#यंदा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 March 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ मार्च २०२५ सायंकाळी ६.१०
****
धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा-बंजारा तांड्यावर रंगोत्सवाचा उत्साह
जालन्यात हत्तीरिसाला परंपरा उत्साहात साजरी तर विड्यात जावयाची गर्दभस्वारी यंदा स्थगित
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे दोन लाख सौर उर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी
आणि
सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव-कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश
****
धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. आबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं, त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगाने धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वत रांगामधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज पहाटे साडे पाच वाजता प्रज्वलित करण्यात आली. ईसवीसन १२४२ मध्ये काठी संस्थानचे राजे उमेदसिंग यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवाना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रुपं धारण करून पारंपारिक वेशभुषेत ढोल, बिजरी, ���ुंगराच्या तालावर थिरतकांना दिसून आले, पुढचे पंधरा दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो.
****
यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी दोन चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्च्छित पडला की ही गोटमार थांबते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही पाळण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, यवतमाळ मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारीक लेंगी नृत्य सादर झालं.
****
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपारिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज इस्कॉन संघटनेतर्फे संध्याकाळी शहरातील अदालत रोड नजिकच्या केंद्रात गौर पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक आज उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे १३६ वे वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा-प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते, त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात, असा प्रघात आहे. आजही ही मिरवणूक उत्साहात पार पडली. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवाणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
****
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.
****
येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलीटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली, त्यामध्ये एकमताने हा निर्णय घे��्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता ५६ रुपये प्रतिलीटरवरून ५८ रुपये प्रतिलिटर, तर म्हशीच्या दुधाची विक्री ७२ रुपये प्रतिलीटरवरून ७४ रूपये प्रतिलिटर होणार आहे, अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली.
****
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत १ लाख ९२ हजार ९३६ सौर उर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या योजनेत देशभरात १० मार्च २०२५पर्यंत एकूण १० लाख ९ हजार सौर उर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देत राहील तसंच २०२६-२७ पर्यंत १ कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
येत्या २ वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या पाच वर्षात नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून मिळणाऱ्या वीजेचे एकूण वितरणातलं प्रमाण १३ टक्क्यांवरुन ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
यूएफबीयू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या २४ आणि २५ मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. बँकांमधल्या रिक्त पदांवर भरती, पाच दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन बरोबर युएफबीयूची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्यानं, संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोने उपग्रह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे साडे चौदा कोटी अमेरिकी डॉलर महसूल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षांत इस्रो��े एकूण ३९३ विदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सिंगापूरसह ३४ विकसित देशांच्या उपग्रहांचा समावेश असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिध्देश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदक वर्गीय पक्षी दगावले होते, या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्युमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी-प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरु झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्षांची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने करण्याचही सूचित करण्यात आलं आहे.
****
पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष २०२० मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अवघ्या चार वर्षांत पुन्हा लेपन करण्याची वेळ येते, म्हणजे यापूर्वीचे काम निकृष्ट झालं होतं, असं संघटनेनं म्हटलं आहे. अशा पद्धतीने वारंवार लेपन केल्यास, मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.
दरम्यान, मंदिराच्या जतन-संवर्धन-जीर्णोद्वाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी - पाच जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. याकामाच्या आढाव्यासह टोकन पध्दतीने दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
****
जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्याने अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वेगेट पार करत असताना अचानक मालवाहून ट्रॅक बंद पडल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहराने कळवली आहे. या अपघातात जीवीत हानी झाली नाही मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतून विस्कळीत झाली आहे.
****
पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठीचे प्रकल्प तयार करण्यासाठी विविध १५ संकल्पना देण्यात आल्या. या उपक्रमात ३६ जिल्ह्यातले १७ हजार ९५६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
****
इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल या��्याकडे सोपवण्यात आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. येत्या २४ मार्चपासून २०२५ चा हंगाम सुरु होत असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समधे विशाखापट्टणम इथं होईल.
