रक्टरचे लक्ष वेधायचे. या सर्व सूचना समजून त्याप्रमाणे त्यांनी केले. मी त्यांच्या बरोबरच होते. आम्ही एकमेकांचे हात हातात धरूनच चालत होतो. उथळ पाण्यात प्रवाळ (Corals) असतात. आम्ही चालत त्या प्रवाळाच्या वसाहतीपर्यंत गेलो. आम्ही पाण्यात चालत असताना इन्स्ट्रक्टरने माश्यांना घालायला खाऊ दिला. तो दिल्याबरोबर तो खाऊ खायला खूप मासे आमच्या अगदी जवळ आले. इतके रंगीबेरंगी मासे जवळून बघण्याचा अनुभव फारच अफलातून होता. आमच्या या धाडसी अनुभवाची, समुद्रतळाशी चालतानाची सीडी आम्हाला मिळाली. एक अद्भुत व अविस्मरणीय अनुभव आम्ही घेतला होता. राज व श्रेयस या दोघांनी भीतीवर विजय मिळवून हा अनुभव घेतल्यामुळे मला फार बरे वाटत होते. अदिती हा अनुभव घेऊ शकली असती, पण अदितीला Mitral valve stenosis म्हणजे हृदयाची झडप आकुंचित असल्यामुळे तिला हा अनुभव देऊन धोका पत्करू नये, असे मला वाटले.
दुसऱ्या दिवशी नाष्टा झाल्यावर नाँगनूच व्हिलेज (Nong Nooch Village) बघायला गेलो. हे खूप मोठे बोटॅनिकल गार्डन आहे. येथे टुरिस्ट लोकांना आकर्षित करणारे अनेक शो आहेत. येथे आम्ही हत्ती पेंटींग करताना व फुटबॉल खेळताना बघितले. थाई कल्चरल शो बघितले. हे बघताना मुलांना फार मजा वाटत होती. हे सगळे शोज बघायला फार गर्दी होती. त्यामुळे आम्हाला मुलांकडे जरा जास्तच लक्ष ठेवावे लागत होते. हे सगळे शोज बघेपर्यंत संध्याकाळ झाली. रात्रीचे जेवण बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊनच आम्ही हॉटेलवर गेलो.
तिसऱ्या दिवशी आम्ही बँकॉक या शहराकडे ज��यला निघालो. या चार दिवसांत आम्ही अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. यामध्ये जेम्स गॅलरी बघायला गेलो. तेथे आमचे सरबत देऊन स्वागत झाले. येथे भुयारी ट्रेनमधून नेऊन, पूर्वी हिरे व किमती खडे खाणीतून कसे काढले जात, तसेच आता कृत्रिम पद्धतीने हिरे व किमती खडे कसे बनवले जातात, हे अतिशय मनोरंजकरीत्या सांगतात.
पटाया सोडल्यावर नंतर दोन दिवस आमचा मुक्काम बँकॉक या शहरात असणार होता. या दोन दिवसांत आम्ही ऑर्किड गार्डन बघितले. हे जगातले सर्वात मोठे ऑर्किड गार्डन आहे. गार्डनची मांडणीही फार सुंदर आहे. सर्वांनी येथे भरपूर फोटो काढून घेतले. दोन बौद्ध मोनॅस्ट्रीज बघितल्या. येथे बुद्धाच्या भव्य मूर्ती आहेत. या मोनॅस्ट्रीजच्या परिसरातील अनेक झाडांवर खाचा पाडून त्यामध्ये ऑर्किडस् लावलेली होती. या ऑर्किड्समुळे बाग फारच सुंदर दिसत होती. सफारी गार्डन बघायला गेलो. येथे माकडांचा एक मनोरंजक शो बघितला. मुलांना या माकडचेष्टा बघताना फार मजा आली. डॉल्फिन शोसुद्धा फार मनोरंजक होता. अनेक सुंदर पक्षी व प्राणी आम्हाला येथे बघायला मिळाले. गाडीमध्ये बसूनच आपल्याला या पार्कमध्ये फिरवतात. बाईयोके टॉवर ही ८५ मजली बिल्डिंग बघितली व अक्षरशः एका मिनिटात आम्ही ८५व्या मजल्यावर गेलो. इतक्या उंचावरून बँकॉक शहराचे दर्शन झाले. जगातल्या या दोन नंबरच्या इमारतीला भेट दिल्यानंतर आम्ही एम.बी.के. मॉलमध्ये खरेदीसाठी गेलो.
हे चार दिवस आम्ही शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे व मुख्यतः पंजाबी पद्धतीचे जेवण घेतले. आम्हाला थायलंड ट्रिपमध्ये सुंदर भारतीय जेवण मिळाले, कारण येथे भारतीय रेस्टॉरंट खूप आहेत. एक दिवस मात्र आम्ही खास थाई पद्धतीचे जेवण जेवलो.
पाचव्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर आम्ही हॉटेल सोडले व सुवर्णभूमी या विमानतळाकडे बसने निघालो. या बस प्रवासात मी सगळ्यांचे आभार मानले व प्रत्येकाला आपले अनुभव सांगण्याची विनंती केली. विशेषतः पालकांनी याची डोळा या ट्रिपमध्ये, नवक्षितिजचे सर्वजण मुलांची खूप छान काळजी घेतात, हे बघितले व त्याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले.
या ट्रिपमध्ये अनेक फोटो व व्हिडिओ फिल्मस् काढल्या. मुलांबरोबर असे अनेक सुंदर अनुभव घेऊन आम्ही पुण्याला पोहोचलो. पुण्याला आल्यावर आमच्या या परदेशवारीची माहिती अनेक पेपरांमध्ये छापून आली. साईदत्त टुरिझमने फार व्यवस्थित आमच्या ट्रिपचे नियोजन केले होते. त्यांच्या संवेदनशील सहकार्यामुळेच विशेष मुलांची थायलंडवारी इतकी छान होऊ शकली.
भरतपूर-पक्षांचे नंदनवन –
२०१४च्या फेब्रुवारीमध्ये ७ ते १३ या कालावधीमध्ये आम्ही भरतपूरला भेट दिली व याला पक्ष्यांचे नंदनवन का म्हणतात, याचा नितांत सुंदर अनुभव घेतला. एका वेगळ्याच कारणासाठी ही ट्रिप आमच्या सर्वांच्या कायम स्मरण���त राहील. नेहमीप्रमाणे सर्व पूर्वतयारी केली. यावेळी ४९ जणांचा ग्रुप घेऊन आम्ही जाणार होतो. सात दिवसाचा कार्यक्रम ठरवला होता. गेली तीन वर्षे व्यवस्थित रेल्वे बुकिंग करणाऱ्या माणसाकडेच तिकिटे काढायला दिली. वरचेवर त्याच्याशी संपर्क ठेवणे सुरु होतेच. भरतपूर ट्रिपला जायला फक्त आठ दिवस राहिले, तरी आमच्या हातात तिकिटे येईनात. आता मात्र जरा काळजी वाटायला लागली. वायाळसर त्याला सारखे फोन करत होते व ‘तिकिटे घ्यायला कुठे येऊ?’ असे विचारत होते. हा सांगायचा सर तुम्ही नका येऊ माझा माणूस तुम्हाला तिकिटे आणून देईल. असे करता करता ट्रिपला जायला दोन दिवस राहिले तरी हा तिकिटे आणून देईना. आता मात्र फारच झाले. मी त्याला दोन-तीनदा फोन केले. तर मला म्हणतो कसा, ‘मॅडम काळजी करू नका विशेष मुलांकरता हे काम आहे, मी नक्की तिकिटे देतो.’ जायच्या आदल्या दिवशी त्याने तिकिटे घ्यायला एके ठिकाणी बोलावले. आमच्यातील एकजण तिकिटे आणायला निम्म्या वाटेत गेल्यावर याचा फोन की तू परत जा. मीच तिकिटे घेऊन येतोय. हे होईपर्यंत संध्याकाळ झाली मी घरी गेले. सर्वांच्या बॅगा भरुन तयार होत्या पण तिकिटांचा पत्ताच नव्हता. याला पैसे दिलेले असल्यामुळे दुसरे पर्याय पण बंद झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी वायाळसरांचा फोन आला की, तिकिटे मिळाली नाहीत. आदल्या दिवशी रात्री तो तिकिटे घेऊन आलाच नाही व सर सारखा फोन लावत होते तर फोन बंद आहे, असे येत होते. आम्हाला काय करावे सुचत नव्हते. दुपारची ट्रेन असल्यामुळे मी व अदिती घरूनच रेल्वे स्टेशनला जाणार होतो. साधारणपणे सकाळी ११.३० वाजता मला सरांचा फोन आला की हा एजंट माझ्याशी फोनवर बोलणार आहे. सरांशी तो काहीच बोलायला तयार नव्हता. मी याच्या फोनची वाटच बघत होते. एवढ्यात फोन वाजला व या माणसाने मला सांगितले, ‘मॅडम, विमानाची तिकिटे काढून मुलांना न्या कारण तिकिटे मिळाली नाहीत.’ तो त्याची शंभर कारणे मला देत होता. मी ते ऐकायच्या मनःस्थितीतच नव्हते, कारण माझ्या डोक्यात पुढे काय करता येईल हा विचार सुरु झाला. मी त्याला फारशी रागवायच्याही फंदात पडले नाही. फोन बंद करून पहिला फोन अॅडव्हेंचर क्लब मेंबर भागवतसरांना लावला. मला ट्रिप कॅन्सल करायची नव्हती व इतक्या आयत्यावेळी विमानाने जायचे हा पर्यायही घ्यायचा नव्हता. आता रेल्वे तिकिटे पण मिळणार नव्हती व आम्ही एक दोन नसून ४९ लोक होतो. भागवतसरांशी पर्यायी व्यवस्था काय करता येईल, याविषयी चर्चा करताना बसची सोय करता येईल असा पर्याय पुढे आला. पण इतक्या आयत्यावेळी बस व ड्रायव्हर मिळणार का? वायाळसरांना आम्ही महिन्याच्या ट्रेकला ज्यांच्याकडून बस घेतो त्यांच्याकडून बसची सोय होते का, हे बघायला सांगितले. आम्हाला आज रात्रीच निघायला हवे होते. कारण पुढची सगळी हॉटेल बुकिंग्ज झालेली होती व त्यांना पूर्ण पैसे देऊन झालेले होते. आम्ही गेलो नसतो तर हे पैसे वाया जाणार होते व मुख्य म्हणजे मुले फार नाराज झाली असती.
