#राष्ट्रीय आरोग्य अभियान
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• मध्यमवर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर-१२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त • शेती-आरोग्य-रोजगार-लघू आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांना अर्थसंकल्पात प्राधान्य • अर्थसंकल्पातल्या तरतुदींचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत तर विरोधकांकडून टीका आणि • पाणी प्रश्नाबाबत जागृतीसाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानकडून जलसंवाद परिषदेचं आयोजन
देशाच्या मध्यमवर्गाला मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत सादर केला. १६ लाख ४५ हजार कोटी रुपये तुटीच्या या अर्थसंकल्पात आगामी वर्षात कर महसुलातून ३४ लाख २० हजार कोटी रुपये उत्पन्न तर ५० लाख ६५ हजार कोटी रुपये खर्च प्रस्तावित असल्याचं म्हटलं आहे. वित्तीय तूट ४ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याची शक्यता असून, चालू आर्थिक वर्षात तुटीचं हे प्रमाण ४ पूर्णांक ८ दशांश टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदाते, शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलं आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयकर प्रणालीत मोठे सुधार अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केले, यामुळे करदात्याचं सुमारे १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन अर्थात मानक वजावटीची मर्यादा ५० हजारांवरून ७५ हजारांपर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे. यासंदर्भातलं नवं आयकर विधेयक पुढील आठवड्यात मांडणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. नव्या आय कर रचनेनुसार ४ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न ��ूर्णपणे करमुक्त असेल. ४ ते ८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर ५ टक्के कर आकारला जाईल, ८ ते १२ लाख रुपये उत्पन्नावर १० टक्के, १२ ते १६ लाखांपर्यंत १५ टक्के, १६ ते २० लाखांसाठी २० टक्के, २० ते २४ लाखांसाठी २५ टक्के तर २४ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के कर द्यावा लागणार आहे. सुधारित आयकर विवरण पत्र भरण्याची मुदत आता २ वर्षांवरुन ४ वर्ष करण्यात आली आहे. TDS आणि TCS साठीही अनेक सुधारणा अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा १ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे.
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याचा लाभ दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे साडे सात कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छिमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सुधारित व्याज अनुदान योजने अंतर्गत कर्ज मर्यादा तीन लाखांहून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारांना कौशल्य, तंत्रज्ञान पुरवलं जाणार आहे. तेलबियांसाठी राष्ट्रीय अभियान राबवण्यात येणार असून, तूर, उडीद, मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून सहा वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाणार आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पुढील चार वर्षांसाठी नाफेड आणि NCCF कडून तेलबीयांची खरेदी केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या वर्गीकरणासाठी गुंतवणुकीची मर्यादा अडीच पटीने तर उलाढालीची मर्यादा दुपटीने वाढवण्यात आली आहे. याशिवाय चर्मोद्योग, खेळणी, अन्नप्रक्रिया, पर्यावरण पूरक तंत्रज्ञान निर्मिती अशा विविध क्षेत्रांसाठी संस्थांची स्थापना, एक कोटी असंघटित कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी, ३० हजार रुपयांची मर्यादा असलेली यूपीआय संलग्न क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत वाढ, आदी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या.
या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सुमारे पाच लाख कोटी, ग्रामीण विकास सुमारे अडीच लाख कोटी, कृषी १ लाख ७१ हजार कोटी, शिक्षण १ लाख २८ हजार कोटी, आरोग्य ९८ हजार कोटी तर क्रीडा क्षेत्रासाठी ३ हजार ७९४ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ७४ टक्क्यांवरुन १०० टक्के करण्यात आली आहे.
सौर बॅटरी, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर, कृत्रिम दागिने, इलेक्ट्रीक वाहनं आणि मोबाईल फोन तसंच एलसीडी, एलईडी टीव्हीच्या सुट्या भागांवरच्या करात सवलत, आणि कर्करोगासह ३६ महत्त्वाच्या औषधांना सीमा शुल्कातून सूट प्रस्तावित करण्यात आली आहे. आय आय टी मध्ये साडे सहा हजार तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १० हजार जागा वाढवण्याचं या अर्थसंकल्पात नमूद असून, देशात तीन कृत्रीम बुद्धीमत्ता अभ्यास केंद्र स्थापन केली जाणार आहेत.
