#लावली
Explore tagged Tumblr posts
Text
दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो
दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो
दरवाजाची उंच कडी आतून कशी लावली? सांगा चौथीतल्या लेकीनं आत्महत्या केली की बरं वाईट झालं? नांदेडमध्ये खळबळ, वडिलांचा टाहो नांदेडः चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या लेकीनं आत्महत्या (Suicide)केल्याचा दावा केला जातोय, तिने वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा आतून लावला, पलंगाला गळफास घेतल्याचं म्हटलं जातंय. पण इवल्याशा लेकीचा साडे ६ फूट दरवाजाच्या कडीला हातही पुरत नाही तर ती आतून कडी लावून आत्महत्या क���ी करेल,…
View On WordPress
#आतून#आत्महत्या#उंच#कडी#कशी#की#केली#खळबळ#गुन्हेगारी#चौथीतल्या#झालं?#टाहो#दरवाजाची#नांदेडमध्ये#बरं#लावली#लेकीनं#वडिलांचा#वाईट#सांगा
0 notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबरच मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून ��न्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आल��. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्कळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पड��ो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या ��िद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल��या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंबानींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या चांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
कोर्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हण��ात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाललेले विचार पडद्यावर दाखवण्यास मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
जागतिक भविष्याला आकार देण्यात भारत पुढाकार घेत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
परिवर्तन महाशक्ती आघाडीची दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर-भाकपची औरंग���बाद मध्य विधानसभा मतदार संघातून विधिज्ञ अभय टाकसाळ यांना उमेदवारी
राजकीय पक्षांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं-मराठवाडा पाणी परिषदेची मागणी
आणि
तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीला रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदक
****
जागतिक भविष्याला आकार देण्यात भारत पुढाकार घेत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत एका खाजगी वृत्तवाहिनीच्या जागतिक शिखर परिषदेला पंतप्रधान संबोधित करत होते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला संपूर्ण जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ओळखलं जात असताना, आपल्या देशासाठी मात्र एआय म्हणजे आकांक्षी भारत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा पंतप्रधान मोदी यांनी आढावा घेतला.
****
राष्ट्रीय जल पुरस्कार उद्या नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं सर्वश्रेष्ठ राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, पाणी वापर समूह आणि सर्वश्रेष्ठ नागरिक समाज अशा नऊ श्रेणींत ३८ विजेत्यांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांचं हे पाचवं वर्ष आहे.
****
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीने दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या दहापैकी आठ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला, तर दोन जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. राजू शेट्टी यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अचलपूरमधून बच्चू कडू, रावेरमधून अनिल चौधरी, चांदवड-गणेश निंबाळकर, देगलूर-बिलोली सुभाष साबणे, हदगाव-हिमायतनगर-माधव देवसरकर, हिंगोली-गोविंदराव भवर, राजुरा-वामनराव चटप तर ऐरोली मतदार संघातून अंकुश कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय शिरोळ आणि मिरज या दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. मात्र, या जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते.
****
भारतीय कम्युनिस्ट पक्षानं छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून विधिज्ञ अभय टाकसाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यां��ी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. भाकपला महाराष्ट्रातून अकरा जागा देण्याबाबत महाविकास आघाडीशी बोलणी सुरू असून, येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय झाल्यानंतर आपण अंतिम उमेदवारांची घोषणा करू असंही डॉ कांगो यांनी सांगितलं.
