#वरण-भात
Explore tagged Tumblr posts
Video
youtube
वरण भात खातोय आमच्या जीवावर तु नीट रहाय मनोज जरांगे..
0 notes
Text
हक्काने सांगायचे जेवायला येतोय, वरण-भात कर : सुप्रिया सुळे सायरस मिस्त्रींच्या आठवणीत भावूक
हक्काने सांगायचे जेवायला येतोय, वरण-भात कर : सुप्रिया सुळे सायरस मिस्त्रींच्या आठवणीत भावूक
हक्काने सांगायचे जेवायला येतोय, वरण-भात कर : सुप्रिया सुळे सायरस मिस्त्रींच्या आठवणीत भावूक Go to Source
View On WordPress
#:जेवायला#आठवणीत#आताची बातमी#कर#ट्रेंडिंग बातमी#न्यूज अपडेट मराठी#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भावूक#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#मिस्त्रींच्या#येतोय#रेगुलर अपडेट#वरण-भात#वायरल बातमी#सांगायचे#सायरस#सुप्रिया#सुळे#हक्काने
0 notes
Text
मालवणातील सगळ्यात उत्तम, चविष्ट आणि गोड पदार्थ म्हणजे शिरवाळे किंवा नारळाच्या दुधातील शेवया. माझी आजी कोकणातली ती नेहमी म्हणायची नागपंचमीला नेहमी उकडीचे पदार्थ बनवायचे. फोडणी द्यायची नाही, नाहीतर नागराजाला चटके बसतात. मग त्यादिवशी सकाळी शिरवाळे आणि पातोळ्या. आणि रात्री साधं वरण भात. असा बेत असायचा. चला हा झाला आठवणींचा भाग आता रेसिपी कडे वळूया. आज आपण शिरवाळे बनवूया, चला येताय ना.....
1 note
·
View note
Text
|| श्री गणेशाय नमः ||
(Shree Ganeshaya Namah)
Salutations to Prosperous Ganesh
Lord Ganesh, the Elephant Headed is worshipped by most of the Hindu. He is considered as most auspicious among all and hence he was granted the boon by the Supreme God Shiva the Destroyer that he will be worshipped first before starting any ritual.
Thus to remove all the obstacles before starting any rituals the beloved almighty is worshipped first before any other God.
Lord Ganesh, the son of Supreme lord Shiva and the Mother Goddess Parvati, God of Good fortune, wisdom, remover of obstacles.
The story of Lord Ganesh is a bit different than other gods.
Let's begin with why he has an Elephant head ?
It begins when Goddess Parvati was going to meditate, she creates an human idol out of the dirt and give life to it. She called him Ganesh
When the human become conscious out of the dirt idol, goddess Parvati gives him the duty of a gatekeeper and tells him not to give entry to anyone as she was about to meditate and doesn't wanted anyone to disturb her.
Child Ganesh stands at the gate to stop all those who tries to enter. When the Supreme Lord Shiva himself come there to visit Parvati, dutiful Ganesh stop him from meeting the goddess. All the gods from heaven and the other members of the holy trinity themselves came to explain Ganesh to let Shiva pass. But the Dutiful Ganesh thought this would result in dishonour of his mother's obligation.
Even after so much explaining by holy trinity and other heavenly gods, Ganesh refuse to let Shiva pass through the gate to meet Parvati.
This makes Shiva furious and after becoming angry he opens his third eye and cuts the human head of Child Ganesh with his Trident.
After seeing Ganesh fallen dead on the ground, Goddess Parvati transform herself into an angry deity called Shakti and threatens the trinity of revive Child Ganesh or she'll destroy all the universe.
To save the world from destruction, Lord Shiva revives Ganesha by attaching an Elephant head instead of a human head.
After the god was awaken with an elephant head he was glorified with all the blessings from the trinity themselves and all the gods from heavens present there.
From all many Blessings received that day, he was granted the rank of God of Good Fortune, God of Wisdom and remover of Obstacles.
He was so wise that the trinity decided to grant him the boon of the God of be worshipped first.
It all begins on the day when the Holy Trinity were confused for who to assign the rank of first worshipped god.
On the same day, Lord Shiva enter into the state of meditation and assign Ganesh and Kartikeya, his older brother, to gatekeep the entries of Kailash.
Both went to guard the gates. There they saw Parshuram, an avatar of Lord Vishnu, approaching towards them.
He said to them "Let me pass young children, I have to see Lord Shiva" on which Ganesha replied "Pardon us oh great sage, but as per the orders of Lord Shiva himself, we cannot let anyone pass through the gates"
Upon hearing this he became angry and threaten them that let him pass or they will encounter his wrath.
But Dutiful Ganesh refuses to let him pass and thought he might end his anger by hugging him and step forward to hug him.
Upon being touched by Ganesh, Parshuram under the sway of his pride though he has polluted him and raises his weapon to attack on him.
Kartikeya steps forward and says "Forgive him O great Parshuram, as he is not acquainted with whom you are let me tell him the tales of Parshuram the great"
After hearing this he let him go and went to Mansarovar lake to purify himself. Here Kartikeya tells him the story of Parshuram the great
Because of the Dutifulness and kind gesture of Ganesh he was first selected for the rank. But when few gods question the selection as they had never seen the powers of Lord Ganesh
On this Shiva comes up with a brilliant game where he tells all of the gods to encircle the Earth three-time and whoever will finish it first and return back will be the one whom they will grant the rank.
To see this competition all the gods from the heavens come to Kailash (home to Shiva and his family). Devrishi Naradmuni counts from three two one
Kartikeya quickly gets on his mount Peacock Surapadma and leaves the place to encircle the planet. Whereas on the other hand Shree Ganesha the wise amongst all gets off his mount Mouse Mushakraj and walks towards his parents, encircles them three times, present a Naman with both palm joined and stand besides them awaiting for Kartikeya to return so Devrishi could announce the winner. Everyone stares at Lord Ganesh with a confused mind. Only God Shiva and Goddess Parvati looks merrily towards their child.
As quickly Kartikeya went, so fast he returned. Seeing Ganesha standing beside his parents he laughs and say "O brother, haven't you gone to encircle the Earth. Look how quickly i have gone and came making me"
All the Gods being confused ask Ganesh why didn't he go to encircle the Earth.
Lord Replied, "O Gods of Heaven, having not only Earth, moon and the Sun within them (Shiva and Parvati) but the entire universe, why should i go somewhere else to encircle. I didn't encircled merely my Parents but the Entire Universe as for me they are the only Reality for me."
Listening to this all the gods became very surprised with happiness and seeing the love for his parents in the eyes of Lord Ganesh Devrishi declares him the winner of the competition.
On this Shiva gives his the boon that Lord Ganesha will be worshipped first before any god or goddess as the most Wise and Fortune full.
|| श्री गणेशा विघ्नहर्ता ||
(Shree Ganesha Vighnaharta)
Prosperous Ganesh God of removal of Obstacles.
On the Fourth day of the Bhadrapada month (Mid August) or the Bhadrapadi Chathurti also called as the Ganesh Chaturthi, the worshippers brings home the Idol of Lord Ganesh (In the Pic) and worship it for either 1.5 days, 3 days, 5 days, 7 days, 11 days or 21 days. We worship for 5 days.
During these days, we worship, pray, entertain the lord by singing Aarti (अर्ती) and Bhajan (भजन). Offer Naivedya (नैवेद्य) and play games.
The Naivedya or the Holy Meal is the Food (Lunch) which is offered to the lord.
The Naivedya is one of my and also the Lord's Favourite part. From वरण भात Varan Bhat (Dal Rice) to मोदक Modak (Sweet Coconut stuffed dessert).
Modak is Lord's most favourite Cuisine of all. Just as children like chocolates, lord loves Modak.
It is believed that those who calls out his name before starting any new job/work/activity experience less or no obstacles which would amounts to stoppage in the work.
This is my First post thus to avoid any obstacles in the future i have begin my first post by talking and praising about Lord Ganesh.
|| तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच करिता आणि करविता ||
Tu Sukh karita, Tu Dukh Harta, Tuch karta ani karavita.
