#वक्तव्याची
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सायंकाळी दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करणार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एक हजार १२१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात, बीडमधून सर्वात जास्त ४१ उमेदवार
पूर्वसूचना न देता सामूहिक रजेवर गेलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे २५ वरिष्ठ कर्मचारी बडतर्फ
आणि
छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या सरी तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सायंकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या आधी २२ एप्रिलला राष्ट्रपतींनी तीन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण तसंच ५५ जणांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते.
****
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकूण एक हजार १२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळेच्या ८६७ उमेदवारांच्या तुलनेत त्यात २९ टक्क्यांची वाढ झाली असली तरी १३ विद्यमान खासदारांना मात्र यंदा लोकसभेत जाण्याची संधी मिळणार नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही बीडमधून सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्यावेळी ३६ उमेदवार या ठिकाणी उभे होते तर आता ४१ जण आपलं नशीब आजमावत आहेत. परभणी, मावळ, हिंगोली, शिरुर, माढा, नाशिक आणि उस्मानाबादमधल्या उमेदवारांची संख्या ३१ ते ३४ च्या दरम्यान आहे, तर गडचिरोली, पालघर, दिंडोरी या तीन मतदारसंघांमध्ये १० उमेदवार रिंगणात आहेत.
****
एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांच्या २५ वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वरिष्ठ कर्मचारी सामुहिक रजेवर गेल्यानं एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत सुमारे ऐंशी उड्डाणं रद्द करावी लागली असून आजही ८५ हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली.
उड्डाण रद्द झाल्यामुळं संबंधित प्रवाशांना तिकीटाचा पूर्ण परतावा मिळू शकतो अथवा ते आगामी तारखेसाठी त्यांच्या प्रवासाचं पुन्हा नियोजन करू शकतात, असं एअर इंडिया एक्स्प्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं. दरम्यान, एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनी त्यांच्या मुळ एअर इंडिया या कंपनीच्या मदतीनं २० प्रवासी मार्गांवर २८३ उड्डाणं करणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षांना काँग्रेसमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर गेले आहेत आणि ते काँग्रेसच्या विचाराशी सहमत असल्याचा आरोपही त्यांनी केली आहे.
****
अदानी, अंबानी कोणाचे मित्र आहेत हे संपूर्ण देशातल्या जनतेला माहित असून जसे निवडणुकीचे टप्पे होत आहेत तसे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. ते आज सातारा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५व्या पुण्यतिथीनिमित्त ते अभिवादन करण्यासाठी सातारा इथं आले होते. भविष्यात राजकारणात प्रादेशिक पक्षांनी काँग्रेस पक्षाशी एकत्रित राहावं, असा माझा विचार होता, प्रादेशिक पक्षांचे काँग्रेस पक्षात विलणीकरण करावं असा माझा विचार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी अदानी आणि अंबानी यांच्याकडून पैसे घेत असतील आणि याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती असेल तर ही मनीलाँड्रिंग आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी तात्काळ ईडीमार्फत या उद्योगपतींची चौकशी करायला हवी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी अहमदनगर इथं आले, त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून पंतप्रधान मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
****
कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारनं लावलेला ४० टक्क�� कर त्वरित बंद करावा, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे विनंती करावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. छत्रपती संभाजी नगर इथं आज पत्रकार परिषदेत ते वार्ताहरांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ ते आज शहरांमध्ये आले होते. यंदाच्या निवडणुकीत मताचं विभाजन होणार नाही, यामुळं राज्यासह देशात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या कमी होणार असल्याचंही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू तसंच औद्योगीकरणावरही भर देऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
औरंगाबाद लोकसभेची निवडणूक येत्या १३ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या वतीनं शहरात वेगवेगळ्या सहा पथकांनी संचलन केलं. राजाबाजार, किराणा चावडी, शहागंज, सिटीचौक, मछलीखडक, औरंगपूरा, गुलमंडी, निराला बाजार, सिल्लेखाना आणि क्रांतीचौक या परिसरात हे संचलन करण्यात आलं. आज सायंकाळी पुन्हा शहरातील विविध भागात संचलन करण्यात येत आहे.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालना लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज जालन्यात पत्रकार परिषद घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेनं ही घोषणा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. त्यामुळे तापमानात घट झाली. उकाडा कमी होऊन वातावरण थंड झाल्यानं नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी एकनंतर हलक्या सरी कोसळल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, क्रांती चौक, उस्मानपुरा, हडको - सिडको या भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
नागपूर शहरातही आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांना उष्णतेपासून आराम मिळाला. आज हवामान खात्याकडून नागपूरसाठी आँरेंज अलर्ट तर उद्या आणि परवा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत शहरात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या रब्बी हंगामातील धान पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.
****
'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पालघर लोकसभा मतदार संघांचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
जालना लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी, अंबड तालुक्यातल्या जामखेड, जालना तालुक्यातल्या रामनगर आणि गोलापांगरी इथले आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. या गावांमध्ये भरवण्यात येणारा आठवडी बाजार हा अन्य दिवशी भरवण्यात यावा, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमितवेळेपेक्षा ११ तास उशीरानं म्हणजेच रात्री साडेआठ वाजता नांदेड रेल्वेस्थानकाहून अमृतसरला रवाना होईल. तसंच नांदेडहून आज दुपारी साडेचार वाजता सुटणारी नांदेड-विशाखापट्टनम् एक्स्प्रेस अडीच तास उशीरानं म्हणजेच सायंकाळी सात वाजता सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
राज्यात काल मालेगाव इथं सर्वाधिक ४२ पूर्णांक सहा अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. सोलापूर, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भात तापमान चाळीशीपार होतं. परभणी इथं ४१ पूर्णांक तीन, बीड इथं ४० पूर्णांक सात, नांदेड इथं ४० पूर्णांक सहा, छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक दोन तर धाराशीव इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
महिला क्रिकेट टी ट्वेंटी मालिकेत भारत आणि बांग्लादेश यांच्यातला पाचवा आणि अंतिम सामना बांग्लादेशच्या सिलहट क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत पाच बाद १५६ धावा करत बांग्लादेशला विजयासाठी १५७ धावांचं आव्हान दिलं. प्रत्युत्तरात बांग्लादेशच्या महिला संघानं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा १२ षटकांत ५ खेळाडु बाद ७९ धावा केल्या होत्या.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या संघात सामना होणार आहे. धरमशाला इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
भारताची अव्वल टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिनं जेद्दाह इथं सुरू असलेल्या सौदी स्मॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
Jr NTR | "..तर मी चित्रपटात काम करणं बंद करेन"; चाहत्यांवर का भडकला ज्युनियर एनटीआर? - junior ntr tells fans i will stop doing movies if you ask repeatedly rrr naatu naatu oscar
Tumblr media
ज्युनियर एनटीआरचा केवळ दक्षिणेतच नाही तर देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. ऑस्कर पुरस्कारानंतर तो जेव्हा भारतात परतला, तेव्हासुद्धा विमानतळावर असंख्य चाहत्यांनी गर्दी केली होती.
Tumblr media
Junior NTR Image Credit source: Twitter हैदराबाद : एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला. लॉस एंजिलिसमधील या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर नुकताच भारतात परतला. यावेळी विमानतळावर चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. त्यानंतर ज्युनियर एनटीआरने हैदराबादमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. हा तोच कार्यक्रम आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने ज्युनियर एनटीआरला मागून घेरलं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका , काय म्हणाले उदयनराजे
बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका , काय म्हणाले उदयनराजे
खासदार उदयनराजे यांनी एक वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडिया जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. बलात्कार या विषयावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया देताना इतर देशांमध्ये कायदे किती कडक आहेत. आपल्याकडे देखील असे कायदे लागू करून चोरी करणाऱ्यांची बोटे छाटून टाकावीत तर बलात्कार करणाऱ्याचे काहीही छाटून टाका बघू कोण असे असे गुन्हे करण्याचे धाडस करतोय ? असे म्हटलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांविरोधात ३०७ : सुप्रिया सुळेंचे फडणवीसांकडे बोट…
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांविरोधात ३०७ : सुप्रिया सुळेंचे फडणवीसांकडे बोट…
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांविरोधात ३०७ : सुप्रिया सुळेंचे फडणवीसांकडे बोट… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होत. यावेळी बोलताना, पाटील यांनी वापरलेला एक शब्द व त्यावेळीचे त्यांचे हावभाव यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मूळ वक्तव्याची पाठराखण करत,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
कोरोना काळात मोदींनी अनेक औषधाचे शोध लावले , नारायण राणे काय म्हणाले ?
कोरोना काळात मोदींनी अनेक औषधाचे शोध लावले , नारायण राणे काय म्हणाले ?
