#दिलं
Explore tagged Tumblr posts
stargazer3700 · 6 months ago
Text
I would feel as if the sky were collapsing if you weren't here. खरंच, माझं आभाळ कोसळलं असतं आणि गम्मत तर ही आहे की कदाचित मीच त्याला कोसळू दिलं असतं.
15 notes · View notes
alkabirislamic · 10 months ago
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
मांस खाणे पाप आहे!
पवित्र कुराण मध्ये लिखित आहे की "खुदा की इबादत पाक दिलं से करणी चाहिए." परंतु मांस खानाऱ्यांचे हृदय कधीच साफ असू शकत नाही.
Tumblr media
25 notes · View notes
chaitanyakulkarni98 · 5 months ago
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
Tumblr media Tumblr media
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
Tumblr media Tumblr media
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (��ीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यास���ोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. व��ील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच ��ता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणा�� हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes · View notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 05 January 2025 Time: 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
दिल्लीसाठी आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. आज पहिल्यांदाच नमो भारत ट्रेन राजधानीत प्रवेश करणार आहे. त्याठिकाणी दिल्ली मेट्रोसह इतर विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमावर दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबाद रेल्वे स्‍थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वेस्‍थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवास केला. या प्रवासात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर कविता सादर केली.
छत्तीसगढमध्ये आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. या गोळीबारामध्ये सुरक्षादलाचा एक जवानही हुतात्मा झाला. सुरक्षा दलांनी मारलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या घटनास्‍थळावरून शस्त्रांस्त्रासह दारूगोळा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. अद्याप गोळीबार आणि शोध मोहिम सुरूच असल्याचं याविषयीच्या वृत्तात म्हटलं आहे.
सर्व मातृभाषांचं जतन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आ��े, असं केंद्रिय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी म्हटलं आहे. आज हैदराबाद इथं जागतिक तेलुगू कॉन्फेडरेशनच्या परिषदेत रेड्डी बोलत होते. तेलगू भाषेचं संगणकीकरण करण्याची गरज असल्याचं मतही रेड्डी यांनी व्यक्त केलं.
चीन इथं पसरलेल्या एचएमपी विषाणूच्या प्रसारावर केंद्र सरकारच्या सर्व माध्यमांद्वारे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने गेल्या काही आठवड्यांपासून चीनमध्ये वाढणाऱ्या श्वसनाच्या आजाराबद्दल वेळेवर माहिती देण्याची विनंती, जागतिक आरोग्य संघटनेला केली आहे. एचएमपी हा विषाणू भारतासह जगभरात पसरत आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संयुक्त देखरेख गटाला आढळून आलं असून, ICMR आणि IDSP च्या सहाय्यानं इन्फ्लूएंझा सारख्या आजारासाठी आणि तीव्र श्वसनाच्या आजारासाठी भारतात आधीच मजबूत पाळत ठेवणारी यंत्रणा आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. राज्यात मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये १०० पेक्षा अधिक जागा जिंकणारा पक्ष हा भाजपच आहे. त्यामुळं राज्यात दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याचे उद्दीष्ठ ठरवलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनीधींसह पदाधिकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागेल, असं प्रतिपादन भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूर इंथ भाजपच्या राज्यातील सदस्य नोंदणी उद्घाटन समारंभात बोलत होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यृ प्रकरणी पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह इतर नागरिक सहभागी झाले आहेत.
परभणी इथंल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निषेध करते, तसच या प्रकरणाची चौकशी विशेष पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी अशी, मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधे जर महायुतीनं योग्य स्थान दिलं नाही तर स्वबळावर लढू, असं देखील आठवले यांनी स्पष्ट केलं.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त कचरामुक्त यात्रा ही मोहीम राबवण्यात येत असून, यात्रेतील स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी ५ वाजता आणि रात्री ११ वाजेदरम्यान यात्रेतील गर्दी कमी झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी प्लास्टिकसह इतर कचरा उचलत आहेत. दरम्यान, यंदाही यात्रेकरुंना फिरत्‍या शौचालयाची सुविधा उप‍लब्‍ध करुन देण्‍यात आली आहे.