माझा वायाळसर व भागवतसरांशी सतत फोन सुरू होता. आम्हाला नेहमी बससेवा देणाऱ्या लोकांकडून बसची व्यवस्था आमच्याकडून होत नाही, असे नक्की झाले. मग आता भागवतसरांना बस व्यवस्था आमच्याकडून होत नाही तर आता तुमच्या ओळखीमधूनच बस ठरवा, असे सांगितले. साधारणपणे चार वाजता एक बस व एक ड्रायव्हर मिळतोय असे झाले. पण लांब जायचे तर बसचे दोन तासांचे काम करून घ्यावे लागेल व तोपर्यंत ड्रायव्हर येईल, असे झाले. हे समजल्यावर मारुंजीला पहिला फोन लावला व आज रात्री बसने निघायचे आहे ही बातमी सांगितली व रात्रीचे सगळ्यांचे जेवण तयार करायला सांगितले. वायाळसरांना पालकांना झालेला प्रकार सांगा व बसने जातोय असा निरोप द्यायला सांगितला. एक-दोन पालकांनी शंका उपस्थित केल्या की, मुले इतके तास बसमध्ये बसतील का? या शंका रास्त होत्या, कारण खूप मोठा पल्ला बसप्रवास करून गाठायचा होता. पुणे ते राजस्थानमधील भरतपूर व येताना आग्रा येथील ताजमहल असा कार्यक्रम होता.
रात्री साडेसात वाजता बस आली. बस नवक्षितिजच्या आवारात शिरताच मुलांनी एकच कल्ला केला. आम्ही सर्वजण जेवून तयारच होतो. भराभर सामान बसमध्ये ठेवले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरातच आमचा हा भन्नाट पुणे भरतपूर प्रवास सुरु झाला. एकदाची ट्रिप निघाली यातच सगळे खुश होतो. गाडीमध्ये गाणी सुरूच होती. सध्या आमच्याबरोबर एकच ड्रायव्हर होता. दुसरा ड्रायव्हर आम्हाला अहमदाबादमध्ये मिळणार होता. थोडा प्रवास झाल्यावर एक एक जण निद्रेच्या अधीन होऊ लागले. ड्रायव्हर बरोबर रात्रभर जागे राहाण्यासाठी पुरुष स्वयंसेवकांनी ड्युटीज लावून घेतल्या. रात्री फक्त एकदाच ड्रायव्हरने व आम्ही सर्वांनी बाथरुम ब्रेक घेतला. त्याचवेळी ड्रायव्हरने चहा पिऊन घेतला. सकाळी उजाडताच आम्ही अहमदाबादला पोहोचलो. इथे आम्हाला अजून एक धक्का बसला. दुसरा ड्रायव्हर काही कारणानी आमच्याबरोबर येऊ शकणार नव्हता, म्हणजे आता या एकाच ड्रायव्हरला पूर्ण ड्रायव्हिंग करायचे होते.
आम्ही वाटेतल्या एका हॉटेलमध्ये थांबून सकाळचे प्रातर्विधी व नाष्टा उरकला. मुले ठीक होती. आता प्रवासामध्ये आमची अंताक्षरी सुरु झाली. काहीजण पत्ते खेळत होते, तर काहीजण झोप घेत होते. दुपारी एका धाब्यावर थांबून आम्ही जेवण घेतले. या धाब्याच्या मालकाने आम्हाला फार प्रेमाने जेवायला घातले व आग्रहाने ताक दिले व त्याचे पैसे घेतले नाहीत. आमचे जेवण होईपर्यंत ड्रायव्हरने दोन तास झोप घेतली. आजही त्याला रात्रभर गाडी चालवायची होती. सकाळी राजस्थानमध्ये प्रवेश केल्यावर जरा बरे वाटले. भरतपूरजवळ आले आहे असे वाटायला लागले. संगमरवर व अनेक रंगाचे दगड असलेले डोंगर दिसू लागले. ज्या रंगाचा दगड जास्त असेल तसे डोंगर पांढरे, ला��, हिरवट रंगाचे दिसत होते. ७ तारखेला रात्री आठ वाजता पुण्याहून निघालो व ९ तारखेला संध्याकाळी पाच वाजता भरतपुरला पोहोचलो. आम्ही ४५ तास सलग बसप्रवास केला. आमच्या कल्पनेपेक्षा चांगला प्रवास झाला. परत एकदा मुलांनी त्यांची अॅडजस्ट करण्याची कुवत दाखवून दिली. आम्ही एक काळजी नक्की घेतली, मुलांना वेळच्या वेळी खायला दिले व योग्य अंतराने बाथरुम ब्रेक्स घेतले. आमच्याकडे अधेमधे खायला बरेच पदार्थ होते, याचा फायदा झाला. कारण दरवेळी नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण घ्यायच्या वेळी चांगले हॉटेल व बस थांबायला योग्य जागा मिळत नव्हती. शक्यतो सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण ताजे व गरमच घेत होतो.
प्रवासामध्ये एक जास्त दिवस गेल्यामुळे, आम्हाला भरतपूरला दोन दिवसांच्या ऐवजी एक दिवसच मिळणार होता. हॉटेलमध्ये ठरल्याप्रमाणे रुम वाटप झाल्यावर सगळ्यांनी पहिल्यांदा आंघोळी उरकल्या व प्रवासाचा शिणवटा काढून टाकला. संध्याकाळी चहा बरोबर चविष्ट सामोसे होते. आज रात्री जेवण करून थोड्याफार गप्पा मारून सगळेच झोपायला गेलो. एवढ्या मोठ्या प्रवासाने खरंतर सगळेच दमलेले होते व कॉटवर मस्त पसरून झोपायची सगळ्यांना घाई झाली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी पक्ष्यांच्या नंदनवनात जायचे होते. कसे असेल हे नंदनवन याचा विचार करत असताना झोप लागून गेली. सकाळी आमचा नाष्टा होईपर्यंत सायकलरिक्षा आम्हाला भरतपूरच्या जंगलात नेण्यासाठी आलेल्याच होत्या. प्रत्येक सायकल रिक्षामध्ये तिघेजण बसलो. जंगल हॉटेलपासून अगदीच जवळ होते. जंगलात जाण्याआधी काही फॉर्मालिटीज होत्या त्या पूर्ण करून आम्ही जंगलात प्रवेश केला. आमच्याबरोबरचे रिक्षा ड्रायव्हरच आमचे गाईड होते. त्यांना जंगलाची व पक्ष्यांची खूप माहिती होत���. एक दुर्बिणही आम्ही बरोबर नेली होती. जंगलात प्रवेश केल्यावर प्रथम अनपेक्षितपणे आम्हाला एक हरणांचा कळप दिसला. हरणे निसर्गामध्ये मनसोक्त बागडताना पाहून, खूप छान वाटत होते. नंतर आम्हाला इतक्या प्रकारचे पक्षी दिसले की, अगदी डोळ्यांचे पारणे फिटले. अनेक प्रकारची, अनेक रंगाची बदके, पोपट, घुबडे, बगळे, चिमण्या, किंगफिशर बघितले.
भारतीय हॉर्नबील, ईगलचे अनेक प्रकार, बॅबलर, बुलबुल, क्वेलस्, बी ईटर, केनस्, पेल्किनस्, गीज. दुसऱ्या देशातील असंख्य पक्षी येथे या काळात वास्तव्याला असतात. फेब्रुवारी मध्यास परत ते आपआपल्या देशात जायला निघतात. सैबेरिया, चायना, युरोप अशा अनेक देशांतून व भारतातील हिमालयाकडील पक्षी येथे येतात. येथील पक्षी खूप माणसाळलेले आहेत. ते अगदी आमच्याजवळ येत होते. अनेक पक्ष्यांची घरटी बघितली. येथे पक्ष्यांसाठी अनेक जलाशये तयार केली आहेत. या जलाशयांमध्ये असलेल्या छोट्या बे��ांवर काही पक्षी खूप संख्येने एकत्र बसलेले दिसत होते. त्याबद्दल चौकशी करताना कळले की, आता तीन चार दिवसांत ते मायदेशी जायला निघतील. त्याआधी त्यांच्या अशा मीटिंगज् असतात. अशा मीटिंग्ज सुरू झाल्या की समजावे, आता पक्ष्यांची परत जायची वेळ झाली. कसा त्यांचा संवाद होत असेल? हे मोठे कोडेच आहे. मला वाटते निसर्गातील काही कोडी तशीच राहू द्यावीत, कारण आपण माणसे फार उत्सुकतेपोटी निसर्गाचे संतुलन बिघडवत चाललोय. निसर्गामधील काही गोष्टी अनाकलनीय ठेवण्यातच मजा असते.
दुपारी आम्ही बरोबरच आणलेले जेवण जेवत असताना अक्षरशः आमच्या भोवती पक्ष्यांनी फेर धरला. क्षणभर असे वाटून गेले स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असेल का? अगदी स्वप्नवत वाटत होते. इतके जवळून पक्षी बघताना फार मजा येत होती. मुले तर एकदम खुश होऊन गेली. जेवण झाल्यावर आम्ही प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचे संग्रहालय बघायला गेलो. तेथे पक्ष्यांवरची एक सुंदर फिल्म व अनेक फोटो बघितले. सायकलरिक्षा जरा लांब उभ्या होत्या म्हणून आम्ही पायी चाललो होतो. एवढ्यात एकाला अजगर दिसला. काहीतरी खाऊन सुस्त पडला होता. नंतर रिक्षावाल्यांनी आम्हाला एका पायवाटेपाशी सोडले व एक तासात परत या असे सांगितले. मग काय आम्ही मस्त जंगलात फिरलो. दुर्बिणीतून दूरवर दिसणारे पक्षी मुलांना दाखवले. बदकांचा पाण्यातील विहार मनसोक्त बघितला. मोर व लांडोर यांचा मुक्त विहार बघितला. एका ढोलीमध्ये बसलेली पोपटाची जोडी बघितली. घरट्यावर बसलेले घुबड, आपल्या पिलाला घरट्यामध्ये घास भरवताना गिधाड अशी अनेक सुंदर दृश्ये बघितली. नाव माहिती नसलेले अनेक सुंदर पक्षी बघितले. नावात काय आहे? त्या पक्ष्यांनी त्यांच्या दर्शनाने आम्हाला खूप अविस्मरणीय अनुभव दिला. त्यांना बघून आम्ही तृप्त मनाने परतीच्या वाटेला लागलो. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रकारचे व सुंदर पक्षी आम्हाला दिसले.
दुसऱ्या दिवशी पहाटेच सर्वजण उठलो. बॅग्ज बऱ्यापैकी रात्रीच आवरून ठेवलेल्या होत्या. सकाळी चहा-नाष्टा करून आम्ही सर्वजण बसमध्ये बसलो. आजचे दुपारचे जेवण आम्ही या हॉटेलवाल्याकडूनच बनवून घेतले होते. प्रवासामध्ये चांगले सावलीचे ठिकाण बघून बस थांबवायची व जेवण घ्यायचे असे आम्ही ठरवले होते.