****
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट ट्वेंटी- ट्वेंटी स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा ९४ धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
0 notes
marathicelebscom · 2 days ago
Text
लक्ष्मीकांत बेर्डेंचा आवाज ऐकून अशोक मामा भावूक | स्टार प्रवाह परिवार पुरस्कार
स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा होणार सन्मान स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता दिवसागणिक वाढतेय. प्रवाह परिवाराच्या या दिमाखदार सोहळ्यात यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणाऱ्या अशोक मामांच्या सन्मानासाठी महेश…
0 notes
adbanaobrandbadhao · 25 days ago
Text
शिवजयंतीचा उत्सव – संधी तुमच्या व्यवसायाला ओळख मिळून देण्याची आणि तुमच्या ग्राहकांचा विश्वास वाढवण्याची
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, शौर्य आणि पराक्रम जाणून घ्या आमच्या शिवजयंती स्पेशल ब्लॉगमध्ये! यंदा शिवजयंती दणक्यात साजरी करा आणि खास शुभेच्छा पोस्टर, बॅनर्स, ऑफर अ‍ॅड्स, व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स AdBanao Poster Maker अ‍ॅपवर मिळवा.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर राज्य करणा��ा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा ......
इतिहासाच्या पटलावर अनेक राजे महाराजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा ना झाला ना होईल. रयतेचा राजा म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांनी रयतेच्या सुखासाठी अवघ आयुष्य दिल असा राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण  AdBanao Festival Poster Maker च्या शिवजयंती Special blog मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती पाहणार आहोत. 
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन - महासंवाद
मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : १७
मित्रांबरोबर शुक्रवारची सकाळची चहा, खाणं आणि गप्पांची मैफिल संपवून अनंत घरीं परतला तो एक आवडतं जुनं गाणं गुणगुणतच! 'आपण पक्के बेसुरे आहोंत' याची पुरेपूर जाणीव असल्याने तो कधी तोंड उघडून गायच्या वगैरे फंदात पडत नसे. तथापि जुन्या, लोकप्रिय गाण्यांची मनापासून आवड असल्याने खुशीत असला की एखादं आवडीचं गाणं हलकेच गुणगुणायची त्याची संवय शुभदाला माहीत असल्याने 'आज काय खुशीचं कारण?' या विचाराने तिचंही कुतूहल जागृत झालं! त्यांतच अनंतने येतांना आणलेलं नेहमींपेक्षा मोठं पार्सल तिच्या हातांत देतांना "आधी मी काय-काय आणलं आहे ते बघ आणि मग जोडीला काही लागेल ते बनव!" असं सांगितल्याने ती चकीतच झाली. कपडे बदलण्यासाठी बेडरूममधे जाणा-या अनंतकडे कौतुकाने हंसून बघत ती स्वतःशीच पुटपुटली, "आज एवढं खुश व्हायला काय झालं आहे, कुणास ठाऊक!"
