Tumgik
#भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया
darshaknews · 2 years
Text
कुस्तीपटू दीपक पुनियाने किरगिझस्तानमध्ये तिरंगा फडकावला, सत्यबल्डीला हरवून कांस्यपदक जिंकले
कुस्तीपटू दीपक पुनियाने किरगिझस्तानमध्ये तिरंगा फडकावला, सत्यबल्डीला हरवून कांस्यपदक जिंकले
भारतीय कुस्तीपटू दीपक पुनिया U19 आशियाई कुस्ती स्पर्धा 2022: भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाने किर्गिस्तानमध्ये सुरू असलेल्या 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी तिरंगा फडकवला. टोकियो ऑलिंपियन दीपक पुनियाने किर्गिझस्तानमधील 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये 86 किलो फ्रीस्टाइल वजन गटात मक्सत सत्याबेल्डीला पराभूत…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 8 लाइव्ह अपडेट्स: पॅरा टेबल टेनिस फायनलमध्ये भाविनाबेन पटेल, बजरंग पुनिया, दीपक पुनिया क्वार्टरमध्ये पोहोचले | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 8 लाइव्ह अपडेट्स: पॅरा टेबल टेनिस फायनलमध्ये भाविनाबेन पटेल, बजरंग पुनिया, दीपक पुनिया क्वार्टरमध्ये पोहोचले | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022 Live: मनिका बत्रा आणि साथियान ज्ञानसेकरन अंतिम आठमध्ये पोहोचले.© एएफपी CWG 2022 दिवस 8 लाइव्ह अपडेट्स: भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात नौरूच्या लोव बिंगहॅमचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपक पुनियानेही पुरुषांच्या फ्री स्टाईल 86 किलो कुस्तीमध्ये आपली चढाई जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भाविनाबेन पटेलने महिला एकेरीच्या पॅरा टेबल टेनिस वर्ग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 September 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक –२८ सप्टेंबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात; १६ मतदारसंघात १७ अर्ज दाखल  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा शरद पवार यांचा निर्णय रद्द  औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी आणि  कुस्तीपटू दीपक पुनिया जागतिक क्रमवारीत अव्वल **** विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास काल सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी राज्यात १६ मतदारसंघात १६ उमेदवारांनी १७ नामनिर्देशनपत्र दाखल केल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथं आर्यन राजे शिंदे यांनी अपक्ष तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात विशाल नांदरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीनं आणि कन्नड मतदारसंघातून एकानं उमेदवारी अर्ज भरला. नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन विधानसभा मतदार संघातून प्रत्येक एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जालना, हिंगोली, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात अर्जांचं वितरण झालं, मात्र एकही अर्ज दाखल झाला नसल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. **** ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलिमिन - एमआयएम पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी काल आणखी तीन उमेदवार घोषित केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघासतून डॉ. गफार कादरी, औरंगाबाद मध्यमधून नासेर सिद्दीकी आणि औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून अरुण बोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** शिवसेना भाजप युतीतल्या जागा वाटपास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीस शिवसेनेते प्रमुख नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार असल्याचं पक्षानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत दिलेल्या कार्यकर्त्यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आलं आहे. **** शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं आणि मित्रपक्षांशी जागा वाटपाची लवकर चर्चा करावी, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. काल जारी केलेल्या एका पत्रात, आठवले यांनी, रिपाईला किमान दहा ते नऊ जागा मिळायला हव्यात, तसंच आगामी महायुतीच्या सरकारमधे एक कॅबिनेट तसंच एक राज्यमंत्री पद, तीन महामंडळाची अध्यक्षपदं, एक विधान परिषद सदस्यत्व मिळायला हवीत, अशी मागणी केली आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. विधानसभा निवडणुकीला महिनाभरापेक्षा कमी काळ बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अजित पवार यांनी राजीनामा देण्याचं कारण माहिती नसून, त्यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानं अजित पवार अस्वस्थ झाल्याचं त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी आपल्याला सांगितलं, असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक आपण लढवणार नसल्याचं, शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, सुनील माने यांची नावं चर्चेत असून, अद्याप कोणाचंही नाव निश्चित झालं नसल्याचं, पवार यांनी सांगितलं. **** राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयात जाण्याचा निर्णय काल ऐनवेळी रद्द केला. तत्पूर्वी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांची भेट घेऊन, ईडीच्या कार्यालयात आपण जाऊ नये अशी विनंती केली. आयुक्तांच्या विनंतीनुसार, कायदा आणि सुव्यस्था कायम राहण्यासाठी, आणि जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचं ते म्हणाले. कार्यालयात येण्याची गरज नाही, असं पत्रही ईडीनं पाठवलं असल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेनेनं पाठिंबा दर्शवल्याबद्दल पवार यांनी त्यांचे आभार मानले. **** विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकार, शरद पवार यांच्याविरुद्ध सूडभावनेनं कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. हे सरकार संधीसाधू राजकारण करत असून, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तिथल्या विरोधी पक्ष नेत्यांविरुद्ध गुन्हे नोंदवले जात असल्याची टीका त्यांनी केली. **** विरोधकांचा आवाज दाब��्यासाठी भाजपा अन्य मार्गांचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. राजकीय सूडबुद्धीच्या या मानसिकतेचा काँग्रेसनं नेहमीच निषेध केला आहे, स्वतःहून ईडीसमोर जाण्याची शरद पवार यांची भूमिका स्वागतार्ह असल्याचं, चव्हाण यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. **** सक्तवसुली संचालनालयाची कारवाई या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकीय सहानभुती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. कायदेशीर मुद्यावर विरोध असेल, तर त्यांनी न्यायालयात जावं, ईडीच्या कार्यालयात जाऊन काय साध्य होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्य सहकारी बँकेतल्या घोटाळ्याची चौकशी, पहिल्यांदा काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळातच सुरु झाली होती. तेव्हा भारतीय रिजर्व्ह बँकेनं या बँकेवर प्रशासक नेमला होता, असं पाटील यांनी सांगितलं. शंभर कोटी रुपयांपेक्षा मोठा घोटाळा असल्यानं सक्तवसुली संचालनालयानं स्वतः या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, याकडे लक्ष वेधताना, राज्य सरकार सूड भावनेनं काम करत नाही, असं त्यांनी नमूद केलं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका वंचित बहुजन विकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजा मणियार यांनी केली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष सुर्यवंशी तसंच डॉ. अरविंद भातांब्रे यांनी काल लातूर इथं आघाडीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, त्यावेळी ते बोलत होते. **** सोयाबीन, कापूस, तूर आणि हरभऱ्याला भाव मिळत नसतांना सरकार मात्र गप्प बसलं असल्याची टीका लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केला आहे. लातूर इथं काल कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात लोककल्याणकारी कार्य केलेल्या पूर्वीच्या महाआघाडी सरकारला पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेत आणण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला असल्याचं देशमुख यावेळी म्हणाले. **** सत्तेचाळीसाव्या केंद्रीय स्वीकृती आणि निरीक्षण समितीनं ���ंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ लाख ३३ हजार घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. राज्य सरकारांतर्फे आलेल्या ६३० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यासाठी ४ हजार ९८८ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी केंद्र सरकार १ हजार ८०५ कोटींची मदत राज्यांना देणार आहे. एकूण १ कोटी १२ लाख घरांची मागणी असुन त्यापैकी शहरी भागात आतापर्यंत ९० लाख घरांच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली आहे. **** औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी एक ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. पूर्वी नोंदणी केली असली तरी ती यादी न्यायालयाच्या आदेशान्वये रद्द करण्यात आल्यामुळे सर्व पदवीधरांनी पुन्हा नोंदणी करणे आवश्यक असल्याचं परभणीचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी सांगितलं. ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते. **** विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसताना नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत सहा ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गर्दी जमवणं आणि राजकीय सभा घेण्याच्या कारणावरून बागलाण, कळवण, निफाड, नाशिक आणि मालेगाव याठिकाणी आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. **** धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी इथं ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या रासायनिक कारखान्यातल्या भीषण स्फोट प्रकरणी काल पोलिसांनी कारखाना मालकासह तिघांना अटक केली. या स्फोटात १४ जण ठार तर ६५ जण जखमी झाले होते. या स्फोट प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** नेपाळमधल्या काठमांडू इथं सुरु असलेल्या १८ वर्षांखालील सैफ फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघानं मालदीवचा चार - शून्य असा पराभव केला. उद्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतासमोर बांग्लादेशचं आव्हान असेल. **** जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता दीपक पुनिया, जागतिक क्रमवारीत ८६ किलो फ्री स्टाईल वजनी गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर बजरंग पुनियानं ६५ किलो फ्री स्टाईल वजनी गटात दुसरं स्थान पटकावलं आहे. पुरुषांच्या ५७ किलो फ्री स्टाईल वजनी गटात महाराष्ट्राचा राहुल आवारे दुसऱ्या क्रमांकावर, तर रवि दहिया पाचव्या क्रमांकावर आहे. महिलांमध्ये कुस्तीच्या जागतिक क्रमवारीत विनेश फोगाट दुसऱ्या, सीमा बिस्ला तिसऱ्या, तर पुजा ढांडा पाचव्या क्रमांकावर आहे. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 August 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक - १८ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि. ****  नागरिकांचे आरोग्यासंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध -राष्ट्रपतींचं प्रतिपादन  देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायद्याची युवासेना नेते आदित्य ठाकरे यांची मागणी  दूरदर्शनच्या वरिष्ठ वृत्तनिवेदक नीलम शर्मा यांचं निधन आणि  मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला नांदेड इथं प्रारंभ **** आयुष्यमान भारत आणि इतर योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. ते काल वर्ध्यात सेवाग्राम इथं महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात बोलत होते. महात्मा गांधीजींच्या जीवनातून नीतिमूल्य, करुणा, तसंच पददलितांची सेवा आणि सन्मान करण्याची तत्वं अंगीकारण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना केलं. तत्पूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी सेवाग्राममध्ये बापूकुटीला भेट देऊन आदरांजली वाहिली. राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आश्रमातल्या खादी प्रकल्पाला राष्ट्रपतींनी भेट दिली, तसंच आश्रम परिसरात वृक्षारोपणही केलं. दरम्यान काल सायंकाळी राष्ट्रपतींनी मुंबईत राजभवन परिसरात उभारलेल्या ‘जल किरण’ अतिथीगृहाचं उद्घाटन तसंच ऐतिहासिक तोफांसमोर कोनशिलेचे अनावरण केलं. आज राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातल्या भूमिगत बंकर संग्रहालयाचं उद्घाटन, तसंच ‘जल भूषण’ या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी पायाभरणी होणार आहे. **** संविधान कर्त्यांनी सामान्य माणसावर विश्वास दाखवल्यामुळे गेल्या ७३ वर्षांत भारत एक सशक्त लोकशाही बनू शकला असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. प्रसाद यांच्या हस्ते काल नागपूर इथं राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. न्यायमूर्ती शरद बोबडे यावेळी उपस्थित होते, देशातली ८० टक्के जनता मोफत न्यायिक सल्ल्याला पात्र असूनही, फार कमी लोक न्यायिक मदत मागतात. या बाबतीत अजून जागृती होण्याची गरज, न्यायमूर्ती बोबडे यांनी व्यक्त केली. **** समाजमाध्यमं अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी पुरक असल्याचं मत मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत पहिल्या मराठी सोशल मिडिया संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी काल ते बोलत होते. माहिती आणि ज्ञानाचं विकेंद्रकरण करण्यात या माध्यमानं महत्वाची भूमिका बजावली आहे. तसंच या माध्यमांमुळे जगभरातले मराठी बांधव एका व्यासपीठावर आले आहेत, त्यांची मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे असंही तावडे यावेळी म्हणाले. **** कोल्हापूर आणि सांगली इथल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मदतीची तीन वाहनं पाठवली आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्न तसंच औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ही वाहनं पूरग्रस्त भागांकडे रवाना झाली. दरम्यान, सांगली जिल्ह्यात स्वच्छतेच्या कामाची गती वाढवण्याचे निर्देश पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले. पुराचं पाणी आलेल्या भागातल्या पूररेषा खूणेची कामं त्वरित करण्याच्या सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुरामुळे बाधित झालेल्या घरांचं संरचनात्मक परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी अभियंत्यांची पथकं तयार करण्यात आली असून, नेमून दिलेल्या ��ागातल्या घरांचं परीक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिऱ्यांनी दिल्या. **** सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाचा तपशीलही हळूहळू समोर येत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात सुमारे ११२ रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या ४३३, तर हरिपूर या एकाच गावात २५० घरांची मोठी पडझड झाली तर, सुमारे तीन हजार घरांचं अंशतः नुकसान झालं आहे. हळदीच्या साठवणुकीसाठी वापरली जाणारी जमिनीतली १०० पेवं पाण्यात बुडाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** कोल्हापूर जिल्ह्यातल्या ३१० गावांच्या स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी २ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पुरामुळे बंद असलेली मिरज - मुंबई मार्गावरची रेल्वे वाहतूक कालपासून सुरू झाली. महालक्ष्मी, सह्याद्री, आणि कोयना एक्सप्रेस गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. **** देशभरात प्लास्टिक बंदीसाठी कायदा करावा, अशी मागणी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी प्लास्टिकमुक्तीचं आवाहन केलं होतं, त्याबद्दल ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानत, प्लास्टिकचं उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी आणण्याची मागणी केली. महाराष्ट्रासह वीस राज्यांनी प्लास्टिक बंदी लागू केली आहे, याकडेही आदित्य यांनी लक्ष वेधलं. एकदाच वापरण्यायोग्य प्लास्टिकवर बंदीमुळे, कापडी पिशव्यांसारख्या पर्यायी वस्तू बनवणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. **** जम्मू आणि काश्मीरमधे राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ भारतीय सैन्याच्या चौक्या आणि नागरी भागात गोळीबार करत, पाकिस्ताननं काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यात एक सैनिक हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे. भारतीय सैन्यानं या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं, यात पाकिस्तानच्या काही चौक्या उध्वस्त झाल्या तर काही सैनिक ठार झाल्याचं वृत्त आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे. **** दूरदर्शनच्या वरिष्ठ वृत्तनिवेदक नीलम शर्मा यांचं काल निधन झालं. त्या ५० वर्षांच्या होत्या. दूरदर्शनमध्ये गेली २५ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदक तसंच सूत्रसंचालक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. तेजस्वीनी, बडीचर्चा यासारखे त्यांचे कार्यक्रम गाजले. केंद्र सरकारच्या नारी शक्ती पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **** कोल्हापूरमधून पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा काल रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे इथं समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. यात दोन तरुणी आणि एका तरुणाचा समावेश आहे. मूळचे कर्नाटकातल्या हुबळीचे रहिवासी असलेले हे तिघे कोल्हापूरमध्ये कसबा बावडा इथं राहत होते. त्यांच्या सोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे. **** अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर जीप आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. काल सकाळी हा अपघात झाला, अपघातात मयत झालेले दोघे जालन्याचे रहिवासी होते. **** पैठण इथं काल एक शाळकरी मुलगा गोदावरी नदीत वाहून गेला. जायकवाडी धरणातून सध्या नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. हे पाणी पाहण्यासाठी गेलेली दोन मुलं पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता, एक जण वाहून गेला, तर दुसऱ्याला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं. **** हिंगोली इथल्या कयाधू शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश वसेकर यांचं काल निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. काल सायंकाळी हिंगोली इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. **** भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना पक्षात प्रवेश देणं योग्य नसल्याचं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. काल एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना, त्यांनी हे मत नोंदवलं. पक्षानं उमेदवारी दिल्यास, मुक्ताईनगर मतदार संघातूच विधानसभेची निवडणूक लढवू, असं खडसे यांनी नमूद केलं. **** राष्ट्रीय मराठा पार्टीनं राज्य विधानसभेच्या सर्व दोनशे ८८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते ललित अहिरे पाटील यांनी काल याबाबत पत्रक जारी केलं. मराठा क्रांती मोर्चामध्ये बलिदान दिलेल्या दिवंगत कार्यकर्त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना, निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं, या पत्रकात म्हटलं आहे. **** नागरिकांचे प्रश्न शासनापर्यंत पोहचवण्यात आणि समाज प्रबोधानात माध्यमाचं योगदान महत्त्वाचं आहे, असं राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी म्हटलं आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला काल नांदेड इथं प्रारंभ झाला, या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून खोतकर बोलत होते. मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन झालं. माध्यमांनी वार्तांकन करतांना सत्यता पडताळून लिखाण करण्याचं आवाहनही खोतकर यांनी केलं. पी साईनाथ यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणातून पीक विमा योजनांचा खासगी कंपन्या आणि बँकांनाच फायदा होतो, असं मत व्यक्त केलं. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे. **** मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद चपळगावकर यांना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात येणार आहे. औरंगाबाद इथं परिषदेच्या डॉ.ना.गो. नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. **** नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे माजी नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते गोविंद कोकुलवार यांच्यावर काल सायंकाळी दोन अज्ञात इसमानी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोकुलवार यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करून त्यांना मुंबईला हलवण्यात आलं आहे. **** बीड तालुक्यात, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामं तसंच रस्ते सुधारणा कामांना रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. **** दिव्यांग ॲथलीट दीपा मलिक आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांना सर्वोच्च क्रीडा सन्मान - राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे. निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड केली, यात क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांचा समावेश आहे. ***** ***
0 notes