सोशल मीडियावर सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी सुरूवातीला टाळ्या थाळ्या वाजवणे अन दिवे लावणे असे अनेक उपक्रम नागरिकांना करण्यास सांगितले होते त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कामाची प्रशंसा केलेली असून ‘ मोदी यांनी कोरोना काळात अनेक औषधाचे शोध लावले, आपण पूर्वी इतर देशांवर औषधासाठी अवलंबून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जागतिक बँकेला आवाहन.
शिवाजी महाराज अवमानकारक वक्तव्यप्रकरणी राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या मोहिमेत सर्व पक्षीयांना सामील होण्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं आवाहन.
राज्यपालांच्या वक्तव्याची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घेण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी.
महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रकरणी केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणं गरजेचं - विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचं मत.
आणि
उस्मानाबादच्या ५५ व्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत राज्याच्या पुरुष आणि महिला संघाचा अंतिम फेरीत प्रवेश.
****
मराठवाडा आणि विदर्भ भागातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचं पाणी वळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनानं तयार केला असून त्यासाठी जागतिक बँकेनं अर्थसहाय्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. जागतिक बँकेचे भारतातले प्रमुख ऑगस्ते तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री शिंदे यांची आज भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळं मराठवाडा आणि विदर्भातल्या सुमारे पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचं सहाय्य लाभलं असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसऱ्या टप्प्याला मान्यता देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरणासाठीचे सात पुरस्कार राज्यानं पटकावले आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारं सर्वश्रेष्ठ राज्य हा पुरस्कार दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांना घोषित झाला आहे. सन २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांचे हे पुरस्कार असून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीनं यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवले होते. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते येत्या ३ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत या पुरस्कारांचं वितरण होणार आहे, अशी माहिती दिव्यांग आयुक्तालय पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करत असून ते राज्याच्या अस्मितेबरोबर खेळत आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यपालांना महाराष्ट्रातून पदमुक्त करण्याची मोहीम आता शिवसेनेने सुरू केली असून त्यांनी या मोहीमेत सर्व पक्षीयांना सामील होण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले -
जर या राज्यपालांना हटवलं गेलं नाही तर या महाराष्ट्र द्रोह्यांचा विरोध तमाम महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र येऊन केला पाहिजे. आणि मी तमाम महाराष्ट्र प्रेमींना आवाहन करतोय, आवाहन म्हणजे विनंती करतो आहे, म्हणून आत्ताच वेळ आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन एक खणखणीत आणि दणदणीत इंगा या महाराष्ट्र द्रोह्यांना हा दाखवलाच पाहिजे. मग मी पक्ष वगैरे बाजुला ठेवून सगळ्यांना आवाहन करतोय, अगदी भारतीय जनता पक्षातले महाराष्ट्रप्रेमी लोकं जरी सोबत आले तर ��्यांना सुद्धा मी आमंत्रण देतोय. कारण पक्षीय राजकारणात जर आपली अस्मिता आणि राज्य चिरडलं जाणार असेल, तर आपण मात्र छत्रपतींच नाव घ्यायला नालायक आहोत.
राज्यात शिंदे सरकार आल्यापासून राज्याची अवहेलना झाल्याची टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, बोम्मईंच्या अंगात भूत संचारल्याचं ठाकरे म्हणाले.
****
शिवरायांचा अवमान करायचे धाडस निर्लज्ज लोक करत आहेत. स्वराज्य नसते, तर आपण आज गुलामगिरीत असतो, असे सांगत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी आता यापुढे कोणी अवमानकारक भाष्य केल्यास ठेचून काढण्याचा इशाराही दिला आहे, यासंदर्भातील पुढची भूमिका येत्या २८ नोव्हेंबर रोजी जाहीर करणार असल्याचंही खासदार भोसले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
वयानं ज्येष्ठ असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांच्या अवमानकारक वक्तव्याचा सर्वसामान्य माणसाला राग आला आहे असे सांगत खासदार भोसले म्हणाले –
महाराष्ट्राच्या राजकारणात वयानं जर कोणी ज्येष्ठ असेल तर पवार साहेब आहेत. पवार साहेब त्या व्यासपीठावर होते. नितीन गडकरीही होते. त्या व्यासपीठावर आणि ही सगळी म्हणजे ज्येष्ठ लोकं आहेत. ज्यावेळेस असं जेंव्हा वक्तव्य होतं, निदान त्याचा कुठेतरी त्यांच्या भाषणात त्यांनी उल्लेख करायला हवा होता. का केला नाही?