आज ड्रायव्हर अगदी फ्रेश दिसत होते. त्यांना चांगली विश्रांती मिळाली होती. परत एकदा गणपती बाप्पा मोरयाच्या गजरातच ड्रायव्हरने गाडी सुरु केली. ११ तारखेला सकाळी सात वाजता आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. आज आम्ही जगातील सात आश्चर्यांपैकी एक ‘ताजमहाल’ बघायला आग्रा या शहराकडे निघालो. भरतपूर-आग्रा अंतर फार नाही. अर्थात, आमच्या अंतराच्या व्याख्या आता बदलल्या होत्या. आम्ही साधारणपणे ११ वाजता आग्रा येथे पोहोचलो. गाडी एका ठिकाणी लावून आम्ही चालत ताजमहाल बघायला गेलो. येथे खूपच गर्दी होती. मुलांच्या ��ोवती कडे करूनच आम्ही ताजमहालाच्या दिशेने जात होतो. ताजमहालाच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच संगमरवरामध्ये बांधलेले हे आश्चर्य बघून धन्य झालो. धन्य तो बादशहा, त्याचे प्रेम आणि धन्य ते कारागीर. इथे भरपूर फोटो काढून आम्ही बसमध्ये बसायला गेलो. अशा गर्दीच्या ठिकाणी मुलांना घेऊन थांबणे फारसे सुरक्षित वाटत नाही. कारण जर एखादे मूल रस्ता चुकले, तर नीट पत्ता पण सांगू शकणार नाही. मुलांना पण गर्दीमध्ये फारसे आवडत नाही, ते अवघडल्यासारखेच असतात. म्हणून विशेष मुले बरोबर असताना गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळलेलीच बरी, असे वाटते. ताजमहाल बघून झाल्यावर आम्ही शहराच्या बाहेर आलो व छान सावलीची जागा बघून बस थांबवली व जेवण केले. बस बरोबर असल्याचा एक फायदा होता, आम्ही कुठेही थांबू शकत होतो. आता खरा परतीचा प्रवास सुरु झाला. मजल दरमजल करत आम्ही १३ तारखेला सकाळी अकरा वाजता मारुंजी इथे पोहोचलो. आमच्या स्वागताला काही पालक व नवक्षितिजचे सहकारी होते. त्यांनी पेढे देऊन आमचे स्वागत केले.
अशा तऱ्हेने आमची आगळीवेगळी भरतपूर ट्रिप यशस्वी झाली. अगदी आयत्यावेळी आलेले संकट आम्ही संघ भावनेने परतवून लावले होते. सगळ्यात जास्त कौतुक मुलांचे. एवढा मोठा ३४०० किलोमीटरचा प्रवास त्यांनी काहीही त्रास न देता व मुख्य म्हणजे आनंद घेत पूर्ण केला. विशेष मुले आपल्याला वाटतात त्यापेक्षा खूप सहनशील व सहकार्य देणारी असतात. आपण त्यांना कसे समजावतो व प्रोत्साहित करतो, यावर सर्व अवलंबून असते.
काही पालक म्हणाले, ‘मॅडम ट्रिपवरून आल्यावर मुले खूप खुश आहेत. दरवर्षी बसनेच जात जा, कारण ट्रेनची तिकिटे मिळायला किती त्रास होतो.’ एक पालक म्हणाले, ‘मॅडम तुम्ही स्कूटरवर नेले असते तरी मुले आली असती व आम्ही त्यांना पाठवले असते.’ यातील गमतीचा भाग सोडला, तरी पालकांनी एवढा विश्वास दाखवल्यामुळेच आम्हाला एवढ्या अडचणींवर मात करून भरतपूरला, पक्ष्यांच्या नंदनवनात मुलांना नेल्याचे अतीव समाधान मिळाले.
https://navkshitij.org/19-Itara-tripsa
0 notes
Text
Incomplete Mahabaleswar Trip
मी तसा जास्त बोलणारा प्राणी नाही, मला कमी बोलायला आवडतं. त्यामुळे स्वतःहून कुणाशी ओळख वगैरे करण्याच्या फंदात मी पडत नाही. अनोळखी व्यक्तींपासून मी जरा दूरच राहतो. का कुणास ठाऊक, पण नाही आवडत मला कुणाशीही स्वतःहून बोलायला. अगदी सुरुवातीपासुनच, म्हणजे लहान होतो त��ंव्हापासूनची हि सवय. होय सवयच म्हणावी लागेल आता.
त्याची अन माझी ओळख कशी झाली आणि कधी आम्ही घनिष्ट मित्र झालो हे काही आठवत नाही. एवढं मात्र आठवतंय कि, ज्यावेळी मी रवी ला भेटायला अमरापूरला जायचो त्यावेळी हा हि तिथे असायचा. रवी माझा जवळचा मित्र जो माझा वर्गमित्र होता आणि नंतर जिवलग मित्र बनला. या दोघांचं काय बोलणं चालायचं मला काही कळायचं नाही. सर्व डोक्यावरून जायचं. अगदी तासनतास काय गप्पा मारायचे त्यांनाच ठाऊक. मला वाटायचं कि पूर्ण गावाची चिंता करण्याचे काम यांच्याकडेच आहे. मी मात्र त्यांच्या सोबत असतांना खुंटीला बांधलेल्या बोकडासारखा कधी रवीकडे तर कधी त्याच्याकडे पहायचो व नुसतीच मान हालवायचो, कधी उत्सुक्तेने, कधी प्रश्नार्थक नजरेने तर कधी काही समजल्याच्या अविर्भावात. ते त्यांच्या गप्पांमध्ये एव्हढे रंगलेले असायचे कि माझे अस्तित्व हे शुण्याप्रमाणे असल्यागत व्हायचे. मलाच कधी कधी गळ्यातून चित्र विचित्र आवाज काढून किंवा बळेच खोकून त्यांचे लक्ष वेधून घ्यावे लागायचे. ज्यावेळी कथा, कादंबर्या, चित्रपट, गाणी आणि टेक्नोलॉंजी असे विषय निघायचे त्यावेळीच मला संधी मिळायची तोंड उघडण्यासाठी, अन जसे कि मी सांगितले मी जास्त बोलत नाही त्यामुळे माझे विषय लवकर संपायचे आणि मग मला पुन्हा गप्प बसण्याशिवाय पर्याय नसायचा व मी पुन्हा एक उत्तम श्रोता बनायचो. असो ! कदाचित त्यांच्या या अघळ पघळ बोलण्यामुळेचं मला पण थोडे फार बोलण्याचे कौशल्य प्राप्त झाले असेल नाहीतर हा जो आज मी इतकं बोलायला लागलो ते काय उगाचंच का!
त्याचा मित्र परिवार खूप मोठा, लहानांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत. त्याचं बोलणही सगळ्यांशी आपुलकीचं त्यामुळे कुणीही त्याला आपला अगदी जवळचा मित्रच समजतो आणि तो तसा आहेही. सर्वांशी अगदी सलोख्याने आणि प्रेमाने वागणारा एक आदर्श मित्र. त्यामुळे जर कुणीही म्हणाले कि महेश माझा जवळचा मित्र आहे तर तो आहे, त्यात काही दुमत नसेल. होय ! इतक्यावेळ मी महेश बद्दलच बोलत होतो. महेश मला दोन इयत्तेने जेष्ठ आहे. पण आम्ही समविचारी असल्यामुळे मला तसे कधी जाणवले नाही.
इतरवेळी शांत असणारा मी त्याच्यासोबत मात्र तासनतास गप्पा मारत असे. आम्हाला बोलण्यासाठी विषयांची कमतरता भासत नसत. आमच्यासोबतचे इतर मित्र वैतागून जायचे, अन म्हणायचे कि इतकं काय बोलता तुम्ही. कित्तेकदा असे झालेय कि मी आणि महेश बोलत बसलोय आणि बऱ्याच जणांनी आम्हाला जाता येता विचारलंय कि, तुम्ही अजून इथचं बोलतं बसलात काय? घरून पन्नास ते साठ वेळा फोन यायचा, कधी येतोय घरी विचारायला. पण आमचे बोलणे काही केल्या संपत नसायचे. नंतर नंतर तर घरी सांगायची गरज पडत नसे कि मी कुठे चाललोय किंवा कुणा सोबत आहे. घरचे समजून जायचे कि एकतर रवी सुट्टीला आला असेल म्हणून आपला मुलगा उशिरा घरी येतोय किंवा मग महेश सोबत असेल.
जर एखाद्याची चेष्टा आम्ही (मी आणि महेश) करायची ठरवली तर समोरचा एकदम त्रस्त होऊन जात असे. अर्थातच आम्ही फक्त गंमत म्हणून टांग खेचायचो. कुणालाही दुखः पोहचवण्याचा आमचा कधीही उद्देश नसायचा आणि समोरचा चिडत असेल तर मग थोडीशी चेष्टा करण्यात काय वाईट आहे. यावरूनच एक किस्सा मला आठवतोय. माझा अजून एक घनिष्ट मित्र आहे नितीन (मूळ नाव बदललेले आहे फक्त त्याला वाईट वाटू ��ये म्हणून) जो महेशचा पण जवळचा मित्र आहे. मी जेंव्हा पतसंस्थेत नोकरी करत होतो तेंव्हा नितीन पुण्याला नोकरीला होता. तो महिन्यातून एकदा तरी दोन दिवसांसाठी पुण्याहून गावाकडे यायचा. तो गावी आल्यावर आम्ही दोघे कित्तेकदा एकत्र अमरापुरला महेशला भेटण्यासाठी जायचो. त्यावेळीही आम्ही (म्हणजे मी आणि महेश )त्याची किंवा तो आमची हलकी फुलकी चेष्टा करायचो. पण त्यावेळी त्याने कधी राग धरला नाही, महेश आणि मला तर आमची चेष्टा केल्याचा काहीचं फरक पडत नसे. कारण आम्ही ते हसण्यावारी घ्यायचो आणि मैत्री म्हटलं कि चेष्टा मस्करी आलीचं.
नंतर काही वर्ष्यानी नितीनचे लग्न झाले आणि त्याचे गावाकडच्या मित्रांमध्ये बसने उठणे कमी झाले. याला अनेक करणे असतील, लग्न म्हणजे जबाबदारी. दोन कुटुंब एकत्र येतात, अनेक गोष्टी असतात, मला सर्वच माहिती आहेत असे नाही. आणि अश्यावेळी सहाजिकच मित्रांऐवजी घरच्यांना आणि घरातील नवीन व्यक्तीला जास्त वेळ देणे गरजेचे असते. आम्हाला या सर्व गोष्टी कळत नव्हत्या असे नाही पण आपला मित्र कितीही विवंचनेत असो वा आनंदात असो, चेष्टा, मस्करी करणे गरजेचे असते, जास्त गंभीर राहून सर्व प्रश्न सुटत नाहीत, तसे ते चेष्टेनेही सुटत नाहीत पण हसून खेळून त्याला सामोरं जाता येतं. मस्करी मित्र करणार नाहीत तर कोण करणार हे ब्रीद वाक्य समजून आम्ही त्याप्रमाने आमचा मैत्रीचा आहेर आम्ही त्याला वेळो वेळी देत राहिलो. पण त्याने कधीही या गोष्टीचा त्रास होत असल्याची कबुली दिली नाही व आम्हीही समजत गेलो कि तो समंजस आहे त्यामुळे आपण केलेली मस्करी तो गंभीरतेने घेणार नाही. आमचा उद्देश नेहमीच सात्विक होता. तसा तोही काही कमी नव्हता आम्हा दोघांना कधी कधी तो भारी पडायचा. तो राजा हरिश्चंद्र आंनी आम्ही ऋषी विश्वामित्र असे काही नव्हते. तोही चांगलीच परतफेड करायचा. अश्या या आमच्या मजेशीर मैत्री मध्ये फक्त चेष्टा, मस्करी एव्हढेच नाही तर इतर कोणत्याही परिस्थिती मध्ये एकमेकांच्या सोबत उभे राहण्यास आम्ही तत्पर असायचो, आत्ता हि तसेच आहोत. आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती कि आमच्या या नेहमीच्या खेळीमेळीच्या स्वभावाने तो इतका त्रस्त होईल आणि एकदिवस असं काही करेल कि आमच्या सततच्या चेष्टा, मस्करी करण्याला खुंट बसेल, अन तसे झालेही.
