#माखलेल्या
Explore tagged Tumblr posts
survivetoread · 2 years ago
Text
दोन पोस्ट लिहिले या भाषेविषयी. दोन्ही पोस्टांत या भाषेची तुलना शरीराशी केली.
कधी त्वचेच्या खाली, कधी बोटांच्या पकडीत.
त्वचेला लागून, शरीराच्या आत, डोळ्यांना झोंबत, केसांत रांगत, अश्रूंतून गळत, अशी मला ही भाषा सापडली.
छातीत खुपसलेली, गुडघ्यांच्या मध्ये, कापलेल्या नखांमध्ये, रक्ताने माखलेल्या बोटांवर, मेंदूच्या अनंत दर्‍यांमध्ये, इथेही मला ही भाषा सापडली.
जिभेवरही सापडली. तेव्हा मात्र तिची चव घेतली नाही.
8 notes · View notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
Ujjain Rape Case: बलात्कारानंतर रक्तानं माखलेल्या कपड्यांनी 'ती' अडीच तास भटकत राहिली
https://bharatlive.news/?p=152465 Ujjain Rape Case: बलात्कारानंतर रक्तानं माखलेल्या कपड्यांनी 'ती' अडीच तास भटकत ...
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
ताकीद! चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आणाल तर
ताकीद! चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आणाल तर
देवरी : चिखलाने माखलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहन घसरून वाहनचालकाचा जीव जाऊ शकतो. रस्ते हे सुखकर प्रवासासाठी असतात. त्यामुळे रस्त्यावर चिखलाने माखलेले ट्रॅक्टर आणता कामा नये. अन्यथा अशा ट्रॅक्टर चालक-मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ताकीद देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवक यांना आपल्या हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना सूचना देण्याविषयीचे लेखी आदेश…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 4 years ago
Text
पदर...
               “आई...आई...आई.... भुक लागली...” असं म्हणतच दफ्तर ओसरीवरच्या पलंगावर टाकून पळत आम्ही स्वैपाकघरात जायचो. “आधी हातपाय घुऊन या माय..” आई हसत कौतुकाने डोक्यावरुन हात फिरवत म्हणायची. तसेच पळत अंगणात जाऊन तौलीत हौदातले पाणी घेऊन गडबडीत धुळीने माखलेल्या ��ायावर टाकून हाता तोंडावर पाण्याचा हात फिरवून पळतच स्वैपाकघरात येऊन आईच्या पदराने आधी कोण हात तोंड पुसते याची चढाओढ लागायची. “अरे बाहेर खांबाला टॉवेल अडकवला आहे तो घेवून स्वच्छ पुसा हात पाय” असे आई म्हणेपर्यंत आमचे तिच्या पदराने पुसणे होवून गेलेले असायचे. आईच्या पदराएवढे सुलभ, सहज सापडणारे, मऊ, उबदार अन हक्काचे टॉवेल असतांना दुसरे टॉवेल शोधत कोण बसेल?
     आई साडीच नेसायची. सहावार. अगदी नवीन लग्न झाले त्यावेळी ती नऊवार नेसायची असे ऐकले होते. जुन्या फोटोत ते पाहिले होते. पण आम्हाला आठवते तसे ती सहावारच नेसायची. पूर्वी बायका सहसा साडीच नेसत असत. आजी, आत्या, मावश्या, काकू हे सर्वजण साडीच नेसायच्या. त्याकाळी  ग्रामीण भागात कॉलेजच्या मुलीसुद्धा साडीच नेसत असत. आमच्या बहिणी अन त्यांच्या मैत्रिणी पण साडीच नेसायच्या. पण त्याकाळी ‘भला उसकी साडी मेरी साडीसे अच्छी कैसी’ हा मत्सर नव्हता. आहे त्यातच समाधान असायचे.
     सकाळी उठून सडा रांगोळी झाली की आईला फुरसतच नसायची. नाष्टा, जेवण यात तिचा संपूर्ण दिवस जायचा. त्यामुळे एकदा सकाळी साडी नेसली की रात्रीपर्यंत तीच अंगावर असायची. क्वचित बाहेर जायचे असेल किंवा फारच खराब झाली तर ती बदलायची. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तिचा पदर वेगवेगळ्या कारणासाठी आम्हाला आवडायचा. रुसवा फुगवा झाला की पदरात तोंड लपवून बसायचं, कुणी रागावले की पदरात शिरायचं, कंटाळा आला की पदरात डोके घालून गरगर फिरत रहायचं, आणि जाता येता हात पुसणे हे तर आहेच!
     आईच्या पदरात काय जादू असते माहित नाही. मार लागला किंवा आजारपण आले की याच पदराने आई आमची दृष्ट काढायची. तोंडाने काही पुटपुटत शरीरावरुन पदर फिरवायची तेव्हा पदराचा होणारा हलका स्पर्श आजाराला बाहेर काढत आहे असे जाणवायचे आणि शांत झोप लागायची. अर्धा आजार यानेच कमी व्हायचा. हा अनुभव जगातील सर्वांनाच आला असेल ही खात्री आहे. अर्थात सर्व ठिकाणच्या पेहराव्या प्रमाणे पदराची जागा, दुपट्टा किंवा इतर कपडा घेत असेल एवढाच फरक!
आई कुणाचीही असो, तिचा सहवास आपल्या मुलांबरोबर इतरांपेक्षा नऊ महिने जास्तच असतो हे नैसर्गिक सत्य आहे. जन्म झाल्यानंतर ��ाळ कापली तरी एक अदृश्य नाळ कायम तिच्याशी जोडलेली असते. त्यामुळेच मुलांच्या मनात काय घालमेल चालली आहे हे तिला सर्वांच्या आधी पटकन समजते. तिला काय समजते, बाहेरच्या जगात काय अडचणी आहेत तिला काय कळते, असा सर्वसाधारण समज आहे. पण जगातल्या कुठल्याही समुपदेशकापेक्षा तिचे धीराचे दोन शब्द मनावरचा सर्व ताण पळवून लावतात हे नक्की. आपला घामेजलेला चेहरा जेव्हा ती आपल्या पदराने पुसते तेव्हा मनातली चिंता कुठल्या कुठे पळून जाते.
‘आई, तू अती काळजी करत जावू नकोस बरं’ असे म्हटल्यावर ‘तू आई होशील तेव्हा तुला समजेल आईचं मन’ या आईच्या उत्तराचा अर्थ मुलींना त्या जेव्हा आई होतात तेव्हा नक्कीच लक्षात येत असेल. मुलींनाच नाही तर मुलेही जेव्हा बाप होतात तेव्हा त्यांनाही या म्हणण्याचा अर्थ नक्कीच कळतो. आपल्या मुलांना ज्या काळजीने त्यांची आई (पत्नी) वाढवते तेव्हा आपल्याला आठवतं आपलं लहानपण आणि आईने घेतलेली आपली काळजी! छोट्या छोट्या गोष्टींवर आपण रुसायचो, रागवायचो, रडायचो तेव्हा आई आपला रुसवा कशी घालवायची, कसे हसवायची हे सगळं आठवतं.
सृष्टीचे चक्र फिरत राहते. मुलांची अन मुलींची मुले मोठी होत जातात अन नवीन पिढीला हाच अनुभव येत जातो. मुली आईच्या रोलमध्ये त्यांच्या मुलांमध्ये समरसून जातात. आपल्या आईचे अनुकरण करत त्यांच्या मुलांची जोपासना करतात. त्यांची मुले त्यांच्या पदराचा आश्रय घ्यायला लागली तरी माहेरी आल्यावर त्या आईच्या मुलीच जास्त असतात, मुलांच्या आई कमी!
मुलेही वयाने कितीही मोठे झाली तरी त्यांना आईच्या पदरालाच हात पुसावे वाटते, तिच्या मांडीवर डोके ठेवून दोन मिनिटे का होईना झोपावे वाटते. तिचा हात डोक्यावरुन फिरत असतांनाचा आनंद आणि श्रीमंती कशातच मोजता येत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी हे उगीच नाही म्हणत! आईसमोर मुले लहानच असतात तसे आईपण मुलांना मोठे समजतच नाही. लहान मुलांप्रमाणे ‘हे खा, ते खा. किती बारिक झालास’ असे म्हणत स्वत:च्या हाताने खाऊ घालते. नातवंडांना हे पहातांना गम्मत वाटत असते.
आपण मोठे होत जातो (वयाने) तसे आयुष्याच्या वाटचालीत अनेक जीवाभावाचे लोक भेटतात. पण आई-वडलांचे स्थान जगात दुसरे कुणीच घेवू शकत नाही हे मात्र त्रिकालाधित सत्य आहे. आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत त्यांनी केलेला त्याग, कष्ट हे आपण आई-बाप झाल्यावरच लक्षात येतो. ��न तेच पुढे आपणही करत राहतो...पिढ्या न पिढ्या हे असेच चालत राहते...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
लैंगिक संबंधांना नकार देणाऱ्या प्रेयसीचा केला खून; रक्ताने माखलेल्या कपड्यात रस्त्यावर बसून राहिला; चित्रपटात शोभेल असं थरारनाट्य
लैंगिक संबंधांना नकार देणाऱ्या प्रेयसीचा केला खून; रक��ताने माखलेल्या कपड्यात रस्त्यावर बसून राहिला; चित्रपटात शोभेल असं थरारनाट्य
लैंगिक संबंधांना नकार देणाऱ्या प्रेयसीचा केला खून; रक्ताने माखलेल्या कपड्यात रस्त्यावर बसून राहिला; चित्रपटात शोभेल असं थरारनाट्य चेन्नई पोलिसांनी बसस्टँड वर रक्ताने भरलेल्या कपड्यांमध्ये बसलेल्या एका तरुणाला शुक्रवारी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर या तरुणाने आपण आपल्या प्रेयसीचा खून केल्याची कबुली दिली आहे. लैंगिक संबंधांना नकार दिल्याने त्याने तिचा खून केला आहे. इंडिया टुडेने दिलेल्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात विशेष सुरक्षा रक्षक वाहन; वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ वन्यप्राण्यांच्या बेशुद्धीची प्रक्रिया आता सुलभ चंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्षांमुळे अनेकदा वाघांना जेरबंद करणे आवश्यक असते, परंतु घनदाट जंगलात चिखलाने माखलेल्या रस्त्यांनी घटनास्थळी पोहोचणे आणि वाघांना इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करणे आव्हानात्मक असते. हे काम सोपे व्हावे यासाठी एक विशेष…
View On WordPress
0 notes