****
राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीनं शिवाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य योग्य नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज त पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी असेही ते म्हणाले. आतापर्यंत राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती. एक मर्यादा म्हणून त्यावर आपण कोणतेही भाष्य केलं नव्हतं. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. सीमावादाच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाला आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र - कर्नाटक राज्य सीमा प्रकरणात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करणे गरजेचं असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यात आज त्या बोलत होत्या. दोन्ही राज्यांच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या मराठी भाषिक जिल्ह्यातील जनतेची महाराष्ट्रात सहभागी होण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. यासाठी अनेकांनी आपले ब��ि��ानही दिलं असल्याचं त्या म्हणाल्या.
****
गोवर रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधवा आणि काळजी घ्यावी, असं आवाहन औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होत असल्याचं ते म्हणाले.
****
५५ व्या राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला, अशा दोन्ही संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या पुरुष गटाच्या सामन्यात महाराष्ट्रानं कोल्हापूरला १९-१५ असं नमवलं. तर, महिला गटात महाराष्ट्रानं दिल्लीला १९-१० असं पराभूत केलं. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या पुरुषांची भारतीय रेल्वे विरुध्द, तर महिलांची विमान प्राधिकरणाविरुध्द लढत होईल.
****
नंदुरबार जिल्ह्यातील पंधराशे कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचा शुभारंभ राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला. नंदुरबारमध्ये झालेल्या सोहळ्यात मंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील एकूण १ हजार ३४ पाणी पुरवठा योजनांचं ऑनलाईन पद्धतीनं उद्‍घाटन केलं. प्रत्येक जिल्ह्यात जे सरपंच पाणीपुरवठ्याचं चांगलं काम करतील त्यांना जलदूत पुरस्कार देण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी यावेळी बोलतांना केली.
****
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री जोतिरादित्य सिंधिया आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला भेट दिली. छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या स्मृती कायम स्मरणात राहतील असं ते यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद - वाळूज औद्योगिक वसाहतीत आज सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. कंपनीत कामासाठी जाणाऱ्या अनिता आणि निकीता या दोघा बहिणीला दीपक लोखंडे हा घेऊन जात असतांना दुचाकीला ट्रकनं धडक दिल्यानं ट्रकच्या चाकाखाली सापडून घटनास्थळीच तिघे ठार झाल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दिली.
****
गायरानधारक आणि वनजमीन धारकांवरील हल्ले थांबवा, आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करा या मागणीसाठी लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातल्या पैठण गेट पासून हा मोर्चा काढण्यात आला होता. संसदेवर हिंस्त्र सिंहाची म���द्रा बसवण्यात आली असून ती हटवण्यात यावी ही मागणीही यावेळी करण्यात आली.
****
उस्मानाबाद इथं येत्या २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधुन मतदार जनजागरण समिती आणि संविधान जनजागरण समितीच्या वतीनं संविधान जनजागरण रॅलीचं काढण्यात येणार आहे. बार्शी नाका जिजाऊ चौक इथं जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रॅलीला सुरुवात होईल.
****
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
‘मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच म्हटलं होतं की…’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Tumblr media
Photo Credit: Twitter / @Ajit Pawar पुणे | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या मनातली ईच्छा बोलून दाखवल्याची चर्चा आहे. भाषणादरम्यान, दादा तुम्ही गृहमंत्री व्हा अशी ईच्छा कार्यकर्त्याने व्यक्त करताच पवारही दिलखुलास बोलले. जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटलं, पण ऐकलं नाही, असं अजित पवार सांगितलं. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाषण केलं. वरिष्ठांना वाटतं याला गृहमंत्री केलं तर हा आपलंही ऐकणार नाही, असं पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला. दरम्यान, गंमतीत अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. मला जे योग्य वाटतं तेच मी करणार. त्यात राष्ट्रवादीचा जरी कुणी म्हणत आला ‘दादा, पोटात घ्या’, तरी पोटात नाही ओठात नाही. सगळ्यांना नियम सारखाच. आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी जीवाचं रान करुन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. पण तोच जर चुकलेला असेल तर मी पांघरुण कसं घालणार. पांघरुण घालून घालून पांघरुणं संपायची वेळ येईल, असं अजित पवार म्हणाले. Read the full article