#महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करत आहे
Explore tagged Tumblr posts
darshaknews · 3 years ago
Text
धोनीच्या सांगण्यावरून ताहिरने विकेट घेतली तेव्हा ईशाननेच सांगितली आऊट झाल्याचा रंजक किस्सा
धोनीच्या सांगण्यावरून ताहिरने विकेट घेतली तेव्हा ईशाननेच सांगितली आऊट झाल्याचा रंजक किस्सा
मुंबई इंडियन्सचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन म्हणाला की चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्याप्रकारे क्रिकेट खेळतो त्यामुळे तो कधीकधी आश्चर्यचकित होतो. तो पुढे म्हणाला की, तो अनेकदा धोनीचा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तो त्याच्या खेळात बदल करू शकेल, पण मैदानात त्याचा बदलता खेळ पाहून तो थक्क होतो. किशन हा IPL 2022 चा सर्वात महागडा खेळाडू आहे. 23 वर्षीय…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
विराट कोहलीने मोठा टप्पा गाठला, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी एलिट लिस्टमध्ये सामील झाला | क्रिकेट बातम्या
विराट कोहलीने मोठा टप्पा गाठला, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी एलिट लिस्टमध्ये सामील झाला | क्रिकेट बातम्या
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत आहे© BCCI विराट कोहलीने बुधवारी अहमदाबादमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 44 धावांनी विजय मिळवून एक मोठा टप्पा गाठला आणि सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या एलिट यादीत सामील झाला. घरच्या मैदानावर १०० एकदिवसीय सामने खेळणे हा कोहलीचा ताजा टप्पा आहे. भारताच्या माजी कर्णधाराने बुधवारच्या दुसऱ्या एकदिवसीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 SEP. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ सप्टेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती; नऊ नवीन चेहऱ्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ ** निर्मला सीतारामन संरक्षण मंत्री; पियुष गोयल रेल्वे मंत्री; तर सुरेश प्रभू यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय ** भाजपला फक्त विधेयकं मंजूर करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीची आठवण - शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका ** श्रीलंकेविरुद्ध पाचवा एकदिवसीय सामना जिंकून भारताचा मालिकेत निर्भेळ विजय; धोनीचा शंभर यष्टिचीत��ा विक्रम आणि ** औरंगाबाद खंडपीठाची क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांचं आवाहन **** केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात काल, चार राज्यमंत्र्यांना बढती देत कॅबिनेट मंत्रिपदीपदाची तर नऊ नवीन चेहऱ्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. काल सकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व मंत्र्यांनी पद ��णि गोपनीयतेची शपथ दिली. बढती मिळालेल्या मंत्र्यांमध्ये निर्मला सीतारामन यांच्यासह मुख्तार अब्बास नक्वी, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यापूर्वी वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार सांभाळलेल्या सीतारामन यांच्याकडे संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार सुरेश प्रभू यांच्याकडे, तर पियुष गोयल यांच्याकडे रेल्वेसह कोळसा मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. स्मृती इराणी यांच्याकडे माहिती प्रसारण तसंच वस्रोद्योग, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक, तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. प्रधान यांच्याकडे कौशल विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी, सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्याकडे परिवहन मंत्रालयासह गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली असून, उमा भारती यांच्याकडे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार असेल. राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयासह क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार, आर के सिंह यांना ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार, संतोष कुमार गंगवार यांना श्रम आणि रोजगार मंत्रालय, के जे अल्फोन्स यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार, तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. शिवप्रताप शुक्ल - अर्थराज्यमंत्री, अश्विनीकुमार चौबे - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, अनंत कुमार हेगडे - कौशल्य विकास राज्यमंत्री, गजेंद्र सिंग शेखावत - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री, डॉ. सत्यपाल सिंग - मनुष्यबळ विकास तसंच जलसंसाधन राज्यमंत्री, तर वीरेंद्र कुमार - महिला आणि बालकल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहतील. दरम्यान, काल