Tumgik
#राज्यपालांचं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल
राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल
राज्यपालांचं ‘ते’ पत्र कधीचं? आताच कसं बाहेर आलं? अमोल कोल्हे यांचा सवाल मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पाठवलेलं पत्र नेमकं आजच का बाहेर आलं? त्यावरची तारीख एवढी आधीची असताना आजच ते उघड कसं झालं? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. छत्रपती शिवरायांबद्दल (Chatrapati Shivaji Maharaj) मी भाषणात जो उल्लेख केला, त्यातला…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 12 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सायबर सुरक्षा हा देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. 
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची छत्रपती संभाजीनगर इथं विविध विषयांवर समाजघटकांशी चर्चा.
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ.
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरू.
****
सायबर सुरक्षा हा विषय देशाच्या संरक्षण यंत्रणेचा अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी अर्थात भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात, त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं. या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल. सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षण देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसीनं उपलब्ध करुन दिला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यपाल सीपी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले आहेत. पालकमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त दिलीप पावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांनी राज्यपालांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांनी शहरातल्या सुभेदारी विश्रामगृहावर लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यपालांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत मराठवाडा विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली त्यावर लवकरात राज्यभवनात विशेष बैठक घेतली जाणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय केला जाईल असं सत्तार यांनी सांगितलं.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांशी पाणी प्रश्नावर आपण चर्चा केली, तसंच वैधानिक विकास महामंडळा विषयी देखील चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासात्मक अनेक मुद्द्यांवर सर्वपक्षीय चर्चा झाली असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, आज सकाळी राज्यपालांनी जळगाव इथं लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. जळगाव जिल्हा सुवर्णालंकार व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी गोल्ड क्लस्टर' करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं.  जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, जलसिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावं, राष्ट्रीय महामार्गाच्या १८ किलोमीटरचं रखडलेलं काम विशेष बाब म्हणून पूर्ण करावं. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरु करण्याचा प्रयत्न करावा असं राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.
****
राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी मूर्तीकार जयदीप आपटेची पोलिस कोठडी १३ सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे, तर चेतन पाटील याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार चेतन पाटील या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांच्या कोठडीची मुदत संपल्यानं, त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. मुख्य संशयित जयदीप आपटे याची अजून चौकशी करायची असल्याने, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीनं न्यायालयात करण्यात आली, न्यायालयानं ती काही अंशी मान्य करत, १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
****
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये ज्वारी खरेदीची मुदत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा पणन अधिकारी व्ही.यू. राठोड यांनी ही माहित दिली. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली होती. मात्र पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे तसंच संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ही मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग असेल.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी सहा दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. आता धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून सुमारे साडे नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतला आहे. गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आठ हजार ६०३ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नाही तसंच आता लोकसंख्या वाढली असल्याने नाशिक जिल्ह्यालाच पुरेसं पाणी उपलब्ध नाही, असं सांगत, आमदार फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली, समन्यायी पाणी वाटपाच्या पुनर्विलोकनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अभ्यास गटाला एक महिन्याची मुदतवाढ द्यावी आणि या कालावधीत त्यांनी अभ्यास करून पुनर्विलोकन अहवाल जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाला द्यावा असे आदेश न्यायालयाने दिल्याचं, आमदार फरांदे यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवादयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. महात्मा फुले पुतळा इथून संवादयात्रा रॅली काढण्यात आली. यावेळी भटके विमुक्त संयोजन समितीचे समन्वयक विधिज्ञ अरूण जाधव, राष्ट्रीय भटके विमुक्त जमाती महासंघ प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
