#रणजित निंबाळकर
Explore tagged Tumblr posts
Text
रणजित निंबाळकर म्हणाले,'आम्ही आधीपासूनच बरोबर आहोत'; उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा
रणजित निंबाळकर म्हणाले,’आम्ही आधीपासूनच बरोबर आहोत’; उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा
साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेयांनी संभाव्य भाजपप्रवेशाबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. भाजप प्रवेशाचं काही माहिती नाही, असं सांगतानाच भाजप खासदार रणजित नाईक-निंबाळकर यांच्यावर उदयनराजेंनी कौतुकाचा वर्षाव केला.
फलटणमध्ये एका खाजगी दौऱ्यावेळी उदयनराजे आणि रणजित निंबाळकर पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजित निंबाळकर हे माढ्यातून खासदार…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २० जून २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
राज्य विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, आणि प्रसाद लाड, शिवसेनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, आणि एकनाथ खडसे, तर काँग्रेसचे, भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे, असे एकूण ११ उम��दवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला २६ मतं मिळवण्याची आवश्यकता आहे.
****
उत्तराखंड, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि गुवाहाटी या पाच उच्च न्यायालयांसाठी, मुख्य न्यायाधीशांची नेमणूक केंद्र सरकारनं केली आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमजद अहतेशाम सईद यांना हिमाचल प्रदेश, तर न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांना, राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर तीन वेगवेगळ्या ठिकणी झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह सात दहशतवादी मारले गेले. कुपवाडा इथं सैन्याच्या २८ राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त तपासणी मोहिमेदरम्यान एक चकमक झाली, त्यात लष्कर - ए - तय्यबाचे दोन पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले. कुलगाम इथं झालेल्या पोलिसांच्या कारवाईत दोन स्थानिक दहशतावदी मारले गेले.
****
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी रणजित सावरकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सावरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा ते हिंगोली रस्त्यावर स्वस्त धान्य दुकानातली १८५ पोती गहू आणि तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारी दोन वाहनं पोलिसांनी काल पकडली. यावेळी पोलिसांनी एकूण ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
****
बंगळुरु इथं काल भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पाचवा टी ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी दोन - दोन अशी बरोबरी साधली.
****
0 notes
Text
भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे म्हणाले....
भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे म्हणाले….
उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच संभाव्य भाजपप्रवेशावर सुरु असणाऱ्या चर्चेवर भाष्य केलं आहे. ���ाजपा प्रवेशाचं काही माहिती नाही असं त्यांनी म्हटलं आहे. फलटणमध्ये उदयनराजे आणि रणजित निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रणजित निंबाळकर हे भाजपाचे माढ्यामधून खासदार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसंबंधी बोलताना उदयनराजे भोसले यांनी सांगितलं की, “भाजपा प्रवेशाचं काही माहिती नाही. पूरग्रस्तांच्या…
View On WordPress
0 notes
Text
आता 'या' मोहिते पाटलांचा देखील भाजपला पाठींबा
आता ‘या’ मोहिते पाटलांचा देखील भाजपला पाठींबा
मोहिते पाटील घराण्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर लगेच राष्ट्रवादीच्या जवळ गेलेले त्यांचे कट्टर विरोधक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी अखेर आपला पाठिंबा भाजपचे उमेदवार रणजित निंबाळकर यांना जाहीर केला. यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व मोहिते पाटील परिवार एकत्रित भाजपच्या मागे उभा राहिल्याचे चित्र आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या दिवशीच…
View On WordPress
#breaking news marathi#dhavalsingh nimbalkar#latest marathi news#rajit singh nimbalkar#धवलसिंह मोहिते पाटील#रणजितसिंह निंबाळकर#रणजितसिंह मोहिते- पाटील
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ एप्रिल २०१९ सकाळी ७.१० मि. **** शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधानांची वर्ध्याच्या सभेत टीका लोकसभा निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांची एक आघाडी होऊ शकते- काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात वाढ येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज आणि लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक इच्छूक उमेदवारांचे अर्ज दाखल; पुण्यातून काँग्रेसची मोहन जोशी यांना उमेदवारी **** शांतताप्रेमी हिंदूंचा दहशतवादाशी संबंध जोडून, हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी काल वर्धा इथून, महाराष्ट्रातल्या भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेला प्रारंभ केला. घराणेशाही, भ्रष्टाचार, आदी मुद्यां��रूनही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार वाऱ्याची दिशा अचूक ओळखतात, त्यामुळेच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं मोदी म्हणाले. पवार यांच्या कार्यकाळात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मोदी यांनी केला. दरम्यान, काँग्रेस पक्षानं, मोदी यांचा हा आरोप खोटा असल्याचं म्हटलं आहे, वरिष्ठ भाजप नेते, तत्कालीन गृहसचिव आर के सिंह यांनी हिंदू दहशतवाद या शब्दाचा सर्वप्रथम वापर केल्याचं, काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी सांगितलं. **** देशहिताच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याकरता सर्व विरोधी पक्ष एक झाले आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्रित येऊन मतदानोत्तर एक आघाडी करू शकतात, असं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणं, लोकशाही आणि संविधान वाचवणं या कामाला सर्वाधिक प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय संस्था आणि सामाजिक रचना उद्ध्वस्त करण्यापासून भाजपला रोखणं, विकास आणि अर्थव्यवस्थेला गती देणं, रोजगार निर्मिती, सामाजिक सौहार्द निर्माण करणं तसंच अन्याय आणि असमानतेच्या विरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असल्याचं गांधी यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. **** काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या विरूद्ध केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून भारतीय धर्म जन सेनेचे तुषार वेल्लाप्पल्ली हे उमेदवार असतील, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. केरळमध्ये भाजप आणि भारतीय धर्म जन सेनेची आघाडी आहे. **** लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या गुरूवारी संपत आहे, त्यामुळे संबंधित मतदार संघात, काल अनेक ठिकाणी इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड, अपक्ष म्हणून संगीता निर्मळ, बहुजन महा पार्टीच्या वतीनं शेख नदीम शेख करिम, अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे, तर माढा लोकसभा मतदार संघातून रणजित नाईक निंबाळकर, रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नीलेश राणे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे धनंजय महाडिक, शिवसेना-भाजप युतीचे संजय मंडलिक, वंचित बहुजन आघाडीच्या अरुणा माळी यांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेना भाजप युतीचे धैर्यशील माने, आणि वंचित बहुजन आघाडीचे असलम सय्यद यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. जालना लोकसभा मतदार संघातून अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे तर शहादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून, अर्ज दाखल केला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ये��ले आणि एका अपक्ष उमेदवारानं काल अ��्ज दाखल केले. दरम्यान, काल काँग्रेसनं आणखी नऊ उमेदवारांची एक यादी जाहीर केली. यामध्ये पुणे मतदार संघातून मोहन जोशी यांना तर रावेरमधून डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोजगारात १ एप्रिलपासून दरवाढ करण्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या प्रस्तावास निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारा रोजगार हा कृषी कामगारांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाशी संलग्न असून दरवर्षी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, १ एप्रिल रोजी त्याचे नवे दर जाहीर केले जातात. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे ग्रामविकास मंत्रालयानं हे दर जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे दर असल्यामुळे ही दरवाढही वेगवेगळी आहे. सध्याच्या दराच्या तुलनेत ही दरवाढ पाच टक्के आणि त्यापेक्षा अधिक आहे. **** येत्या आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या हवामान केंद्रानं वर्तवली आहे. मराठवाड्यात चार दिवस तर विदर्भात पाच दिवस ही उष्णतेची लाट राहील. काल राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४३ पूर्णांक ४ डिग्री सेल्सीअंश इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान, मध्य भारतात यंदा एप्रिल ते जून या काळात, नेहमीपेक्षा अर्धा अंश सेल्सियस अधिक तापमान राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या भागात पुढचे तीन महिने तापमापकाचा पारा कमाल चव्वेचाळीस अंशांपर्यंत वाढू शकतो, अशी शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नांदेड लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारांना पेड न्यूज प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी नोटीसा बजावल्या आहेत. अपक्ष उमेदवार डॉ महेश तळेगावकर यांच्यासंदर्भात दैनिक श्रमिक एकजूट आणि दैनिक नांदेड एकजूट या वृत्तपत्रातून प्रसारीत झालेल्या बातम्यांवरून तसंच दैनिक पुढारी या दैनिकात अपक्ष उमेदवार अशोक चव्हाण यांच्या नावापुढे लोहा असा उल्लेख आल्यानं उमेदवाराची वेगळी ओळख प्रदर्शित झाली. त्यामुळे त्या पेडन्युजच्या व्याख्येत येत असल्याच्या कारणाने दोघाही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. **** लातूर लोकसभा मतदार संघातली लढत ही तिरंगी होणार आहे. भाजपा सेना युतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छींद्र कांमत हे दोघे करोडपती उमेदवार आहेत, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राम गारकर त्यांच्याशी झुंज देत आहेत. या तिन्ही उमेदवारांनी आपल��� संपत्तीविषयक विवरण निवडणूक विभागाला सादर केलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.. भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या परिवाराकडे साडे अठ्ठावीस कोटींची मालमत्ता आहे.तर काँग्रेसचे उमेदवार मच्छींद्र कामत यांच्याकडे अकरा कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार जे निवृत्त शासकीय अधिकारी आहेत राम गारकर यांच्याकडे मात्र अवघे ७९ लाख अठ्याहत्तर हजार आठशे तेहतीस रूपये आहेत. स्वत:च्या मालकिची एक दुचाकी आणि एक स्विफ्ट कार वाहन आहे. आणि या दोघांचा जर विचार केला तर श्रृंगारे आणि मच्छींद्र कामत हे दोघं उद्योजक आहेत त्यामुळे होणारी लढाई ही कोट्याधीशांमधली होणार आहे. **** बीड लोकसभा मतदार संघातल्या शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपासंदर्भात आपणच निवडणूक आयोगाकडं सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल बीडमध्ये वार्ताहरांशी बोलत होत्या. तर खासदारकीचा निधी आपण जिल्ह्याच्या विकास कामांसाठी खर्च केला असून राज्य आणि केंद्र सरकारच्या देखील विविध योजनांचा निधीही जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणला असल्याचा दावा यावेळी डॉक्टर प्रितम मुंडे यांनी केला. **** राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून ते मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. दरम्यान, सोनवणे यांना जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षानं पाठिंबा दिला आहे. पक्षाचे राज्य समन्वयक अॅड.विशाल कदम यांनी ही माहीती दिली. **** परभणी मतदार संघाचा प्रचाराला गती येत आहे. याविषयी अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून परभणी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार संजय जाधव यांनी जिंतूर, सेलू इथं शिवेसना भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय विटेकर यांनी काल परभणी तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांनी पालम, गंगाखेड शहराला भेट देवून मतदारांशी हितगुज साधले. हळुहळु सर्व उमेदवारांच्या प्रचाराला वेग येत असल्याचे दिसून येते. **** लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक एन. आर. पाटील आणि चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिशन तेलंग यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार विनायकराव पाटील उपस्थित होते. **** बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा तांडा इथं पाण्याचे ड्रम भरून ठेव���ेली बैलगाडी उलटून दोन लहान मुले चिरडून ठार झाली. काल ही घटना घडली. पाण्याचे ड्रम भरून ठेवलेल्या या बैलगाडीखाली ही मुलं खेळत असतांना बैलगाडीला लटकल्यामुळं बैलगाडी उलटून ही घटना घडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 April 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १ एप्रिल २०१९ सायंकाळी ६.०० ****
काळा पैसा वैध केल्याप्रकरणी, उद्योजक रॉबर्ट वॉड्रा यांना आज दिल्ली न्यायालयानं पाच लाख रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. वॉड्रा यांना न्यायालयाच्या पूर्व परवानगी शिवाय ��ेशाबाहेर जाण्याची मनाई करण्यात आली आहे. वॉड्रा यांच्याविरोधात, काळा पैसा वैध करण्याच्या व्यवहारातून लंडन इथं, मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे.
****
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी, गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २०१५ मध्ये दंगल घडवल्याप्रकरणी गुजरात मधल्या सत्र न्यायालयानं, पटेल यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती, या निर्णयाला स्थगिती देण्याची पटेल यांची मागणी गुजरात उच्च न्यायालयानं फेटाळून लावली, त्यानंतर पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करत, तत्काळ सुनावणी घेण्याची विनंती केली. हार्दिक पटेल काँग्रेसकडून गुजरातमधल्या जामनगर इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, मात्र या मतदार संघात अर्ज दाखल करण्याची मुदत चार एप्रिलला संपते आहे.
****
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत चार एप्रिलला संपते आहे, त्यामुळे संबंधित मतदार संघात, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होत आहे. आजही अनेक ठिकाणी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार, सुभाष झांबड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जोरदार शक्तीप्रदर्शन करत, क्रांतीचौक ते शहागंज अशी मिरवणूक काढून, सुभाष झांबड आज दुपारी आपल्या समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले. झांबड यांच्यासह औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आजपर्यंत राजकीय पक्ष तसंच अपक्ष उमेदवारांचे एकूण नऊ अर्ज दाखल झाले आहेत.
****
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे डॉ.सुजय विखे यांनी आज आपला अर्ज दाखल केला. सुजय विखे यांनी, मोठं शक्तिप्रदर्शन करत, शहरातल्या दिल्ली दरवाजापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढून अर्ज भरला. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुजय यांचे वडील, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मात्र यावेळी गैरहजर असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
माढा लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे रणजित नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रणजीतसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
****
जालना लोकसभा मतदार संघासाठी आज अखिल भारतीय सेनेचे गणेश शंकर चांदोडे यांनी तर शहादेव महादेव पालवे यांनी अपक्ष म्हणून, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता पाच झाली आहे.
****
लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी प्रसारण तासांचे वाटप आज करण्यात आलं. सात राष्ट्रीय पक्षांना राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी सहाशे मिनिटे तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रसारणासाठी ९०० मिनिटे मिळतील. ५२ राज्यस्तरीय पक्षांना, राष्ट्रीय प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी पाचशे वीस मिनिटे, तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एक हजार आठशे मिनिटं मिळणार आहेत.
****
सैन्य दलाचा पुणे इथला दक्षिण कमांड आज आपला १२५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हा भारतातला सर्वात जुना आणि मोठा कमांड असून याची स्थापना एक एप्रिल १८९५ रोजी करण्यात आली आहे. ११ राज्यं आणि चार केंद्रशासीत प्रदेशांच्या संरक्षणाची जबाबदारी, या दक्षिण कमांडवर आहे. या निमित्त आज पुण्यात राष्ट्रीय युध्दस्मारकावर अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जालना तालुक्यातल्या रोहनवाडी सज्जाचे तलाठी प्रसाद हजारे याला पाच हजार रुपये लाच घेताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ अटक केली. भुखंडाचा फेर घेऊन सातबारा देण्यासाठी त्यानं दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंबंधी तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं सापळा रचून त्याला अटक केली.
//************//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि
**** ** मुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रकरणी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव ** पीक विमा योजनेला पाच ऑगस्टनंतर मुदतवाढ न देण्याची सरकारची घोषणा ** नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांचा राजीनामा ** औरंगाबाद महानगर पालिकेची बेकायदेशिर धार्मिक स्थळ हटवण्याची मोहीम सुरूच; कारवाईत भेदभाव होत असल्याचा शिवसेनेचा आरोप, कारवाई थांबवण्याची खासदार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांची मागणी आणि ** मराठवाडा विकास आंदोलनातले मार्गदर्शक पत्रकार हेमराज जैन यांचं निधन **** मुंबई विद्यापीठाचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर होतील अशी ग्वाही देऊनही, ते जाहीर न केल्याबद्दल, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात शिवसेनेनं काल विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडला. शिवसेनेच��� अनिल परब यांनी मांडलेल्या या प्रस्तावावरुन विरोधकांबरोबर खडाजंगी झाली. हा प्रस्ताव मांडताना सात जणांचं अनुमोदन हवं तसंच सत्ताधारी सदस्यांना मंत्र्यांविरोधात हक्कभंग मांडता येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी सांगितलं. आधी सत्ता सोडा, मग हक्कभंग मांडा असा टोला, काँग्रेसचे नारायण राणे यांनी लगावला. मात्र उपसभापतींनी प्रस्ताव स्वीकारत, यावर खुलासे नोंदवल्यावर निर्णय दिला जाईल असं स्पष्ट केलं. याच मुद्यावरुन आधी विरोधकांनी गदारोळ केला. मंत्री तावडे यांनी राजीनामा द्यावा, आणि कुलगुरुंना पदावरुन हटवावं अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित आलं होतं. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी भायखळा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर आणि प्रभारी कारागृह अधीक्षक तानाजी करबुडवे यांना निलंबित करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल विधानपरिषदेत केली. आरोपींचा बचाव केल्याचं समोर आल्याबद्दल, या प्रकरणातल्या तत्कालीन तपास अधिकारी, कारागृह पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची चौकशी, सचिव वर्गाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल, असं गृहराज्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. **** पीक विमा योजनेसाठी पाच ऑगस्टनंतर मुदतवाढ देता येणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज कामकाज सुरु होताच पीक विमा योजनेत सहभागी होण���यासाठी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असून, त्यामुळे या योजनेला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली. या योजनेसाठी पैसे भरण्याची पूर्वीची ऑनलाईन पद्धत वाढत्या गर्दीमुळे ऑफलाईन केल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. **** पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी केली आहे. काल लोकसभेत २०१७-१८ साठीच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, तसंच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, असंही सातव म्हणाले. **** दहीहंडीची उंची वाढवण्याबद्दलची याचिका सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केली आहे. त्यामुळे या याचिके संदर्भात यापुढची सुनावणी येत्या सात ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. उच्च न्यायालयानं २०१४ साली दहीहंडीची उंची २० फुटांहून कमी आणि गोविंदांचं वय १८ वर्षांहून जास्त ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दहीहंडी आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, सुरक्षेची हमी घेत असल्याचं सांगत, दहीहंडीची उंची वाढवण्याची परवानगी मागितली होती. यंदा येत्या १५ ऑगस्टला दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. **** नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं काल जाहीर केलं. शिक्षण क्षेत्रात पुन्हा काम करण्यासाठी ते राजीनामा देत असल्याचं, पीटीआयनं म्हटलं आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंतच ते पदभार सांभाळतील. नियोजन आयोगाच्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पनगरिया यांची २०१५ मध्ये नियुक्ती झाली होती. **** येत्या नऊ ऑगस्टला होणाऱ्या मराठा मोर्चापूर्वी, आंदोलकांनी सरकारबरोबर चर्चा करावी, असं आवाहन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल औरंगाबाद शहरातून वाहन फेरी काढण्यात आली. **** तूर खरेदी घोटाळा प्रकरणी जालना जिल्ह्यातल्या ४९ व्यापाऱ्यांची बँक खाती संशयास्पद आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना दिली. यासंदर्भातला अहवाल राज्य शासनाकडं पाठवला असल्याचं त्यांनी सांगितलं. जालना बाजार क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेडच्या केंद्रावर तूर विक्री केलेल्या ८०० खात्यांची चौकशी करण्यात आल्याचं ते म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या कारवाईत काल औरंगाबाद महानगर पालिकेनं तीन मंदिरं हटवली. यात पहाडसिंगपुरा इथले दोन मंदिरं, आणि सिडकोतल्या एका मंदिराचा समावेश आहे. या कारवाईत सगळ्या धर्मांची धार्मिक स्थळं पाडली जात नसून, महानगर पालिका यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, शिवसेनेच्या नगर सेवकांनी काल ��रंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त डी. एम मुंगळीकर यांना दोन तास घेराव घातला. दरम्यान, महानगरपालिकेनं सुरू केलेली कारवाई थांबवण्याचे आदेश राज्य सरकारला द्या, अशा मागणीचं एक निवेदन काल खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दिलं. तर ही कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारनं मध्यस्थी करावी, अशी मागणी, एम.आय.एमचे आमदार इम्तियाज जलील यांनी काल विधानसभेत केली. **** मराठवाडा विकास आंदोलनातले मार्गदर्शक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार हेमराज जैन यांचं काल परभणी इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या निर्मिती आंदोलनात त्यांचं मोलाचं योगदान होतं. मॉडेल एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. परभणी नगरपालिकेचे नगरसेवकासह अन्य विविध पदांवर त्यांनी काम केलं होतं. आज सकाळी ९ वाजता त्यांच्यावर परभणी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** औरंगाबाद इथले मजलिस-ए-इतेहाद्दुल मुस्लिमीन -एमआयएम पक्षाचे नगरसेवक जमीर कादरी यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी घेतला. कादरी यांचं जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. **** संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या ८२४ व्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पैठण दरवाजा ते संस्थान गणपती मंदीर या मार्गावर निघालेल्या या शोभायात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. **** लातूर शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित दुकानदार, फेरीवाले यांचं पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी अभ्यास करत असून गरजूंना महापालिका योग्य तो मोबदला देईल, अशी माहिती महापौर सुरेश पवार यांनी दिली. यासंदर्भात आयोजित वार्ताहर परिषदेत ते काल लातूर इथं बोलत होते. ही मोहीम अजून काही दिवस सुरु राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. **** केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड नगर परिषदेची निवड झाली आहे. या योजनेतून शहरातल्या प्रत्येक बेघरांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य मिळणार आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी ही माहिती दिली. **** संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणी साठी काल हिंगोली इथं शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आगामी काळात दहा वर्षांच्या कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचं न्यायिक लेखा परीक्षण करावं, यासह अन्य काही मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. **** लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना राज्यभरात आदरांजली वाहण्यात आली. विधानभवनात वि���ान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिळक आणि साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 March 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि. ****
• सैनिक पत्नींचं अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परीषदेत गदारोळ, कामकाज तहकूब • कांदा आणि तूर डाळीच्या हमी भावासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवन परिसरात आंदोलन • नक्षलवाद्यांना मदत करणारा दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन.साईबाबा याच्यासह चार जणांना आजन्म कारावासाची श���क्षा आणि • दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ७५ धावांनी विजय **** सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबद्दल आमदार प्रशांत परिचारकांचं सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी काल दुसऱ्या दिवशीही विधान परीषदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लावून धरली. परिचारक यांचं सदस्यत्व रद्द केलं जात नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू दिलं जाणार नाही, असं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात सांगितलं. परिचारक यांचं वक्तव्य निंदनीय असून, याचं समर्थन कोणीच करु शकत नाही, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. यासंदर्भात सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांच्या गट नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असं आवाहन पाटील यांनी केलं. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी याबाबत चिंता व्यक्त करत, कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. दरम्यान, आमदार परिचारक यांनी वकिलाच्या माध्यमातून महिला आयोगासमोर बिनशर्त माफी मागितली आहे. भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. **** अंमली पदार्थ तस्करांविरोधात विशेष मोहिम सुरु करण्यात आली असून पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी शाखेला आणखी मनुष्यबळ आणि विशेष पोलीस ठाणं देण्यात येईल असं गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा तयार झाल्याची माहिती जलसंपदा मंत्री राम शिंदे यांनी दिली. तर जलयुक्तचं काम उत्कृष्ट असून काही ठिकाणी कागदावरच काम झाल्याचा आरोप विरोधी पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी केला. बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक विधानसभेत काल एकमतानं मंजूर झालं. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या महापौरांच्या निवासस्थानी हे स्मारक उभारण्यात येणार आहे. **** कांदा आणि तूर डाळीला हमी भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल विधान भवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी शेट्टी यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. कार्यकर्त्यांनी यावेळी कांदा आणि तूर डाळ रस्त्यावर फेकली. **** नक्षलवाद्यांना मदत करत असल्याच्या संशयावरुन तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेला दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक जी.एन.साईबाबा याच्यासह जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी हेम मिश्रा, पत्रकार प्रशांत राही, महेश तिरकी आणि पांडू नरोटे यांना काल गडचिरोलीच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. यातील अन्य एक आरोपी, विजय तिरकी याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. नक्षलवादी हिंसक कारवायांसाठी दिल्ली विद्यापाठीतल्या युवा कार्यकर्त्यांना तयार करणं, त्यांना गडचिरोलीतल्या जंगलांमध्ये कारवायांसाठी पाठवणं, माओवादी कट्टर विचारांचा प्रसार करणं या आरोप���खाली साईबाबाला २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्याकडून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, सीडी, कागदपत्रे, व्हिडिओ टेप, माओवादाचं प्रसार साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं होतं. **** सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं झालेल्या गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी डॉ.बाबासाहेब खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी काल बेळगाव इथं अटक केली. म्हैसाळ इथल्या गर्भपात केंद्रावर छापा टाकल्यानंतर तिथे १९ भ्रूण पुरलेले आढळल्याप्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर खिद्रापुरे तीन दिवसांपूर्वी फरार झाला होता. या रॅकेटमध्ये खिद्रापुरे याच्यासोबत आणखी पाच डॉक्टर आणि तीन दलाल कार्यरत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. खिद्रापुरे याला मिरजच्या न्यायालयानं १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. **** आधार क्रमांक मिळेपर्यंत इतर कोणत्याही ओळखपत्रांच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असं सरकारनं काल स्पष्ट केलं. कोणत्याही व्यक्तीला केवळ त्याच्याकडे आधार क्रमांक नाही म्हणून त्याला सरकारी योजंनाच्या लाभांपासून वंचित ठेवता येणार नाही, असं यासंदर्भात काल जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. शासकीय योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी तसंच यंत्रणेत पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सरकारनं कल्याणकारी योजना आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू नये म्हणून सरकारनं काल हे स्पष्टीकरण जारी केलं आहे. **** आज जागतिक महिला दिन. यानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज देशातल्या ३१ महिलांना २०१६ चा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहेत. महिला सशक्तीकरणाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. मराठवाड्यातही जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठवाड्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-मनरेगा अंतर्गत मार्च २०१८ पर्यंत एक हजार पाचशे कोटी रूपयांपर्यंतची कामं करण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरूषोत्तम भापकर यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. औरंगाबाद विभागात ६ मार्च ते १२ मार्च या कालावधी��� मनरेगा सप्ताह साजरा केला जात आहे. आज या सप्ताहांतर्गत महिला दिनानिमित्त मराठवाड्यातल्या सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. गुरूवारी सर्वसाधारण सभाही घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सागितलं. **** उस्मानाबाद इथं होणारं ९७वं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे संमेलन आता २१, २२ आणि २३ एप्रिल रोजी होणार आहे. यापूर्वी ते सात ते नऊ एप्रिलदरम्यान होणार होतं. नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे वेळापत्रक पाहता स्थानिक नाट्यप्रेमी कलाकारांना या संमेलनात सहभागी होण्यासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून हे संमेलन पुढे ढकललं असल्याचं त्यांनी सांगितलं. **** ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना. धनागरे यांचं काल पुण्यात एका खाजगी दवाखान्यात निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात पुद्दुचेरी इथं व्याख्यान देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आग्रा, कानपूरची भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. कुलगुरू म्हणून काम करत असताना त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले. परदेशातल्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन उच्च शिक्षणाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी या काळात केलं. **** बंगळुरु क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत काल एक-एक अशी बरोबरी साधली. कसोटी सामन्यात एका डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम पंचविसाव्या वेळेस करणारा रविचंद्रन अश्विन, फलंदाज के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे हे या विजयाचे शिल्पकार ठरले. भारतीय संघानं पहिल्या डावात १८९ तर दुसऱ्या डावात २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात २७६ करत भारतावर ८७ धावांची आघाडी घेतली होती. मात्र आर अश्विनच्या फिरकी माऱ्यापुढे त्यांचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांमध्ये आटोपला. **** राज्यात काल दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. भ्रमणध्वनीच्या मदतीनं प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार लक्षात घेता केंद्र संचालक आणि परिरक्षकांशिवाय अन्य व्यक्तींना भमणध्वनी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कालच्या पहिल्या दिवशी या परीक्षेत नकला करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं. **** युपीआय हे मोबाईल बँकींगचे ॲप्लीकेशन वापरून फसवणूक करण्याचे एक हजार २१४ प्रकार औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस आले आहेत. हा प्रकार महाराष्ट्र बँकांच्या शाखांमध्ये घडला असून यामाध्यमातून ९ कोटी ४३ लाख रूपयांचा व्यवहार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. या ॲप्लीकेशनमध्ये एक लाख रूपये कर्ज काढण्याची स���विधा असून तिचा वापर करून ��ायबर भामट्यांनी या महाराष्ट्र बँकेतून पैसे काढले आणि ते एचडीएफसी बँकेत भरले. बँकेच्या नोटीसा आल्यानंतर खातेदारांच्या लक्षात हा प्रकार आला, त्यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. **** महाराष्ट्र विकास आघाडी आणि एमआयएम या दोन पक्षांनी युती करून लातूर महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काल लातूर इथं या दोन पक्षांची संयुक्त जाहीर सभा झाली. यावेळी बोलतांना एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असद्दुदिन ओवेसी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवल्यामुळे भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेससह भाजप आणि इतर राजकीय पक्षावर टिका करत, आपल्याला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असं सांगितलं. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. अण्णाराव पाटील, ताहेर सय्यद, आणि बसवंत उबाळे यांची भाषणे झाली. //*******//
0 notes