#मद्यधुंद
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दिल्लीतील कथीत दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातुन बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजुर करताना घातलेल्या अटीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचे नियमीत कामकाज पाहता येत नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची विमानतळावरून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटा नगर - पाटणासह सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झारखंड दौरा मुसळधार पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं रांची इथूनच आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. याचवेळी देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ६६० कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
****
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. शिंदखेडा ��ालुक्यातील वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून शिंदखेडा इथं परतत असतांना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रातील सरकार आणि राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं शेतकरी मेळावा आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं, तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. नागरीकांनी आपल्या सूचना माय जी ओ व्ही, नमो ॲप वर किंवा, एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीनं छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा त्याग आणि संघर्षाचं प्रतिक आहे. हा संघर्ष नव्या पिढीला समजण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असंही त्यांनी सांगितलं. १७ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील सोलार प���नल उभारण्यास आणि त्यातुन विजनिर्मीती करण्यास सरकार अनुदान पुरवत ��हे. ही योजना जागतिक तापमानवाढ रोखण्यास प्रभावी ठरेल असं प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद -ए -मिलाद निमित्तची सुटी कायम करण्यात आली आहे. ही सुटी १६ किंवा १८ तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीपर निर्णय घेण्यास सांगगण्यात आलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय येजना करण्यात येत अहे. यावेळी सोडत पद्धतीने क्रमांक काढून त्यानुसार मंडळांना विसर्जनासाठी वेळ देण्यात येणार आहे.
0 notes
Text
Pune Porsche Case : अल्पवयीन आरोपीचे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण; कोर्टाच्या आदेशानुसार RTO मध्ये 15 दिवसांचे प्रशिक्षण
एमपीसी न्यूज : मद्यधुंद अवस्थेत कार चालवत (Pune Porsche Case) अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी दोन जणांना धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता अल्पवयीन आरोपीचा ड्रायव्हिंग कोर्स पुणे येथे पूर्ण झाला आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, न्यायालयाच्या आदेशानुसार, त्याला 15 दिवसांचा सुरक्षित ड्रायव्हिंग कार्यक्रम पार पाडावा लागला. आरटीओच्या अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली. पुण्यातील…
0 notes
Text
मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाववेगाने रो हाउसमध्ये शिरली कार!
सायंकाळनंतर ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’ची मोहीम राबवण्याची होती मागणी! नाशिक (प्रतिनिधी) : भरधाव कार संरक्षक भिंत तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या रो हाउसमध्ये शिरल्याची घटना औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. मद्यपी चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही घटना घडली असून, या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एका सहा वर्षीय चिमुरड्याचा समावेश आहे. जखमींवर श्रीगुरुजी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू…
View On WordPress
0 notes
Text
कुंभेफळ गावातील घटना: चालक मद्यधुंद असल्याचा आरोप
View On WordPress
0 notes
Text
Pune : बस चालकाची मद्यधुंद अवस्थेत बस चालवत 15 वाहनांना धडक
https://bharatlive.news/?p=174760 Pune : बस चालकाची मद्यधुंद अवस्थेत बस चालवत 15 वाहनांना धडक
���ुण्यात ...
0 notes
Text
'का' झाली 'आप'चे नेते अमित पालेकर यांना अटक?
Banastarim Bridge Accident: बाणस्तारी येथे झालेल्या मर्सडीज अपघात प्रकरणात क्राईम ब्रँचने गुरूवारी आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांना अटक केली. या अपघातातील मर्सडीज परेश सावर्डेकर चालवत होता. त्याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत तिघांचा बळी घेतला होता. तथापि, त्याचा बचाव करण्यासाठी अमित पालेकर यांनी एका बनावट चालकाला तयार केले आणि त्याला म्हार्दोळ पोलिस स्थानकात नेले होते, असे तपासात आढळून…
View On WordPress
0 notes
Text
' कबाब व्यवस्थित नव्हता ' , उच्चभ्रू मद्यधुंद तरुणांकडून आचाऱ्याची हत्या
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली इथे समोर आलेले असून ‘ कबाब व्यवस्थित नव्हता ‘ म्हणून वाद झाल्यानंतर काही मद्यधुंद तरुणांनी चक्क आचारी असलेल्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली आहे . बरेली शहरात ही घटना समोर आलेली असून अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बरेली शहरातील प्रेमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील प्रियदर्शनी नगर इथे बुधवारी रात्री ही…
View On WordPress
0 notes
Text
' कबाब व्यवस्थित नव्हता ' , उच्चभ्रू मद्यधुंद तरुणांकडून आचाऱ्याची हत्या
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली इथे समोर आलेले असून ‘ कबाब व्यवस्थित नव्हता ‘ म्हणून वाद झाल्यानंतर काही मद्यधुंद तरुणांनी चक्क आचारी असलेल्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली आहे . बरेली शहरात ही घटना समोर आलेली असून अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बरेली शहरातील प्रेमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील प्रियदर्शनी नगर इथे बुधवारी रात्री ही…
View On WordPress
0 notes
Video
youtube
नाशिक रोड गायखे कॉलनीत मद्यधुंद तरुणांची अंधाधुंद दगडफेक..