२८ ऑगस्ट रोजी पुण्यातल्या फुलेवाडा इथून सुरू झालेल्या या संवादयात्रेचा २३ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रालयात समारोप होणार आहे. भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय, भटक्यांना अर्थसंकल्पीय तरतूद, जातिनिहाय जनगणना, प्रशिक्षण संस्था अशा एकूण १७ मागण्यांसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
****
प्राथमिक शिक्षक पदाकरिता केवळ पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या १० नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा महाटीईटी’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. शिक्षण सेवकशिक्षक या पदांकरिता १० नोव्हेंबरला सकाळी साडे दहा ते दुपारी १ वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-१ घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-२ दुपारी २ ते साडे चार वाजे दरम्यान होणार आहे.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील १० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३३ पूर्णांक ३९ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यतल्या उर्वरीत १३१ पात्र शेतकऱ्यांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार असून या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
विशेष सहाय्य योजनेतील राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना शासनामार्फत देण्यात येत असलेला लाभ तात्काळ मिळावा, यासाठी थेट हस्तांतरण योजना अर्थात डीबीटी द्वारे अर्थसहाय्य वितरीत करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. याकरिता लातूर जिल्ह्यातल्या पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रं लातूर तहसील कार्यालयात सादर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
0 notes
karmadlive · 3 years
Text
'समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारलं असतं?'; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
‘समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारलं असतं?’; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य
औरंगाबादः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक असं वक्तव्य केलं आहे , ज्यावरुन आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे . राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध समाज माध्यमांवर करण्यात येतो आहे . ‘ समर्थ नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं का ? ‘ असं वक्तव्य त्यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमामध्ये केलं आहे . याच बरोबर त्यांनी शिवाजी महाराजांना कमी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indialegal · 4 years
Photo
Tumblr media
Hasan Mushrif: फडणवीस आणि राज्यपालांचं आधीच ठरलंय; ‘या’ मंत्र्याचा गौप्यस्फोट – mlc appointments: koshyari and fadnavis already decided what to do, alleges hasan mushrif कोल्हापूर: 'विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून पाठवली जाणारी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज्यपालांचं चुकलंच! अमित शहांनी दिला 'हा' सल्ला महाराष्ट्रातील मंदिरं अजूनही बंद आहेत | #AmitShah #BhagatsinghKoshyari #UddhavTHackeray #MaharashtraTemple http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/maharashtra-governor-bhagat-singh-koshyari-could-have-been-restrained-in-choice-of-words-to-uddhav-thackeray-says-amit-shah/?feed_id=14206&_unique_id=5f8d0f8b3e5c3
0 notes
freepressindia · 4 years
Link
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली.
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Photo
Tumblr media
राज्यपालांचा भाषणाचा गुजरातीत अनुवाद, सभागृहात गदारोळ मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली पण, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाचा अनुवाद आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला. त्यामुळे त्यांच्या भाषणादरम्यानच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेच्या नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्याग केला. या गोंधळातच राज्यपालांचे भाषण गोंधळातच सुरू होते. दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी राज्यपालांची भेटही घेतली. मराठी भाषांतराच्या घोळावर विनोद तावडेंना स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘राज्यपालांचं अभिभाषण मराठीत अनुवाद करणारा व्यक्ती भाषांतर कक्षेत नसल्याने मी स्वत: मराठीत भाषांतर केले. मोघलांना जसे सगळीकडे संताजी-धनाजी दिसत होते तसें काहींना गुजरातीत भाषण ऐकायला आलं असेल. पण या सर्व प्रकाराची चौकशी विधानसभा अध्यक्ष करतील.’ असं तावडे यावेळी म्हणाले.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यपालांचं अमित शहांना पत्र लिहून स्पष्टीकरण; “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही…’
राज्यपालांचं अमित शहांना पत्र लिहून स्पष्टीकरण; “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही…’
राज्यपालांचं अमित शहांना पत्र लिहून स्पष्टीकरण; “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही…’ मुंबई – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभर त्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला गेला. विरोधी पक्षातीन नेत्यांशिवाय भाजपतील काही लोकांना कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे गटाचे नेतेही राज्यपाला यांच्या वादग्रस्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, राज्यपालांचं अमित शाह यांना पत्र
“महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, राज्यपालांचं अमित शाह यांना पत्र
“महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, राज्यपालांचं अमित शाह यांना पत्र मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय. “महापुरुषांच्या अनादराची स्वप्नातही कल्पना करू शकत नाही”, असं कोश्यारी यांनी पत्रात म्हटलंय. बातमी अपडेट होत आहे. राज्यपालांचं अमित शाह यांना पत्र Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्यपालांचं चहा-बिस्किट न खाता, का रे… विचारा, भाजप नेत्यांना संजय राऊत यांचं आव्हान
राज्यपालांचं चहा-बिस्किट न खाता, का रे… विचारा, भाजप नेत्यांना संजय राऊत यांचं आव्हान
राज्यपालांचं चहा-बिस्किट न खाता, का रे… विचारा, भाजप नेत्यांना संजय राऊत यांचं आव्हान मुंबईः महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगण्याऱ्या कर्नाटक सरकारला (Karnataka Government) कारे म्हणण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारमध्ये नाही. तसेच महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati shivaji Maharaj) यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना का रे… शिवरायांचा अपमान केला, हे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
कर्करोगाच्या औषधांवरच्या जीएसटीत सात टक्के कपात-मंकीपॉक्सच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी करण्याचे केंद्राचे निर्देश
राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात १९ टक्के वाढ 
आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन-ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा फुलल्या
आणि
पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या बारा दरवाजातून सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू
****
कर्करोगा औषधांवरचा जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १२ वरुन पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. काल नवी दिल्लीत परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. फरसाण आणि इतर पदार्थांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य विम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमी करण्याचा मुद्दा मंत्र्यांच्या गटाकडे पाठवला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारशी सुचवायला सांगितल्या असून, त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.
****
मंकीपॉक्स रोगाच्या सर्व संशयित प्रकरणांची पडताळणी आणि चाचण्या करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या रोगाबाबत जनतेत असलेली भीती दूर करण्यासाठी तसंच जनजागृतीसाठी उपाय योजावेत, असं केंद्रानं राज्यांना सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं एकंदर परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असून, याबाबत सर्व राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर येत्या ११ तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकाकर्ते मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.
****
शाळा, शालेय आवार तसंच शाळेसाठीच्या वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे उपाय सुचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीचं नेतृत्व निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी या करणार आहेत. या समितीनं २९ ऑक्टोबरपर्यंत आपल्या शिफारशी आणि सूचनांचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत.
****
शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत. काल मुंबईत पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाबाबत माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेऊन ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाच्या ॲपचं आज लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही घोषणा केली. मार्च २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ही वाढ लागू करण्यात आली आहे. महानिर्मिती कंपनीतील कामगारांनी ई.एस.आय.सी.ची वेतन मर्यादा ओलांडली असल्याने आता ऊर्जा विभागाच्या सर्व कंपन्यातील कंत्राटी कामगारांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा सुविधा लागू करण्यात येत असल्याचंही फडणवीस यांनी जाहीर केलं.
****
प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये मंजूर आकृतीबंधाच्या ५० टक्के जागा मिळणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. परळीतल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसंच मागण्या प्राधान्यानं सोडवल्या जातील, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून, शहरातल्या लोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजक तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. राजकीय पक्षांचे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांना देखील चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. आज दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास राज्यपालांचं शहरात आगमन होईल.
****
राज्यातल्या सगळ्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढच्या एकत्रित वाटचालीच्या दृष्टीनं राज्यात जळगाव, मनमाड आणि नागपूर इथे जाहीर कार्यक्रम घेणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.
****
अखिल भारतीय मजलिस - ए - इत्तेहादूल मुसलमिन - एआयएमआयएम पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील, मालेगावातून आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, धुळे इथले आमदार फारुख शहा, सोलापूर इथून फारुख शाब्दी, तर मुंबई इथून रईस लष्करिया यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं ओवेसी यांनी सांगितलं.
