#रक्षणाचा संदेश
Explore tagged Tumblr posts
Text
youtube
के के वाघच्या 3000 विद्यार्थ्यांचा निसर्गस्नेही गणेशोत्सव 🌿💚
के के वाघ महाविद्यालयात 3000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाडू मातीच्या गणपतींच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साकारला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या रक्षणाचा संदेश दिला. एकत्रितपणे निर्माण केलेल्या या सुंदर आणि सर्जनशील गणेशमूर्तींनी पर्यावरणस्नेही उत्सवाचा आदर्श घालून दिला आहे. चला, आपणही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया! 🌱🙏
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी प्रमुख नेते मुंबईत दाखल.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये पंधरा ते सतरा सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रम - मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती.
श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित.
आणि
लातूर इथं पर्यावरण रक्षणाचा संदेश देत राखी पोर्णिना साजरी.
****
मुंबई इथं आजपासून इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. या बैठकीमध्ये संघटनेचे प्रतिनिधी, झेंडा तसंच संयोजक या विषयांवर चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी देशभरातून विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं मुंबई विमानतळावर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं. उद्योजक अदानींच्या गुंतवणुकींसंदर्भात राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन पुन्हा विविध प्रश्न उपस्थित केले. या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांची पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरं द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
****
इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्तानं एकत्र आलेल्या पक्षांसमोर कोणताही कार्यक्रम नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही आघाडी झाली असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.
****
मुंबईमध्ये आज सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठकही होत आहे. आघाडीच्या पुढल्या रणनितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचं एकूण देशांतर्गत उत्पन्न सात पूर्णांक आठ दशांश टक्के झालं असल्याची माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं दिली आहे. या आधीच्या तिमाहीत हे उत्पन्न सहा पूर्णांक एक दशांश टक्के इतकं होतं, असं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
संसदेचं विशेष अधिवेशन अठरा ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातून दिली. या अधिवेशनामध्ये पाच बैठका होणार आहेत. अमृत काळा दरम्यानच्या या अधिवेशनात सरकार फलदायी चर्चा आणि वादविवाद करू इच्छिते असंही जोशी यांनी म्हटलं आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. ते आज औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात विविध कार्यक्रम होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले -
१५, १६, १७ या तीन दिवसांत मोठ्या प्र��ाणावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या मुक्तिसंग्रामामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन सोळा तारखेला चार वाजता करण्यात आलं आहे. त्यासाठी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेबांना या बाबतीतलं निमंत्रण मी स्वतःही दिलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांनी भेट देऊन हे निमंत्रण दिलेलं आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची माहिती देणारं भव्य स्मारक औरंगाबाद इथं उभारलं जाणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपये निधी यापूर्वीच मंजूर केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. सुमारे साडे चार एकर जागेवर उभारलं जाणारं हे स्मारक ज्ञानवर्धक तसंच राष्ट्रीय वैभवात भर घालणारं असेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
****
उस्मानाबाद कलाविष्कारचे डॉ. पद्मसिंह पाटील पुरस्कृत श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्���रीय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. श.मा.पाटील स्मृती पुरस्कार पद्य विभागामध्ये सोलापूरचे डॉ शिवाजी शिंदे लिखित 'अंतस्थ हुंकार' काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे. त्रिंबकदादा शेळके स्मृती पुरस्कार यंदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाची सोय करणाऱ्या उस्मानाबादच्या अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला जाहीर झाला आहे. पुरस्कारांचं वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी दिली आहे.
****
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज शिर्डी इथं साईबाबांचं दर्शन घेत साईंबाबांची पाद्य पूजा केली. या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.
****
लखनौ विभागात वाराणसी रेल्वे स्थानकावर तांत्रिक काम करण्याकरता `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यानुसार जालना ते छपरा ही विशेष रेल्वे २० आणि २७ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासातली छपरा ते जालना ही विशेष रेल्वेही २२ आणि २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
लातूर इथल्या `ग्रीन लातूर वृक्ष टीम` या सामाजिक संघटनेनं यंदा रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा केला. या संघटनेनं तुळशीच्या बियांच्या राख्या तयार केल्या होत्या. यासंदर्भात संघटनेचे समन्वयक डॉ पवन लड्डा यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले -
राखी पोर्णिमेचा सण आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पारं��ारिक राख्यांसोबत आम्ही तुळसी बियांपासून बनवलेल्या आकर्षक राख्या तयार केल्या. यामध्ये शंभर एक तुळशी बिया कागदाच्या पुड्यामध्ये बांधून त्यांला मोळी बांधली. आणि सुंदर अशी राखी तयार केली. शेवटचा उद्देश हा होता की जेव्हा ही राखी मातीमध्ये, कुंड्यामध्ये टाकल्या जातील सोबत बियासुद्धा पडल्या जातील त्याच्या. आणि त्यानंतर त्याच्यातून जी तुळशीची रोपं उगवतील, प्रत्येक घरामध्ये या पद्धतीनं दोन, तीन, चार तुळशीची रोपं उगवायला लागतील. पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा हा छोटासा प्रयत्न ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून केला आहे.
****
लातूर जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळांपैकी ३१ मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्यानं त्याचा परिणाम पीक वाढीवर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचं सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट झाल्याचं दिसून आल्यास विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत विमा कंपनीला कळवण्यात येईल, असं जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी कळवलं आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडन पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे अलेक्जांडर बुकीक आणि क्रिस्तोफर ओकोनेल यांच्या जोडीला पहिल्या फेरीत ६-४, ६-२ असं पराभूत केलं. महिला एकेरीमध्ये प्रथम मानांकित पोलंडची इगा स्वियातेक तिसऱ्या फेरीत दाखल झाली आहे. पुरुष एकेरीमध्ये तीन वेळचा विजेता सर्बीयाचा नोवाक जोकोविचनं स्पेनच्या बर्नाबे मिरालेसला पराभूत करुन तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.
****
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन केलं. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
धुळे शहरासह जिल्हाभर पाणी टंचाईच्या अनुषंगानं ’धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मिरवणुकीनं वरुणराजाला साकडं घातलं. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत २५ टक्केही पा��स झाला नाही. यामुळं धुळे महापालिकेनं पाण्याचं योग्य नियोजन करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली.
****
कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आले आहेत. शेतकरी, गट, संस्था आणि व्यक्ती यांनी या संदर्भात आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दहा सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक एस. व्ही. लाडके यांनी केलं आहे.
****
रोटरी क्लबचे महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाबमधले शल्यचिकित्सक आणि स्वयंसेवक असे एकूण पस्तीस जण येत्या तीन ते १३ सप्टेंबर दरम्यान काश्मीर खोऱ्यातल्या अनंतनाग, पुलवामा, शोपीयान आणि कुलगाम या ठिकाणी विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी जाणार आहेत.
****
0 notes
Text
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल - पर्यावरणमंत्री
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल – पर्यावरणमंत्री
राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल असा विश्वास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
शासनाचा पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,…
View On WordPress
0 notes
Text
बालगणेश मंडळाने वृक्षारोपणातून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
बालगणेश मंडळाने वृक्षारोपणातून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
तिरोडा, दि.3 : ग्राम अर्जुनीच्या टंकीटोली येथील बालगणेश मंडळाने वृक्षारोपणातून पर्यावरण रक्षणचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. अशात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केल्यास ढासळणारे पर्यावरणाचे संतुलन नियंत्रित केले जावू शकते. हाच मानवीय हेतु लक्षात घेवून शनिवार, 3 सप्टेंबर रोजी बालगणेश मंडळ टंकीटोलीतर्फे वृक्षारोपण…
View On WordPress
0 notes
Text
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा ; वटपौर्णिमा विशेष
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा ; वटपौर्णिमा विशेष
वटपौर्णिमा साजरी करताना त्यामागचा वैज्ञानिक व शास्त्रीय दृष्टिकोन समोर ठेवणे आवश्यक आहे. ज्येष्ठ महिना हा मृग नक्षत्राचा महिना आहे. यावेळी शेतकरी खरीप ह��गामातील पिकांची तयारी करत असतात. मान्सूनचे आगमन झालेले असते. पाऊस पडण्याचा वृक्षाशी असलेला संबंध हा पूर्वजांना माहिती असल्याने निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्त्रीच्या हाताने वडाच्या रोपट्याची पूजा करून योग्य अशा जमिनीत त्याचे रोपण केले जायचे.…
View On WordPress
0 notes
Text
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देणा-या प्रदर्शनाचं आयोजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देणा-या प्रदर्शनाचं आयोजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षातर्फे प्लास्टीक आणि थर्माकोलला पर्याय तसंच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणा-या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. (more…)
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकात प्रस्तावित कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पीटलाईनचं भुमिपूजन आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होत आहे. या पीटलाईनसाठी २९ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यावेळी उपस्थित आहेत.
****
इंडोनेशिया इथं सॉकर मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १२५ वर गेली तर जखमींची संख्या ३२३ वर गेली. इथं झालेल्या फुटबॉल सामन्यात स्थानिक संघाचा पराभव झाल्यानंतर संतापून मैदानात उतरलेल्या प्रेक्षकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला.
****
खादी आणि ग्रामीण उद्योग प्राधिकरणानं त्यांच्या सर्व उत्पादनांवर २० टक्के सवलतीची घोषणा केली आहे. खादी उत्पादनांवर २० टक्के, तर ग्रामीण उद्योग उत्पादनांवर दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी काल नवी दिल्लीच्या खादी भवन इथं भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
****
उरण इथल्या जे एन पी ए बंदरातून दुबईतल्या जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटी रुपयांचं तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागानं जप्त केलं आहे. दोन आठवड्यापूर्वी देखील अशाच प्रकारे रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं.
****
नवी मुंबईत वाशीमध्ये संत्र्याच्या ट्रकमध्ये लपवून नेण्यात येत असलेले एक हजार ४७६ कोटी रुपये किमतीचे १९८ किलो अंमली पदार्थ आणि नऊ किलो कोकेन जप्त करण्यात आलं. महसूल गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली.
****
'प्रगतीकडून पर्यावरण रक्षणाकडे' या मुंबई ते डेहराडून पर्यावरण जागृती सायकल यात्रेला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल राजभवन इथून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ही यात्रा ४० दिवसांत दहा हजार लोकांशी संपर्क साधेल तसंच एक कोटी लोकांना निसर्ग रक्षणाचा संदेश देणार आहे.
****
लातूर इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षक अभिजित देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यात अवैध मद्याचे एकूण १६ गुन्हे नोंदवण्यात आले, त्यामध्ये ३१ आरोपींना अटक करण्यात आली.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 12 June 2018 Time - 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
संगणकाची कृत्रिम बुद्धिमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या कॅनडातल्या आय व्ही ए डी ओ, नेक्स्ट ए आय आणि एफ आर क्यू एन टी संस्थांच��� सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून, या माध्यमातून राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लस्टर्सची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅनडा दौऱ्यावर असून, राज्यात उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीनं त्यांनी विविध उद्योगांसोबत आज सामंजस्य करार केले. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार असून, या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातल्या ५० स्टार्ट अप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट ए आय ही संस्था काम करणार आहे. भारतासह महाराष्ट्र अतिशय वेगानं प्रगती करीत असून, या विकासपर्वात भागिदारी करण्यासाठी कॅनडातल्या उद्योग समुहांनी राज्यात गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
अध्यात्मिक गुरु भैय्यू महाराज यांनी आज इंदूर इथं राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, ते ५० वर्षांचे होते. भैय्यू महाराज यांना अत्यवस्थ अवस्थेत इंदूरच्या बॅाम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहूल ठेवलेल्या चिट्टीत आपण तणावामुळे हा मार्ग पत्करत असल्याचं सांगितलं असून आपल्या मृत्यूस कोणालाही दोषी धरण्यात येऊ नये असं म्हटलं आहे. उदयसिंह देशमुख असं मूळ नाव असलेले भैय्यू महाराज यांनी सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टच्या माध्यमातून जलसंधारण, वृक्षलागवड, बालशिक्षण, वेश्यांच्या मुलांचं पुनर्वसन अशा अनेक क्षेत्रात मोठं काम केलं होतं. राजकीय क्षेत्रात मान्यवरांसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भैय्यू महाराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. वंचित आणि दुर्लक्षितांसाठी त्यांनी केलेलं कार्य मोठं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
विधान परिषदेच्या बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे उमेदवार सुरेश धस विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अशोक जगदाळे यांचा ७८ मतांनी पराभव केला. बीड नगर परिषदेच्या अपात्र नऊ नगरसेवकांच्या मतांसह ही मतमोजणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल दिले ��ोते, त्यानुसार आज झालेल्या मतमोजणीत धस यांना ५२६ तर जगदाळे यांना ४५२ मतं मिळाली. २५ मतं बाद झाली, तर एका मतदारानं वरीलपैकी कोणी नाही - नोटा ला मत दिलं.
दरम्यान, या विजयाबद्दल बोलताना धस यांनी, हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय असल्याचं म्हटलं आहे.
****
नक्षलवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्यासंदर्भातल्या पत्रावर संशय व्यक्त केल्यामुळे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. राजकीय सुरक्षेच्या मुद्यावर विरोधकांनी राजकारण करु नये, असं ते म्हणाले.
****
वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा, असं आवाहन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुंबईत झालेल्या वृक्ष लागवड परिषदेत ते बोलत होते. सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्यानं रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड करता येणार असून, यासाठी वैयक्तिक लाभधारकांसाठीची क्षेत्र मर्यादा कोकणासाठी १० हेक्टर असून, उर्वरित महाराष्ट्रासाठी ती चार हेक्टरवरून सहा हेक्टर एवढी वाढवण्यात आल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
लातूर शहरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज शहरातल्या काही भागांमध्ये पाहणी केली. पाण्यामुळे नागरिकांना होणारा त्रास जाणून घेत त्या भागातले अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांना तात्काळ पाणी वाहून जाण्याकरता योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.
****
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषि विस्तार आणि तंत्रज्ञान अभियानातंर्गत यंदाच्या खरीप हंगामात ग्राम बिजोत्पादन राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमातंर्गत बुलडाणा जिल्ह्याकरता सोयाबीन जेएस ३३५ वाणाचं ११ हजार क्विंटल बियाण्याचं उद्दिष्ट प्राप्त झालं आहे. त्याअनुषंगानं महाबीज अधिकृत विक्रेता स्तरावर संपूर्ण जिल्ह्यात बियाणे उपलब्ध झालं असून, तालुका कृषि अधिकारी स्तरावर परमीट उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
//***********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 3 June 2018 Time - 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
देशभरातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षक बनून प्लास्टिक प्रदूषण रोखण्यात सरकारला मदत करावी, असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे. येत्या पाच जून रोजी साजऱ्या होत असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत आयोजित ‘एन्व्हीथॉन’ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत ते बोलत होते. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत १० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभाग झाले. कुठलंही ध्येय गाठण्याचा मुलांमध्ये असलेला जोम आणि उत्साह, इतरांनाही प्रोत्साहीत करतो, मुलांनी पर्यावरणाच्या दृष्टीनं उपयोगी एकतरी काम दररोज करावं असं त्यांनी सांगितलं. उपस्थित मुलांना यावेळी पर्यावरणाभिमूख राहण्याची तसंच दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याची शपथ ड���.हर्षवर्धन यांनी दिली.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार हे सर्वसमावेशक, भेदभावरहीत विकासासाठी कटीबद्ध असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज पणजी इथं वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. अल्पसंख्याक समाजातल्या मुलींसाठी असलेल्या शिष्यवृत्तीसाठी ��ोन कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करण्यात आली असून, अल्पसंख्याकांसाठी पाच लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्यात आल्याचं नक्वी यांनी यावेळी सांगितलं.
****
पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशानं वेरुळ - अजिंठा, हंपी आणि बोधगया सारख्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रांच्या बैठका आणि संमेलनं आयोजित करण्यात येणार आहेत. एका शासकीय प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली. पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी बैठक घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. यासंदर्भात सार्वजनिक उपक्रम विभागानं पर्यटन मंत्रालयासोबत चर्चा केल्यानंतर, विकसित करण्याची गरज असलेल्या पर्यटन स्थळांची यादी तयार करण्यात आल्याचं याबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सत्तेसाठी तडजोड न करता जनतेसाठी वेळ प्रसंगी संघर्ष करा, अशी शिकवण दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त परळी इथल्या गोपीनाथ गडावर आयोजित ‘सामाजिक उत्थान दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार प्रितम मुंडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय इतिहास मुंडे यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही, असं सांगून, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आलं. मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
औरंगाबाद इथल्या डॉ.इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयात शिखर कन्या अॅडवेंचर्स स्पोर्टस् कल्बची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आतंरराष्ट्रीय गिर्यारोहक प्राध्यापक मनिषा वाघमारे यांनी दिली आहे. जगातलं सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल वाघमारे यांचा आज महिला महाविद्यालयात सत्कार करण्यात आला, त्यानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. मराठवाड्यातून २०२४ पर्यंत एका महिला गिर्यारोहकाला माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माउंट एव्हरेस्ट सर करतानाचे चित्तथरारक अनुभव वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
****
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातल्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसात कोकण, आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यात आजही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर आणि परिसरात सकाळी काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जालना, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाचं वृत्त आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्याला आज सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा बसला. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
क्वालालांपूर इथं सुरु असलेल्या महिला आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं मलेशियाचा १४२ धावांनी पराभव केला. भारतानं वीस षटकांत तीन बाद १६९ अशी धावसंख्या उभारली. भारतीय गोलंदाजांनी मलेशियाच्या सहा फलंदाजांना शून्यावर बाद करुन तंबूत पाठवलं. पूजा वस्त्राकारनं तीन गडी बाद केले. या स्पर्धेत सहावेळा अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना उद्या थायलंड विरुद्ध होणार आहे.
****
0 notes