#बिहार क्रिकेट बोर्ड
Explore tagged Tumblr posts
countryinsidenews · 2 months ago
Text
बिहार के खिलाड़ी भी आईपीएल मैच खेलेंगे- सम्राट चौधरी
आज उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी ने बताया कि मोईनुलहक स्टेडियम, राजेन्द्र नगर, पटना के पुनर्निर्माण के लिये भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (बी.सी.सी.आई.) के द्वारा बिहार राज्य हेतु सम्बद्धता प्राप्त संस्था को दीर्घकालीन लीज पर सौपने के निमित्त MoU किये जाने हेतु मंत्रिमंडल द्वारा आज अनुमति प्रदान की गयी है । मोईनुलहक स्टेडियम, राजेन्द्र नगर, पटना, राज्य में अवस्थित एक प्रतिष्ठित स्टेडियम है। पूर्व…
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आका��वाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सरासरी ६२ टक्के मतदान-परवा मतमोजणी
घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ-सराव सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ६० धावांनी विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ७३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड ७० पूर्णांक ६६, उत्तर प्रदेश ५५ पूर्णांक ५९ , बिहार ५२, चंदीगढ सुमारे ६८, पंजाब ६१ पूर्णांक ३२, तर ओडिशामध्ये सरासरी ७० पूर्णांक ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळपासून सर्वच खासगी वृत्तवाहिन्या तसंच राजकीय समीक्षकांनी कलचाचण्यांनुसार निकालाचे अंदाज वर्तवण्यात सुरुवात केली आहे.
****
मराठवाड्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हण��न नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली. हिंगोतील लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतल्या दोन परिचारिकांचीही चौकशी झाली आहे. 
****
राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. धनगर समाजातील १० हजार मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च सरकार करणार आहे, तसंच धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बरावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी ��ेली आहे
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन काल राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून सजवण्यात आली होती. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे  विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत काल भारत आणि बांग्लादेश संघात झालेल्या सरा�� सामन्यात भारतानं बांग्लादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेलं १८३ धावांचं ��क्ष्य साधतांना, बांग्लादेशचा संघ निर्धारीत षटकांत ९ गडी बाद १२२ धावांचं करु शकला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आलं आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन रॅकेटचं जाळं वाळूज, गारखेडा, सिल्लोड, तसंच भोकरदन मधील दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या मातु:श्री सत्यवती माणिकराव कुलकर्णी यांचं काल रात्री निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतापनगर स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत काल एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
avitaknews · 4 years ago
Text
बिहार क्रिकेट लीग को लेकर छिड़ा विवाद, बीसीसीआई और बिहार क्रिकेट एसोसिएशन आमने-सामने 
विवादों से घिरे बिहार क्रिकेट एसोसिएशन (बीसीए) ने भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआई) से मंजूरी मिलने से पहले ही गैरमान्यता प्राप्त बिहार क्रिकेट लीग टी20 टूर्नामेंट के लिए नीलामी आयोजित करके नया विवाद खड़ा कर दिया। बीसीसीआई की भ्रष्टाचार निरोधक पैनल पहले ही सिफारिश कर चुकी है कि किसी राज्य टी20 लीग को हरी झंडी देने से पहले बीसीसीआई को कड़े दिशानिर्देश देने चाहि�� और बीसीए ने पूर्व में मंजूरी लिए बिना…
View On WordPress
0 notes
mrdevsu · 4 years ago
Text
बिहार क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट को BCCI ने जारी किया चेतावनी पत्र, कानूनी टीम भी भेजेगा, ये है वजह
बिहार क्रिकेट एसोसिएशन के प्रेसिडेंट को BCCI ने जारी किया चेतावनी पत्र, कानूनी टीम भी भेजेगा, ये है वजह
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने शुक्रवार को अपनी सर्वोच्च परिषद की बैठक में बिहार क्रिकेट एसोसिएशन की प्रशासनिक गतिविधियों पर गर्व करने के लिए एक कानूनी टीम भेजने का फैसला किया। साथ ही प्रेसिडेंट को भी एक चेतावनी पत्र जारी किया गया। बिहार में बीसीसीआई के आदेश के खिलाफ जाकर टी -20 टूर्नामेंट का आयोजन किया गया था। इस संबंध में बिहार क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष को एक पत्र जारी किया गया था और उन्हें…
View On WordPress
0 notes
sarkariresultgov · 3 years ago
Text
Top Current Affairs - 10 August 2021 @ SarkariResultGov.com
Tumblr media
1. With the historic win, India's men's hockey team won a bronze medal at the Tokyo Olympics 2020. It was the team's first Olympic medal in 41 years, achieved in a thrilling 5–4 win over Germany in a thrilling bronze medal match. ऐतिहासिक जीत के साथ, भारत की पुरुष हॉकी टीम ने टोक्यो ओलंपिक 2020 में कांस्य पदक जीता। यह 41 वर्षों में टीम का पहला ओलंपिक पदक था, जिसने रोमांचक कांस्य पदक मैच में जर्मनी पर 5-4 से रोमांचक जीत हासिल की। 2. America's world record holder Ryan Krueger won the men's shot put title at the Tokyo Olympics. अमेरिका के विश्व रिकॉर्ड धारक रयान क्रुएगर ने टोक्यो ओलंपिक में पुरुषों की शॉट पुट का खिताब जीता। 