रोजच्याप्रमाणे दुपारी एक वाजेपर्यंत अनंतने स्नान करून देवपूजा वगैरे नित्यक्रम उरकले आणि डायनिंग टेबलापाशी येऊन बसत तो म्हणाला, "मला आज संध्याकाळीं ५ वाजतां आमच्या ग्रुपच्या मनोहर भोसलेंबरोबर बाहेर जायचं आहे!" "अरे, वा! आज संध्याकाळीं तुमच्या 'खाबु ग्रुप'ची पुन: बैठक आहे वाटतं? म्हणून कां स्वारी एवढी खुश आहे?" शुभदाने केलेली चेष्टा लक्षांत न येऊन अनंत म्हणाला, "अग, सकाळी झाली की आमच्या ग्रुपची बैठक! आज संध्याकाळी फक्त मी आणि भोसले दोघेच जाणार आहोंत! तुला आठवतंय् कां, मध्यंतरी भोसलेंनी आपल्याला काय ऑफर दिली होती?" ही प्रस्तावना म्हणजे कुठल्यातरी खोड्यांत स्वत:ला अडकवण्याची नांदी असल्याचा दाट संशय येऊन शुभदा सावधपणे म्हणाली, " तुमच्या 'खाबु ग्रुप'मधील मित्रांच्या ऑफर्स ना, तुमचा रिकामा वेळ जाण्यासाठी, तुमच्यापुरत्या असतात! मला माझी नेहमींची भरपूर कामं आहेत, दुसर्‍या कुठल्या फंदात पडण्यापेक्षा! रिटायर झाल्यापासून तुम्हांला आराम आहे, पण माझी कुठली कामं कमी झाली आहेत ते सांगा!" आपल्याच नादांत अनंत पुढे सांगू लागला,"बरं शुभदा, माझा रिकामा वेळ सत्कारणी लावण्यासाठी समज! मनोहर भोसलेंना सामाजिक कार्यामधे रस आहे;-- म्हणून मी त्यांना कांही समाजकार्य माझ्यासाठी सुचवा असं सांगितलं होतं! त्या संदर्भात त्यांनी आज मला एका लहान मुलांच्या अनाथाश्रमाबद्दल सुचवलं आहे---' "म्हणजे?"
"लोहगांव परिसरात, एअरपोर्टच्या जवळ लहान मुलांचा हाॅस्पिटलवजा अनाथाश्रम आहे. तिथे विशेषत: अपंग लहान मुलांवर, नाममात्र दरांत वा कधी मोफतही उपचार केले जातात. एका ट्स्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या या 'स्वयंसिद्ध' नामक अनाथाश्रमाला थोडीफार सरकारी मदत मिळते;-- पण बव्हंशी याचा कारभार लोकांकडून मिळणाऱ्या देणग्यांवर चालतो. 'त्यांचे हिशोब तपासण्याचं काम कराल कां' असं मला भोसलेंनी विचारलं आहे! तुला काय वाटतं?" "मला विचारताय् म्हणजे हे काम विनामोबदला असणार ना?" शुभदाने खडा टाकला. "तसंच कांही नाहीं! मी विनामोबदला नाही म्हटलं, तर 'फुल ना फुलाची पाकळी' म्हणून नाममात्र मोबदला देईलही ट्रस्ट!" म्हणत 'नरो वा, कुंजरो वा' थाटात अनंतने आपलं घोडं पुढे दामटलं. "चांगल्या कामाला हातभार लागणार असेल तर एकतर पूर्णत: विनामूल्य करा नाहीतर पूर्णत: ��ोग्य मोबदला घ्या असं मला वाटतं! दिखाव्यापुरता नाममात्र मोबदला नको!" "कसं म��झ्या मनातलं बोललीस! अजून मी भोसलेंना कांहीच शब्द दिलेला नाहीं. 'आधी अनाथाश्रम तर बघावा' म्हणून मी त्यांच्याबरोबर आज संध्याकाळी जाणार आहे. एकदां ट्रस्टचं प्रत्यक्ष कामकाज बघितलं, विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्तींशी बोललो की एकुण कसं-काय चाललं आहे त्याची कल्पना येईल! सगळा कारभार पारदर्शी आणि चोख वाटला तरच मी हो म्हणेन!" "तुुमचे ते मनोहर भोसले काय काम करतात अनाथाश्रमासाठी?" "ते ट्रस्टसाठी जमेल तशा देणग्या गोळा करतात! यंदा दिवाळीपर्यंत त्यांनी सुमारे पंधरा लाख गोळा केल्याचं म्हणाले! त्यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत गाजावाजा न करतां काम करीत राहणारे! बरं, आज तूंही येशील कां आमच्यासोबत? " नको, --आज तुम्ही एकटेच जा! एकदा तुम्ही अनाथाश्रमाचं काम अंगावर घेतलंत, तर मग माझंही येणं होईलच! बघुंया, जमेल तशी मदत मीही करीन!"
३ नोव्हेंबर २०२२
0 notes
nagarchaufer · 4 months ago
Text
मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचं मोठं यश , शहरात वाढलं मतदान पण सत्ताधाऱ्यांची धाकधूक  
नगर शहरात मतदारांमध्ये जागृतीसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले होते त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे सरासरी 64 टक्के मतदान झालेले असून महापालिकेतर्फे झालेली आदर्श मतदान केंद्राची उभारणी , दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर , पाणी तसेच इतर सुविधा यामुळे मतदारांना देखील फारसा त्रास सहन करावा लागला नाही.  मनपा आयुक्त यशवंत…
0 notes
jagdamb · 4 months ago
Text
#देव_देश_धर्मरक्षक
ओळख आधी हिंदू नागरिक आणि मग सुजाण मतदार,
हिंदुत्वाचा सन्मान राखणाऱ्यालाच यंदा आम्ही निवडून आणणार!!
#आम्ही_भगव्याचे_रक्षक
#हिंदू #hindu #bhagwa #hindutwa #hindurashtra
(CONTENT ©️ COPYRIGHT)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
Tumblr media
0 notes
news-34 · 4 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 6 months ago
Text
Pune : शिवाजीनगरमध्ये यंदा 1127.4 मिमी हंगामी पावसाची नोंद
Pune : शिवाजीनगरमध्ये यंदा 1127.4 मिमी हंगामी पावसाची नोंद – MPC…
0 notes
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 February 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. • उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभ तसंच संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं उद्घाटन. • राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात, जालना जिल्ह्यात पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा खुलासा. आणि • महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून नांदेड इथं सुरुवात.
नवी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. विज्ञान भवनात सुरु असलेल्या या कार्यक्रमात संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, ९७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे, निमंत्रक संजय नहार, उपस्थित आहेत. भाषा बोलली तर ती जिवंत राहते, कारण भाषा ही जैविक गोष्ट आहे, भाषा ही जोडणारी गोष्ट असली पाहिजे, असं तारा भवाळकर यांनी यावेळी भाषेची महती सांगताना नमूद केलं. एक स्त्री साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही, तर गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध प्रादेशिक भाषांबद्दल पंतप्रधान संवेदनशील असतात, असं उषा तांबे यांनी प्रास्ताविक करताना सांगितलं. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं अधिक जवळ आणणारं हे संमेलन असून, इतर भाषिकांच्या सूचनाही यात विचारात घेतल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. महिला साहित्यिकाला संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला याबद्दल आनंद व्यक्त करत असल्याचं, शरद पवार यावेळी म्हणाले. काश्मीरी गायिकेनं गायलेलं महाराष्ट्र राज्यगीत या उद्घाटन सोहळ्याचं आकर्षण ठरलं. संमेलनानिमित्त आज सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. त्यात विविध साहित्यिक, राजकारणी, साहित्य प्रेमी, चित्ररथ सहभागी झाले होते. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचं दुसरं उद्घाटन सत्र होणार आहे. त्यात गेल्या संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण होईल.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार आहे. दरम्यान, पीएम उषा प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या चार इमारतींचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन, आणि संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त सरस्वती भुवन शैक्षणिक संस्थेत आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपती करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात वेरुळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिरालाही उपराष्ट्र्पती भेट देणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पश्चिम क्षेत्रीय परिषदेची सत्ताविसावी बैठक होणार असून, दुपारी ते जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी, बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात शहा यांच्या उपस्थितीत, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दहा लाख लाभार्थ्यांना, या योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण तसंच वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. यंदा राज्यातल्या पाच हजार १३० मुख्य केंद्रावर परीक्षा होत असून, १६ लाख ११ हजार ६१०विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची बातमी चुकीची असल्याचा खुलासा, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केला आहे. याठिकाणी काही स्थानिक झेरॉक्स दुकानदारांनी काही बनावट प्रश्नपत्रिका विकल्याचं आणि खरी प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर न आल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले… दहावीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करुन देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती, तर त्या बातमीमध्ये तथ्य नाहीये. सर्वच केंद्रावरीत जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्�� करण्यात येत आहे. आणि तो रेजिस्टंट मध्ये काही लोकांनी तेथे विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही. मात्र, पेपर कॉपीमुक्त ठेवण्यासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याशी काही पालकांनी वाद घातल्याचं आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात १५३ परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होत असून, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरता सात भरारी पथकांसह १५६ बैठे पथक नियुक्त केले आहेत. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी याकरता स्वच्छ आणि मोकळी हवा येईल असे परीक्षा केंद्र निवडण्यात आले आहेत.
राज्यातल्या खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; तसंच या मैदानांमध्ये खेळाडूंसाठी स्वच्छतागृहं आणि चेंजिंग रूम उभारण्याच्या सूचना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. मुंबईतल्या ओव्हल, आझाद आणि क्रॉस मैदानातल्या भूखंडांच्या भाडेपट्टा करार नूतनीकरणासाठी सर्वसमावेशक नवीन धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना किंवा एसटी भाड्यात सवलत, अशा कुठल्याही योजना बंद होणार नाहीत, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली.
मुंबई उच्च न्यायालयात तीन अतिरिक्त स्थायी न्यायमूर्तींच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं मंजुरी दिली आहे. यामध्ये न्यायमूर्ती शैलेश प्रमोद ब्रह्म, फ़िरदोश फिरोज पूनीवाल आणि जितेंद्र शांतिलाल जैन यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढवायलाही कॉलेजियमनं मंजुरी दिली.
छत्रपती संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या, कॅलिफोर्निया इथल्या विकिमीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवूनही हा मजकूर हटवण्यात न आल्यानं गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर विभागानं दिली आहे.
सहायक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा-सेट, येत्या १५ जूनला होणार असून, या परीक्षेसाठी २४ फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ही माहिती दिली. उमेदवारांना २४ फेब्रुवारी ते १३ मार्च या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळाद्वारे अर्ज भरता येणार आहेत. तर, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १४ ते २१ मार्च अशी मुदत देण्यात आली आहे.
महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांना आजपासून नांदेड इथं सुरुवात झाली. श्री गुरूगोविंद सिंघजी क्रीडा संकुलात राज्याच्या महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं. तर, खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कोणत्याही राज्याची, जिल्ह्याची ओळख तिथल्या महसूल प्रशासनाच्या कारभारावरून ठरते, महसूल कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि दर्जेदार कामांमुळे देशात महाराष्ट्र��ची ओळख निर्माण झाली असल्याचं, राजेशकुमार यावेळी म्हणाले. अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना, कर्मचाऱ्यांवरील ताण तणाव हलका करण्यासाठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा उपयोगी पडत असल्याचं सांगितलं. येत्या तेवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांसाठी महसूल विभागाचे सुमारे अडीच हजार कर्मचारी नांदेडमध्ये आले आहेत. यामध्ये क्रीडा स्पर्धांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद तालुक्यात शिवजयंतीच्या औचित्यानं प्राचीन शिवकालीन तलावातला गाळ काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, या योजनेतून वेरूळ इथल्या डमडम तलावात हे काम सुरू झालं असून, ज्या शेतकऱ्यांना शेतासाठी गाळ पाहिजे असेल,त्यांनी तो घेऊन जावा, असं प्रशासनानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या बसस्थानकात आज दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं एक बस अचानक प्रवासी उभे असलेल्या प्लॅटफॉर्मवर चढली. या घटनेत एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला, तर पाचजण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यात साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळानं वर्ष २०२४-२५ करता थेट कर्ज योजनेसाठी प्रस्ताव मागवले आहेत. या योजनेसाठी मातंग समाजातल्या इच्छुक लाभार्थ्यांनी येत्या पाच मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
0 notes
majhamoryaofficial · 7 months ago
Text
आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनातील प्रेम collect करणाऱ्या आपल्या लाडक्या collector madam अभिनेत्री शिवाणी नाईक madam( @shivaninaikofficial )ह्यांनी यंदा माझा मोरया मध्ये आपला बाप्पा बुक केला आहे!!
तुम्ही कधी करताय??!
आजच भेट द्या www.majhamorya.in ला आम्हाला भेट देण्यासाठी आमचा पत्ता BIO मध्ये 😌😇 . . . @shivaninaikofficial 😇 @majhamoryaofficial . . .
ganeshutsav #zeemarethiofficial #appiamchicollector #marathiactress #ganpatibappamorya #ganeshreels #ganpatiidol #ghargutibappa #sankashtichaturthi
. . . [ Ganesh Murti, Ganesh Idols, Bappa shop, zee marathi official, Ganpati near me, Bappamorya, Majha Morya]
0 notes
mazhibatmi · 7 months ago
Text
Sugarcane Farming: महाराष्ट्राच्या कृषी विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात मराठवाडा विभागातील उसाचे क्षेत्र यंदा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, पावसाच्या आधारे गोळा केलेली आकडेवारी ही दिशा दर्शवते. महाराष्ट्र साखर आयुक्त कार्यालयाने 31 जुलैपर्यंतच्या पावसाच्या आधारे कृषी विभागाच्या अहवालातून ऊस लागवडीची आकडेवारी संकलित केली आहे. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
marmikmaharashtra · 10 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-district-10th-result-92-percent-vasmat-taluka-topper/
0 notes
gajananjogdand45 · 11 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/lok-sabha-election-ego-of-superiority-is-not-right/
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : १६
पहांटे जाग आल्यावर अनंतने उशीखालचे घड्याळ उचलून बघितलं तर ठीक ५-३० वाजले होते. खरं तर झोंपायला मध्यरात्र उलटून गेल्याने 'सकाळी वेळेवर हमखास जाग नाहीं आली तर?' या शंकेपोटीं अनंंतने पर्याय म्हणून ६ वाजतांचा गजर लावून ठेवला होता! पण पहांटे ५-३० वाजतां नेमकी जाग आल्याने अंगीं बाणलेल्या संवयीचा परीणाम जाणवून तो स्वत:च कांहीसा चकीत झाला होता! 'गजर बंद करावा की राहूं द्यावा, म्हणजे शुभदाला ६ वाजतां उठायला आपसूक मदत होईल?' या संभ्रमांत कांही क्षण गेल्यावर त्याने गजर बंद न करण्याचा निर्णय घेतला व हलकेच पांघरूणाची घडी करून ठेवल्यावर तो मुखमार्जनासाठी बाथरूमकडे वळला. अनंत बाथरूम मधून बाहेर आला तोंवर शुभदाने उठून उशा आणि पांघरूणं आवरलीही होती. त्याने कांही विचारण्याआधीच शुभदा थट्टेच्या स्वरांत म्हणाली, "तुम्ही जागे होऊन, तुमची खुडबुड एकदां सुरु झाली की मला कशी बरं झोंप लागणार?" ��णि कीचनकडे निघालेल्या अनंतला इशाऱ्याने थांबवीत ती पुढे म्हणाली," आपण दोघेही वेळेवर उठलो आहोत;- तरी कसला गजर लावला असेल तर आतां तो बंद करून ठेवा! नाहींतर मी नेमकी बाथरूममधे असतांना ठणाणा वाजत राहील!"
त्यानंतर १५-२० मिनिटांनी डायनिंग टेबलापाशी बसून गरमागरम चहाचे घुटके घेतां घेतां अनंतने विचारलं, "पमाताईला आपण किती वाजेपर्यंत पोहोंचूं असं सांगीतलं आहेस? उशीर झाला तर ती बिचारी वाट बघत बसेल!" " आम्ही ९ वाजेपर्यंत येतो असं सांगीतलंय् -पण आपल्याला काल झोपायला किती वाजले असतील याची त्यांना कल्पना आहे;--त्यामुळे थोडा उशीर झाला तरी समजून घेतील पमाताई! मात्र काल रात्री सगळा पसारा आवरण्यापासून त्यांना थांबवायचं बरं सुचलं ना!" "हो;-नाहींतर आपल्याला घरी परतायलाच पहांट झाली असती! दिवसभर नेटाने उभं राहून सगळ्यांना हवं-नको बघतांना पार दमली असणार पमाताई! पण तोंडातून ब्र काढील तर शप्पथ! माझ्यापेक्षां ५ वर्षांनी मोठी आहे ती;- पण उत्साह मला लाजवील असा! त्यामुळे आतां निदान ५-६ तासांची विश्रांती झाल्यावर, नव्या दमाने तुम्ही कालचा पसारा आज दिवसभर आवरीत बसलात तरी त्रास जाणवणार नाही!" "काल पावसानेही उसंत घेतल्यामुळे अपेक्षित ती सगळी मंडळी येऊं शकली ते मात्र फार छान झालं! त्यांत दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी असल्याने जणूं डबल धमाकाच! खाण्यापिण्याचा रामरगाडा दिवसभर सुरु होता,--पण त्यामुळे घर कसं सतत हंसतं-निनादतं राहिलं! जणूं ३ वर्षांनी घराला पुन: एकदां घरपण आलं! मला फक्त एक खटकलं;-- वरवर हंसरा चेहरा ठेवून वावरत असल्या तरी मीनाताई अंतर्यामीं उदासच होत्या!"
"साहजिकच आहे ते!ती कितीही नाहीं म्हणाली तरी दिवसभर तिला सतत शेजारच्या सबनीस पती-पत्नींची आठवण येतच असणार ग! इतक्या वर्षांचा त्यांंचा शेजार, पण यंदा जानेवारीत कसा अकस्मात् संपला! कोविडचं निमित्त होऊन नवरा आणि बायको दोघेही तडकाफडकी ८ दिवसांच्या अंतराने मरण पावले! मागील दिवाळीत नांदत्या असलेल्या त्या घरांत, यंदा पणती लावायलाही कुणी नाही!" "असं मरण कुणाच्याच वांट्याला ये॓ऊं नये, परमेश्वरा! कर्ते-धर्ते दोन्ही मुलगे परदेशांत स्थायिक झालेले! त्यामुळे अंत्यसंस्कारां��ह सगळे विधी सोसायटीतील लोकांनीच पार पाडले! आतां यंदा ख्रिसमसच्या सुमारास दोन्ही मुलगे घरादाराची उस्तवार करण्यासाठी येणार आहेत असं काल मीनाताईंच्या बोलण्यांत आलं!" "या कोविड काळानं नको-नको ते सगळे अनुभव प्रत्येकाच्या पदरांत टाकले आहेत, शुभदा! त्यांतून शिकण्यासारखं एकच की आजचा दिवस आपला म्हणत आनंदाने जगायचा!" अनंत निष्कर्ष काढीत म्हणाला," मी आतां पटकन थोडा योगपाठ करतो म्हणजे मला जरा फ्रेश वाटेल. त्यानंतर लगेेच आंघोळी आटपून शक्यतों लवकर बाहेर पडुंया! ब्रेकफास्टसाठी गरम पॅटिस जातां-जातां आपल्या नेहमीच्या बेकरीतून घ्यायचे आहेत ते ध्यानांत ठेव! -- म्हणजे मी विसरलो तर मला आठवण कर!!"
२७ ऑक्टोबर २०२२
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी; यंदा युवा मतदार ठरणार निर्णायक, साडेसहा लाखांपेक्षा जास्त नोंदणी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत, तर दुसरीकडे निवडणूक तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा काही महिन्यांपासून व्यस्त आहे. दरम्यान, १५ मार्चच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मतदार आतापर्यंत ३० लाख ३१ हजारांच्या पुढे गेली आहे. यामध्ये नवमतदारांची संख्या ४१ हजारांच्या घरात आहे. यात २० ते २९ वयोगटातील युवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes