#लढाईमध्ये
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
vikram vedha trailer : सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये कोण जिंकणार? हृतिक-सैफचा अॅक्शन अवतारातील ट्रेलर प्रदर्शित
vikram vedha trailer : सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये कोण जिंकणार? हृतिक-सैफचा अॅक्शन अवतारातील ट्रेलर प्रदर्शित
vikram vedha trailer : सत्य आणि असत्याच्या लढाईमध्ये कोण जिंकणार? हृतिक-सैफचा अॅक्शन अवतारातील ट्रेलर प्रदर्शित ३० सप्टेंबर २०२२ रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट संपूर्ण जगभरात मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडेच आहे . नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आ��ा होता. हा चित्रपट मुळ दाक्षिणात्य…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार - विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 4 :- पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर लढाईमध्ये बलिदान केलेल्या मराठा सैनिकांना स्मारकस्थळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हरियाणा राज्यातील रोड मराठा संघटनेच्या विनंतीवरून पानिपत येथील युद्ध स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 February 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ‌ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·      कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट.
·      कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक एकशे अडुसष्ट कोटी लस मात्रांचं वितरण.
·      मनमाड - मुदख��ड - डोन या रेल्वेमार्गावर विद्युतीकरणासाठी २२९ कोटी रुपयांचा निधी.
·      आणि
·      रमेश देव यांच्या पार्थीव देहावर अंत्यसंस्कार.
****
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. गेल्या चौदा दिवसांमध्ये हे प्रमाण कमी झालं असल्याचंही ते म्हणाले. गेल्या चोवीस तासांमध्ये या संसर्गाचे एक लाख ७२ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात रुग्ण सापडण्याचं प्रमाण दहा पूर्णांक ९९ शतांश टक्के झालं असल्याचं त्यांनी नमुद केलं. आठ राज्यांमध्ये रुग्णांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे. केरळ आणि मिझोराममध्ये नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.  अठरा वर्षांवरच्या ९६ टक्के युवकांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात आली असून ७६ टक्के युवकांच्या दोन्ही मात्रा झाल्या आहेत. सहा राज्यांमध्ये शंभर टक्के लसीकरण झालं असून लसीकरणामुळं मृत्यूचं प्रमाण कमी झालं असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.
****
देशातल्या पात्र लोकसंख्येला कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक एकशे अडुसष्ट कोटी लस मात्रा आता पर्यंत देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे. देश कोरोना विषाणू संसर्गाविरुद्धच्या लढाईमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचही आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधतात त्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात भाग घेण्याची मुदत आज संपत आहे. या कार्यक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे. मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीचा कार्यक्रमही ‘ऑनलाईन’ पद्धतीनच होणार आहे. या कार्यक्रमासाठी इयत्ता ९वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक तसंच पालकांची निवड ‘ऑनलाईन’ स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहे.
****
ग्रामीण भागातल्या सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचं छत मिळावं यासाठी राज्यात सुरू ‘महाआवास’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या ३१ मार्च पर्यंत पाच लाख घरं बांधण्याचा दृढनिश्चय करण्याच्या सूचना ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत. मुंबईत आज यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरं बांधून उद्दीष्टपूर्ती करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मनमाड - मुदखेड - डोन या रेल्वेमार्गावर विद्युतीकरण करण्यासाठी केंद्र सरकारनं २२९ कोटी रुपयांचा निधी म��जूर करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक संजीव किशोरे यांनी दिली आहे. त्यांनी दूरदृश्य संवाद प्राणालीच्या माध्यमातून पत्रकारांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. रेल्वे मार्ग विद्युतीकरणासाठी पिंपळखुटी - मुदखेड आणि परभणी - परळी वैजनाथ या मार्गासाठी १२९ कोटी रुपये, परळी वैजनाथ - विकाराबादसाठी १०९ कोटी रुपये, पूर्णा - अकोलासाठी १०३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात दक्षिण मध्य रेल्वेसाठी नऊ हजार १२५ कोटी रुपये निधीची तरतूद केंद्र सरकारनं केली असल्याचं किशोरे म्हणाले.
****
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत विलेपार्ले इथल्या पारशी वाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या आधी सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत त्यांचा पार्थिव देह त्यांच्या वर्सोवा इथल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र नव निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसंच ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, किरण कुमार, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं.                                      
****
किराणा दुकानात वाईन विक्री कारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ‘ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लीमीन – एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद शहरातल्या क्रांतीचौक इथं आज धरणे आंदोलन केलं. राज्य सरकारच्या निषेधाचे फलक झळकावत या कार्यकर्त्यांनी यावेळी निदर्शनं केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
****
किराणामालाच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध सातारा जिल्ह्यात आज व्यसनमुक्त युवक संघ आणि वारकऱ्यांतर्फे आंदोलन करण्यात आलं. पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान दंडवत घालत हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा वारकरी महामंडळाचे मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांनी यावेळी दिला.
****
वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू, इतर गौण खनिज संपत्तीची चोरी थांबवण्यासाठी महसूल प्रशासन आता आधुनिक पद्धतीचा अवलंब करत या संपत्तीवर लक्ष ठेवत आहे. या भागातली ही चोरी रोखण्यासाठी ‘ड्रोन’ कॅमेऱ्याचा उपयोग केला जात आहे. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही सुरू आहे. तहसीलदार महेंद्र गिरमे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह या भागातल्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी ‘ड्रोन’ द्वारे नदी पात्राची निगराणी करत आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर-जालना महामार्गावर मालेगाव शिवारात काल संध्याकाळी दोन दुच��कींच्या भीषण अपघातामध्ये ��क जण जागीच ठार झाला तर तिघं गंभीर जखमी झाले. अपघातातल्या जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात २५ शिवभोजन केंद्र कार्यान्वित असून एकूण २१ शिवभोजन केंद्रावर ‘सीसीटिव्ही कॅमेरा’ बसवण्यात आले आहेत. उर्वरित चार केंद्रांवर दोन दिवसांत हे कॅमेरा बसवण्याबाबत प्रशासनाकडून सुचना देण्यात आल्या आहेत.
****
0 notes
wbkincnews · 4 years ago
Photo
Tumblr media
देशात स्पुतनिक-V ची डिलीवरी सुरू:995 रुपयांमध्ये मिळणार रशियन व्हॅक्सीनचा एक डोस, भारतात याला डॉ. रेड्डीज बनवणार; देशात प्रोडक्शन झाल्यास कमी होऊ शकते किंमत #russia सध्या देशात दोन व्हॅक्सीन उपलब्ध, डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोज होणार कोरोना विरोधातील लढाईमध्ये देशाला अजून एक लस मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीजने देशात रशियन व्हॅक्सीन स्पुतनिक-V ची आजपासून डिलीवरी सुरू केली आहे. सध्या या लसी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत मर्यादित कालावधीसाठी पुरवण्यात येत आहे. डॉ. रेड्डीजने स्पुतनिक-V च्या लसीची किंमत 995.40 रुपये केली आहे. डॉ. रेड्डीज म्हणाले की, ते सध्या प्रती डोस 948 रुपये दराने लस आयात करत आहेत. यावर 5% दराने जीएसटी आकारला जात आहे. यानंतर, लसची किंमत प्रति डोस 995.4 रुपये होते. शुक्रवारी, स्पुतनिक-व्हीचा पहिला डोस हैदराबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेमध्ये कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांना देण्यात आला. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे भारतीय भागीदार आहेत. रशियन लस स्पुतनिक-V फक्त डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळांमध्ये भारतात तयार केली जाईल. #coronaindia पहिली खेप 1 मे रोजी आली होती डॉ. रेड्डीज म्हणतात की स्पुतनिक-V ची पहिली मालवाहतूक 1 मे रोजी भारतात पोहोचली. या खेपेला 13 मे रोजी केंद्रीय औषध प्रयोगशाळा कसौलीकडून नियामक मंजुरी मिळाली. येत्या काही महिन्यांत लसीच्या आणखी काही खेप येणे अपेक्षित आहे. यानंतर भारतात स्पुतनिक-V ची निर्मिती होईल. भारतात तयार केलेल्या लसीची किंमत कमी केली जाऊ शकते. 6 मॅन्य��फॅक्चरर्ससोबत सुरू आहे चर्चा डॉ. रेड्डीज म्हणतात की, देशातील लसींच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी कंपनी 6 निर्मात्यांसोबत चर्चा करत आहे. यासोबतच कंपनी जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरणासाठी सरकार आणि प्रायव्हेट सेक्टरसोबत काम करत आहे. डॉ. रेड्डीचे को-चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर जीव्ही प्रसाद म्हणतात की, देशात कोविड केसची संख्या सलग वाढत आहे. अशा वेळी कोविड-19 विरोधातील लढ्यात लसीकरण सर्वात जास्त प्रभावी हत्यार आहे. भारतीयांचे लसीकरण योग्य वेळी होणे ही आपली प्राथमिकता आहे. किती विशेष आहे स्पुतनिक-V? रशियाने आपल्या अँटी-कोविड-19 व्हॅक्सीनचे नाव स्पुतनिक-V ठेवले आहे. कारण त्यास त्याची सर्वात मोठी उपलब्धी लक्षात ठेवायची आहे. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने (आजचा रशिया) जगातील पहिले उपग्रह स्पुतनिक प्रक्षेपित केले होते. https://www.instagram.com/p/CO2gO9LJdyT/?igshid=agwswpcjusap
0 notes
darshaknews · 4 years ago
Photo
Tumblr media
#Kangna #Mumbai #SSR मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याचा कंगनाला हक्क रामदास आठवलेंना असं म्हणायचं आहे का ? मुंबई (दि ४ सप्टेंबर २०२०) : कंगना आणि खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्य लढाईमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेत कंगनाला खा.राऊत यांनी धमकी देणे चुकीचे म्हणत आरपीआय तिला संरक्षण देईल असे म्हटले सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारे कंगनाला धमकी देणे योग्य नसल्याचे आठवले म्हणाले.कंगनाला आरपीआयचे संरक्षण पाकव्याप्त वक्तव्यावरून कि सत्ताधारी शिवसेनेचा विरोध म्हणून हा नेमका प्रश्न उभा राहिला आहे.
0 notes
nasiknews · 5 years ago
Photo
Tumblr media
आज रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र आज रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना वंदन व सध्या कोरोना विरूद्ध लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम..!
