#म्हणणाऱ्या
Explore tagged Tumblr posts
Text
ll वानप्रस्थ ll : २५
'रविवार म्हणजे पूर्ण आरामाची सकाळ!' ही नोकरी करीत असतांना अंगी बाणलेली संवय अनंत निवृत्त झाल्यानंतरही टिकून होती! अगदी संवयीनुसार रोजच्याच वेळी जाग आली तरी उशीरापर्यंत झोपून राहण्यापासून ते रोजचा योगपाठ आणि सकाळी फिरायला जाण्याला सुट्टीपर्यंत! त्यानुसार आज आरामांत पहिला चहा पिऊन झाल्यावर अनंत आळसावल्यागत पेपरमधील मुख्य बातम्यांवर नजर फिरवीत बसला होता! त्याचं लक्ष मात्र 'शुभदा कीचनमधे आज नाश्त्यासाठी काय बरं बनवीत असेल?' याकडेच लागलेलं होतं! खरं तर त्याचा चहानंतर सिंंकमधे कप ठेवण्याच्या निमित्ताने कीचनमधे रेंगाळण्याचा प्रयत्न शुभदाने "गुपचूप बाहेर बसा पेपर वाचीत! नाश्ता तयार झाला की मी आणून देईन! तोपर्यंत माझ्या मागे उगाच भुणभुण लावूं नका!" म्हणत त्याला बाहेर पिटाळीत, ऊधळून लावला होता. त्यावर "अग तुला तेवढीच मदत होईल--" म्हणणाऱ्या अनंतला मधेच दटावीत ती म्हणाली होती, "रविवारी तुमचा आराम असतो ना, मग मलाही मी करतेय् ते आरामांत करूं द्या की! तुमची मदत म्हणजे लुडबूडच जास्त! नसते प्रश्न विचारून मला भंडावून सोडाल! त्यापेक्षा मी एकट्याने काय करायचं ते शांतपणे करीन!" "पण नाश्त्यासाठी काय बनवते आहेस ते तरी सांग!" या त्याच्या भाबड्या प्रश्नालाही उडवून लावीत शुभदा म्हणाली होती, "पानांत पडलं की दिसेलच! पेपर वाचून झाला असेल आणि भुकेपोटीं वेळ जात नसेल, तर टेरेसवरील झाडांना पाणी घाला! तेवढीच मला मदत करण्याची तुमची हौसही फिटेल!" त्यामुळे नाईलाज होऊन अनंत हाॅलमधे बसून पेपरवरून नुसतीच नजर फिरवीत होता. तेवढ्यांत डोअरबेल वाजली!
'रविवारी एवढ्या सकाळी सकाळी कोण बरं आलं असावं?' या कुतूहलाने अनंतने दार उघडलं. दाराबाहेर उभे असलेले अनोळखी गृहस्थ नजरानजर होताच किंचित हंसून नमस्कार करीत म्हणाले, " मी दिनकर सबनीस! तुमच्या शेजारच्या फ्लॅटमधे चार दि��सांपूर्वी राहायला आलो आहे. आज तुमच्या घरीं रोजच्यासारखी ग���बड जाणवली नाही. विचार केला आज रविवार,-- सुटीचा दिवस! तुम्हीही आरामात दिसताय्;-- म्हणून परिचय करून घेण्यासाठी आलो आहे!" "ओहो! -- म्हणजे चार दिवसांपूर्वी तुमचं सामान आलं तर शेजारच्या फ्लॅटमधे! पण तेव्हां तुम्ही कुणी दिसला नाही?" अनंत मोकळेपणानं स्वागत करीत म्हणाला, "या,ना आंत! बसा स्वस्थपणे!" आपल्या मागे दार बंद करून सबनीस आंत आले आणि म्हणाले, "दिवसभरात सामान हलवून, रिकामी जागा नवीन मालकाच्या ताब्यात दिली आणि आम्ही रात्री झोपायच्या वेळेस इथे आलो!" संभाषणाचे आवाज ऐकून बाहेर आलेल्या शुभदाची ओळख करून देत अनंत म्हणाला, " अग, आपल्या शेजारच्या फ्लॅटमधे हे दिनकर सबनीस आतां राहायला आले आहेत." तेवढ्यात खिशातून मोबाईल काढीत सबनीसांनी विचारलं, "If you don't mind, फोन करून माझी पत्नी रजनीला बोलावूं कां? मी तिला म्हणालो होतो की आधी मी पुढे जाऊन घरी कुणी आहे कां बघतो आणि तुला कळवतो!" अनंतने होकारार्थी मान हलवल्यावर सबनीसांनी मोबाईलवरून पत्नीला लगेच येण्याची सूचना केली आणि शुभदाकडे वळून ते म्हणाले, " तुमची दोघींचीही ओळख होईल म्हणून रजनीला बोलावून घेतलं!" "मीही कधीपासून वाट बघते आहे, शेजारी कुणीतरी राहायला येण्याची! गेलं वर्षभर तरी रिकामाच आहे शेजारचा फ्लॅट!" तेवढ्यांत डोअरबेल वाजली तशी "रजनीवहिनी आल्या वाटतं!" म्हणत चटकन् पुढे होऊन शुभदाने दार उघडून त्यांचं स्वागत केलं.
आंत आल्यावर हातांतला डबा शुभदाला देत रजनी सबनीस म्हणाल्या, " ढोकळा केला होता, तो आणला आहे नमुन्यासाठी! गरम आहे तोंवर लगेच खाल्लांत तर बरं!" " अरे वा!" अनंतकडे वळून चेष्टा करीत शुभदा म्हणाली, " मजा आहे आज एका माणसाची! मी त्याच्या खास आवडीचे कोळाचे पोहे बनवते आहे नाश्त्यासाठी;-- त्यात भर म्हणून रजनीवहिनींनी त्याचा लाडका ढोकळा आणला आहे!" " काय? आज नाश्त्यासाठी कोळाचे पोहे, शुभदा?" अनंतच्या स्वरातील आश्चर्य आणि आनंद लपण्यासारखा नव्हता! त्याची गंमत वाटून सबनीस म्हणाले, "वहिनी, तुम्ही नाश्त्यासाठी कोळाचे पोहे बनवताय् म्हणजे तुमचा उरक दांडगा म्हणायला हवा!" "आज रविवारी तसा आराम असतो, म्हणून फुरसत मिळते असले घाट घालायला! नाहींतर एरवी घड्याळाच्या कांट्यामागे धावतांना, कसले वेळमोडे पदार्थ करतांय्?" शुभदाने खुलासा केला. कीचनकडे वळत ती सबनीसांना उद्देशून म्हणाली, "तुम्हां दोघांना चालणार असेल, तर आंत डायनिंग टेबलजवळ बसतां कां? कोळाचे पोहे आतां पांच-सात मिनिटांत तयार होतील, ते आमच्याबरोबर तुम्हीही खा! आवडतात ना तुम्हांला?" "क्या बात है! मला नाही वाटत, कोळाचे पोहे न आवडणारा कुणी मराठी माणूस पुण्या-मुंबईत तरी जन्माला आला असेल!" सबनीस दिलखुलास हंसत उद्गारले!
२९ डिसेंबर २०२२
0 notes
Text
‘ मी पुन्हा येईन ‘ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची हॅट्रिक तर अजित पवारांचाही अनोखा विक्रम
‘ मी पुन्हा येईन ‘ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची हॅट्रिक तर अजित पवारांचाही अनोखा विक्रम #CMMaharashtra #Maharashtra
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही शपथ घेतलेली आहे. राज्याला आता पूर्वीप्रमाणेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री लाभणार असले तरी उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत तर मुख्यमंत्री पदावरून आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री…
0 notes
Text
मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर
मुंबई– बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंगात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यामध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठीच्या प्रचारसभेत सोनवणे यांना एकप्रकारे दम भरला होता. याला सोनवणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोनवणे यांना आपली मुलगी ग्रामपंचायत-नगरपालिकेसाठी निवडून आणता आली नाही,…
View On WordPress
0 notes
Text
सोनमला मुर्ख म्हणणाऱ्या 'युट्युबर'ला कायदेशीर नोटीस; काय आहे प्रकरण?
https://bharatlive.news/?p=167633 सोनमला मुर्ख म्हणणाऱ्या 'युट्युबर'ला कायदेशीर नोटीस; काय आहे ...
0 notes
Text
'बारामतीत सुप्रियाच सुळेच निवडून येणार' म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं आव्हान, म्हणाले "यावेळी परमेश्वरही..." | BJP Chandrakant Patil on NCP Ajit Pawar Supriya Sule Baramati Constituency sgy 87
‘बारामतीत सुप्रियाच सुळेच निवडून येणार’ म्हणणाऱ्या अजित पवारांना चंद्रकांत पाटलांचं आव्हान, म्हणाले “यावेळी परमेश्वरही…” | BJP Chandrakant Patil on NCP Ajit Pawar Supriya Sule Baramati Constituency sgy 87
राज्यात एकीकडे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा संघर्ष पहायला मिळत असताना, दुसरीकडे बारामती मतदारसंघावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केलं अस��्याने, राष्ट्रवादी नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. बारामतीमधील जनता पवार कुटुंबालाच निवडून देणार असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला असताना,…
View On WordPress
0 notes
Text
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ' येतेस का लॉजवर ? '
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘
पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घडत होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय…
View On WordPress
0 notes
Text
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ' येतेस का लॉजवर ? '
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘
पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घ���त होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय…
View On WordPress
0 notes
Text
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ' येतेस का लॉजवर ? '
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘
पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घडत होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय…
View On WordPress
0 notes
Text
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ' येतेस का लॉजवर ? '
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘
पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घडत होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय…
View On WordPress
0 notes
Text
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ' येतेस का लॉजवर ? '
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘
पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घडत होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय…
View On WordPress
0 notes
Text
भाजप सत्तेत आलंय मारवाडीत बोला म्हणणाऱ्या ‘ त्या ‘ व्यापाऱ्याची मनसेकडून धुलाई
सोशल मीडियावर काल मुंबई येथील एका मराठी महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालेला होता. भाजप सत्तेत आलं तर आता मारवाडीत बोला असा आग्रह एका व्यापाऱ्याने केला आणि त्यानंतर संतापलेल्या महिलेने मनसेकडे धाव घेतली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या परप्रांतीय व्यापाऱ्याला जाब विचारत त्याची धुलाई केली त्यानंतर त्याने अखेर झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. आपण गमतीने असे म्हणाले होतो असाही त्याने दावा केला…
0 notes
Text
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ' येतेस का लॉजवर ? '
पुण्यात खळबळ.. बसमध्ये हात धरून म्हणाला ‘ येतेस का लॉजवर ? ‘
पुणे शहरात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून एका तरुणीचा पाठलाग करून बसमध्ये सर्वांसमोर तिचा हात धरून आपल्या सोबत चल असे म्हणणाऱ्या एका व्यक्तीला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार सर्व नागरिकांच्या समोर घडत होता मात्र तरीही कोणी त्याला हटकले नाही अखेर बसवाहकाने त्याला खाली उतरून दिले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, विकी भास्कर लोंढे ( वय…
View On WordPress
0 notes
Text
गोमूत्र शिंपडणाऱ्यांना दंगलखोर म्हणणाऱ्या राऊतांनी आता त्र्यंबकेश्वरला जाऊन दाखवावे; दोन पायावर…
https://bharatlive.news/?p=101058 गोमूत्र शिंपडणाऱ्यांना दंगलखोर म्हणणाऱ्या राऊतांनी आता ...
0 notes
Text
'आय हेट यू डॅडी'
‘आय हेट यू डॅडी’
‘दगडी चाळ २’ मध्ये ‘डॅडी आणि सूर्या’ मध्ये नेमकं काय झालं? मुंबई : मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित ‘दगडी चाळ ‘ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एखाद्या वादळासारखा आला आणि त्यानंतर ‘चुकीला माफी नाही’ असे म्हणणाऱ्या अरुण गुलाब गवळी ऊर्फ ‘डॅडीं’ची पुन्हा सर्वत्र चर्चा सुरू झाली. ‘दगडी चाळ १’ ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर आता या चित्रपटाचे दुसरे पर्व…
View On WordPress
0 notes
Text
Editorial BJP Fadnavis Announced Chief Minister Shinde government ysh 95
Editorial BJP Fadnavis Announced Chief Minister Shinde government ysh 95
भाजप श्रेष्ठींनी फडणवीस यांना ‘तुमच्या इच्छेपेक्षा आमचे आदेश महत्त्वाचे’ असा जाहीर संदेश देण्याचे कारण नव्हते. असा उघड उपमर्द काँग्रेसनेही कधी केला नसेल.. मुख्यमंत्रीपदी शिंदे यांच्या निवडीऐवजी ‘सरकारात मी नसेन’ म्हणणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणे याची चर्चा अधिक मोठी ठरली.. उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर गुरुवारी दिवसभर ज्या काही घडामोडी घडल्या त्या…
View On WordPress
0 notes
Text
' काय डोंगर काय दांडा ' म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
‘ काय डोंगर काय दांडा ‘ म्हणणाऱ्या नगरसेविका शिंदे गटात सामील
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर बंडखोर आमदारांचा कडक शब्दात समाचार घेणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे ह्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या आहेत त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडत केंद्र सरकारच्या निशाण्यावर मुंबई महापालिकेतून शिवसेना हद्दपार करणे आहे हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांना…
View On WordPress
0 notes