काही वर्ष्यांनी मी ही नोकरी करण्यासाठी पुण्याला आलो. मला पुण्यात येऊन २ वर्षे झाली असतील तेंव्हाची हि गोष्ट आहे. खूप दिवस झाले होते मी, महेश आणि नितीन एकत्र आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही एकत्र कुठे तरी बाहेर जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. जेथे आम्हाला एकमेकांशी खूप काही बोलतं येईल आणि जास्त वेळ सोबत व्यतीत करता येईल. एक प्रका��ची छोटीशी सहलचं. साहजिकच मला ठरवायचे होते कि कुठे जायचे. मी पुष्कळ विचार करून आणि विविध मार्गांनी माहिती काढून, एक स्थळ निवडले. मी लगेच नितीनला फोन केला आणि विचारले, अरे नितीन! “महाबळेश्वरला जाण्यासंबंधी तुझा काय विचार आहे”. वाह! मस्त स्थळ निवडलंय, माझी काही हरकत नाही आणि तसेही आपल्याला ४ दिवस सुट्टी आहे. एक मुक्काम करावा लागला तरी चालेल, नितीन उत्तरला.
“छान! मग मी लगेच महेशला कळवतो. मी म्हणालो. “ ठीक आहे सांगून टाक आणि महेशला सांग कि १ दिवस अगोदर ये पुण्याला. नितीन म्हणाला.
मी लगेच महेशला कळवले कि आपण महाबळेश्वर ला जातोय तर तू तयारीला लाग. तुझी गावाकडची कामे उरकून घे आणि लवकर पुण्याला ये. महेश ने ही संमती दर्शविलीआणि आमचे महाबळेश्वरला जायचे निश्चित झाले. मी तर जाम खुश होतो कि किती छान झालं, आता सगळे पुन्हा एकत्र येऊन मस्त धमाल करू, हिंडू, फिरू, छान छान फोटोज काढू. निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेऊ. अन याहीपेक्षा मला आम्ही तिघे एकत्र भेटणार याचा आनंद जास्त होत होता.
महाबळेश्वरला जाण्यासाठी शनिवार निश्चित झाला होता. महेश शुक्रवारीच पुण्याला पोहचला होता. मी त्यावेळी होस्टेलमध्ये राहत होतो. संध्याकाळी आम्ही नितीनला फोन केला, इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलून झाल्यावर आमच्या नेहमीच्या गमतीदार स्वभावानुसार आम्ही फोनवरच त्याची गमंत करायला लागलो. यात काहीही नवीन नव्हते सगळे नेहमीप्रमाणेच. मी आणि महेश दोघे���ी अविवाहित आणि नितीनचे लग्न झालेले म्हणून नेहमी प्रमाणे महेशने नितीनला विचारले, “अरे नितीन ! पण तू वहिनींना विचारले का महाबळेश्वरला जाऊ का नको म्हणून?” नितीन म्हटला हो सांगितले मी , तू नको काळजी करूस. हो पण, परवानगी घेतलेले चांगले असते, नाही का? , महेश ने पुन्हा चिमटा घेतला. असं बऱ्याच वेळ महेश त्याची खेचत होता आणि मी आपला ऐकत होतो आणि मध्ये मध्ये महेशला वेगवेगळ्या कल्पना देत होतो. शेवटी फोन ठेवण्या अगोदर महेश पुन्हा म्हणाला, “अरे ऐक न नितीन, वहिनींना म्हणा कि तेव्हढा जेवणाचा डबा करून दिला तर छान होईल”. हो हो सांगतो आणि घेऊन येतो डबा, नितीन म्हणाला आणि फोन बंद केला. नंतर आम्हीही लवकर सगळं आवरून झोपी गेलो.
सकाळी महेश ने मला लवकर उठवलं. मी उठलो तो पर्यंत महेशची अंघोळपण झाली होती आणि तो सगळं आवरून बसला होता. मी पण पटकन आवरा-आवर केली आणि तयार झालो. सहजच वेळ पाहण्यासाठी फोन हातात घेतला. फोनच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसला. मी ओपेन केला तर तो मेसेज नितीनचा होता. मेसेज वाचून मला काय बोलावं काहीच ��ुचेना. मी काहीही न बोलता फोन महेश कडे दिला. अन खुणेनेच सांगितलं मेसेज वाच, महेशने मेसेज वाचला आणि स्तिमित नजरेने माझ्याकडे पाहत राहिला. थोडा वेळ आम्ही दोघेही काहीही न बोलता एकमेकांकडे द्विधा मनस्थित पाहत राहिलो. डोक्यात अनेक शंका येत होत्या... की काय झाले असेल? नितीनच्या घरी सगळे ठीक असेल ना? त्याची तब्येत बरी असेल ना? घरी कुणी पाहुणे आले असतील का अचानक? वहिनी नका जाऊ म्हणाल्या असतील का? या सर्व आमच्या प्रामाणिक शंकांनी डोक्यात काहूर माजलं होतं.
नितीनचा मेसेज – “मला तुमच्यासोबत उद्या महाबळेश्वरला येता येणार नाही, तुम्ही दोघे जाऊन या. हैप्पी जर्नी ! “ :(
1 note
·
View note
Text
ll वानप्रस्थ ll : ४२
शुक्रवारी सकाळी अनंतची मित्रांबरोबर गप्पा आणि खाण्याची साप्ताहिक बैठक असल्याने शुभदा तशीही निवांत असे. आज जरा अधिकच निवांत होती कारण ४ दिवसांपूर्वी 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'मधे घडलेल्या गैरप्रकारांबाबत विस्तृत कारवाई मनासारखी झाल्याच्या समाधानांत मनोहर भोसले आज सर्व मित्रांना विशेष पार्टी देणार होते! त्यांनी स्वत: फोन करून, "वहिनी, मी तुमच्यासाठी खास भलंमोठं पार्सल पाठवणार आहे;- तरी आज चूलीला पूर्ण विश्रांती देऊन मस्त आराम करायचा!" असा निरोप दिल्याने शुभदाला आज स्वयंपाकाचाही तगादा नव्हता! त्यामुळे बर्याच दिवसांनी मिळालेल्या फुरसतीचा सदुपयोग करुन एक नवीन डिझाईनचा स्वेटर विणायला सुरुवात करायचा घाट तिने घातला होता. संग्रही असलेल्या लोकरींचे गुंडे तपासून कुठले ३ रंग निवडावेत याचा विचार ती करीत असतांनाच डोअरबेल वाजली! अनंतला यायला आज नेहमींपेक्षा अधिकच उशीर होणार असल्याने 'कोण आलं असावं?' असा विचार करीत तिने दार उघडलं तर बाहेर अनंत उभा! "धांदलीमधे लॅचची चावी घरीच राहिली कां?" "तूं चुकून आंतून कडी लावली होतीस कां?" त्याला पाहून चकीत झालेल्या शुभदाच्या प्रश्नावर हातांतला चाव्यांचा जुडगा पुढे करीत अनंतने विचारलं, "मी नेहमीप्रमाणेच लॅच उघडायचा प्रयत्न केला, पण उघडलंच नाही!" "जाऊं द्या! माझीच कांहीतरी गडबड झाली असेल तुम्ही गेल्यावर दार ओढून घेतांना!" नेहमी हमखास लॅच उघडून घरांत येणाऱ्या अनंतला आज लॅच उघडतां आलं नाही म्हणजे तो नक्कीच कसल्यातरी गहन विचारांत मग्न असणार हे ओळखून शुभदाने विषय वाढवला नाहीं. आपला लोकरींचा पसारा झटपट आवरून तिने अनंतला सोफ्यावर बसायला जागा करून दिली आणि थंड पाण्याचा ग्लास त्याच्या हातांत देत सहज स्वरांत विचारलं, "पण तुम्ही आज एवढे लौकर कसे परत आलांत? भोसलेंची खास पार्टी होती ना?"
"हो, आज खास पार्टीचं आयोजन मनोहर भोसलेंनी केलं होतं! त्यांनी स्वत: प्रत्येकाला फोन करून आग्रह केल्याने कधी नव्हे ते आम्ही सर्व १६ मेंबर्स आज अगदी वेळेवर हजर होतो. मनोहरपंतांनी स्वत: ठरवलेल्या मेनूला दाद मिळाली. तसंच कांही जणांनी बदलही सुचवले . त्यानुसार खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आणि चहा-काॅफीचा आस्वाद घेत गप्पाही सुरु झाल्या! पण तेवढ्यांत एक फोन आला आणि एकच गोंधळ उडाला!" "म्हणजे?" "आमचे एक मेंबर भाऊसाहेब सप्रे रहात असलेल्या सोसायटीच्या अध्यक्षांचा फोन आला की सप्रेवहिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून भाऊसाहेबांनी तांतडीने घरीं परत यावं! ते ऐकून भाऊसाहेब एवढे घाबरले की त्यांनाच आधी डाॅक्टरांकडे न्यावं लागणार असं वाटायला लागलं! पण सुदैवाने त्यांच्या सोसायटीतच राहणारे यशवंत माने आमच्या ग्रुपमधे आहेत. त्यांनी भाऊसाहेबांना धीर देऊन सांवरलं आणि आपल्या कारमधे त्यांना बसवून तडक घरी घेऊन गेले!" "पण मग तुम्ही नाहीं गेलांत?" "शुभदा, आमची बर्याच वर्षांची ओळख असली आणि ग्रुपच्या निमित्ताने हल्ली नियमित भेटतही असलो तरी माझे भाऊसाहेबांशी वैयक्तिक संबंध नाहींत! त्यामुळे अशा नाजूक आणि अवघड परिस्थितीत माझ्यासारख्या, नाहीं म्हटलं तरी परक्या माणसाने त्यांच्या घरी जाणं मला योग्य वाटलं नाहीं! माझ्यासारखे इतरही ५-६ जण आहेत. आम्ही सर्वांनी एकत्र विचार करून ठरवलं की आपण आत्तां लगेच त्यांच्या घरी जायचं नाहीं!" यावर काय बोलावं हे न सुचून शुभदाही गप्प राहिली. पांच-सात मिनिटे अशा अवघडलेल्या शांततेत गेल्यावर अनंत विमनस्कपणे म्हणाला, "मात्र आम्ही सगळे संध्याकाळी एकत्र भेटून ठरवणार आहोत की कधी जायचं भाऊसाहेबांना भेटायला! तोपर्यंत एकुण परिस्थितीचाही अंदाज येईल!" "आतां भाऊसाहेबांसोबत कोण आहेत याची कांही कल्पना? म्हणजे त्यांना कांही मदत लागली तर या दृष्टीने मी विचारतेय!" "त्या सगळ्या गडबड गोंधळामधे यशवंत मानेंसोबत किती, कोण गेले आठवत नाहीं" अनंत विचार करीत उत्तरला,"पण मानेंसोबत गेले नसले तरी मनोहरपंत तिथे नक्की गेले असतील! त्यांची भाऊसाहेबांशी व्यक्तीशः मैत्री आहे. शिवाय एकुणच त्यांचं सोशल नेटवर्किंग मोठं आहे;- ज्याचा अशा वेळी हमखास उपयोग होतो! मीही संध्याकाळी त्यांनाच फोन करून परिस्थिती जाणून घेणार आहे!!"
