#महिंद्रा अँड महिंद्रा बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
ओडिशातल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात
ऊर्जा विभागाच्या तिनही कंपन्यांच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आणि सर्व भत्त्यांमध्ये वाढ
येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची - छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन
पंढरपूर इथं आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन २४ तास सुरु राहणार
आणि
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध दोन दिवसीय जगन्नाथ रथयात्रेला आज सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा यांचे तीनही रथ ओढण्यास प्रारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. प्रथेला फाटा देत यावेळी भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र या तिन्ही भावंड देवतांचा समावेश असलेले अनेक विधी एकाच दिवशी केले जातील. जगन्नाथाची रथयात्रा एक दिवसाची असते, परंतु विशिष्ट खगोलीय व्यवस्थेमुळे, ती या वर्षी दोन दिवस चालणार आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं इस्कॉनच्या वतीने जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा मार्गाने ही रथ यात्रा भाग्यनगर इथल्या इस्कॉन मंदिरात पोहोचत आहे. या रथ यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
नाशिकमध्ये पंचवटीत भगवान श्री जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली. या यात्रेत पर्यावरण रक्षणा��ाबतही जनजागृती करण्यात आली.
****
आपल्या प्रदेशाची गरज लक्षात घेऊन भविष्यात कोणतं तंत्रज्ञान आपल्यासाठी उपयुक्त आहे, याचा विचार करा आणि त्यानुसार तरुणांमध्ये नवतंत्रज्ञानाचं कौशल्य विकसित करा, असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औद्योगिक कंपन्यांना केलं आहे. नागपूर इथं विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन, महिंद्रा ट्रॅक्टर्स, यंत्र इंडिया लिमिटेड यांनी संयुक्‍तपणे स्‍थापन केलेल्या वेदिक-महिंद्रा कौशल्‍य विकास केंद्राचं गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाला पेट्रोल-डिझेलमुक्‍त करण्‍याचं आपलं ध्‍येय असल्‍याचं सांगत गडकरी यांनी, डिफेन्‍सच्‍या उपयोगाकरता आऊटर रिंग रोडवर लवकरच नवीन तंत्रज्ञानाने युक्‍त १३२ आसनक्षमता असलेली ट्रॉली बस सुरू करण्‍यात येणार असल्‍याचं सांगितलं.
****
मुंबईमध्यल्या वरळी इथं झालेल्या हिट अँड रन दुर्घटनेतल्या दोषींना पाठीशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. आज पहाटे वरळी इथं एका भरधाव चारचाकीने एका दांपत्याला फरपटत नेल्याची घटना घडली, यात महिलेचा मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी आहे. कायदा सर्वांसाठी समान असून, योग्य ती कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कायद्यासमोर सगळे समान. सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो. त्यामुळे ही घटना जी आहे, याला काही वेगळा न्याय लागणार नाही, वेगळा नियम नाही. जे होईल ते कायदेशीर होईल. कोणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत. आणि कोणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नयेत, यासाठी देखील शासन म्हणून यामध्ये गृहविभाग नक्की उपाययोजना करेल. परंतू या केस मध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुती नऊ पैकी नऊ जागा जिंकेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर आज शिंदे यांनी बावनकुळे यांची नागपूर इथं भेट घेतली.
****
राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली वीज निर्मिती, विद्युत वितरण आणि विद्युत पारेषण या कंपन्यांमधले अधिकारी आणि कर्म��ाऱ्यांच्या यांच्या मूळ वेतनात १९ टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येणार आहे. मुंबईत आज या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता आता ५०० वरुन एक हजार रुपये करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
****
येणारी विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई असेल, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळाव्यात बोलत होते. मागील दहा वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती घोषणा अंमलात आणल्या आहेत असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी, सरकारवर टीका केली. संपूर्ण थकबाकीसह शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. एकमेकांत भांडण्यात शक्ती वाया न घालवता एकजूट दाखवून आपल्या मागण्या केंद्र सरकारकडून पुर्ण करुन घ्याव्यात, असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं.
भारतीय जनता पक्षाचे माजी उप महापौर राजू शिंदे यांनी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
****
पंढरपूर इथं आषाढी एकादशी आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. भाविकांना आता २६ जुलै पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणीचं चोवीस तास मुखदर्शन, तर २२ तास १५ मीनिटे पदस्पर्श दर्शन घेता येईल, अशी माहिती, मंदिर प्रशासनाचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. याशिवाय दर्शन रांगेत शेड, आपत्कालिन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालयं तसंच बसण्याची सुविधा करण्यात आली आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज धाराशिव शहरात आगमन झालं. शहरवासीयांनी पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. उद्या ही पालखी तुळजापूरला जाणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महा��ाज पालखी सोहळ्यात बारामती इथं आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार सहभागी झाले होते.
