#मोठा संघर्ष
Explore tagged Tumblr posts
Text
जालन्यातील मेडिकल कॉलेज याच शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे यासाठी प्रयत्न - आ. गोरंटयाल
विधिमंडळाच्या अधिवेशनात आग्रही भूमिका घेणार @ मेडिकल कौन्सिलच्या पथकाने केली जागांची चाचपणी Efforts are being made to start the medical college in Jalna from this academic year. Gorantyal जालना (प्रतिनीधी) राज्य शासन आणि प्रशासकीय पातळीवर मागील तीन वर्षात मोठा संघर्ष करून जालन्यासाठी मंजूर करून आणलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यावर्षी कोणत्याही परिस्थितीत सुरू झाले पाहिजे अशी आपली भूमिका…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश.
कष्टकरी आणि शेतकरी हिताच्या आड येणाऱ्याला आपला पाठींबा नाही - खासदार शरद पवार.
लातूर जिल्ह्यात लिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश.
आणि
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याचं उद्घाटन.
****
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रशासनास दिले आहेत. ते आज औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या पंचनाम्यांसाठी कृषी, महसूल त्याचबरोबर पिक विमा कंपनीलाही सोबत घ्या, असे निर्देश मुंडे यांनी दिले.
या बैठकीला मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आमदार सतिश चव्हाण, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी ��धिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्र���ार परिषदेत बोलताना मुंडे यांनी, दुष्काळी परिस्थितीत राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरि मदत करेल, अशी ग्वाही दिली. विभागात पिण्याचं पाणी तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहणार नाही, यासाठी उपाययोजना हाती घेणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. ते म्हणाले -
आहे ही परिस्थिती खरंच भयावह आहे. आपण एकटे नाहीत तर हे सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं आहे. माझ्या मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना आणि भगिनींना याठिकाणी विनंती करतो की, अशा संकटाच्या काळात शासन सर्वतोपरी तुमच्या पाठीमागे आहे. गरज पडली तर वाट्टेल तेवढे पैस खर्च करील पण या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणाने उभं राहील. आठवड्याला एक बैठक आम्ही कृषी विभागाचा मंत्री या नात्याने घेणार आहे.
दुष्काळी स्थितीसाठी पावसाचा सलग २१ दिवसांचा खंडकाळ ग्राह्य धरला जाईल, यासाठी प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं कृषीमंत्री मुंडे यांनी सांगितलं. शेती कर्जाची वसुली दुष्काळी काळात थांबवावी, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं. मराठवाड्यातले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच औरंगाबाद इथं मंत्रिमंडळाची बैठक घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.
****
राज्यात आतापर्यंत एकूण १६ ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी गोयल यांच्याकडे केली, त्यावर गोयल यांनी ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उप्तादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं, भुजबळ यांनी म्हटलं आहे.
****
मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन समितीच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत सागरी जिल्ह्यांतील तसेच भूजलाशयीन जिल्ह्यातले प्रत्येकी दोन विधानसभा सदस्य आणि एक विधानपरिषद सदस्यांच्या नावांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच मत्स्य व्यवसाय विकास धोरण तयार होत असून मत्स्य व्यवसायाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ते साह्यभूत ठरणार आहे.
****
कष्टकरी आणि शेतकरी हिताच्या आड येणाऱ्याला आमचा पाठींबा असणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज सातारा जिल्ह्यात दहिवडी इथं एका शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी हितासाठी एकत्र येऊन संघर्ष करण्याचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं. जनतेच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष नसून त्याविरोधात एकजुटीनं उभं राहणे आवश्यक असल्याचं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर सिंधुदुर्ग इथल्या चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिली. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट दिल्ली इथं भेट घेतली होती. एअर अलांयन्स आणि इंडीगो या दोन विमान कंपन्यांमार्फत ही विमान सेवा दर आठवड्याला सुरु करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.
****
'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या हस्ते घोरवड इथल्या प्रगाय तीर्थ याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं तसंच हुतात्मा स्मारकाचे अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात हुतात्मा सैनिकांच्या कुटूंबीयांचा तसंच सैनिकांचा सत्कारही करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात लिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या भागात संशयित सोनोग्राफी केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. त्या आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेत जिल्ह्यातल्या सर्व शासकिय कार्यालये, निमशासकिय कार्यालये आणि सर्व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त ठेवण्याच्या सूचना दिल्या.
****
उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात आज राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाड्याचं उद्घाटन करण्यात आलं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आर.व्हि.गलांडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. नागरिकांमध्ये मरणोत्तर धार्मिक विधीप्रमाणेच मृत व्यक्तीचे नेत्रदान करण्याबाबतचा वैज्ञानिक विधी रुजवणे आवश्यक असल्याचं मत दोमकुंडवार यांनी यावेळी व्यक्त केलं. नेत्रदानाच्या चळवळीत सामाजिक संस्था आणि नागरिकांनी स्वेच्छेनं पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आर.व्हि.गलांडे यांनी जिल्ह्यातच नेत्रपेढी आणि प्रत्यारोपण केंद्र कार्यान्वित होणं गरजेचं असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश दिले.
****
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मताची "व्हाईस ऑफ वोट" या अंतर्गत जाहिरात निर्मित ध्वनिचित्रफित, भित्तीपत्रक आणि घोषवाक्य या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या महाविद्यालय तसंच सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन बीड उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाले आहेत. परंतु शासनाकडून शिष्यवृत्ती प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रांसाठी महाविद्यालयाकडून अडवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी महाविद्यालयांनी अडवणूक न करता विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत, असं आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या बालाजी सरोवर इथं उस्मानाबादचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते चाळीस शाळांना विविध शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातल्या २५ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५ शाळांना पाचशे बाकं, वीस संगणक, प्रोजेक्टर, डिजिटल यंत्रणा अशा साहित्याचं वाटप यावेळी ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
आज हिंगोली इथं एकता दौड स्पर्धा घेण्यात आली. सामाजिक शांतता, सद्भावनेचा संदेश देण्यासाठी आणि खेळाप्रती समाजात आवड निर्माण व्हावी या उद्देशानं पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडा दाखवण्यात आला.
****
0 notes
Text
अर्जुनीत व्याख्यानासाठी अलोट गर्दी | जेवढा मोठा संघर्ष तेवढे यशही मोठे असते : विश्वास नागरे पाटील
0 notes
Text
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत?
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे कोणतं सोशल इंजिनिअरिंग करू पाहत आहेत? एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आणि बाळासाहेब ठाकरेंकडून, मिळालेला शिवसेनेचा वारसा स्वत:कडेच ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा संघर्ष सुरू झाला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, लोकसभा-विधानसभेचं सभागृह ते दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क, असा या संघर्षासाठी अनेक मैदानांचा मोठा विस्तृत पट आहे. पण यातलं सर्वात मोठं…
View On WordPress
0 notes
Text
म्यानमारची सत्ता पुनश्च सैन्याच्या हातात!