बोलत असतांना अनंतच्या चेहर्यावरील तणाव व आवाजातील थकवा जाणवून शुभदा म्हणाली, "हो, संध्याकाळी तुम्ही ठरल्यानुसार तुमच्या मित्रांशी सल्ला-मसलत जरूर करा, पण तोपर्यंत मात्र विश्रांती घ्यायची! उन्हातून आला आहांत म्हणून थंडगार पन्हं घेणार आहांत की तुम्हांला तुमचा तिन्हीत्रिकाळ आवडता चहाच हवा?" "मला काय हवं ते ठाऊक असूनही कशाला नसतंं नाटक ग!" म्हणतांना अनंतच्या चेहर्यावर प्रथमच हलकीशी स्मितरेषा उमटली. 'बरं;-- चहा आणते!' म्हणत शुभदा कीचनमधे जाण्यासाठी वळली तेव्हां तिला थांबवीत अनंत म्हणाला, "तुझी जी कुणी मैत्रीण आहे डबा देणारी, तिच्याकडून सरळ जेवण मागव! आतां कांही करीत बसूं नकोस! आज सकाळी नाश्ता न केल्याने आतां या परिस्थितीतही आपल्या दोघांना लौकरच सणसणून भूक लागणार आहे!"
८ जून २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३५
रविवारची आळसावलेली सकाळ! चहामागोमाग भरपेट नाश्ताही झाल्याने सुस्ती जरा अधिकच वाढली होती! 'रविवार असल्यामुळे आज अनंतची आंघोळ करण्याची घाई असणार नाहीं' हे ओळखून शुभदा आपली आंघोळ आटपून घेण्यासाठी अनंतला तसं सांगून बाथरूममधे गेली होती आणि अनंत सोफ्यावर निवांत आडवरून 'आज दिवसभरात काय-काय करायचं?' याचा विचार करीत होता, तेवढ्यांत डोअरबेल वाजली. विचारांच्या तंद्रीतच अनंतने दार उघडलं आणि दाराबाहेर पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असलेल्या केदार आणि एकनाथना बघून चकीतच झाला! "रविवारी भल्या सकाळी तुम्हांला डिस्टर्ब केल्याबद्दल माफ करा, काका!" नजरानजर होतांच मान किंचित झुकवून अभिवादन करीत केदार म्हणाला, "पण आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही!" "आधी आंत तर या!" दिलखुलास हंसून अनंतने त्यांचं स्वागत केलं आणि भिंतीवरील घड्याळाकडे कटाक्ष टाकीत म्हणाला,"आतां दहा वाजायला आलेत;-- म्हणजे सकाळ संपली रे बाबांनो! तरी कसलाही संकोच नको!" आंत आल्यावर दार लोटून घेत एकनाथ म्हणाला "सबनीसकाका घरी असल्यास त्यांना इथेच बोलावता येईल कां? म्हणजे तुम्हां दोघांशी एकत्रच बोलतां येईल!" संभाषणाचे आवाज ऐकून कोण आलं आहे ते बघण्यासाठी शुभदा बाहेर आली तशी चटकन उठून तिला अभिवादन करीत केदार म्हणाला, " गुड मॉर्निंग, काकु! खरं तर काम तुम्हां दोन्ही काकुंकडेच आहे!" "वा रे वा! म्हणजे हे पुष्पगुच्छ खास दोन्ही काकुंसाठी आहेत तर!" शुभदा कांही बोलण्याआधीच अनंत मिस्किलपणे म्हणाला! "नाही, नाहीं!" केदारने घाईघाईने खुलासा केला, "पुष्पगुच्छ तुम्ही आणि सबनीसकाकांसाठी आहेत;-- पण काम मात्र काकुंकडे आहे!" ते ऐकून "मी रजनीला फोन करून दोघांनाही इथे बोलावून घेते" म्हणत शुभदाने लगेच मोबाईलवरून रजनीशी संपर्क साधला!
दहा-बारा मिनिटांत रजनी आणि दिनकर सबनीस हजर झाले! केदार आणि एकनाथना पाहून थोडे चकरावलेले सबनीस म्हणाले, " तुम्ही दोघं आल्याचं वहिनी बोलल्या नाहीत! 'महत्वाचं काम आहे, ताबडतोब या' एवढंच म्हणाल्या!!" "दिनकरराव, या दोघांचं खरं काम दोन्ही काकुंकडेच आहे! 'देखल्या देवा दंडवत' म्हणून त्यांनी आपल्यासाठी पुष्पगुच्छ मात्र आणले आहेत!" अतिशय गंभीर चेहर्याने अनंत करीत असलेली थट्टा ऐकून चहाचा ट्रे घेऊन बाहेर येणारी शुभदा म्हणाली, "अहो, किती चेष्टा कराल त्या बिचाऱ्यांची!" केदार आणि एकनाथच्या हातांत चहाचे कप देत तिने पुस्ती जोडली, " तुम्ही लक्ष देऊं नका रे यांच्याकडे;-- दोन्ही काकुंकडे काम काढलंत ना याचा मत्सर वाटतोय बरं तुुमच्या काकाला!" चहा पिऊन झाल्यावर केदार अनंत आणि सबनीसांना उद्देशून म्हणाला, " काका, मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्या स्टाॅलचा धंदा वाढावा यासाठी ज्या काही नव्या कल्पना सुचवल्या, त्यावर विचार करून आम्ही 'केदारनाथ स्टाॅल'वर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयी देण्याचं ठरवलं आहे!" त्याचं बोलणं ऐकून एकाच वेळी खुष आणि चकीत झालेले सबनीस म्हणाले , "भले शाब्बास! अवघ्या ८-१० दिवसांत एवढा मोठा निर्णय घेतलांत याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!" "वा,वा! एवढ्या झटपट असा धाडसी निर्णय घेण्याची तुमची धडाडी नक्कीच कौतुकास्पद आहे" चक्क टाळ्या वाजवीत अनंतने आपला आनंद व्यक्त केला, "कधीपासून स्त्री ग्राहकांना खास सोयी देणार आहांत?" "तेच तर सांगायला आलोत, काका!" एकनाथ उत्साहाने म्हणाला,"पण त्याआधी तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही आणलेले पुष्पगुच्छ स्वीकारा आणि आशिर्वाद द्या!" पुष्पगुच्छ देऊन पायां पडायला वाकलेल्या केदार-एकनाथला अर्ध्यावर थांबवीत अनंत म्हणाला, "खरं तर याची गरज ��व्हती,- पण तुमच्या भावनांचा प्रामाणिकपणा आम्हांला कळतो आहे!" दोघांचे हात प्रेमभराने दाबीत सबनीस म्हणाले, "आम्हां सर्वांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत हमेशा असतील याची खात्री बाळगा!"
"काका, येत्या गुरुवारी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयींचा उपक्रम सुरु करायची आमची इच्छा आहे!" केदार सांगू लागला, "---त्यासाठी आमच्या पहिल्या दोन सन्माननीय ग्राहक या दोन्ही काकु असतील असं आम्हीं ठरवलं आहे!" "काकु, तुम्ही प्लीज नाहीं म्हणूं नका!" एकनाथने विनम्रपणे दोन्ही हात जोडून शुभदा आणि रजनीला विनंती केली. त्यांचा हा अनपेक्षित प्रस्ताव ऐकून आश्चर्यचकित झालेल्या दोघींनाही काय बोलावं ते सुचेना! पण कांही क्षणांनी त्या धक्क्यातून स्वत:ला सावरीत शुभदा म्हणाली, " केदार आणि एकनाथ, तुम्ही दिलेला हा बहुमान कुणालाही आवडेल! पण तरीही हा बहुमान तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधा-या महिलेला देणं अधिक योग्य ठरेल असं मला मनापासून वाटतं!"
३० मार्च २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २७
" नाहीं हं, शुभदा! तूं आतां जेवढा आव आणते आहेस, तेवढ्या सहजपणे काही तूं सुरवातीला हे सगळं स्वीकारलं नव्हतंस!" शुभदाच्या लटक्या आविर्भावाचा निषेध करीत, अनंत सबनीसांकडे वळून म्हणाला, "अहो, तिची तक्रार होती की 'इतकी वर्षं पहांटे ५ ३० वाजतां उठून स्वत: चहा करण्याची तुमची हौस अजून भागली नाहीं कां?' एवढंच नाहीं;-- तर तिने मला सरळ धमकीही दिली होती की 'नसेल भागली तर तुम्ही खुशाल चहा करून पीत जा! पण मी कांही आतां रोज इतक्या लौकर उठणार नाही! माझा चहा करून ठेवलात, तर मी उठल्यावर गरम करून घेईन;-- नाहीं केलात तर मी माझ्यापुरता करून घेईन'!" "तुम्हीच सांगा रजनीवहिनी, नवरा रिटायर झाल्यावर इतक्या वर्षांचा कामाचा ससेमिरा जरा कमी होऊन थोडा आराम मिळेल असं बायकोला वाटणं चूक आहे कां? त्यामुळे मी तसं म्हटलं आणि यांनी ते निमूटपणे मान्य केलं! उगीच वितंडवाद न घालतां यांनी आपला रोजचा दिनक्रम चालूं ठेवला! माझ्यासाठी कोरा चहा काढून ठेवून, चहा प्यायल्यावर पूर्वीप्रमाणे फिरायलाही जाऊं लागले! पण १५-२० दिवस गेल्यावर असं एकटीने चहा प्यायचा मलाच कंटाळा येऊं लागला! पूर्वी रोज सकाळी ना, चहा पितांना आमचा दिवसभराचा आराखडा ठरायचा! अगदी नाश्त्याला काय करायचं वा भाजी काय करायची इथपासून ते कांही वेगळा विचार सुचला तर त्याविषयी एकमेकांना सांगण्यापर्यंत! हा रोज सकाळी होणारा संवाद थांबल्याने कांहीतरी हरवल्याची हुरहूर मला लागली आणि एक दिवस मी चक्क शरणागती पत्करली! गुपचूप यांच्या मागोमाग उठून मुखमार्जन केलं आणि कीचनमधे जाऊन सरळ सांगून टाकलं की 'आजपासून तुमच्याबरोबर मीही चहा घेईन!' "
"व्वा, अनंतराव! तुम्ही संयम राखून, कुठलाही वाद न घालतां मोठीच बाजी मारली की!" सबनीस कौतुकाने उद्गारले. "बाजी वगैरे कांही नाही हो! मी हे सगळं माझ्या आई-वडीलांकडून शिकलो! त्या दोघांना मी कधीही वाद घालतांना पाहिलं नाही! माझे वडील शीघ्रकोपी, तर आई अतिशय चोखंदळ! अशी दोन माणसं एकत्र आल्यावर त्यांच्यात मतभिन्नता असणारच;-- पण आई नेहमी म्हणायची की 'ही चाळीची वस्ती! इथे भिंतींनाही कान आहेत! आपण भांडून वा वाद घालून लोकांना ��शाला तमाशा दाखवायचा?' त्यापेक्षा स्वत:ला योग्य वाटतं ते दोघंही निमुटपणे करीत रहायची! अशा प्रकारे वागल्यास थोडा वेळ जास्त लागतो, पण ज्याचं चुकतं, ते त्याला आपोआप कळून येतंच! आणि उगीच शब्दाला शब्द वाढून मनं दुखावली न गेल्याने आपली चूक कबुल करण्याचा समजुतदारपणाही अंगी येतो!" "माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो, की अनेकदां आपली चूक कळून आल्यावरही ती कबूल करणं खुप कठीण होतं!" सबनीस मोकळेपणाने म्हणाले, "टोकाचे वाद घालतांना अकारण इतकी कटुता निर्माण झालेली असते, की आपण चुक कबूल केल्यावर, बायको मोठ्या मनाने माफ करील आणि पुन: पूर्ववत् हंसत-खेळत बोलूं लागेल याची मला खात्री नसते!" " पूर्वी मुलं लहान होती तेव्हा कसं, निदान त्यांच्या आडून वा त्यांच्या मार्फत माफी मागण्याची सोय होती!" रजनीवहिनी चिडवीत म्हणाल्या, "पण आतां मुलं मोठी होऊन दूर गेल्याने तीही संधी मिळत नाहीं!"