****
लातूरच्या विवेकानंद प्रतिष्ठानच्या विवेकानंद रुग्णालयामार्फत गेल्या १८ वर्षांपासून आषाढी वारीतल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैद्यकीय पथक पायी दिंडीत सहभागी होत असतं. यावर्षीही हे पथक आजपासून १७ जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या मोफत वैद्यकीय सेवेसाठी रवाना झालं आहे. या पथकाकडून दिंडीतल्या वारकऱ्यांना गरजेनुसार मोफत उपचार आणि औषधी पुरवली जाणार आहे.
****
मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी आज मुस��धार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त असून, रेल्वे मार्गावरील साचलेल्या पाण्यामुळे कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना अडथळा निर्माण होत आहे. पालघर जिल्ह्यातल्या उसगाव इथं पाण्यात अडकलेल्या १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात राष्ट्रीय अपत्ती दलाच्या पथकाला यश आलं आहे.
नाशिक जिल्ह्यासह शहरात सकाळपासून पाऊस सुरु आहे. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथं एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस झाला असून, निर्मला नदीला पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे वस्तीला गेलेल्या एसटी गाड्या अडकून पडल्या आहेत. काही ठिकाणी पडझड होऊन मालमत्तेचं नुकसान झालं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातले नदी, ओढे, तलाव ओसंडून वाहत आहेत. अनेक बंधार्यांवरुन पाणी ओसंडून वाहत आहे. आज दुपारी पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर आलं आहे. जिल्ह्यातल्या अनेक भागात नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यानं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानच्या पाच टी-ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज हरारे इथं सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या २० षटकांत दोन बाद २३४ धावा झाल्या होत्या. अभिषेक शर्मानं ४७ चेंडुत १०० धावा केल्या.
****
बीड इथल्या पोलिस भरती लेखी परिक्षेच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिस उपनिरीक्षकांचा नेकनूरजवळ आज अपघाती मृत्यू झाला. दिंद्रड ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक मच्छिंद्र नन्नवरे आणि सिरसाळा ठाण्याचे उपनिरिक्षक रमेश नागरगोजे हे दुचाकीने बीडकडे निघाले होते, त्यावेळी नेकनूरकडे भरधाव जाणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला, यात नन्नवरे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर चारचाकी वाहनचालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जम्मू काश्मीर मधल्या कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दलाचे जवान आणि ��हशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन सैनिकांना वीरमरण आलं. यामध्ये अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव - भाकरे इथल्या प्रवीण जंजाळ यांचा समावेश आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा संपली आहे, XUV300 EV लवकरच लॉन्च होणार आहे
महिंद्राच्या इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा संपली आहे, XUV300 EV लवकरच लॉन्च होणार आहे
Mahindra XUV300 EV लाँचची तारीख आणि किंमत: भारतीय बाजारपेठेतील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करणार आहे. महिंद्राने दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये XUV300 आणि KUV100 च्या इलेक्ट्रिक व्हर्जन्सचे प्रदर्शन केले होते. असे सांगण्यात आले आहे की कंपनी आता आपले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. महिंद्र पुढील वर्षाच्या पहिल्या…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
महिंद्रा प्लांटिंग मास्टर पॅडी 4 आरओ लाँच, शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या जाणून घ्या
महिंद्रा प्लांटिंग मास्टर पॅडी 4 आरओ लाँच, शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या जाणून घ्या
महिंद्रा रोपण मास्टर धान 4 आर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेती उपकरणे क्षेत्रात तेलंगणामध्ये महिंद्र रोपण मास्टर पॅडी 4 आर नावाच्या तांदूळ प्रत्यारोपणाची नवीन श्रेणी सुरू झाली आहे. तांदूळ प्रत्यारोपण हे एक खास मशीन आहे, जे भात शेतीत तांदळाच्या बियाण्यांची लागवड तसेच उत्पादन वाढविण्यास मदत करते, हे मॅन्युअल ट्रान्सप्लांटच्या तुलनेत श्रम आणि वेळेची बचत करते. 980 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले झारखंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०२३ सकाळी ���.१० मि.****
केंद्र सरकारच्या नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नियुक्तीपत्रांचं वितरण
नागपूरमधील शांतीवन इथल्या संशोधन केंद्राचंही पंतप्रधानाच्या हस्ते आज लोकार्पण 
दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातली महाभरती रद्द झाल्यामुळे, सर्व उमेदवारांचं परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्रा आणि प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन
आणि
महिला आशिया कुस्ती स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघालची अंतिम फेरीत धडक, तर आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपर किंग्ज संघावर तीन धावांनी विजय
****
केंद्र सरकारच्या नोकरीत नव्यानं भरती होणाऱ्या ७१ हजार उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं नियुक्तीपत्रांचं वितरण होणार आहे. या उमेदवारांशी पंतप्रधान संवादही साधणार आहेत. भरती होणाऱ्या उमेदवारांना नव्यानं सुरू करण्यात आलेल्या कर्मयोगी प्रारंभ, या ऑनलाइन कामकाज परिचय अभ्यासक्रमाद्वारे प्रशिक्षण घेण्याचीही संधी मिळणार आहे.