****
पुण्यातल्या कसबा मतदारसंघातले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कसबा मतदारसंघातील नागरिकांना काल रविवारी रात्री सुगंधी, उटणे, उदबत्ती, रांगोळी अशा वस्तू असलेल्या पिशव्यांचं वाटप हिंदमाता प्रतिष्ठान या संस्थेतर्फे करण्यात आलं. त्या पिशवीवर धंगेकर यांचं सपत्निक छायाचित्रं आहे, या माध्यमातून मतदारांना प्रलोभन दाखवण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
****
भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांची अकोला इथली विचार सभा, वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. महाराष्ट्र डेमोक्रेटिक फोरम-लोकशाही मंच द्वारे घेण्यात आलेल्या या सभेत योगेंद्र यादव यांचं भाषण सुरू होताच, वंचित बहूजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. यावरून मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर महायुतीविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान, धक्काबुक्की झाल्यानं पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त मराठवाड्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाड्यातील सिंचन क्षमता ५० टक्क्यांन वाढवण्यासाठी एकात्मिक जलनिती या योजनेअंतर्गत सर्व पर्यायाचा विचार करून कालबध्द कार्यक्रम राबवला जावा अशी अपेक्षा देखील मराठवाडा पाणी परिषदेने आपल्या प्रसिध्दी पत्रकात व्यक्त केली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज ठाणे जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
केंद्र सरकारने देशभरातल्या ६ लाख २६ हजार गावांमधल्या जमिनींच्या नोंदी संगणकीकृत केल्या असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. नागरी क्षेत्रातल्या जमिनींचं सर्वेक्षण पुनर्सर्वेक्षण करताना आधुनिक तंत्र���्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्ली इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेला ते संबोधित करत होते. भूसंसाधन विभागाने आतापर्यंत जमिनीच्या मालकी हक्काचे निदर्शक असलले १४ कोटी भू-आधार क्रमांक वितरित केले असून नागरी भागातही जिओस्पेशियल तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं चौहान यांनी सांगितलं. सुरुवातीला १३० शहरांमधे हा प्रयोग राबवला जाणार आहे.
****
पोलिस स्मृतिदिवस आज पाळला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलिस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथं चिनी सैन्याचा हल्ला मोडून काढताना, पोलिस विभागाचे दहा कॉन्स्टेबल हुतात्मा झाले होते. त्यांच्यासह देशभरात विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
पोलीस स्मृतिदिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शहीद पोलीस हुतात्म्यांना मुंबईत नायगाव पोलीस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलिस दलानेही एका ट्विट संदेशातून हुतात्मा पोलिसांना अभिवादन केलं आहे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचा मान राखत जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या सर्व हुतात्मा पोलिसांना सलाम, असं या संदेशात म्हटलं आहे.
****
मेक्सिको इथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या दीपिका कुमारी हिला आज रिकर्व्ह प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या ली जियामन हिने सुवर्णपदक जिंकलं. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावण्याची दीपिकाची ही पाचवी वेळ आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा कसोटी सामना येत्या गुरूवारपासून पुणे इथं खेळवला जाणार आहे. बंगळुरू इथं झालेला पहिला कसोटी सामना न्युझीलंडनं जिंकत मालिकेत एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. तिसरा आणि अंतिम सामना मुंबई इथं एक नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे.
****
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती जिल्ह्यातल्या सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या गुरुकुंज मोझरी इथं आज त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शिख, पारशी आणि ख्रिश्चन धर्मानुसार प्रार्थना घेण्यात आली.
****
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना उद्धव बाळासा��ेब ठाकरे पक्षावर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत जर सन्माजनक वागणूक मिळत नसेल तर शेतकरी कामगार पक्ष तत्काळ महाविकास आघाडीतून बाहेर पडेल आणि आगामी निवडणुकीत सांगोला विधानसभेत उमेदवार देऊन स्वबळावर निवडणूक लढेल, अशी भूमिका शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव रोडवर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. पुसेगाव पाटी जवळ काल रात्री दहा वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. गौतम धाबे आणि शेख सत्तार असं मृतांचे नाव असून बबन धाबे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा विभागीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शासनाच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त जगदिश मिनीयार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहे.
****
सोने आणि चांदीच्या दरानं उच्चांक गाठला आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर ७८ हजार ४०० रुपये, तर एक किलो चांदीचा दर ९८ हजार १९० रुपये आहे. आज, देशांतर्गत शेअर बाजारात चांगली खरेदी दिसून येत असून सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांत वाढ नोंदवली. सुरुवातीला निफ्टीने वाढीसह २४ हजार ९५० चा टप्पा पार केला तर सेन्सेक्समध्ये ४०० हून अधिक अंकांची वाढ दिसून आली.
****
येत्या २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर आणि उत्तर अंदमान समुद्रालगतच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तमिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसंच उद्या कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बुधवारपर्यंत तयार होईल आणि गुरुवारी ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ताशी १०० त�� १२० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह धडकेल असंही विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
आरोपीला पकडण्याची तयारी करणाऱ्या पोलिसाच्या पत्नीची अन मुलीची हत्या
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण छत्तीसगड इथे समोर आलेले असून सूरजपूर जिल्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल तालिब शेख यांची पत्नी आणि मुलीची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. आरोपी फरार असून संतप्त जमावाने आरोपीचं घर आणि गोदामाबाहेर असलेल्या वाहनांना आग लावली आहे कुलदीप साहू असे मुख्य आरोपीचे नाव असून संतप्त जमावाने त्यानंतर सुरजपूर पोलीस ठाण्याला घेराव देखील घातला तसेच एडीएम यांनाचाही…
0 notes
Video
youtube
देवेंद्र फडणीसांनी एसआयटी लावली..