" वहिनी, तुम्ही अशा प्रकारे बोलताय् की नेहमी जणूं दिनकररावांवरच ही पाळी येते!" अनंतने मिस्कीलपणे संधी साधली. " नाही, नाही;-- अगदी तसंच नाहीं!", रजनीवहिनींनी घाईघाईने खुलासा केला, " पण एवढं मात्र खरं की मी निष्कारण वितंडवाद घालीत नाही! आपलं चुकतंय् असं जाणवलं की लगेच माघार घेते!" "खरं सांगते आहे, रजनी!", सबनीस म्हणाले," ती चटकन् यशस्वी माघार घेत असल्याने माझ्यासारखी कोंडी होण्याची पाळी तिच्यावर सहसा येत नाहीं! पण अनंतराव आणि शुभदावहिनी, सहज गप्पांच्या ओघांत तुमच्याकडून, वादविवाद टाळून मतभेद दूर करायचा सोप्पा मार्ग समजला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच!!" पत्नीला निघण्याची खुण करीत ते पुढे म्हणाले, "घरीं आम्ही दोघेच असल्याने नवीन फ्लॅट निवडतांना, जसा शेजार मिळावा अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाल्याची खात्रीही तुमच्याबरोबर आज पहिल्या फटक्यातच रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांमुळे झाली आहे! तुम्हांला पत्ते खेळायची आवड असेल तर पुढची बैठक, तुम्हांला वेळ असेल तेव्हां आमच्या घरी पत्ते खेळत रंगवूंया असं सुचवीत आहे!" "अरे वा! तुम्हांलाही पत्ते खेळायची आवड आहे तर!" अनंत उत्साहाने म्हणाला,"आमचा १०-१२ जणांचा ग्रुप आहे! सवडीनुसार आम्ही दुपारी एकत्र जमून रमी खेळतो. तुमची इच्छा असेल तर, पुढचा खेळ ठरेल तेव्हां तुम्हींही सोबत या! तुमच्या तेवढ्याच अधिक ओळखी होतील आणि आमच्या ग्रुपलाही २ नवीन मेंबर्स मिळतील!"
१२ जानेवारी २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २६
'कोळाचे पोहे' खाऊन झाल्यावर हात धुऊन सबनीस शुभदाला म्हणाले, "वहिनी, आम्हां दोघांनाही पोह्यांचा हा प्रकार खुप आवडतो. पण आमच्या घरीं तो करायची प्रथा नाही. तुम्ही शिकवाल कां रजनीला?" "हो, नक्की! पुन: जेव्हां तुम्हांला 'कोळाचे पोहे खाण्याची इच्छा होईल तेव्हां सांगा! त्यावेळी मी तुमच्या घरीं ते रजनीवहिनींकडून करुन घेईन!! मग तर झालं?" त्यावर रजनीवहिनींनीही तत्परतेने मान डोलावली तशी सबनीस त्यांना उद्देशून म्हणाले, "तूं वहिनींना सगळं आवरायला मदत केल्यावर आपण लगेच निघुयां! फक्त ओळख करून घ्यायला म्हणून आलो, आणि बोलतां-बोलतां आपण खुप वेळ घेतला या दोघांचा!" "दिनकरराव, असे कसे तडकाफडकी काय निघालांत? कोळाचे पोहे आवडले ना? मग आता त्यावर निदान अर्धा कप तरी चहा नको? काय शुभदा?" "चहा तर करणारच आहे मी! एरवी आम्ही सकाळी पुन: चहा घेत नाही, पण रविवारी मात्र चहाखेरीज आम्हांला नाश्ता हजम होत नाही!" "ते सगळं ठीक आहे;-- पण वहिनी, तुमची सकाळपासून किती धांवपळ चालली आहे! त्यांत आतां तुम्ही पुन्हा चहा करणार?" रजनी सबनीस म्हणाल्या, "त्यापेक्षा ��ी चहा करते, तोवर तुम्ही बाकीचं आवरा! मला फक्त चहा-साखरेचे डबे कुठे आहेत ते दाखवा!"
चहा पितांना गप्पा पुन्हां नव्याने रंगल्या! त्या ओघात सबनीसांनी शुभदाला विचारलं, "मी ऐकलं होतं की अनंतराव नोकरीतून रिटायर झाले आहेत! पण मग तुम्ही घड्याळाच्या कांट्यांमागे धांवण्याचा उल्लेख कशासाठी केला?" " 'Bad habits die hard' म्हणतात ना, तसं काहीसं झालंय् आमचं! जवळपास गेली ३५ वर्षं अंगीं बाणलेल्या संवयी सुटतां सुटत नाहीत!" शुभदा सस्मित उत्तरली! "म्हणजे?---" सबनीसांच्या मनांतला गोंधळ आवाजात स्पष्ट जाणवत होता. तो उमजून शुभदा सांगू लागली, " मी जरा सविस्तर सांगते, म्हणजे बहुधा तुमच्या लक्षात येईल! लग्न होऊन मी जेव्हां केळकरांंच्या घरी आले तेव्हां आमची फक्त एक डबल रूम होती! त्यात राहणारे सासु-सासरे, माझे थोरले दीर-जाऊ, त्यांची दोन छोटी मुलं आणि आम्ही दोघं असे ८ जण! चाळीतली जागा म्हणजे मोजके काॅमन संडास आणि नळ हे ओघानेच आलं! त्यामुळे सगळ्या घराला एक शिस्त होती! सकाळी लौकर ऊठून, नळावर गर्दी होण्यापूर्वीच पाणी भरण्यापासून ते पुरुषांच्या आंघोळी उरकण्यापर्यंत! सासुबाईचं उठल्यावर पहिलं काम म्हणजे बंबात पाणी तापवायचं. तोपर्यंत जाऊबाई चहा करीत! चहा पिऊन सासुबाई मोरीत पटकन् आंघोळ करीत आणि स्वयंपाकाला लागत! लग्नापूर्वी मला नोकरी मिळाली होती, ती लग्नानंतरही चालूं ठेवायची असं आम्ही दोघांनी ठरवल्याने मूळांत थोडी गलथान असलेली मीसुद्धा लग्नानंतर लौकरच केळकरांच्या घराच्या शिस्तीनुसार सगळं पटापटा आवरायला शिकले! तीन वर्षांनी मोठा मुलगा कौस्तुभ जन्माला आल्यावर जागेची अडचण जाणवूं लागली तशी सर्वांची संमती घेऊन आम्ही जवळच एक डबलरूम घेऊन स्वतंत्र बिऱ्हाड थाटलं! जागेची अडचण कमी झाली तरी संसाराची जबाबदारी वाढली!आर्थिक गरजेपोटीं माझी नोकरी चालूच होती ती अगदी मुलगी केतकी शाळेत जाऊं लागेपर्यंत! मध्यंतरी आमची आर्थिक परिस्थितीही सुधारली होती. त्यामुळे नोकरीत प्रमोशन मिळून पगार बराच वाढल्यावर मात्र यांनी मी नोकरी सोडावी असा आग्रह धरला! चांगली १२ वर्षं केलेली नोकरी एकदम सोडायला मी राजी नव्हते;-- पण तोपर्यंत केतकीचं शाळेत जाण्याचं वय झाल्याने 'मुलांना पुरेसा वेळ देणं अधिक महत्त्वाचं आहे!' हे मला पटलं आणि मी नोकरीचा राजीनामा दिला! अशा रीतीने एकीकडे नोकरीची दगदग कमी झाली, तरी दुसरीकडे वाढत्या वयाच्या मुलां��्या जबाबदाऱ्या वाढतच होत्या!"
" हे अगदी १०० % सत्य आहे!" अनंत कबुली द���त म्हणाला, "ऑफिसात प्रमोशनमुळे पगार वाढला, तसा कामाचा बोजाही वाढला! त्यामुळे मी घरासाठी देत असलेला वेळ उत्तरोत्तर कमी कमी होत गेला! कौस्तुभ आणि केतकीला शुभदाने एकहातीं मोठं केलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीं! त्यांच्या पालनपोषणाचा खर्च उचलण्यापलीकडे मी बाप म्हणून कांही केलं नाहीं! -- आणि मुख्य म्हणजे मुुलांचे वाजवीपेक्षा जास्त वा फाजील लाड न करतां शुभदाने त्यांना शिस्तीत मोठं केलं!'लहानपणीं आईच्या कडक शिस्तीचा आम्हांला कधी कधी खुप राग यायचा, पण त्या शिस्तीचं महत्व आम्हांला आतां स्वत: पालक बनल्यानंतर समजतंय्!' असं कौस्तुभ आणि केतकी दोघंही आज प्रांजळपणे कबूल करतात!!" "अशा प्रकारे जवळजवळ गेली ३५ वर्षं अंगी मुरलेल्या संवयी जातां जात नाहीत! तुम्हांला खोटं वाटेल, पण रिटायर झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी हा गृहस्थ पहांटे साडेपांच वाजता कीचनमधे रोजच्यासारखा चहा करीत होता! काय करणार;-- शेवटीं 'पदरी पडलं, पवित्र झालं,' म्हणायचं!!" म्हणत शुभदाने सुस्कारा सोडला!