मुंबईत होणाऱ्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे सहभागी होतील, तर नांदेडमध्ये केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील रोजगार मेळाव्यात नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रं प्रत्यक्ष सुपूर्द करतील.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था - बार्टीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत, ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बार्टी, सारथी, टी आर टी आय, महाज्योती या संस्थांच्यावतीने, पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांबाबत मुख्यमंत्री लाभार्थ्यां��्या प्रतिक्रिया स्वत: जाणून घेणार आहेत. आज सायंकाळी साडे चार वाजता दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमात प्रत्येक जिल्ह्यातून ५० लाभार्थी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातून सहभागी होणार आहेत. आनंदाचा शिधा संचाचं वितरण, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी, शिवभोजन थाळी या योजनेतल्या लाभार्थ्यांशीही यावेळी संवाद साधण्यात येणार आहे.
****
ग्रामीण भागात दिव्यांग आणि पालात राहणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना तयार करण्याची सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धर्तीवर भूमिहीन शेतमजुरांसाठी योजना तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. सरकारनं फक्त घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी आग्रही मागणी, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यात, नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यावर बोलत होते.
****
राज्याच्या अनेक भागात गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतांना, सरकार मात्र नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी आणि घोषणा करत असल्याची टीका, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आपण नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, दानवे यांनी काल निफाड तालुक्यात नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणचे  तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी करत दानवे यांनी, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत राहणार असल्याचं सांगितलं.
****
विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि फळबागांसाठी एक लाख रुपये प्रति हेक्टर देण्याची मागणी सरकारकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी येत्या १९ तारखेला विशेष न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात सक्तवसुली संचालनालय -ईडीनं न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याचं समोर आलं आहे. मात्र, अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी निगडीत जरंडेश्वर साखर कारखाना स्पार्कलिंग सॉईल लिमिटेड कंपनीचं ​​नाव आरोपपत्रात आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
****
राज्यात जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ मधल्या विविध १८ संवर्गातल्या रिक्त पदांच्या महाभरतीची प्रक्रिया रद्द झाल्यामुळे, या परीक्षेला अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना, त्यांचं परीक्षा शुल्क परत दिलं जाणार आहे. यानुसार राज्याच्या ग्रामविकास विभागाने पहिल्या टप्प्यात एकूण शुल्कापैकी ६५ टक्के रक्कम ही सर्व जिल्हा परिषदांकडे वर्ग केली आहे. मार्च २०१९ आणि ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू करण्यात आलेली ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे रद्द करण्यात आली होती.
****
महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात परवा झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या दोन्ही नेत्यांमध्ये या बैठकीत आघाडीची भविष्याची दिशा ठरवण्यावर चर्चा झाली असून, काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
****
महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत, त्यामुळेच आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडी भक्कम असून, कसलेही मतभेद नाहीत, आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविडचे एक हजार ११५ नवे रुग्ण आढळले, तर नऊ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला. राज्यात सध्या कोविड संसर्ग झालेले पाच हजार ४२१ सक्रीय रुग्ण आहेत. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक १२४ सक्रीय रुग्ण आहेत. त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८३, नांदेड २६, लातूर २१, बीड १९, तर हिंगोली जिल्ह्यात कोविडचा एक रुग्ण आहे. परभणी जिल्ह्यात सध्या एकही सक्रीय रुग्ण नसल्याचं, आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
कांदा अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत या विषयावर बैठक घेऊन, धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याचं, आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांच्या अनुषंगानं आज तुळजापूर महसूल मंडळामध्ये प्रायोगिक तत्वावर तलाठी तसंच कृषी सहाय्यक प्रत्यक्ष गावांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. मुख्यमंत्री परवा धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करून, ई पीक पाहणीची अट शिथील करण्याची मागणी केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा इथल्या वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला दोन लाख रूपये दंडासह कारवाईचे आदेश, डॉ बाबासा��ेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी ��िले आहेत. विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने, महाविद्यालयास दोषी ठरवलं आहे. दंडाची रक्कम सात दिवसांत न भरल्यास त्यावर १० टक्के व्याज आकारण्यात यावं, संपूर्ण दंड वसूल झाल्याशिवाय महाविद्यालयातल्या विद्यार्थांचे निकाल घोषित करु नये, तसंच पुढील आदेशापर्यंत या केंद्रावर विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा घेऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आगामी काळात शैक्षणिक लेखापरीक्षण, महाविद्यालयाचं संलग्निकरण, परीक्षा या कोणत्याही बाबतीत बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कुलगुरू येवले यांनी महाविद्यालयांना दिला आहे.