शपथ घेतलेल्या केंद्रीय मंत्र्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केलं आहे. या विस्तारामुळे महाराष्ट्राला आणखी लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. **** भाजपला फक्त विधेयकं मंजूर करताना तसंच निवडणुका जवळ आल्या की, एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी ची आठवण होते, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी सध्या एनडीए केवळ कागदावर आणि बैठकीपुरती उरल्याची टीका केली. **** २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचं महत्वाकांक��षी ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. माहिती आणि प्रसारण महासंचालनालयाच्या मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सर्वांसाठी परवडणारी घरे या विषयावर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. **** राज्यातली ३० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश असलेली जवळपास ५९ अभियांत्रिकी महाविद्यालयं बंद होणार असल्याचे संकेत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद AICTE नं दिले आहेत. आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव, तसंच ३० टक्क्यांहून अधिक जागा सलग पाच वर्षे भरली न जाणारी महाविद्यालयं बंद करण्याचा AICTE चा नियम आहे. यंदाही राज्यभरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतल्या ५० हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. **** राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील, यांचं काल पहाटे औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. पाटील यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगर जिल्ह्यातल्या नालेगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** श्रीलंकेविरुद्धचा पाचवा एकदिवसीय सामना सहा गडी राखून जिंकत भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ विजय मिळवला. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करत, भारतासमोर २३९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद ११० धावांच्या बळावर भारतानं ४७ व्या षटकात चार गडी गमावत हे लक्ष्य साध्य केलं. पाच बळी घेणारा भुवनेश्वर कुमार सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या दौऱ्यातला एकमेव टी-ट्वेंटी सामना परवा बुधवारी खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने आपल्या कारकिर्दीतला १००वा यष्टीचित करत नवा विक्रम केला. असा विक्रम करणारा धोनी पहिला यष्टिरक्षक ठरला आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगाकारा ९९ यष्टिचीत करून दुसऱ्या स्थानी आहे. **** अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार पेंग शुआर्इ यांनी स्पर्धेच्या ‘अंतिम १६’मध्ये प्रवेश केला. सानिया-पेंग जोडीने मॅग्डालेना रायबरीकोव्हा आणि जाना सेपेलोव्हा ��ोडीचा ६-७, ६-३, ६-३ असा पराभव करत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. **** औरंगाबाद खंडपीठाची क्षमता कमी होणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशात अलीकडच्या काळात स्थापन झालेली न्यायालयांची खंडपीठं, औरंगाबाद खंडपीठाची प्रेरणा घेऊन अस्तित्वात आल्याचं त्यांनी सांगितलं, न्यायमूर्ती रवींद्र बोर्डे यावेळी उपस्थित होते, नॅशनल लॉ स्कूलमध्ये ५४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. **** औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं उत्कृष्ट संशोधनासाठी देण्यात येणारे नॅशनल रिसर्च प्रोफेसर पुरस्कार आज प्रदान केले जाणार आहेत. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पी.के.अस्वाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र सिरसाठ, डॉक्टर के.एम.जाधव, डॉक्टर रामफल शर्मा, रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर सी.एच.गील, डॉक्टर बापू शिंगटे, संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर के.व्ही.काळे, ग्रंथालयशास्त्र विभागाच्या डॉक्टर वैशाली खापर्डे आणि रसायनतंत्रज्ञान विभागाचे डॉक्टर अनिकेत सरकटे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. **** औरंगाबाद शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणी, समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं असल्याचं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं बांधकाम व्यावसायिकांच्या 'क्रेडाई' संघटनेच्या नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळ्यात बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांनी पाणी या मुलभूत गरजेचा विचार करावा, तसंच व्यवसायात काम करणाऱ्या मजूर, ठेकेदारांना प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजनेचा लाभधारक बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या प्रत्येक घटकाला होण्यासाठी आणि या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आध्यात्मिक व्यासपीठ हे अत्यंत उपयुक्त असल्याचं प्रतिपादन अपर आयुक्त विजयकुमार फड यांनी केलं. जालना जिल्ह्यातील मंठा इथं सात गाव एक गणपती या वार्षिक गणेश महोत्सवात आयोजित संवादपर्व कार्यक्रमात ते काल बोलत होते. आपल्यातली सात्विकता ही येणारी पिढी घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं सांगत समाजामध्ये मुलगा आणि मुलगी ही विषमता दूर करायाची असेल तर प्रत्येकानं सकार���त्मक दृष्टीकोनातुन विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. **** पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. काल सायंकाळी धरणात सुमारे तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू होती. **** जालना इथं स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका कारसह गुटख्याचा साठा जप्त केला. जिल्ह्यातल्या भोकरदन इथून अंबड कडे हा गुटखा नेला जात होता. दोन कंपन्याचा सुमारे साडे तीन लाख रुपयाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. ****
0 notes
webmaharashtra-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
​धोनी 2019 चा विश्वचषक खेळणार? वाचा रवी शास्त्री काय म्हणाले कोलंबो : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्याच्या टीम मध्ये फिट बसत नसल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यानं शानदार फलंदाजी करत टीकाकारांना जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. इंग्लंडमध्ये होणारा 2019 चा विश्वचषक खेळणार का, याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. धोनीने अजून त्याचं निम्म क्रिकेटही खेळलेलं नाही, तो निश्चितच 2019 चा विश्वचषक खेळणार, असं शास्त्रींनी म्हटलं आहे. 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात नवनवीन प्रयोग आणि रोटेशन पॉलिसीचा वापर केला जात आहे. ज्यामध्ये धोनी फिट बसतो. धोनीचा भारतीय संघावर प्रभाव आहे, तो ड्रेसिंग रुममधील ‘लिव्हिंग लिजेंड’ आहे आणि त्याचा सर्व जण आदर करतात, असं रवी शास्त्री म्हणाले. धोनी भारताचा बेस्ट विकेटकीपर आहे. कारण तो गेल्या कित्येक वर्षांपासून खेळत आहे. तुम्ही त्याची जागा इतर कुणाला देण्याचा विचारही करु शकत नाही, असंही रवी शास्त्री म्हणाले. तो त्याच्या जागी फिट आहे, असंही रवी शास्त्रींनी ठणकावलं.
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 AUG. 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २५ ऑगस्ट २०१७ सकाळी ६.५० मि.
**** ** व्यक्तिगत गोपनीयता हा मुलभूत अधिकार : सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा ** २०० रुपये मूल्याची नोट आजपासून चलनात येणार ** गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ ** श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारत���चा तीन गडी राखून विजय आणि ** विविध शाळांच्या २६२ बोगस तुकड्या प्रकरणी लातूर इथं ३१५ जणांविरुध्द गुन्हा दाखल **** व्यक्तिगत गोपनीयता हा मुलभूत अधिकार असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय घटनापीठानं काल हा निर्णय दिला. सरकारी योजनांसाठी आधार क्रमांकाच्या सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेच्या मूलभूत अधिकारांचा भंग होतो असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर दोन ऑगस्टला सुनावणी पूर्ण झाली होती, त्यावर काल हा निर्णय देत, न्यायालयानं, आधार पत्राच्या वैधतेबाबतचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाईल, असंही स्पष्ट केलं. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत करत, हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना प्रसाद यांनी, आधार पत्रावरची माहिती पूर्णपणे सुरक्षित असून, विहित उद्देशाव्यतिरिक्त अन्य कामासाठी या माहितीचा उपयोग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. **** देशाच्या विकासासाठी शेतकऱ्यांची समृध्दी गरजेची असल्याचं मत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्याच्या भारती ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशनच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबोधित करताना, पंतप्रधानांनी, देशानं हरित आणि धवल क्रांती पाहिली असून, आता मच्छीमारांसाठी निळी तर मधाच्या अधिक उत्पादनासाठी गोड क्रांती करण्याची वेळ आली असल्याचं नमूद केलं. **** २०० रुपये मूल्याची नोट आजपासून चलनात येणार असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. विमुद्रीकरणानंतर निर्माण झालेला चलन तुटवडा भरुन काढण्यास यामुळे मदत मिळणार असून, २०० रुपयांच्या सुमारे ५० कोटी नोटा बाजारात आणण्यात येणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. **** छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही ‘मिशन मोड’वर करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधत, अर्ज भरण्यासाठीची बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत असेल, याची दक्षता घेण्यास सांगितलं. हे अर्ज भरून घेण्यासाठी सेवा केंद्रांना प्रती अर्ज दहा रुपये शुल्क सरकारकडून देण्यात येणार असून, शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेण्याच्या तक्रारी आल्यास, अशा सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. **** राज्यातल्या नगरपरिषदांमध्ये गेल्या २० वर्षांपासून रोजंदारीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध नगरपालिकांमध्ये सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नगरपरिषद तसंच नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक विचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. करांची वसुली करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तसंच त्यांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. **** कांद्यावर कोणत्याही परिस्थितीत निर्बंध घालू देणार नसल्याचा निर्वाळा, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. नाशिक जिल्ह्यात विंचूर इथं कांदा लिलावाचा शुभारंभ करताना ते काल बोलत होते. लासलगाव इथं कांदा हब निर्माण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. सरकारनं कांद्याची पस्तीस लाख मेट्रिक टनाची होणारी आयात कमी करून ती दोन लाख टनावर आणली असल्याचं त्यांनी सांगितलं. **** गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. सकाळी घरोघरच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होईल. यंदा अनंत चतुर्दशी पाच सप्टेंबर र���जी असल्यानं, गणेशोत्सव दहा ऐवजी बारा दिवस साजरा होणार आहे. नागरिकांनी हा उत्सव पर्यावरण पूरक पद्धतीनं साजरा करावा, असं आवाहन विविध पर्यावरणवादी तसंच सामाजिक संघटनांकडून केलं जात आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला कालचा दुसरा सामना भारतानं तीन गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं २३६ धावा केल्या, मात्र पावसामुळे खेळात व्यत्यय आल्यानं, भारताला ४७ षटकात २३१ धावांचं आव्हान देण्यात आलं. महेंद्रसिंग धोनी च्या नाबाद ४५ आणि भुवनेश्वरच्या नाबाद ५३ धावांच्या बळावर भारतानं ४५ व्या षटकात विजय मिळवला. **** ग्लासगो जागतिक बॅडमिंटन अजिक्यंपद स्पर्धेत भारताच्या के श्रीकांत आणि पी.व्ही सिंधू यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं डेन्मार्कच्या अँडर्स अँटनसनवर २१-१४, २१-१८ नं तर सिंधूनं हाँगकाँगच्या चुंग येंग गेन ई वर १९-२१, २३-२१ आणि २१-१७ अशी मात केली. **** लातूर जिल्ह्यातल्या २६२ बोगस तुकड्या प्रकरणी शासनाची ६ कोटी अट्ठावन्न लाख सत्त्याण्णव हजार नऊशे रूपयांची फसवणूक केल्याच्या कारणावरून लातूर जिल्हा परिषदेचे तत्कालिन शिक्षणाधिकारी विलास जोशी यांच्यासह १८ अधिकारी, कर्मचारी आणि संस्थाचालक मुख्याध्यापकासह ३१५ जणांविरुध्द काल गुन्हा दाखल करण्यात आला. २०१०-११ ते २०१२-१३ या कालावधीत विलास जोशी यांनी जिल्ह्यातल्या ९९ खाजगी प्राथमिक शाळांमध्ये २६२ तुकड्यांना शासनाचे नियम डावलून मंजूरी दिली होती. या ९९ शाळांमध्ये उर्दू माध्यमांच्या ११ तर मराठी माध्यमांच्या ८८ शाळांचा समावेश आहे. त्यानंतर या शाळांमध्ये तीनशे एकोणसत्तर शिक्षकांची भरती केली होती. **** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्पॉट ॲडमिशन प्रकियेत नियोजनाच्या अभावाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या रिक्त जागांसाठी काल स्पॉट ॲडमिशन प्रक्रिया राबवण्यात येणार होती, यासाठी औरंगाबादसह अनेक जिल्ह्यातले विद्यार्थी दाखल झाले होते. मात्र प्रवेशासाठी सायंकाळी उशीरापर्यंत ताटकळत बसावं लागल्यानं, या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर घोषणाबाजी केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागली. **** जालना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पंचवीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर इथं काल ही कारवाई करण्यात आली. महेबूब खान उस्मान खान पठाण असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. **** परभणी महानगरपालिकेनं पाणीपट्टी आणि मालमत्ता करात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ आमदार राहूल पाटील यांनी काल एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. गेल्या १८ वर्षात करवाढ न करता, अचानक कराच्या दरात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ पाटील यांनी हे उपोषण केलं. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. **** नांदेड जिल्ह्यात खाजगी प्रवासी बस उलटून झालेल्या अपघातात चार प्रवासी ठार तर अकरा प्रवासी जखमी झाले. नर्सी ते देगलूर रस्त्यावर वनाळी टोल नाक्याजवळ काल दुपारी ही घटना घडली. ****
0 notes