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम
मो. नं. ८५५०९७१३१०
म्यानमारमध्ये १० वर्षांपूर्वी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारण्यात आलेली होती. परंतु म्यानमारची सत्ता पुन्हा सैनिकी व्यवस्थेकडे गेलेली आहे. देशाचे सर्वोच्च नेते आंग सॅन सू की आणि अध्यक्ष यू विन मिंट यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केल्यानंतर म्यानमार सैन्याने म्यानमारवर आपली सत्ता काबीज केली असून अटकेनंतर लष्करी मालकीच्या टीव्ही चॅनल मायावाडीने देशात वर्षभर आ��त्कालीन परिस्थिती राहणार असल्याची घोषणा केली. म्यानमारची राजधानी राजधानी नेपेटा आणि मुख्य यॅंगॉन मधील सैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत. बख्तरबंद वाहने येथे गस्त घालत आहेत आणि बर्याच शहरांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशाची सत्ता आता संरक्षण सेवा प्रमुख सेनापती मिंग ऑंग हिलिंग यांच्या ताब्यात असून देशाचे पहिले उपराष्ट्रपती माइंट स्वे हे कार्यवाहक अध्यक्ष असतील लष्कराचे प्रमुख म्हणूनही त्यांना पदभार सोपवण्यात आला आहे. देशातील स्थिरता धोक्यात आल्याने हा निर्णय घेतल्याचे सैन्याने म्हटले आहे. कुठल्याही निषेधाला चिरडण्यासाठी सैन्य रस्त्यावर उतरले असून फोन लाईन्स बंद करण्यात आल्या आहेत. सैनिकी कारवाईमुळे राजधानी नेपिताशी संपर्क तुटल्याने परिस्थिती बिघडली आहे. येनगॉनमधील स्थानिकांनी येत्या काही दिवसांत एटीएमसमोर रोख रकमेची कमतरता निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. म्यानमार बँकिंग असोसिएशनच्या म्हणण्यानुसार बँकांनी काही काळासाठी सर्व आर्थिक सेवा बंद केल्या आहेत.
आणीबाणीनंतर निवडणुका घेण्यात येतील असे म्यानमारच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगात सुधारणा करून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांचा आढावाही घेण्यात येईल. ८ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्याचा पुनरुच्चार सैन्याने यावेळी केला. या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमॉक्रेसी पार्टीने ८३ टक्के जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासूनच सैन्य आणि सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला होता. संसदेच्या नव्या अधिवेशनापूर्वी सैन्याने संविधान संपुष्टात आणण्याचा आणि निवडणुकीत मतदानाच्या घोटाळ्याच्या तक्रारीवर कारवाई न केल्यास सेना कारवाई करणार असल्याचा इशारा सैन्याने दिला होता.
म्यानमारचे नेते आंग सॅन सू की राजकीय पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) यांनी देशातील जनतेला लष्करी बंडखोरीचा विरोध करण्याचे व हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवा���न केले आहे. पक्षाच्या प्रमुखांनी आंग सॅन सू की फेसबुक पेजवर म्हटले आहे की लष्कराच्या कृती अन्यायकारक आणि मतदारांच्या इच्छेनुसार आणि घटनेच्या विरोधात आहेत. मात्र, हा निरोप कोणी पाठवला हे कळू शकले नाही. बर्याच काळापासून नजरकैदेत राहिलेल्या आंग सॅन सू की यांच्या��र २०११ पर्यंत सैन्याने राज्य केले आहे. देशात लोकशाही आणण्यासाठी आंग सॅन सू की यांनी कित्येक वर्षे संघर्ष केला. यावेळी त्याला बराच काळ नजरकैदेत राहावे लागले. लोकशाही आल्यानंतर संसदेत सैन्याच्या प्रतिनिधींसाठी निश्चित कोटा निश्चित करण्यात आला होता. घटनेत अशी तरतूद होती की सू कधीही अध्यक्षीय निवडणूक लढवू शकत नाही.
ऑंग सॅन सू ची म्यानमारच्या स्वातंत्र्याचा नायक जनरल ऑंग सानची यांच्या कन्या आहे. १९४८ मध्ये ब्रिटीश राज्यापासून स्वातंत्र्यापूर्वी जनरल ऑंग सॅनची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सू ची दोन वर्षांची होती. म्यानमारच्या लष्करी राज्यकर्त्यांना आव्हान देणारी मानवाधिकारांसाठी लढा देणारी महिला म्हणून सु की यांना जगभर पाहिले जाते. १९९१ मध्ये अटकेत असताना सु ची यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. १९८९ ते २०१० या काळात सु ची यांनी जवळपास १५ वर्षे नजरकैदेत घालविली. नोव्हेंबर २०१५ मध्ये सू ची यांच्या नेतृत्वात नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीने एकतर्फी निवडणुका जिंकल्या.
म्यानमारच्या इतिहासातील २५ वर्षातील ही पहिली निवडणूक होती ज्यात लोकांनी उघडपणे भाग घेतला. म्यानमारची राज्यघटना त्याला अध्यक्ष होण्यापासून प्रतिबंधित करते कारण त्याची मुले परदेशी नागरिक आहेत. पण ७५ वर्षांची सू की म्यानमारचा सर्वोच्च नेता म्हणून पाहिली जाते. म्यानमारचे राज्य सल्लागार बनल्यापासून म्यानमारच्या अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लिमांवर आंग सॅन सू की यांच्यावर टीका झाली होती. २०१७ मध्ये राखीन प्रांतातील पोलिस कारवाई टाळण्यासाठी लाखो रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारच्या देश बांगलादेशात आश्रय घेतला. त्यानंतर सू ची च्या आंतरराष्ट्रीय समर्थकांनी बलात्कार खून आणि संभाव्य हत्याकांड रोखण्यासाठी माईटी सेनचा निषेध केला नाही किंवा अत्याचारांची कदर केली नाही. काही लोकांचा असा तर्क आहे की बहुधा पारंपारिक देशात शासन करण्याचा प्रयत्न करणारी ती हुशार राजकारणी आहे. ज्यांचा इतिहास खूपच जटिल आहे. सु ची यांनी सन २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांची आंतरराष्ट्रीय कीर्ती संपुष्टात आली. तथापि आंग सॅन सू की म्यानमारमधील द लेडी ही पदवी प्राप्त झाली आहे. बहुसंख्य बौद्ध लोकांमध्ये अजूनही ती खूप लोकप्रिय आहे. रोहिंग्या समाजाबद्दल मात्र सन सु ची कठोर भूमिका दिसून आली.
म्यानमारच्या परस्थिती बाबत भारतासह अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. म्यानमारच्या परिस्थितीवर भारताने बारीक लक्ष ठेवले असून म्यानमारमधील लष्करी उठावास वोरोध आणि शेजारील देशातील लोकशाही प्र��्थापनेस नेहमीच पाठिंबा दर्शविला असून म्यानमारमधील लष्करी उठाव आणि वरिष्ठ नेत्यांच्या अटकेबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. १६०० कि.मी. लांबीचा किनारा भारत आणि म्यानमार दरम्यान आहे. दोन्ही देशांमध्ये दीर्घ काळापासून चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. चीनला लागून अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मणिपूर आणि नागालँडमधील घुसखोरी वाढवायची आहे. युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीजनुसार चीन म्यानमारच्या बंडखोरांना शस्त्रे देऊन भडकवित असतो. दुसरीकडे भारत म्यानमारमधील लोकशाहीचा समर्थक आहे. अशा परिस्थितीत म्यानमारचे सैन्य चीनकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्यानमारमधील लष्करी बंड थांबवून ऑंग सॅन सू की यांच्यासह देशातील सर्वोच्च नेत्यांच्या अटकेतून सुटका न केल्यास आणि देशात लोकशाही पुनर्संचयित करण्यासाठी योग्य पावले उचलली गेली नाहीत तर अमेरिकेकडून कठोर पाऊले उचलले जातील असे व्हाईटचे प्रेस सचिव जेन साकी यांनी स्पष्ट केले आहे. म्यानमारच्या सैन्याने देशात प्रस्थापित लोकशाही बिघडवण्यासाठी पावले उचलली आहेत. म्यानमारच्या लोकशाही संस्थांना अमेरिका कणखर पाठिंबा दर्शविते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले की, “आम्ही लोकशाही प्रक्रियेअंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला पाठींबा देतो तसेच म्यानमारच्या सैन्यदलाला सर्व सरकारी अधिकारी व नेते सोडण्याची आणि देशातील जनतेच्या निर्णयाचा आदर करण्यास सांगितले आहे. म्यानमारच्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाने सैन्यात निवडणुकीत घोटाळे असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ८ नोव्हेंबर रोजी म्यानमारमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत ऑंग सॅन सू की नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसीने नेत्रदीपक विजय मिळवला. सु ची च्या पक्षाने ४७६ पैकी ३९६ जागा जिंकल्या तर सैन्य समर्थित संघटना एकता व विकास पक्षाने केवळ ३३ जागा जिंकल्या.
म्यानमारच्या परिस्थिती संदर्भात संयुक्त राष्ट्र संघाने सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरेस यांनीही सु ची आणि इतर नेत्यांना म्यानमार सैन्याने ताब्यात घेतल्याचा निषेध केला आहे. सु ची यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत असताना ऑस्ट्रेलियन परराष्ट्रमंत्री मारिज पेने म्हणाले की नोव्हेंबर २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालांच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रीय विधानसभेच्या शांततेत पुनर्रचनेचे जोरदार समर्थन करतो. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनीही म्यानमारमधील सत्तापरिवर्तनाचा निषेध केला आहे. जनतेच्या मताचा आदर केला पाहिजे असे ट्विट जॉन्सन यांनी केले आहे. बांगलादेशने सुद्धा म्यानमारमध्ये शांतता पुनर्संचयित करण्याची मागणी केली आहे. ताज्या घडामोडींचा रोहिंग्यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवर परिणाम होणार नाही. अशी अशा बांगला देशाला आहे. बाग्लादेशांच्या परराष्ट्र मंत्रालयाने अशी आशा व्यक्त केली की म्यानमारमध्ये लवकरच लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होईल. त्याचबरोबर अॅम्नेस्टी इंटरनेशनलने ऑंग सॅन सू ची आणि इतर नेत्यांना त्वरित मुक्त करण्याची मागणी केली आहे.
म्यानमारमधील लोकशाही सुधारणांना मर्यादा आल्या आहेत असे सांगून जगभरातील सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी सैनिकी राजवटीचा निषेध केला आहे. सध्याच्या म्यानमारला लोकशाही देश म्हणून हा मोठा धक्का असून मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि सैन्यावर टीका करणार्यांवर प्राणघातक हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती ह्यूमन राइट्स वॉचच्या कायदेशीर सल्लागार लिंडा लखधीर यांनी बोलून दाखविली. सैन्यदलाच्या सैन्याच्या विद्रोहच्या भीतीने लष्कराने म्यानमारमध्ये एक वर्षाची आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. यापूर्वीही म्यानमारच्या सैन्याने आंग सान सू की यांना ताब्यात घेतले आहे.
निवडणुकीत घोटाळ्याच्या तक्रारी आल्यानंतर म्यानमारच्या सैन्य दलाने शनिवारी आपल्या लष्करप्रमुखाने एका सामूहिक बंडखोरीची धमकी दिली असल्यास नकार दिलेला आहे. प्रसार माध्यमांनी त्यांच्या मुद्द्याचा चुकीचा अर्थ काढला आहे असे म्यानमारच्या सैन्याकडून स्पष्ट करण्यात आले. गेल्या आठवड्यात म्यानमारमध्ये तणाव निर्माण झाला होता. नोव्हेंबरमध्ये लष्कराच्या घोटाळ्याच्या तक्रारींकडे लक्ष न दिल्यास सैन्य दलाच्या एका प्रवक्त्याने अफवा उठवल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्यानमार कमांडर-इन चीफ सीनियर जनरल मिल ऑंग लैंग यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेत म्हटले होते की, 'देशात कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न केल्यास संविधान रद्द केले जाऊ शकते'. त्यांच्या या वक्तव्यानंतर म्यानमारमधील राजकारण तापले होते. म्यानमारच्या संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारी होणार होते परंतु तसे झाले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आंग सॅन सू कीच्या पक्षाला एनएलडीला ८० % मते मिळाली होती. रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहार केल्याचा आरोप असूनही आंग सान सू ची च्या सरकारला ही मते मिळाली होती.
म्यानमार मध्ये भविष्यात काय घडू शकते यावर विचार केल्यास लष्कराला जास्त फायदा होताना दिसत नाही. तरीही सैन्याने हे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीच्या आशिया रिसर्च इन्स्टिट्यूटशी संबंधित जेरार्ड मॅकअथी म्हणतात,"सध्याची व्यवस्था म्यानमारच्या लष्करासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्यापारी हितसंबंध आणि राजकारण यात पूर्ण स्वायत्तता आहे, मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक तेथे आहे सर्व काही सैन्याच्या हाती आहे." पुढच्या निवडणुकीत विरोधी पक्ष युएसडीपीला अधिक चांगले व मजबूत करण्यासाठी सैन्य हे करीत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्याचबरोबर ह्युमन राईट वॉचचे फिल रॉबर्टसन यांचा असा विश्वास आहे की लष्कराच्या अशा हालचालीमुळे म्यानमार पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर विलग होईल. दुसरीकडे, यामुळे देशामध्येही संताप निर्माण होईल. ते म्हणतात, "मला वाटत नाही की म्यानमारची जनता ही व्यवस्था सहज स्वीकारेल. लोकांना पुन्हा सैनिकी सत्तेच्या भविष्याकडे वाटचाल करायची नाही. देशातील लोक आंग सॅन सू की यांना कणखर नेतृत्वाच्या रूपात पाठींबा द्यायला पाहिजे."
म्यानमारमधील लोकशाही पद्धतीने निवडले गेलेले सरकार बरखास्त करून आणि सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेने आता दक्षिण आशियाई देशावर नवीन निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर म्यानमारमध्ये आणीबाणी लागू करण्यात चीनचा हात असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी यांनी 'लष्करी पुनरुज्जीवन' साठी म्यानमारच्या लष्करप्रमुखांना थाप दिली होती आणि दोन्ही देशांचे भाऊ असल्याचे वर्णन केले होते. चीन पक्षीय राजवटीचे हुकुमशाही मान्य करतो. आतापर्यंतच्या घडामोडींवर चीन शांत आहे आणि म्यानमारला मित्र म्हणत सर्व बाजूंनी करारावर येण्याचे आवाहन केले आहे. म्यानमारचा एक तृतीयांश व्यापार हा चीनशी आहे. जो अमेरिकेपेक्षा १० पट जास्त आहे. म्यानमारमध्ये चीनची गुंतवणूक २०.५ अब्ज डॉलर्स (१.५७ लाख कोटी रुपये) आहे. चीनचे म्यानमार मधील हितसंबंध लक्षात घेता म्यानमारमधील सैन्याच्या कारवाईला चीनची फूस असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
डॉ. मंगेश गोविंदराव आचार्य
राज्यशास्त्र विभाग प्रमुख
जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम
मो. नं. ८५५०९७१३१०
1 note
·
View note
Text
असीम....
असीम अनंत अपार आहेस तू.
पण तू कितीही मोठा झालास ना तरीही माझा दोस्तच वाटतोस मला.
असा दोस्त कि ज्याला माझ्या मनातल न सांगता कळतं .
केळशीला सुरुच्या वनाला बिलगणारा तू.
मुरुडच्या लहानसहान पोरांना डॉल्फिन्स दाखवणारा तू..
गणपतीपुळ्याच्या ओंकाराचा नाद आपल्या लाटांतून ऐकवणारा तू..
आंजर्ल्याच्या कड्यावरून दिसणारं तुझं लोभसवाणं रूप ..
गोव्याच्या हवेने थोडा glamorous झालेला तू ..
तुझी जेवढी रूपं बघितली तेवढं तुझ्याबद्दलचं प्रेम वाढलं मित्रा ..
तुला भेटायचं म्हणलं कि माझ्यातलं पोर जागं ��ोतं . मग मला बाकीचं काही लागत नाही.
तुझ्या जवळ जसं जसं येत जातो तसं आकाशाचं रूप बदलतं .. तुझा प्रतिबिंब पडतं आकाशात
सुरुची ,नारळी पोफळी ची झाडं दिसली कि तुझी चाहूल लागते . आणि मग मनाला सांभाळणं अवघड होऊन जातं ..
एवढ्या वेळा तुला भेटलोय ..पण प्रत्त्येक वेळी तेवढ्याच ओढीने भेटतो मी तुला ..
तुला भेटायला जातानाचा रस्ता पण आवडतो.. त्यावरची माणसं पण आवडतात ..त्यांचं बोलणं , वागणं बघत राहावं असं वाटतं ..
तुझा अंश त्यांच्यात असतो आणि म्हणून तुझ्या जवळ राहणारे लोक वेगळेच असतात . सतत पळणाऱ्या लोकांच्या चिंता त्यांना भेडसावत नाहीत..
पण म्हणून संघर्ष संपलेला नसतो.तो चालूच असतो.पण चेहऱ्यावर एक निवांतपणा असतो.. त्यांच्या आत तुझी अथांगता पोचलीये असा वाटतं काहीवेळा ..
तुझा स्पर्श आणि नंतर एक एक पाऊल तुझ्या आणखी जवळ येणं .. तुझ्या लाटा अंगावर घेणं त्या अथांगतेचा एक अंश.. तो हि अथांगच . . तो अंगावर घेणं ..मनाला आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो.. खूप असतं मनात तुला भेटायच्या आधी ..आपल्या लोकांकडून बाळगलेल्या छोट्या अपेक्षा ..त्यांचा कधीच ना फिरणारा पाठीवरचा मायेचा हात .आपल्या व्यापात गुंतलेले आणि मनात असून सुद्धा वेळ ना देऊ शकणारे "आपले "लोक .. त्यांच्या जुन्या आठवणी .. आणि या सगळ्यातून आलेलं एकटेपण insignificant वाटतो स्वतःला मग मी खूप .. पण तुला बिलगलो कि ते मळभ जातं सगळं कुणाबद्दल राग नाही राहत मनात .. कारण तुला कळतं ..ना सांगता ..
साक्षात सूर्यनारायणाचं नातं आहे तुझ्याशी .. आपलं काम काही झालं तरी नेटाने करणारे तुम्ही २ दोस्त ..संध्याकाळच्या वेळेला काय गप्पा मारत असता ..
तो हि कधीच थांबत नाही आणि तू पण .. काय सांगता एकमेकांना संध्याकाळी .. पण तुमच्या दोघांचा ते अद्वैत मात्र खूप लोभसवाणं असतं .. हळव्या माणसाला अजून कातर बनवतं ते..
सूर्यास्तानंतरचं तुझं रूप खूप उदास बनवतं मनाला ..पण ते हि सौन्दर्यच ना.. उदासी खूबसूरत नही होती बाबूमोशाय?
खूप आहे मनात ..पण तुला ना बोललेलं पण कळतं ना.. एवढं पुरे आहे माझ्यासाठी ..थांबतो
3 notes
·
View notes
Text
रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकार झुकलं?; घेतला मोठा निर्णय
मुंबई | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलतं आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र दिवाळीच्या सणाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीची दमडीही मिळाली नाही. यामुळं जगावं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. अशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे फडणवीस सरकारविरुद्ध दंड थोपटले आहे. तुपकरांनी शिंदे फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिलाय. रविकांत तुपकरांनी सरकारने 4 मागण्या केल्या आहेत. त्यांनी सोयाबीनला प्रति क्विंटल साडे 8 हजारांचा दर द्या. कापसाला प्रति क्विंटल साडे 12 हजारांचा दर द्यावा. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. आणि पिक विमा कंपन्यांवर कारवाई करुन पिकविम्याचे पैसा द्यावेत, असं म्हटलंय. तुपकरांनी सरकारला इशारा देत सळो की पळो करून सोडलंय. थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतल्याने सरकार हादरल्याचं दिसतंय. तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलाय. शिंदे सरकारने तातडीने बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतही जाहीर केली. पण सरकारचा हा उतारा काही लागू झाला नाही. तुपकर हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकार स्वाभिमानीच्या इशाऱ्यानंतर अॅक्शन मोडवर आले. त्यांनी वाशिम आणि बुलढाण्यातील शेतकऱ्यांसाठी मदतही जाहीर केली. त्यामुळे आता हे आंदोलन मागे घेण्यात येईल असं वाटत होतं. पण तुपकर आंदोलनावर ठाम आहेत. राज्य सरकारने या आंदोलनाचा धसका घेत, तातडीने 157 कोटींचा निधी मंजूर केला. पण हा निधी अपुरा असल्याचा दावा करत, तुपकर यांनी आंदोलनावर कायम असल्याचं म्हटलंय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारसमोरील पेच वाढला आहे. तुपकरांच्या जलसमाधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नोटीसही बजावलीय. मात्र अशा नोटीशींना घाबरत नसून हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान तुपकरांनी दिलंय. शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेची मस्ती आणि पैशाचा माज आला आहे. पण आता सोयाबीन कापूस उत्पादक ही मस्ती उतरवल्याशिवाय थांबणार नाही, असंही तुपकर म्हणालेत. सरकारने निदान आमच्याशी चर्चा करावी. नंतर निर्णयाचे श्रेय त्यांना घ्यायचं असेल तर सरकारने जरूर घ्यावं. आमची ही लढाई श्रेयासाठी किंवा राजकीय नाही. शेतकऱ्यांच्या समस्या दूर व्हाव्यात, या एका भावनेने आम्ही आंदोलन करत असल्याचं तुपकरांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतायत. पण तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी तुपकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिंदेंच्या आवाहनानंतर देखील रविकांत तुपकर ठाम असल्याने शिंदे सरकार आणि रविकांत तुपकरां��ध्ये संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. Read the full article
0 notes
Text
"शाहीन असता तर वेगळा खेळ": बाबर आझम आशिया चषकात भारत विरुद्ध संघर्ष | क्रिकेट बातम्या
“शाहीन असता तर वेगळा खेळ”: बाबर आझम आशिया चषकात भारत विरुद्ध संघर्ष | क्रिकेट बातम्या
शाहीन शाह आफ्रिदी हा सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याला आशिया चषकातून बाहेर पडणे हा संघाला मार्की स्पर्धेपूर्वी मिळालेला मोठा धक्का होता. दुबईत रविवारी भारत विरुद्ध आशिया चषक सामन्याच्या आधी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तो म्हणाला की त्याच्या संघाला स्पीडस्टरची नक्कीच उणीव भासेल आणि शाहीनने हा खेळ खेळला असता तर हा वेगळा खेळ झाला असता. “शाहीन आमच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक…
View On WordPress
#आशिया कप 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#पाकिस्तान#भारत#भारत विरुद्ध पाकिस्तान 08/28/2022 inpk08282022215316 ndtv स्पोर्ट्स#मोहम्मद बाबर आझम#शाहीन शाह आफ्रिदी
0 notes
Text
ओबीसी आरक्षण; राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने पुनर्विचार याचिका दाखल करावी : छगन भुजबळ
ओबीसी आरक्षण; राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने पुनर्विचार याचिका दाखल करावी : छगन भुजबळ
नाशिक : राज्यातील २७१ ग्रामपंचायत, ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायत याप्रमाणे ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे ओबीसींच्या वाट्याचा संघर्ष काही संपताना दिसत नसून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला मोठा धक्का बसला आहे. यावरून ओबीसी आरक्षणाबाबत बाजू मांडण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे ओबीसींच्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 June 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ जून २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
सर्व परीक्षांची प्रमाणपत्र�� डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र शोभणे यांची निवड
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार-कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सांगली इथल्या मेळाव्यात टीका
जालना शहरात रस्ता अपघातात तीन बालकं ठार;औरंगाबाद इथं दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
नैऋत्य मोसमी पाऊस राज्यभरात सक्रीय
सविस्तर बातम्या
राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी व्हावा, हा आमच्या सरकारचा अजेंडा असल्याचं प्रतिपादन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल नांदेड इथं शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार लोकांच्या चिरंतन स्मरणात राहतं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले…
Byte..
आमच्या अजेंडा एकच आहे, या राज्याचा सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे. हेच तर सरकारचं काम असतं. नाहीतर सरकार कशासाठी? सरकार कुणासाठी? सरकारं येतात, सरकारं जातात, सरकारं बदलतात. परंतू हे सरकार लोकांसाठी काम करतं. तेच सरकार कायम लोकांच्या आठवणीमध्ये चिरंतन राहतं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे.
अबचलनगर मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेअंतर्गत, ४३६ कोटी ४८ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचं काल भूमिपूजन करण्यात आलं. शहरातल्या मलनि:स्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या कामांसह, रस्ते विकास कामांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ४३० किलोमीटर लांबीच्या भूमिगत मलनि:स्सारण वाहिनीची जोडणी तसंच महानगरपालिका हद्दीतल्या १८२ रस्त्यांची कामं याअंतर्गत होणार आहेत.
****
दरम्यान, ठाणे इथं महानगरालिकेच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं. राज्यातल्या जनतेला विकासकामं हवी आहेत, त्यांना आरोप प्रत्यारोपात रस नाही, असं ते म्हणाले. पर्यावरणपूरक आणि समाजाभिमुख विकासकामं हे सरकारचं प्राधान्य असून, अधिकाऱ्यांनी पायाला भिंगरी लावून कामं करण्यासाठी तयार राहावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार असल्याचं ते म्हणाले. परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षेपासून विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी घेऊन त्यावरच प्रमाणपत्र पाठवण्यात येणार असल्याचं बेडसे यांनी सांगितलं.
****
विदर्भातील आघाडीचे ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे तसंच मनसेचे रमेश राजूरकर यांनी काल चंद्रपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ��नमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथं भाजपाच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत काल लाभार्थी संमेलन घेण्यात आलं. मध्य प्रदेशातल्या खासदार कल्पना सैनी आणि आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या हस्ते या संमेलनात, शासनाच्या विविध योजनांचा ४७० जणांना लाभ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात महिला, शेतकरी, विद्यार्थी आणि आदिवासींना विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यात आल्याचं, खासदार कल्पना सैनी यांनी यावेळी सांगितलं.
****
आणीबाणीमध्ये लोकशाही वाचवण्यासाठी देशाने मोठा संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानामुळे लोकशाहीची पुनर्स्थापना झाली, असं प्रतिपादन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रबुद्ध नागरिक संमेलन घेण्यात आलं, देशात आणिबाणी लागू केल्याच्या घटनेला काल ४८ वर्ष झाली, त्याअनुषंगानं गडकरी या संमेलनात बोलत होते. आपल्या देशात धर्मांची, जातींची विविधता आहे, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. कोणत्या देवाची उपासना करायची, याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण, राष्ट्रवादाला पर्याय नाही, असं प्रत्येकाच्या लेखी राष्ट्रहितालाच प्राधान्य असायला हवं, असंही गडकरी म्हणाले.
दरम्यान, प्रबुद्ध भारत कार्यक्रमांतर्गत काल औरंगाबाद इथं भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचं भाषण झालं, औरंगाबादचं नाव बदलण्यासाठी ७५ वर्ष लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आणिबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर त्यांनी कडाडून टीका केली.
****
केंद्रशासित प्रदेशांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल अंदमानात पोर्टब्लेअर इथं बोलत होते. अंदमान निकोबारमध्ये पर्यटन उद्योगाला चालना मिळावी, यासाठी पोर्टब्लेअर इथल्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सुविधा सुरु करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण नागरी विमान वाहतुकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार असल्याचं, आठवले यांनी सांगितलं. अंदमानात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रध्वजाला आठवले यांनी मानवंदना दिली.
****
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. काल पुणे इथं झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ गीतकार प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक बाळकृष्ण कवठेकर, समीक्षक डॉ ऋषीकेश कांबळे यांच्या नावावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. संमेलनाच्या तारखाही यावेळी निश्चित करण्यात आल्या. थोर लेखक साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथं पुढच्या वर्षी दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान हे संमेलन होणार आहे.
****
भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीका, कर्नाटकचे मुख्यमंत्री सि���्धरामय्या यांनी केली आहे. काल सांगली इथं काँग्रेस पक्षाचा महानिर्धार शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली, संविधान नसतं तर दीनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, असं सिद्धरामय्या म्हणाले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली. सरकारने पंढरपूरात जागोजागी लावलेले पोस्टर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी पटोले यांनी केली.
दरम्यान, पंढरपुरात चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळु उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांची त्यांनी काल पाहणी केली, हा प्रश्न आपण विधान परिषदेमध्येही उपस्थित करु, असं मिटकरी यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे भारत राष्ट्र समिती -बी एस आर पक्षात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर इथं कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर भालके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या २७ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरला येणार आहेत. या दिवशी पंढरपूर तालुक्यात सरकोली इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह बीएसआर पक्षात प्रवेश करणार असल्याचं भालके यांनी सांगितलं. त्यांच्या या निर्णयाचं पंढरपूर तसंच मंगळवेढा इथल्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलं आहे.
****
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण काल अकलूज जवळ खुडूस फाटा इथं साजरं झालं. मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा अनुभवला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं जबरी चोरी करून दोन जणांना ठार मारणाऱ्या आरोपीला काल पोलिसांनी अटक केली. शेवगांव इथल्या मारवाडीगल्लीत २३ जूनला आरोपीनं दोन जणांना ठार करून चार लाख ९५ हजार रुपयांची चोरी केली होती. संशयीत आरोपी हा पैठण तालुक्यातल्या म���हारोळा बिडकीन, इथला सराईत गुन्हेगार अस���न त्याच्या विरोधात विविध सात गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
जालना शहरातल्या अंबड चौफुली बायपास मार्गावरच्या उड्डाण पुलावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तीन बालकांचा मृत्यू झाला. काल संध्याकाळच्या सुमारास सय्यद शोएब सय्यद खैर हे आपल्या दोन मुलांसह नातेवाइकांच्या दोन मुलांना दुचाकीवरून घेऊन जात असताना, भरधाव आयशरनं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात सात वर्षीय नुरेन फातेमा सादेक शेख, आणि पाच वर्षीय आयेजा फातेमा सादेक शेख, आणि अदाबिया फातेमा सय्यद शोएब यांचा मृत्यू झाला, तर सय्यद शोएब सय्यद खैर यांच्यासह अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला. हे सर्वजण जुना जालन्यातल्या ट्टुपुरा भागातले रहिवासी असल्याचं पोलीसांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या डवाळा इथं पोहण्यासाठी खड्ड्यातल्या पाण्यात उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. १५ वर्षीय आयुष पडवळ आणि १८ वर्षीय शाहिद इरफान सय्यद हे दोघे बकऱ्या चारण्यासाठी गेले असता, ही दुर्घटना घडली.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथं ट्रकने मॅजिक प्रवासी रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षातल्या आठ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. काल दुपारच्या सुमारास दापोली - हर्णे मार्गावर आसूद इथं हा अपघात झाला.
*****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या ढोरकीन औद्योगिक वसाहतीत, पोलिसांनी काल धाड टाकत गोमांस हस्तगत केलं, तसंच ५० गायी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलीसांचं विशेष पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी सिन्नर मार्गावर गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडीवर काल अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नाशिक इथं अवैध मद्यसाठ्याची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत, राज्य उत्पादक शुल्क विभागानं, एक कोटी ९० हजार रुपयांचा मद्यसाठा आणि मुद्देमाल जप्त केला. विंचूर चौफली आणि विल्होळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केल्याचं, राज्य उत्पादक शुल्क विभागानं कळवलं आहे. याप्रकरणी ट्रकचालक, क्लिनरसह मद्यपुरवठादार आणि मद्य खरेदीरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे शाखेचे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ही माहिती दिली. दरवर्षी सरासरी एक जून दरम्यान मोसमी पाऊस केरळात, तर १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र आठ जूनला मान्सून केरळात आणि त्यानंतर ११ जून रोजी तो तळकोकणात दाखल झाला होता. मात्र बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कित्येक दिवस तो तिथेच रखडला होता. काल नेहमीपेक्षा सुमारे दहा दिवस उशीराने मोसमी पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पुढच्या चार दिवसांत कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्या म्हणाल्या…
Byte…
गेल्या चोवीस तासांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. मान्सून सक्रिय असल्यामुळे एवढा पाऊस झाला. आणि आजची विशेष बातमी ही आहे की पंचवीस जूनला मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे.
****
खान्देशची जीवनदायनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी नदीचा प्रकटदिन काल नंदुरबार जिल्ह्यात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातल्या संगमेश्वर इथं जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात नदीचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं तसच अडीचशे मीटर लांबीच्या साडीसह सोळा शृंगार अर्पण करण्यात आले. शेती आणि समाज जीवन समृद्ध करणाऱ्या नदीचं ऋण फेडण्यासाठी महिला भाविकांकडून तापी जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
****
हैदराबाद विभागात विविध ठिकाणी सुरू असलेल्या रेल्वे सुविधांच्या कामामुळे सुमारे आठवडाभर `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड विभागातल्या काही रेल्वे रद्द, तर काही, अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. निझामाबाद - नांदेड रेल्वे आजपासून दोन जुलै पर्यंत, आणि नांदेड - निझामाबाद रेल्वे आजपासून ते एक जुलै पर्यंत रद्द करण्यात आली आहे. धर्माबाद - मनमाड मराठवाडा रेल्वे एकोणतीस तारखेपर्यंत, धर्माबाद ते मुदखेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. जालना इथून सकाळी ११ वाजून ५० मिनिटानी सुटणारी जालना - तिरुपती विशेष रेल्वे सुमारे सहा तास उशिरा म्हणजे संध्याकाळी सहा वाजता जालना इथून सुटणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? शिंदे गटाशी संघर्ष सुरूच, दरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे
महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? शिंदे गटाशी संघर्ष सुरूच, दरम्यान उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे
सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची मागणी ऐकून घेण्याचे मान्य केले असून त्यासाठी 1 ऑगस्टची तारीख निश्चित केली आहे. Cm एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे कोणाचे शिवसेना अस्सल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे उद्धव ठाकरे साठी चांगली बातमी आहे. सर्वोच्च न्यायालय त्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. सुप्रीम कोर्टात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार…
View On WordPress
#उद्धव ठाकरे#एकनाथ शिंदे#महाराष्ट्राचे राजकारण#शिव सेना#सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेण्याचे मान्य केले
0 notes
Text
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या विनंतीवर मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या विनंतीवर मोठा निर्णय
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या विनंतीवर मोठा निर्णय Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला कागदपत्रं सादर करण्यास चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून मुदतवाढ मागण्यात आली होती. नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाबरोबरच आणि यांच्यातील संघर्ष निवडणूक आयोगात देखील…
View On WordPress
#आजची अपडेट#आताची मोठी बातमी#आयोगाकडून#उद्धव#गुन्हेगारी बातम्या#ट्रेंडिंग बातम्या#ठळक बातम्या#ठाकरेंना#ताज्या बातम्या#दिलासा#दैनिक मराठी#निर्णय#निवडणूक#न्यूज अपडेट मराठी#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी भाषिक बातम्या#मराठी समाचार#महत्वाची बातमी#महाराष्ट्र बातमी#मोठा#मोठ्या बातम्या#राजकीय बातम्या#राज्यस्तरीय बातम्या#वायरल बातम्या#विनंतीवर#शासकीय बातम्या
0 notes
Text
श्रीमंत.....भाग – १४
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा)
Cont’d....
पेशवा बाळाजी विश्वनाथ : (इ.स. १६६० ते २ एप्रिल १७२०)
महादजी विसाजी बल्लाळ देशमुख (भट) (बाळाजींचे पणजोबा) यांच्याकडे दंडराजपूरी आणि श्रीवर्धनची देशमुखी वंशपरंपरेने आलेली होती. महादजींना नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी दोन मुले होती. त्यापैकी शिवाजीस कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी असे तीन मुले होती. विश्वनाथला पाच मुले होती – बाळाजी, कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.
कोकणातील श्रीवर्धन येथे सन १६६० मध्ये बाळाजीचा जन्म झाला. पणजोबा – आजोबाप्रमाणे त्यांचे वडील विश्वनाथपंत (विसाजी) भट हे सिद्दीच्या राजवटीत देशमुख होते. त्याकाळी समुद्रावर सिद्दीचीच पकड होती. सन १६५४ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी जाणले की स्वराज्याच्या सुरक्षेसाठी समुद्रावर वर्चस्व असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्यांनी मराठा आरमार यंत्रणा उभी केली. आरमार प्रमुख दर्यासारंग यांच्यासोबत दौलतखान, इब्राहिमखान, मायनाक भंडारी आदी आधिकारी नेमले. मालवणचा सिंधूदुर्ग किल्ला, कल्याणजवळचा दुर्गाडी किल्ला उभारून आरमार बळकट केले. १६५९ मध्ये तुकोजी संकपाळ (आंग्रे – पुण्याजवळील आंगरवाडीचे मूळ असल्यामुळे आंग्रे हे आडनाव लागले) शिवाजी महाराजांसोबत जुडले गेले. १६५९ ते १६८० पर्यंत मराठा आरमाराचे काम त्यांनी केले. १६८० मध्ये तुकोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ – ४ जुलै १७२९) यांनी आरमाराची धुरा सांभाळली आणि समुद्रावर प्रचंड वर्चस्व निर्माण केले. संभाजीराजांनी कान्होजीच्या साथीने मराठा आरमार खूप वाढवले होते.
राजाराम महाराजांच्या शेवटच्या काळात सन १६९८ मध्ये कान्होजी आंग्रे यांना सरखेल (आरमार प्रमुख) हा सर्वोच्च किताब देण्यात आला. राजारामाच्या मृत्यूनंतर राणी ताराबाईंच्या विश्वस्तांपैकी ते एक होते. त्यांनी मुघल, सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांवर चांगलाच जरब बसवला. स्वराज्यासाठी समुद्र मार्गे येणार्या व्यापार्यांकडून सारा वसूली केली.
सन १६८९ मध्ये छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिद्दीने उचल खाल्ली आणि त्याने समुद्र किनार्यावरच्या रयतेचा अतोनात छळ सुरू केला. भट घराणे आंग्रेला मिळाले असा समज करुन त्याने त्यांचाही छळ सुरू केला. बाळाजीचे भाऊ जानोजी यांचा त्याने वध केला. त्यामुळे परंपरागत देशमुखी सोडून बाळाजी भट कुटूंब आणि हरी महादेव, बाळाजी महादेव (नाना फडणवीस यांचे आजोबा) व रामजी महादेव हे भानु कुटूंब, श्रीवर्धन सोडून सातार्यास आले. सिद्दीने त्यांचा तिथेही पिच्छा सोडला नाही. सातार्याहुन निघून त्यांनी मुरुडला वैशयंपान कुटूंबाकडे काही दिवस आश्रय घेतला.
१६९४ ते १६९९ या काळात बाळाजी रामचंद्रपंतांकडे कारकून म्हणून काम करत होते. त्यांची हुशारी पाहून धनाजी जाधवने त्यांना दिवाण म्हणून आपल्या सेवेत घेतले. १६९९ पासून पुणे, नगर, दौलताबाद या प्रदेशावर त्यांची सरसुभेदार म्हणून नेमणुक झाली. त्यावेळी पुण्याजवळील सासवड येथे बाळाजींचे वास्तव्य होते. खुद्द औरंगजेब यावेळी स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. पुणे, नगर, दौलताबाद या परगण्यावर तर मुघलांचाच अमल होता. पण बुद्धी कौशल्याच्या जोरावर बाळाजी विश्वनाथनी मुघलांचा कहर माजू दिला नाही. बादशहाचा विश्वासही त्यांनी संपादन केला होता. त्या अनुशंगानेच त्यांनी येसूबाई अन शाहूमहाराजांची कैदेत असतांना भेट घेतली होती. पण केवळ शिष्टाईनेच नव्हे तर पुणे प्रांताच्या रक्षणासाठी त्यांनी मुघलांवर सशस्त्र आक्रमण करूनही धाक बसवला होता. वेळ पडेल तेव्हा शस्त्र चालवण्याचे कसब असल्यामुळे बाळाजींचे मराठेशाहीत नाव झाले होते.
सन १७०�� मध्ये शाहू महाराजांच्या सुटकेसाठी अनेक सरदारांप्रमाणे बाळाजींची शिष्टाई कामाला आली होती. अनेक वेळ�� त्यांनी बादशहाला शाहूच्या सुटकेसाठी अर्जवे केली होती. शाहूच्या सुटकेनंतर ताराबाई सोबत संघर्ष, मराठ्यांच्या दोन गाद्या, पेशवेपद याबाबत वर उल्लेख आलेलाच आहे.
पेशवे पद प्राप्त झाल्यानंतर लगेचच सन १७१४ मध्ये कान्होजी आंग्रे यांना शाहू महाराजांकडे वळवून पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी त्यांचा पक्ष मजबूत केला. मुघल, सिद्दी आणि दोन राजघराणे यांच्यात संघर्ष चालू असतांनाच पन्हाळ्यावर ताराबाई बंदी झाल्या आणि मराठा इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली. हा उल्लेख वरती आलाच आहे.
सन १७१४ मध्ये सुपे आणि पाटस परगण्याचे जहागीरदार, ताराबाईंचे अतिशय विश्वासू असे दमाजी थोरात यांच्यावर बाळाजींनी मोहिम काढली. दमाजीचा पाडाव केल्याशिवाय कोल्हापूरचे वर्चस्व कमी होणार नव्हते. पण दमाजी मोठ्या ताकदीने प्रत्येक हल्ला परतवून लावत होते. शेवटी सन १७१८ मध्ये शाहूराजांनी मुघलांचे सहकार्य घेवून बाळाजींना थोरातांचा पाडाव करण्याची आज्ञा केली. एवढ्या मोठ्या सैन्यासमोर दमाजीची ताकद कमी पडली. त्यांना कैद करून परळीच्या किल्ल्यावर ठेवण्यात आले.
या काळात कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांमध्ये सतत संघर्ष घडत होते. दोन्ही पक्ष एकमेकांना वरचढ ठरत होते. याच सुमारास हुसेन सय्यद अली याची बादशहाने दक्षिण सुभ्यावर नेमणुक केली होती. सन १७१८ साली शाहू महाराजांनी त्याच्या मार्फत बादशहाशी वाटाघाटी केल्या. या तहा अंतर्गत छ. शिवाजीच्या काळातील गडकिल्ले मराठ्यांना सुपूर्द करावेत, मराठ्यांनी जिंकलेले खानदेश, वर्हाड, हैदराबाद, कर्नाटक इ. भाग मुघलांनी मराठ्यांच्या ताब्यात द्यावेत, मुघलांच्या दक्षिण मु��ुखात चौथाई मराठ्यांनी वसूल करावी व त्या बदल्यात बादशहाच्या मदतीस मराठ्यांनी पंधरा हजार फौज तैनात ठेवावी, कोल्हापूरच्या संभाजीस उपद्रव करू नये, दरसाल बादशहाला शाहूने दहा लाखाची खंडणी द्यावी आणि शाहूच्या मातुश्री येसूबाई, कुटुंब, संभाजीराजांचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे लोकांस बादशहाने मुक्त करावे. शाहूच्या वतीने बाळाजींनी या वाटाघाटी शिक्कामोर्तब करुन घेतल्या. हुसेन अलीने त्या मान्य केल्या पण बादशहाचे फर्मान आले नव्हते.
या वाटाघाटींमुळे शाहू महाराजांची जनसामान्यात व सरदार मंडळीत वजन वाढले. मराठ्यांना आपसातील वाद, तंटे यातून बाहेर काढण्याचा बाळाजीचा मतलब सिद्धीस गेला. मराठ्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. या तहाच्या माध्यामातून शाहूने बादशहाची एकप्रकारे ताबेदारीच स्विकारली होती. पण चौथाई, देशमुखी यामुळे मराठ्यांना एक दिशा मिळाली. कराराची अंम��बजावणी बादशहा करत नव्हता म्हणून स्वत: हुसेन अली आपल्याबरोबर मराठ्यांची फौज घेवून नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस निघाला. बाळाजी विश्वनाथ, त्यांचा पुत्र बाजीराव, चिमाजी आप्पा, भानू फडणीस, संताजी व राणूजी भोसले यांच्यासोबत मराठ्यांची दहा हजारांची फौज होती. फेब्रुवारी १७१९ ला फौजा दिल्लीत पोहोचल्या. २८ फेब्रुवारी १७१९ रोजी हुसेन अली आणि बादशहात बेबनाव होवून बादशहास कैद केले गेले आणि रफीउद्दराजत यास तख्तावर बसवले गेले. बाळाजींनी यात तटस्थ भूमिका वठवली. त्यामुळे बादशहाकडून सनदा घेऊन परत येतांना त्यांना कुणाचा विरोध झाला नाही.
ठरल्याप्रमाणे कराराची अंमलबजावणी झाली. येसूबाई, मदनसिंग व इतर कुटूंबातील मंडळी यांना बाळाजींच्या स्वाधीन करण्यात आले. सर्व सनदा घेवून २० मार्च १७१९ रोजी बाळाजींनी दिल्ली सोडले. वाटेत काशीयात्रा करून ४ जुलै १७१९ रोजी मातु:श्री येसुबाईंसह ते सातार्यास आले. येसुबाई २९ वर्षानंतर स्वराज्यात परतल्या. शाहूमहाराज आणि समस्त रयतेला यामुळे खूपच आनंद झाला. या बातमीने कोल्हापूरच्या संभाजीराजांनाही आनंद झाला. त्यांनी शाहूमहाराजांना पत्र लिहून हा आनंद व्यक्त केला. दोन्ही बंधूंचा कौटुंबिक जिव्हाळा यात दिसून आला, पण राजकीय वैर संपले नव्हते.
बाळाजींची दिल्ली स्वारी सफळ झाली. स्वराज्य, चौथाई, देशमुखीच्या बादशाही सनदा प्राप्त झाल्यामुळे मराठे सरदारास आनंद झाला. या सनदांमुळे स्वराज्यावर शाहूचा हक्क सिद्ध झाला अन कोल्हापूरच्या संभाजीचा त्यावर कसलाच हक्क राहिला नाही. या स्वारीचा खर्च हुसेन अलीनेच केला होता. बाळाजींनी त्यात बचत करून प्रचंड खजीना स्वराज्यात आणला होता हेही या दिल्ली स्वारीचे एक वैशिष्ट्य ठरले अन शाहूला कृतार्थ वाटले.
शाहूंच्या आदेशाने बाळाजी विश्वनाथांनी कराराची अंमलबजावणी सुरू केली. शिवाजीराजांच्या काळात १६७४ मध्ये जेवढे मराठ्यांचे राज्य होते तेवढे शाहूराजांकडे कायम झाले. हुसेनअली सोबत वाटाघाटी करून बादशहा कडून बाळाजींनी सनदा मिळवल्या नसत्या तर संभाजीचे पारडे जड झाले असते. पण बाळाजी दिल्लीहून यशस्वी होवून परल्यामुळे शाहूची परिस्थिती एकदम बदलली. विरोधकांची तोंडे बंद झाली. याचा फायदा बाळाजींनी घेतला. पुणे प्रांतावरील मुघलांचा अंमल कायमचा उठला. ऑगस्ट १७१९ मध्ये कल्याण भिवंडी प्रांत ताब्यात घेण्यात यश आले.
याबरोबरच बाळाजींनी वसूलीची पद्धत ठरवून दिली. सर्व विखूरलेल्या सरदारांना आपसातील तंट्या बखेड्यातून बाहेर काढून मराठेशाहीत गोवून घेतले. सरंजामी पद्धत आमलात आणली अन राज्यकारभाराची घडी व्यवस्थित बसवली.
नोव्हेंबर १७१९ मध्ये बाळाजींनी वडगाव, अष्टे वगैरे ठाणी हस्तगत करण्यासाठी मोहीम काढली. कोल्हापूरपर्यंत त्यांनी मु��ंडी मारली. २० मार्च १७२० रोजी खुद्द संभाजीमहाराज व बाळाजी विश्वनाथ यांच्या फौजा एकमेकांना भिडल्या. यात बाळाजींची सरशी होवून संभाजीमहाराजांना माघार घेवून पन्हाळ्याला परतावे लागले.
या मोहीमेवरून परतल्यावर बाळाजी सातार्याहून सासवडला स्वगृही आले. सततची धावपळ, दगदग यामुळे ते अचानक आजारी पडले. काही दिवस आराम करायचा सल्ला राजवैद्यांनी दिला. अनेक उपचार झाले पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. या आजाराचे निमित्त झाले अन २ एप्रिल १७२० रोजी एकाएकीच त्यांना मृत्यूने कवटाळले. अतिशय करारी, बुद्धीमान, लढवैय्या अन मुत्सद्देगीरीत निष्णात असलेले प्रथम पेशवा बाळाजी विश्वनाथ अनंतात विलीन झाले.
बाळाजी विश्वनाथ हे केवळ सहा वर्ष पेशवा होते, पण एवढ्या कमी काळात त्यांनी स्वराज्य संकटमुक्त करून शाहूमहाराजांचे सिंहासन बळकट केले आणि मराठ्यांच्या वैभवाचा पाया घातला. या त्यांच्या महान कार्यामुळेच स्वराज्याला बळकटी आली होती. त्यांच्या आकस्मिक जाण्याने स्वराज्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
आता पुढचा पेशवा कोण? हा शाहूराजांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला.
–-----------------------–--------------------------
पेशवा बाळाजी विश्वनाथ वंश :
पत्नी :
राधाबाई : (दादाजी बर्वे डुबरेकर, नेवारे - रत्नागिरी यांची कन्या),
मुले : (दोन मुले, दोन मुली)
१. विसाजी उर्फ बाजीराव : (जन्म १८ ऑगस्ट १७००, डुबेरे - सिन्नर येथे)
२. भिऊबाई :
३. अंताजी उर्फ चिमाजी आप्पा : (जन्म सन १७०७)
४. अनुबाई :
To be cont’d...
© नितीन म. कंधारकर
0 notes
Text
दूधप्रश्नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने
दूधप्रश्नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात निदर्शने
नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७) राज्यभर किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात आले. राज्यातील २�� जिल्ह्यांमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन, निदर्शने व तहसील कार्यावर मोर्चे काढले. या आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सकाळीच ठिकठिकाणी दूध संकलन केंद्रावर…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधानचा नारा
पंतप्रधानांचे ८३ मिनिटे भाषण, लाल किल्ल्यावरून नवव्यांदा फडकव��ा राष्ट्रध्वज नवी दिल्ली : आज संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून नवव्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी २१ तोफांची सलामीही देण्यात आली. लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित करताना त्यांनी ५ संकल्प देशासमोर ठेवले. यावेळी त्यांनी जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधानची घोषणा दिली. पीएम समग्र स्वास्थ्य मिशन या नवीन नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विस्ताराचाही त्यांनी उल्लेख केला. गांधी, नेहरू, सावरकर यांचेदेखील त्यांनी स्मरण केले. यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान आणि अभिमान याबद्दल बोलताना ते भावूक झाले. माझी व्यथा मी देशवासियांना सांगणार नाही, तर कोणाला सांगणार, असे ते म्हणाले. मुले आणि मुली समान असतील तरच घरात एकतेचा पाया रचला जाऊ शकतो. स्त्री-पुरुष समानता ही एकतेची पहिली अट आहे. भारत प्रथम एकतेचा मंत्र आहे. कार्यकर्त्यांचा आदर केला पाहिजे. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्यात विकृती निर्माण झाली आहे. आपण महिलांचा अपमान करतो. दैनंदिन जीवनात स्त्रियांना अपमानित करणा-या प्रत्येक गोष्टीतून निसर्गाच्या संस्काराने मुक्त होण्याचा संकल्प आज आपण करू शकतो. मोदींचे देशवासियांना संकल्प आपण आपल्याच पाठीवर थाप मारत राहिलो तर आपली स्वप्ने दूर होतील, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळेच आपण कितीही संघर्ष केला असला तरी आज आपण अमृतमय कालखंडात प्रवेश करत आहोत, तेव्हा पुढील २५ वर्षे आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहेत. आज मी १३० कोटी लोकांना लाल किल्ल्यावरून बोलतो. मित्रांनो, मला असे वाटते की येत्या २५ वर्षांसाठीदेखील आपण आपल्या संकल्पांवर केंद्रित केले पाहिजेत. २०४७ ला स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा स्वातंत्र्यप्रेमींची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी आपण उचलली पाहिजे. पहिला संकल्प : आता मोठ्या संकल्पाने देश पुढे जायला हवा. खूप जिद्द घेऊन चालायचे आहे. त्यामध्ये पहिला मोठा संकल्प हा विकसित भारत. दुसरा संकल्प : जर आपल्या मनात अजूनही गुलामगिरीचा एक भाग कोणत्याही कोप-यात असेल तर त्याला कोणत्याही परिस्थितीत पळून जाऊ देऊ नये. शेकडो वर्षे गुलामगिरीत जखडून ठेवलेल्या अवस्थेतून आता शंभर टक्के सुटका करावी लागेल. तिसरा संकल्प : आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान असायला हवा. हा तो वार��ा आहे ज्याने एकेकाळी भारताला सुवर्णकाळ दिला. या वारशाचा आपल्याला अभिमान असायला हवा. चौथा संकल्प : एकता आणि एकता. १३० कोटी देशवासीयांमध्ये एकता. ना स्वत:चा ना कोणी परका. एकतेची शक्ती ही एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नांसाठी आपली चौथी प्रतिज्ञा आहे. पाचवा संकल्प : नागरिकांचे कर्तव्य. ज्यामध्ये पंतप्रधानही नाबाद आहेत, तर मुख्यमंत्रीही नाबाद आहेत. तेही नागरिक आहेत. येत्या २५ वर्षांची स्वप्ने पूर्ण करणे ही मोठी प्राणशक्ती आहे. जेव्हा स्वप्ने मोठी होतात. जेव्हा विचार मोठे असतात तेव्हा प्रयत्नही खूप मोठे असतात, असेही ते म्हणाले. Read the full article
0 notes
Text
--II ● विवेक विचार ● II--
–II ● विवेक विचार ● II–
संघर्ष हा जीवनातला फार मोठा लाभ आहे हे लक्षात असू द्या. संघर्षमय जीवनातूनच आपल्याला मार्ग काढायचा असतो. स्वर्गाला जाण्याचा जर एखाद्या मार्ग असेल तर तो नरकातूनच आहे. ध्येयाच्या मार्गावर जो निर्भयपणे सतत संघर्ष करीत पुढेपुढे जात असतो, तोच जीवनात महान, शक्तीशाली व यशस्वी बनतो. स्वामी विवेकानंद… *● आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो ●**★ भारतीय सौर २२ माघ शक…
View On WordPress
0 notes