****
स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामस्तरावरील सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामं वीस एप्रिल पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, नरेगा आणि जलजीवन मिशन या विषयाचा आढावा घेतल्यानंतर त्या बोलत होत्या. १४१ गावांमध्ये अधिकाऱ्यांनी भेटी देवून, अद्याप सुरु न झालेली कामं तात्काळ सुरु करावीत, तसंच सार्वजनिक शौचालयाची कामंही वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
****
वडीलांना धक्काबुक्की करुन घराबाहेर काढल्याप्रकरणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या भावाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. आत्याला घरी येऊ दिल्याच्या कारणावरुन वादावादी होऊन आमदार क्षीरसागर यांनी आपल्याला घराबाहेर काढल्याची तक्रार त्यांचे वडील रविंद्र क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली, त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला.
****
सरकारनं शिक्षण क्षेत्रावरती खर्च वाढवावा, त्याशिवाय देशाचा विकास अशक्य असल्याचं, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ.भालचंद्र कानगो यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं रयत शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. शिक्षण व्यवस्थेतला बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य नागरीक शिक्षणापासून लांब जात असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. खाजगीकरण तसंच व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणं अवघड होईल, अशी भीती कानगो यांनी व्यक्त केली.
****
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्रा यांचं काल मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं, ते ९९ वर्षांचे हेाते. केशुब महिंद्रा हे १९६३ ते २०१२ पर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष होते. त्यांनी २०१२ मध्ये त्यांचे पुत���े आनंद महिंद्रा यांच्याकडे समूहाचा कार्यभार सोपवला. पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. १९८७ मध्ये, केशुब महिंद्रा यांना फ्रेंच सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं.
****
प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजाराने निधन झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या. 'तमस' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या उत्तरा बावकर यांनी, अनेक मराठी, हिंदी चित्रपट तसंच दूरचित्रवाणी मालिकांतून विविध भूमिका साकारल्या. त्यांना अभिनयासाठी १९८४ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तर एक दिन अचानक या चित्रपटासाठी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. उत्तरायण, वास्तुपुरुष, दोघी, तक्षक, एक दिन अचानक, संहिता, आजा नचले, शेवरी, डोर आदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका, रसिकांच्या स्मरणात आहेत.
****
महाराष्ट्र विकास सेवा या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेनं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व कामं करण्यास नकार दिला आहे. याबाबातचं निवेदन संघटनेच्या वतीनं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना नुकतचं देण्यात आलं. संघटनेच्या विविध मागण्यांबाबत कोणताही निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आला नसल्यानं, ही भूमिका घेतल्याचं, संघटनेनं म्हटलं आहे.
****
नागरिकांनी आपल्या पाल्यांचे शाळाप्रवेश करताना, शाळांना मान्यता असल्याची खातरजमा करून घ्यावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी केलं आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्र जारी केलं. शाळांची सरकारी मान्यता तसंच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई सोबतची संलग्नता पालकांनी तपासून घेण्याची सूचना या पत्रातून करण्यात आली आहे.
****
महिला आशिया कुस्ती स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघालनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. ५३ किलो वजनी गटाच्या काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात तिनं उज्बेकिस्तानच्या कुस्तीपटुचा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना जपानच्या अकारी फुजिनामी विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या इतर कुस्तीपटू मनिषा, रितिका आणि सोनम मलिक आज कांस्य पदकासाठी खेळणार आहेत.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जचा तीन धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघानं विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं लक्ष्य पार करताना चेन्नईचा संघ निर्धारित षटकात १७२ धावाच करु शकला.
****
हवामान
मराठवाड्यात आजपासून ते १५ एप्रिल���रम्यान अवकाळी पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत, तर उद्या जालना वगळता इतर सगळ्या जिल्ह्यांत आणि पंधरा तारखेला नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात हवामान विभागातर्फे उद्या आणि परवा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल सायंकाळी पाऊस पडला. मेघगर्जनेसह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ N चे फीचर्स लॉन्चपूर्वी लीक, 27 जून ला लॉन्च होणार
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ N चे फीचर्स लॉन्चपूर्वी लीक, 27 जून ला लॉन्च होणार
2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच तारीख: महिंद्रा अँड महिंद्रा (महिंद्रा अँड महिंद्रा) ची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पिओ आहे. Mahindra and Mahindra या SUV Scorpio चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल Scorpio N (2022 Mahindra Scorpio-N) लॉन्च करणार आहे. नवीन स्कॉर्पिओ 27 जून रोजी भारतीय बाजारपेठेत सादर होणार आहे. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एन वाहन अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह सादर केले जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
चांगली बातमी! या दिवशी लॉन्च होणार नवीन स्कॉर्पिओ, पाहा कसे असतील त्याचे फीचर्स?
चांगली बातमी! या दिवशी लॉन्च होणार नवीन स्कॉर्पिओ, पाहा कसे असतील त्याचे फीचर्स?
नवी दिल्ली. महिंद्रा प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुढील महिन्यात आपल्या लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनी पुढील महिन्यात 27 जून रोजी लॉन्च करू शकते अशी माहिती आहे. मात्र, कंपनीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. नुकताच महिंद्राने स्कॉर्पिओचा टीझर रिलीज केला. यामध्ये एसयूव्हीची थोडीशी झलक दाखवण्यात आली. टीझर सूचित करतो की 2022 स्कॉर्पिओ आउटगोइंग मॉडेलच्या तुलनेत अगदी नवीन…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
वाहन कंपन्यांचे विक्री निकाल आले, कोण वाढले आणि कोण घसरले, येथे पहा
वाहन कंपन्यांचे विक्री निकाल आले, कोण वाढले आणि कोण घसरले, येथे पहा
ऑटो कंपन्यांची विक्री: पुरवठा साखळीच्या आव्हानांमुळे उत्पादन आव्हानांना तोंड देत असलेल्या ऑटोमेकर्ससाठी एप्रिलमधील घाऊक विक्रीचे आकडे मिश्रित होते. काही वाहन कंपन्यांसाठी शेवटचा महिना विक्रीच्या दृष्टीने चांगला गेला, तर काहींनी विक्रीत घट नोंदवली. नवीन निकालांनुसार, महिंद्रा अँड महिंद्रा, रॉयल एनफिल्ड आणि अशोक लेलँड यांनी विक्रीत वाढ नोंदवली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने सांगितले की…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
Mahindra XUV900 लाँच तयार, शक्तिशाली इंजिन आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये
Mahindra XUV900 लाँच तयार, शक्तिशाली इंजिन आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये
Mahindra XUV900 SUV लाँच आणि किंमत: महिंद्राच्या XUV मालिकेची जादू जोरात बोलत आहे. XUV700 च्या यशानंतर, Mahindra & Mahindra लवकरच XUV900 या मालिकेचे नवीन वाहन लॉन्च करणार आहे. असे सांगितले जात आहे की नवीन XUV900 SUV लुक आणि फीचर्सच्या बाबतीत जबरदस्त असेल. ही कूप स्टाइल एसयूव्ही असेल. लुक व्यतिरिक्त, लक्झरी आणि सुरक्षिततेच्या बाबतीतही ते इतर वाहनांपेक्षा वेगळे असेल. डिझायनर प्रताप बोस हे या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
महिंद्रासह तुमची होळी अधिक रंगतदार बनवा, रु. 3 लाखांपर्यंत सूट मिळवा
महिंद्रासह तुमची होळी अधिक रंगतदार बनवा, रु. 3 लाखांपर्यंत सूट मिळवा
महिंद्रा होळी ऑफर: दिग्गज कार निर्माता कंपनी महिंद्रा आणि महिंद्राने आपल्या SUV वर एक उत्तम होळी ऑफर जाहीर केली आहे. M&M त्‍याच्‍या काही मॉडेलवर रु.3 लाखांपर्यंतचे फायदे देत आहे. कंपनीमध्ये XUV100, XUV300, Scorpio, Bolero, Bolero Neo, Mahindra Marazzo आणि Mahindra Alturas G4 यांचा समावेश आहे. मात्र, कंपनीच्या Mahindra XUV 700 आणि Mahindra Thar वर कोणतीही सूट नाही. महिंद्रा KUV100 NXTमहिंद्राच्या…
View On WordPress
0 notes