****
नंदुरबार इथं काल बाल हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांच्यासह त्यांच्या बालसहकाऱ्यांच्या ८२ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनासह, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी हुतात्मा स्थळावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
****
गणेशोत्सवात आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती काल शेतकरी, पोलीस तसंच स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली. मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल मुख्यमंत्री शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणेशाचं दर्शन घेतलं. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजासह इतरही गणेश मंडळांना शहा यांनी भेट दिली.
****
परदेशात गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, याचा आपण दररोज आढावा घेत आहोत. आज आपण जपानमध्ये टोक्यो इथल्या गणेशोत्सवाबाबत तिथे राहणाऱ्या प्राची धर्मे यांच्याकडून जाणून घेत आहोत...
आमच्या काही मित्रांच्‍या घरी गणपतीच्या मातीच्या सुंदर मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते. आम्ही बाप्पासाठी घरच्या प्रमाणे पारंपारिक पद्धतीने पदार्थ प्रसाद बनवतो. आणि त्यात अशा काही जपानी पदार्थांचाही समावेश करतो. प्रत्येकजण आपल्याला शक्य असेल तसं इथं असलेले भारतीय कुटुंब किंवा मित्रांच्या घरी तर काही जणं कम्युनिटी हॉलमध्ये जमतात आणि गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवानिमित्त आम्ही विविध उपक्रम आयोजित करतो. आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक देवाणघेवाणीत सामील होण्यासाठी आमचे जपानी मित्र सुद्धा आमच्या सोबत या उत्सवात सहभागी होतात.
****
हिंगोली जिल्ह्यात एक हजार चारशे चौसष्ट ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. तर ७१० पैकी ३०५ गावांनी 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबवली आहे.
****
अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असं आश्वासन राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलं आहे. काल नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या नुकसानाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून अहवाल पाठवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे बारा दरवाजे अर्ध्या फुटानं उघडून गोदावरी नदीपात्रात सहा हजार २८८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणात १२ हजार ७४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून, पाणी साठा साडे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीवरचा नियोजित खरबी वळण बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, यात सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार चारशे शहाऐंशी जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. या योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातल्या तेरखेडा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याला शासकीय मान्यता मिळाली आहे. आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी या आरोग्यविषयक महत्त्वाच्या मागणीला एक महिन्याच्या आत तात्काळ मंजुरी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 12 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १२ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज रियासी जिल्ह्यातल्या त्रिकुर्ता टेकड्यांच्या भागात वैष्णोदेवी भवनात दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. तसंच त्या वैष्णोदेवीचं दर्शन देखील करणार आहेत. उप राज्यपाल मनोज सिंन्हा हे देखील त्यांच्यासोबत असतील.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तराखंड दौऱ्यामध्ये आज स्थानिकांनी पारंपारिक पद्धतीनं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत आज उत्तराखंडमधल्या चार हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उदघाटन तसंच प्रकल्पांच्या कार्याचा प्रारंभ होणार आहे. वीज, रस्ते, स्वच्छ पाणी याच्याशी संबंधित हे प्रकल्प आहेत. पंतप्रधानांनी पार्वती कुंड इथं पूजा केली. पंतप्रधानांनी पिठोरगड इथं लष्कर, सीमासुरक्षा दल आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांशी संवादही साधला.
****
बिहारमध्ये काल रात्री बक्सर जिल्हयातल्या अपघातातल्या  मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा रेल्वे प्रशासनानं केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या अपघातातल्या मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकार सर्व जखमींवरच्या उपचारांचा खर्च उचलेल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दूर्घटनेबद्दल सामाजिक संपर्क माध्यमातल्या संदेशाद्वारे दुःख व्यक्त केलं आहे. रघुनाथपूर रेल्वेस्थानकाजवळ ईशान्य जलदगती रेल्वेचे आठ डबे रुळावरून घसरल्यामुळं झालेल्या या अपघातात, चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातले ३० जखमी गंभीर अवस्थेत आहेत. अपघातग्रस्त रेल्वे नवी दिल्लीहून गुवाहाटीकडे निघाली होती. या अपघातामुळं पुणे-दानापूर, लोकमान्य पाटलीपुत्र, आनंदविहार भागलपूर विक्रम शीला जलद रेल्वेसह सुमारे १८ रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
****
राज्यपाल रमेश बैस आज नाशिकमध्ये विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्यपालांचं शहरातल्या आगमनाप्रसंगी स्वागत केलं. राज्यपाल आरोग्य विद्यापीठात एक बैठक घेत आहेत. त्यानंतर ते गंगापूर इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला भेट देतील तसंच विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेणार आहेत. राज्यपाल यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवादही साधणार आहेत.