You are the bringer of happiness, you are the slayer of sadness, you are the performer of actions and you are the one who make others to perform their actions.
We'll see about Brahman from the next post. Today let's begin the journey by calling out the almighty's name ...
|| गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ||
Ganpati Bappa Morya Mangal Murti Morya
Salutations to Lord Ganesh, Salutations to the Idol of Good Fortune
1 note
·
View note
Text
हुंडी
"सुरेखा ए सुरेखा, खूप दिवसात रिक्लायनर सीट वर रेलून सिनेमा नाही चेपलाय. जाऊया का या रविवारी संध्याकाळच्या शो ला? बुक करतो तिकिट्स. तू फ्री आहेस ना?" "हो रे कर, जाऊया. मीनल नाही येणार पण, तिचे वेगळे प्लॅन्स असतात. उगीच तिचे तिकीट काढू नकोस. एक तर तिला बळे बळे न्यायचे महागडे तिकीट काढून आणि चेहेऱ्यावर एरंडेल प्यायल्याचे भाव सोसायचे आपणच". सुरेखातला मुनीम बोललेला! रवी ने मागच्या सहा एक महिन्यात एक सुद्धा सुटी घेतलेली नव्हती. मागचे चार सहा रविवार पण तो इमरजनसी ड्युटी वर होता. त्याच्या सगळ्या कलिग्स च्या मुलांच्या परीक्षा होत्या म्हणून ड्युटीज याच्या गळ्यात पडलेल्या. तसाही रवी दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख बघणारा. "प्लीज रवी कर ना रे ऍड्जस्ट" म्हणायचा अवकाश की रवी हळवा होई आणि ड्युटी त्याच्या गळ्यात येई. रवी शहरातल्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या इस्पितळात सिनियर भूलतज्ञ म्हणून कामाला होता. कामाची वेळ दहा ते सहा पण एकदा का चेंबर मध्ये स्वारी पोचली की पीटर हेन्लेईन घडाळ्याचा शोध करायचे विसरले की काय असा तो कामात गुंतून जाई. रवीला पेशंट्सशी अवांतर गप्पा मारायला जाम आवडे. खरतर त्याचे काम शस्त्रक्रियागृहात भूल देण्याचे पण हा अधिक वेळ आदल्या दिवशी त्यांच्याशी गप्पा मारण्यात घालावी. पेशंट रिलॅक्स झाला की त्याला कमी औषधात बेहतर भूल देता येते अशी त्याची पक्की खात्री. काहीश्या अश्याच विषयावर त्याचा एक शोध प्रबंध एका उच्च दर्जाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेला आणि नावाजलेला सुद्धा. "काँग्रॅच्युलेशन्स रवी यू कंपलिटेड टेन किमी इन फिफ्टी एट मिनिट्स. धिस इज युअर न्यू बेस्ट!!" रवीच्या आयफोन वर मॅसेज पॉप अप झाला. त्याच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर लहानसे स्मित आले. रविवार ची छान सुरुवात झालेली! रवीने घराची बेल वाजवली आणि त्याला हवी तशी ब्लॅक कॉफी चा मग घेऊन सुरेखा ने दार उघडले. घराच्या गॅलरीत रवी पाय लांब करून बसला. पक्ष्यांचा किलबिलाट, हलक्या आवाजात भीमसेन बुवांचा भैरव राग, गार वाऱ्यावर वाळत चाललेला घाम, दीडशे वरून साठीत येणारी हृदयाची गती आणि जिभेवर कॉफी ची चव - ….व्वाsss!... ही रवी ची स्वर्गाची व्याख्या! मीनल तेवढ्यात येऊन त्याला बिलगली. "बाबी लंच ला मॅक-डी ला जायचे का?" मॅक-डी आणि रवीचे हाडाचे वैर! तो नाही म्हणणार हे तिला नक्की माहित असे. मग तिचा नेक्स्ट डायलॉग - "बघ ह .. मी यायला तयार आहे तुझ्या बरोबर, तूच नाही म्हणतोयस. मी जाते आता माझ्या फ्रेंड्स गॅंग बरोबर". तो चिडचिड करण्याचा आव आणि पण आतून त्याला हे सगळे आवडे. "सुरेखा आज मस्त अंडा करी चा बेत करूया. मी करतो सगळे. तू आज जरा तुझ्या 'मी-टाइम' चा आनंद घे". चव कमी अधिक असली तरी ती बोटं चोखून करी चा आनंद घेत असे. अंड्याचा बलक आवडत नसला तरी ती मिटक्या मारून खाई. "रवी तुझ्या हाताला अशी काही चव आहे ना की मला ते कमी मीठ/ अंड्याचा बलक जाणवतच नाही रे". तिची ही एक ओळ त्याचा सगळा थकवा घालवायला पुरेशी असे. स्वतः बनवलेला विडा चघळत त्याने एक झोप काढली. चार चा अलार्म लावला, सिनेमाला जायचे होते ना! पण डोळा लागतो ना लागतो तोच फोन खणा��ला. डॉ सरपोतदार कॉलिंग ... हॉस्पिटल सुपरिटेंडेंट. "रविवार दुपारी का कडमडतोय हा" म्हणत त्याने फोन कट केला. परत फोन ची कटकट सुरूच. शेवटी कंटाळून त्याने फोन रिसिव्ह केला. "रवी लगेच हॉस्पिटल ला ये"' इतकेच बोलून सरांनी फोन कट केला. इतके तुटक सर कधीच बोलत नाहीत. नक्की काही तरी गंभीर असेल - रवी ला उमगले. तो तडक हॉस्पिटल ला पोचला. सर घाई घाईत बोलत होते "रवी कुठल्या तरी वेगळ्याच आजाराने पीडित वृद्ध लोक दोन दिवसां पासून हॉस्पिटलच्या ओपीडी ला येतायत. आपले जवळ जवळ सगळ्या फिजिशियनना लागण झाल्याची संभावना आहे. त्यांना आयसोलेशन मध्ये शिफ्ट केलाय. आपल्या दोघांनाच आता गड लढवायचा आहे. फास्ट सेलिना सिस्टर - डॉ रवी ना 'पीपीइ' द्या आणि त्यांची रूम दाखवा". ओपीडी सेक्शन बघून मी हबकलोच. रविवार असून सुद्धा ओपीडी खोकणाऱ्या आणि तापाने फणफणणाऱ्या स्त्री पुरुषांनी भरलेली. सिस्टर सेलिना मला चेंजिंग रूम मध्ये घेऊन गेली. 