५ जानेवारी २०२३
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २५
'रविवार म्हणजे पूर्ण आरामाची सकाळ!' ही नोकरी करीत असतांना अंगी बाणलेली संवय अनंत निवृत्त झाल्यानंतरही टिकून होती! अगदी संवयीनुसार रोजच्याच वेळी जाग आली तरी उशीरापर्यंत झोपून राहण्यापासून ते रोजचा योगपाठ आणि सकाळी फिरायला जाण्याला सुट्टीपर्यंत! त्यानुसार आज आरामांत पहिला चहा पिऊन झाल्यावर अनंत आळसावल्यागत पेपरमधील मुख्य बातम्यांवर नजर फिरवीत बसला होता! त्याचं लक्ष मात्र 'शुभदा कीचनमधे आज नाश्त्यासाठी काय बरं बनवीत असेल?' याकडेच लागलेलं होतं! खरं तर त्याचा चहानंतर सिंंकमधे कप ठेवण्याच्या निमित्ताने कीचनमधे रेंगाळण्याचा प्रयत्न शुभदाने "गुपचूप बाहेर बसा पेपर वाचीत! नाश्ता तयार झाला की मी आणून देईन! तोपर्यंत माझ्या मागे उगाच भुणभुण लावूं नका!" म्हणत त्याला बाहेर पिटाळीत, ऊधळून लावला होता. त्यावर "अग तुला तेवढीच मदत होईल--" म्हणणाऱ्या अनंतला मधेच दटावीत ती म्हणाली होती, "रविवारी तुमचा आराम असतो ना, मग मलाही मी करतेय् ते आरामांत करूं द्या की! तुमची मदत म्हणजे लुडबूडच जास्त! नसते प्रश्न विचारून मला भंडावून सोडाल! त्यापेक्षा मी एकट्याने काय करायचं ते शांतपणे करीन!" "पण नाश्त्यासाठी काय बनवते आहेस ते तरी सांग!" या त्याच्या भाबड्या प्रश्नालाही उडवून लावीत शुभदा म्हणाली होती, "पानांत पडलं की दिसेलच! पेपर वाचून झाला असेल आणि भुकेपोटीं वेळ जात नसेल, तर टेरेसवरील झाडांना पाणी घाला! तेवढीच मला मदत करण्याची तुमची हौसही फिटेल!" त्यामुळे नाईलाज होऊन अनंत हाॅलमधे बसून पेपरवरून नुसतीच नजर फिरवीत होता. तेवढ्यांत डोअरबेल वाजली!
'रविवारी एवढ्या सकाळी सकाळी कोण बरं आलं असावं?' या कुतूहलाने अनंतने दार उघडलं. दाराबाहेर उभे असलेले अनोळखी गृहस्थ नजरानजर होताच किंचित हंसून नमस्कार करीत म्हणाले, " मी दिनकर सबनीस! तुमच्या शेजारच्या फ्लॅटमधे चार दिवसांपूर्वी राहायला आलो आहे. आज तुमच्या घरीं रोजच्यासारखी गडबड जाणवली नाही. विचार केला आज रविवार,-- सुटीचा दिवस! तुम्हीही आरामात दिसताय्;-- म्हणून परिचय करून घेण्यासाठी आलो आहे!" "ओहो! -- म्हणजे चार दिवसांपूर्वी तुमचं सामान आलं तर ��ेजारच्या फ्लॅटमधे! पण तेव्हां तुम्ही कुणी दिसला नाही?" अनंत मोकळेपणानं स्वागत करीत म्हणाला, "या,ना आंत! बसा स्वस्थपणे!" आपल्या मागे दार बंद करून सबनीस आंत आले आणि म्हणाले, "दिवसभरात सामान हलवून, रिकामी जागा नवीन मालकाच्या ताब्यात दिली आणि आम्ही रात्री झोपायच्या वेळेस इथे आलो!" संभाषणाचे आवाज ऐकून बाहेर आलेल्या शुभदाची ओळख करून देत अनंत म्हणाला, " अग, आपल्या शेजारच्या फ्लॅटमधे हे दिनकर सबनीस आतां राहायला आले आहेत." तेवढ्यात खिशातून मोबाईल काढीत सबनीसांनी विचारलं, "If you don't mind, फोन करून माझी पत्नी रजनीला बोलावूं कां? मी तिला म्हणालो होतो की आधी मी पुढे जाऊन घरी कुणी आहे कां बघतो आणि तुला कळवतो!" अनंतने होकारार्थी मान हलवल्यावर सबनीसांनी मोबाईलवरून पत्नीला लगेच येण्याची सूचना केली आणि शुभदाकडे वळून ते म्हणाले, " तुमची दोघींचीही ओळख होईल म्हणून रजनीला बोलावून घेतलं!" "मीही कधीपासून वाट बघते आहे, शेजारी कुणीतरी राहायला येण्याची! गेलं वर्षभर तरी रिकामाच ���हे शेजारचा फ्लॅट!" तेवढ्यांत डोअरबेल वाजली तशी "रजनीवहिनी आल्या वाटतं!" म्हणत चटकन् पुढे होऊन शुभदाने दार उघडून त्यांचं स्वागत केलं.
आंत आल्यावर हातांतला डबा शुभदाला देत रजनी सबनीस म्हणाल्या, " ढोकळा केला होता, तो आणला आहे नमुन्यासाठी! गरम आहे तोंवर लगेच खाल्लांत तर बरं!" " अरे वा!" अनंतकडे वळून चेष्टा करीत शुभदा म्हणाली, " मजा आहे आज एका माणसाची! मी त्याच्या खास आवडीचे कोळाचे पोहे बनवते आहे नाश्त्यासाठी;-- त्यात भर म्हणून रजनीवहिनींनी त्याचा लाडका ढोकळा आणला आहे!" " काय? आज नाश्त्यासाठी कोळाचे पोहे, शुभदा?" अनंतच्या स्वरातील आश्चर्य आणि आनंद लपण्यासारखा नव्हता! त्याची गंमत वाटून सबनीस म्हणाले, "वहिनी, तुम्ही नाश्त्यासाठी कोळाचे पोहे बनवताय् म्हणजे तुमचा उरक दांडगा म्हणायला हवा!" "आज रविवारी तसा आराम असतो, म्हणून फुरसत मिळते असले घाट घालायला! नाहींतर एरवी घड्याळाच्या कांट्यामागे धावतांना, कसले वेळमोडे पदार्थ करतांय्?" शुभदाने खुलासा केला. कीचनकडे वळत ती सबनीसांना उद्देशून म्हणाली, "तुम्हां दोघांना चालणार असेल, तर आंत डायनिंग टेबलजवळ बसतां कां? कोळाचे पोहे आतां पांच-सात मिनिटांत तयार होतील, ते आमच्याबरोबर तुम्हीही खा! आवडतात ना तुम्हांला?" "क्या बात है! मला नाही वाटत, कोळाचे पोहे न आवडणारा कुणी मराठी माणूस पुण्या-मुंबईत तरी जन्माला आला असेल!" सबनीस दिलखुलास हंसत उद्गारले!
२९ डिसेंबर २०२२
0 notes
Text
भूकंप...
रोजच्या प्रमाणे रात्रीचे जेवण उरकून छोटा ब्लॅक अँड व्हाईट मर्फी टिव्ही बंद करुन झोपायची तयारी झाली. दोन खोल्यांचेच घर. समोरच्या खोलीत दिवसा ऑफिस, अन रात्री तिथल्या टेबल खुर्च्या सरकावल्या की तीच बेडरुम! खालीच गादी टाकून त्यावर आम्ही झोपायचो. टिव्ही यासाठी बंद करावा लागायचा कारण वर्ष सव्वा वर्षाची कन्या टिव्ही चालू असला की झोपायचीच नाही. तिला झोपवायचे म्हणजे खूप कष्टाचे काम असायचे. नऊ वाजता हा कार्यक्रम सुरु व्हायचा तेव्हा कुठे साडेदहा अकरापर्यंत ती झोपायची. मगच आम्हाला अंग टेकायला मिळायचे.
29 सप्टेंबर 1993 च्या रात्री तिला झोपवून आम्हीही काही क्षणातच झोपी गेलो. मुलगी पहाटे पाच सहाच्या दरम्यान उठून बसायची, तोपर्यंतच आमची झोप व्हायची. पहाटे गाढ झोपेत असतांना अचानक एखादे रोड रोलर अगदी जवळून जात असल्यासारखा आवाज आला अन जमीन हादरु लागली! आधी काही भास आहे असे एक क्षण वाटले. पण दुसर्या क्षणातच एकदम लक्षात आले अन आम्ही दोघेही एकाच वेळी ‘भूकंप’ असे ओरडलो! मुलीला कडेवर उचलले अन दार उघडून पटकन बाहेर आलो. अजूनही रोड रोलर दूर गेल्याचा आवाज अन त्याचा कंप जाणवत होता. पळत जावून घरमालकाचे दार वाजवले. ते सगळे बाहेर आले. तोवर कॉलनीतले बरेचजण बाहेर आले होते.
घरमालक म्हणाले ‘आम्हाला थोडे व्हायब्रेशन जाणवले, पण भूकंप असेल असे काही वाटले नाही. तुम्हाला कसे लक्षात आले?’
‘आम्ही खालीच गादी टाकून झोपतो म्हणून कदाचित जमीन हादरल्याचे लगेच जाणवले अन त्याबरोबरच कडकडणारा भयानक आवाज आला, घाबरुन पटकन आम्ही बाहेर आलो.’ मी म्हणालो.
कॉलनीतल्या प्रत्येकाच्या चेहर्यावर आश्चर्ययुक्त भीती दिसत होते. प्रत्येकजण आपले अनुभव सांगत होता. कुणाला काय जाणवले, कसे लक्षात आले, पूर्वी असा अनुभव कधी आला होता वगैरे चर्चा सुरु झाली. आम्हाला दोघांनाही तो आवाज अन धरणी कंप हा भूकंपाचाच आहे हे कसे लक्षात आले माहित नाही, पण आम्ही लगेच पावले उचलली होती. कुठेतरी भूकंपाबद्दल वाचले होते त्यावरुन आम्ही अंदाज केला होता, तो बरोबर निघाला होता.
उजाडत आले होते. अजूनही छातीतली धडधड थांबली नव्हती. नेमके काय घडले, कुठे घडले काही कळत नव्हते. मुलगी खांद्यावर अजूनही मस्त झोपली होती. आत येवून परत तिला गादीवर झोपवले अन आम्हीही तिच्या बाजूला विसावलो. पडल्या पडल्या बाहेरची चर्चा मनात घोळवत डोळा कधी लागला कळलेच नाही.
मुलगी सहा वाजताच उठली होती. तिचे खाणेपिणे ही किचनमध्ये करत होती. मी मात्र गाढ झोपलो होतो. तितक्यात दार वाजले. घड्याळाअत पाहीले, साडे सात वाजले होते. खडबडून उठलो अन दार उघडले. बाहेर घरमालक होते. ते म्हणाले ‘बातम्या ऐकल्या का? सातच्या बातम्यात सांगितले की भूकंप तुमच्या उमरग्याकडे कुठेतरी झाला आहे. ते ऐकून लगेच तुम्हाला सांगावे म्हणून आलो.’