3. England's batsmen may have had a disappointing performance in the first innings of the first Test between India and England at Trent Bridge but team captain Joe Root scripted history to become England's highest run-scorer in international cricket. इंग्लैंड के बल्लेबाजों का ट्रेंट ब्रिज में भारत और इंग्लैंड के बीच पहले टेस्ट की पहली पारी में भले ही निराशाजनक प्रदर्शन रहा हो, लेकिन टीम के कप्तान जो रूट ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में इंग्लैंड के सबसे ज्यादा रन बनाने वाले खिलाड़ी बनने का इतिहास रच दिया। 4. Kumar Mangalam Birla has stepped down as non-executive director and non-executive chairman of the board of Vodafone Idea Ltd. कुमार मंगलम बिड़ला ने वोडाफोन आइडिया लिमिटेड के बोर्ड के गैर-कार्यकारी निदेशक और गैर-कार्यकारी अध्यक्ष के रूप में पद छोड़ दिया है। 5. The Government of India, the Central Water Commission, government representatives from the 10 participating states, and the World Bank today signed a $250 million project on the Long Term Dam Safety Program and a $250 million project to improve the safety and performance of existing dams in various states in India. भारत सरकार, केंद्रीय जल आयोग, 10 भाग लेने वाले राज्यों के सरकारी प्रतिनिधियों और विश्व बैंक ने आज दीर्घकालिक बांध सुरक्षा कार्यक्रम पर $250 मिलियन की परियोजना और विभिन्न क्षेत्रों में मौजूदा बांधों की सुरक्षा और प्रदर्शन में सुधार के लिए $250 मिलियन की परियोजना पर हस्ताक्षर किए। भारत में राज्यों। 6. Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA) signed MoU with the University of Agricultural Sciences (UAS), Bangalore to promote exports of agricultural and processed food products in particular. कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) ने विशेष रूप से कृषि और प्रसंस्कृत खाद्य उत्पादों के निर्यात को बढ़ावा देने के लिए कृषि विज्ञान विश्वविद्यालय (यूएएस), बैंगलोर के साथ समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए। 7. The Indigenous Aircraft Carrier (IAC) vessel 'Vikrant' designed by the Directorate of Naval Design (DND) of the Indian Navy is being built at Cochin Shipyard Limited (CSL), a public sector shipyard under the Port, Ministry of Shipping and Waterways (MoS). भारतीय नौसेना के नौसेना डिजाइन निदेशालय (डीएनडी) द्वारा डिजाइन किया गया स्वदेशी विमान वाहक (आईएसी) पोत 'विक्रांत' कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) में बनाया जा रहा है, जो बंदरगाह, जहाजरानी और जलमार्ग मंत्रालय के तहत एक सार्वजनिक क्षेत्र का शिपयार्ड है। एमओएस)। 8. The Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) has today launched www.cip.icegate.gov.in here www.cip.icegate.gov.in to provide free access to all customs procedures and regulatory compliance information for about 12,000 customs tariff items. /CIP on Indian Customs Compliance Information Portal (CIP) launched. केंद्रीय अप्रत्यक्ष कर और सीमा शुल्क बोर्ड (सीबीआईसी) ने आज www.cip.icegate.gov.in को यहां www.cip.icegate.gov.in लॉन्च किया है ताकि लगभग 12,000 सीमा शुल्क टैरिफ के लिए सभी सीमा शुल्क प्रक्रियाओं और नियामक अनुपालन जानकारी तक मुफ्त पहुंच प्रदान की जा सके। आइटम। / भारतीय सीमा शुल्क अनुपालन सूचना पोर्टल (सीआईपी) पर सीआईपी लॉन्च किया गया। 9. Principal Scientific Adviser to the Government of India Prof. Of. Vijay Raghavan virtualized a decentralized biomedical waste furnace at Buxar Municipality, Bihar. भारत सरकार के प्रधान वैज्ञानिक सलाहकार प्रो. के. विजय राघवन ने बक्सर नगर पालिका, बिहार में एक विकेन्द्रीकृत जैव चिकित्सा अपशिष्ट भट्टी का वर्चुअलाइजेशन किया। 10. Bharat Biotech's COVID-19 vaccine has received Good Manufacturing Practices (GMP) compliance certificate in Hungary. भारत बायोटेक के COVID-19 वैक्सीन को हंगरी में गुड मैन्युफैक्चरिंग प्रैक्टिस (GMP) अनुपालन प्रमाणपत्र मिला है। Read the full article
0 notes
everynewsnow · 4 years ago
Text
बिहार के क्रिकेटरों ने बीसीसीआई को दो साल में फीस नहीं दी है
बिहार के क्रिकेटरों ने बीसीसीआई को दो साल में फीस नहीं दी है
बिहार के 21 वर्षीय तेज गेंदबाज प्रशांत सिंह को पिछले दो सत्रों से भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) द्वारा मैच फीस का भुगतान नहीं किया गया है। उसके साथ सर्वव्यापी महामारी देश भर में उग्र, प्रशांत अपने बड़े भाई के लिए इलाज की लागत के बारे में चिंतित है कोविड -19 छपरा में घर पर सकारात्मक और अलग। उनकी मां को भी सांस लेना मुश्किल हो रहा है। अंडर -23 क्रिकेटर प्रशांत अपने परिवार में एकमात्र…
View On WordPress
0 notes
reallovee · 4 years ago
Text
BCCI की मंजूरी मिलने से पहले गैर मान्यता प्राप्त टी20 लीग के लिए BCA ने की नीलामी
BCCI की मंजूरी मिलने से पहले गैर मान्यता प्राप्त टी20 लीग के लिए BCA ने की नीलामी
यह टूर्नामेंट कार्यक्रम के अनुसार 21 से 27 मार्च के बीच पटना में होना है (File Photo) यह टूर्नामेंट कार्यक्रम के अनुसार 21 से 27 मार्च के बीच पटना में होना है, जिसमें पांच फ्रेंचाइजी टीमें अंगिका एवेंजर्स, भागलपुर बुल्स, दरभंगा डायमंड्स, गया ग्लैडिएटर्स और पटना पायलट्स भाग ले रही है. नई दिल्ली. विवादों से घिरे बिहार क्रिकेट संघ (बीसीए) ने भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआई) से मंजूरी मिलने स��� पहले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kisansatta · 4 years ago
Photo
Tumblr media
दो साल के बैन के बावजूद उत्तराखंड क्रिकेट टीम में चुना गया खिलाड़ी
Tumblr media
क्रिकेट एसोसिएशन ऑफ उत्तराखंड या तो अनजान है या जानबूझकर बीसीसीआई के आदेशों की अवहेलना की जा रही है। ताजा मामला संयम अरोड़ा का है। ओवरएज पाए जाने पर संयम अरोड़ा पर बीसीसीआई ने 2018 में दो साल के लिए प्रतिबंध लगाया था।
प्रतिबंध मार्च 2021 में समाप्त होना है। इससे पहले सीएयू के चयनकर्ता उसे चुनते हैं और टीम के साथ चेन्नई भी भेज देते हैं। हालांकि उसे बगैर मैच खिलाए वापस भेज दिया गया है। गौर करने वाली बात यह है कि वसीम जाफर ने भी उसे अपनी 22 सदस्यीय टीम में 11वें नंबर पर जगह दी थी।
उत्तराखंड को वर्ष 2018 में बीसीसीआई ने घरेलू क्रिकेट खेलने की मंजूरी दी थी। यहां चार क्रिकेट एसोसिएशन सक्रिय थीं, लिहाजा सबको अलग-अलग टीम का जिम्मा दिया गया था। सीनियर टीम सीएयू, अंडर-19 उत्तराखंड क्रिकेट एसोसिएशन, जूनियर टीम का जिम्मा उत्तरांचल क्रिकेट एसोसिएशन, जबकि महिला क्रिकेट की जिम्मेदारी यूनाइटेड क्रिकेट एसोसिएशन को दी गई थी।
अंडर-19 कूच बिहार ट्राफी में एक बल्लेबाज काफी उभर कर सामने आया था, जिसने उत्तराखंड के लिए पांच शतकों के साथ 1080 रन बनाए थे। उससे ज्यादा रन देश में सिर्फ दो ही बल्लेबाज बना पाए थे। इसी बीच संयम पर उम्र कम बताने के आरोप लगे।
तब बीसीसीआई की एक कमेटी की जांच में आरोप सही पाए गए थे। संयम पर फर्जी जन्म प्रमाणपत्र देने का मामला सिद्ध हुआ था। बोर्ड ने कड़ी कार्रवाई करते हुए संयम पर दो साल का बैन लगा दिया था। प्रतिबंध के तहत संयम अरोड़ा बोर्ड या एसोसिएशन से जुड़े जिलास्तर के मैच भी नहीं खेल सकेगा। प्रतिबंध मार्च 2021 में समाप्त होना है। ऐसे में प्रतिबंध समाप्त होने से पहले सीनियर टीम में उनका चयन हैरान करने वाला है।
  https://kisansatta.com/player-selected-in-uttarakhand-cricket-team-despite-two-year-ban/ #PlayerSelectedInUttarakhandCricketTeamDespiteTwoYearBan Player selected in Uttarakhand cricket team despite two-year ban Sport #Sport KISAN SATTA - सच का संकल्प
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला, रमेश बैस यांची नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती
बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ची स्थापना, ‘नंगारा मंडळा’ला ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
रत्नागिरी जिल्ह्यातले दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुबियांना २५ लाख रुपयांची मदत
काँग्रेसचे वरिष्ठ नाराज नेते बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा स्वीकारला नाही, काँग्रेस अध्यक्षांसोबत चर्चा करणार
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी-अमराठी भेदाच्या भिंती तोडत एकत्र येण्याची गरज - माज�� मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मत
परभणीत अकराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला सुरुवात
आणि
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सात खेळाडू राखून विजय
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्याजागी नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. बैस हे याआधी झारखंडचे राज्यपाल होते. यासंदर्भात राष्ट्रपती भवनानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्रासह तेरा राज्यांच्या राज्यपालांची तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनिक यांना अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. लक्ष्मण प्रसाद आचार्य सिक्कीमचे, सी.पी. राधाकृष्णन झारखंडचे, शिव प्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशचे, गुलाब चंद कटारिया यांना आसामचे तर निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांना छत्तीसगडचे राज्यपाल, छत्तीसगडचे राज्यपाल अनुसुईया उईके यांना मणिपूर, मणिपूरचे राज्यपाल ला. गणेशन यांना नागालँण्ड, तर बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांना मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांना बिहार, तर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर डॉ. बी.डी. मिश्रा यांना लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. कोश्यारी यांच्यासोबत राष्ट्रपतींनी लडाखचे नायब राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचाही राजीनामा स्वीकृत केला आहे.
****
बंजारा समाजाच्या विकासासाठी वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था- ‘वनार्टी’ तसंच ‘नंगारा मंडळ’ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. नंगारा मंडळासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं. वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण, सेवाध्वजाचं आरोहण आणि ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांचं भुमिपूजन, काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले….
‘‘बंजारा बोर्ड या ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि ५० कोटी रूपये या बोर्डाला देण्याचा निर्णयदेखील घेतला आहे. ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शासन तुमच्या समाजाच्या पाठीशी उभा आहे.’’
पोहरादेवीला आल्यावर काशीला आल्यासारख वाटतं, ��सं सांगत मुख्यमंत्र्यांनी, तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर ��ाणी, रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. नवी मुंबईत बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पोहरादेवी तीर्थस्थळाचा विकासासाठी निधी कमी पडू न देण्याचं आश्वासन दिलं. राज्यातल्या बंजारा तांड्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल, बंजारा समाजातल्या मुला-मुलींचं शिक्षण थांबू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील, तसंच गोर बोलीचं संवर्धन करण्यासाठी अकादमी स्थापन करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राज्य सरकार येत्या आठ मार्च ला महिला धोरणाची घोषणा करणार असल्याची माहिती, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. त्या काल अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. या धोरणात महिलांसाठी समान नागरी कायदा, असंघटित महिलांसाठी कायदा  यासह  महिलांच्या इतर मुद्द्यांवर भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या....
‘‘जे परिघावरच्या महिला आहेत, आणि त्याच्यामध्ये कोविडमध्ये निराधार झालेल्या महिला, शेतकरी आत्महत्या आणि शेतमजुरांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्या महिला, असंघटीत क्षेत्रातल्या महिला यांच्यासाठी तसंच वेळ पडल्यास समान नागरी कायदा अशासारखे मुद्दे जे आहेत, ते महिला धोरणांमध्ये अंतर्भाव व्हावा असं मला वाटतं. त्या दृष्टीकोनातून मी प्रयत्न करणार आहे.’’
या संदर्भात महिला संस्थांनी, महिला आमदारांनी सूचना कराव्यात असं आवाहनही गोऱ्हे यांनी केलं. शिर्डीच्या साई संस्थाननं आपला निधी कोविड मुळे निराधार झालेल्या विद्यार्थी आणि विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी खर्च करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरचे दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुबियांना २५ लाख रुपयांची मदत, आणि त्यांच्या मुलाला कायम स्वरुपाची नोकरी दिली जाणार असल्याची माहिती, उद्योगमंत्री उ��य सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरीमध्ये झालेल्या रोजगार महामेळाव्यात काल त्यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपये आणि इतर माध्यमातून १५ लाख रुपये अशी मदत दिली जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.
****
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि इतर बाबींसंदर्भात नाराज असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा गटनेते पदाचा राजीनामा स्वीकारलेला नसून, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी ते चर्चा करणार असल्याची माहिती, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच के पाटील यांनी दिली. रायपूर इथं होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीलाही थोरात उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची काल मुंबईत भेट घेतली, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असून, पाटील यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण काँग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन आपल्या मुद्यांबाबत चर्चा करु, असं सांगितलं. तसंच रायपूर इथल्या कार्यकारिणीच्या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि इतर ज्येष्ठ सदस्य भेटणार असल्यांमुळे त्या बैठकीला आपण हजर राहणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं.
****
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठी-अमराठी भेदाच्या भिंती तोडत आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. काल मुंबईत शिवसेनेच्यावतीनं आयोजित उत्तर भारतीय नागरिकांशी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवण्याचं आव्हान ठाकरे यांनी दिलं. भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणावर टीका करत ते ब्रिटिशांचं तोडा-फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब करततात, आज ज्या प्रकारे ते हिंदुत्वाचं प्रचार करत आहेत ते खरं हिंदुत्व नसल्याची टिकाही ठाकरे यांनी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथल्या ऐतिहासिक शहाजीराजे भोसले स्मारक आणि मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार असल्याची ग्वाही, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. वेरुळ इथं शहाजीराजे भोसले स्मारक आणि मालोजीराजे भोसले गढीच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. या दोन्ही ठिकाणांच्या सर्वांगिण विकासासाठी कंपन्यांच्या सार्वजनिक दायित्व निधीमधून पाच कोटी रुपये देण्यात आले असून, विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर साजेसं काम होणार आहे. यामध्ये नाईट टुरिझम, आकर्षक विद्युत रोषणाई आणि पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यात येईल असं सांगून, गढीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन  डॉ. कराड यांनी दिलं.
****
औरंगाबाद इथं आयोजित अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचा काल अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. भुमिका करताना कलाकारांनी भुमिकाही घ्यायला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. संमेलनाचे अध्यक्ष प्रकाश त्रिभुवन, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड यावेळी उपस्थित होते. समारोप सत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं.
****
परभणी इथं काल अकराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते झालं. संमेलनाध्यक्ष तुकाराम महाराज गरुड ठाकूरबुवा दैठणकर यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. विज्ञानाला संत साहित्याची अम��ल जोड दिल्यास विश्वशांतीच्या मार्गाने आपण मार्गक्रमण करु, असं मत दैठणकर यांनी व्यक्त केलं. विज्ञान, अध्यात्म आणि साहित्य या तीन गोष्टी मानवाच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भुमिका बजावत असतात, असं  देखील त्यांनी नमूद केलं.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत संत साहित्याचा सर्वात मोठा वाटा असल्याचं, भुमरे यावेळी म्हणाले. स्वागताध्यक्ष डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार भरत गोगावले, सुरेश वरपुडकर यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातल्या संत जनाबाई यांचं जन्मस्थळ असलेल्या गंगाखेडला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी आमदार गुट्टे यांनी यावेळी केली.
भाऊसाहेब महाराज गोसावी आणि आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव प्रदिप व्यास यांना वारकरी विठ्ठल पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला, तसंच स्मरणीकेचंही विमोचन करण्यात आलं.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. दररोजच्या एकूण उष्मांकापैकी ७० ते ८० टक्के उष्मांक तृणधान्यापासून मिळतात. या व्यतिरिक्त तृणधान्यांमधून आपल्याला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्व "अ' आणि "ड' चांगल्या प्रमाणात मिळतात. तृणधान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. कोडो किंवा कोद्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृण धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
औरंगाबाद इथं होणाऱ्या G-20 महिला सदस्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर, शहरातल्या विविध संघटना, आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या शहर स्वच्छता अभियानाचा काल समारोप झाला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. G-20 बैठकीचं यजमानपद मिळणं हे शहरासाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा शहराला काय फायदा होणार आहे याचं विश्लेषण कराड यांनी यावेळी केलं. उद्योजक समीर काननखेडकर यांनी बनवलेल्या 'बकासुर' या स्वच्छता यंत्राचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या आभासी चलन जीडीसी कॉईन प्रकरणी पोलिसांनी आणखी दोन गाड्या जप्त केल्या असून, आतापर्यंत साडे दहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वर्ग एक च्या जमिनी वर्ग दोन मध्ये टाकण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या कारवाईस महसूल मंत्र्यांनी दिलेली स्थगिती प्रत्यक्षात अंमलात यावी, अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष सुध���र पाटील आणि धनंजय शिंगाडे यांनी केली आहे. ते काल उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. चुकीचे जमिनींचे फेर रद्द करून पुन्हा नव्याने फेर व्हावेत, अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानवर सात खेळाडू राखून विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १५० धावांचं लक्ष्य भारतीय महिलांनी एकोणिसाव्या षटकातच पूर्ण केलं. जेमिमाह रॉड्रीक्सनं ५३, ऋचा घोषनं ३१, शेफाली वर्मा ३३, तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं १६ धावा केल्या. भारतीय महिला संघाचा पुढचा सामना येत्या बुधवारी वेस्ट इंडीज सोबत होणार आहे.