'पिपीई' चा या आधी मी कधीच वापर केला नव्हता. दरवाज्या मागे लावलेल्या तक्त्या नुसार मी चेंज करायला घेतले. घातलेले कपडे आधी काढून ठेवले. सर्जिकल गाऊन चढवला. रेड टेप चे भारीतले शूज काढून साधे कॅनवास पुश इन घातले. त्यावर एक विशिष्ठ प्रकारच्या प्लास्टिक चे पिशवीसम कव्हर चढवले. अंगावर त्याचाच अंगरखा घातला. हातात डबल ग्लोव्हस, डोक्यावर कापडी आणि त्यावर प्लास्टिक ची टोपी. तोंडावर कापडी मास्क आणि त्यावर ट्रिपल लेअर चा विशिष्ठ मास्क. डोळ्याला चष्मा आणि त्यावर एक पारदर्शक बंद गॉगल. ह्या सगळ्यावर हेल्मेट ला पुढे काच असते ना तशे कव्हर. बेसिन च्या वर लावलेल्या आरश्यात बघितले आणि पटकन हसू आले स्वतःचे ध्यान बघून. झिपकी {लेकीचे लाडाचे नाव} च्या खोलीत भिंतीवर टांगलेल्या फोटोतला नील आर्मस्ट्राँग वाटत होतो फुल्टू :). समोरच्याला माझ्या डोळ्यांशिवाय काही दिसत नसणार. मी ओपीडी १ गाठली. १५ x १५ फुटाची खोली. मधोमध एक लाकडी टेबल. त्यावर ठेवलेला एक पांढऱ्या रंगाचा स्टील ट्रे. त्यात एक टॉर्च, टंग-डिप्रेसर, स्पिरिट, सॅनिटायजर, पीसीआर किट - इतकेच सामान. टेबलाच्या दोन्ही बाजूला हात नसलेली एक-एक खुर्ची. कोपऱ्यात कॉम्प्रेसर चालू आहे याची सतत जाणीव करून देणारा एक आवाज करणारा जुना ��्रिज. भिंतीवर राष्ट्र पुरुषांच्या तसबिरी आणि त्याला घातलेले प्लास्टिक च्या फुलांचे हार. उजव्या भिंतीला एक छोटिशी खिडकी ज्याची काचेची कवाडे घट्ट बंद. छतावरचा पंखा एका विशिष्ठ लइत फिरत होता, फ्रिज च्या आवाजाला साथ देत होता जणू. खोलीचा दरवाजा स्प्रिंग ची बिजागरे असलेला, दोन्ही कडून धक्का दिला की उघडणारा. मी खुर्चीत विसावतो ना विसावतो तोच सिस्टर सेलिना बोलल्या - सर पाठवू का पेशंट? मी होकारार्थी मान डोलवली. पहिला रुग्ण - वय - ६१, कोरडा खोकला, ताप १०१, पल्स - ११०, रेस्पिरेटरी रेट - ४०, रक्तदाब, मधुमेह - आहे. घ��्यातुन स्वाब घेऊन सॅमपल पाठवले. दुसरा रुग्ण - ताप, खोकला, पल्स, सॅमपल. तिसरा मग चवथा... दहावा... विसावा... बाहेरच्या रुग्णांचा खोकल्याचा आवाज, सिस्टर सेलिना चा - चला नेक्स्ट पेशेंट आणि माझ्या फोन ची रिंग - काहीच थांबेना. सुरेखा जाम वैतागली असणार. मला फोन रिसिइव्ह पण करता येत नव्हता. मला तरी कोठे माहिती होते असे काही तरी पुढे वाढून ठेवलाय ते. असो.. रात्रीचे नऊ कधी वाजले कळलेच नाही. मास्क चे इलॅस्टिक काना मागे काचायला लागलेले. उजव्या पोटरीला आणि पाठीला खाज येत होती पण काही इलाज नव्हता. ब्लैडर इतके भरले होते की ते फुटेल कि काय अशी सारखी भीती वाटत होती. माने भोवती घामाने पोवळ उठल्या सारखे जाणवत होते. हे सगळे विचार मेंदू करत होता. रुग्ण मात्र मी स्पायनल लेवल वर बघत होतो. ताप, खोकला, टेस्ट हेच काय ते करायचे होते. सिस्टर सेलिनाला शेवटी माझी दया का कीव काहीतरी आली. "सर एक ब्रेक घेऊया" ती उद्गारली. मी लगेच उठलो. किती बर वाटले पाय सरळ करून! मी तडक चेनजींग रूम मध्ये गेलो. चिलखत भिरकावले आणि गोड मिट्ट चहा घश्या खाली केला. चहानी मला इतका आनंद या आधी कधीच दिला नव्हता. चहा संपवून सुरेखा आणि मीनल ला परिस्थीची कल्पना दिली. मला काही दिवस इथेच राहावे लागणार होते, नव्या डॉक्टरांची फळी येईस्तोवर तरी. पलंगावर आडवा झालो ते सकाळी सहालाच जाग आली. सिस्टर सेलिनाने दोनदा नॉक केल्याचे ती म्हणाली पण नंतर तिने नाद सोडला. चहा बिस्किटे खाल्ली, पीपीई चढवला आणि परत १,२,३, ताप, खोकला, टेस्ट ... चालू. काल घश्याला कोरड पडून वैताग आलेला. त्यावर मी आज एक युक्ती शोधली. मॅरेथॉन ला वापरलेली सिप्पीन्ग बॅगेत मी पाणी, मीठ, साखर आणि लिंबू असे मिश्रण भरून घेतले. ती बॅग पीपीई च्या ��तून पाठीवर घेतली. त्याचे सिप्पीन्ग एन्ड तोंडात ठेवले. ते पाणी पिताना मी केलेला त्या बॅग च्या उपयोगाने स्वतःचा अभिमान वाटायचा आणि मीच माझी पाठ थोपटून घ्यायचो. काना मागे काचणाऱ्या इलॅस्टिक च्या पट्टीला गॉज चा एक थर दिला, त्यानी खूप सुखावह झाले. इलॅस्टिक च्या खेचण्या मुळे माझे कान जरा बाहेर आल्यागत वाटत होते. थोडा का होईना गांधीजीं सारखा दिसतोय म्हणून कॉलर ताठ झाली! मानेवर, पाठीवर आणि पायावर टालकम पावडर लावल्यानी सारखी घामामुळे येणारी खाज बरीच कमी झाली होती. बाहेर लॉक डाउन झाल्याचे कळाले. काल केलेल्या टेस्ट्स पैकी ९०% पॉसिटीव्ह आल्या होत्या. प्रत्येक दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत होती. आता तर कमी वयाचे रुग्ण पण यायला लागलेले. कॉवीड-१९ किती बळावलाय याची कल्पना मला येत होती. कबुलच करायचे तर मी जाम घाबरलो होतो. घश्यात जरा जरी टोचल्या सारखे झाले किंव्हा डोळ्यांची थोडीका आग झाली तरी मला धस्स व्हायचे. मी लगेच इन्फ्रारेड थर्मोचेक स्वतःच्या कपाळा समोर धरी. '३७' चा आकडा बघून जीव भांड्यात पडे. शाळेत भूगोल माझा जानी दुश्मन. तेव्हा सुद्धा प्रगती पुस्तकावर भूगोलाच्या रकाण्यात '३७' चा आकडा बघून अगदी इतकाच आनंद होत असे. दिवसाचे दहा तास काम करून रात्री कधी झोप लागायची कळायचेच नाही. आज तिसरा दिवस. पहिलाच रुग्ण रशीद. त्याला बघून धक्काच बसला. रशीद पन्नाशीतला एक उत्साही बंदा. कुठल्याश्या आयटी कंपनीत मदतनीस म्हणून कामाला होता. रोज सकाळी फ्रेश जूस घेऊन रस्त्याच्या कडेला एक टेबल घेऊन उभा असे. "सर, आज गाजर डे, आज कारले जूस, आज बीटरूट," कधी मिक्स असे माझ्यासाठीचे दिवस त्यांनीच ठरवलेले. मी पण रन नंतर निमूटपणे तो देईल ते जूस पीत असे. सगळ्यांना तंदुरुस्त रहायला मदत करणारा रशीद आज खोकल्याने बेजार आणि तापाने थरथरत होता. त्याचे वय झाल्यासारखे स्पष्ट वाटत होते. आता माझ्या ओळखीचे लोक पण इथे दिसू लागले या विचारानेच मी घाबरलो, हादरलो. काहीही झाले तरी रुग्णाला हात लावायचा नाही अशी सक्त ताकीद असून सुद्धा माझा हात आपसूक रशीद च्या खांद्यावर विसावला आणि "घाबरू नका बरे व्हाल लवकर" अशे शब्द तोंडी आले. नुसत्या ह्या कृतीने सुद्धा त्याला धीर आल्यासारखे स्पष्ट दिसत होते. माझ्या झाकलेल्या चेहऱ्या मुळे त्यानी मला ओळखले नव्हते. एका अर्थी ते बरेच झाले. आज डे - ९. आता मला रोजच्या दिनक्रमाची सवय झालेली. सकाळी ८ ला उठून ९ पर्यंत ओपीडी गाठायची. रात्री ९ ला अंघोळ करून गादीवर पाठ टेकवायची ती सकाळी ८ पर्यंत. माझ्या ओपीडी च्या खिडकीत एक मनी प्लांट ची कुंडी ठेवलेली. त्यावर सकाळी कोवळ्या उन्हाची तिरीप पडे. त्याने ते रोप जणू आनंदी होई. त्याची पाने टवटवीत आणि डोलताना दिसत. जस जसे उन्ह माथ्यावर येई तसे ते रोपटे अंग चोरल्यागत पाने खाली वाकवे. मग मी जाऊन कुंडी सावलीत घेत असे. थोड्या वेळात पाने परत टवटवीत दिसत. सकाळी आल्यावर तिरपीच्या कक्षेत कुंडी ठेवायची आणि नंतर सावलीत. हा आमच्या दोघांचा - मी आणि ते वेल रोजचा ठरलेला खेळ . गेल्या दहा दिवसात ना रन, ना ते पाय लांब करून बसून कॉफी पिणे, ना भीमसेन, ना तो पक्ष्यांचा किलबिलाट. मी माझ्या झिपकी {माझ्या लेकीला} सगळ्यात जास्त मिस करत होतो. ते तिचे लाडिक बाबी म्हणत उगीच गळ्यात बिलगणे, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणे, रात्री बळेबळेच मला कॉफी प्यायला लावणे, मॅक-डी चे नाव घेऊन मला उल्लू बनवत मित्रां बरोबर बाहेर जाणे - सगळे सगळे मिस करत होतो. सरपोतदार सरांचा निरोप आला - "उद्या घरी जाऊ शकतोस. रुग्ण संख्या मंदावलीय आणि बाकीचे डॉक्टर्स पण कामावर रुजू झालेत". माझा आनंद गगनात मावेना. मी लगेच घरी फोन करून सुरेखा ला हुकूम सोडला. "उद्या घरी येतोय. मस्त फोडणीचे वरण आणि फडफडीत भात करून ठेव". हॉस्पिटल च्या डब्याचा वीट आला होता. सकाळी लवकर उठून सरपोतदार सरांचा आणि सिस्टर सालिना चा निरोप घेऊन बाहेर पडलो. सकाळच्या उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडली आणि ते मनी प्लांट का डोलायचे आणि टवटवीत दिसायचे ते कळले. तसाच ५ मिनिटे उभा राहिलो आणि १४ दिवसांची कसर भरून काढली. याच उन्हा पासून बचावा साठी मी डोळ्यावर ग्लेअर्स आणि चेहऱ्यावर सनस्क्रीन लावून पळायला जायचो, तेच ऊन आज मला हवेहवेसे वाटत होते. या दोन आठवड्यात मला माझ्या एकट्या बरोबर भरपूर निवांत वेळ मिळाला. शरीर पूर्ण वेळ काम करीत असे. मेंदू आणि मन मात्र खूप गप्पा मारत अगदी कुठल्याही विषयावर. त्यांची चांगलीच गट्टी जमली होती. याचा एक मोठा फायदा झाला - मी स्वतःला आणखीन नीट ओळखायला लागलो आणि स्वतःवर जास्त प्रेम पण करायला लागलो. मागच्या काही दिवसात मी कमीत कमी हजार च्या वर रुग्ण तपासले असतील. त्यांच्या पैकी कित्येक चेहेरे माझ्या लक्षात आहेत. माझा चेहेरा मात्र त्यांनी कोणीच पहिला नाही - म्हणजे दिसतच नव्हता पीपीई मुळे. तिरुपतीला मी पाहिल्यात हुंड्या ठेवलेल्या - गुप्त दान करायला. ज्याची सेवा केली त्याला पण कळायला नको की कोणी ती केलीय - ती�� तर खरी सेवा - गुप्त दान, हुंडीतले!
1 note
·
View note
Text
*आयुर्वेदातील आहाराचे महत्व*
आहार किती घ्यावा याविषयीही आयुर्वेदाने विचार केला आहे. आपल्या आहाराच्या क्षमतेपेक्षा एक चतुर्थांश कमी खाल्ले पाहिजे. पूर्ण पोटभर जेवल्यामुळे अन्नपचनासाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही. जेवताना खूप घाईघाईने जेवणेही प्रकृतीसाठी चुकीचे असते. पहिला घास तोंडात गेला की तो चाव�� असतानाच लाळ मिसळली जाऊन त्या अन्नाच्या पचनाची प्रक्रिया सुरू होते. ते अन्न पोटात पोहोचले व पचनक्रिया नीट सुरू झाली की मेंदूला संदेश जातो. ज्या व्यक्ती भरभर जेवतात त्यांचे पोट प्रत्यक्षात लवकर भरते पण अन्न पचनाची प्रक्रिया ठरावीक वेळानंतर पुरेशी सक्रिय होत असल्याने मेंदूकडून खाणे थांबवण्याचा संदेश उशिरा येतो. तोपर्यंत खाण्याची क्रिया चालूच राहते. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न पोटात जाते. अतिखाण्यामुळे वजन वाढते. यामुळे सावकाश खाणे खूप महत्त्वाचे आहे.
एकदा पोटभर जेवल्यावर थोड्या थोड्या वेळाने परत खाणे आयुर्वेदानुसार चुकीचे आहे. त्याला ’अध्यशन’ असे म्हटले आहे. अधिक अशन म्हणजे सारखे सारखे खाणे. यामुळे विविध प्रकारच्या व्याधी, आजार
होऊ शकतात.
सध्या आपल्या आहाराच्या पद्धतीही अतिशय चुकीच्या झाल्या आहेत. आयुर्वेदाने जसे जेवणात सहा रस असावेत असे सांगितले आहे तसे ते कोणत्या क्रमाने खावेत हेही सांगितले आहे. जड अन्न, जास्त पाणी असलेले, खूप गोड किंवा खारट असलेले पदार्थ जेवणाच्या सुरुवातीस आधी खावेत असे आयुर्वेद म्हणतो. मात्र सध्या आपण स्वीट डीश, डेझर्ट किंवा फळे जेवणानंतर खातो. त्यात आपली जीवनशैली बैठी व व्यायाम नसलेली झाली आहे. त्यामुळे जेवणानंतर खाल्लेली स्वीट डीश पचत नाही. भातामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तोही जेवताना आधीच खावा. आपल्या पारंपरिक भोजनसंस्कृतीतही वरणभात आधीच खायची पद्धत आहे. त्यानंतर गोड पदार्थ, पोळी, भाजी खावी व सर्वांत शेवटी पचण्यास हलके असलेले ताक प्यावे. भात, वरण, मीठ व लिंबू हे एकत्र खाल्ले जाते त्याचीही उपयुक्तता आता आधुनिक संशोधकांना जाणवली आहे. कारण कार्बोहायड्रेट, फॅटस्, प्रोटीन्स आणि ऍसिटिक ऍसीड हे जेव्हा एकत्र होते तेव्हा त्याचे पचन उत्तम होते.
आहार कधी घ्यावा, जेवणाची वेळ कोणती असावी याविषयीही आयुर्वेदात स्पष्ट मार्गदर्शन आहे. अग्नी ही आयुर्वेदामध्ये संकल्पना आहे. आपल्या अन्नाचे पचन करण्याचे काम शरीरातील अग्नी करतो. सूर्य आणि शरीरातील अग्नी यांचा थेट संबंध असतो. त्यामुळे दुपारचे जेवण डोक्यावर सूर्य असताना म्हणजे दुपारी बारा ते एकच्या सुमारास घ्यावे. यावेळी अग्नी चांगला प्रज्वलित असल्यामुळे आहाराचे प्रमाण व्यवस्थित असावे. शरीरातील अग्नी संध्याकाळी सूर्योदयानंतर मंद असतो त्यामुळे हलका व कमी आहार घ्यावा. खूप उशिरा जेवू नये. उशिराचे जेवण व त्यात पचनास जड पदार्थांचा समावेश हे सध्या सामान्य चित्र दिसून येते. कामावरून उशिरा घरी येणे, टि.व्ही.वरील कार्यक्रम, पार्ट्या, रिसेप्शन यामुळे जेवणास वारंवार खूप उशीर होतो. तसेच अशा जेवणात पनीर, छोले, चायनीज, गोड पदार्थ यांचा बहुधा समावेश असतोच. उशिरा जेवून लगेच झोपले जाते. त्यामुळेही हे अन्न पूर्णपणे पचत नाही आणि पचनविषयक अनेक आजार अनेकांना झालेले दिसून येतात.
जेवण कुठे घ्यावे, स्वयंपाक तयार करताना स्वच्छता कशी महत्त्वाची आहे, जेवताना वातावरण व मनःस्थिती कशी असली पाहिजे याविषयीही आयुर्वेदाने मार्गदर्शन केले आहे. जेवताना देवाचे, स्वयंपाक करणार्याचे, अन्न पिकवणार्यांचे स्मरण करावे असेही सांगितले आहे. गप्पा, वादविवाद, टि.व्ही, कॉम्प्युटर अशा गोष्टींसोबत जेवणे चुकीचे आहे.
विरुद्ध अन्न ही आयुर्वेदातली एक महत्त्वाची संकल्पना आहे. यामुळे मुख्यतः त्वचेचे आजार जास्त प्रमाणात होतात. फळे आणि दूध हे एकत्र खाणे (शिक्रण, फ्रूट सॅलड) किंवा मांसाहार व दुधाचे पदार्थ एकत्र खाणे (चिकन बिर्याणीमध्ये दही घालणे) ही विरुद्ध अन्नाची ठळक उदाहरणे आहेत. दही आणि पापड एकत्र खाण्याची सध्या चुकीची पद्धत सुरू आहे. या सर्वांमुळे पदार्थाची चविष्ट होत असले तरी पचनाच्यासाठी अडचण तयार होते. पचन न झाल्याने रक्तामध्ये दोष निर्माण होतात व त्यातूनच पुढे त्वचाविकार होतात. त्यामुळे विरुद्ध अन्न न घेणे ही त्वचाविकारांमधून मुक्त होण्यासाठी पहिली पायरी असते. दही आणि मिठाचा अतिरेकही आहारात नसावा.
आहारामध्ये पाणी हा देखील महत्त्वाचा घटक आहे. याविषयी अनेक मते व गैरसमज आहेत. जेवणा आधी जास्त पाणी पिणे अयोग्य आहे कारण त्यामुळे अन्न कमी जाते. जेवताना वारंवार पाणी पिणे चुकीचे आहे व जेवल्यानंतर एकदम पाणी पिणे चुकीचे आहे. यामुळे अन्नपचन बरोबर होत नाही. आहारात खूप पाणीदार पदार्थ असतील तर जेवताना पाणी कमी प्यावे. जेवताना कोमट पाणी प्यायल्यास ते पचनास मदत करणारे असते. तोंडात ओलसरपणा राहील एवढेच थोडे पाणी जेवताना प्यावे. सामान्यपणे तहान लागली की थोडे पाणी सावकाश प्यावे असे सांगितले जाते. हे नियम आरोग्यसंपन्न व्यक्तीसाठी आहेत. आजारी व्यक्तीस रोगानुसार वेगळी पथ्ये असतात.
सर्वांत शेवटी साररूपामध्ये आहाराविषयीचे महत्त्वाचे नियम सांगायचे झाले तर आहार हा योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य प्रकारचा, घरी तयार केलेला, सहा रसांचा समावेश असलेला असावा. तो शांतपणे बसून, जेवणावर लक्ष केंद्रित करून केला जावा. आपण खात असलेल्या पदार्थांचे दृश्य स्वरूप, स्पर्श, वास, चव या सर्वांची अनुभूती घेत आहार घेतल्यास मेंदूला योग्य संदेश जाऊन आहार पचवणार्या रसांची निर्मिती योग्य प्रकारे होते व अन्नामुळे शरीराचे योग्य पोषण होते
Dr Swapnil Burhanpurkar Dombivli India
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pure herbs#Dombivli#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#indonesia#Canadá#Egypt#singapore#portugal#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes
Text
वास्तव...
१९९८ सालची गोष्ट आहे. ड्रॉईंग बोर्डवर काही काम करत ऑफिसमध्ये बसलो होतो. कॉम्प्युटर घेवून वर्ष झाले होते, पण अजून त्याचा वापर फारसा जमत नव्हता. त्याचा उपयोग फक्त गेम खेळणे आणि एस्टीमेट टाईप करणे एवढाच मर्यादित होता. मॅन्युअलीच काम चालायचे. दुपारचे चार वाजले होते. ऑफिस बॉय अजून आला नव्हता. शांततेत काम करत बसलो होतो.
त्याचवेळी ‘आत येवू का’ असा आवाज आला. एक धिप्पाड माणूस केबीनचे दार उघडून उभा होता. अंगावर सफारी, वरची दोन बटणे उघडी, डोक्यावर पैलवानासारखे केस अशा अवतारात त्याला एकदम समोर पाहुन दचकलोच.
‘या, आत या’ म्हणत खूर्चीकडे बोट दाखवत त्याला आत बोलावले.
‘नमस्कार. मी जवळच राहतो. नुकताच इथे आलो आहे. आपली पाटी वाचून आलो’ तो म्हणाला.
इकडची तिकडची माहिती विचारत त्याला कामाबद्दल विचारले. तो बिचकत बिचकत म्हणाला ‘माझ्या मनात एक बौद्ध मंदिर बांधावे असे आहे. दहा हजार स्केअर फुट जागा आहे. मंदिर आणि भिक्षू निवास बांधायचे आहे. आपण सर्व नकाशे आणि काम करून द्याल का?’
‘का नाही. जरूर’ मी म्हणालो. माझ्या मनात उकळ्या फुटत होत्या. एवढे मोठे काम कुणाची शिफारस नसतांना मिळत होते. अजून काय पाहिजे? पुढचे किमान एक दोन वर्ष चांगले जाणार होते या विचारानेच मी खूश झालो होतो. इतर काही किरकोळ गप्पा झाल्यानंतर काही वेळाने ‘जागेचे कागदपत्र घेवून उद्या येतो’ असे म्हणून तो गेला.
खूर्चीला मागे रेलून मी दीर्घ श्वास घेतला. हातावर त्यावेळी फारसे काम नव्हते. योग्यवेळी तो आला होता. मागे वळून मी देवाच्या फोटोला नमस्कार केला आणि रोजचे काम करत बसलो.
दुसर्या दिवशी तो बरोबर त्याच वेळी आला. आज गडी थोडा खुलला होता. मोकळेपणाने बोलत होता. काल त्याने सांगितले होते त्याप्रमाणे मी अंदाजे एस्टीमेट आणि कच्चा प्लान तयार केला होता. त्यावरून त्याला बजेट सांगितले विस लाख. तो म्हणाला ‘नाही, आपल्याला अजून चांगले बनवायचे आहे. आपले बजेट चाळीस लाख आहे.’
मी उडालोच! त्या काळी चाळीस लाख म्हणजे खूप मोठी रक्कम होती. चला, आपल्याला काय. उलट फिस जास्त मिळेल या विचाराने मी खूश झालो.
‘प्लॉटचे कागद आणले का?’ मी विचारले.
‘मी सांगितले तीच साईज समजा. तूम्ही त्याप्रमाणे कामाला लागा.’ तो म्हणाला.
‘काही अॅडव्हांस दिला तर बरे होईल.’ मी त्याचा अंदाज घेत हळूच म्हणालो. रागाने निघून गेला तर काय करा!
‘माझे पैसे बँकेत जमा आहेत. फक्त ते मुंबईहुन इकडे ट्रांस्फर व्हायचे बाकी आहे.’ असे म्हणत त्याने एक कागद मला दाखवला. ते कुठल्यातरी अमेरिकन बँकेचे कागद होते. त्यावर डॉलर कंव्हर्ट करून भारतीय चलनात चाळीस लाख लिहिले होते. म्हणजे तो जे सांगत होता ते खरे होते. विश्वास ठेवायला हरकत नव्हती. अॅडव्हांन्सच्या चक्कर मध्ये चांगले क्लायंट हातचे जाईल म्हणून ‘ठिक आहे. मी काम सुरू करतो. दोन तीन दिवसांनी या’ असे म्हणून त्याला निरोप दिला.
दुसर्या दिवशी तो परत आला. आणि पुढचे आठ दिवस रोज त्याचवेळी येवू लागला. ‘दुपारी तुम्ही एकटेच असता म्हणून ��ोकळेपणाने बोलता येते’ असे तो म्हणाला. रोज आल्यावर एक एक नव्या गोष्टी सांगू लागला, आणि त्या ऐकून माझी पाचावर धारणच बसली!
तो फक्त चौथीपर्यंत शिकला होता. चौदाव्या वर्षी मुंबईला गेला आणि पडेल ती कामे करू लागला. एक उल्हासनगरचे बिल्डर त्याच्या संपर्कात आले. तो त्यांच्याकडे काम करू लागला. ‘माझ्यासारख्या बेवारस मुलाला साहेबांनी खूप प्रेम लावले. त्यांचे उपकार विसरणे शक्य नाही’ असे म्हणत त्याने त्याची पुढची हकिकत सांगितली.
बिल्डरने त्याला त्याचा हस्तक बनवला होता. तो जे सांगेल ते हा डोळे झाकून करायला लागला. एखाद्याची जागा ताब्यात घ्यायची असेल तर फिल्मी स्टाईलमध्ये धमकावून जागा बळकावणे, कुणी बिल्डरला त्रास देत असेल तर त्याला मारपीट करून गप्प करणे अशी कामे करू लागला.
इथपर्यंत ठिक होतं, पण पुढे त्याने जे सांगितले ते ऐकून तर मला घामच फुटला!
तो म्हणाला ‘कुणाला बोलू नका, पण मी अनेक लोकांना यमसदनी पाठवले आहे. मला साहेब फक्त फोटो द्यायचे आणि कुठे भेटेल ते सांगायचे. मी तयारीनिशी बाहेर पडायचो. गाडी तयार असायची. ती गाडी मध्येच कुठेतरी थांबून मला दुसर्या गाडीत बसवले जायचे. गाडीतच कपडेही बदलायचो. असे गाड्या व कपडे बदलल्यामुळे कुणी पाळत ठेवत असेल तर त्याची नजर चुकवणे सोपे जायचे. असे करत मी ठरलेल्या ठिकाणी जायचो. ‘ती’ व्यक्ती दिसेल अशा पट्ट्यात बसायचो. योग्य वेळ आली की सायलेंसर लावलेल्या पिस्तुलातून गोळी झाडायचो. माझा नेम आजवर कधी चुकला नाही. ती व्यक्ती टपकली की परत तसेच गाड्या व कपडे बदलत घरी यायचो.’
मी घामेघुम झालो होतो, पण तो मात्र शांतपणे सांगत होता. अशी काही उदाहरणे देवून पुढे तो म्हणाला ‘एकदा दुबईतून एका आर्किटेक्टला उचलून आणले होते. त्याच्याकडून साहेबांना प्लान करून पाहिजे होता. पण तो वेळ नाही म्हणून टाळत होता. त्याला रातोरात इकडे उचलून आणले अन दोन महिने इथेच बसवून काम करून घेतले. सर्व काम झाल्यावर साहेबांनी दर महिन्याला यायचे या बोलीवर सोडले व त्याला पैसेही भरपूर दिले. दिलदार माणूस होता आमचा साहेब. कधी फुकट काम करून घेतले नाही. पण कुणी वाकड्यात गेले तर त्याला सोडलेही नाही!’
एखाद्या पिक्चरची स्टोरी सांगावी तसे तो सांगत होता. माझे हातपाय मात्र गळून गेले होते. पुढे तो म्हणाला ‘एक दिवस ऑफिसमध्ये साहेबांसोबत काही चर्चा करत त्यांच्या बाजूला उभा होतो. लंच टाईम असल्यामुळे बराच स्टाफ जेवायला गेला होता. फक्त तीन चार लोक बाहेर होते, त्यात दोन मुली होत्या. अचानक गोळ्यांचा आवाज आला, बाहेरच्या मुलींची किंकाळी ���कू आली. मी साहेबांच्या पायाजवळ टेबलखाली वा��लो. साहेब खूर्चीतून उठायच्या आत ते लोक केबीनमध्ये घुसले आणि चार गोळ्या झाडल्या. माझ्या अंगावर माझ्या अन्नदात्याच्या रक्ताची चिळकांडी उडाली. पण हालचाल न करता तसाच बसून राहिलो. टेबलखाली असल्यामुळे मी त्यांना दिसलो नाही. माझ्याकडे कसलेच शस्त्र नव्हते. काहीच करता येत नव्हते. थोड्या वेळाने शांतता पसरली तसा मी बाहेर आलो. त्या लोकांचे काम झाले होते. साहेब निपचित पडले होते, बाहेरही चार मुडदे पडले होते.’
हे सांगतांना त्याच्या डोळ्यात पाणी आले होते. ते पुसत तो पुढे म्हणाला ‘माझ्यासारख्या फाटक्याला साहेबांनी अलिशान फ्लॅट दिला होता. डनलॉपची मऊ मऊ गादी, इटालियन मार्बल, त्यावर दुबईहुन आणलेला भारी गालिचा, हाताखाली नोकर चाकर असे सुसज्ज घर साहेबांनी मला दिले होते. मुंबईसारख्या ठिकाणी असे अलिशान घर फार मोठी गोष्ट होती. गाड्यांची तर मोजदाद नव्हती. पण तेच साहेब माझ्या डोळ्यादेखत देवाघरी गेले!’
थोडा वेळ शांत बसून तो म्हणाला ‘मी रात्री त्या मऊ गादीवर झोपत होतो. पण कधीच डोळा लागला नाही. इतकी पापं केली होती की टाचणी पडल्याचा आवाज झाला तरी उशीखालची पिस्तुल घेवून उठायचो. दार, खिडकी, बाल्कनी सर्व ठिकाणी पिस्तुल ताणून दबकत दबकत टेहळणी करायचो. दुसर्याला मी मारू शकतो तर मला कुणी का मारणार नाही? अशी दहशत सतत मनात असायची. बायको नेहमी म्हणायची, सोडा हे सगळं. चटणी भाकरी खाऊ, मोलमजूरी करू पण निवांत झोप लागेल अशा ठिकाणी जावून राहू. पण मोह सुटत नव्हता. शेवटी देवानेच हे सगळे संपवले.’
तो हे सगळे इतके व्यवस्थित सांगत होता की ते चित्र डोळ्यासमोर दिसत होते. बिचकतच त्याला म्हणालो ‘मग साहेब गेल्यावर तुम्ही इकडे आलात का?’
तो म्हणाला ‘नाही. साहेब गेल्यावर मी चार महिने तिथेच होतो. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका अमेरिकन कंपनीत पैसे गुंतवले होते. पंधरा वर्षानंतर त्याचे चाळीस लाख झाले होते. साहेबांचे तर करोडो रुपये होते. ते पैसे मिळायच्या आत साहेब गेले. मला माझे पैसे पाहिजे होते म्हणून मी थांबलो. त्या कंपनीशी पत्र व्यवहार झाला अन त्यांनी ते पैसे ट्रांस्फर करण्याची प्रोसेस केली. पण त्याच वेळेस लोचा झाला. पोलिस साहेबांच्या खुनाचा तपास करत माझ्यापर्यंत पोहोचले. माझे घर पाहुन ते आचंबितच झाले. लिहिता वाचता न येणार्या या आडमुठ्याकडे एवढा भारी फ्लॅट कसा? हा त्यांना प्रश्न पडला अन माझीच चौकशी सुरू झाली. माझा एकच रट्टा – काही विचारले की साहेबांनी दिले एवढेच म्हणायचे. पण त्यातून त्यांचे समाधान होत नव्हते.’
पाणी पिऊन पुढे तो म्हणाला ‘माझी चौकशी जशी सुरू झाली तसे जे जे मर्डर आधी झाले होते त्याचे धागे साहेबांशी व पर्यायाने माझ्याशी जोडणे सुरू झाले. मला रोज पोलिस स्टेशनला बोलावण्यात येवू लागले. बायको मुलांचीही झडती घेण्यात येवू लागली. त्रासून गेलो होतो. माझ्याविरुद्ध पुरावे जमायला वेळ लागणार नव्हता. माझ्यावर जळणारे काही लोक पोलिसांना फितूर झाले होते. आता आपली काही धडगत नाही हे ओळखून एक दिवस बायको आणि दोन मुलांसह अंगावरच्या कपड्यानिशी औरंगाबादला आलो. इंदिरानगर वस्तीत पाहुण्यांची झोपडी रिकामी होती. तिथे सारवलेल्या जमिनीवर झोपू लागलो. जर्मनच्या भांड्यात चुलीवर शिजवलेले भात वरण खात गेल्या महिन्याभरापासून इथेच आहे. पण तुम्हाला सांगतो साहेब, डनलॉपच्या मऊ गादीवर कधी झोप लागली नाही अशी झोप सारवलेल्या जमिनीवर लागतीय. कित्येक वर्षानंतर झोपतोय असे वाटत आहे. झकपक किचनमधले जेवण जात नव्हते, पण फुटलेल्या ताटलीतले भात वरण पोटभर समाधानाने खातोय.’
मी आवाक होवून ऐकत होतो. काय बोलावे काहीच कळत नव्हते. भीतीने माझी गाळण उडाली होती. त्याने दुबईच्या आर्किटेक्टची गोष्ट सांगितल्यावर तर याच्याकडून फिसची अपेक्षाच सोडली! आता आपली सुटका नाही याची खात्री झाली. घशाला कोरड पडली. पाणी पित त्याला म्हणालो ‘मी...तुम्ही...नाही...मीच, उद्या सर्वकाही तुम्हाला दाखवतो. मला फक्त जागा एकदा दाखवून द्या, मग लगेच पुढच्या कामाला लागता येईल.’ अडखळतच मी बोललो तसा उठत तो म्हणाला ‘ठिक आहे उद्या याच वेळेला येतो.’ अन तो निघून गेला.
इतकी भयानक कहानी ऐकून मी सुन्न झालो होतो. कुणाला याबद्दल सांगताही येत नव्हते. त्याला कळले अन तो आला ‘तयारीने’ तर काय करा! याच विचारतंद्रीत तो दिवस अन ती रात्र गेली. सकाळी ऑफिसमध्ये येऊन त्याचे काम करत बसलो. दुपारी जेवायलाही गेलो नाही. तो यायची वाट पहात बसलो. चार वाजून गेले, पाच, सहा, सात वाजून गेले. पण तो आला नाही. आठ वाजता ऑफिस बंद करून घरी गेलो. रात्रभर माझ्या मनात चलबिचल चालली होती. तो का आला नाही? मला उचलून तर नेणार नाही ना? का अजून काही त्याच्या मनात आहे? अशा एक ना अनेक शंकांनी मला झोपूच दिले नाही.
सकाळी घरी चहा पीत पेपत उघडला. पहिल्याच पानावर एक बातमी होती ‘मुंबईहुन पळालेला एक अंडरवर्ल्डचा गँगस्टर इंदिरानगर परिसरात राहतो असे कळल्यामुळे मुंबई पोलिसांची टीम औरंगाबादला दाखल!’
हेडलाईन वाचून मी उडालोच! माझे हातपाय लटलट कापू लागले. चहा सांडला, पेपर हातातून निसटला. बायकोला आवाज देवून तिला ती बातमी दाखवली आणि गेल्या आठ दिवसांपासून ऑफिसमध्ये काय काय चालले होते ��े सविस्तर सांगितले. ‘आता पोलिस माझ्या चौकशीला येतील’ ही भीती वाटू लागली. आपण होवूनच पोलिसांना सांगावे असे वाटले, पण त्याच्या हातातले पिस्तुल दिसू लागले! त्याचा नेम चुकत नव्हता, त्यामुळे गप्प बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता.
तो दिवस गेला, अन पुढचे अनेक दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पण तो काही आला नाही की पोलिसही आले नाहीत. सुटलो!
कामाच्या गडबडीत सर्व विसरून गेलो आणि साधारण वर्षभरानंतर एक दिवस सहकुटुंब संजय दत्तचा नवा पिक्चर ‘वास्तव’ पहायला गेलो. पिक्चर पाहतांना मला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला! चित्रपटाची कथा ‘त्याने’ सांगितलेल्या कथेशी इतकी मिळती जुळती होती की जणू ‘तो’ स्वत:च चित्रपटाचा नायक असावा! संजय दत्तच्या जागी मला त्याचाच चेहरा दिसू लागला.
चांगले विसरून गेलो होतो अन या पिक्चरने परत ती सर्व आठवण जागी केली. अंडरवर्ल्डचे ‘वास्तव’, पिक्चर पाहण्यापूर्वीच त्या अज्ञात व्यक्तीमुळे मला चांगले माहित झाले होते. पण योग्यवेळी पोलिसांनी अॅक्शन घेतल्यामुळे मी बचावलो!
पुढचे दोनतीन वर्ष मात्र काही देण न घेणे, पोलिसांची गाडी दिसली किंवा साधा ट्रॅफिक पोलिस दिसला तरी माझी गाळण उडत होती...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Photo
July 2015 घर. घर घरघर घरघर / घरघर डोक्यात घर / घरात घरघर / डोळ्यांत चरचर / चराचरात वळवळ / वळ घराघरात वळवळ / सळ पानापानांत सळसळ / मळ मनामनात मळमळ मनात घर / वनात घर / घरात वणवा / वणव्यात रण / रणांत मन / रणांत मरण / मरणात मरण / मसणात घर घर घरघर घराघरात घरघर / झर झऱ्यात झरझर / सर डोळ्यांत भडभड / धड धडात धडधड / उराउरात फडफड / फडाफडात बडबड / गोंधळफडात गडबड / गोंधळात गारगार घर / कुल्फी घर / जुल्फी घर / सिल्कि घर / मिल्की घर / घरघर गुत्यांत सांडून / मुक्त-मोकाट सारं सारं घर फोडणीत घर / मोडणीत घर / खमंग घर / दारदार घर / चवदार घर / वरण घर / भात-भात तूप घर / पांढरफट्ट घट्ट घर भत्त्यात घर / गुत्त्यात घर / घरात भट्टी / भट्टी जाळजाळ / भाळी जाळजाळ / जाळजाळ जाळ्यात काळ / काळाकाळा कुट्टकुट्ट काळ / तडफड तडफड / मर गुदमर तडफड / सड काळ / जाळ्यात सड सड / घरात सड ऊरात रड / राड्यात ठोक / झुलत झुलत ठोक / ठोक्याठोक्यात झूल / धुळधुळीत झूल / झिंगझिंग झूल / झिंगझिंग घर / धुमाळ घर / डूमडूम घर / डगमग घर / तगमग घर / घरघर डोक्यास घरघर / मरमर घरास मरमर कडकड वीज घर / चिंबचिंब भीज घर / पाणी पाणी घर / पापणी पापणी घर / ओलं-ओलं घर / मिटली ��िटली रात घर / गोड गोड साखर्गोड स्वप्न घर / घर वरवर / वर घर / तुझं घर माझं घर / घरात घर घरात घर / तुझं-माझं घर
0 notes
Text
मांजरेकर यांच्या चित्रपटाचा खेळ भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून बंद
मांजरेकर यांच्या चित्रपटाचा खेळ भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून बंद
मांजरेकर यांच्या चित्रपटाचा खेळ भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून बंद लातूर : महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरण-भात लोन्चा, कोन नाही कोन्चा’ हा चित्रपट शुक्रवारी भारतीय स्त्री शक्ती आणि आयएमएच्या कार्यकर्त्यांनी लातूर येथे बंद पाडला. भारतीय स्त्री शक्ती संघटनेने मुंबई ,नागपूर, लातूर, पुणे अशा विविध ठिकाणी या चित्रपटाच्या विरोधात लेखी तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. शुक्रवारी लातूर येथे…
View On WordPress
0 notes
Photo
Deep fried fish fingers at home 😋 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 Ohh yes, you can also make restaurant style delicacies at home. Well it's all that we have been doing since more than past year. Our desire to eat something can take us to the next level. I can show you atleast a dozen of my friends who learnt to cook and present well in the last year as they we fed up eating regular home cooked meals. We all experimented, starting from simple curd rice or वरण भात to Panipuri to western meals to desserts. We all tried our best to satisfy our hunger for good food. The family bond and the joy of cooking it brought together made us believe that we can survive this. Food is one of the best thing in world that keep us sane. It's one of the most physiological as well as psychological need of human body and we simply cannot ignore it. Our ancestoral journey from hunters to farmers to 3D print our food has quite evolved into a beautiful thing. The variety, the presentation, the taste, the ultimate level of satisfaction has risen so much in the last year that I simply want to cook for my loved ones every day. Cooking is an exam and the satisfactory smile is your gift after testing the result. Never say never and never fail to recognise and surprise your own self !! 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 “A recipe has no soul. You as the cook must bring soul to the recipe.” ~Thomas Keller 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 😀Stay tuned for more updates. Your Love is Our only Motivation 🙏❣️ @bhukad_punekar Tag us & use #bhukad_punekar to get featured🤗😋 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 #foodgasm#deepfried#fish#fishfingers#fish#surmai#basa#foodgram#foodstagram#foodlove#foodlife#foodlike#foodlust#foodporn#foodpic#mouthwateringplatter#mouthgasmic#mommade#mouthfull#mouthgasm#distinct#droolicious 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 Note :- We deeply respect everyone's choice and love for food 🤗. Eat Healthy and Stay Strong 💪 https://www.instagram.com/p/CPlI68dl7hR/?utm_medium=tumblr
#bhukad_punekar#foodgasm#deepfried#fish#fishfingers#surmai#basa#foodgram#foodstagram#foodlove#foodlife#foodlike#foodlust#foodporn#foodpic#mouthwateringplatter#mouthgasmic#mommade#mouthfull#mouthgasm#distinct#droolicious
1 note
·
View note
Text
#82: तूप साखर पोळी
#82: तूप साखर पोळी
तूप साखर पोळी – a dish beloved by me, my mother, and my grandmother. It’s sort of been a family thing for years, with वरण भात being a staple too. Out of the children of my family, I was the one who really inherited the love of these dishes – I remember visiting my grandparents’ house in Old Bangalore (back when I lived there too) and how my grandpa would prepare dishes for everyone, and my…
View On WordPress
0 notes
Text
कणकवलीत उद्यापासून कमळ थाळी; आ.नीतेश राणे यांनी घोषणा
कणकवली : गोरगरिबांना नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात जेवण मिळावे, याचं उद्देशाने आमदार नितेश राणे यांनी कमळ थाळी सुरुवात केल्याची घोषणा आज ट्विटर वरून केली आहे.
या थाळीमध्ये हे दोन मुद भात, दोन चपात्या, वरण डाळ व एक भाजी मिळणार आहे. ही थाळी संजीवनी हॉस्पिटलजवळ, लक्ष्मी विष्णू हॉल “विद्यानगर” येथे दुपारी १२ ते २ या वेळेत मिळणार आहे. ही योजना कणकवली नगरपंचायत यांच्या सहकार्याने…
View On WordPress
0 notes
Text
SACHIN'S PERSONAL DIARY: स्लीपिंग वेल, वरण-भात और पिंक फ़्लॉइड - क्रिकेट का भगवान कैसे है?
SACHIN'S PERSONAL DIARY: स्लीपिंग वेल, वरण-भात और पिंक फ़्लॉइड – क्रिकेट का भगवान कैसे है?
यह एक आलसी सुबह है, मेरे व्यस्त जीवन में ए��� दुर्लभ दिन है। हम भारत में केवल तीन सप्ताह के लॉकडाउन में हैं और COVID-19 वायरस द्वारा बनाए गए दुनिया भर में कहर ��ी गंभीरता का गहरा संबंध है। हम एक अनिश्चित भविष्य और एक अज्ञात दुश्मन के खिलाफ घूर रहे हैं। मैंने क्रिकेट से जो सबक सीखा, वह अब बहुत प्रासंगिक है। जैसे ही स्थिति की मांग होती है, हमें नए सिरे से पहरा देना होगा, पिच को पढ़ना होगा, स्विंग…
View On WordPress
0 notes
Video
youtube
वरण भात Mini Food || Daal Rice || Mini Maharashtrian Kitchen जगातील पहिल...
0 notes
Text
*घर आणि काम दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक काही टिप्स*
बहुतांश स्त्रियांना घर आणि ऑफिस अश्या दोन्ही आघाड्यावर लक्ष द्यावं लागतं त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आबाळ होते. आणि हळू-हळू एक एक दुखणी मागे लागतात. त्यामुळे या दोन्ही आघाडयांवर लक्ष द्याव्या लागणाऱ्या स्त्रियांसाठी काही आरोग्यविषयक टिप्स आम्ही सांगणार आहोत, ज्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्यांवर त्यांना मात करणे शक्य होईल.
*आहार*
नाश्ता
सकाळच्या गडबडीत अनेक जणी नाश्ता करणे टाळतात आणि चहावरच काम भागवतात असे करू नये यामुळे ऍसिडीटी होण्याची शक्यता अस���े. तसेच चहा घेताना त्याच्या बरोबर काहीतरी खावे. रिकाम्या पोटी चहा घेऊ नये. या नाश्त्यामध्ये शक्यतो ब्रेड, सामोसा वडा असे पदार्थ टाळावे. आणि शरीराला प्रथिने आणि इतर आवश्यक घटक देणारा आहार घ्यावा. यामध्ये पराठा, पोळी, थालिपीठ, भात, धिरडी,फळ ,दूध, अंड याचा समावेश करावा.
*दुपारचे जेवण*
कामामध्ये कितीही व्यस्त असाल तरी दुपारचे जेवण हे २ च्या आत होणे आवश्यक असते.डब्यामध्ये पोळीभाजी वरण भात अश्यातसेच पातळ भाजी सलाड अश्या पदार्थांचा समावेश असावा. अधून मधून मांसाहार असला तर हरकत नाही रोजच्या-रोज मांसाहाराने पचनविषयक आजार होण्याची शक्यता असते.
*मधल्या वेळेतले खाणे*
दुपारच्या जेवणानंतर संध्यकाळी भूक लागते अश्यावेळी कडधान्ये, पोहे, उपीट, घरी केलेला चिवडा, पौष्टीक लाडू असे पदार्थ खावे.जंकफूड टाळावे
*रात्रीचे जेवण*
जर ऑफिसमधून घरी जायला उशीर होणार असेल तर संध्याकाळचा डब्बा देखील घेऊन जावा. तसेच या जेवणात मसालेदार, जड अन्न खाऊ नये. हलका आहार घ्यावा.
*व्यायाम*
ऑफिसची गडबड घरातील कामे यामुळे जरी व्यायाम करायला वेळ नसेल तरी ऑफिसमध्ये सतत बसून न राहता जेवण झाल्यावर शतपावली करावी लिफ्टने येणे जाणे टाळून पायऱ्यांचा वापर करावा ऑफिस ६ व्या मजल्यावर असले तर तीन मजले जिन्याने जावं आणि मग लिफ्टने जावे.
*सवयी*
बैठे काम असणाऱ्यांनी अधून-मधून उठून फिरावे. जास्त प्रमाणात कॉफी,चहाचे सेवन करू नये.
जेवणाच्या वेळा पाळाव्या.
जंकफूड शक्यतो टाळावे.
योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करावे.
सुट्टीच्या दिवशी व्यायाम करावा.
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pure herbs#Dombivli#india#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#indonesia#canada#Egypt#singapore#portugal#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes