#योजनेला
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 15 hours ago
Text
त्यांनी कधी मुंगी मारली का ? , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की.. 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आणि पैसे कुठून आणणार म्हणणारे आता बहिणीला तीन हजार रुपये देणार असल्याचे सांगत आहेत त्यामुळे आता ते पैसे कुठून आणणार ? असा प्रश्न उपस्थित होत असून महाविकास आघाडीने महायुतीचाच वचननामा चोरलेला आहे असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे.  जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे प्रचारासाठी आलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ,’आमच्या लाडक्या…
0 notes
heritagetrailindia · 7 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला वेग • महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारसभेत काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध • गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी • घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसला निर्देश आणि • मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं आता वेग घेतला असून, विविध पक्षांच्या बड्या नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. महाविकास आघाडीची संयुक्त प्रचारसभा काल मुंबईत वांद्रे- कुर्ला संकुलात झाली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मविआचे इतर नेते सभेला उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पंचसूत्री जाहीरनामा यावेळी प्रसिद्ध करण्यात आला. महिलांना दरमहा तीन हजार रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या महालक्ष्मी योजनेचा तसंच बेरोजगारांना चार हजार रुपये अर्थसहाय्याचा त्यात समावेश आहे. भाजपाप्रणित लोकशाही आघाडी सरकारच्या धोरण आणि कार्यक्रमांवर नेत्यांनी यावेळी टीका केली.
दरम्यान, राहुल गांधी काल सकाळी नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची काल लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं प्रचार सभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, असं आवाहन मराठवाड्यातल्या या आपल्या पहिल्या सभेत ठाकरे यांनी केलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल भारतनगरमध्ये पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला.
मुंबईतल्या माहीम मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर आणि मानखुर्द - शिवाजीनगर मध्ये सुरेश पाटील यांना रिपब्लिकन पक्षाने अधिकृत पाठींबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल ही माहिती दिली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांना राज्यात सत्तेचा वाटा मिळवून देण्यासा��ीच महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पाठींबा असल्याचं त्यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृतीसाठी राज्य निवडणूक आयुक्तांतर्फे येत्या आठ नोव्हेंबर पासून मोबाईल व्हॅन्स सुरू करण्यात येणार आहेत. या व्हॅन्सवर मतदान जनजागृतीविषयक माहिती देण्यात येणार आहे. या गाड्या राज्यातल्या १५ जिल्ह्यांमध्ये मतदार जागृतीचं कार्य करतील.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणार्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री कविता मेढेकर यांनी केलं आहे.
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज अकोला आणि वाशिम या जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आर्थिक कमतरतेमुळे बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशानं मंजूर केलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भारतीय अन्न महामंडळासाठी वर्ष २०२४-२५ मध्ये दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या समभाग भांडवलाला मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे महामंडळाची कार्यान्वयन क्षमता वाढेल, असं त्यांनी नमूद केलं.
घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्‍या ३६ तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं, असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घड्याळ या चिन्हांवरुन असलेल्या वादावर काल न्यायालयात सुनावणी झाली. दोन्हीं गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च ��रण्यापेक्षा प्रचारावर भर द्यावा, असा सल्लाही न्यायालयानं यावेळी दिला.
निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव राहू नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी काल निवडणूक यंत्रणांना दिले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवाव्यात आणि मतदानाबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिन हॅक करून विजयी करून देतो, असे सांगत नाशिकमधल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडे ४२ लाख रूपयांची मागणी करणाऱ्या एका व्यक्तीला नाशिक पोलीसांनी अटक केली आहे. भगवानसिंग चव्हाण असं त्याचं नाव आहे. मध्य नाशिक विधानसभा मतदार संघातले उमेदवार वसंत गीते यांच्या मुंबई नाका इथल्या कार्यालयात जाऊन त्याने ही मागणी केली होती.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंटचं उद्घाटन काल महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झालं. “मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या” असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठया प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. काल वाचनालयाच्या वतीने बाह्यरुग्ण विभागात आणि लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती आणि औषधाच्या कागदावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मी मतदान करणार तुम्ही पण करा, असा एक शिक्का देण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड मतदारसंघातल्या अनेक गावांमध्ये स्वीप अंतर्गत शिक्षक संचाने गायन आणि पथनाट्यातून मतदान जनजागृती केली. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथंही शिक्षकांनी आठवडी बाजारात नागरिकांशी संवाद साधून, मतदान जनजागृती केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिव्यांग आणि ८५ वर्षांपूढील नागरिकांसाठी येत्या १३ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरु होणार आहे. जिल्ह्यात असे चार हजार ४२४ मतदार आहेत. स��ल्लोड मतदारसंघात १३ ते १६ नोव्हेंबर, पैठण, गंगापूर आणि कन्नड मतदारसंघात १५ ते १७, फुलंब्री १४ ते १७, औरंगाबाद मध्य आणि पश्चिम १३ ते १५, औरंगाबाद पूर्व १३ ते १८ आणि वैजापूर इथं १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान गृह मतदान होणार आहे.
परभणी तालुक्यातल्या नृसिंह पोखर्णी या ग्रामपंचायतीला नुकताच आयएसओ दर्जा प्राप्त झाला आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोन्सीकर यांच्या पथकानं काल या गावाला भेट देऊन विकास कामांची पाहणी केली. ग्रामपंचायत आयएसओ बनवल्याबद्दल तसंच ग्रामपंचायतीचे अभिलेखे अद्ययावत केल्याबद्दल घोन्सीकर यांनी यावेळी ग्रामपंचायतीचं अभिनंदन केलं.
पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. या गाड्या आठ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून पंढरपूरकड�� जाणार आहेत. यामध्ये लातूर-पंढरपूर विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर-लातूर ही विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून दुपारी एक वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि लातूरला संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.
जालना तहसील कार्यालयातला तलाठी दुर्गेश गिरी याला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं अटक केली. तक्रारदाराच्या भूखंडाचा फेर घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागानं दहा ठिकाणी धाडी टाकून एकूण दोन लाख ७४ हजार रुपयांची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली. याप्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली असून, गुन्हे दाखल झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सीमेवर जळगाव जामोद तालुक्यातल्या भिंगारा गावातल्या एका शेतात पोलिसांना ४५ क्विंटल गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 notes
6nikhilum6 · 2 months ago
Text
Pune : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती
Pune : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती – MPC…
0 notes
darshanpolicetime1 · 3 months ago
Text
चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील घरकुलांसंदर्भात केंद्रीयस्तरावर पाठपुरावा करु - वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 2 :- चंद्रपूर शहर महानगरपालिका येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10 हजार घरे बांधण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेला गती द्यावी. महानगरपालिकेने त्यासाठी म्हाडाचे सहकार्य घ्यावे. राज्य व केंद्रीय स्तरावर याबाबत तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर केल्या जातील. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबतही बैठक घेण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. महाप्रीत आणि चंद्रपूर शहर…
0 notes
news-34 · 4 months ago
Text
0 notes
mahayojanaa · 11 months ago
Text
नव तेजस्विनी योजना 2023 महाराष्ट्र | Maharashtra Nav Tejaswini Yojana: रजिस्ट्रेशन ऑनलाइन, फॉर्म, लाभ संपूर्ण माहिती मराठी
Maharashtra Nav Tejaswini Yojana 2023 Registration Online, Application Form, Eligibility, Benefits All Details In Marathi | नव तेजस्विनी योजना महाराष्ट्र 2023 | नव तेजस्विनी योजना | महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म
Tumblr media
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नव तेजस्विनी योजनेला 8 ऑक्टोबर 2020 रोजी मान्यता दिली आहे. वैयक्तिक लाभार्थी किंवा महिला स्वयं-सहायता गटांना, नव तेजस्विनी योजनेसाठी रु. 523 कोटी, जी महिला आणि बाल विकास मंत्रालय (WCD) (SHGs) द्वारे महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे, ही योजना राज्यातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याचा एक कार्यक्षम मार्ग आहे. तसेच हा उपक्रम महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित क���तो. Read more
0 notes
mdhulap · 1 year ago
Link
महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंत्रिमंडळांची मंजुरी - Cabinet approves plan to tap women's savings drones
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
PM Vishwakarma Yojana | मोठी बातमी! मोदी सरकारने आणली नवी योजना; आता 5 टक्के व्याजदराने ‘या’ लोकांना मिळणार 1 लाखांच कर्ज
Tumblr media
PM Vishwakarma Yojana | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर एका दिवसानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत ( PM Vishwakarma Yojana) पाच वर्षांत 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुशल कामात गुंतलेल्या कामगारांना स्वस्त व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी 15 ऑगस्ट रोजी या योजनेची घोषणा केली. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर ते लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत होते. त्याचवेळी, कौशल्याशी संबंधित कामांमध्ये गुंतलेल्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजना सुरू केली जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. किती रक्कम खर्च केली जाईल? केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी, 16 ऑगस्ट रोजी झाली. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर योजनेच्या मंजुरीची माहिती दिली. ते म्हणाले की केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे, ज्यावर 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 30 lakh artisans will benefit | 30 लाख कारागिरांना फायदा होणार ते म्हणाले की, पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2023-24 ते आर्थिक वर्ष 2027-28 या पाच वर्षांत 13,000 कोटी रुपये खर्च केले जातील. 17 सप्टेंबरपासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त सुरू होणार आहे. या अंतर्गत अशा कामगारांना लाभ मिळणार आहे, जे कौशल्याशी संबंधित कामात गुंतलेले आहेत ��णि जिथे गुरु-शिष्याची परंपरा अजूनही सुरू आहे. या योजनेचा 30 लाख पारंपारिक कारागिरांना फायदा होणार असल्याचे मंत्री म्हणाले. Who will benefit from PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेचा कोणाला होईल फायदा? लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलविक्रेते, मासे जाळे विणणारे, लॉकस्मिथ, शिल्पकार इत्यादींची गणना केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ होणार्‍या संभाव्य कारागिरांमध्ये केली जात आहे. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेत या लोकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. कौशल्य विकास अभ्यासक्रम पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, अधिक कौशल्ये कशी विकसित करता येतील याकडे लक्ष दिले जाईल आणि पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती मिळावी. या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही मदत केली जाणार आहे. योजनेंतर्गत, मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील. कोर्स करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल. How can you get financial help under PM Vishwakarma Yojana? | पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत आर्थिक मदत कशी मिळेल? पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाणार आहे. आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पीएम मोदींच्या घोषणेनंतर २४ तासांत विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
https://bharatlive.news/?p=122115&wpwautoposter=1692183951 पीएम मोदींच्या घोषणेनंतर २४ तासांत विश्वकर्मा योजनेला मंत्रिमंडळाची ...
0 notes
mahanews26 · 1 year ago
Link
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: जुन्या पेन्शन योजनेला आमचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे...
0 notes
airnews-arngbad · 9 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 November 2024 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
• विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार. • संविधान केवळ एक पुस्तक नाही, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. • लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत ६०० रुपयांची वाढ करण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं जाहीरनाम्यात आश्वासन. • गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि • घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राष्ट्रवादी काँग्रेसला निर्देश.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांचा प्रचार आणखी तीव्र झाला असून दिग्गजांच्या प्रचारसभा होत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज नागपूर इथं संविधान संमेलनात सहभागी झाले होते. संविधान हे केवळ एक पुस्तक नसून, जीवन जगण्याचं माध्यम आणि तत्वज्ञान आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विकास, प्रगती, अर्थव्यवस्था अशा शब्दांच्या आडून राज्यघटनेवर हल्ला करतात, असा आरोप त्यांनी केला. जाती आधारित जनगणना हा लोकांचा आवाज असून, तो संसदेपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी, नागपूर इथल्या दीक्षाभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट देऊन अभिवादन केलं. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुल इथं प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याभोवती अर्बन नक्षलींचा गराडा पडल्यामुळे ते आता काँग्रेस विचारसरणीचे राहिले नसून, अतिडावे बनल्याची टीका, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज एका मुलाखतीमध्‍ये बोलत होते. भारतीय संविधानाची प्रत पारंपारिक निळ्या कव्‍हरमध्‍ये असते, मात्र राहुल गांधी भारतीय संविधानाची प्रत लाल रंगाचं कव्‍हर घातलेली का दाखवतात, असा प्रश्नही त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्‍या १८० संघटना विध्‍वंसक कृत्‍यात सहभागी असणाऱ्या होत्‍या, असा आरोपही फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत ६०० रुपयांची वाढ करून पा��्र महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचं आश्वासन, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. या जाहीरनाम्यात अकरा नवीन घोषणा असून त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये बोनस, अडीच लाख नोकऱ्या, ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांची निर्मिती, या घोषणांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचा राज्यव्यापी जाहीरनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत प्रसिद्ध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून या मतदारसंघासाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. बारामतीला देशातला सर्वात आदर्श आणि प्रगत तालुका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं प्रचार सभा झाली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता एकदा आपल्या हातात द्या, असं आवाहन मराठवाड्यातल्या या आपल्या पहिल्या सभेत ठाकरे यांनी केलं.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातल्या आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन अभिनेते वैभव मांगले यांनी केलं आहे. बाईट - अभिनेते वैभव मांगले
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघां��ा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज यवतमाळ जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आर्थिक कमतरतेमुळे बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशानं मंजूर केलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही तारणाशिवाय कर्ज मिळू शकेल, असं त्यांनी सांगितलं. याशिवाय, भारतीय अन्न महामंडळासाठी वर्ष २०२४-२५ मध्ये दहा हजार सातशे कोटी रुपयांच्या समभाग भांडवलाला मंजुरी दिल्याची माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे महामंडळाची कार्यान्वयन क्षमता वाढेल, असं त्यांनी नमूद केलं.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. या विजयासोबतच, तीन वेळा निवडणूक लढवून दोन वेळा जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला आहे. अमेरिकेचं सुवर्णयुग आता सुरू झालं असून, अमेरिकेला पुन्हा महान करण्यासाठी हा विजय झाल्याचं ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याबद्दल डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन केलं आहे.
घड्याळ चिन्ह वाटपाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याचं येत्‍या ३६ तासात सर्व वर्तमानपत्रातून जाहीर करावं, असे निर्देश, सर्वोच्च न्यायालयानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये घड्याळ या चिन्हांवरुन असलेल्या वादावर आज न्यायालयात सुनावणी झाली. दोन्हीं गटांनी ऐन निवडणुकीच्या काळात आपली ऊर्जा न्यायालयात भांडण्यात खर्च करण्यापेक्षा प्रचारावर भर द्यावा, असा सल्लाही न्यायालयानं यावेळी दिला.
निवडणूक प्रक्रिया राबवताना त्यात कोणत्याही शंकेला वाव राहू नये याची खबरदारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी, आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमधल्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज छत्रपती संभाजीनगर इथं पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवाव्यात आणि मतदानाबाबत जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ��ठ नोव्हेंबरच्या, म्हणजे परवाच्या प्रस्तावित धुळे दौऱ्याच्या अनुषंगानं प्रशासनानं आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. आठ तारखेपर्यंत धुळ्यात नो फ्लाईंग झोन जाहीर करण्यात आला असून, धुळे शहरात वाहतूक मार्गामध्ये तात्पुरता बदल करण्याच्या सूचना पोलिस विभागानं दिल्या आहेत.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि रुग्ण सेवा मंडळ सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी सेल्फी पॉइंटचं उद्घाटन आज महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते झालं. “मतदाराला प्रोत्साहन म्हणून मतदानाच्या बोटाची शाई दाखवा आणि मोफत डोळे तपासणी करून घ्या” असा उपक्रम आयोजित केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. आज वाचनालयाच्या वतीने बाह्यरुग्ण विभागात आणि लसीकरण केंद्रात रुग्णाला दिल्या जाणाऱ्या पावती आणि औषधाच्या कागदावर २० नोव्हेंबर २०२४ रोजी मी मतदान करणार तुम्ही पण करा, असा एक शिक्का देण्यात येत आहे.
पंढरपूर इथं होणा��्या कार्तिकी यात्रेला भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून तीन विशेष अनारक्षित गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. या गाड्या आठ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून पंढरपूरकडे जाणार आहेत. यामध्ये लातूर-पंढरपूर विशेष गाडी १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी लातूर स्थानकावरून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Bhosari : भोसरी मतदार संघात 50 हजाराहून अधिक ‘लाडकी बहीण’ लाभार्थी
एमपीसी न्यूज – राज्यातील महायुती (Bhosari) सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना घोषित केली. या योजनेला पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये तब्बल 50 हजाराहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय…
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची जिल्ह्यात भरारी
गोंदिया : मातामृत्यू ,बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला लॉकडाउन काळातही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्याला सदर योजनेचे ५५,७१६ नोंदणी उद्दीष्ट्ये ��ेण्यात आले होते. जिल्ह्याने २0 फेब्रुवारी २0२३ अखेरपयर्ंत ५७,२१७ मातांची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत नोंदणी झालेली असून, १0३ नोंदणी उद्दिष्ट्ये पूर्ण करून जिल्ह्यात भरारी घेतली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
MSRTC | बिग ब्रेकिंग! महिलांना ‘या’ दिवसापासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, शासनाकडून आदेश जारी
Tumblr media
MSRTC | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी (MSRTC) धडाकेबाज घोषणा करण्यात आल्या. महिलांना एसटी (MSRTC) प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. मात्र महिलांना 50 टक्के सवलत कधीपासून लागू होईल याचा प्रश्न उपस्थित होत होता. आता याबाबत शासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. कधीपासून महिलांना एसटी तिकिटात मिळणार सवलवत? अर्थसंकल्पात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली खरी, पण हा निर्णय कधीपासून लागू होईल हा मोठा प्रश्न होता. यामुळे काही वादही निर्माण झाले होते. परंतु आता कोणतीच दिरंगाई न करता ��ासनाकडून आदेश जारी करण्यात आला आहे. तर महिलांना आज शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 पासून एसटी तिकिटात 50 टक्के सवलत मिळणार आहे. याबाबतचा जीआर निर्गमित करण्यात आला आहे. महिला सन्मान योजना महिलांना 50 टक्के सवलत मिळणाऱ्या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे. महिलांना आता 50 टक्के सवलत मिळाल्यामुळे त्यांना प्रवासाबाबत मोठा आर्थिक दिलासा मिळणारं आहे. आता महिला सहज दूर दूर पर्यंत कमी पैशांमध्ये प्रवास करू शकतात. महिलांसाठी राज्य सरकरकाचा मोठा खूप मोठा निर्णय आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून एसटी दरात सूट देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कारण राज्य शासनाच्या निर्णयानुसार 75 वर्��े पूर्ण असणाऱ्या नागरिकांना देखील एसटीचे तिकीट मोफत दिले जाते. तसेच अपंग लोकांना देखील एसटीच्या तिकिटात सवलत दिली जाते. 60 वर्षे पूर्ण असणाऱ्या नागरिकांना देखील एसटीचे अर्धेच तिकीट काढावे लागते. त्यानंतर आता महिलांसाठी हा जबरदस्त निर्णय घेण्यात आला आहे. Read the full article
0 notes