अन्य एका सामन्यात श्रीलंकेनं बांग्लादेशचा सात खेळाडू आणि दहा चेंडू राखून पराभव केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मौजे मंगरूळ इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त, आठवड्यातून एक दिवस तरी आहारात तृणधान्याचा समावेश करू अशी शपथ ग्रहण केली. कृषी सहाय्यक नवनाथ आलमले यांनी विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्याची ओळख आणि आहारातील महत्व, या विषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. तृणधान्याचं आहारातील महत्त्व याचे फलक बनवून, घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
****
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या श्री तुळजाभवानी कृषी महोत्सवात, पाक कला आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. पाककला स्पर्धेमध्ये ३४ महिलांनी सहभाग घेऊन तृणधान्यापासून विविध पदार्थ बनवले. या महोत्सवात २२१ स्टॉल्स उभारण्यात आले असून, उद्या या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
औरंगाबाद जवळील हर्सुल गावाच्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरु असल्यानं, उद्यापासून १६ तारखेपर्यंत शहरातून हर्सुल मार्गे फुलंब्री- सिल्लोडकडे जाणारी वाहतूक, हर्सूल टी पॉइंट इथून आंबेडकर नगर पिसादेवी रोड मार्गे सावंगी बायपास अशी वळवण्यात आली आहे. सिल्लोड - फुलंब्रीकडून हर्सुलकडे येणारी वाहतूकही याच मार्गाने वळवण्यात आल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
बीसीसीआई के सलेक्शन ट्रायल में शामिल होंगे बेगूसराय के 11 खिलाड़ी Divya Sandesh
#Divyasandesh
बीसीसीआई के सलेक्शन ट्रायल में शामिल होंगे बेगूसराय के 11 खिलाड़ी
बेगूसराय। भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआई) द्वारा आयोजित होने वाले विजय हजारे ट्रॉफी के सिलेक्शन ट्रायल में बेगूसराय के 11 खिलाड़ी शामिल होंगे। सभी खिलाड़ी इसमें शामिल होने के लिए सोमवार को पटना रवाना हो गए। जिला क्रिकेट संघ के संयुक्त सचिव मृत्युंजय कुमार वीरेश ने बताया कि बिहार क्रिकेट संघ द्वारा मंगलवार को वैशाली के सोनपुर रेलवे मैदान और जगजीवन राम स्टेडियम पटना के मैदान पर सलेक्शन ट्रायल का आयोजन किया गया है। बीसीसीआई के द्वारा आयोजित होने वाले विजय हजारे ट्रॉफी के बिहार टीम के गठन को लेकर यह सलेक्शन ट्रायल किया जा रहा है।
इस सलेक्शन ट्रायल के लिए बेगूसराय जिला क्रिकेट संघ द्वारा 11 खिलाड़ी का चयन किया गया है, इसमें कुछ स्टेट खिलाड़ी भी शामिल है। जिसमें रोहन कुमार सिंह, शशि शेखर, कुणाल, देवास, निशित कुमार, दानिश आलम, मुरारी कुमार, अमित शर्मा, मो. इम्तियाज आलम, नीरज कुमार एवं निधि कुमार को शामिल किया गया है।  
0 notes
jainyupdates · 4 years ago
Text
अजहर अली से छीनी टेस्ट कप्तानी, पीसीबी ने बाबर को सौंपी जिम्मेदारी
अजहर अली से छीनी टेस्ट कप्तानी, पीसीबी ने बाबर को सौंपी जिम्मेदारी
स्पोर्ट्स डेस्क, अमर उजाला
Updated Wed, 11 Nov 2020 08:28 AM IST
Tumblr media
बाबर आजम – फोटो : ट्विटर
Tumblr media
बिहार चुनाव नतीजे 2020 Live Result Updates
खबरें, विश्लेषण, साक्षात्कार और विशेष वीडियो
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने न्यूजीलैंड के आगामी दौरे से पहले मंगलवार को अनुभवी खिलाड़ी अजहर अली को टेस्ट टीम की कप्तानी से हटाकर बाबर आजम को…
View On WordPress
0 notes
shaileshg · 4 years ago
Link
Tumblr media
आज दो प्रसिद्ध हस्तियों का जन्मदिन है। पहले तो लोकनायक जयप्रकाश नारायण और दूसरे हैं सदी के महानायक अमिताभ बच्चन। दोनों ने अपनी-अपनी विधा में अलग पहचान कायम की है।
जयप्रकाश नारायण यानी जेपी का जन्म 11 अक्टूबर 1902 को बिहार में सारन के सिताबदियारा में हुआ था। पटना से शुरुआती पढ़ाई के बाद अमेरिका में पढ़ाई की। 1929 में स्वदेश लौटे और स्वतंत्रता आंदोलन में सक्रिय हुए। तब वे मार्क्सवादी होते थे। सशस्त्र क्रांति से अंग���रेजों को भगाना चाहते थे। हालांकि, महात्मा गांधी और जवाहरलाल नेहरू से मिलने के बाद उनका नजरिया बदला।
नेहरू की सलाह पर कांग्रेस से जुड़े। लेकिन, आजादी के बाद वे आचार्य विनोबा भावे के सर्वोदय आंदोलन से जुड़ गए। ग्रामीण भारत में आंदोलन को आगे बढ़ाया और भूदान को सपोर्ट किया। जेपी ने 1950 के दशक में राज्य व्यवस्था की पुनर्रचना नाम से किताब लिखी। इसके बाद ही नेहरू ने मेहता आयोग बनाया और विकेंद्रीकरण पर काम किया। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि जेपी ने कभी सत्ता का मोह नहीं पाला। नेहरू चाहते थे, लेकिन कैबिनेट से जेपी दूर ही रहे।
1975 में निचली अदालत में गांधी पर चुनावों में भ्रष्टाचार का आरोप सही साबित हुआ तो जेपी ने उनसे इस्तीफा मांगा। उन्होंने इंदिरा गांधी के खिलाफ एक आंदोलन खड़ा किया, जिसे जेपी आंदोलन भी कहते हैं। उन्होंने इसे संपूर्ण क्रांति नाम दिया था। इंदिरा गांधी ने इमरजेंसी की घोषणा कर दी और जेपी के साथ ही अन्य विपक्षी नेताओं को गिरफ्तार कर लिया।
जेपी की गिरफ्तारी के खिलाफ दिल्ली के रामलीला मैदान में एक लाख से अधिक लोगों ने हुंकार भरी थी। उस समय रामधारी सिंह “दिनकर” ने कहा था “सिंहासन खाली करो कि जनता आती है। जनवरी-1977 में इमरजेंसी हटी। लोकनायक के “संपूर्ण क्रांति आंदोलन” के चलते देश में पहली बार गैर कांग्रेसी सरकार बनी। जेपी को 1999 में भारत सरकार ने भारत रत्न से सम्मानित किया।
2000 में नासा के स्पेस शटल प्रोग्राम का 100वां मिशन
इस प्रोग्राम को स्पेस ट्रांसपोर्टेशन सिस्टम या एसटीएस के तौर पर भी जाना जाता है। यह दुनिया का पहला प्रोग्राम था, जिसमें लोगों को अंतरिक्ष में ले जाने के लिए दोबारा इस्तेमाल होने वाले स्पेसक्राफ्ट शामिल किया। स्पेस शटल बेड़े की पहली फ्लाइट ने 12 अप्रैल 1981 को उड़ान भरी है। इसमें कोलंबिया, चैलेंजर, डिस्कवरी, एटलांटिस और एंडीवर शामिल थे। 100वीं फ्लाइट डिस्कवरी की थी और इस मिशन को STS-92 दिया गया था। 30वीं बार डिस्कवरी को अंतरिक्ष भेजा गया था।
इतिहास में आज का दिन इन घटनाओं के लिए भी याद किया जाता हैः
1869ः अमेरिकी नागरिक थॉमस एडीसन ने अपने पहले आविष्कार पर एक पेटेंट के लिए आवेदन किया। इस इलेक्ट्रिक मशीन का इस्तेमाल वोटों की गिनती के लिए किया ��या था।
1881ः अमेरिकी आविष्कारक डेविड हेंडरसन हॉस्टन ने कैमरों के पहले रोल फिल्म का पेटेंट कराया।
1916ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़े रहे समाज सेवी नानाजी देशमुख का जन्म।
1932ः न्यूयॉर्क में राजनीतिक अभियान के लिए पहला प्रसारण किया गया।
1939ः अमेरिकी राष्ट्रपति रूजवेल्ट ने अल्बर्ट आइंस्टीन को पत्र लिखकर अमेरिका के परमाणु कार्यक्रम को तेजी से विकसित करने का आग्रह किया।
1942ः फिल्म एक्टर अमिताभ बच्चन का जन्म।
1968ः अमेरिका का पहला मानवयुक्त ओपोलो मिशन ‘अपोलो 7’ के प्रक्षेपण का कक्षा से पहली बार टेलीविजन प्रसारण किया गया।
1984ः अमेरिकी अंतरिक्ष वैज्ञानिक कैथरीन डी सुलिवन अंतरिक्ष में सैर करने वाली पहली महिला अंतरिक्ष यात्री बनी। वह अंतरिक्ष शटल चैलेंजर पर सवार थीं।
1994ः अमेरिका में कोलोराडो सुप्रीम कोर्ट ने राज्य में समलैंगिक विरोधी अधिकारों को असंवैधानिक घोषित कर दिया।
2000ः दक्षिण अफ़्रीकी क्रिकेट बोर्ड द्वारा हैन्सी क्रोन्ये पर आजीवन प्रतिबंध।
2001ः त्रिनिदाद में जन्में भारतीय मूल के ब्रिटिश लेखक विद्याधर सूरज प्रसाद नॉयपाल को वर्ष 2001 के नोबेल साहित्य पुरस्क���र से सम्मानित करने की घोषणा।
2002ः नेपाल नरेश ज्ञानेन्द्र ने लोकेन्द्र बहादुर को प्रधानमंत्री नियुक्त किया।
2005ः तीसरे अंतरिक्ष पर्यटक ग्रेगोरी ओल्सन पृथ्वी पर लौटे।
2007ः ब्रिटेन के उपन्यासकार डोरिस लैसिंग को वर्ष 2007 के साहित्य के नोबेल पुरस्कार के लिए चुना गया।
2008ः प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने नौगांव स्टेशन से हरी झंडी दिखाकर कश्मीर की घाटी में चलने वाली पहली रेलगाड़ी को रवाना किया।
आज की ताज़ा ख़बरें पढ़ने के लिए दैनिक भास्कर ऍप डाउनलोड करें
Tumblr media
Today History for October 11th/ What Happened Today | Jaiprakash Narayan Birthday | All You Need To Know About Sampurna Kranti JP Movement | Amitabh Bachchan Birthday | 100th Mission of NASA’s Space Shuttle Program
from Dainik Bhaskar /national/news/today-history-october-11th-loknayak-jayprakash-narayan-birthday-amitabh-bachchan-birthday-127801744.html via IFTTT
0 notes
gaanaliveent · 4 years ago
Link
Tumblr media
महेंद्र सिंह धोनी के अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास लेने के फैसले ने उनके प्रशंसकों को गहरा दुख पहुंचाया और स्तब्ध कर दिया। बॉम्बे टाइम्स ने लेखक-निर्माता दिलीप झा से बात की , जिन्होंने निर्देशक नीरज पांडे के साथ उनकी बायोपिक लिखी थी । शब्दशः कैप्टन कूल के साथ अपनी बातचीत का पुनरीक्षण करता है और वह अंतरराष्ट्रीय क्रिकेट से संन्यास लेने के अपने फैसले के बारे में सोचता है। 
जब आपने सुना कि महेंद्र सिंह धोनी ने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट से संन्यास लेने की घोषणा की है, तो आपकी क्या प्रतिक्रिया थी?
मुझे बिल्कुल आश्चर्य नहीं हुआ। माही को जानने वाला कोई भी व्यक्ति आश्चर्यचकित नहीं होगा क्योंकि वह अपने काम या अपने फैसलों के बारे में शोशा को पसंद नहीं करता है। उसे शांत रहना पसंद है। मुझे आश्चर्य नहीं होगा अगर मुझे पता चला कि उसने पहले से ही अपना मन बना लिया है, और केवल दुनिया को कल के बारे में बताया। शायद, वह उस समय की प्रतीक्षा कर रहा था जब उसके निर्णय के बारे में कम से कम ब्राहा होगा। वह उस तरह का व्यक्ति है जो जो कुछ भी करता है उसका तमाशा करना पसंद नहीं करता है। उसे चुप रहना पसंद है।
जब आप कुछ साल पहले उनकी बायोपिक लिख रहे थे, तो उन्हें अपने बारे में बोलना आपके लिए एक काम रहा होगा। क्या आपको एमएस धोनी के साथ अपनी पहली बातचीत याद है ?
मैं बोर्ड पर आने वाला पहला व्यक्ति था। यह 2013 रहा होगा। जब ��ैं एमएस धोनी से मिलने उनके आवास पर गया, तो मैंने वहां आईपीएल टीम को देखा। यह उनके लिए रात के खाने के लिए एक अंतरंग था। मेरे लिए, उनके घर में उनसे मिलना एक भारी पल था। हालाँकि उसने मुझे सभी से मिलवाया, जो उसके प्रति अनुग्रह था, वह नहीं चाहता था कि हर कोई यह जाने कि मैं घर में क्यों था। उन्होंने महसूस नहीं किया कि लोगों को यह बताने का सबसे अच्छा समय था। और यह एक धारणा है जिसे मैंने उस परियोजना के साथ अपने जुड़ाव के दौरान चलाया। यह मेरे लेखन में परिलक्षित होता है। फिल्म उनके व्यक्तित्व की सादगी, उनकी परवरिश और क्यों वह जिस तरह से है, उसे सूक्ष्मता से रेखांकित करती है। इसीलिए फिल्म को एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी कहा गया। यह उस चीज़ से आगे निकल गया जिसे हर कोई देख सकता था।
आपने एक ऐसे शख्स के साथ बर्फ कैसे तोड़ी, जो अपने निजी स्थान की इतनी भयंकर सुरक्षा करता है।
एमएस धोनी उस तरह के व्यक्ति हैं जो साथ खेलेंगे अगर उन्हें पता चलता है कि कोई उन्हें कमरे में नहीं पहचानता है। वह खुश है और वह इसे प्यार करता है। वह पूरी तरह से सहज है। किआरा आडवाणी और सुशांत सिंह राजपूत केबीच एक स���क्वेंस है फिल्म में जहां वह माही को नहीं पहचानती। यह सच है; यह वास्तविक है। MSD को यह सब अच्छा लगता है। यह उनकी संवेदना का प्रतिबिंब है। वह केवल किसी को अपने व्यक्तिगत स्थान में जाने की अनुमति देता है और अपने मन को पढ़ने के लिए अगर वह आश्वस्त हो कि व्यक्ति ईमानदारी के स्थान से आता है। मैंने हमेशा उन्हें बताया कि उनकी जीवन कहानी की सुंदरता वास्तव में यह है। मैंने उससे कहा था कि हम कुछ भी नाटक नहीं करेंगे, इसमें कल्पना नहीं जोड़ेंगे और हमने ऐसा नहीं किया। यह जिस तरह से सुंदर था। लोगों ने ऐसी यात्रा पहले नहीं देखी थी। वह पहले से ही एक अच्छी तरह से प्रलेखित व्यक्तित्व थे लेकिन फिल्म उससे आगे निकल गई। फिल्म के बाद वह आपके साथ रहता है, वह जिस तरह का व्यक्ति है - अपने दोस्तों, अपने परिवार, अपने खेल, अपनी नौकरी के साथ। माही एक शांत व्यक्ति है, जो बाहरी लोगों के साथ आसानी से नहीं खुलता है। थोड़ी देर के लिए, हमारी शुरुआती बातचीत के दौरान, मुझे लगा कि मैं सतह को खरोंच रहा हूं। उसे बोलना कठिन था। मेरे बदलते ही चीजें बदल गईं। मैंने उनके घर पर अपने माता-पिता और साक्षी के साथ समय बिताया है। उनके माता-पिता सरल, मामूली लोग हैं। माही के बारे में सबसे अच्छी बात यह है कि सफल होने के बाद भी उन्होंने अपने मूल्यों को नहीं छोड़ा।
वह वास्तव में आपके साथ कब खुला?
ए�� सार्वजनिक शख्सियत के रूप में, बहुत बार उनसे एक ही सवाल पूछा जा रहा था कि यहां तक ​​कि मैं उनसे पूछ रहा था, जो थकाऊ हो सकता है। मुझे भी उनके साथ बैठकर बात करने के लिए एक लंबा और निरंतर जादू नहीं मिल रहा था। वह व्यस्त था। वह इस शब्द से स्पष्ट था कि जब भी वे टीम इंडिया के मैच पर होंगे, तब वे किसी और चीज के लिए समय नहीं देंगे। इसलिए, कई बार, जब मैं उसके साथ यात्रा कर रहा था, तब भी मैं उसके साथ फिल्म के बारे में बातचीत नहीं करता था। मुझे बस उसे दूर से देखने और यह देखने का सौभाग्य मिला कि वह टीम के साथ कैसे बातचीत करता है, मैदान पर खेलता है। जब यह फिल्म लिखी जा रही थी तब धोनी अपने सबसे व्यस्त थे। उनके मैचों पर बहुत अधिक ध्यान केंद्रित किया गया था। आखिरकार, एक साल में, मैं उसके साथ बर्फ तोड़ने में कामयाब रहा। धीरे-धीरे, हमें चैट करने के लिए व्यापक मंत्र मिले। मुझे यह समझने में कुछ प्रयास करना पड़ा कि उनकी कहानी प्रेरणादायक है और उन्हें मुझे इसमें शामिल होने की जरूरत है। आज तक, मुझे लोगों को यह बताना है कि उनकी बायोपिक का कोई भी हिस्सा काल्पनिक नहीं था।
नीरज पांडे टीम में कब शामिल हुए?
मैं स्क्रिप्ट के पहले मसौदे के साथ लगभग था। उसके साथ काम करना एक जबरदस्त बढ़ावा था। एक बार जब वह बोर्ड पर आया, ऊर्जा बदल गई और बेहतर के लिए। बातें उगल दीं।
आपने फिल्म में सुशांत के अभिनय का क्या किया? आज आप इसे कैसे देखते हैं?
हम सोच रहे थे कि हमें किसको कास्ट करना चाहिए। शाहीद कपूर और सुशांत सिंह राजपूत हमेशा एमएस धोनी की भूमिका निभाने के लिए मेरे शीर्ष विकल्प थे। मुझे लगा कि वे दोनों भूमिका को संभालने में सक्षम हैं। सुशांत उस समय इतने बड़े स्टार नहीं बन पाए थे, लेकिन उनके अभिनय के बारे में बहुत कुछ समझा गया था। मैं उनका शौकीन था। जब हमने उससे बात की, तो सभी को लगा कि वह पहुंचा सकता है। वह कहानी की सेटिंग से अच्छी तरह वाकिफ थे, वह बिहार का एक लड़का था और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि वह इस भूमिका की बारीकियों को अच्छी तरह से समझ सकता था। सुशांत के प्रदर्शन पर मुझे इतना गर्व था। सुशांत और मैंने एमएस धोनी की बायोपिक पर एक साथ काम करने में बहुत अच्छा समय दिया।
वर्षों से आप एमएस धोनी के संपर्क में रहे हैं?
उसके साथ संपर्क में रहना बहुत कठिन है और किसी को उसे यह बताना चाहिए। किसी तरह, हम हमेशा एक खिड़की, एक दूसरे से मिलने का कारण और एक साथ भोजन करते हैं। अब, यह एक विशेषाधिकार है जो हर किसी को पसंद होगा, नहीं?
0 notes
newshindiplus · 4 years ago
Text
बीसीसीआई ने नहीं दी खिलाड़ियों को मैच फीस, जय शाह को पत्र लिखकर की गई शिकायत
बीसीसीआई ने नहीं दी खिलाड़ियों को मैच फीस, जय शाह को पत्र लिखकर की गई शिकायत
[ad_1]
Tumblr media
बीसीसीआई ने बिहार के खिलाड़ियों को नहीं दी मैच फीस आईपीएल (IPL) याचिकाकर्ता आदित्य वर्मा ने इस संबंध में भारतीय क्रिकेट बोर्ड के सचिव जय शाह (Jai Shah) को पत्र लिखकर शिकायत की है
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years ago
Text
'गांगुली-शाह कार्यकाल का विरोध नहीं करेगा बिहार क्रिकेट संघ'
‘गांगुली-शाह कार्यकाल का विरोध नहीं करेगा बिहार क्रिकेट संघ’
[ad_1]
इंडियन प्रीमियर लीग (आईपीएल) स्पॉट फिक्सिंग के याचिकाकर्ता आदित्य वर्मा ने मंगलवार को कहा कि भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआई) के अध्यक्ष सौरव गांगुली और सचिव जय शाह की विराम अवधि (कूलिंग ऑफ पीरियड) को हटाने के मसले पर जब सुप्रीम कोर्ट में सुनवाई के लिए आएगा तो उनका वकील इसका विरोध नहीं करेगा। शीर्ष अदालत में बीसीसीआई की अपने संविधान में संशोधन करने और गांगुली और शाह को अनिवार्य विराम अवधि…
View On WordPress
0 notes
aspntechnosoft · 4 years ago
Text
Aditya Verma, Secretary of Cricket Association of Bihar, writes to BCCI, expresses concern over Patna Moin ul Haq stadium |कभी वर्ल्ड कप मैच की मेजबानी की थी, आज बदइंतजामी की मार झेल रहा है ये स्टेडियम
Aditya Verma, Secretary of Cricket Association of Bihar, writes to BCCI, expresses concern over Patna Moin ul Haq stadium |कभी वर्ल्ड कप मैच की मेजबानी की थी, आज बदइंतजामी की मार झेल रहा है ये स्टेडियम
नई दिल्ली:क्रिकेट एसोसिएशन ऑफ बिहार (CAB) के सचिव आदित्य वर्मा ने बीसीसीआई को पत्र लिखकर पटना में मोइन उल हक स्टेडियम की खराब स्थिति को लेकर चिंता जाहिर की है. इस स्टेडियम ने अभी तक सिर्फ तीन अंतर्राष्ट्रीय मैचों की मेजबानी की है जिसमें 1996 वर्ल्ड कप में खेला गया मैच भी शामिल है. वर्मा ने बोर्ड के अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) और अन्य अधिकारियों को चिट्ठी लिख कर बताया है, ‘मैं यह पत्र…
View On WordPress
0 notes