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर ५० हून अधिक प्रवासी जखमी.
जालना जिल्ह्यात उपोषणकर्त्या ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईला चर्चेसाठी जाणार.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सक्षम काढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील.
आणि
त्यागाची शिकवण देणारा बकरी ईदचा सण सर्वत्र भक्तिभावानं साजरा.
****
पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वे अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ५० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी नऊ प्रवासी गंभीर जखमी असल्याचं, वृत्त आहे. रंगापानी रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी कंचनजंगा जलदगती रेल्वेला मालगाडीने पाठीमागून धडक दिल्याने, कंचनजंगा एक्सप्रेसचे काही डबे रुळावरुन घसरून हा अपघात झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर ईशान्येकडे जाणाऱ्या मार्गावरच्या अनेक रेल्वेगाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
नागपूर शहरात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालक युवकाने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले असून यात २ महिलांचा मृत्यू झाला तर इतर ७ जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी पोलीसांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सहा युवकांना ताब्यात घेतलं, त्यावेळी हे सर्व जण मद्याच्या अंमलाखाली असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
****
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचं, सांगत मिड डे या इंग्रजी वृतपत्राने माफी मागितली आहे. ही बातमी सामाजिक माध्यमांवर सामायिक करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली आहे. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, याच मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह प्रवेश केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार विलास पोतनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी केली होती, त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीसाठी, जालना जिल्ह्यात वडीगोद्री इथं उपोषणकर्त्या आंदोलकांच्यावतीनं आज सायंकाळी पाच सदस्यीय शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. सरकार या शिष्टमंडळाशी त्यांच्या मागण्याबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज सकाळी या आंदोलकांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं, अशी मागणी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.
****
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे इथं राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत आज घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वि��िध योजनांतर्गत बँकांना अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत शासन आग्रही आणि सकारात्मक आहे, अशी माहीती वळसे पाटील यांनी दिली.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये काम करत असलेल्या महाराष्ट्र आणि मुख्य कार्यालयातल्या ६१ कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्याची, मागणी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत बोलत होते. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते यांची बदली करण्यात यावी, तसंच नव्याने दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
`येत्या २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी जगभरात मोठ्या उत्साहात सुरु आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भद्रासनाची माहिती देणारी एक चित्रफित सामाजिक माध्यमांवर सामायिक केली आहे. भद्रासनाचा सराव केल्याने सांधे मजबूत होतात, गुडघेदुखी कमी होते, पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे आसन उपयुक्त असून, याचा सर्वांनी सराव करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १११व्या भागात या महिन्याच्या अखेरच्या रविवारी, येत्या ३० जूनला देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
****
१८व्या 'मिफ' अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. प्रतिष्ठेच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेल्या काही वर्षांत निवडल्या गेलेल्या काही निवडक चित्रपटांसोबत रशिया, इराण, इटली इत्यादी देशांचे, तसंच भारतीय लघुपट, माहितीपट आणि ऍनिमेशनपट आज दाखवण्यात येत आहेत. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झालेल्या 'गुमनाम दिन' या माहितीपटाच्या दिग्दर्शक एकता मित्तल यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला. रोजगाराच्या शोधात बंगळुरूमध्ये आलेल्या स्थलांतरित मजुरांची कहाणी या माहितीपटात मांडली आहे. या माहितीपटाची प्रक्रिया, भावनिक गुंतवणूक आणि या प्रक्रियेने दिलेले धडे एकता मित्तल यांनी उलगडून सांगितले.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त येत्या २६ जून ते २९ जून दरम्यान जळगाव इथं पहिलं शिवचरित्र साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘शककर्ते शिवराय’ या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक विजयराव देशमुख यांची निवड झाली आहे. आज नागपूर इथं संमेलनाचे निमंत्रक प्राचार्य लक्ष्मणराव देशमुख आणि नियंत्रक रवींद्र पाटील यांनी माहीती दिली. जळगाव इथल्या नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. छत्रपतींच्या वंशजांच�� या संमेलनाला प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
****
बकरी ईदचा सण आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं नमाज पठणासह इतर कुर्बानी आणि इतर धार्मिक विधी पार पडले. छत्रपती संभाजीनगर इथं महापालिकेनं तीन ठिकाणी केलेल्या तात्पुरत्या कत्तलखान्यात आज म्हैस तसंच बकरीवर्गीय सुमारे शंभर जनावरांची कुर्बानी देण्यात आल्याचं, महापालिकेकडून जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
लातूर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बकरी ईद पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. लातूर शहरातील ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. त्यानंतर जगभरात शांततेसाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. लातूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित काँग्रेस खासदार डॉ.शिवाजी काळगे, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासहित अनेक मान्यवरांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून ईदच्या शुभेच्छा दिल्या.
****
जालना शहरासह जिल्ह्यात बकरी ईद पारंपरिक पध्दतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरातल्या कदीम ईदगाह मैदानावर मुस्लीम समाज बांधवांनी सामुहिक नमाज अदा करून विशेष प्रार्थना केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ज्ञानराधा मल्टिस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक संजय कुटे आणि इतर पाच जणांविरुध्द जालना जिल्ह्यातल्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अंबड शहर आणि तालुक्यातल्या सुमारे १२५ ठेवीदारांची सुमारे ७० ते ८० कोटी रुपये मुदतठेव ज्ञानराधा मल्टिस्टेट बँकनं परत न देता फसवणूक केल्याची तक्रार व्यावसायिक लक्ष्मण सावंत यांनी केली, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या बँकेतल्या संबंधित ठेवीदारांनी आपल्या कागदपत्रांसह जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करण्याचं आवाहन पोलीस प्रशासनानं केलं आहे.
****
लातूर पोलिसांनी अवैध पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसं आणि मॅगझीन जप्त करण्यात आलं. महेश दिनकर कुलकर्णी असं या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी औसा तालुक्यात भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून सध्या तो जामिनावर त्याच्या मूळ गावी आला असता, त्याच्याकडे पिस्तुल आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
जालना पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या १०२ आणि चालक पदाच्या २३ जागांसाठी परवा १९ जूनपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी सहा हजार ९७८ अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी होणार असून, यात उत्तीर्ण उमेदवारच लेखी परीक्षेस पात्र असतील. उमेदवारांनी कुठल्याही अमिषाला बळी पडू नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
ट्रॅक्टरवरील ताबा सुटला; नियंत्रण मिळविताना खाली पडल्याने मृत्यू
भंडारा : मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाचा भरधाव असलेल्या ट्रॅक्टरवरून ताबा सुटला. यामुळे झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथे घडली आहे. खेडचंद शेडमाके असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे.अपघाताची माहिती मिळताच काही लोकांनी खेडचांद शेडमाके यांना ग्रामीण��रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती…
View On WordPress
0 notes
Text
एखादा गुन्हा करणं आणि तो करून पळून जाणं हे गुन्हा करण्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. मुळात गुन्हा करणं हिच चुकीची बाब आहे. मात्र लोकशाही स्वीकारलेल्या आपल्या देशात कायद्यांच्या कचाट्यातून पळून बिनधास्तपणे समाजात वावरणारे अनेक ठग आपण बघत असतो.
गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान हे नाव चर्चेत आले आहे, त्याने केलेल्या पराक्रमुळे आता त्याच्या वडिलांना म्हणजे शाहरुख खानला तोंड लपवण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी आर्यनला पकडले त्याच रात्री आपला सल्लू भाई शाहरुखला भेटायला गेला बहुदा कोणता वकील कर हे सांगण्यासाठी गेला असावा. दोघांच्या भेटीवरून अनेक चर्चांना उधाण आले सोशल मीडियावर जोक्स फिरू लागले होते.
याच ऑक्टोबर महिन्यातील ४ तारखेला एका कॉन्स्टेबलचे निधन झाले होते. रवींद्र पाटील असं त्यांचं नाव, हेच रवींद्र पाटील सल्लू भाईच्या ‘त्या’ केसचे एकमेव साक्षीदार, ज्यांनी अखेरपर्यंत आपली साक्ष बदलली नाही. नेमकी काय घटना आहे चला जाणून घेऊयात…
ती घटना २००२ सालातली सलमान खानला अंडरवर्ल्डमधून धमक्या येत होत्या म्हणून संरक्षणासाठी एका हेड कॉन्स्टेबलची नेमणूक करण्यात आली. ते कॉन्स्टेबल दुसरे तिसरे कोण नसून रवींद्र पाटील होते. मूळचे धुळ्याचे असलेले रवींद्र १९९८ पासून पोलीस सेवेमध्ये दाखल झाले होते.
२८ सप्टेंबरची ती काळी रात्र, त्या रात्री सलमान आपल्या एका मित्रासोबत लँड क्रुझर गाडीने वांद्रे परिसरातील एका बारमध्ये गेला. त्यांच्यासोबत रवींद्र पाटील देखील होते मात्र त्यांना बारच्या बाहेर थांबायला सांगितले. तिथून बाहेर पडून ते तिघे दुसऱ्या बारमध्ये गेले, गाडी सलमानच चालवत होता. रात्री २च्या सुमारास ते दोघे बाहेर पडले.
सलमान मद्यधुंद होता तरीदेखील त्याने पुन्हा गाडी चालवली, रवींद्र पाटील यांनी त्याला गाडी न चालवण्याचा सल्ला दिला, मात्र नशेत असलेल्या सलमानने त्याला नकार दिला. सलमानने इतकी दारू प्यायली होती की त्याला रस्त्यावरचे वळण दिसले नाही आणि भरधाव वेगात असलेली गाडी थेट एका बेकरीत घुसली, त्याच बेकरीच्या ��ुटपाथवर असलेल्या काही मजुरांच्या अंगावरून ती गाडी गेली ज्यात एकाच मृत्यू झाला तर बाकीचे जखमी झाले.
सलमान आणि त्याच्या मित्राने शिताफीने तिथून पळ काढला, मात्र कर्तव्यदक्ष अधिकारी असलेले रवींद्र मात्र तिथेच उपस्थित होते. त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सलमान विरोधात FIR दाखल केली आणि घडलेल्या प्रकाराची रितसर माहिती दिली.
कोर्टाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले तसेच नोकरीवर गैरहजर राहिल्याने त्यांना नोकरीवरून काढण्यात आले. पोलिसांचा ससेमिरा त्यांचा पाठी होताच त्यातच ते गायब झाले. त्याच्या कुटुंबावर देखील दबाव टाकण्यात आला होता, अखेर पोलिसांनी त्यांना महाबळेश्वर येथे पकडून तुरुंगात टाकले. तुरुंगात त्यांचे हाल केले गेले असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
तुरुंगातून बाहेर आल्यावर ते भीक मागताना देखील आढळून आले होते. एकाकी पडलेल्या रवींद्र पाटीलांनी शेवटी दारूचा आधार घेतला, नंतर ते दारूच्या इतक्या अधिन झाले की त्यांना टीबी झाला आणि ते शिवडीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि तिकडचे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकूणच सलमानच्या या केसमध्ये अनेक तर्कवितर्क लावले गेले, एका कोर्टातून दुसऱ्या कोर्टात ही केस फिरत राहिली जी आजतगायत फिरते आहे. ‘सलमान आपल्या ट्रस्टमधून गरिबांची मदत करतो,ऑपरेशन करतो’, असे युक्तिवाद सलमानबद्दल सहानभूती मिळावी म्हणून वकिलाने केले.
ज्या खात्यात रवींद्र पाटील होते तिकडच्या लोकांनी देखील रवींद्र पाटीलांना मदत केली नाही उलट त्यांनी साक्ष फिरवावी यासाठी दबाव टाकण्यात येत होता प्रसंगी लाच सुद्धा ऑफर केली होती, मात्र शेवटच्या श्वासापर्यंत रवींद्र पाटील ठाम होते.
0 notes
Text
मद्यधुंद अवस्थेत ' ती ' बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
मद्यधुंद अवस्थेत ‘ ती ‘ बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका महिलेने एसटी बसमध्ये जोरदार धिंगाणा घातलेला असून हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे उघडकीला आलेला आहे. रात्रीच्या वेळी बसमधून प्रवास करताना या महिलेने बसच्या वाहकाला आणि चालकाला जबरदस्त शिवीगाळ केली त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले मात्र तरीदेखील तिने पोलिसांना देखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी तिला प्रश्न विचारले त्यावेळी तिने…
View On WordPress
0 notes
Text
मद्यधुंद अवस्थेत ' ती ' बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
मद्यधुंद अवस्थेत ‘ ती ‘ बसमध्ये आली अन चालकापासून वाहकापर्यन्त सगळ्यांची..
दारूच्या नशेत धुंद झालेल्या एका महिलेने एसटी बसमध्ये जोरदार धिंगाणा घातलेला असून हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे उघडकीला आलेला आहे. रात्रीच्या वेळी बसमधून प्रवास करताना या महिलेने बसच्या वाहकाला आणि चालकाला जबरदस्त शिवीगाळ केली त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले मात्र तरीदेखील तिने पोलिसांना देखील अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांनी तिला प्रश्न विचारले त्यावेळी तिने…
View On WordPress
0 notes
Text
कोल्हापूर : मद्यधुंद कारचालकाने ९ वाहनांना चिरडले; एक ठार; नऊ जखमी
https://bharatlive.news/?p=171158 कोल्हापूर : मद्यधुंद कारचालकाने ९ वाहनांना चिरडले; एक ठार; नऊ ...
0 notes