****
मराठा आरक्षण विषयक मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमंत्री निवासस्थानावर निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाही आणि कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. आरक्षण हे मराठा म्हणूनच आणि कायद्यात टिकणारं पाहिजे, या मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याचं आंदोलकांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, मराठा समाजाला इतर मागास वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावं हीच आपली भूमिका असल्याचं मंत्री छगन भूजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना नमुद केलं.
****
मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती-आयओसीची १४१वी बैठक येत्या १५ ते १७ तारखेदरम्यान होणार असून या साठी समितीचे सदस्य मुंबईत दाखल होत आहेत. या सत्राआधी आजपासून १४ तारखेपर्यंत आयओसीच्या कार्यकारी मंडळाची मुंबईत बैठक होत आहे. समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यापुर्वीच मुंबईत दाखल झाले असून ते आज सुरू होत असलेल्या या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना होणार आहे. लखनऊ इथं अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रीडासंकुलातला हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल. या स्पर्धेत काल आपला सलग दुसरा विजय नोंदवताना भारतानं अफगाणीस्तानविरुद्ध सहज मात केली. भारताचा या स्पर्धेतला पुढचा सामना शनिवारी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. अहमदाबाद इथं हा सामना होईल. 
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख २५ हजार १७२ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्डच वितरण लवकरचं केलं जाणार आहे. आतापर्यंत ८१ हजार ३१९ लाभार्थ्यांना आरोग्य कार्ड देण्यात आलं असून अजून २ लाख ४३ हजार ८४३ लाभार्थी बाकी आहेत. ३१ डिसेंबर पूर्वी हे कार्ड काढून घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाच्या योगदानावर अधिक संशोधन होण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त; महाराष्ट्र दौरा आटोपून राष्ट्रपत���ंचं दिल्लीकडे प्रस्थान.
राज्य विधिमंडळाचं १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मुंबई इथं पावसाळी अधिवेशन.
काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडून खंडन.
आणि
शाळांनी भू-वारसा स्थळांच्या सहली आयोजित कराव्यात - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन.
****
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान फार मोठं असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत राजभवनातल्या भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिकारकांच्या दालनांपैकी आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती बोलत होत्या. या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून, राष्ट्रपतींनी अभिवादन केलं.
त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपूजा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. संस्थानच्या वतीनं साईबाबांची मूर्ती देऊन राष्ट्रपती तसंच राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं. शिर्डीहून राष्ट्रपतींनी वायूदलाच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदी आडनावाच्या वक्तव्यावरील शिक्षेवरील पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. राहुल गांधी यांना या संदर्भात सुनावलेल्या दोन वर्ष तुंरूगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत सुरत सत्र न्यायालयानं गांधी यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यानंतर गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आलं आहे.
****
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मुंबई इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.
****
येत्या ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान “महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. आज झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयावर चर्चा झाली. १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषद शतकपूर्तीचा कालखंड मानला जातो. मात्र कोविड-19 मुळे हा महोत्सव साजरा करणे शक्य न झाल्यामुळे यंदा या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवाद, वरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळा, विधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्त्वाची विधेयकं, ठराव, प्रस्ताव यांचं पुस्तक स्वरुपात संकलन, शतकपूर्ती कालावधीतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित “एक दृष्टिक्षेप” या पुस्तिकेचं प्रकाशन यासारख्या विविध उपक्रम तसंच कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात येणार आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
****
बुलढाणा जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात सामील झाले. त्यांनी आज अधिकृतरित्या पाठिंबा देण्याचं जाहिर केलं. शिंगणे हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्या आज परळी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे एखाद्याची विश्वासार्हता संपते, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे माध्यमांनी खात्री करुन बातम्या द्याव्या, असं त्या म्हणाल्या. चुकीचं वृत्त देणाऱ्या माध्यमाविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेली अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यात्रा मार्गावरील हवामान सुधारल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. काल संध्याकाळपर्यंत ८५ हजार भाविकांनी श्री अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, उत्तराखंडमधल्या चमोली इथं डोंगरावरून दगड पडल्यानं बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. गेल्या दहा दिवसांत हा महामार्ग चौथ्यांदा बंद झाला आहे.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ नुकत्याच झालेल्या खासगी बस जळीत कांडाच्या तपासात संबंधित बसचालक अपघातावेळी मद्यधुंद असल्याचं न्यायवैद्यक अहवालातून समोर आलं आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, बसचालक शेख दानिशच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा ३० टक्के अधिक अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे, तर बसचालकाच्या मद्यपानामुळे घडला होता का, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. ३० जूनला मध्यरात्री ही बस दुभाजकाला धडकून पेटल्यामुळे २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
****
यंदा आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे पाच हजार विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. यामधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, २७ कोटी ८८ लाख रुपये इतकं उत्पन्न झाल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. यात्रेसाठी औरंगाबादसह मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
****
विद्यार्थ्यांना भू-वारसा स्थळांविषयीची माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त शाळांनी भू-वारसा स्थळांची सहली काढाव्यात असं आवाहन केंद्रीय कोळसा आणि खनिज राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. केंद्रीय खनिज मंत्रालय आणि भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्यावतीनं औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा इथं आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भू वारसा स्थळांच्या जनजागृती मोहीमेअंतर्गत ‘अजिंठा लेणी एक भू वारसा स्थळ’ हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दानवे बोलत होते.
राज्यात अजिंठा- वेरूळ लेणी, लोणार, महाबळेश्वर मधील पाचगणी पठार, अहमदनगर जिल्ह्यात निघोज आणि गडचिरोली जिल्ह्यात वडधम ही भू वारसा स्थळे असून या ठिकाणी शैक्षणिक सहल काढून त्यांच्या विषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी असं दानवे यावेळी म्हणाले‌. प्रस्तावित जालना - जळगाव १७४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी लवकरच भू संपादन प्रक्रिया सुरू होईल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिलं. अजिंठा लेणीमुळे गावातल्या शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी होणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे अब्दुल सत्तार यांनी यावेळी लक्ष वेधले. जालना जळगाव रेल्वे मार्ग सिल्लोडसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
****
सामुहिक सेवा केंद्र धारकांनी पीक विमा नोंदणी करताना अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी आयुक्त, सुनील चव्हाण यांनी केलं आहे. काही सामुहिक सेवा केंद्र धारकांनी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्याचं विभागानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. याआधीचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांना कार्यालयाच्या वतीनं निरोप देण्यात आला. त्यांची सिंधुदूर्ग इथं जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी मुदखेड तालुक्यातल्या शाळांना भेटी दिली. शिक्षकांचे पाठ निरीक्षण, शालेय पोषण आहाराची पाहणी, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शालेय मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आदी उपक्रमांची पाहणी बिरगे यांनी यावेळी केली.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी कुशल तरुणांना संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. स्वत:मधला विद्यार्थी कायम जागृत ठेवा, असा सल्ला त्यांनी उमेदवारांना यावेळी दिला. संरक्षण सामग्री आणि मोबाईल संच यासारख्या वस्तुंची आयात करणारा भारत आज यांची निर्यात करणारा देश बनला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
मुंबईत केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते, पुण्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, तर नांदेड इथं केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रं देण्यात आली.
नागपूर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी २१० उमेदवारांना नियुक्तीपत्रं प्रदान केली. नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपलं ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासाचा जीवनात तसंच समाजासाठी उपयोग, कठोर परिश्रम आदींवर लक्ष देणं आवश्यक असल्याचं कराड यांनी यावेळी सांगितलं.
***
आनंदाचा शिधा आणि विविध शासकीय योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी चार वाजता दूरस्थ पद्धतीनं संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून सहभागी होणार आहेत.
***
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उद्या साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेतलं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, यांनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचं स्वागत केलं. 
***
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या महात्मा गांधी भवन इथं विशेष अभिवादन सभा संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत आणि वर्तमान परिस्थिती, या विषयावर मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. तसंच छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं आज संध्याकाळी साडे सहा वाजता विशेष व्याख्यान होणार आहे. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं उद्या सकाळी नऊ वाजता भडकल गेट इथल्या डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ अभिवादन सभा होणार असल्याची माहिती, उत्सव समितीचे अध्यक्ष नवीनसिंग ओबेरॉय यांनी दिली.
***
यंदा साखर उतारा कमी आल्यानं साखरेचं उत्पादन कमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेल्या हंगामात साखरेचा उतारा दहा पूर्णांक ४२ शतांश टक्के होता, तो यंदा नऊ पूर्णांक ९८ शतांश टक्क्यापर्यंत घसरला आहे. २०४ साखर कारखान्यांचं गाळप बंद झाल�� असून, सोलापूर, जालना, उस्मानाबाद, बीड आणि सातारा इथल्या सहा साखर कारखान्याचं गाळप अद्याप सुरू असल्याची माहिती साखर आयुक्तालयानं दिली आहे.
***
नांदेडमध्ये येत्या सोळा एप्रिल रोजी होणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, गटशिक्षणाधिकारी रविं��्र जाधव यांनी काल ही माहिती दिली. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या मराठवाडा विभागानं या संमेलनाचं आयोजन केलं आहे.
***
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या ३८ अभ्यास मंडळांच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी दाखल ५९ अर्जांची छाननी काल करण्यात आली. वैध अर्जांची यादी आज संध्याकाळपर्यंत घोषित करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या २५ एप्रिलला मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
***
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या देऊळवाडी इथल्या विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीनं मराठी भाषेतल्या उत्कृष्ट साहित्यकृतींना देण्यात येणारे पुरस्कार काल जाहीर झाले. छत्रपती संभाजीनगर इथले डॉ. रामकिसन दहिफळे आणि लातूरचे कवी ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांचा पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये समावेश आहे. पुढच्या महिन्यात एका विशेष कार्यक्रमात या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंबादास केदार यांनी सांगितलं.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून वाटचाल करा; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांचं आवाहन.
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून २५ जणांविरोधात गुन्हा दाखल.
जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यात ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्‌घाटन.
आणि
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याचा विचार सुरू - आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत.
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून पुढील वाटचाल करा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्येयासाठी झपाटून कामाला लागाल तरच आयुष्यात यशस्वी व्हाल, इतिहासातून प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श ठेवला तर संस्कार निर्माण होतील, परिणामी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. देशाला विश्वगुरु करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं –
सबसे पहले जब यहां से निकलेंगे, हम इस युनिव्हरसिटी से बाहर जायेंगे, तो आज यहां से संकल्प कर के जायेंगे की हम इस देश को विश्वगुरू बनाना है। देश को सर्वश्रेष्ठ बनाना है। चारों ओर वर्ल्ड क्लास सडक बन रही है। वर्ल्ड क्लास एअरपोर्ट बन रहे है। इसके लिए इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, देश आगे बढ रहा है।
परम सुपर संगणकाचे जनक विजय भटकर यावेळी उपस्थित होते. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश हे जसं आव्हान आहे तशी ती संधी असल्याचं भटकर यांनी नमूद केलं. संगणक, बायोटेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान असे आधुनिक विषय मराठीतून शिकवणं गरजेचं असल्याचं मत विजय भटकर यांनी यावेळी व्यक्त केलं. 
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यावेळी मानद डी. लिट. पदवी कुलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
 
पवार यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्यात साखरेवर संशोधन करणारी राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक संस्था जालना इथं उभारण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात या कामाला गती मिळणार असल्याची माहिती दिली.  
तर गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारत घडवण्यात तसंच भारताला सुपर इकोनॉमिक पावर बनवण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने मुंबईतल्या एका खासगी कंपनी, तसंच कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून, या आरोपींनी २८ बॅंकांच्या समूहाची २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार भारतीय स्टेट बँकेनं केली होती. त्या तक्रारीच्या आधारे संबंधित कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ खासदार शेवाळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला, त्यावेळी शेव���ळे बोलत होते. शिवसेनेला सावरकरांविषयी खरोखरच आदर असेल तर त्यांनी त्वरित महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, असं शेवाळे म्हणाले.
****
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. खासदार सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.
****
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. लक्ष्मीबाईंनी देशासाठी दिलेलं अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. साम्राज्यवादाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम प्रेरणादायक राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
तरुणांना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याचा उद्देशाने आज नागपूर इथं भारतीय वायुसेने कडून एअर फेस्ट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. वायुसेनेच्या वैमानिकांनी यावेळी चित्तथरारक हवाई कवायती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. हवाई कवायती बघण्यासाठी नागपुरातील सुमारे ५ हजार नागरिक यावेळी सहभागी झाले होते.
****
५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं उद्या गोव्यात दिमाखदार सोहळ्यानं उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ७९ देशातले २८० चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पणजी शहर चित्रपटप्रेमींनी गजबजू लागलं आहे.
****
विकास कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं, असं केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यातल्या ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्‌घाटन आज जालना इथ दानवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय योजनांचा फायदा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी गावाचा सर्वांगिण विकास करावा, तसंच शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्याच्या माध्यमातून आथिक उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला दानवे यांनी यावेळी दिला. या पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर पाणी दररोज मिळणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याच्या विचार सुरू असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते आज परांडा इथं बोलत होते. केंद्र सरकारने या अभियानाचं कौतुक केलं असून आता केंद्र सरकार हे अभियान देशपातळीवर राबवण्याचा विचार करत आहे. राज्यात या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता देशपातळीवर हे अभियान तेवढ्याच प्रमाणावर राबवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक पथक राज्यात अभ्यासासाठी पाठवत असल्याचं सावंत म्हणाले.
या अभियानाच्या माध्यमातून साडेतीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर राज्यातील सर्व महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालयातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उपचारांवर भर दिला जाणार आहे. आजारांचे निदान झालेल्या अधिकाऱ्यांना चांगले उपचार देण्याचे प्रयत्न केले जातील. ज्या महिलांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार केले जातील, असं सावंत यांनी सांगितलं.
 
ग्रामीण भागात होणारं पहिलं महाआरोग्य शिबिर २७ नोव्हेंबरला परांडा इथं आयोजित करण्यात आलं असून, यामध्ये राज्यभरातून सहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. सावंत यांनी परांडा इथं या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. परंडा शहरातल्या मुख्य रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनही सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात आज पहाटेपूर्वी दोन वाजून सात मिनिटांनी भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात होता. २ पूर्णांक ४ इतकी रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे परिसरात कोणतेही नुकसान झालं नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
शरद साखर कारखान्याच्या माध्यमातून मंत्री संदिपान भुमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला असून, या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
राज्यपालांचं समर्थन करणं अडचणीचं ठरलं, दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जोडे मारत पेटवून दिला!
राज्यपालांचं समर्थन करणं अडचणीचं ठरलं, दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जोडे मारत पेटवून दिला!
राज्यपालांचं समर्थन करणं अडचणीचं ठरलं, दानवेंचा प्रतिकात्मक पुतळा जोडे मारत पेटवून दिला! जालना : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यातच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने संतप्त झालेल्या शिवभक्तांनी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत पुतळ��याचं दहन केलं. युवा सेनेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes