#वर्षांसाठी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरुन गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरु झाल्यानंतर सुरुवातील बारा वाजेपर्यंत गोंधळामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचल्या आहेत. त्या उद्या ऊटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी नीलगिरीमध्ये विविध जनसमुहाशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत, त्यामुळे कोईम्बतूर आणि ऊटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचे लक्ष्य असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं, हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली. जागरुकता वाढवणं, तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरीत माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे.
****
पंचावन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियन या चित्रपटासह जवळपास ७० चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात, तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथावाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनु चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील.
****
शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी या योजनेसाठी एच एम ए एस डॉट एम ए एच ए आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त कार्यालयात जमा करावी, असं आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात २५ वर्षानंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी दोन वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्राची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.
****
नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चक्री वादळात रुपांतरीत होत आहे. यामुळं श्रीलंकेच्या बेटावर दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण-पूर्वेस ५९० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत हा पट्टा उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. येत्या ४८ तासांत हा खोल दाबाचा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
****
भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं दहा मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी, या संस्थेनं २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता चार वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. यामुळं बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही तसंच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकापदासाठी अर्जही करता येणार नाही.
****
0 notes
Text
Pimpri : निकृष्ट कामे; 11 ठेकेदार काळ्या यादीत
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामे घेण्यासाठी तब्बल 40 ते 45 टक्के कमी दराने निविदा भरून निकृष्ट कामे ( Pimpri) करणा-या 11 ठेकेदारांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चांगलाच दणका दिला आहे. 11 ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असून निकृष्ट झालेल्या कामाचे दुप्पट पैसे वसूल करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. शहरात महापालिकेच्या…
0 notes
Link
81.35 कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य - Free food grains to 81.35 crore beneficiaries for five years
0 notes
Text
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची मस्त स्कीम, भरमसाठ व्याजासह दरमहा 9000 रुपये कमवा.
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या आश्चर्यकारक योजनेत, फक्त पैसे सुरक्षित नाहीत तर व्याज देखील बँकांपेक्षा जास्त आहे. या योजनेत तुम्ही ५ वर्षांसाठी Single किंवा Join Account उघडू शकता. प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही भाग वाचवतो आणि तो अशा ठिकाणी गुंतवण्याची योजना बनवतो की भविष्यात केवळ मोठा निधी जमा होऊ शकत नाही, तर निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचीही व्यवस्था करता येईल. या संदर्भात, Post…
View On WordPress
#post office#Post Office Monthly Income Scheme#Post Office New Scheme#Post office schemes in Marathi
0 notes
Text
जळगाव : दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
https://bharatlive.news/?p=169932 जळगाव : दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
जळगाव, पुढारी वृत्तसेवा: ...
0 notes
Text
मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान अनमोल – राज्यपाल रमेश बैस
मुंबईच्या शैक्षणिक विकासात सिंधी समाजाचे योगदान ......
मुंबई, : स्वातंत्र्यानंतर मुंबईत स्थलांतर केल्यानंतर सिंधी समाजातील लोकांनी ��नेक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून मुंबईच्या शैक्षणिक विकासात अनमोल योगदान दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. सिंधी समाजातील लोकांनी स्थापन केलेल्या एचएसएनसी शिक्षण संस्थेने पुढील २५ वर्षांसाठी आपल्या विकासाचा रोडमॅप तयार करून देशविदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी जागतिक दर्जाची…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती
नागपूरला मुंबईशी थेट जोडणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपूरात होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख… २५ वर्षांपूर्वी, चार वर्षांसाठी महाराष्ट्राचे आणि आता गेली आठ वर्षे देशाचे रस्ते मंत्रालय समर्थपणे सांभाळणारे देशाचे लोकप्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती
नागपूरला मुंबईशी थेट जोडणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महा��ार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपूरात होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख… २५ वर्षांपूर्वी, चार वर्षांसाठी महाराष्ट्राचे आणि आता गेली आठ वर्षे देशाचे रस्ते मंत्रालय समर्थपणे सांभाळणारे देशाचे लोकप्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी…
View On WordPress
0 notes
Text
औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई
औरंगाबाद : केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता स्थानिक पोलिसांकडून सुद्धा या संघटनेवर कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद पोलिसांकडून पीएफआय कार्यालय सिल करण्यात आले आहे. सील केलेल्या नोटीसवर औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांची सही आहे. कार्यालयाच्या तीनही गेटवर सील लावण्यात आले आहे. तर पीएफआयच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे. तर पीएफआयचे कार्यालय सील करण्याची राज्यातील पहिलीच कारवाई आहे. देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संघटनेच्या शेकडो सदस्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी वेगवेगळ्या कारवाया करत ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता पीएफआय कार्यालयावर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबादच्या जिन्सी भागातील पीएफआयचे कार्यालय औरंगाबाद शहर पोलिसांनी सील केले आहे. याबाबत कार्यालयावर एक नोटीस सुद्धा लावण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांनंतर स्थानिक पोलिसांकडून सुद्धा पीएफआयवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याभरापासून पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर करण्यात येत असलेल्या कारवायांमध्ये औरंगाबाद केंद्रंिबदू बनला असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सुरवातील चार आणि त्यानंतर १३ पीएफआय सदस्यांना औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे औरंगाबादमधून अटक करण्यात आलेला नासेर शेख या संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये पीएफआयचं मोठं जाळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद
केंद्र सरकारने आरक्षण ५० टक्क्यांच्या वर न्यावं तसंच जातीनिहाय जनगणना करावी-शिर्डीच्या प्रचार सभेतून प्रियांका गांधी यांचं आव्हान
मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना जाहीर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो ऍपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या संकल्पनेतून साधलेल्या या संवादात, पंतप्रधानांनी महायुतीच्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजपा सुरुवातीपासून मध्यमवर्गाच्या आकांक्षांवर लक्ष केंद्रीत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गाचं योगदान सगळ्यात जास्त असल्याचं लक्षात घेऊन, त्यांच्यावरचा कराचा बोजा कमी केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
****
��ेंद्र सरकारने आरक्षणाचं प्रमाण ५० टक्क्यांच्या वर न्यावं, आणि जातीनिहाय जनगणना करावी असं आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदार��ंघातील साकुरी इथल्या प्रचार सभेत त्या आज बोलत होत्या. दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग आणि बेरोजगारी या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली.
****
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव तसंच कांद्याला विशेष समिती नेमून योग्य भाव देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. ते आज अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभेत बोलत होते. देशाच्या विकासात काँग्रेसनं अमूल्य योगदान दिलं असून काँग्रेस नेहमीच शेवटच्या घटकाचा सर्वात आधी विचार करते असं राहुल गांधी म्हणाले.
****
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं मत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
****
येत्या ५ वर्षात मुंबईकरांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव मोठ्या प्रमाणात सुखद होईल, असं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते.
मनोरंजन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यावं यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी ची स्थापना करायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यातली पाहिली संस्था मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा वैष्णव यांनी केली.
****
शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात दापोली मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार योगेश रामदास कदम तसंच गुहागर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. राज्यात महायुतीला १७० जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
महाराष्ट्रात राजकीय स्थिरतेसाठी तसंच विकास आणि सुरक्षिततेसाठी महायुती हाच पर्याय आहे. असं मत भारतीय जनता पक्षाचे नेते सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केलं. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुरक्षितेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे चांगलं राज्य असल्यानं इथं गुंतवणूकही वाढत आहे असं सिंह यांनी सांगितलं.
****
विधानसभेत हमी भावाचा कायदा व्हावा, यासाठी आपण आग्रही असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोला जिल्हयातल्या कुरणखेड इथल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. दरम्यान, आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं आंबेडकर यांची प्रचारसभा होणार आहे.
****
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची उद्या, रविवारी पुण्यातील येरवडा परिसरात सभा होणार आहे. दुपारी १२ वाजता ही महासभा आयोजित करण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रचाराचा अवधी संपत असल्याने, उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. घरोघरी जाऊन प्रचारावर अधिक भर असल्याचं पहायला मिळत आहे.
जालना जिल्ह्यात महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी आज ग्रामीण भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगर इथे आज ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे नेते माजेद हुसेन सहाब यांची पक्षाच्या उमेदवारांसाठी रोशन गेट येथे सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी आज पैठण मतदार संघातील पक्षाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ पैठण तालुक्यातील चिंतेपिंपळगाव येथे सभा घेतली. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी मतदार संघात जनतेशी संवाद साधला.
****
विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात जैवविविधता, सांस्कृतिक-सामाजिक वारशांचं दर्शन, स्तन्यदा-गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा, दिव्यांग तसंच महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचं पाणी तसंच स्वच्छतागृहांची सोय देखील उपलब्ध असणार आहे.
****
स्वीप कार्यक्रमाअंतर्गत राज्यभर मतदार जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. लातूर जिल्ह्यात अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जात आहे. जिल्ह्यात १२१ शाळांमधल्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारांपेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं.
तुळजापूर इथं ३७ शाळेतील ३७०० विद्यार्थी तसंच ३२१ शिक्षकासह जनजागृती फेरी काढण्यात आली. हातात घोषवाक्याचे फलक घेऊन ��हरातील विविध भागातून या फेरीनं जनजागृती केली.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथली एमबीएची विद्यार्थिनी असलेल्या साक्षी वैद्य या नवमतदार तरुणीनेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट – साक्षी वैद्य
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा चड्डा -बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानचे संजीव कुलकर्णी आणि हेमंत मिरखेलकर यांनी नांदेड इथं ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ. मीरा बोरवणकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
राज्याचे टपाली मतपत्रिका राज्यसमन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात आलं आहे. सर्व २८८ विधानसभा मतदार संघातल्या टपाली मतपत्रिकांचं संकलन तसंच वितरण या केंद्रातून केलं जात आहे. मतदान झालेल्या सुमारे २२ हजारांहून अधिक तसंच कोऱ्या मतपत्रिकांचं हस्तांतरण या ठिकाणी सुरु असल्याची माहिती, नोडल अधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी केली.
****
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघामध्ये एक हजार ७५५ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर पुरवण्यात आलेल्या असून सर्वच केंद्रावर दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी विशेष दोन स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्र���कृष्ण पांचाळ यांनी ही माहिती दिली.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १९ आणि २० नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचं बीडच्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच दूरचित्रवाणी वाहिन्या, दृक-श्राव्य जाहिरातींचे देखील पूर्व प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे.
दरम्यान, राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणाची मुदत उद्या संपत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितलं आहे. सोशल मीडिया तसंच यू-ट्यूबर्सना मतदानापूर्वी शेवटच्या ४८ तासात प्रचार प्रसारास बंदी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघात एकूण ५३१ मतदारांचं गृहमतदान घेण्यात आलं. यामध्ये ४८५ वयोवृद्ध आणि ४६ दिव्यांगांचा समावेश आहे. ५७६ मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते. अर्जांनुसार गेले दोन दिवस मतदान करण्याची सुविधा प्रशासनाकडून देण्यात आली होती.
****
नांदेड शहरात आज मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीत महापालिकेतील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
****
भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
****
0 notes
Text
"7 वर्षांसाठी...": रवी शास्त्री यांनी कोचिंगमध्ये संभाव्य पुनरागमनाबद्दल काय म्हटले | क्रिकेट बातम्या
“7 वर्षांसाठी…”: रवी शास्त्री यांनी कोचिंगमध्ये संभाव्य पुनरागमनाबद्दल काय म्हटले | क्रिकेट बातम्या
रवी शास्त्री यांचा भारताचे मुख्य प्रशिक्षक असतानाचा फाइल फोटो.© एएफपी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू रवी शास्त्री 2021 च्या T20 विश्वचषकानंतर गेल्या वर्षी भारतीय पुरुष क्रिकेट संघासोबत एक यशस्वी प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपवला. तत्कालीन कर्णधारासोबत शास्त्री यांनी चांगली भागीदारी केली विराट कोहली, दोन संस्मरणीय कसोटी मालिका जिंकल्या डाउन अंडर – भारताने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात लांब…
View On WordPress
0 notes
Text
Agnipath | चार वर्षांसाठी नोकरी हा सुरक्षा दलाचा अपमान : खा राऊत
#Agnipath | चार वर्षांसाठी नोकरी हा सुरक्षा दलाचा अपमान : खा राऊत #Mumbai #Maharashtra #SanjayRaut #Shivsena
Agnipath | चार वर्षांसाठी ठेकेदारी पद्धतीने नोकरीवर ठेवणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान : खासदार संजय राऊत Agnipath | मुंबई (दि १८ जून २०२२) : अग्निपथ योजनेची केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सैन्य भरतीसाठी घोषणा केली आहे. या योजनेनुसार ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली जाणार आहे. केंद्र सरकार���े या योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटत आहे. या योजनेवरून शिवसेना खासदार संजय…
View On WordPress
0 notes
Text
सुषमा अंधारेंची खाेचक पाेस्ट, "दादा ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री; मग भाजप..."
https://bharatlive.news/?p=157912 सुषमा अंधारेंची खाेचक पाेस्ट, "दादा ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री; मग ...
0 notes
Text
आयपीएल मीडिया राइट्स विकल्यानंतर जय शाहचा दावा आहे की आयपीएलला पुढील एफटीपीमध्ये अडीच महिन्यांची विंडो आहे
आयपीएल मीडिया राइट्स विकल्यानंतर जय शाहचा दावा आहे की आयपीएलला पुढील एफटीपीमध्ये अडीच महिन्यांची विंडो आहे
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ने पाच वर्षांसाठी मीडिया हक्कांसाठी 48,390 कोटी रुपयांची कमाई केली असूनही, BCCI सचिव जय शाह यांना आश्चर्य वाटले नाही आणि त्यांनी आग्रह केला की त्यांना क्रिकेटच्या सर्वात चर्चेत असलेल्या T20 लीगमध्ये अधिक योगदान देण्याची संधी आहे. क्षमता. तेहतीस वर्षीय ��ाह यांनी पीटीआय-भाषेशी एका खास संभाषणात सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुढील फ्युचर टूर प्रोग्राम…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
पैगंबरांवरील टिप्पणीवर भाजपची कारवाई: प्रवक्त्या नुपूर शर्मांची पक्षातून हकालपट्टी
पैगंबरांवरील टिप्पणीवर भाजपची कारवाई: प्रवक्त्या नुपूर शर्मांची पक्षातून हकालपट्टी
प्रेषितांवरील वादग्रस्त विधान भोवले भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. नुपूर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप सर्वच धर्म व त्यांच्या प्रतीकांचा सन्मान करत असल्याचे या प्रकरणी स्पष्ट करण्यात आले आहे. भाजपने नुपूर शर्मांसह दिल्ली प्रदेश प्रवक्ते नवीन जिंदल यांच्यावरही…
View On WordPress
0 notes