मराठवाडा साहित्य परिषद आर्थात मसापच्यावतीनं मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचा आज सायंकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगरातील ना.गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. डॉ. रसाळ यांच्या 'विंदांचे गद्यरूप' या समीक्षाग्रंथास नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. या निमित्तानं हा सन्मान केला जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक डॉ. चंद्रकांत पाटील हे डॉ. रसाळ यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर भाष्य करणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काही विशेष गाड्या सो���ण्याचा निर्णय घेतला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यात भजेपार इथं आज राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते 'भजेपार कबड्डी चषक २०२५' चा उद्घाटन सोहळा पार पडला. या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४४
शुभदाने स्वाधीन केलेल्या पिशवीतून सामान बाहेर काढून ठेवीत मनोरमा म्हणाली, "शुभदा, तूं येशील म्हणून मी चहा करायची थांबले होते! घरी पिऊन आली असलीस तरी माझ्याबरोबर पुन: घेशील ना?" "तुला कंपनी देण्यासाठी घेईन अर्धा कप;--पण तोपर्यंत मी एकदां सुहासिनी मॅडमना बघून येऊं कां? ह्यांच्या तोंडून ती भयानक बातमी ऐकल्यापासून जिवाला चैन नाहींये!" शुभदाला बेडरूमचं दार उघडून देऊन मनोरमा कीचनकडे वळली. शुभदाने दारातूनच डोकावून बेडकडे बघितलं तर अंगावर व्यवस्थित घातलेल्या पांघरुणाखाली सुहासिनीमॅडमचं शरीर दिसतच नव्हतं! दिसत होता तो फक्त त्यांचा निद्रिस्त शांत चेहरा आणि त्याभोंवतीची दाट शुभ्र केसांची महिरप! भूतकाळातील अनेक आठवणी मनांत दाटल्यामुळे शुभदा जागींच खिळल्यागत ऊभी राहून बघत असतांना नकळत तिचे डोळे भरून आले आणि हलक्या हाताने बेडरूमचं दार लावून ती परत फिरली. तिची चाहूल जाणवून मनोरमा म्हणाली, "कीचनमधेच ये, शुभदा!" साश्रू डोळ्यांनी विमनस्कपणे बसलेल्या शुभदापुढे चहाचा कप ठेवीत मनोरमा म्हणाली, "भाऊसाहेब त्यांच्या परीने ह्यांना 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करायला मदत करीत असतात. त्यातूनच माझी सुहासिनीची ओळख झाली! पण तुझी तिच्याशी ओळख कशी?"
"आमची जयू ८ वीत असतांना सुहासिनी मॅडम तिच्या क्लासटीचर होत्या. सायन्स विषयही त्याच शिकवायच्या. शिक्षणाचा प्रात्यक्षिक भाग म्हणून त्या हौसेनं स्टडी टुर काढीत! अशाच एका टुरनंतर त्यांनी 'भेटायला या' म्हणून निरोप पाठवला!" शुभदा भूतकाळाच्या आठवणी जागवीत सांगू लागली, "पण ह्यांना कुठे ऑफिसच्या कामांतून वेळ मिळायला! चार दिवस वाट बघून शेवटी मी एकटीच भेटायला गेले. पहिल्याच भेटीत त्या जयूचं वनस्पतींबद्दलचं कुतूहल आणि निरीक्षण यांबाबत भरभरून बोलल्या! जयूचे इतर छंद आणि आवडींची आस्थेनं चौकशी केली! जयू ९ वीत गेल्यावरही त्यांनी तिच्या प्रगतीमधे रस घेतल्याने आमच्या भेटी होत राहिल्या, ओळख वाढत गेली!" "मीसुद्धां अनेकांकडून तिच्या जीव ओतून शिकवण्याबद्दल ऐकलं आहे!" मनोरमा म्हणाली, "बाहेर पडली तर अजूनही तिचे जुने विद्यार्थी मोठ्या आदराने तिला भेटतात!" "पांच वर्षांपूर्वी जयू आली होती तेव्हां कपड्यांच्या दुकानांत आम्ही खरेदी करीत असतांना तिने अचानक मॅडमना ओझरतं पाहिलं आणि धांवतच जाऊन त्यांना गांठलं! तिथंच त्यांच्या पायां पडली तेव्हां "अग, बबली तूं?" म्हणतांना मॅडमना केवढा आनंद झाला होता! खरेदी राहिली बाजूला आणि त्यांच्या गप्पा संपेनात, तेव्हां 'एकदां आरामांत गप्पा मारायला घरी ये' म्हणाल्या होत्या! पण जेमतेम दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे जयूला नाहींच जमलं! परत जातांना ती 'मॅडमना पुन: भेटतां आलं नाही' म्हणून जाम हळहळली होती!कारण पुढे ज्या वनस्पतींविषयक संशोधनक्षेत्रांत जयूने स्कॉलरशिप मिळवून डाॅक्टरेट केली, त्यातली तिची रुची आणि कल ओळखून मॅडमनी तिला प्रोत्साहन दिलं! आपल्या करीअरचा पाया घालण्याचं श्रेय ती नेहमी मॅडमनाच देते!"
"जयूचं टोपण नांव 'बबली' असल्याचं मला आजच समजलं!" मनोरमा कौतुकाने म्हणाली. "जयू लहान असतांना आम्ही भाड्याच्या जागेत रहात होतो तिथे शेजारी शर्मा कुटुंब होतं! त्यांच्या घरांत समवयस्क लहान मुलं असल्याने जयू तिथे रमायची!शर्मा मंडळीनीच तिला 'बबली' म्हणायला सुरुवात केली. तिच्या 'बबली' या टोपणनांवाचं सुहासिनी मॅडमना केवढं अप्रूप!'किती वेगळं आणि गोड आहे' म्हणायच्या आणि कौतुकाने हंसायच्या!" "नांवाप्रमाणे सतत हंसत असायची!" खेदाने मान हलवीत मनोरमा म्हणाली, "पण आज ही काय वेळ आली बघ तिच्यावर!" "विषय निघाला, म्हणून विचारतेय्--" काहीशी चांचरत शुभदा म्हणाली, "मॅडमचा आत्महत्येचा प्रयत्न ऐनवेळी कुणी हाणून पाडला?" "सकाळी भाऊसाहेब नेहमीप्रमाणे शुक्रवारच्पा गप्पांच्या बैठकीला गेल्यावर सुहासिनीने 'जगण्या��त रस न उरल्याने मी स्वतःहून आयुष्य संपवीत आहे. याबाबत इतर कुणालाही दोष देऊं नये!' अशा आशयाची चिठ्ठी लिहून बेडवर ठेवली! त्यानंतर ती जीव देण्यासाठी बेडरूमच्या खिडकीतून उडी मारणार होती. पण आठव्या मजल्यावरून खाली बघितल्यावर तिला बहुधा भोंवळ आली आणि ती आंतल्या बाजूला पडली! तो आवाज ऐकून खालच्या फ्लॅटमधले घाबरून चौकशी करायला धांवत आले. शेजारी कुणाकडे तरी डुप्लिकेट चावी होती ती वापरून फ्लॅटचा दरवाजा उघडला तर सुहासिनी बेडरूममधे, खिडकीखाली बेशुद्ध अवस्थेमधे पडलेली आढळली! तेवढ्यांत शेजारी बेडवर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी कुणीतरी वाचली आणि एकच हलकल्लोळ उडाला!" सगळी हकीकत नुसती ऐकतांना थरकांप उडालेल्या शुभदाने स्वत:ला सावरण्यासाठी बाजूच्या खुर्चीचा आधार घेतला! "नशीब बलवत्तर म्हणून सुहासिनी वाचली आहे, शुभदा! अगदी सुखरूप आहे!" म्हणत मनोरमाने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला! तेवढ्यांत दरवाजाचं लॅच उघडल्याचा आवाज आला! पोलीस चौकीतील काम निपटून मनोहर भोसले भाऊसाहेबांना सोबत घेऊन परतले होते. शुभदाला उद्देशून भोसले म्हणाले, "अनंतरावांशी माझं वाटेतच बोलणं झालं! ते आणि आणखी कांही मित्र १०-१५ मिनिटांत पोहोचतीलच!"
२२ जून २०२३
0 notes
nagarchaufer · 23 days ago
Text
जिथे काही नाही तिथे छाती फुगून दाखवण्यात अर्थ नाही , उद्धव ठाकरेंनी दिलं मोदींना आव्हान
जिथे काही नाही तिथे छाती फुगून दाखवण्यात अर्थ नाही , उद्धव ठाकरेंनी दिलं मोदींना आव्हान
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी ,’ बांगलादेशात हिंदूंची मंदिरे जाळली जात आहेत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुसतेच अत्याचार पहात बसलेले आहेत. संसदेत महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन चर्चा भरकटवली जाते. हिंदूंना भावना आहेत. यांचे हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे का ? असा प्रश्न विचारला आहे.  उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री इथे पत्रकार परिषद घेत केंद्र…
0 notes
pradip-madgaonkar · 3 months ago
Text
Tumblr media
Bishan Singh Bedi Birthday : Wishes from Pradip Madgaonkar
बिशनसिंह बेदी कोण होते? भारतीय क्रिकेटला त्यांनी काय दिलं? वाचा
0 notes
bandya-mama · 3 months ago
Text
Tumblr media
Bishan Singh Bedi Birthday : Wishes from Bandya Mama
बिशनसिंह बेदी कोण होते? भारतीय क्रिकेटला त्यांनी काय दिलं? वाचा
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
फडणवीस तुम्ही नाही दिलं मग तुम्हाला सुट्टी नाही.. #latestnews #indianpol...
0 notes
steadykingchaos · 5 months ago
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
0 notes
pandurangkoli · 5 months ago
Text
0 notes
vishnulonare · 5 months ago
Text
600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वतः येऊन तत्वज्ञान दिलं | Sant Rampal ...
youtube
अवश्य ऐका हा शॉ���्ट सत्संग - 600 वर्षांपूर्वी परमात्मा यांनी स्वत: येऊन तत्वज्ञान दिलं?| Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भर दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन-नायगाव इथलं नियोजित स्मारक पाच वर्षांत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही • शेतीच्या नुकसानाचं आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती • कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरणाची आवश्यकता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांच्याकडून व्यक्त आणि • जालना इथं ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह दोघांना अटक
भविष्यातल्या आव्हानांसाठी नवी पिढी घडवण्यावर नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अधिक भर दिल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल दिल्लीत विविध विकास कामांचं लोकार्पण केल्यानंतर नागरिकांशी बोलतांना पंतप्रधान म्हणाले.. “हमे सिर्फ बच्चों को सिर्फ पढाना ही नही है, बल्की वर्तमान और भविष्य की जरूरतों के लिए नई पिढी को तयार करना है। नई नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मे इसी बात का ध्यान रखा गया है। नई राष्ट्रीय शिक्षा निती गरीब परिवार का बच्चा हो, मध्यम परिवार की संतान हो अब वो अपनी मातृभाषा मे पढकर के डॉक्टर भी बन सकता है। इंजिनियर भी बन सकता है। और बडी से बडी अदालत में मुकदमा भी लड सकता है।’’
दरम्यान, आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. '२०४७ पर्यंत विकसित भारत' ही या महोत्सवाची संकल्पना आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी ��ाल त्यांना अभिवादन केलं. महिला सक्षमीकरणाच्या जननी आणि शैक्षणिक तसंच सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी असलेल्या सावित्रीबाईंचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना काल सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. सावित्रीबाईंच्या जन्मगावी, सातारा जिल्ह्यातल्या नायगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. माजी मंत्री छगन भुजबळ, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायगाव इथं घोषणा केलेलं सावित्रीबाईंचं स्मारक त्यांच्या द्वी शताब्दी जयंतीपूर्वी तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. या स्मारकासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले… ‘‘स्मारक हे केवळ पुतळ्यापुरतं मर्यादित नाहीये. स्मारक पुतळ्यांसोबत विचारांचंदेखील झालं पाहिजे, आणि मी आपल्याला यानिमित्ताने शब्द देतो, की निश्चितपणे अशा प्रकारचं जे स्मारक आहे, ते याठिकाणी आम्ही पूर्ण करून दाखवू. बरोबर पाच वर्षांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची द्विशताब्दी सुरू होणार आहे. त्या द्विशताब्दीपूर्वी हे स्मारक तयार ठेवलं पाहिजे. जिल्हाधिकारी तुम्हाला मी जबाबदारी देतो यातलं पहिलं काम दहा एकर जमीन अधिगृहीत करण्याकरता तात्काळ कारवाई सुरू करा.’’ ** सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुंबईत मंत्रालयात तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि धाराशिव इथं विविध शासकीय कार्यालयं, लोकप्रतिनिधी तसंच पक्ष संघटनांकडून सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. हिंगोली जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा घेण्यात आला. जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसंच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणारे सीआरपी अर्थात समुदाय संसाधन प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोऱ्यातील पाण्याबाबत पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन सर्व आढावा घेणार असल्याचं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल तुळजापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. 'दुष्काळ तिथे पाणी' यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नदी जोड प्रकल्प हाती घेतला असून यामुळे कुठेच दुष्काळ भासणार नाही, असं सांगत लवकरच धाराशिव जिल्ह्यात पाणी येईल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात मेंढगिरी समितीच्या शिफारसींचं मूल्यांकन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. पूर्वीच्या अहवालानुसार जायकवाडीत ६५ टक्के पाणी शिल्लक असेल तरीही नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची शिफारस होती, मात्र नव्या शिफारसीनुसार जायकवाडीत ५८ टक्के पाणी साठा असेल तरीही, वरच्या धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. या नव्या अहवालावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार असून, यासंदर्भात नाशिक इथं पाणी परिषद घेणार असल्याचं, आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या नुकसानाचं, आता उपग्रहाव्दारे सर्वेक्षण केलं जाणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. ते काल नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात किसान संवाद मेळाव्यात बोलत होते. उपग्रहाद्वारे सर्वेक्षणामुळे नुकसानाचं अचूक मोजमाप होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित भरपाई मिळू शकेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. ते म्हणाले… ‘‘फसल खराब हुई तो सॅटेलाईट के आधार पर रिमोट सेन्सिंग से इमेज लेंगे। फसल के नुकसान का आकलन करेंगे। और वो आकलन परफेक्ट होगा और जितना नुकसान होगा फसल का, फसल का उत्पादन कम होगा, उसका आकडा होगा सीधा किसान के अकाऊंट मे डीबीटी के माध्यम से डाल दिया जायेगा।’’
कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होणं आवश्यक असल्याचं, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या काल लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. या संदर्भात कार्यालयातल्या प्रत्येक सहकाऱ्याची जबाबदारी महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान, महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त लातूर इथं दोन दिवसीय पोलीस प्रदर्शनाचं रहाटकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या प्रदर्शनात पोलिस दलातल्या विविध विभागांची माहिती आणि शस्त्र पाहता येणार आहेत.
जालना इथल्या ३० लाख रुपये लाच मागणाऱ्या सहायक निबंधकासह आणखी एकास अटक करण्यात आली आहे. संजय अर्जुनराव राख आणि सहकार अधिकारी शेख रईस शेख जाफर अशी त्यांची नावं ��सून, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेविरुध्द दाखल त��्रार अर्ज निकाली काढण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं कालच्या एक बाद नऊ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १०१ धावा झाल्या होत्या. दरम्यान, या कसोटीत काल भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, भारताचा पहिला डाव अवघ्या १८५ धावांवर संपुष्टात आला.
छत्रपती संभाजीनगर इथल्या गरवारे क्रीडा संकुलावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयकडून १९ वर्षांखालील महिलांची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. या मैदानावर फ्लड लाईट्स आणि खेळपट्टीचं काम पूर्ण झाल्यावर प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा होणार आहे.
लातूर इथं सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनात काल भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप जाहीर सभेत करण्यात आला. परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.
पारंपारिक लोककलांचे संवर्धन आणि कलाकरांना प्रोत्साहन हे आपलं ध्येय असून, कलाकारांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं माळेगाव यात्रेत लोककला महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. विविध कलावंतांचा यावेळी चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले या दाम्पत्याने काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशसोहळा पार पडला.
आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा पाठवला असून आपल्याला देण्यात आलेली सुरक्षा काढून टाकावी अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३३
"केदार, जुन्या आठवणी जागवून कशाला एवढा त्रास करून घेतोस!" चटकन ऊठून, केदारच्या पाठीवर हलकेच आपला हात ठेवीत अनंत म्हणाला. "त्यांतूनही कटुआठवणी म्हणजे नुकतीच खपली धरलेल्या जखमांसारख्या असतात;-- जरा धक्का लागला की भळाभळा वाहूं लागतात!" सबनीसांच्या या सहानुभूतीपूर्ण उद्गारांनी भानावर येत केदार म्हणाला, "नाहीं काका, मला या आठवणींनी वाईट नाहीं वाटत;-- उलट 'आपण किती वाईट परिस्थितीतून वाट काढली आहे' या विचाराने स्वत:चा अभिमान वाटतो!!" "केदार बोलतोय ते खरं आहे, काका!" एकनाथ म्हणाला, " ते जुने दिवस आठवले की आम्हांला त्या वाईट परिस्थितीवर मात करायला किती लोकांनी मदत केली तेही आठवतं! स्टाॅल टाकायचा विचार आमच्या दोघांच्या मनांत आला खरा, पण तसं करणं खुपच अवघड ��ोतं!" "तुम्हांला खोटं वाटेल काका, पण मी आणि एकनाथने बेकारीच्या काळांत कुणाकडे पैशांसाठी कधी हात नाहीं पसरला! कामासाठी वेळ आली तर उपाशीपोटी पायपीट केली, पण काही फुकट मिळावं म्हणून याचना नाहीं केली! गराजमधे प्रामाणिकपणाने आणि चोख काम करीत असतांना अनेक भल्या-चांगल्या गिऱ्हाईकांशी ओळखी झाल्या होत्या पण त्यांच्या कुणाच्याही दारांत मदत मागायला आम्ही गेलो नाहीं! मात्र जेव्हां स्वत:चा स्टाॅल टाकायचा विचार मनांत पक्का झाला, तेव्हां अशा ठोस कामासाठी ज्याच्याकडून मदत मिळेल असं वाटलं त्याच्याकडे ती सरळ मागितली!" "आणि तेव्हां कळलं की लोकांना खऱ्या-खोट्याची किती पारख असते!" एकनाथ भरल्या गळ्याने सांगू लागला,"केवळ आमच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हांला मदत केली! आम्ही सर्वांना हेच सांगितलं की तुमचे पैसे आम्ही कर्ज म्हणून घेतले आहेत! शक्य तेवढ्या लौकर आम्ही ते नक्की परत करूं! तसं लिहून द्यायलाही आम्ही तयार होतो पण लिखापढी कुणीही करून घेतली नाही!"
"त्याच वेळीं आम्ही ठरवलं की ज्यांनी आपल्यावर इतका विश्वास ठेवला आहे त्यांचे पैसे आपण लौकरांत लौकर परत करायचे! त्यासाठी कमाई चांगली होऊं लागल्यावर दरमहा आम्ही ठराविक रक्कम बाजूला काढून एकेकाचे पैसे परत करायला सुरुवात केली! आणि काय सांगू काका,--" आपले अश्रू न लपवतां केदार म्हणाला, "अनेकांनी पैसे परत घ्यायला नकार दिला! कुणी म्हणाले 'पैसे सत्कारणी लागतील याची खात्री होती म्हणूनच दिले होते' तर कुणी म्हणाले 'तुम्ही पैसे परत करायला आलांत, यांतच ते मिळाले असं आम्ही मानतो'! लोकांच्या या अशा वागण्याने आम्हांला प्रामाणिकपणाने कष्ट करण्यासाठी दुप्पट बळ मिळालं बघा!" "माझ्या अनुभवावरून सांगतो," अनंत म्हणाला, "आपल्या आजुबाजूला वावरणारी माणसं रोज उठून गवगवा करीत नसली, तरी आपल्या वर्तनाकडे त्यांचं बारीक लक्ष असतं! योग्य वेळ येते तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियेतून ते आपल्याला समजतं! याचाच अनुभव तुम्हांलाही आला आहे! कुुणी तुमच्या सचोटीचं प्रशस्तीपत्र आपणहून दिलं नसलं, तरी तुम्हांला गरज पडली तेव्हां लोकांचा तुमच्या सचोटीवरील विश्वासच तुमच्या कामीं आला ना!" "तुम्हांला लोकांचा हा विश्वास गमवायचा नाहींये;-- तर तो अधिक वृद्धिंगत करायचा आहे हेच तुम्ही लोकांचे पैसे परत करायच्या प्रयत्नांतून दाखवून दिलं आहे!" सबनीसांच्या या उदगारांवर हंसून मान डोलावीत अनंत म्हणाला, "अगदी बरोब्बर बोलताहेत सबनीसकाका! मात्र केदार आणि एकनाथ, लोकांची जी कांही कर्जाऊ रक्कम तुमच्याकडे अद्याप बाकी आहे, ती लौकरांत लौकर परत करण्यासाठी तुम्हांला प्रयत्न वाढवावे लागतील!" "त्यासाठीच तर आम्ही सगळी मेहनत करतोय् काका!" केदार गोंधळून म्हणाला, " त्यांत काय कमी पडतंय् असं तुम्हांला वाटतं?" "'नाहीं,नाहीं!" अनंतने घाईघाईने खुलासा केला, " तुम्ही दोघे जिवापाड मेहनत करताहांत यांत शंकाच नाहीं! फक्त तिची दिशा थोडी बदलायला हवी!"
अनंतच्या या खुलाशावर केदार आणि एकनाथ बावचळल्यागत त्याच्याकडे आणि एकमेकांकडे बघतच राहिले! "आपल्या जिवापाड मेहनतीला आतां कुठली नवी दिशा दाखवणार हा माणूस?" अशी जणूं शंका त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसत होती! त्यांचा गोंधळ लक्षात येऊन, त्यांना दिलासा देण्यासाठी अनंत म्हणाला, "असे गोंधळू नका रे! तुम्हांला कांहीही वेडावाकडा सल्ला मी देणार नाहीं याची खात्री बाळगा! लोकांचं बाकी असलेलं कर्ज लौकर फेडण्यासाठी तुम्हांला स्टाॅलपासून मिळणारं उत्पन्न वाढलं पाहिजे ना? त्यासाठी सबनीस मगाशी म्हणाले त्याप्रमाणे गिऱ्हाईकांच्या गर्दीचा पुरेपूर लाभ व्हावा यासाठी स्टाॅल बंद करायची वेळ तुम्हांला रात्री ऊशीरापर्यंत वाढवावी लागेल!" "पण अनंतराव , स्टाॅल रात्री ८ / ८.३० नंतर उघडा ठेवण्यात येणाऱ्या अडचणींबद्दल दोघे मगाशीच मोकळेपणानं बोलले ना!" सबनीस कांहीसं गोंधळून म्हणाले! "ते माझ्याही लक्षांत आहो! पण केदार आणि एकनाथ, त्यांतून मार्ग काढण्यासाठी मला एकच प्रश्न तुम्हांला विचारायचा आहे की स्टाॅलवर तुम्ही दोघांनी दिवसभर एकत्र थांबणं कितपत आवश्यक आहे? त्यापेक्षा कामाचे तास तुम्ही दोघांमधे वाटून घेतलेत तर? अनेक कारखान्यांमधे जशा कामाच्या पाळ्या असतात त्याप्रमाणे तुम्हांला आळीपाळीने स्टाॅल सांभाळणं जमणार नाहीं कां?"
२३ फेेब्रुवारी २०२३
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
नगरच प्रगतीपुस्तक व्हिजन २०२९ संग्राम जगताप यांच्याकडून प्रसिद्ध , विरोधकांना प्रगती पुस्तकातून दिलं उत्तर
नगरच प्रगतीपुस्तक व्हिजन २०२९ संग्राम जगताप यांच्याकडून प्रसिद्ध , विरोधकांना प्रगती पुस्तकातून दिलं उत्तर
नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी ,’ गेल्या दहा वर्षात शहर बदलत असून विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला. प्रचंड वेगाने कामे सुरू आहेत. मतदारांना मी वचन देतो की पुढील पाच वर्षात पुण्याप्रमाणे अहिल्यानगर स्मार्ट सिटी करणे हे माझे व्हिजन २०२९ असणार आहे ,’ असे म्हटलेले आहे.  संग्राम जगताप यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली त्यावेळी बोलताना ते म्हणाले की ,’ एक काळ असा…
0 notes
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
वडील : pradip ! आम्ही तुझं लग्न करून दिलं. घरात सून आली,
तरीसुद्धा तुच तुझ्या जीन्सला बटण लावत बसला आहेस.
Pradip: बाब! तुमचा काही तरी गैरसमज होतोय.
ही जीन्स तिचीच आहे.
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
0 notes