येत्या तीन वर्षांत प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी उपचार केंद्र, २५ हजार कोटी रुपये निधीसह मेरीटाईम बोर्डाची स्थापना, उडान योजनेची नव्याने स्थापना, ५० नव्या पर्यटन क्षेत्रांचा विकास, मेडिकल टूरिझमसाठी 'हील इंडिया'योजना, जलजीवन मिशनला २०२८ पर्यंत मुदतवाढ, दीड लाख ग्रामीण टपाल कार्यालयं, पुरातन हस्तलिखितांचं जतन, तसंच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नवीन पोर्टल सुरू करणार असल्याचं, अर्थमंत्र्यांनी सांगितलं. **** हा अर्थसंकल्प करदात्यांना दिलासा देणारा तसंच सर्वसमावेशक असल्याचं सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. ते म्हणाले… जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे, याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरूणांना होणार आहे. एकविसाव्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे. भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे. आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. आणि त्यासोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला या अर्थसंकल्पातनं पाहायला मिळतात. हा अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला अभूतपूर्व दिलासा देणारा असल्याचं वर्णन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी होत असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी चार हजार कोटी, दळणवळण सुधारणांसाठी ६८३ कोटी, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी, तर सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणीकरता एक हजार ९४ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं.
काँग्रेस पक्षाने हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांचा भुलभुलैया असल्याची टीका केली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी, या अर्थसंकल्पातून गुंतवणूकदार, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकाची निराशा झाल्याचं मत नोंदवलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या अर्थसंकल्पात कुठेही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीत मोठ्या कल्पना मांडण्यात आल्या नसल्याची टीका केली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे… हे बजट निराशाजनक आहे. कारण का की भारतापुढे आज अर्थव्यवस्थे��े अनेक प्रश्न आहेत. याच्यामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी आणि वाढती विषमता हे प्रश्न गंभीर आहेत. परंतू त्याचा कुठेही उल्लेखदेखील नाही. शेतकऱ्यांची जी मागणी आहे, एम एस पी ची, त्याचाही उल्लेख नाही. त्याचबरोबर पेन्शनसारख्या किंवा मनरेगासारख्या ज्या योजना असतात, त्याचा निधी वाढवलेला नाही.
किसान सभेचे डॉ अजित नवले यांनी या अर्थसंकल्पात शेतीसाठी करण्यात आलेल्या बहुतांशी घोषणा या उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्राला लाभ पोहोचवणाऱ्या असल्याची टीका केली. ते म्हणाले… फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन धार्जिण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत. अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात आपल्याला झालेली दिसते. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून, आधारभावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असा हा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट हमी कवच १० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचं मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे कार्यकारिणी सदस्य उद्योजक दुष्यंत आठवले यांनी स्वागत केलं आहे.
पर्यटनविषयक होम स्टे या प्रकाराला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचं धाराशिव इथल्या पर्यटन जनजागृती समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला… होम स्टेच्या संदर्भात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी होईलआणि होम स्टेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र आणखीन जास्त कसं वृद्धींगत होत जाईल, यासाठी या अर्थसंकल्पामध्ये जो निर्णय घेतलेला आहे, त्याचं मी स्वागत करतो. आणि अपेक्षा करतो की याचं इंप्लिमेंटेशन मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि तरूणांना याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी.
मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं जलसंवाद २०२५ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्याची पाण्याची गरज आणि पाणी उपलब्धतेच्या संभाव्य उपाययोजना या संदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे. चिकलठाणा परिसरात मसिआ संघटनेच्या सभागृहात आज सकाळी नऊ वाजता होणाऱ्या या परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२५-२६ या वर्षाच्या ४११ कोटी १७ लाख रूपयांच्या प्रारुप आराखड्याला काल मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
गझल ही माणसाला माणसाच्या जवळ आणण्याचं काम करते असं मत, ख्यातनाम मराठी उर्दू गझलकार डॉ. संदीप गुप्ते यांनी व्यक्त केलं आहे. अंबाजोगाई इथं साधना प्रतिष्ठानच्या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमात सागर पांपटवार आणि प्रियंका गिरी या नवोदित गझलकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह तसंच शाल देऊन गौरव करण्यात आला.
परभणीच्या सय्यद शाह तुराबूल हक उर्सला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी राघुनाथ गावडे, पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत काल संदल मिरवणूक काढण्यात आली.
0 notes
Link
आयुक्त आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती - Arogya Vibhag Bharti 2023 ऑनलाईन अर्ज (Apply Online)
0 notes
Link
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या खात्यात वाढीव मानधन येणार; शासन निर्णय जारी.