एकदम धक्काच बसला! मी टिव्ही सुरु केला. त्यावेळी आमच्याकडे फक्त दूरदर्शनच होते. नेमका दुसराच कुठला तरी कार्यक्रम चालला होता. चिडुनच कपडे घालून बाहेर पडलो अन एसटीडी बुथवर गेलो. तिथून उमरग्याला घरी फोन लावला. बर्याच वेळानंतर फोन लागला. पलिकडून दादा बोलत होते. त्यांनी सांगितले की ‘खूप भयंकर घडले आहे. किल्लारीला भूकंपाचे सेंटर आहे, तिथे तर खूपच हानी झाली आहे पण उमरग्यालाही खूप नुकसान झाले आहे. आपल्या वाड्याची स्वैपाकघराच्या बाहेरची दगडी भिंत पडली आहे, बर्याच ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पण सगळे ठिक आहेत.’ नंतर आईपण बोलली. त्यांच्याबरोबर बोलून खूप बरे वाटले अन डोक्यावरचे टेंशन कमी झाले.
या घटनेच्या काही दिवस आधीच शिवाजी कॉलेजसमोर नवीन घर बांधले होते. अजून सगळे तिकडे शिफ्ट झाले नव्हते. फक्त प्रवीण अन वहिनी कन्येसह रात्री झोपायला तिथे जात असत अन सकाळी वाड्यात येत असत. तिकडेही सर्व ठिक आहे, काही काळजी करण्यासारखे नाही असे दादांनी सांगितले. त्यांनी सांगितले की बैलगाडी घेवून ग़डी आला आहे, आवश्यक सामान घेवून आम्ही लगेच नवीन घरात शिफ्ट होत आहोत. ते सर्व ऐकून माझ्या मनातली भीती कमी झाली अन मी घरी येवून ही बातमी सांगितली.
त्या दिवशी दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेरच होतो. संध्याकाळी परत आलो. गेटमध्ये असतांनाच घरमालकांनी ओरडून सांगितले ‘लवकर बातम्या ऐका, तुमचे उमरगा पूर्णपणे बेचिराख झाले असे सांगत आहेत.’ हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली! पळत घरी आलो, टिव्हीवर खरंच तसं सांगत होते! बातम्या ऐकून खूप टेंशन आले. परत एसटीडी बुथवर गेलो. पण नेमकी तिथे खूप गर्दी होती. प्रत्येकजण आपल्या गावी फोन लावत होता. लाईन कंजेशनमुळे कुणाचे फोनच लागत नव्हते. खूप प्रयत्न करुन एखाद्याचा फोन लागत होता. सहा वाजता मी तिथे गेलो होतो, रात्री अकरा वाजेपर्यंत फोन लागलाच नाही! कंटाळून एसटीडी बुथवाल्याने बुथ बंद केला अन मी खजील होवून घरी आलो. बातम्यामध्ये वारंवार तेच दाखवत होते ‘उ���रगा शंभर टक्के उध्वस्त!’
थोडा विचार करुन एकदम हिला म्हणालो ‘मी आत्ताच उमरग्याला जातो.’ ती म्हणाली ‘अहो साडेअकरा वाजलेत, उमरग्याची शेवटची गाडी तर केव्हाच निघून गेली. आता कसे जाणार?’ मी म्हणालो ‘स्कुटरवर जातो.’ काही वेळ आमची ही चर्चा झाली अन कुणी मित्र सोबत मिळाला तर बघा असे तिने सुचवले. मी लगेच एका मित्राकडे गेलो. तो म्हणाला ‘अरे औरंगाबाद ते उमरगा साडे तिनशे किलोमिटर स्कुटरवर एवढ्या रात्री गेल्यापेक्षा सकाळ होईपर्यंत थांब, एखादी गाडी करु अन जावू.’ त्याचा सल्लाही योग्यच होता. पण मनात खूप घालमेल चालली होती. शंभर टक्के उध्वस्त म्हणजे कसे काय शक्य आहे? सकाळी तर आपण बोललो, तोपर्यंत सर्व ठिक होते, मग नंतर नेमके काय झाले? का परत भूकंप झाला? अन फोन का लागत नाहीत? असे एक ना अनेक विचार येत असल्यामुळे रात्रभर झोपच आली नाही.
सकाळी निघण्याची तयारी केली. मित्र गाडी ठरवणार होता. त्याच्याकडे स्कुटरवर निघालो. रस्त्यात सहज एका एसटीडी बुथवर गेलो. नुकतेच ते उघडत होते. त्याने फोन लावला अन काय आश्चर्य पहिल्याच प्रयत्नात फोन लागला! अधीर होवून तो मी कानाला लावला. पलिकडून दादा बोलत होते. त्यांनी सांगितले की हिंदी बातम्यात उमरगा तालुका किंवा किल्लारी असे न सांगता उमरगाच सांगत आहेत. किल्लारी सास्तूरला खूप नुकसान झाले आहे, तिथे खूप जीवीतहानी झाली आहे. पण आपल्याकडे त्यातल्या त्यात ठिक आहे. नुकसान आहे पण जीवीतहानी नाही.
हे ऐकून मणा मणाचे ओझे उतरल्यासारखे वाटले. नवीन घरी अजून फोन नव्हता. योगायोगाने दादा अन प्रवीण काही सामान ने��्यासाठी वाड्यात आले होते, त्यामुळे फोन उचलला गेला, नसता अजून खूप टेंशन वाढले असते. प्रवीणशीही बोलणे झाल्यामुळे खूप हलके वाटले.
तिथले क्षेमकुशल ऐकून खूप बरे वाटले, पण त्याचवेळी इतर ठिकाणी झालेली हानी ऐकून वाईटही वाटत होते. अशा द्विधा मन:स्थितीत मित्राकडे गेलो अन त्याला सर्व वृत्तांत सांगितला. तो म्हणाला ‘चला, घरी सर्व ठिक आहे हे बरं झालं. मी गाडी ठरवली आहे, पण ती उद्या मिळणार आहे. तुझे घरी बोलणे झाले नसते तर मी तुझ्याबरोबर स्कुटरवर यायची तयारी केली होती, पण आता अनायासे सर्व ठिक आहे तर आपण उद्या गाडीने जाऊत.’ मलाही ते पटले अन मी घरी आलो.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही तीन मित्र टॅक्सीने निघालो अन दुपारी दोन वाजता उमरग्याला पोहोचलो. घरी सर्वांना भेटून खूप आनंद झाला. तिथे गेल्यावर खर्या अर्थाने भूकंपाची तीव्रता जाणवली. चर्चेतून कळले की अनेक गावे नष्ट झाली होती. हजारोच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले होते. कित्येक लोक बेघर झाले होते. सुन्न होवून आम्ही हे ऐकत होतो. नवीन घरातही भिंतींना तडे गेले होते. सगळे समोरच्या खोलीतच झोपत होते. घरा समोरच्या हायवेवरच्या वाहतुकीने होणारे व्हायब्रेशनही भूकंपाचेच आहेत असे वाटायचे, इतकी दहशत बसली होती.
त्याच दिवशी परत जायचे असे ठरले होते म्हणून जेवण, चहापाणी करुन आम्ही चार वाजता निघालो. प्रवीण आमच्या सोबत किल्लारीपर्यंत येणार होता. आधी आम्ही वाड्यात गेलो. तिथली पडझड पाहवत नव्हती. आमचे जन्मस्थान, आमचे रम्य बालपण ज्या वाड्यात गेले तो वाडा ओसाड पडला होता! तीन दिवसांपूर्वीच चकचकीत असणारा वाडा, ते ढेळज, अंगण, ओसरीवरचा झोपाळा, माडीवर जायच्या पायर्या वर्षानुवर्षापासून धुळ खात पडल्या आहेत असे वाटत होते. वाडा बांधल्यापासून वाड्यात कुणीही माणूस नाही अशी ही पहिलीच वेळ होती. स्वैपाकघराची मागची भींत कोसळली होती. तिच्या दगड मातीच्या ढिगार्याखाली न्हाणीघर दबले होते. ते पाहुन जाणवले की अगदी पहाटे ही घटना घडल्यामुळे निदान न्हाणीघराच्या बाजूला कुणी नव्हते. नसता...! विचारही करवत नव्हता!
गल्लीत सर्व लोक रस्त्यावरच सतरंज्या, पलंग टाकून झोपत होते. दिवसाही कुणी घरात जात नव्हते. थोडे कुठे खुट्ट झाले तरी सर्वजण घाबरत होते, इतकी दहशत बसली होती. हे सर्व पाहुन मनात खूप कालवाकालव होत होती.
जड मनाने आम्ही तिथून निघालो अन किल्लारी, सास्तूर आदी गावे पाहिली. तिथली परिस्थिती तर अतिशय भयानक होती. एकही घर शाबूत दिसत नव्हते. खूपच भयानक दृश्य होते. सगळी दगडीच घरे असल्यामुळे जागोजागी दगडमातीचे ढिगारेच ढिगारे दिसत होते. ते उपसण्याचे काम चालले होते. मिलीटरी अन काही स्वयंसेवी संघटना झटतांना दिसत होती. त्यात पाऊस पडत असल्यामुळे अन बघ्यांमुळे काम करणे अवघड जात होते. सर्वत्र कुबट वास सुटला होता. एका ठिकाणी भट्टी पेटलेली पाहिली अन छाती चर्रर्र झाले. एकाच भट्टीत अनेकांचे अंतीम संस्कार होत होते. कुणाचे नातेवाईक होते तर कुणी बेवारस! हे सर्व पाहवत नव्हते.
किल्लारीच्या महादेव मंदिरात गेलो. गाभारा सोडून सर्वकाही पडले होते. गाभार्यात एका व्यक्तिने सांगितले की बारा महिने महादेवाच्या पिंडीखालून पाणी वहात असते, पण नेमके भूकंपाच्या आदल्या दिवशी रात्रीपासून ते पाणी बंद झाले आहे! हा दैवी संकेत कुणाला कळला नाही! काय खरे काय खोटे माहित नाही, पण सत्य डोळ्यासमोर होते!
किल्लारी व सास्तूर ही दोन्ही सधन अन संपन्न गावे एका क्षणात बेचिराख झाली होती! आजुबाजूचीही अनेक गावे उध्वस्त झाली होती. ते हृदयद्रावक दृश्य फक्त पाहूनच आम्ही एवढे हवालदिल झालो होतो, तर ज्यांच्यावर प्रत्यक्ष हे बेतले आहे त्यांचे काय हाल झाले असतील? या विचारानेच मन सुन्न झाले. मनोमन देवाला प्रार्थना केली की ‘देवा अशी आपदा तुझ्या भक्तांवर कधीच आणू नको!’
निशब्द होवून तिथून बाहेर पडलो, अन मुख्य रस्त्यावर एका ठिकाणी प्रवीणला सोडून जड अंत:करणाने आम्ही औरंगाबादकडे प्रस्थान केले...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes