#मुलांमध्ये
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन • राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना, तसंच परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी • राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय • प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याचा आज महाशिवरात्रीच्या पर्वावर समारोप आणि • प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ८९५ प्रकल्पांना मंजुरी-सलग तिसऱ्या वर्षी देशात अव्वल आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून, सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सामाजिक दायित्व निधीतून आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या परिषदेत ते बोलत होते. आदिवासी मुलांना योग्य संधी मिळण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले… जर आदिवासी मुलं योग्य प्रकारे शिकली, तर अनेक अडचणीतनं ते बाहेर येतात. साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये उपजत प्रचंड मोठे गुण आहेत. केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या आदिवासी शाळा असतील, आश्रमशाळा असतील, नामांकित प्रायव्हेट स्कुल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे. कारण, जोपर्यंत समाजातल्या इतर लोकांसोबत त्यांचं एज्य���केशन होणार नाही, तोपर्यंत बुजरेपणाचा गुण तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील. **** पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. १९७६ पूर्वीच्या बाधित गावठाणांसाठी हा कृती कार्यक्रम राबवण्यात येईल. राज्य आधारसामग्री -डेटा धोरणास मंजुरीसह, राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात सुधारणा, आणि महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला ही, या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्यात बारामती इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. यासाठी प्रत्येकी ५६४ कोटी ५८ लाख रुपये तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. दरम्यान, परळीत पशुवैद्यक महाविद्यालय स्थापनेच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. प्रगतीच्या वाटेवर हे एक विश्वासात्मक पाऊल ठरेल, असं मुंडे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. आता राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ५३ टक्के महागाई भत्ता मिळेल. एक जुलै २०२४ पासून ही दरवाढ लागू होईल, जानेवारीपर्यंतची थकबाकी या महिन्यातल्या वेतनासह दिली जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** राज्यशासनाने यावर्षीपासून छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिस इथं ही घोषणा केली. पहिला प्रेरणा गीताचा पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 'अनादी मी, अनंत मी' या गीताला देत असल्याचंही शेलार यांनी जाहीर केलं.
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा-यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरु असलेल्या, महाकुंभमेळ्याचा आज महाशिवरात्रीला समारोप होत आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात अमृतस्नान करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं, स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं आहे. महाकुंभमेळ्याचा सुरळीत समारोप होण्यासाठी अधिकाऱ्यांनी मेळा परिसरात आणि प्रयागराजमध्ये "नो व्हेईकल झोन" लागू केला आहे. १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत ६४ कोटी ६० लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त मराठवाड्यात वेरुळ इथ��ं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, परळी इथं वैद्यनात तसंच औंढा इथल्या नागनाथ मंदिरातही भाविकांसाठी मंदिर व्यवस्थापनानं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या उपक्रमात गावातल्या शक्य त्या समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, असं गावडे यांनी सांगितलं. ते म्हणाले… लोकांचे जागेवर सुटणारे प्रश्न जागेवर सोडवू. ज्याला थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यावर जे काही कामकाज करावं लागतं, ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खासकरून रचनात्मक पद्धतीनं ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे, त्याचा अनुभव घेऊन आणि जसे जसे आम्हाला करेक्टीव्ह मेजर्स घ्यावे लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इंप्रुव्ह कराव्या लागतील, इन्क्लुड कराव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणाने करू. **** प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात, सर्वाधिक २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक हजार ८९५ प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प मंजुरीचा उच्चांक असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने सलग तीन वर्षांपासून हे सातत्य राखल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली, ते म्हणाले… आपल्याकडे खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकल्प या योजनेतून उभे राहिलेले आहेत. उदाहरणादाखल भाजीपाल्याचे सोलार ड्राईड करण्याचे अनेक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत. तसेच एस फॉर एस नावाची एक बायबॅक करणारी स्टार्ट अप आहे. ती कंपनी पूर्ण त्यांचा सोलार ड्राईड भाजीपाला बायबॅक करते. मसाल्याचे उद्योग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेले आहेत. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा मागच्या तीन वर्षापासून सातत्यानं देशात नंबर एकवर आहे. **** देशभरात आठवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक काल पार पडली, या गणनेसाठी ग्रामीण भागासाठी सुमारे साडे सहा हजारावर तर शहरी भागासाठी सुमारे साडे पाच हजारावर प्रगणकांची नेमणूक केली जाणार असून, यासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे. देशात पहिली आर्थिक गणना १९७७ मध्ये झाली होती. तर २०१९ साली सातवी आर्थिक गणना झाली होती. अर्थ��्यवस्थेच्या संरचनेचं मूल्यांकन करणं म्हणजे, बिगरशेती उत्��ादन तसंच वस्तू आणि सेवांच्या वितरणात असलेल्या आस्थापनांची संख्या, आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करणं तसंच अद्ययावत करणं, हा या आर्थिक गणनेमागचा उद्देश असतो. काळानुसार आर्थिक परिदृष्यातील बदलांचं निरीक्षण करणं, केंद्र, आणि राज्य सरकारी धोरणांच्या प्रभावाचं मूल्यांकन करणं, तांत्रिक प्रगती तसंच बाह्य आर्थिक घटकांचा प्रभाव अभ्यासणं अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही आर्थिक गणना केली जाते. **** बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयने काल देशभरात ६०हून अधिक ठिकाणी छापे घातले. यामध्ये पुणे, कोल्हापूर, आणि नांदेडचा समावेश आहे. गेन बिटकॉईन नावाने ही कंपनी २०१५ मध्ये सुरू झाली होती. या कंपनीने १८ महिन्यांसाठी दरमहा १० टक्के दराने परतावा देण्याचं आश्वासन दिलं होतं. २०१७मध्ये या कंपनीचा घोटाळा उघड झाला होता. त्यानंतर या कंपनीविरोधात देशभरात तक्रारी दाखल झाल्या होत्या. **** कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबतचा अंतिम निकाल नाशिक जिल्हा न्यायालयानं शनिवारपर्यंत राखून ठेवला आहे. याप्रकरणी काल सुनावणी झाली. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातली सदनिका मिळवण्यासाठी खोटं प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी न्यायालयानं कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि फरार कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी काल दोन दिवसांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नांदेड इथं काल २१ व्या संगीत शंकर दरबार कार्यक्रमाचं उद्घाटन सतार वादक, पद्मभूषण पंडित बुधादित्य मुखर्जी यांच्या हस्ते झालं. यावेळी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा नांदेडकर यांना यावर्षीच्या 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काल या कार्यक्रमात साधना सरगम यांच्या संगीत रजनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार अशोक चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी ��हाराज यांच्या जयंतीनिमित्ताने परभणी इथं शून्य ते १८ वर्षे वयोगटातल्या ४३८ बालरुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यापैकी ९७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचं तपासणी अंती आढळून आलं. गरजू बालकांवर आर.पी रुग्णालयात नामवंत हृदयरोग तज्ज्ञांकडून उपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून बीदर ते हजरत निझामुद्दीन दरम्यान विशेष गाडीची एक फेरी करण्यात येणार आहे. ही विशेष गाडी बीदरहून आज सकाळी निघाली असून, परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीहून एक मार्चला सकाळी पावणे आठ वाजता सुटेल.
0 notes
Text
शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक घेण्याची फॅशन , ‘ ह्या ‘ गावामध्ये बंदीचा ठराव मंजूर
शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक घेण्याची फॅशन , ‘ ह्या ‘ गावामध्ये बंदीचा ठराव मंजूर
मोठ्या प्रमाणात कॅफेन असलेले शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक घेण्याची फॅशन अल्पवयीन शाळकरी मुलांमध्ये वाढत असून श्रीगोंदे तालुक्यातील पेडगाव आणि चांडगाव या ग्रामपंचायतींनी ठराव करून अशा शीतपेये यांच्या विक्रीवर गावात बंदी घातलेली आहे. अकरा वर्षाच्या आतील व्यक्तींना अशी पेय देण्यास बंदी असताना देखील वेगवेगळ्या ठिकाणी अगदी किराणा दुकानात देखील अशा पद्धतीची शीतपेय विकली जातात . किशोरवयीन मुलांच्या…
0 notes
Text
तुम्हालाही अनेकदा अन्न गिळताना त्रास होत असेल तर ते दुर्लक्ष घेऊ नका. हे आजाराचे लक्षण असू शकते. या आजारात अन्न गिळताना किंवा पाणी पिताना छातीत दुखते. गिळण्यात अडचण ही वैज्ञानिक संज्ञा म्हणजे डिसफॅगिया. अन्न तोंडातून पोटात हलवण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. सामान्यतः मज्जातंतू किंवा स्नायूंच्या समस्यांमुळे, डिसफॅगिया वेदनादायक असू शकते आणि वृद्ध ल���क आणि लहान मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. जरी वैद्यकीय संज्ञा डिसफॅगिया हे सहसा एक लक्षण मानले जाते, परंतु काहीवेळा ते स्वतःच्या स्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. डिसफॅगियाच्या संभाव्य कारणांची विस्तृत श्रेणी आहे. जर ते फक्त एक किंवा दोनदाच उद्भवले तर कदाचित कोणतीही गंभीर अंतर्निहित समस्या नाही, परंतु जर ती नियमितपणे होत असेल, तर डॉक्टरांनी ते पहावे. डिसफॅगिया का होऊ शकतो याचे अनेक स्पष्टीकरण असल्याने, मूळ कारण औषधांवर अवलंबून आहे. नियमित "निगल" मध्ये अनेक वेगळे स्नायू आणि नसा गुंतलेले असतात, हे एक विलक्षण जटिल ऑपरेशन आहे. डिसफॅगिया गिळण्याच्या प्रक्रियेच्या कोणत्याही भागामध्ये अडचण झाल्यामुळे होऊ शकते. आजाराचे निदान लवकर होणे आवश्यक असते. या व्हिडिओ मध्ये डॉ सम्राट जानकर आपल्याला या आजराबद्दल संपूर्ण माहिती देत आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा.
youtube
#Dysphagia Treatment#Dysphagia Specialist#Swallowing Disorder Treatment#Achalasia Treatment#gastroenterologist#Youtube
0 notes
Text
मुलांमधील वाढती हायपरअॅक्टिव्हिटी: समस्या आणि WHO चा दृष्टिकोन
More thoughts more confusion…leads to hyperactivity आधुनिक युगात मुलांमध्ये हायपरअॅक्टिव्हिटीच्या समस्या वेगाने वाढत आहेत. हायपरअॅक्टिव्हिटी म्हणजे मुलांच्या मनोवृत्तीत एक अस्वस्थता, चिडचिडेपण, आणि एकाग्रता कमी होणे. यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर, सामाजिक वर्तनावर आणि भावनिक आरोग्यावर विपरीत प्रभाव पड��ो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या समस्येवर लक्ष केंद्रित करून तत्त्वज्ञान आणि उपाययोजना…

View On WordPress
#कुटुंब#पालक#पालकत्व#भावनिकअस्थिरता#मानसिकआरोग्य#मुलांचीविकास#मुलांचेआरोग्य#मुलांच्यासमस्या#शारीरिकक्रियाकलाप#शालेयजीवन#शिक्षण#संवेदनशीलतेचेसंबंध#सकारात्मकआवरण#हायपरअॅक्टिव्हिटी#MindMaster
0 notes
Text
सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान
Author- सौ.ज्योती अजित येनपुरे Asst. Teacher (SSPMS Primary Day School)
मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.
जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.
परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.
मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती ��त्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.
एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.
Source: https://sspmpds.in/sabhotalchya-parisaratun-ghadte-vidhyarthi-jiwanman/
0 notes
Text
सावधान! पारा ४० च्या पार : काळजी घ्या उष्माघाताचा धोका निर्माण
उष्माघाताची लक्षणे : प्रौढांमध्ये शरीराचे तापमान १०४ फॅरनहाइटपर्यंत पोहोचल्यास स्नायूंचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे व चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे व धडधडणे, तसेच उन्हात फिरल्यामुळे डोकेदुखी, ताप, जास्त घाम येणे आणि बेशुद्ध पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे लहान मुलांमध्ये, आहार घेण्यास नकार देणे, नियमित चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, रक्तस्राव…
View On WordPress
0 notes
Text
लहान मुलानं मधील ADHD म्हणजे काय ? लक्षणे व उपाय डॉक्टर उत्तम गव्हाणे | संमोहन तज्ञ

मुलांमध्ये एडीएचडीचा अर्थ काय आहे. याविषयीची सर्व माहिती व्हिडिओमध्ये डॉ. उत्तम गव्हाणे.
youtube
1 note
·
View note
Text

लहान मुलानं मधील ADHD म्हणजे काय ? लक्षणे व उपाय डॉक्टर उत्तम गव्हाणे | संमोहन तज्ञ
मुलांमध्ये एडीएचडीचा अर्थ काय आहे. याविषयीची सर्व माहिती व्हिडिओमध्ये डॉ. उत्तम गव्हाणे.
youtube
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी कृती कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय-परळीत पशूवैद्यक महाविद्यालय स्थापनेला मान्यता
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचा दर बुधवारी एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रम
आणि
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ८९५ प्रकल्पांना मंजुरी-सलग तिसऱ्या वर्षी देशात अव्वल
****
आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून समतोल विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सामाजिक दायित्व निधीतून आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. आदिवासी मुलांना योग्य संधी मिळण्याची गरज फडणवीस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले –
जर आदिवासी मुलं योग्य प्रकारे शिकली, तर अनेक अडचणीतनं ते बाहेर येतात. साधारणपणे आपण जर बघितलं तर आदिवासी मुलांमध्ये उपजत प्रचंड मोठे गुण आहेत. केवळ त्या गुणांना योग्य प्लॅटफॉर्म देण्याची आवश्यकता असते. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या आदिवासी शाळा असतील, आश्रमशाळा असतील, नामांकित प्रायव्हेट स्कुल्समध्ये देखील आदिवासी मुलांना आपण शिकवलं पाहिजे. कारण, जोपर्यंत समाजातल्या इतर लोकांसोबत त्यांचं एज्युकेशन होणार नाही, तोपर्यंत बुजरेपणाचा गुण तेव्हाच जाऊ शकतो, जेव्हा हा समाज सगळा किंवा ही मुलं इतरांसोबत मिक्सअप होतील.
****
पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. १९७६ पूर्वीच्या बाधित गावठाणांसाठी हा कृती कार्यक्रम राबवण्यात येईल. अशा एकूण ३३२ गावठाणासाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या तरतुदीस राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
राज्य आधारसामग्री -डेटा धोरणास मंजुरीसह राज्य डेटा प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात सुधारणा, आणि महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश २०२५ ला या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पुणे जिल्ह्यात बारामती इथं तसंच बीड जिल्ह्यात परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी प्रत्येकी ५६४ कोटी ५८ लाख रुपये तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी परळी इथं ७५ एकर तर बारामती तालुक्यात कऱ्हावागज इथं ८२ एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता प्रत्येकी ८० विद्यार्थी इतकी असणार आहे.
दरम्यान, परळीत पशुवैद्यक महाविद्यालय स्थापनेच्या निर्णयाबद्दल अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. प्रगतीच्या वाटेवर हे एक विश्वासात्मक पाऊल ठरेल, असं मुंडे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं गंगा-यमुना आणि गुप्त सरस्वतीच्या पवित्र संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ पर्वाचा उद्या महाशिवरात्रीला समारोप होणार आहे. १४४ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वात आज सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास ९७ लाखापेक्षा अधिक भाविकांनी स्नान केलं. अमृतस्नान करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्थापन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महसुली विभागात एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विभागात ७६ तालुक्यातल्या एका गावात तालुक्यातले अधिकारी दर बुधवारी भेट देणार आहेत. या उपक्रमात गावातल्या शक्य त्या समस्या जागेवरच सोडवण्याचा प्रयत्न असेल, असं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. ते म्हणाले –
लोकांचे जागेवर सुटणारे प्रश्न जागेवर सोडवू. ज्याला थोडा वेळ लागणार आहे, त्याच्यावर जे काही कामकाज करावं लागतं, ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खासकरून रचनात्मक पद्धतीनं ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि पहिल्या एक दोन आठवड्यामध्ये आम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे, त्याचा अनुभव घेऊन आणि जसे जसे आम्हाला करेक्टीव्ह मेजर्स घ्यावे लागतील काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इंप्रुव्ह कराव्या लागतील, इन्क्लुड कराव्या लागतील त्या आम्ही निश्चितपणाने करू.
****
एसटी बसमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा शासनाचा विचार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. कर्नाटकात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते पीटीआयशी बोलत होते. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भात बोलतांना, एसटीतल्या प्रवाशांची सुरक्षा ही कर्नाटक सरकारची देखील जबाबदारी असून त्यांनी ती पार पाडली नाही तर महाराष्ट्र सरकार सुरक्षा पुरवेल असं सांगितलं.
****
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सर्वाधिक २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी महाराष्ट्रात देण्यात आली आहे, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक हजार ८९५ प्रकल्पांचा समावेश आहे. महाराष्ट्रात हा प्रकल्प मंजुरीचा उच्चांक असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने सलग तीन वर्षांपासून हे सातत्य राखल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली, ते म्हणाले –
आपल्याकडे खूप वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकल्प या योजनेतून उभे राहिलेले आहेत. उदाहरणादाखल भाजीपाल्याचे सोलार ड्राईड करण्याचे अनेक प्रकल्प खूप चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत. तसेच एस फॉर एस नावाची एक बायबॅक करणारी स्टार्ट अप आहे. ती कंपनी पूर्ण त्यांचा सोलार ड्राईड भाजीपाला बायबॅक करते. मसाल्याचे उद्योग आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने सुरू झालेले आहेत. दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो की या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा मागच्या तीन वर्षापासून सातत्यानं देशात नंबर एकवर आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर खालोखाल राज्यात अनुक्रमे अहिल्यानगर, सांगली, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. राज्यात मंजूर झालेल्या २२ हजार १० प्���कल्पांसाठी दोन हजार २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून अनुदानापोटी ३८९ कोटी रुपये निधी लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.
****
देशभरात आठवी आर्थिक गणना करण्यात येणार आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक आज पार पडली, या गणनेसाठी ग्रामीण भागासाठी सुमारे साडे सहा हजारावर तर शहरी भागासाठी सुमारे साडे पाच हजारावर प्रगणकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ही गणना होणार आहे.
देशात पहिली आर्थिक गणना १९७७ मध्ये झाली होती. तर २०१९ साली सातवी आर्थिक गणना झाली होती. अर्थव्यवस्थेच्या संरचनेचं मूल्यांकन करणं म्हणजे, बिगरशेती उत्पादन तसंच वस्तू आणि सेवांच्या वितरणात असलेल्या आस्थापनांची संख्या, आणि त्यात गुंतलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करणं तसंच अद्ययावत करणं, हा या आर्थिक गणनेमागचा उद्देश असतो. काळानुसार आर्थिक परिदृष्यातील बदलांचं निरीक्षण करणं, केंद्र, आणि राज्य सरकारी धोरणांच्या प्रभावाचं मूल्यांकन करणं, तांत्रिक प्रगती तसंच बाह्य आर्थिक घटकांचा प्रभाव अभ्यासणं अशा विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही आर्थिक गणना केली जाते.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने परभणी इथे शून्य ते १८ वर्षे वयोगटातील ४३८ बालरुग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. यामध्ये परभणीसह हिंगोली, जालना तसंच बीड जिल्ह्यातल्या बालकांचाही समावेश होता. यापैकी ९७ बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचं तपासणी अंती आढळून आलं आहे. गरजू बालकांवर आर.पी रुग्णालयात नामवंत हृदयरोग तज्ज्ञांकडून उपचार तसंच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितलं.
****
हिंगोली इथं ज्य���ष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळ गव्हाणकर यांचा जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त गौरव सोहळा आज पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, तसंच शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांनी टाकळगव्हाणकर यांना शुभेच्छा दिल्या.
****
आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान नियोजित सामन्यापूर्वी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.
****
0 notes
Text
‘ तुझी विकेट पाडीन , म्हणत वर्गात काचेच्या तुकड्याने वार , आरोपी अल्पवयीन
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून इयत्ता नववीमधील एका विद्यार्थ्यांचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्यात आला. त्यात तो गंभीर जखमी झालेला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ही मांजरी परिसरात घडलेली असून शाळेतील स्नेहसंमेलनावरून दोन मुलांमध्ये वाद झालेले होते. फिर्यादी मुलगा…
0 notes
Text
सेरेब्रल पाल्सीबद्दल हवी जागरुकता
https://bharatlive.news/?p=170862 सेरेब्रल पाल्सीबद्दल हवी जागरुकता
सेरेब्रल पाल्सी ही मुलांमध्ये ...
0 notes
Text
Intuition Process
Intution Process आर्ट ऑफ लिविंग,बारामतीआयोजितINTUITION PROCESS✨ अंतर्ज्ञान प्रक्रिया✨ प्रशिक्षक :श्री राजेंद्र राऊत सर 👉🏻आपण सर्वजण आपल्या इंद्रियांच्या पलीकडे जाणण्याची नैसर्गिक अंतर्ज्ञानी क्षमता घेऊन ��न्माला आलो आहोत. हे विशेषतः अशा मुलांमध्ये दिसून येते ज्यांची मने अजूनही ताजी, निरागस आणि निसर्गाशी अधिक सुसंगत आहेतफायदे 💡 ०६ वे इंद्रिय विकसित करा. 🤓 *फोटोग्राफिक मेमरी विकसित करा. 🎯…

View On WordPress
0 notes
Text
"तुमचं मूल ADHD चं बळी आहे का?पालकांनी काय पाहावं?"
हायपरएक्टिविटी आणि ADHD (Attention Deficit Hyperactivity Disorder) असलेल्या मुलांमध्ये आढळणारी लक्षणं अधिक सविस्तर समजून घेणे पालकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. खालील लक्षणं हायपरएक्टिव मुलांमध्ये अधिक ठळकपणे दिसू शकतात: १. लक्ष केंद्रित न होणं (Inattention): सतत काम विसरणं: मुलं शाळेची पुस्तकं, पेन किंवा शाळेतील होमवर्क सारख्या गोष्टी विसरतात. कामांमध्ये सातत्य नसणं: सुरुवातीला उत्साहाने एखादं…
#ADHD#ADHDAwareness#ADHDSymptoms#ChildBehavior#ChildCare#ChildDevelopment#Counseling#FocusAndAttention#Hyperactivity#MentalHealth#MindMaster#ParentingTips
0 notes
Text

https://wa.link/pntukd
मुलांचे आरोग्य हि प्रत्येक आई वडिलांची काळजी असते.त्यात आजकाल मुलांचं शेड्युल फार बिझी झालाय. शाळा, अभ्यास, वेगव���गळ्या ऍक्टिव्हिटीज यात मुलांचा दिवस कसा जातो हेच कळत नाही. मुलांची शारीरिक हालचाल, व्यायाम पाहिजे तेवढा होत नाही. आजकाल मुलांचा बौद्धिक विकास जरी चांगला असला तरी फिजिकली कमकुवत होत चालला आहे. वातावरण बदलल कि मुलांच आजारी पडणं, वायरल इन्फेक्शन .... या गोष्टी तर आजकाल कॉमन झाल्या आहेत.
मनसोक्तपणे खेळण नाही, बागडन नाही, स्पर्धांच्या मागे धावणं.फक्त अभ्यास, मार्क्स आणि त्यांच्या मागे टॉपर होण्यासाठी असलेला तगादा ..... तेच जर त्यांच्या तब्येतीकडे ��क्ष दिल तर नक्कीच उत्तम ठरेल. आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण जाणवून येतो. काही मुलांचे कॅल्शियम कमी तर कोणाला व्हिटॅमिन ची कमतरता......
मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि भावी पिढीसाठी उत्तमोत्तम आरोग्य लाभावे म्हणून एक पालक म्हणून आपण नक्की प्रयत्न करत राहायला हव. पौष्टिक आहाराचा समावेश करणे. होताहोईल तेवढ जंक फूड टाळणे. मुलांसाठी डाएट चार्ट बनवणे.एकदम नाही पण हळू हळू या गोष्टींची सुरवात तर करता येईल.
एकंदरीतच सगळ्याच बाजूने पाहिलं तर मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम हा विचारात घ्यायलाच हवा. एक पालक म्हणून आपल्या आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. यात प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. पण यामागे "मुलांचे उत्तम आरोग्य" हेच ध्येय प्रत्येक पालकाचे असते.
''आरोग्यम् धनसंपदा.....!
तर मग चला जाणून घेऊया 20 ऑगस्टला दुपारी 3:00pm
Happy To Help सत्रात
Ask for zoom link : 9011050390
#kidshealth #momlife #kids #health #healthykids #healthylifestyle #kidsgym #toddlerlife #dadlife #momentsthatmatter #childrensfitness #parentwin #kidsgymnastics #mommyandme #kidsclasses #mygymclasses #cutekids #minime #nutrition #kidsgymnasticsclasses #littleathlete #parenting #mommyandmeclasses #clockinandplay #mommyandmeclass #mygymsmiles #mygymparty #kidsbirthday #childrenshealth #pediatrics
0 notes
Text
सर्दी-खोकल्याचे औषध घ्या काळजीपूर्वक! थेट मेंदूवर होतोय वाईट परिणाम

WHO | या वर्षाच्या सुरुवातीलाच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने म्हटले होते की फोलकोडिनचा वापर कफ सिरपमध्ये केला जातो, अशा परिस्थितीत ते टाळणे आवश्यक आहे. 14 जुलै रोजी ‘औषध नियंत्रक जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने कफ सिरपमध्ये फोलकोडिन पदार्थ बंद करण्याचा सल्ला दिला आहे. WHO च्या मते ‘फोलकोडाइन’ हे ओपिओइड औषध आहे जे प्रौढ आणि मुलांमध्ये गैर-उत्पादक (कोरड्या) खोकल्यावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. फोलकोडिनचा वापर जगभरात कफ सिरपमध्ये केला जातो. जसे की ओव्हर-द-काउंटर गोळ्या आणि सिरप. WHO ने दिली चेतावणी मार्चमध्ये, WHO ने आरोग्य सेवा व्यावसायिकांना आणि नियामक अधिकाऱ्यांना चेतावणी दिली ज्यांनी न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट्स (NMBAs) सह सामान्य भूल देण्याच्या प्रक्रियेच्या किमान 12 महिने आधी फोल्कोडिन हे औषध वापरलेल्या लोकांमध्ये अॅनाफिलेक्टिक प्रतिक्रिया होण्याच्या जोखमीबद्दल विषय तज्ञ समिती (अँटीमाइक्रोबियल आणि अँटीव्हायरल) नावाच्या एका विशेष समितीने फोलकोडाइनच्या वापराविरुद्धच्या पुराव्याचे पुनरावलोकन केले. तसेच आरोग्य व्यावसायिक, डॉक्टर आणि ग्राहकांसाठी शिफारसी सुचवल्या. डॉक्टरांनी काय दिला सल्ला? अॅडव्हायझरीनुसार, डॉक्टर आणि आरोग्य व्यावसायिकांना खोकला आणि सर्दीवरील उपचारांसाठी फोल्कोडाइन असलेली औषधे घेणे थांबवण्याचा सल्ला रुग्णांना देण्यात आला आहे आणि त्यांच्या लक्षणांकडे लक्ष देण्यास सांगितले. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंग एजंट (NMBAs) असलेले जनरल ऍनेस्थेटिक्स घेणार्या रूग्णांनी गेल्या 12 महिन्यांत खोकला आणि सर्दीच्या उपचारांसाठी फोल्कोडाइन असलेले औषध घेतले आहे की नाही हे सत्यापित करण्यासाठी आणि अशा रूग्णांमध्ये ऍनाफिलेक्टिक प्रतिक्रियांबद्दल देखील जागरूक रहा. सीके बिर्ला हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ.सौरभ खन्ना म्हणाले की, फोलकोडिन हे रोगप्रतिबंधक औषध आहे. फोलकोडाइन हे अँटीट्यूसिव्ह औषधांच्या गटाशी संबंधित आहे जे खोकला दाबते. तर, दुसऱ्या शब्दांत, हे खोकला शमन करणारे आहे जे ओपिओइड व्युत्पन्न आहे. हे मेंदूतील खोकला केंद्र दाबून कार्य करते,” डॉ सौरभ खन्ना म्हणाले. वैद्यकीय तज्ञांच्या मते, काउंटरवर उपलब्ध असलेल्या बहुतेक खोकल्याच्या सिरपमध्ये याचा वापर केला जातो. Read the full article
0 notes