0 notes
Text
राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड मध्ये 42 रिक्त पदांची भरती
NHM Nanded Bharti 2023-NHM नांदेड भरती 2023 NHM Nanded Recruitment 2023 NHM Nanded Bharti 2023: NHM Nanded (National Health Mission Nanded) ने बालरोगतज्ञ, विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, CT स्कॅन तंत्रज्ञ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना www.zpnanded.in या वेबसाइटद्वारे त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. NHM Nanded Bharti 2023-NHM नांदेड भरती 2023 Read the full article
0 notes
Text
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १३६७.६६ कोटी रुपयांची तरतूद
कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासन सज्ज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती मुंबई, दि.२७ : कोविड-१९ च्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाने १३६७.६६ कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे. कोविड प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या या विशेष तरतुदीमुळे अत्यावश्यक गोष्टींसाठी…
View On WordPress
0 notes
Text
PCMC भर्ती 2020: 8 वीं पास महिलाओं के लिए 'आशा' के 360 पदों पर भर्तियां
PCMC भर्ती 2020: 8 वीं पास महिलाओं के लिए ‘आशा’ के 360 पदों पर भर्तियां
[ad_1]
PCMC ASHA भर्ती 2020: राष्ट्रीय आरोग्य अभियान के अंतरगत महाराष्ट्र के पिंपरी चिंचवाड़ महानगरपालिका (PCMC) में 360 आशा स्वयं की भर्ती के लिए आवेदन आमंत्रित किए गए हैं। इन पदों के लिए योग्य और इच्छुक उम्मीदवार आवदेन कर सकते हैं।
पीसीएमसी के भर्ती नोटिफिकेशन के अनुसार, आवेद�� विवाहित महिलाएं हो सकती हैं जिनकी शैक्षणिक योग्यता कम से कम 8 वीं पास हो। आदिवासी व विधवा महिलाओं को प्रमुखता दी…
View On WordPress
#360 आशा भर्ती#360 एक की भर्ती#8 वीं पास महिलाओं के लिए नौकरी#pcmcindia.gov.in#आशा भर्ती २०२०#आशा स्वयंसेवक#आशा स्वयंसेविका#एनएचएम भर्ती#जॉब्स#नौकरियां#पिंपरी चिंचवाड़ नगर निगम#पिंपरी चिंचवाड़ महानगरपालिका#पीसीएम भर्ती#पीसीएमसी#पीसीएमसी भर्ती#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महिलाओं के लिए 8 वीं पास नौकरियां#माहौर संवाददाता#राष्ट्रीय आरोग्य अभियान#सरकारी नौकरियों#सरकारी नौकरी#हिंदी समाचार#हिंदुस्तान#हिन्दी में समाचार#हिन्दुस्तान
0 notes
Text
NHM भर्ती: ग्रेजुएट उम्मीदवारों के लिए राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के तहत राज्य भर में मेगा भर्ती, खाली है ये पद
NHM भर्ती: ग्रेजुएट उम्मीदवारों के लिए राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के तहत राज्य भर में मेगा भर्ती, खाली है ये पद
NHM भर्ती: राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन के तहत जल्द ही कुछ पदों पर भर्ती (NHM Recruitment) की जाएगी. इसके लिए नोटिफिकेशन जारी कर दिया गया है। ��ह भर्ती कम्युनिटी हेल्थ ऑफिसर के पदों पर ���ोगी। इच्छुक उम्मीदवारों को नीचे दिए गए पते पर ऑफलाइन मोड के माध्यम से आवेदन करना होगा। आवेदन करने की अंतिम तिथि 20 दिसंबर 2022 है। संस्था – राष्ट्रीय आरोग्य अभियान (Naional Health Mission) भरे जाने वाले पद…
View On WordPress
0 notes
Text
तेव्हा तुकारामांच्या गाथा बुडवल्या, आता तुकारामांच्या बदल्या होतायेत - तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
तेव्हा तुकारामांच्या गाथा बुडवल्या, आता तुकारामांच्या बदल्या होतायेत – तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली
निर्भिड आणि बेधडक कार्यासाठी जाणले जाणारे कर्तव्य निष्ठ अधिकारी आय ए एस तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली झालेली आहे. त्यांची या आगोदर ची बदली ही फक्त दोनच महिन्यांपूर्वी दिनांक 30 सप्टेंबर रोजी झाली होती. आता 29 नोव्हेंबर रोजी त्यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले होते युवक काँग्रेस उतरले मैदानात आय ए एस तुकाराम मुंढे यांची आयुक्त, कुटुंब कल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरून…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे एक लाख ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षात भारताचं पाचशे गिगावॅट अजीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याची ल��्ष्यपूर्ती होणार आहे. याशिवाय, साडे एकोणीस हजार कोटी रुपये मूल्यांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण, दक्षिण कोस्ट रेल्��े मुख्यालय, नक्कापल्ली इथं बल्क ड्रग पार्कची पायाभरणी, तर कृष्णपट्टमणम् औद्योगिक परिसराची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट तज्ञ डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर केंद्र सरकारकडून पुढील दोन वर्षासाठी अंतराळ विभागाचे सचिव पदावर देखील नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
१८ व्या प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनाला आजपासून भुवनेश्वर इथं सुरुवात झाली. यासाठी ५० देशांतून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याच्या समृद्ध संस्कृतीचं आणि वारशाचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. ओडिशा सरकारने युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या युवा प्रवासी भारतीय दिन कार्यक्रमाने संमेलनाची सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रवासी भारतीय दिनासाठी यंदा ‘विकसित भारतासाठी भारतीय समुदायाचं योगदान’ ही मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे.
आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा उपयोग करून राज्यातली आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असे निर्देश केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. मुंबईत काल केंद्र शासनाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होते. आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त लाभ पात्र नागरिकांना देण्यात यावा, क्षयरोग मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नि:क्षय मित्र जास्तीत जास्त जोडण्यात यावेत, आदी सूचना जाधव यांनी दिल्या.
शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून, पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते काल बोलत होते. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करावं, ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं आणि त्याची काटेकोरपणं अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी ��ावेळी दिल्या. या दीक्षान्त समारंभामध्ये एक लाखांहून अधिक स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी. एचडी, तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. या समारंभाला उच्च, तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यातला कारभार अधिक गतीमान आणि पारदर्शी करणं, मंत्रिमंडळातले निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचवणं आणि त्याद्वारे शासकीय कामकाजाला गती देणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जलदगतीने सोडवणं या उद्देशाने राज्यात ई-कॅबिनेट उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबतचे सादरीकरण केलं. ई-कॅबिनेट हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे.
मुंबईत टोरेस या परदेशी कंपनीने गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून या कंपनीनं अनेकांकडून पैसे गोळा केले आणि त्यानंतर पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी कंपनीच्या दादर इथल्या बंद कार्यालयासमोर आंदोलन केलं.
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल जिल्हा विकास समन्वय आणि संनियत्रण समितीची बैठक घेतली. जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. आपण सर्व मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू, असं ते यावेळी म्हणाले.
धाराशिव इथं काल ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचं उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात करण्यात आलं. हा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवला जात असून, यामुळे वाचकांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसंच सामूहिक वाचन कार्यक्रम, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळा आणि लेखक, विद्यार्थ्यांमधल्या संवादासाठी विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
0 notes
Text
SBI Recruitment | राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती
SBI Recruitment | राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती
Job Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद आणि संघ लोक सेवा आयोगात विविध पदांसाठी भरती निघाली आहे. याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 13 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, औरंगाबाद विविध पदांच्या ४ जागांसाठी भरती निघाली आहे. पोस्ट – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
मुंबई, दि. 30 : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विविध आरोग्य कार्यक्रम व कार्यालयीन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य आयुक्तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा…
View On WordPress
0 notes
Text
NHM बीड भारती 2023: 28 स्टाफ नर्स पदांसाठी भरती जाहिर
NHM Beed Bharti 2023 - NHM बीड भारती 2023NHM Beed Bharti 2023: NHM बीड (राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड) – नोकरी शोधणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. NHM बीड भरती 2023 साठी नवीनतम अपडेट. ताज्या बातम्यांनुसार, बीड राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड जिल्ह्यात लवकरच विविध मोठ्या पदांसाठी नवीनतम भरती सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. 2023 मध्ये ही भरती लवकरच अपेक्षित आहे. पुढील तपशील पुढीलप्रमाणे आहेत:-NHM बीड भारती 2023, आणि NHM Beed Bharti 2023 बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या RojgarMelava.com वेबसाइटला भेट द्या. NHM Beed Bharti 2023 - NHM बीड भारती 2023 Read the full article
0 notes
Text
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू
मुंबई, दि. 30 : आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विविध आरोग्य कार्यक्रम व कार्यालयीन व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य आयुक्तालयातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा…
View On WordPress
0 notes
Text
UP NHM CHO Recruitment 2021
UP NHM CHO Recruitment 2021
यूपी एनएचएम सीएचओ भर्ती 2021 – 2800 सामुदायिक स्वास्थ्य अधिकारी नौकरियों, यूपी एनएचएम रिक्तियों, राष्ट्रीय आरोग्य अभियान उत्तर प्रदेश सीएचओ भारती 2021, यूपी एनएचएम सीएचओ रिक्तियों के लिए upnrhm.gov.in पर ऑनलाइन आवेदन करें। उत्तर प्रदेश एनआरएचएम सामुदायिक स्वास्थ्य अधिकारी रिक्ति अधिसूचना अब upnrhm.gov.in पर जारी की गई है। सभी इच्छुक उम्मीदवार अधिसूचना पीडीएफ डाउनलोड कर सकते हैं और 2800 सीएचओ…
View On WordPress
0 notes