0 notes
kokannow · 5 years ago
Text
​आ. नितेश राणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे संतप्त सवाल
​आ. नितेश राणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे संतप्त सवाल
सिंधुदुर्ग​ : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या पत्रात आमदार नितेश यांनी लिहिले आहे की, कोरोनाच्या या लढाईमध्ये मी ��णि माझा पक्ष पहिल्या दिवसापासून प्रशासनाला पाहिजे ती मदत आणि सहकार्य करत आलेलो आहे. पण आता ज्या प्रशासनाच्या माध्यमातून होणाऱ्या चुका व संभ्रमाचे वातावरण आणि व्यापाऱ्यांना होणारा त्रास याबद्दल माझी नाराजी व्यक्त करण्यासाठी हे पत्र मी लिहीत आहे. ​    ​
कोरोनाच्या या…
View On WordPress
0 notes
thebusinesstimes · 5 years ago
Text
'पेटीएम'च्या सहाय्याने 'फीड माय सिटी'
‘पेटीएम’च्या सहाय्याने ‘फीड माय सिटी’
​मुंबई : ​कोरोना विरोधातील लढाईमध्ये आता मुंबईतील स्‍थंलातरित कामगार, तसेच रोजंदारी मजूरांसाठी आहार व्‍यवस्‍था उपलब्‍ध करून​ देण्यासाठी पेटीएमने पुढाकार घेतला असून, ​त्यासाठी केव्‍हीएन फाऊंडेशनसोबत​ जोडून घेतले आहे. ​ मुंबईमध्‍ये लॉकडाऊनमुळे उत्‍पन्‍नाचा स्रोत गमावलेल्‍या १६ हजार लोकांना प्रतिदिन आहाराचे वाटप केले जात आहे. आगामी आठवड्यांमध्‍ये मुंबईत आणखी २.५ लाख आहार पॅकेट वितरित करण्‍या​त येणार…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
तालिबानने लष्करी तुकडीचं नाव ठेवलं ‘पानिपत’; भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाहून भारतीय संतापून म्हणाले…
तालिबानने लष्करी तुकडीचं नाव ठेवलं ‘पानिपत’; भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाहून भारतीय संतापून म्हणाले…
तालिबानने लष्करी तुकडीचं नाव ठेवलं ‘पानिपत’; भारताला डिवचण्याचा प्रयत्न पाहून भारतीय संतापून म्हणाले… अफगाणिस्तानमध्ये सध्या सत्तेत असणाऱ्या तालिबानच्या हंगामी सरकारने स्थानप केलेल्या विशेष लष्करी पथकाला ‘पानिपत’ असं नाव दिलं आहे. अहमद शाह दुर्राणीच्या नेतृत्वाखाली १७६१ साली झालेल्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव केलेल्या अफगाणी फौजांकडून प्रेरणा घेण्याच्या हेतूने हे नाव ठेवण्यात आल्याचं…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 May 2020 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २७ मे २०२० सकाळी ७.१० मि. **** ** कोरोना विषाणू संसर्गात वयोवृद्ध नागरिकांची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना ** राज्यातली टाळेबंदी उठवण्याबाबत वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून योजना तयार करण्याचं काम सुरू ** राज्यात काल कोरोना विषाणू बाधित ९७ रुग्णांचा मृत्यू, दोन हजार ९१ नवे रूग्ण ** औरंगाबादमध्येही तीन जणांचा मृत्यू तर २५ नवे रूग्ण. ** परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीडसह मराठवाड्यातल्या अन्य सातही जिल्ह्यातल्या रूग्णांच्या संख्येत वाढ ** राज्यात सरकारच्या यशापयशावरून राजकीय पक्षांचे शाब्दिक युद्ध आणि ** पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश **** कोरोना विषाणू संसर्गामुळे देशभरात मृत्यू झालेल्यांपैकी ५० टक्के मृत्यू हे वयोवृद्धांचे झाले आहेत, यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी ठोस उपाययोजना करत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. देशातला कोरोना विषाणू संसर्गाचा दर दोन पूर्णांक ८७ शतांश टक्के एवढा असून, मृत्यू दर शून्य पूर्णांक तीन दशांश टक्के एवढा असल्याचं ते म्हणाले. तर देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढं झालं आहे. देशात आतापर्यंत ६० हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात सरकारी आणि खासगी अशा एकूण ६०० पेक्षा अधिक प्रयोगशाळांमधून दररोज एक लाख दहा हजार कोरोना विषाणू संसर्ग नमुन्यांची चाचणी होत असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली. **** राज्यातली टाळेबंदी उठवण्यासंदर्भात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखालील पथक एक योजना तयार करत असल्याची माहिती मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिली. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. राज्यातली टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथिल केली जाणार असल्याचं सांगत त्यांनी आवश्यकतेच्या आधारावर विविध घटकांना टाळेबंदीमधून सवलती जाहीर केल्या जातील, असं सांगितलं. टाळेबंदी उठल्यानंतर मात्र कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भितीही मुख्य सचिवांनी वर्तवली आहे. **** राज्यात काल आणखी दोन हजार ९१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण रुग्णांचा आकडा ५४ हजार ��५८ झाला आहे. काल या आजारानं ९७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एक हजार ७९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल एक हजार १६८ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. **** औरंगाबाद शहरात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये इंदिरा नगरमधली ५५ वर्षीय महिला, जय भीम नगरमधले ७२ वर्षीय पुरूष, आणि जाधववाडीतल्या ५७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा ५८ झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल आणखी २५ कोरोना विषाणू बाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक हजार ३३० इतकी झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सिडको एन आठ आणि जुना बाजारमध्ये प्रत्येकी चार, बायजीपुरा दोन, जुना मोंढा, रोहिदासपुरा, कांचनवाडी, भारतमाता नगर हडको, जुना हनुमान नगर, हनुमान चौक, न्याय नगर, कैलाश नगर, रामनगर, रोशन गेट, एन ११ सुभाषचंद्र नगर, पुंडलीक नगर, भवानी नगर, रेहमानिया कॉलनी, रहिम नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. औरंगाबाद शहरात काल ३० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ८११ जण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. **** परभणी जिल्ह्यात काल ३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या सदुसष्ठ झाली आहे. काल परभणी शहरात १२, पूर्णा इथं दहा, गंगाखेड चार, जिंतूर आणि सेलू प्रत्येकी दोन, तर पालम तालुक्यात एक रुग्ण सापडला. **** लातूर इथं काल आणखी दहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये निलंग्याचे सहा, लातूर शहर आणि उदगीरमधले प्रत्येकी दोन, तर हुडको आणि मसला इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातली एकूण रुग्णांची संख्या आता १०३ झाली आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. नऊ जण बरे झाले असून, ३२ रुग्णांवर उस्मानाबाद इथं तर, लातूर आणि सोलापूर इथ प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरु असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितलं. **** बीड जिल्ह्यातही काल नवे आठ कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले. यामध्ये परळी तालुक्यातल्या हाळंब आणि शिरुर तालुक्यातल्या बारगजवाडी इथले प्रत्येकी दोन, तर कारेगाव आणि वाहली इथं प्रत्येकी एक रुग्ण आहे. जिल्ह्यातही एकूण रुग्णसंख्या ५५ झाली आहे. **** हिंगोली जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औंढा इथल्या कोविड केअर सेंटरमध्ये असलेले दोन जण, ते पहनी आणि वसमत तालुक्यातल्या हट्टा इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडला. हिंगोली जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १६४ झाली आहे. **** नांदेड जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळल्यानं जिल्ह्यात एकूण संख्या १३७ झाली आहे. काल आढळलेले सर्व चारही रूग्ण उमरी तालुक्यातले आहेत. दरम्यान, नांदेड इथल्या १६ रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या सर्वांना सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. **** जालना जिल्ह्यात काल आणखी २ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं निष���पन्न झालं. जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ७६ झाली आहे. बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यातल्या हिवरा काबली आणि जालना तालुक्यातल्या वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. **** नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे. काल आणखी १५ जण बाधित असल्याचं आढळून आल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या एक हजार एक इतकी झाली आहे. **** बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार ग्रामीण रुग्णालयात एका ६० वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला. या महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय आहे. सदर महिला आपल्या कुटुंबियांसोबत २० मे रोजी मुंबईहून शारा या मूळगावी आली होती. **** देशातली टाळेबंदी हटवण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आपलं धोरण स्पष्ट करावं, असं काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते काल सामाजिक माध्यमांवरून पत्रकारांशी बोलत होते. टाळेबंदी हटवण्यासंदर्भात पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला माहिती द्यावी, असं ते म्हणाले. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी आहे, मात्र निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसकडे नाहीत, असं गांधी यांनी सांगितलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या कामगारांबाबत केलेलं विधान योग्य नसल्याचं सांगत, प्रत्येक भारतीयाला देशभरात कुठेही काम करून, आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क असल्याचं, गांधी यांनी यावेळी नमूद केलं. महाराष्ट्रात आघाडी सरकार असून महत्त्वपूर्ण निर्णय काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही, असं सांगत केंद्र सरकारनं या राज्याला मदत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. **** राज्यातली जनता एकीकडे कोरोना विषाणुच्या संसर्गाचा सामना करत असताना दुसरीकडे राज्यात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपासह शाब्दिक युद्ध करत असल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. सोमवारी श्रमिक रेल्वेवरून राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून आला, तर भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे केलेल्या मागणीचे काल दिवसभर पडसाद उमटत राहिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोरोना विषाणुच्या संकटाच्या काळात विरोधी पक्ष राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही विरोधी पक्षावर आरोप करत महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधली कोरोना विषाणुच्या संसर्गाची स्थिती वाईट असून राष्ट्रपती राजवट लागू करायच असेल तर गु��रातपासून सुरूवात करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यात सत्तेची लालसा असल्यामुळे संकट काळात सरकारला मदत करण्याऐवजी ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मात्र ��ाज्यातलं सरकार मजबूत असल्याचा दा��ाही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यात महाआघाडीच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं एका दूरचित्रवाहिनीशी बोलतांना स्पष्ट केलं. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यात सत्ता स्थापन करण्याची घाई नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विधानाचा हवाला देत काँग्रेस राज्यातल्या अपयशाची जबाबदारी टाळत असून याचे खापर ते शिवसेनेच्या माथ्यावर फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचं सांगितलं. राज्यात सत्तेसाठी आम्ही काहीही करत नसून हे सरकार त्यांच्या आघाडीतल्या कुरबुरीमुळेच जाईल, असं ते म्हणाले. भारतीय जनता पक्षाला आता राजकारणात इंटरेस्ट नाही मला असं वाटतं की आता केंद्राचा सगळा Focus हा पूर्णपणे कोरोनाच्या लढाईमध्ये आहेत त्यामुळे आत्ता जे काही Statement येत आहेत की चर्चा झालेली आहे त्या चर्चेमध्ये आम्ही सामील नाही आम्हीला राजकारणात आता इंटरेस्ट नाही कोरोनाची लढाई इफेक्टटीव झाली पाहिजे याकरता मात्र आम्ही दबाव तयार करणार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची खासदार राणे यांची मागणी ही त्यांची वैयक्तिक मागणी असून पक्षाची ती भूमिका नसल्याचंही फडणवीस यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केलं. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती नसल्याचं सांगत राज्य सरकार कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं असल्याचा आरोप केला. दरम्यान, केंद्र सरकारनं राज्य सरकारला गेल्या तीन महिन्यात २८ हजार कोटी रूपयांची मदत केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. याबाबतची सविस्तर आकडेवारी त्यांनी यावेळी दिली. **** शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक तसंच अन्य कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे तसंच शाळेत हात धुण्यासाठी जंतूनाशक आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांसोबत काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचे पर्याय सुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणामकारकरित्या उपयोगात आणावेत, असं ते म्हणाले. शाळा आणि शाळा व्यवस्थापन समितीला याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येत असून शाळा वेगवेगळ्या सत्रात भरवणं, दर दिवशी एक वर्ग भरवणं अशा पर्यायांचाही विचार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. **** आपत्ती व्यवस्थापन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठकही काल मुख्यमंत्र्यांनी घेतली. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्तींच्या दृष्टीनं आधीच नियोजन करावं तसंच सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन काम करावं असे निर्देश ��िले. रेल्वे मंत्रालयानं देखील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचं नियोजन करावं तसंच आवश्यक संरक्षण साधने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे तसंच गेल्या वर्षी कोल्हापूर- सांगली भागात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातल्या पाण्याबाबत संबंधित विभागाशी समन्वय ठेवावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. **** उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा संसर्ग होत असून, सर्व विभागाच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेऊन आणि सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावं, असे निर्देश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले आहेत. उस्मानाबाद इथं काल कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खंरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. उपचाराबाबत कोणत्याही परिस्थितीत हलगर्जीपणा होणार नाही, याची काळजी घ्यावी, असं ते म्हणाले. दरम्यान, ढोकी इथं काल खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा करण्याच्या योजनेचा शुभारंभ गडाख यांच्या हस्ते झाला. **** आगामी मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आवश्यक उपाययोजनांची तयारी आणि पूर्वनियेाजन करुन सज्ज राहण्याचे निर्देश औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल विभागीय मान्सून पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. मराठवाड्यात गोदावरी काठच्या एक हजार ५७२ गावांमध्ये विशेष नियंत्रण व्यवस्था तयार ठेवावी, नोडल अधिकारी नियुक्त करावेत, नदीकाठच्या गावांमध्ये सरपंचाची बैठक घेऊन नियंत्रण व्यवस्थापन सज्ज ठेवावं, आदी सूचना आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. **** औरंगाबाद इथून काल उत्तर प्रदेशकडे एक विशेष श्रमिक रेल्वे रवाना झाली. दरम्यान, या रेल्वेसाठी नांदेड इथून आलेले ४० मजूर दहा मिनिटं उशीरा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानं त्यांना परत जावं लागलं. ते परत नांदेडला गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** औरंगाबाद शहरातली जीवनावश्यक वस्तुंची दुकानं आजपासून सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं. १५ ते २० मे दरम्यान शहरात जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री आणि खरेदीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती, या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवर काल सुनावणी झाली, त्यावेळी आयुक्तांनी ही माहिती दिली. ३१ मे पर्यंत हा आदेश लागून राहणार असून, नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाहेरील जिल्ह्यातून अथवा परराज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती लपवल्यास अथवा विलगीकरणात न ज��ण्यासाठी राजकीय दबाव आणल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी हा इशारा दिला. **** नांदेड शहराला आजपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेनं ही माहिती दिली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातला पाणीसाठा कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. **** औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं ‘जिल्हा परिषद आपल्या गावी’हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी या उपक्रमाअंतर्गत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार ग्रामीण भागात वाढू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी केली. याविषयी माहिती देतांना ते म्हणाले.. Z.P आपल्या दारी असे आम्ही अभियान राबवलेला आहे जिथे – जिथे भेटी दिल्या जर तिथे कोरोना केअर सेंटर असेल शाळा असेल आहे त्याचं प्रिपरेशन आहे का जर गाव पातळीवरती कोरोना वाढला ग्रामपंचायतीची आणि लोकांची तयारी कशी शफिशियंट आहे इक्विपमेंट आहेत का औषधी आहेत का मनुष्यबळ आहे का या सर्वांचा आढाचा गावाची तयारी किती आहे आणि याच्यामध्ये एक पुढचा टप्पा म्हणून ५५ वर्षाच्या जास्त लोक आहेत त्या सर्व लोकांना Pulse Optimeter म्हणून मशीन आहे त्यांच्या द्वारे सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे **** परभणी जिल्ह्याच्या पाथरी पोलिस ठाण्यातल्या सहायक पोलीस निरीक्षकासह पाच कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा आदेश असतानाही सामुहिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. या सामुहिक नमाज पठण प्रकरणी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह १२५ जणांविरूध्द पाथरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** औरंगाबाद महानगरपालिका शहरातल्या नागरिकांना कोविडच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधांचं मोफत वाटप करणार आहे. यासाठी शहरातल्या होमिओपॅथीक डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेषतः प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना प्राधान्यानं हे औषध दिलं जाणार असल्याचं आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी कळवलं आहे. **** परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्याल्या लिंबा इथं गोदावरी नदीच्या पात्रात काही वाळू माफियांनी बेकायदेशीरपणे जमा केलेला सुमारे १२५ ब्रॉस वाळूचा साठा पोलिसांनी काल छापा टाकून जप्त केला. अपर पोलिस अधिक्षकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केल��. **** लातूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त म्हणून देवीदास टेकाळे यांनी काल पदभार स्वीकारला. टेकाळे हे यापूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद प्रशासन विभागाचे प्रमुख होते. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पालिकेतले कर्मचारी, अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. **** परभणी तालुक्यातल्या झरी इथं माणिक वैद्य या २५ वर्षीय युवकाचा उष्माघाताने काल मृत्यू झाला. हा युवक काल शेतावर काम करायला गेला असता त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं तो घरी परतला, अचानक चक्कर आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. **** माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथल्या विलास बागेतल्या विलासराव देशमुख यांच्या समाधीस्थळावर त्यांच्या कुटुंबियांनी आदरांजली वाहिली. युवक कॉंग्रेसच्या वतीनं कॉंग्रेस भवनात रक्तदान शिबिर घेण्यात आलं. लातूरच्या धर्मवीर औदुंबर पाटील बट्टेवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सामाजिक अंतर पाळत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतल्या गरीब गरजू रूग्णांना आणि नातेवाईकांना अन्नदान करण्यात आलं. **** मुंबईच्या आयआयटी पवईत शिक्षण घेत असलेला उस्मानाबादचा विद्यार्थी अनिकेत काळे यानं अत्यल्प किमतीत यु व्ही स्टरीलाइजर तयार केलं आहे. विद्यार्थ्यांना आपल्यातल्या तंत्र कौशल्यांचा वापर करून भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचं आवाहन त्यानं केलं आहे. तो म्हणाला… यु व्ही स्टरीलाइजर भाज्या, फळ या घरगुती गोष्टी आपण हॉस्पिटलसाठी मास्क आणि पीपीई किट इतर सगळ्यांच्या वस्तूंच्या लागणाऱ्या गोष्टी स्टरीलाइज करू शकतो यामुळे कोरोना virus पण पसरण्याच शक्यता कमी होते या सर्व गोष्टी आपल्याला स्वस्तात बाजारात जे दहा पंधरा हजार भाव आहे त्यापेक्षा कमी भाव आपल्या लोकांना चार–पाच हजारात लोकांना देण्यात यावा हा माझा विचार होता हे शक्य का झाले लोकांना भागात स्वताहून विचार करून बनवलं यामुळे आपल्याला लोकांना स्वस्तात देता यावेत **** औरंगाबाद शहरातल्या गारखेडा परीसरातल्या श्रीहरी पॅव्हेलियनमध्ये आमदार अंबादास दानवे यांनी ३१ मे पर्यंत शेतकरी ते थेट ग्राहक धान्य बाजार सुरु केला आहे. नगरसेवक त्रिंबक तुपे यांच्या हस्ते काल या धान्य बाजाराचं उद्घाटन झालं. या धान्य बाजारात शेतकऱ्यांच्या वतीनं भाजीपाला, फळ, धान्य हे एकाच छताखाली थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हा बाजार सुरू राहणार आहे. या बाजारात शेतकरी माफक दरात ग्राहकांना शेतमाल विकत आहेत. **** नवीन आणि जुना जालन्याला ज��डणाऱ्या कुंडलिका नदीवरचा सव्वाशे वर्ष जुना लोखंडी पूल तोडण्याच्या कामाला कालपासून सुरुवात झाली. येत्या आठ महिन्यात या ठिकाणी ८० मीटर लांब आणि १५ मीटर रुंद चार पदरी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लंडन कंस्ट्रक्शन कंपनीने या पुलाचं बांधकाम केलं होतं. **** नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातले दिग्गज नेते संभाजी पाटील उमरेकर यांच काल निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. उमरेकर हे नांदेड जिल्ह्यातल्या कलंबर सहकारी साखर कारखान्याचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. नांदेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे दहा वर्षे उपसभापती, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, शारदा भवन शिक्षण संस्थचे कार्यकारिणी सदस्य, दहा वर्षे नांदेड जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता उमरा इथ अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या चांभारवाडी इथं पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसह तिच्या वडिलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. पोहताना मुलीच्या हातातून दोरी निसटल्यानं बुडणाऱ्या मुलीला वाचण्यासाठी वडील पाण्यात उतरले. मात्र, घाबरलेल्या मुलीनं वडिलांना घट्ट मिठी मारल्यानं दोघेही पाण्यात बुडाले. शिवसिंग बहुरे आणि आरती बहुरे, अशी मृतांची नावे आहेत. ****
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 April 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा. **** कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर राज्य सरकार गरीब आणि गरजुंच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व उपाय योजत आहे. बृहण मुंबई महापालिकेनं काल पाच रुग्णालयं कोरोनाबाधीतांच्या उपचारांसाठी राखीव ठेवत असल्याचं म्हटलं आहे. अन्य सहा रुग्णालयांना अलगीकरण केंद्र बनवण्यात आलं आहे. मुंबईमध्ये `ताज` समुहानं कोरोनाविरुद्ध लढत असलेल्या डॉक्टरांसाठी आपली सेवा उपलब्ध करून दिली आहे. **** लोक `लॉकडाऊन` गांभीर्यानं घेत नसल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात असं महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत कोरोनाच्या मुद्दावर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. लोकांनी घरातच बसावं, असं आवाहनही त्यांनी केलं. लोक ऐकत नसल्यानं `लॉकडाऊन` वाढवण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या देशात असलेल्या संभ्रमावस्थेबाबत बोलणं अपेक्षित आहे, दिवे घालवून काय होणार, असा प्रश्र्न ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्य सरकारनं लोकांचे प्रश्र्न नीट सोडवण्यासाठी योग्य यंत्रणा लावली पाहिजे तसंच आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याची माहिती त्यांनी दिली. आरोग्य खात्यावर कमित कमी लक्ष दिल्यामुळे ही परिस्थिती ओढावली असल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. **** अमरावती शहरातल्या एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला परवा दोन तारखेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून या अहवालात त्याला कोरोनाची लागण असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ही व्यक्ती रहात असलेला हैदरपुरा परिसर अमरावती जिल्हा प्रशासनानं प्र��िबंधित केला आहे. **** मुंबईतल्या विक्रोळी इथल्या झोपडपट्टीत आज कोरोनाचे तीन रुग्ण सापडले. त्यामुळे ही संपूर्ण झोपडपट्टी सील करण्यात आली आहे. या परिसरातल्या नागरिकांनी गरज नसताना बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. **** दिल्लीतल्या निजामुद्दीन इथं तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नऊशे साठ विदेशी नागरिकांवर शासनानं प्रतिबंध घातला आहे. आपत्ती प्रबंधन आणि विदेशी नागरिक कायद्याअंतर्गत या नऊशे साठ जणांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटलं आहे. या लोकांना त्यांच्या मायदेशी लवकरात लवकर पाठवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध देशाच्या लढाईमध्ये एकजुटता दाखवण्यासाठी जनतेला उद्या दीप प्रज्ज्वलित करण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी आज या संदर्भातील आपल्या एका संदेशात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता `आओ फिर से दिये जलाए` ची चित्रफित जारी केली आहे. **** जनधन खात्यामध्ये जमा झालेले पाचशे रुपये काढण्यासाठी जालना शहरातल्या काही बँकांसमोर महिला गर्दी करत आहेत. जालना इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला घेण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत. यामुळे भाजीपाल्याच्या ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांनीच फक्त जालना बाजार समितीच्या आवारामध्ये भाजीपाला खरेदी करावा, सामान्य नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आलं आहे. **** नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नयेत यासाठी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी भायेगाव, राहेगाव, किकी या तीन गावांमध्ये आज निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करून घेतली. **** राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर प्रशासनाला एन ९५ चे ५ हजार `मास्क` तसंच इतर ५ हजार `मास्क`, हातमोजे, वैयक्तिक साधसामुग्रीसह इतर सुरक्षिततेचं आवश्यक असलेलं साहित्य दिलं आहे. संगमनेरमध्ये काल कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानं तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करत प्रशासनानं १८८ कलम लावला असून संपूर्ण तीन दिवस संगमनेर शहरात आणि तालुक्यात शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. **** कोरोनाचं संकट दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातली कुडाळ नगर पंचायत वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुडाळ नगर पंचायतनं रस्त्यावर संदेश रेखाटन केलं आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 March 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ मार्च २०१९ दुपारी १.०० वा. **** राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान केले. या कार्यक्रमात शौर्य सन्मान आणि विशिष्ट सेवा पुरस्कार दिले गेले. यामध्ये दोन किर्ती चक्र आणि एक शौर्य चक्र मरणोपरांत दिलं गेलं. यावेळी स्थल सेना अध्यक्ष जनरल बिपिन रावत यांना परम विशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. **** दहशतवादी कारवाया सुरू असताना चर्चा होऊ शकणार नसल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दहशतवाद मुक्त वातावरणात पाकिस्तानशी चर्चा करायला आपण तयार असल्याचंही भारतानं म्हटलं आ हे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात म्हटलं की पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांना दहशतवादाविरुद्ध कडक कारवाई करावी लागेल आणि भारताविरुद्ध दहशतवाद्यांचा उपयोग कोणत्याही परिस्थितीत थांबवला पाहिजे. **** निवडणूक आयोगानं आज नवी दिल्ली इथं केंद्रीय निरीक्षकांची बैठक बोलावली आहे. निवडणुकीच्या काळात निरीक्षकांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची माहिती ��ा बैठकीत त्यांना दिली जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चन्द्र निरीक्षकांना याबाबत मार्गदर्शन करतील. **** गुरुनानक देव यांच्या ५५०व्या जयंती निमित्त पाकिस्तानमधील गुरुद्वारा कर्तारपूरला भाविकांना सहज भेट देता यावी या करता कर्तारपूर छत्रमार्ग सुरू करण्याकरता भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज बैठक सुरू झाली आहे. अटारी - वाघा सीमेवर ही बैठक होत आहे. **** भारतात सहा नव्या अणूभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान काल या संबंधी करार झाला. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँड्रे थाँमसन यांच्या उपस्थितीत नवव्या सचिवस्तरीय बैठकीत द्विपक्षीय नागरी आण्विक सहकार्य वाढवण्याचंही ठरलं आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिकेनं पाकिस्तानला दहशतवादी गट आणि त्यांच्या म्होरक्यांविरुद्ध ठोस कारवाई करायला सांगितलं आहे. अमेरिका दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताच्या बाजुने ठामपणे उभे असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्या सह झालेल्या बैठकीत म्हटलं आहे. ***** शिवसेना आणि भाजप युतीच्या प्रचाराला येत्या २४ तारखेपासून कोल्हापूर इथं प्रारंभ होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी युतीच्या राज्यभरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एकत्रित मेळावे उद्यापासून होणार आहेत. पहिला मेळावा उद्या अमरावतीला होणार असून, उद्या संध्याकाळी नागपूर इथं मेळाचा होईल. १७ मार्चला औरंगाबाद आणि नाशिकला, तर १८ मार्चला नवी मुंबई, आणि पुण्यात, पदाधिकारी मेळावा होणार असल्याचं वृत्त आहे. **** बीडच्या शासकीय धान्य गोदामात ५५ लाख रूपयांचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या गोदामातून १४ हजार ६८७ क्विंटल धान्याची काळ्या बाजारात विक्री झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तीन गोदाम व्यवस्थापंका विरूद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा तालुक्यात एरंडेश्वर इथल्या हायटेक विद्यालय परीक्षा केंद्रावर सामुहिक कॉपीचा प्रकार निदर्शनास आला असून, केंद्र चालकांसह आठ जणांविरोधात पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी काल अचानक दिलेल्या भेटी दरम्यान, ही बाब समोर आली. या परीक्षा केंद्रावर संस्थाचालकांसह, वसतीगृहातले कर्मचारी आणि अनाधिकृत पर्यवेक्षकाच्या मदतीने, अनेक विद्यार्थी सामुहिक कॉपी करीत असल्याचं दिसून आलं. त्या��ंतर या सर्वाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. **** पालघर जिल्ह्यात वनविभागाच्या अधिकाऱ्याला तीन लाख रुपये लाच देऊ करणाऱ्या एका वैद्यकीय व्यावसायिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. डॉ दिगंबर जेठे असं या आरोपीचं नाव असून, वनविभागाच्या जागेवरचं बांधकाम पाडू नये, यासाठी त्यानं संबंधित अधिकाऱ्याला लाचेचं आमीष दाखवलं. काल सापळा रचून त्याला लाच देताना रंगेहाथ अटक करण्यात आली. **** विश्र्व विशेष ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेला आजपासून आबू धाबीमध्ये प्रारंभ होत आहे. दोनशे देश यात सहभागी होत आहेत. आशियात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत पुढील सात दिवस साडे सात हजार खेळाडू १४ क्रीडा प्रकारांत सहभागी होतील. भारतानं या विशेष ऑलिंपिकसाठी ३७८ जणांचं पथक पाठवलं आहे. यजमान सौदी अरबनंतरचं हे सर्वात मोठं पथक आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १४  मार्च २०१९ सकाळी ११.०० वाजता.
काँग्रेस पक्षानं लोकसभेसाठीच्या २१ उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातल्या पाच जागांचा समावेश आहे. नागपूरहून नाना पटोले, सोलापूरहून सुशीलकुमार शिंदे, गडचिरोली- नामदेव उसंडी, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवडा तर उत्तरमध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. **** भारतात सहा नव्या अणूभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. भारत आणि अमेरिके दरम्यान काल या संबंधी करार झाला. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँड्रे थाँमसन यांच्या उपस्थितीत नवव्या सचिव स्तरीय बैठकीत द्विपक्षीय नागरी आण्विक सहकार्य वाढवण्याचंही ठरलं आहे. दरम्यान अमेरिका दहशतवादा विरुद्धच्या लढाईमध्ये भारताच्या बाजुने ठामपणे उभा असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे परराष्ट्र सचिव गोखले यांच्यासह झालेल्या अन्य बैठकीत म्हटलं आहे. **** परळी औष्णिक विद्युत केंद्रातला २५० मेगावॅट क्षमतेचा आठवा संच, कार्यान्वीत झाला आहे. काल दुपारी या संचातून २०० मेगावॅट एवढ्या वीजेची निर्मिती सुरू झाली. हा संच गेल्या १२ जानेवारीपासून बंद होता. **** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युतर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. विद्यापीठाची पदवी परीक्षा, येत्या २७ मार्चपासून तर पदव्यूत्तर परीक्षा ५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. आधी या परीक्षा अनुक्रमे १९ आणि २६ मार्चपासून सुरू होणार होत्या. **** पालघर जिल्ह्यात वनविभागाच्या अधिकाऱ्याला तीन लाख रुपये लाच देऊ करणाऱ्या एका वैद्यकीय व्यावसायिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. डॉ दिगंबर जेठे असं या आरोपीचं नाव असून, वनविभागाच्या जागेवरचं बांधकाम पाडू नये, यासाठी त्यानं संबंधित अधिकाऱ्याला लाचेचं आमीष दाखवलं. काल सापळा रचून त्याला लाच देताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
**** संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या तिस-या दिवशी, लोकसभेमध्ये कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे काही मिनिटांमध्येच लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं होतं.प्रश्नकाल रद्द करून शेतक-यांच्या समस्येवर चर्चा करावी, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला, तर, सरकार सर्व मुद्द्यांवर विरोधकांशी चर्चा करण्यास तयार असून, विरोधकांनी सदनाचं कामकाज चालू द्यावं, असं आवाहन सरकारनं विरोधकांना केलं. दुसरीकडे, देशभरातले शेतकरी त्रस्त असून, त्यांच्या प्रश्नांवर सदनात चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेस आणि संयुक्त जनता दलानं राज्यसभेमध्ये केली.काही वेळ कामकाज सुरू राहिल्यानंतर राज्यसभेचं कामकाजही साडेबारापर्यंत स्थगित करावं लागलं. **** भारत आणि चीन दरम्यान, सिक्किमच्या डोकलाम भागात सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर दोन्ही देशांनी शांततापूर्ण रीतीनं तोडगा काढावा, असं आवाहन ऑस्ट्रेलियानं केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्यूली बिशप सध्या भारताच्या दौ-यावर असून,त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्र्यांशी एका बैठकीत चर्चा केली. बिशप यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी घेतलेल्या भेटीदरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याची निंदा केली असून, दहशतवादाविरुद्धच्या प्रत्येक लढाईमध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी आहे, असं नमूद केलं. **** खाजगीपणाचा अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार आहे का, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायमूर्तींचं घटनापीठ आज सुनावणी करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या यासंदर्भातल्या याआधीच्या दोन निर्णयांच्या पार्श्वभूमीवर यावर विचार होईल, असं काल सरन्यायाधी�� जे.एस.खेहर यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं म्हटलं होतं.खाजगीपणाचा अधिकार हा संविधानानुसार मूलभूत अधिकार नसल्याचं, या आधी सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.आधार क्रमांकासाठी मागितली जाणारी माहिती म्हणजे व्यक्तीच्या खाजगीपणाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असं प्रतिपादन करत,याचिकाकर्त्यांनी आधारच्या वैधतेला आव्हान दिलं आहे. ***** राज्यात नव्यानं लागू झालेल्या ‘सामाजिक बहिष्कार प्रतिबंध‘ कायद्यांतर्गत काल पुण्यात अजून एक गुन्हा दाखल झाला.पंचांच्या निर्णयाला विरोध केल्यानं एका कुटुंबाला वाळीत टाकल्याबद्दल वैदू समाजातल्या सहा पंचांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे. **** राज्यशासनानं खाजगी भागीदारीसह कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘ महावेध‘ प्रकल्पांतर्गत, वाशीम जिल्ह्यामधल्या तीस महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रं सुरू झाली आहेत.पाऊस,हवेची दिशा आणि गती, दिवसाचं तापमान आणि वातावरणातली आर्द्रता यासह पडलेल्या पावसाच्या प्रमाणाची माहिती या केंद्राकडून शेतक-यांना दिली जाईल. **** स्वच्छ भारत मिशनची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेनं जिल्हाभरात शौचालय बांधकामासाठी परवा सोमवारी सकाळी ६ ते रात्री बारा वाजेपर्यंत दहा हजार शोषखड्डे खोदले. निर्धारित उद्दिष्टापेक्षा ७७६ शोषखड्डे जास्त खोदून जिल्हा परिषदेनं उच्चांक गाठला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली. **** महिलांना कामाच्या ठिकाणी सन्मान आणि सुरक्षित वातावरण मिळावं, यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसंच प्रत्येक कार्यालयात ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापन करावी, असे निर्देश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. महिलांनी या कायद्याचा दुरुपयोग करु नये, असं आवाहनही त्यांनी केलं. **** औरंगाबाद जिल्हा वकील संघातर्फे काल सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये तीसहून आधिक वकिलांनी नेत्रदानाचा संकल्प केला तर सुमारे पन्नास वकिलांनी रक्तदान केलं. या शिबीरात जिल्ह्यातले वकील तसंच जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश उपास्थित होते. **** मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी राही भिडे यांना जाहीर झाला आहे. येत्या १२ ऑगस्टला मुंबईतल्या पत्रकार भवनात होणा-या एका समारंभात राही ��ांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. रोख बक्षीस आणि स्मृतीचन्ह असं या पुरस्काराचं स्वर��प आहे. **** सातारा जिल्ह्यातले जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी यांचं भिलार इथे आज पहाटे पाचच्या सुमारास निधन झालं. ते अट्ठ्याण्णव वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी भिलार इथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ****
0 notes