#राहुलनं
Explore tagged Tumblr posts
Text
IND vs BAN: केएल राहुलनं सोपा झेल सोडला, रोमहर्षक सामन्यात बांगलादेश एक विकेटनं विजयी
IND vs BAN: केएल राहुलनं सोपा झेल सोडला, रोमहर्षक सामन्यात बांगलादेश एक विकेटनं विजयी
IND vs BAN: केएल राहुलनं सोपा झेल सोडला, रोमहर्षक सामन्यात बांगलादेश एक विकेटनं विजयी India Vs Bangladesh Today Match highlights: बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशने ४६ षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले. India Vs Bangladesh Today Match highlights: बांगलादेशने…
View On WordPress
#ban:#ind#एक#केएल#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#झेल#बांगलादेश#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#राहुलनं#रोमहर्षक#विकेटनं#विजयी#विश्व#सामन्यात#सोडला#सोपा#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Valentines day : केएल राहुलनं शेअर केली रोमँटिक पोस्ट; अथियानं दिलं ‘असं’ उत्तर!
Valentines day : केएल राहुलनं शेअर केली रोमँटिक पोस्ट; अथियानं दिलं ‘असं’ उत्तर!
Valentines day : केएल राहुलनं शेअर केली रोमँटिक पोस्ट; अथियानं दिलं ‘असं’ उत्तर! टीम इंडियाचा फलंदाज आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे नाते अधिकृत झाले आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. ते आपले फो��ोही सोशल मीडियावर शेअर करतात. आज व्हॅलेंटाईन डेला राहुलने इंस्टाग्रामवर अथियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही एकत्र फिरताना दिसत…
View On WordPress
0 notes
Text
IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार
IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार
IND vs SA : राहुलला बसणार मोठा धक्का, टीम मॅनेजमेंट करणार वेगळा विचार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे आऊट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 7 महिन्यांंमध्ये 4 वेळा राहुलनं दुखापतीमुळे भारतीय टीममधून माघार घेतली आहे. केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे आऊट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या 7 महिन्यांंमध्ये 4 वेळा राहुलनं दुखापतीमुळे भारतीय टीममधून माघार घेतली आहे. Go to Source
View On WordPress
#ind#करणार#क्रीडा#क्रीडा विषयक#खेळ बातमी#खेळी#टीम#धक्का!#बसणार?;#बातमी#भारत लाईव्ह मराठी बातमी#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्राची खबर#मॅनेजमेंट#मोठा#राहुलला#विचार#वेगळा!#समाचार#स्पोर्ट्स
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 December 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत. सरकारनं काल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं.
****
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या तीन डिसेंबरला महाराष्ट्रात उग्र आंदोलन करणार आहे. समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितलं. संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसंच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत तीन डिसेंबर रोजी राजस्थानातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रस्ता रोको करून ��ेतकऱ्यांचं हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचं रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारनं केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.
****
देशात काल दिवसभरात ३६ हजार ६०४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५०१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९४ लाख ९९ हजार ४१४ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३८ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४१ हजार ९८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८९ लाख ३२ हजार ८४७ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख २८ हजार ६४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा लाख ९६ हजार ४५१ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी २४ लाख ४५ हजार ४९ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
नियंत्रक आणि महालेखापाल - कॅगने जलयुक्त शिवार योजनेत सुधारणात्मक शिफारसी केलेल्या असताना राज्य सरकारनं ही योजनाच गुंडाळून टाकल्याचा आरोप भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. अकोला इथं वार्ताहरांशी बोलताना सावरकर यांनी, जे शेतकरी पूर्वी एक पीक घेत होते, ते आता या योजनेमुळे दोन पीकं घेतात, तसंच पाणी पुरवणाऱ्या टँकर्सची संख्या कमी झाल्याचं या अहवालात, नमूद असल्याचं सांगितलं. राज्यात २२ हजार ५८९ गावांत जलयुक्त शिवार योजनेची ६ लाख ४१ हजार ५६० कामं झाली, त्यापैकी फक्त १२० गावातली एक हजार १२८ म्हणजे शून्य पूर्णांक १७ शतांश टक्के कामंच कॅगने तपासली असल्याकडे सावरकर यांनी लक्ष वेधलं. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीतून सत्यच बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या चौकशीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. या चौकशीतून सत्य काय ते कळेल, असं ते म्हणाले. या योजनेचं अपयश दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास सरकारकडून होत आहे, त्यामुळे या प्रकारच्या चौकशीचा फरक भाजपवर पडणार नाही, असं ते म्हणाले.
****
विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी काल सरासरी ६९ टक्के मतदान झालं. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ६१ पूर्णांक आठ दशांश टक्के मतदान झालं.
****
नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा आजपासून एकदिवसआड सुरु झाल्या. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गर्दी टाळण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थीं सम तारखेला तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विषम तारखेला शाळेत येण्याची सूचना करण्यात आली आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं हार्दिक पंड्याच्या ९२ आणि रविंद्र जडेजाच्या ६६ धावांच्या बळावर निर्धारित षटकात पाच बाद ३०२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं ६३, शुभमन गीलनं ३३, शिखर धवननं १६, श्रेयस अय्यरनं १९, के एल राहुलन��� पाच धावा केल्या. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं यापूर्वीच विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ट्वेंटी तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून, पहिला टी ट्वेंटी सामना परवा चार तारखेला होणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 january 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा. **** लोकसभेत गदारोळ करणाऱ्या अण्णाद्रमुक आणि तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांना अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुढच्या चार बैठकांसाठी निलंबित केलं आहे. आज सकाळी लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीवर धरण बांधण्यावरुन, तर तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. या गोंधळातच अध्यक्षांनी प्रशनोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही हे सदस्य गदारोळ करत असल्यामुळे अध्यक्षांनी या सदस्यांना पुढच्या चार बैठकांसाठी निलंबित केलं. अण्णाद्रमुकच्या २६ खासदारांना अध्यक्षांनी काल पाच दिवसांसाठी निलंबित केलं होतं. **** राफेल खरेदी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीच्या मुद्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सभात्याग केला. काँग्रेस सदस्य आनंद शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं, काँग्रेसचे सदस्य सदनातून बाहेर पडले. **** जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरु केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी झाले. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. फुलंब्री इथं विविध प्रशासकीय इमारती, तसंच विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर मुख्यमंत्री हेलीकॉप्टरनं सातारा परिसरातल्या श्रीयश अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाकडे प्रस्थान करतील. त्यानंतर उच्चतम कृषी ��ाजार समितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल इथल्या सभेनंतर, सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यशाळेला संबोधित करतील. सायंकाळी सहा वाजता टी.व्ही. सेंटर चौकात रस्त्यांच्या व्हाईट टॅपिंग कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. **** राज्यातले निर्माणाधीन ९१ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनानं विशेष पॅकेज दिलं आहे. या विशेष पॅकेजच्या योजनेस आता ‘बळीराजा जलसंजीवनी योजना’ असं संबोधण्यात येणार आहे. हा प्रकल्प २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या खर्चाची विभागणीही केली असून, त्यानुसार केंद्राचा हिस्सा २५ टक्के आणि राज्याचा हिस्सा ७५ टक्के राहणार आहे. **** स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी विचारवंत, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. धर्माधिकारी यांच्या निधनानं एक तत्वनिष्ठ व्यक्तीमत्त्व आणि नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. धर्माधिकारी यांचं आज पहाटे वार्धक्यानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. **** सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत समग्र शिक्षा अभियानातल्या विशेष शिक्षकांचं मानधन वाढवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी करण्यात येईल, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणं हे एक उत्तम काम असून, हे काम करताना विशेष शिक्षकांचं मानधन पूर्वीच्या म्हणजे २०१६-१७ च्या मानधनाप्रमाणे सुरु ठेवावं ही मागणी या बैठकीत करण्यात आली. आदिवासी आणि दुर्गम भागात कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या एम.बी.बी.एस पात्रता धारक डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा ४५ हजार रुपयांच्या आणि इतर भागात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या ४० हजार रुपयांच्या मानधनात १५ हजार रुपयांची वाढ करण्यात यावी, असे आदेशही मुनगंटीवार यांनी अन्य एका बैठकीत दिले. **** कर्नाटकात विजयनगर इथं होत असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत पदकविजेत्या सोनिया लाठेर आणि सिमरनजीत कौर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना नमवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पिंकी जागंडा आणि मनिषा मौन यांनीही विजय संपादन करत आगेकूच सुरु ठेवली आहे. ५१ किलो वजनी गटात, तेलंगणाच्या निखत झरीननं लिखिता बट्टीनीचा परा��व केला. **** भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर, भारताच्या चार बाद ३०३ धावा झाल्या होत्या. मयंक अग्रवाल ७७, विराट कोहली २३, अजिंक्य रहाणे १८, लोकेश राहुलनं नऊ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा १३०, तर हनुमा विहारी ३९ धावांवर नाबाद आहेत. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 8 December 2018 Time - 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ८ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.०० ****
५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. धर्माच्या आधारावर मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही, या शहा यांच्या विधानाबाबतही पवार यांनी टीका केली असून मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचा आग्रह त्यांनी धरला. मुंबईत आज एका कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेबाबत विचारलं अस��ा पवार यांनी, मराठा समाजासाठीच्या १६ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी ��ालीच पाहीजे परंतू, इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात यावं अशी आपली भूमिका असल्याचं सांगितलं.
****
भारतीय नौदल आज पाणबुडी दिवस साजरा करत आहे. याच दिवशी वर्ष १९६७ मध्ये आय.एन.एस.कावेरी ही देशाची पहिली पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती. २९ वर्षांच्या सेवेनंतर ३१ मे १९९६ ला आय.एन.एस कावेरी लष्कराच्या सेवेतून निवृत्त झाली.
****
जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबनी क्षेत्रात आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरु केला. भारतीय सैन्यानंही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. या गोळीबारात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचा समावेश असलेल्या, लोकतंत्र के स्वर या पुस्तकाचं आज नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. परारष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत दरात कपात अद्याप कायम आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २२ पैशांची घसरण होऊन तो ११ महिन्यांच्या निचांकी दरावर पोहोचला. डिझेलच्या दरांतही २५ पैशांनी घसरण होऊन तो आठ महिन्यांच्या निचांकावर पोहोचला. मुंबईत पेट्रोलची किंमत ७६ रुपये २८ पैसे प्रतीलिटर, तर डिझेलची किंमत ८६ रुपये ३२ पैसे प्रतीलिटर झाली आहे.
****
बदलत्या काळानुसार मराठी भाषेचा नियमित आणि अधिक वापर होण्याची गरज असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज मराठीप्रेमी पालक महासंमेलनात ते बोलत होते. मराठी भाषेविषयी असलेले गैरसमज सर्वप्रथम दूर करणं गरजेचं असून, मराठी भाषा अधिक सक्षम झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
****
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. अत्यंत चुरशीची ही निवडणूक होत असून, भारतीय जनता पक्षाविरुद्ध लोकसंग्राम, काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी, शिवसेना आणि इतर सर्व पक्ष अशी लढत होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनानं अतिरिक्त बंदोबस्त मागवला आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार असून, मतमोजणी परवा सोमवारी होणार आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचा ३६ वा वर्धापनदिन आज साजरा होत आहे. ��ानिमित्तानं महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं. महापौर नंदकुमार घोडेले यांनी क्रांतीचौक इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. शहरातल्या इतर सर्व प्रभागातल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना प्रभाग सभापती, नगरसेवक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.
****
नांदेड इथं आजपासून ‘नांदेड ग्रंथोत्सव २०१८’ ला सुरुवात झाली. ग्रंथोत्सवाची सुरुवात आज सकाळी ग्रंथदिंडीनं करण्यात आली. त्यानंतर ग्रंथोत्सवाचं औपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते झालं. पुस्तक वाचनातून वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, यातून समाज सुसंस्कृत होतो, यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे ठरतात, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
****
परभणी शहरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गोदामाला आज भीषण आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे, दुपारपर्यंत आग आटोक्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान ॲडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवस अखेर भारताच्या तीन बाद १५१ धावा झाल्या. चेतेश्वर पुजारा ४० आणि अजिंक्य रहाणे एका धावेसह नाबाद आहेत. के एल राहुलनं ४४ आणि विराट कोहलीनं ३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवर संपुष्टात आला. भारत १६६ धावांनी आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 7 April 2018 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ७ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
भारत नेपाळच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भारत आणि काठमांडूदरम्यान रेल्वेरुळाचं काम सुरू करण्याबरोबरच दोन्ही देशांदरम्यान जलमार्ग आणि रेल्वेसेवेद्वारे संपर्क वाढवण्यावर भारताचा अधिक जोर असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. तसंच शेती क्षेत्रामध्ये दोन्ही देशांनी एकत्रितरित्या काम करण्यास सहमती दर्शवली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अभिनेता सलमान खानला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. गुरुवारी याप्रकरणी सलामनला दोषी ठरवत पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर लगेचच सलमानच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज केला होता.
****
आयसीसीआयसीआय बँक आणि व्हीडीओकॉन समूहाच्या तीन हजार २५० कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे नातेवाईक राजीव कोचर यांची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज सलग तिसऱ्या दिवशी चौकशी केली. कर्जाच्या रक्कमेत वाढ करण्यामध्ये त्यांच्या कंपनीच्या भूमिकेबाबत चौकशी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या सरोगसी केंद्रांवर कडक निर्बंध घालण्याच्या शिफारशी बाल हक्क संरक्षण आयोगानं केल्या आहेत. देशभरात सरोगसी विषयक कायदा अस्तित्वात नसल्यामुळे अनियंत्रित चालणारी केंद्र आणि रुग्णालयांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आयोगाकडून केला जात आहे. पूर्ण राज्यामध्ये सरोगसी केंद्र आणि सरोगसी प्रकरणं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालतील, आणि यासंदर्भात नियंत्रण मंडळ स्थापन करण्याची शिफारस आयोगानं केली आहे.
****
औरंगाबाद जिल्हयात गंगापूर तालुक्यातल्या तुर्काबाद गणाच्या ��ोटनिवडणुकीत शिवसेनेच्या सोनाली पवार या दोन हजार ९४ मतं मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जमुनाबाई पवार यांचा पराभव केला.
तर अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर साडेचारशे मतांनी विजयी झाले.
****
जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शासन सेवेतल्या २००५ नंतरच्या कर्मचार्यांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी या प्रमुख मागणीचं निवेदन संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवासी जिल्हाधिकारी राजेश जोशी यांना दिलं. या आंदोलनात शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
बीड इथंही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. शासनानं आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलक शिक्षकांनी यावेळी दिला.
****
मुस्लिम धर्मातल्या तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या विधेयकाविरुद्ध बीड इथं आज मुस्लिम व्यक्तीगत कायदे मंडळाच्या वतीनं मुस्लिम महिलांचा मेळावा घेण्यात आला. सरकारनं व्यक्तीगत कायदे मंडळाच्या कामात दखल देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महिलांच्या आधिकार आणि हक्काच्या विरूध्द हे सरकार पावलं उचलत असून, आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मंडळाच्या पदाधिकारी शेख साबिया खान यांनी सांगितलं. यावेळी मुस्लिम महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा - २०१८ उद्या होणार आहे. परभणी जिल्ह्यात एकुण दोन हजार ६२७ उमेदवार या परीक्षेला बसले असून, नऊ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलं असून, एक भरारी पथकही तैनात करण्यात आलं आहे.
****
ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आज चौथं सुवर्ण पदक पटकावलं. भारोत्तोलन स्पर्धेत व्यंकट राहुलनं ८५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. याबरोबरच भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत चार सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह एकूण सहा पदकं मिळवली आहेत.
****
राज्यात काही ठिकाणी पाऊस पडल्यानं तापमानात किंचित घट झाली आहे. आज सर्वात जास्त ४१ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान वर्धा इथं नोंदवलं गेलं. नांदेड ४०, तर उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं सरासरी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून, पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा शहर आणि ��रिसरातही आज दुपारी पाऊस पडल्याचं वृत्त आहे. पुढचे दोन दिवसही राज्यात ��ुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
//*************//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date –23 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २३ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** राज्यातल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा; हेक्टरी ६ हजार ८०० ते ३७ हजार ५०० रुपये मदत मिळणार. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक- आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा. आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या चौकशीला राज्यपालांनी दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली. आणि टी - २० सामन्यात भारता��ा श्रीलंकेवर विजय; रोहित शर्माची जलद शतकाच्या विक्रमाची बरोबरीत **** राज्यातल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक, धान उत्पादक आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काल राज्य सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, पिक विमा आणि कापूस नियंत्रण कायद्याअंतर्गत आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार ८०० रुपये ते ३७ हजार ५०० रुपये, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त धानाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ६ हजार रुपये ते २३ हजार २५० रुपये मदत दिली जाणार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितल. ओखी वादाळानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १८ हजार रुपये तर पीक विम्याअंतर्गत ९ हजार ते २५ हजार रुपये मदत देण्यात येईल, अस फुंडकर म्हणाले. **** राज्यात गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेच्या प्रमाणात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली असून तो ३४ टक्क्यांवर पोचल्याचा दावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र गुन्ह्य���च्या बाबत देशात १३व्या स्थानावर असून शरीरासंबंधीच्या गुन्ह्यात देशात १९ व्या स्थानावर असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपूरातलं विधीमंडळाचं अधिवेशन काल संपलं. अधिवेशातल्या सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारनं पळ काढल्याची टीका वार्ताहरांशी बोलतांना केली. **** धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी टाटा मूलभूत संस्था करत असलेलं संशोधन अंतिम टप्प्यात असल्याचं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. काँग्रेसचे रामहरी रूपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला असून, पुढच्या कार्यवाहीसाठी उपसमिती नेमली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र सावरांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश झालेला आहेच, त्यामुळे सरकारनं वेळकाढूपणाचं धोरण न अवलंबता फक्त अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात, असं रूपनवर यांनी सांगितलं. **** वीज निर्मिती केंद्रांसाठी आवश्यक कोळशाचा साठा उपलब्ध असल्यानं राज्यात भारनियमन होणार नाही, असं उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितलं. भविष्यात विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलर ऊर्जा तसंच पवन ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार असून, राज्यातल्या ४० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचं ते म्हणाले. **** जात प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्याचा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश रद्द केला जाणार नाही, असं समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत सांगितलं. सदस्य हेमंत टकले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. **** आणीबाणीच्या काळात ज्यांनी बंदीवास ��ोगला त्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याबाबातचा निर्णय, नवीन वर्षात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत घेण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. आणीबाणीच्या काळात अनेकांना १९ महिने तुरुंगात राहावं लागलं होतं. काही राज्यांमध्ये अशा बंदीवानांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देऊन निवृत्ती वेतन देण्यात येतं त्यानुसार राज्यातल्या अशा बंदीवानांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळाप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दिलेली मंजुरी मुंबई उच्च न्यायालयानं काल रद्द केली. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय चव्हाण यांच्याविरोधात कोणताही नवीन पुरावा सादर करण्यास असमर्थ ठरली असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यपालांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये या घोटाळ्याप्रकरणी चव्हाण यांची चौकशी करण्यास आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास सीबीआयला परवानगी दिली होती. चव्हाण यांनी या परवानगीला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान, या प्रकरणी राज्यपालांनी राजकीय हेतूनं प्रेरित होऊन निर्णय घेतला असल्याचा आरोप करत चव्हाण यांनी राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर आपण समाधानी नसल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. **** निरिक्षणात्मक खगोल विज्ञानात देश तांत्रिक दृष्टीनं कुठेही कमी नसल्याचं भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. अरविंद रानडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथल्या एमजीएम संस्थेत उभारण्यात आलेल्या ‘डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल विज्ञान केंद्रा’चं उद्घाटन काल रानडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात खगोल विज्ञानासंदर्भात खूप मोठ्या प्रमाणात काम होत असून येणाऱ्या काळात अभियंता आणि इतर विविध पदांसाठी भारत सरकारतर्फे नोकरीच्या संधी निर्माण केल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादचं हे खगोल विज्ञान केंद्र मराठवाड्यातल्या भावी वैज्ञानिकांसाठी मोलाचं योगदान देईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. **** इंदोर इथं खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी- ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा ८८ धावांनी पराभव करत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारीत २० षटकात ५ बाद २६० धावां केल्या. यात कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमी शतकाचा समावेश आहे, त्यांन या सामन्यात ३५ चेंडूत शतक करत जागतिक विक्रमाची बरोबरी केली. त्यानं ११८ धावा केल्या. लोकेश राहुलनं राहुलनं ��कोणनव्वद धावा केल्या. श्रीलंकेचा संघ १८ व्या षटकात १७२ धावा करून सर्वबाद झाला. या विजयासोबतच भारतानं मालिकेत २-० नं आघाडी मिळवली आहे. **** जालना शहरातल्या धार्मिक स्थळांचं पुन:सर्वेक्षण करण्यात यावं अशी मागणी नगरपालिकेतल्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतर नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नगरसेवकांनी काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मागणी केली. तत्पूर्वी सर्वसाधारण सभेत शहरातले अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. धार्मिक स्थळांचं चुकीचं सर्वेक्षण करणाऱ्या स्वच्छता निरीक्षकांना निलंबित करावं, या मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन करत कामकाज बंद पाडलं. त्यामुळे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सहा स्वच्छता निरीक्षकांचं तात्पुरतं निलंबन केलं. **** औरंगाबादनजीक साजापूरजवळ एका अज्ञात वाहनानं दोन दुचाकींना धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. लासूरगाव इथले ग्रामपंचायत सदस्य मनोहर काळे यांच्यासह अन्य तिघे जण दोन दुचाकींवरुन लासूरहून औरंगाबादकडे येत असतांना काल रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. काळे यांच्यासह अन्य दोघंजण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीवर आधारित शेषराव चव्हाण लिखित ’द ग्रेट इनिग्मा’ या पुस्तकाचं आज औरंगाबाद इथं माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत प्रकाशन होणार आहे. शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या सभागृहात दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होईल. *****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १३ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला ** शेतकरी आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचा इशारा ** पन्नास हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एस.एस शेटकार विरूद्ध गुन्हा दाखल आणि ** श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी भारताच्या सहा बाद ३२९ धावा **** उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. नाशिक औद्योगिक वसाहतीतली जमीन विनासूचित करुन खासगी विकासकाला दिल्याचे आरोप विरोधकांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर देसाई यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नसल्याचं देसाई यांनी सांगितलं. यासंदर्भात होणाऱ्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असून या चौकशीनंतर येणारे निष्कर्ष मान्य करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना देसाई यांच्या पाठीशी आहे असं म्हटलं आहे. विरोधी पक्षांकडून मात्र या मुद्यावर देसाई यांच्यासह सरकारच्या भूमिकेवर टीका होत आहे. सततच्या दुटप्पी भूमिकेमुळे जनमानसात शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली असून, ‘डॅमेज कंट्रोल’साठी देसाई यांनी राजीनाम्याचं नाटक केल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शिवसेना पूर्वीपासूनच भ्रष्टाचाराचे समर्थन करत असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमीच त्याकडे डोळेझाक करतात, अशी टीका विखे पाटील यांनी केली. देसाई यांचा राजीनामा न स्वीकारून, सरकारने नैतिकता धाब्यावर बसवली असल्याचं, स्पष्ट झालं, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना एक न्याय आणि इतरांना दुसरा न्याय ही सरकारची भूमिका ही राजकीय संधीसाधूपणाची असल्याचंही सावंत म्हणाले. देसाई यांचा राजीनामा फेटाळून मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहता यांचंही मंत्रिपद वाचवलं, अशी टीका विधान प��िषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दोन्ही मंत्री पदावर असताना, नि:पक्ष चौकशी होऊ शकणार नाही, त्यामुळे दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेऊनच चौकशी करावी, असं मुंडे म्हणाले. भ्रष्टाचारी मंत्री आणि सरकार विरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. **** राज्यात न्यायालयांच्या इमारतींमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. एकत्र कुटुंब पध्दतीचे प्रमाण कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत, बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक वादाचं प्रमाण वाढत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. **** पुढील वर्षापासून नव्या हज धोरणानुसार हज यात्रेचे आयोजन केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. ते काल मुंबईत हज यात्रेच्या आढावा बैठकीला संबोधित करत होते. नवीन हज धोरण २०१८ ची घोषणा चालू महिन्यातच केली जाणार असून हज यात्रेची संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक बनवणं, हा या धोरणाचा उद्देश्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या धोरणात हज यात्रेकरूंना सागरी मार्गाने पाठवण्याचा पर्याय समाविष्ट आहे. यामुळे हजयात्रेचा खर्च निम्म्याने कमी होईल असं सांगून हे धोरण आखण्यासाठी स्थापन, उच्चस्तरीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी नमूद केलं. **** शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं दिला आहे. मुंबईत काल सुकाणू समिती सदस्य आमदार बच्चू कडू, अजित नवले, रघुनाथदादा पाटील यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. सरकारनं जाहीर केलेल्या निकषांसह कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. समितीच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार न केल्यानं राज्यव्यापी आंदोलन केल जात असल्याचं, यावेळी स्पष्ट करण्यात आलं. या आंदोलनाचा भाग म्हणून, उद्या १४ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा तर परवा १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा इशारा सुकाणू समितीनं दिला आहे. **** मराठवाड्याच्या जल विकासासाठी पाण्याचा योग्य वापर आणि जल व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन जलतज्ञ प्राध्यापक प्रदीप पुरंदरे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं काल स्वामी रामानंद तीर्थ संस्थेतर्फे आयोजित व्याख्यानात गोदावरी खोरे जल आराखडा आणि मराठवाडा या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. सिंचन क्षेत्रात अधुनिक तंत्रज्ञानासह प्रकल्��ांचं जल व्यवस्थापन- कारभार- नियमन महत्वाचं असून मराठवाड्यातील पाण्यासाठी नगर-नाशिक कडून भांडून पाणी मिळवणं हा एकच पर्याय नाही असही ते म्हणाले. पाटबंधारे विकास मंडळ हा जल विकासातला अडसर असल्याचं सांगून यासाठी स्वायत्त जलसंपत्ती नियामक मंडळाची गरज असल्याचं पुरंदरे यांनी नमूद केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** येत्या दोन वर्षात जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला विजेचा शाश्वत पुरवठा करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं, राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काल जालना इथं पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत प्रस्तावित ३३ किलोव्हॅट क्षमतेच्या केंद्राचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वांसाठी वीज या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी १२४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वीज देयकांची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या थकबाकीपैकी दंड तसंच व्याज वगळून, मूळ रकमेचा भरणा करण्याचं आवाहनही ऊर्जा मंत्र्यांनी केलं. **** लातूर इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एस.एस शेटकार यांच्या विरूद्ध पन्नास हजार रुपये लाच मागितल्याप्रक्रणी गुन्हा दाखल झाला आहे. लातूर परिवहन कार्यालयातल्या एका निरीक्षकाच्या विरोधात आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी शेटकार यांनी ही लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं औसा रोडवर एका मोटार ड्रायव्हिंग केंद्रात शेटकार यांच्यासह त्यांच्या साथीदाराला लाच स्वीकारताना काल रंगेहाथ पकडलं. मात्र शेटकार फरार झाले. प्रत्यक्ष लाच घेणारा छोटू गडकरी याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ���ुळजापूरच्या मंडळ अधिकारी कार्यालयातला लेखनिक नारायण देडे याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. जातीच्या दाखल्यांसाठीच्या चौकशी अहवालावर मंडळ अधिकाऱ्याची सही घेऊन देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी देडे यानं केली होती. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारताच्या सहा बाद ३२९ धावा झाल्या. शिखर धवननं ११९, लोकेश राहुलनं ८५, कर्णधार विराट कोहलीनं ४२ तर रविचंद्रन अश्विन ३१ धावा केल्या. कालच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा रिद्धिमान सहा तेरा तर हार्दिक पांड्या एका धावेवर खेळत होते. या सामन्याचं धावतं वर्णन सकाळी साडे नऊवाजेपासून आकाशवाणीवरून ऐकता येणार आहे. **** माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त उद्या सोमवारी लातूर इथल्या १५० ह��न अधिक रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबीरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहेत. गरजूंनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात काल झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार तर सहा जण जखमी झाले. खुलताबादहून भद्रा मारोतीचं दर्शन घेऊन दुचाकीवर परत येत असतांना पडेगाव इथल्या छावणी परिषदेच्या टोल नाक्याजवळ एका लष्करी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्याण एका महिलेचा मृत्यु झाला तर त्या महिलेचा पती आणि तीन वर्षांची मुलगी जखमी झाली. दुसरा अपघातही खुलताबादहून भद्रा मारूतीचं दर्शन घेऊन जाणाऱ्या दुचाकीला पाथ्री गावाजवळ झाला. यात दुचाकीवरच्या एका तरूणाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. फुलंब्रीजवळ भालगाव फाटा इथ टेंपो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्य झाला. मुंबई - नागपूर एक्सप्रेसवेवर आसेगाव शिवारात भरधाव वेगानं जाणाऱ्या कंटेनरनं एका मोटारीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात मोटारतल्या एक जणाचा मृत्यु झाला.तर तीन जण जखमी झाले. **** बीड जिल्ह्यातल्या प्रलंबित विकास कामांसाठी शासनस्तरावरुन प्रयत्न करत असल्याचं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पाटोदा तालुक्यात सावरगाव - घाट या राष्ट्र संत भगवानबाबा यांच्या जन्मस्थळी आयोजित भगवानबाबा जन्मोत्सव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. या गावाचा समावेश तीर्थ क्षेत्र विकासामध्ये झाल्याचं सांगून गावासह भगवानबाबा यांचा जन्म झालेल्या वाड्याचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 12 August 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ ऑगस्ट २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूरच्या बी आर डी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ६० मुलांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिध्दार्थनाथ सिंह गोरखपूरमध्ये पोहचले आहेत. याप्रकरणी जे कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरच्या तुटवड्याबाबत राज्य सरकारला ९ जुलै रोजी किंवा ९ ऑगस्ट रोजी कळवण्यात आलं नसल्याचं राज्य सरकारनं पुनरुच्चार केला आहे. **** पाकिस्ताननं शस्रसंधीचे पुन्हा एकदा उल्लंघन करत जम्मू काश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यातल्या मेंधर भागात सीमेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. या गोळीबारीमध्ये पाकिस्ताननं फेकलेल्या बॉम्बगोळ्याच्या स्फोटात एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं कोणत्याही चिथावणीशिवाय पहाटे पाचच्या सुमारास भारतीय तळांवर आणि नागरी भागात अचानक गोळीबार करण्यास सुरूवात केल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. भारतीय सैन्यानं या गोळीबारीला चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. **** संयुक्त जनता दल पक्षानं आज शरद यादव यांना पक्षविरोधात कारवाया करण्याच्या कारणावरून राज्यसभेच्या पक्षनेते पदावरून हटवले आहे. त्यांच्या ऐवजी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आर सी पी सिंह यांची निवड केली आहे. पक्षानं यासंदर्भात राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. यापूर्वी पक्षानं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित न राहण्यासाठी राज्यसभेचे खासदार अली अन्वर अन्सारी यांना संसदीय पक्षातून निलंबित केलं होतं. **** भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामिल होण्याचे आमंत्रण दिलं आहे. शाह यांनी केलेल्या ट्वीटमध्ये आपण कुमार यांची भेट घेऊन त्यांना रालोआमध्ये सामील होण्याचं आमंत्रण दिलं असल्याचं म्हटलं आहे. भाजपनं दिलेल्या प्रस्तावावर संयुक्त जनता दलाच्या पाटण्यामध्ये होणाऱ्या त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. **** राज्याबाहेरुन आणलेलं किंवा राज्यात प्राण्यांचं मांस बागळण्यास गुन्हेगारी कृत्य ठरवणारं कलम मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी मे महिन्यात असंवैधानिक ठरवलं होतं. या निर्णयास राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. यावर न्यायालयानं म्हणणं मागवले आहे. मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा, १९९५ मधील दोन कलमं रद्द ठरवली होती. हे कलम म्हणजे व्यक्तीच्या खासगी हक्कामध्ये हस्तक्षेप करतं असं कारण देत, उच्च न्यायालयानं हे कलम घटनाबाह्य ठरवलं होतं. **** वस्तू आणि सेवा कर - जीएसटीमुळे उत्पादन आणि सेवेच्या गुणवत्तेवर आधारित स्पर्धा वाढेल तसंच समाजातल्या विविध घटकांच्या सहभागामुळे लघु उद्योग क्षेत्राचाही विकास होईल, असं केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत लघु उद्योग भारतीतर्फे आयोजित लघु उद्योजकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात बोलत होते. स्वत:चं भांडवल न वापरता बँकांकडून पैसे घेऊन उद्योग उभारण्याची मानसिकता यापूर्वी देशात रुजली होती, त्यामुळ���च आज बँका डबघाईला आल्याचं ते म्हणाले. **** नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक लोकहिताचे निर्णय मार्गी लावण्यात यश आल्यानं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. शेतकरी कर्जमाफी आणि मराठा समाजाच्या विकासासाठी विविध उपापयोजना अशा महत्त्वपूर्ण निर्णयांसह दोन्ही सभागृहात एकूण २० विधेयकं मंजूर करण्यात आली असून, विधानसभेत एक आणि विधानपरिषदेत पाच विधेयके विचारार्थ प्रलंबित आहेत. तसंच या अधिवेशनात १९४२ च्या चले जाव चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबाबतही ठराव मांडण्यात आला. **** राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना ‘यू-डायस’ क्रमांक असणं बंधनकारक केलं आहे. ज्या शाळांकडे अद्याप असा क्रमांक नाही, त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत तो ऑनलाइन काढून घ्यावा, ज्या शाळा हा क्रमांक घेणार नाहीत, त्यांची मान्यता काढून घेतली जाईल, असा इशारा राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात दिला आहे. ‘यू-डायस’च्या माध्यमातून राज्यातल्या सर्व शाळांची सर्व प्रकारची माहिती संकलित केली जाते. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आज ��हिल्या दिवसाचा खेळ संपला असून, दिवसअखेर भारताच्या सहा बाद ३२९ धावा झाल्या. शिखर धवननं ११९, लोकेश राहुलनं ८५, विराट कोहलीनं ४२ तर रविचंद्रन अश्विन ३१ धावा केल्या. श्रीलंकेकडून मलिंडा पुष्पकुमारानं तीन तर लक्षण संदकणनं दोन बळी घेतले. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० म
**** ** राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांना पदावरुन हटवण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा; गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी करण्याचं आश्वासन ** राज्यभरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त ** औरंगाबाद शहरातली अनधिकृत धार्मिक स्थळांची आणखीन १० अतिक्रमणं काढली आणि ** श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या ३ बाद ३४४ धावा **** राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांना वादग्रस्त ध्वनिफितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरुन हटवल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. हिंदू या वृत्तपत्रात, पंतप्रधान कार्यालयानं मोपलवार यांच्यावर आक्षेप घेतल्याचं वृत्त आलं होतं, त्यावर शासनानं काय कारवाई केली, असा सवाल कॉंग्रेसचे नेत�� पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहाबाहेर वार्ताहरांशी बोलताना उपस्थित केला. मोपलवारांना फक्त पदावरुन हटवल्यानं विरोधकांचं समाधान झालं नाही. गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी लावून धरलेली मागणी आणि लातूरमधल्या महिला तस्करीचा सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा यांचे तीव्र पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल उमटले. यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारीच दिवसभरासाठी तहकूब झालं. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल दुपारी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावून सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कार मुद्यावर तोडगा काढला, त्यानंतर कामकाज सुरु झालं. सर्व सदस्यांनी सहकार्य करुन विधान परिषदेची परंपरा कायम राखावी असं आवाहन सभापतींनी केलं. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानं सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब झालं होतं. मेहता यांची चौकशी करणार असं जाहीर करुनही विरोधक राजीनाम्याची मागणी करत आहेत, ही मागणी राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातल्या लातूरसह १४ जिल्ह्यात लहान मुलींची तस्करी सुरू असून, सरकारचं लक्ष कुठे आहे, असा सवाल लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. लातूरमधल्या महिला तस्करी प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकारी अडकल्याचा मुद्दा सत्ताधारी पक्षांनी उपस्थित केला. यावर याप्रकरणी चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. कर्जमुक्ती आंदोलनात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे सरकारनं तात्काळ रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी केली. शिवसेनेचे सर्व आमदार यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** मुंबईसह राज्यभरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातल्या जनतेला चांगले रस्ते देणं हे तुमचं कर्तव्य असूनही तुम्ही ते पार पाडत नाहीत ही लाजीरवाणी बाब आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागतोय आणखी किती बळी हवेत, असा संतप्त सवाल करत मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांनी काल राज्य सरकार आणि महा नगरपालिकांना धारेवर धरलं. स्थानिक प्रशासन खड्ड्यांची दखल घेत नसेल तर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवांकडे आपल्या तक्रारी पोहोचवाव्यात अशी सूचनाही न्यायालयानं केली. **** पॅरालिम्पिक खेळांमधे सुवर्ण पदक पटकावलेला देवेंद्र झांझरीया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांची क्रिडा क्षेत्रातल्या सर्वोच्च राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासा��ी निवड समितीनं शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी १७ खेळाडूंची शिफारस केली आहे. यात क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रित कौर, पॅरालिम्पिक पदक विजेता मरीयप्पन थंगवेलू आणि वरुण भाटी, गोल्फपटू एसएसपी चौरसिया आणि हॉकीपटू एस व्ही सुनिल यांच्या नावाचा समावेश आहे. यावर अंतिम निर्णय क्रिडा मंत्रालय घेणार आहे. **** नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सातत्यानं वाढत असून, आज दोन हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. येवला इथल्या बाजार समितीत कांद्याला एक हजार ९०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला, तर लासलगाव इथं एक हजार ८७५ रुपये भाव मिळाला. राज्यात हा सर्वाधिक भाव असल्याचा दावा बाजार समितीचे सभापत��� अरुण वाघ यांनी केला आहे. बुधवारी बाजारात सुमारे सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. **** बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या घोटाळा प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावी आणि दोषींवर कारवाई करून त्यांच्या मालमत्तांवर बोजा टाकून वसुली करावी असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. १४५ कोटींच्या या अपहार प्रकरणात बँकेचे तत्कालीन संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि काही शेतकरी असे तब्बल ५४५ लोक अडकलेले असून १३१ गुन्हे दाखल झाले आहेत. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत काल महानरपालिकेनं आणखीन १० अतिक्रमणं काढली. दरम्यान या कारवाईला आक्षेप घेत वक्फ मंडळानं दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी काल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली. अतिक्रमण हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं २००८ मध्ये दिला असतांना आतापर्यंत दाद का मागण्यात आली नाही, असा सवाल न्यायालयानं सुनावणी दरम्यान विचारला. शिवाय वक्फ मंडळाचे अधिकारी शासकीय कर्मचारी असताना खाजगी मालकीच्या धार्मिक स्थळांविषयी वक्फ मंडळ कशी काय दाद मागू शकते असा सवालही न्यायालयानं केला. याचिका मागे घेण्याबाबत विचारले असता वक्फ मंडळानं न्यायालयाकडे एक दिवसाचा कालावधी मागून घेतला आहे. दरम्यान, बेकायदेशिर धार्मिक स्थळं काढून टाकण्याच्या महानगरपालिकेच्या मोहिमेची गंभीर दखल घेण्याची मागणी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन केली. यामुळे औरंगाबाद शहरात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत महाधिवक्ता यांना या न्यायालयीन प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली. **** लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातल्या २६२ बोगस तुकड्या वाटप प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले. या प्रकरणी गेल्या १३ डिसेंबर रोजी जनहित याचिका दाखल करण्यात झाली आहे. **** बीड जिल्ह्यातल्या कुंभारी इथं राजकीय वैमनस्यातून एक जणाच्या झालेल्या हत्या प्रकरणी ९ जणांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गावातल्या १४ जणांनी विरोधी गटातल्या तिघा जणांना केलेल्या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला होता. **** चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकांच्या जोरावर भारतानं श्रीलंकेविरुध्द दुसऱ्या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर तीन बाद ३४४ अशी भक्कम धावसंख्या उभारली. पुजारा १२८ धावांवर तर अजिंक्य रहाणे १०३ धावांवर खेळत असून, दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद २११ धावांची भागीदारी केली आहे. लोकेश राहुलनं ५७ धावा केल्या. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग नजीक चारचाकी वाहन अडवून लुटणारा पोलीस उपनिरीक्षक अनिल किरवाडे आणि त्याचे साथीदार पोलीस हवालदार मनोज भिसे, शिपाई नरसिंग दिघोळे आणि राजू चव्हाण यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं असल्याचं पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 March 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २८ मार्च २०१७ दुपारी १.००वा. ***** भारतानं बॉर्डर गावसकर चषक जिंकला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं झालेला अखेरचा सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. सामन्याच्या आज चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज लोकेश राहुल आणि मुरली विजयनं कालच्या बिनबाद १९ धावसंख्येवरून पुढे खेळ सुरू केला. मुरली विजय आठ धावांवर तर चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. मात्र विराट कोहलीच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य राहणेच्या साथीनं लोकेश राहुलनं अर्धशतक झळकावत, भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतानं ही मालिकाही दोन एक अशा फरकानं जिंकली. भारताचा हा सलग सातवा कसोटी मालिका विजय आहे. या मालिकेत फलंदाजी तसंच गोलंदाजीत उत्तम कामगिरी करणारा रवींद्र जडेजा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. उमेश यादव, स्टीव्ह स्मिथ यांना प्रायोजकांचा विशेष खेळाडू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार आणि एक दशलक्ष डॉलर्सचा धनादेश प्रदान करण्यात आला. **** अल्पसंख्याक आयोगासह अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागास प्रवर्ग आयोगातल्या रिक्त जागांच्या मुद्यावरून राज्यसभेचं कामकाज आजही दुपारी साडे बारा वाजेपर्यंत तीन वेळा आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. लोकसभेत अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देशवासियांना आज गुढीपाडवा, उगादी, चेटीचंडसह नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. दिव्यांगांसाठी सार्वभौम ओळखपत्र तयार करणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. दिव्यांगांसाठीच्या सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी देशभरात हे ओळखपत्र स्वीकार्य असेल, असं त्यांनी सांगितलं. देशभरात अर्धसैनिक दलातल्या सैनिकांना अत्याधुनिक उपकरणं देण्यात येत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. ते लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. **** जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात आज सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या भागात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून सुरक्षा जवानांनी इथं शोधमोहीम सुरू केली, त्यादरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला, त्याला सुरक्षा जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या परिसरात सुरक्षा जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याच्या कारवाईत एक जण मारला गेला. **** पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशा��ेत काल रात्री लागलेल्या आगीत रासायनिक प्रयोग शाळेची दहा हजार चौरस फुट क्षेत्रफळावर उभी इमारत जळून खाक झाली. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. **** शिर्डीच्या साईमंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चालण्यातून वीज निर्मिती केली जाणार आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली. या फ्लोअर तसंच सौर प्रकल्पाच्या माध्यमातून दहा मेगावॅट वीज निर्मिती होणार असल्याचं, हावरे यांनी सांगितलं. मंदिरात वाहिलेल्या गुलाब फुलांपासून बचत गटांच्या माध्यमातून अगरबत्ती बनवली जाणार असल्याची माहिती हावरे यांनी दिली. मंदिरात रोखरहित व्यवहारांसाठी साई वॉलेट योजना सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. **** ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांवर महाराष्ट्र चालत असून मानवता धर्म जिवंत ठेवण्याचं काम वारकरी संप्रदायानं केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आळंदी इथल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेसाठी राज्य शासनाच्यावतीनं एक कोटी रुपयांची देणगी त्यांनी जाहीर केली. ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यावेळी उपस्थित होते. या संस्थेत मिळणारं, विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालणारं दर्जेदार शिक्षण समाजासाठी उपयुक्त असल्याचं हजारे यांनी नमूद केलं. **** राज्य शासनाचं सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने २०१५-२०१६ साठीचे विविध साहित्य पुरस्कार काल मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. लातूर इथले डॉ. अंबादास देशमुख यांना गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. **** लातूर इथं हिंदू नववर्षाचं विविध सामाजिक संस्था, मंडळांनी मिरवणुका काढुन जल्लोषात स्वागत केलं. शहरातल्या दक्षिणेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात मराठी संस्कृतीचं दर्शन घडविणाऱ्या मंगलध्वज परिक्रमेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैद्यनाथ मंदिरापासुनही शोभा यात्रा काढण्यात आली. //*******//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 March 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि. **** • सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्नांमुळेच, नव भारताच्या निर्मितीचा पाया घातला जाणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी • डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं राज्यपालांचं आवाहन • वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योग तसंच व्यापारी जगतानं तयार राहण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन आणि • ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावात ६ बाद २४८ धावा **** सर्व देशवासियांची बदल घडवण्याची इच्छा आणि प्रयत्न, यामुळेच न्यू इंडिया - नव भारताचा, पाया घातला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरील मन की बात या या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधताना काल ते बोलत होते. वैयक्तिक आयुष्यातून बाजूला होऊन समाजाकडे संवेदनशील नजरेनं बघायला हवं असं ते म्हणाले. डिजि��ल पेमेंट, डिजिटल आंदोलनात, नागरिक, मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. डिजिटलायजेशनसाठीच्या भीम ॲपचा जास्तीत जास्त प्रचार आणि वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं. येत्या एक वर्षात अडीच हजार कोटी डिजिटल देवाण घेवाण व्यवहार करण्याचा संकल्प करावा, शाळेची फी, रेल्वे प्रवास, विमानप्रवास, औषध खरेदी अशा दैनंदिन व्यवहारात नागरिकांनी अंकेक्षित प्रणालीचा वापर करावा असं पंतप्रधान म्हणाले. येत्या १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी डिजिटल मेळाव्यांची सांगता होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचा विषय ‘नैराश्य’ आहे, हा असाध्य विकार नसून, मिळून मिसळून राहिल्यामुळे, मनातल्या भावना व्यक्त केल्यामुळे या आजारावर मात करता येऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले. **** डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. पद्मविभूषण डॉ. नागेश्वर रेड्डी यांना राज्यपालांच्या हस्ते धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेनं केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं. या आंदोलनामुळे रूग्ण आणि डॉक्टरांचे संबंध हा चर्चेचा विषय झाला असून रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातलं नातं हे त्यांच्यातल्या संवादावर आणि डॉक्टरांच्या उपचारांवर अवलंबून असतं असं राज्यपाल म्हणाले. डॉक्टरांनी रुग्णांच्या प्रती संवेदनशीलता आणि ममत्व दाखविणं तसंच रुग्णांनीही डॉक्टरांविषयी विश्वास दाखविणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. **** येत्या १ जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी होणार असून, या कर प्रणालीच्या अनुषंगाने राज्यातल्या उद्योग – व्यापारी जगतानं तयारी करावी, असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल मुंबई इथं केलं. या कराच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या विविध उद्योग- व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी जेटली यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. येत्या आठवड्यात या कराच्या प्रारूप मसूद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल, असं जेटली यांनी सांगितलं. **** दुर्गम भागातल्या लोकांना विविध सरकारी योजनांसह ऑनलाईन सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वे विभाग पाचशे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ‘रेलवायर साथी’ नावाच्या या उपक्रमांतर्गत अंमलात येणाऱ्या या सुविधेमुळे ऑनलाईन बँक व्यवहार, विमा योजना, रेल्वे आणि बससाठी तिकीट सुविधा तसंच मुक्त विद्यापीठांसह अन्य सेवा उपलब्ध होतील. **** निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी करणाऱ्या टोटलायजर यंत्राचा व��प�� करण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. या यंत्रामुळे मतं एकत्रित करुन मोजली जात असल्यानं, कोणत्या गावातून किती मतं मिळाली याची माहिती मिळणार नाही. त्यामुळे सर्व गावांचा विकास होण्यास मदत होईल, असं हजारे म्हटलं आहे. **** धुळे जिल्ह्यात काल झालेल्या दोन दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला. सुरत - नागपूर महामार्गावर मुकटी नावाच्या गावाजवळ काल सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या ट्रक आणि सुमोमध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले. महामार्गावरच्या एका नदीवरच्या पूलावर पडलेल्या खड्ड्यातून ट्रक काढताना तो सुमोवर आदळल्यानं हा अपघात घडला. दोन्ही वाहने ५० फूट खोल पूलाखाली कोसळली. सुमोमध्ये ११ जण होते, ते सर्वजण पारोळ्याला नातेवाईकांकडे जात असताना हा अपघात झाला. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. दुसऱ्या एका घटनेत धुळे शहरातल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या पाचकंदिल परिसरात परवा मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. या आगीवर एका खतासानंतर नियंत्रण मिळवण्यात मनपा पथकाला यश आले. तोपर्यंत घरात अडकलेल्या पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** सध्याच्या लोकशाहीत सरकार, पोलीस आणि न्याययंत्रणा यांचं एकमत झाल्यामुळे आता न्यायालयात फक्त निकाल लागतो न्याय मिळत नाही, असं मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. अमन समिती आणि बापू -सुधा काळदाते प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या ‘भारतीय राज्यघटनेसमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. राजकारणात घराणेशाही सुरू असून सामान्यांना कोणतेच स्वातंत्र्य मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात सर्व नैसर्गिक संपत्ती ही मूठभर लोकांच्या हातात जाईल, असं भाकितही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. **** औरंगाबादख्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडू नयेत, यासाठी ३० पोलिसांचं कायमस्वरूपी संरक्षण देण्यात आलं आहे. रूग्णालय प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची काल बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला, तसंच रुग्णालयात कुठे पोलीस यंत्रणा तैनात करावयाची याचा निर्णय घेण्यात आला. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदुर्ग किल्ल्याचं ऐतिहासिक तसंच पर्यटन वैभव टिकवण्यासाठी युनीटी मल्टीकॉ�� या कंपनीकडे १० वर्षांसाठी किल्ल्याच्या देखभालीचं काम सोपवलं आहे. महाराष्ट्र वैभव संगोपन योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हा किल्ला आता निश्चितच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनेल, असा विश्वास पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अजित खंदारे यांनी व्यक्त केला आहे. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाला इथं सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात सहा बाद २४८ धावा केल्या. लोकेश राहुलनं ६०, चेतेश्वर पुजारानं ५७ तर रविचंद्रन अश्विननं ३० धावा केल्या. रवींद्र जडेजा १६ आणि वृद्धीमान साहा १० धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ ५२ धावांनी आघाडीवर आहे. रांची इथं झालेला तिसरा सामना अनिर्णित राहील्यानं, चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत. **** लातूर महानगर पालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी मेळावे, संभाव्य उमेदवाराच्या मुलाखतीसह निवडणूक कामांना चांगलाच वेग दिला आला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या आज आणि उद्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत एक मेळावाही घेण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातल्या आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी मुंबईत घेणार असल्याचं पक्षाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भाजपाने महिला मेळावे घेऊन एका अर्थानं प्रचारास प्रारंभ केला आहे. त्याचबरोबर पक्ष संघटनेतल्या रचने प्रमाणे मंडळनिहाय कार्यकर्ते आणि इच्छुकांचे मेळावे घेतले जात आहेत. अपक्षांची शहर विकास आघाडी करण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, मराठवाडा जनता पक्षाचे प्रा. संग्राम मोरे यांनी सुरु केला आहे. //******//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 26 March 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २६ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि. **** प्रत्येक नागरिकानं वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचा, आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा, आठवड्यातून एक दिवस पेट्रोल-डिझेल न वापरण्याचा संकल्प केला, तर लहान वाटणाऱ्या अशा गोष्टींमधूनच नव्या भारताचं स्वप्न पूर्ण होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या मालिकेच्या ३०व्या भागात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. डिजिटल पेमेंट, डिजिधन आंदोलन यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत आणि हळू हळू रोख-विरहित व्यवहारांकडे वळत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. आतापर्यंत सुमारे दीड कोटी लोकांनी ‘भीम ॲप’ डाउनलोड केलं आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आपल्याला पुढे न्यायची असून या एका वर्षात अडीच हजार कोटी डिजिटल देवाण-घेवाण व्यवहार करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपण शाळेची फी, रेल्वे प्रवास, विमान प्रवास, औषधं खरेदी अशा दैनंदिन व्यवहारात अंकेक्षित प्रणाली वापर करावा असं ते म्हणाले. येत्या १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या दिवशी डिजिधन मेळाव्यांची सांगता होईल असं त्यांनी सांगितलं. महात्मा गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहाचं हे शताब्दी वर्ष आहे. शंभर वर्षांपूर्वी १० एप्रिल १९१७ रोजी, महात्मा गांधीज���ंनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात, ग़ांधी विचार, गांधी शैली यांचं प्रकट रूप या सत्याग्रहाच्या रुपात पहायला मिळालं, असं ते म्हणाले. चंपारण्य सत्याग्रह म्हणजे अशी घटना होती ज्यात महात्मा गांधीजींचं संघटन कौशल्य, भारतीय समाजाची नाडी ओळखण्याची शक्ती, ब्रिटीश राजवटीविरुद्ध गरीबातल्या गरीब, अशिक्षित व्यक्तीला संघर्ष करण्यासाठी संघटित करणं, प्रेरित करणं, लढण्यासाठी मैदानात आणणं, या सगळ्या अद्भूत गुणांचं दर्शन घडतं असं पंतप्रधान म्हणाले. भारतातल्या सामान्य माणसाच्या अपार शक्तीला स्वातंत्र्य आंदोलनाप्रमाणे स्वराज्याकडून सुराज्याकडे या प्रवासासाठी वापरताना, सव्वाशे कोटी देशवासियांच्या संकल्पाची शक्ती, परिश्रमाची पराकाष्ठा, सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय हा मूलमंत्र घेऊन, देशासाठी, समाजासाठी, काहीतरी करून दाखवण्याचा निरंतर प्रयत्नच, स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या महापुरुषांच्या स्वप्नांना साकार करेल असं पंतप्रधान म्हणाले. सव्वाशे कोटी देशवसियांची बदल घडवण्याची इच्छा, प्रयत्न, यामुळेच नव्या भारताचा, न्यू इंडीयाचा, पाया घातला जाणार आहे असं त्यांनी नमूद केलं. न्यू इंडीया हा सरकारी कार्यक्रम किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा जाहीरनामा नसून सव्वाशे कोटी देशवासियांना केलेलं आवाहन आहे असं त्यांनी सांगितलं. लक्षावधी लोक निस्वार्थ भावनेनं, त्यांच्या व्यक्तिगत जबाबदाऱ्यांच्या पलिकडे जाऊन, समाजासाठी, शोषितांसाठी, पिडीतांसाठी, गरीबांसाठी काही-ना-काही करताना दिसतात. एखाद्या मूक सेवकाप्रमाणं जणू तपस्या करावी, साधना करावी, त्याप्रमाणे काम करतात. रुग्णांची सेवा करतात, रक्तदानासाठी धावून जातात, भुकेल्या लोकांच्या पोटाची चिंता करतात अशा लोकांमुळे आपला देश बहुरत्ना वसुंधरा आहे असं गौरदवोद्गार त्यांनी काढले. सव्वाशे कोटी देशवासीयांनी जर संकल्प केला, त्यासाठी मार्ग तयार केला आणि एका मागून एक पावलं उचलली, तर न्यू इण्डीया हे सव्व्वाशे कोटी देशवासियांचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर साकार होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले. **** दुर्गम भागातल्या लोकांना विविध सरकारी योजनांसह ऑनलाईन सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी रेल्वे विभाग पाचशे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ‘रेलवायर साथी’ नावाच्या या उपक्रमांतर्गत अंमलात येणाऱ्या या सुविधेमुळे ऑनलाईन बँक व्यवहार, विमा योजना, रेल्वे आणि बससाठी तिकीट सुविधा तसंच मुक्त विद्यापीठांसह अन्य सेवा उपलब्ध होतील. **** सर्व मोबाईल फोन धारकांना लवकरच आधार कार्डनुसार ओळख पडताळणी करावी लागणार आहे, सर्व ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश सरकारनं दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. देशात सध्या सुमारे १०० कोटी हून अधिक मोबाईल फोन धारक आहेत. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान धर्मशाला इथं सुरु असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात सहा बाद २४८ धावा झाल्या. लोकेश राहुलनं ६०, चेतेश्वर पुजारानं ५७ तर रविचंद्रन अश्विननं ३० धावा केल्या. रवींद्र जडेजा १६ आणि वृद्धीमान साहा १० धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा संघ ५२ धावांवर आघाडीवर आहे. रांची इथं झालेला तिसरा सामना अनिर्णित राहील्यानं, चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत. //****//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 19 March 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ मार्च २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशचे २१वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल राम नाईक यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आणखी २२ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. **** दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकार येत्या आठवडाभरात राष्ट्रीय वयोश्री योजना सुरु करणार आहे. आर्थिक दुर्बल गटातल्या वृध्दांना सामान्य आणि सक्रीय जीवन जगता यावं यासाठी त्यांना या योजनेअंतर्गत मदत केली जाणार आहे. त्या अनुषंगानं गरजु वृध्दांना चाकाची खुर्ची, चष्मे, श्रवणयंत्र, दातांची कवळी, कुबड्या आदी साधनं पुरवली जातील. ६० वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. **** देशातल्या न्यायालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या तीन कोटींहून अधिक खटल्यांपैकी सुमारे ४६ टक्के खटल्यांमध्ये सरकार एक पक्ष म्हणून अंतर्भूत असते. न्यायालयांचा मोठा वेळ अशी प्रकरणं निकाली काढण्यात जातो. त्यामुळे अशा प्रत्येक खटल्यात सरकारनं अपरिहार्य पक्ष होऊ नये अशी सूचना केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी विविध केंद्रीय मंत्रालयांना आणि राज्य सरकारांना केली ��हे. सरकारी अधिकाऱ्यांनी असे क्षुल्लक आणि त्रासदायक खटले शोधून ते लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत असं त्यांनी म्हटलं आहे. **** घटस्फोटाच्या खटल्यात अज्ञान बालकांच्या खर्चासाठी मिळालेली रक्कम एकल पालकाच्या खात्यात जमा केल्यास त्यावर आयकर सूट द्यावी अशी शिफारस विधी आयोगानं केली आहे. अशा ठेवींवरील व्याज सध्या पालकांच्या उत्पन्नात धरले जाते, ज्यावर आयकर लागू शकतो. **** प्रस्तावित वस्तू आणि सेवा करासंदर्भात दागिने आणि जडजवाहिर उद्योगाच्या समस्यांबाबत केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. या क्षेत्रातल्या पुरस्कार सोहळ्यात ते मुंबई इथं बोलत होते. हा उद्योग देशाला परकीय चलन मिळवून देतो आणि रोजगाराच्या संधीही निर्माण करतो असं सांगत त्यांच्या समस्यांची आपल्याला जाणीव असल्याचं ते म्हणाले. आपण व्यवसाय उद्योग सुलभीकरण प्रक्रिया राबवत असल्यानं यासंदर्भात उपाय शोधण्याचे प्रयत्न करू असं ते पुढे म्हणाले. आपला देश दागिने आणि जडजवाहिर निर्यातीत जगात सहाव्या क्रमांकावर असून या उद्योगासंदर्भात विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचं ते म्हणाले. **** नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार मदत करणार असल्याची ग्वाही लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या गारपीटग्रस्त येलोरी, मासुर्डी गावांना पालकमंत्री निलंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान पीक विमा योजनेत ज्यांनी विमा हप्ता भरला आहे त्यांना आणि ज्यांनी भरला नाही त्यांनाही मदत दिली जाणार असल्याचं सांगत दानवे यांनी, सरकार शेतकरी कर्ज माफीच्या विरोधात नसल्याचं स्पष्ट केलं. शेतीत शाश्वत गुंतवणूक झाल्याशिवाय शेतकरी कर्जमुक्त होणार नसल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रांची इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिला डाव नऊ बाद ६०३ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारानं २०२, वृद्धीमान सहानं ११७, मुरली विजयनं ८२, लोकेश राहुलनं ६७ तर रविंद्र जडेजानं ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला असून, दिवस अखेर त्यांच्या दोन बाद २३ धावा झाल्या. रविंद्र जडेजानं दोन बळी घेतले. भारत १२९ धावांनी आघाडीवर आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक-एकनं बरोबरीत आहेत. **** नाशिक इथं आज जलजागृती सप्ताहांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीनं ‘जल दौड’ काढण्यात आली. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक म���ठ्या संख्येनं उपस्थित होते. **** उस्मानाबादमधल्या हनुमाननगर भागात वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या दोघांनी काल रात्री महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. त्यांनी आपल्या वाहनानं अधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक दिल्याचं एका अधिकाऱ्यानं सांगितलं. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सुमारे २० लाख रुपये किमतीची वाळू जप्त केली आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 March 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ मार्च २०१७ दुपारी १.००वा. *****
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु होण्याआधी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. तूरडाळ आणि कांद्याला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी, हे आंदोलन करण्यात आलं. यात खासदार राजु शेट्टींसह, अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. **** विधानसभेत आज सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस विधानसभा अध्यक्षांना ��ेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. विधानपरीषदेत आज पुन्हा विधानपरीषद सदस्य प्रशांत परिचारक, यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली. परिचारक यांचं सदस्यत्व रद्द होईपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा, मुंडे यांनी दिला. **** राष्ट्रीय एकात्मतेसाठी देशभरात एका राष्ट्रभाषेची गरज असून, स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षानंतर आपल्या देशात एक राष्ट्रभाषा नसल्याची खंत, प्रसिद्ध तत्त्ववेत्ते डॉ. शंकर अभ्यंकर यांनी व्यक्त केली. पुणे इथं टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित, दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते आज बोलत होते. स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा यांचं महत्व त्यांनी यावेळी विशद केलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच, या लोकमान्य टिळकांच्या प्रसिद्ध विधानाला शंभर वर्ष पुर्ण झाल्या निमित्त, या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. आज या चर्चासत्राचा समारोप होत आहे. **** बाटलीबंद पाण्याचे दर विविध ठिकाणी वेगवेगळे आकारण्याबद्दल, केंद्र सरकारनं संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. विमानतळ, हॉटेल्स आणि मॉलमध्ये एकाच दरानं पाणी मिळायला हवं, असे निर्देशही, अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहेत. यासंदर्भात ग्राहकांकडून मिळालेल्या तक्रारींची दखल घेत, मंत्रालयानं हे पाऊल उचललं आहे. **** महिलांचं सशक्तीकरण, मुक्ती आणि समानता या तीन गोष्टी राष्ट्रीय विकासात, त्यांची भूमिका स्पष्ट करतात, असं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांना समान अधिकार आणि संधी देण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं ते म्हणाले. सरकार महिलांच्या सबलीकरणासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी यावेळी सांगितलं. **** अमेरिकेत सहा मुस्लिम बहुल देशांच्या नागरिकांना, तीन महिन्यांसाठी, आणि सर्व देशांच्या शरणार्थींना, चार महिन्यांसाठी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. यात इराण, लिबिया, सीरिया, सोमालिया, सुदान आणि यमन या सहा देशांचा समावेश आहे. १६ मार्चपासून हा आदेश लागू होणार आहे. दरम्यान, अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि ��ांग्लादेशची यात्रा न करण्यास सांगितलं आहे. दक्षिण आशियात कार्यरत असणारे दहशतवादी गट अमेरिकी नागरिकांसाठी धोका असल्याचं, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. भारतातही दहशतवादी गट सक्रीय असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. **** यावर्षी योग्य प्रमाणात पाऊस झाल्यानं, २०१६-१७ या वर्षात कांदा निर्यातीनं उच्चांक गाठला आहे. गेल्या नोव्हेंबर पर्यंत २० लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली असून, ती मार्च ते एप्रिलपर्यंत २५ ते ३० लाख मेट्रिक टन इतकी होण्याची शक्यता, व्यापारी वर्गानं व्यक्त केली आहे. या पूर्वी २००९-१० मध्ये १८ लाख मेट्रिक टन इतकी उच्चांकी निर्यात झाली होती. हा उच्चांक यंदा मोडीत निघण्याची शक्यता आहे. **** इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार करणं शक��य नसल्याचं सांगत, राज्य निवडणूक आयोगानं यासंदर्भातला विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे. सर्वोच्च न्यायालयानंही इव्हीएम यंत्रं सुरक्षित असल्याचा निर्वाळा २०१४ मध्ये दिला होता, असं राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूकीत, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला होता. **** भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरु इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होताच भारताचा दुसरा डाव २७४ धावात संपुष्टात आला. चेतेश्वर पुजारानं ९२, अजिंक्य रहाणेनं ५२ तर लोकेश राहुलनं ५१ धावा केल्या. //*******//
0 notes