0 notes
Text
Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे मृत्युमुखी
Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नांदेड(अर्जुन राठोड): जिल्हात सलग दुसऱ्या दिवशी ही पावसाने जोरदार हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी ९३ पैकी ४५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवष्टीमुळे दोन लाख हेक्टरहुन अधिक शेतीचे…
View On WordPress
#heavy rains in nanded#nanded news today#rain news#नांदेड आजच्या बातम्या#नांदेड पाऊस बातमी#नांदेड पावसाचे अपडेट#नांदेडमध्ये अतिवष्टी#विष्णुपुरी प्रकल्प
0 notes
Text
Pune Rain : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची धुंवाधार, लोणावळ्यात 115 तर वडगाव शेरी येथे 113 मिमी पावसाची नोंद
एमपीसी न्यूज – दिवसभर उकाडा व उन्हानंतर (Pune Rain) सायंकाळी पाऊस शहर परिसरात हजेरी लावत आहे. मात्र अवघ्या काही तासात पावसाचा जोर वाढत असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सखल भागात पाणी साचत आहे. रविवारी देखील पावसाने अशीच हजेरी लावली यामध्ये लोणवळा परिसरात मागील 24 तासात 115.5 मिमी पावसाची नोंद झाली तर पुण्यातील वडगावशेरी 113.5 मिमी पावसाची नोंद जाली आहे. जोरदार पावसामुळे पुणे स्टेशन परिसरात काल…
0 notes
Text
Pradip रस्त्यावर उताणा होऊन गाणी म्हणत असतो.
मग तो पालथा होऊन परत गायला सुरुवात करतो.
एक व्यक्ती विचारते : “हे काय?”
Pradip म्हणतो, “कॅसेटची दुसरी बाजू लावली आहे.”
🤣🤣🤣🥳🥳🥳😂😂😂😅😅😅
0 notes
Text
Bandya रस्त्यावर उताणा होऊन गाणी म्हणत असतो.
मग तो पालथा होऊन परत गायला सुरुवात करतो.
एक व्यक्ती विचारते : “हे काय?”
Bandya म्हणतो, “कॅसेटची दुसरी बाजू लावली आहे.”
🤣🤣🤣🥳🥳🥳😂😂😂😅😅😅
0 notes
Text
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली”
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली”
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली” जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांना सुरुंग लावण्यात यश मिळाले आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना निवडणुकीत दारुण…
View On WordPress
#“विरोधकांनी#आहे#एकनाथ#किल्ल्याला#खडसे#खडसेंच���या#खोक्यांची#गटाचे#गंभीर#जळगाव#ताकद#दूध#निवडणूक#भाजप-शिंदे#मुद्दा#म्हणाले#लावत#लावली#वर्चस्व#संघ#सुरुंग
0 notes
Text
Anant-Radhika Wedding: Crores-Worth Watch for VVIP Guests
Discover exclusive Bollywood masala and celebrity interviews at Kalakruti Media. Get the scoop on Anant-Radhika's lavish wedding return gifts! Visit now!!
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत, ���ाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईतल्या टिळक भवन इथं आज होत आहे. या बैठकीनंतर याच ठिकाणी वाजता काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नियुक्त केलेल्या वरिष्ठ निरीक्षक आणि समन्वयकांची बैठक होणार आहे. दरम्यान, चेन्नीथला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नव्हती म्हणून भेट घेतल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून अध्यक्षपदी दिली�� वळसे-पाटील यांची तर निमंत्रक म्हणून पक्षाचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांची निवड प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली आहे.
या जाहीरनामा समितीमध्ये पक्षाचे नेते धनंजय मुंडे, अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, समीर भुजबळ, आमदार इद्रीस नायकवडी, प्रवक्ते अविनाश आदिक, रुपाली चाकणकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या, यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या सर्वात जास्त तक्रारींचं निवारण करण्यात आलं आहे. याकाळात राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू आदी बाबतीत कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध करणं, मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करुन मतदानाची टक्केवारी वाढवणं, अशा निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे, असं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यात मतदान प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त मतदान केंद्र शाळेतच असल्यामुळे शाळेमध्ये असणाऱ्या सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला, त्यावेळी काल ते बोलत होते. निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शिक्षक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी निवडणूक कालावधीत मुख्यालय सोडू नये. याबाबत शिक्षण विभागाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले.
****
दिवाळीनिमित्त राज्य परिवहन महामंडळातर्फे पुणे विभागातून राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी ५०४ जादा बसगाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. २७ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी चिंचवड बसस्थानकातून या गाड्या सोडण्यात येणार आहेत.
****
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या १६ ते १८ तारखेदरम्यान प्रवाशांनी सामानात, शरीरात आणि कचरापेटीत लपवून आणलेलं १ कोटी ७० लाख रुपये किमतीचं २ किलो ४२७ ग्रॅँम सोनं आणि ४२ लाख १४ हजार रुपये किमतीचे महागडे ७ फोन विमानतळ गुप्तचर आणि टेहळणी विभागानं जप्त केले आहेत. केनिय���, जेद्दाह, दुबई आदी देशांमधून हे सर्व साहित्य बेकायदेशीर पद्धतीनं विमानानं मुंबईत आणण्यात आलं होतं.
****
जळगांव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात परतीच्या पावसानं काल संध्याकाळी आणि मध्य रात्री पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या वादळी पावसामुळं वेचणीवर आलेला कापूस, मका आणि कडधान्याचं अतोनात नुकसान झालं आहे. पाचोरा तालुक्यातल्या नगरदेवळा इथं काल अंगावर वीज पडून ६५ वर्षीय पांडुरंग त्र्यंबक महाजन यांचा मृत्यू झाला; तर दुसऱ्या घटनेत वीज पडून बैल आणि दोन वासरं ठार झाली. त्यापूर्वी अग्नावती आणि गडद नदीला सोमवारी आलेल्या पुरात तिघांचा बडून मृत्यू झाला होता. परतीच्या प्रवासात गेल्या सहा दिवसात जळगाव जिल्ह्यात झालेला हा चौथा मृत्यू आहे.
****
भारत आणि न्यझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील आज चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळं थांबला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, भारताच्या दुसऱ्या डावात ३ गडी बाद ३४४ धावा झाल्या आहेत. सर्फराज खान यानं शतक साजर करत १२५ धावांवर ऋषभ पंतनं ५३ धावांवर नाबाद आहेत. यापूर्वी भारतीय संघाचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपला तर न्युझीलंडनं पहिल्या डावात सर्वबाद ४०२ धावा केल्या होत्या.
****
0 notes
Text
शहरात धुळीचे साम्राज्य अन बेलगाम बेरोजगारी तर लोकप्रतिनिधी दहीहंडी अन पैठणीत ‘ व्यस्त ‘
नगर शहरातील रस्त्यांची सध्या नियोजन शून्य पद्धतीने कामे सुरू असल्याकारणाने शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. कुठलेही नियोजन न करता ही कामे सुरू करण्यात आलेली असल्याने अनेक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे अनेक जणांच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 24 तास कामे करून पटकन मार्गी लावली जातात मात्र नगर शहरात कासवाच्या गतीने सुरू असलेल्या…
View On WordPress
0 notes
Video
youtube
धनंजय मुंडेनी बीड जिल्ह्याची वाट लावली ?
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/relief-from-heat-for-mumbaikars-pre-monsoon-heavy-rains-in-many-areas/
0 notes
Text
लग्नाच्या ३ महिन्यातच संसार तुटला, एक गोष्ट लपवली अन् प्रकरण कोर्टात, अशी चूक तुम्ही करु नका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: विवाहापूर्वीच जडलेल्या आजाराची माहिती न देता तो लपवून ठेवत एखाद्याशी लग्न करणे चूक असून ते घटस्फोटाचे कारण ठरू, असे महत्त्वपूर्ण मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. न्यायमूर्तीद्वय विनय जोशी आणि एम.डब्ल्यू चांदवानी यांनी हे मत नोंदवित पतीच्या बाजूने निकाल देत पत्नीची याचिका फेटाळून लावली आहे. हे जोडपे अकोल्यातील आहे. त्यांचे २०१७मध्ये लग्न झाले.…
View On WordPress
#husband filed divorce case#husband-wife news#nagpur court#nagpur live news#nagpur marathi news today
0 notes