#फुगडी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
सहकारी बँकांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारकडून चार महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान.
आणि
बारव संवर्धनात विज्ञान आणि आध्यात्माचा सखोल विचार करण्याची आवश्यकता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ प्रभाकर देव यांच्याकडून व्यक्त.
****
देशातल्या सहकारी बँकांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं चार महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या बँकांना नवीन शाखा उघडण्याची परवानगी, व्यावसायिक बॅंकांबरोबर एकरकमी तडजोड करण्याची मुभा, प्राधान्य क्षेत्र कर्जांबाबतची उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ, आणि रिझर्व्ह बँकेत तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची परवानगी, या उपायांचा त्यात समावेश असल्याचं सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. ते आज नांदेड इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते सचखंड हुजूर साहेब गुरुद्वाऱ्याला भेट देणार आहेत. दरम्यान, अबचलनगर मैदानावर होणाऱ्या गृहमंत्र्यांच्या या सभेच्या अनुषंगानं वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. रात्री १० वाजेपर्यंत हा बदल लागू राहील.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आज नवी दिल्लीत पक्षाची बैठक झाली, त्यात अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, याबाबत माहिती दिली. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांसह महिला, युवक-युवती आणि लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सुनील तटकरे यांच्याकडे ओदिशा, पश्चिम बंगाल या राज्यांसह शेती, अल्पसंख्याक या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक या राज्यांसह कामगार विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. पत्रकारांनी अजित पवार यांच्यासंदर्भात विचारलं असता, त्यांच्याकडे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी असल्याचं, शरद पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांनी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत, ते या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचं अभिनंदन केलं आहे.
****
राज्याला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची आवश्यकता असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात बोंढार हवेली इथल्या अक्षय भालेराव हत्येप्रकरणी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पिडीत कुटूंबाला शासन तरतूदीतील आठ लाख २५ हजार रुपयांपैकी चार लाख १२ हजार ५०० रुपयांचा धनादेश हस्तांतरीत केला. राज्यात सामाजिक सलोखा आणि एकात्मता वाढवण्यासाठी सर्वांनी अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याला आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांच्या जयघोषात तुकोबांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक देहूत दाखल झाले असून फुगडी, भगवी पताका घेऊन एक-एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पैठण इथल्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची पालखी आज पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यातून ही पालखी मार्गक्रमण करणार आहे. नाथांच्या वारकऱ्यांच्या जवळपास ९० दिंड्या या सोहळ्यात सहभागी होतात. पालखीचं पहिलं रिंगण १३ जून ला मिडसावंगी इथं होणार आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी आज जालना जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
****
बारवांचं संवर्धन करताना विज्ञान आणि आध्यात्म यांचा सखोल विचार करण्याची आवश्यकता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ प्रभाकर देव यांनी व्यक्त केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बारव संवर्धन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बारवा या केवळ स्थापत्यकला किंवा जलसाठे किंवा वास्तु म्हणून अभ्यासणं अपुरं असल्याचं, मत डॉ देव यांनी व्यक्त केलं. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सची औरंगाबाद शाखा आणि मराठवाडा प्राचीन वास्तू संवर्धन समिती यांच्यावतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत पहिल्या सत्रात बारव संवर्धन चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी अनुभव कथन, कामातल्या अडचणी तसंच लोक सहभाग यांवर मनोगतं व्यक्त केली. दुसऱ्या सत्रात बारवांच्या विविध पैलूंवर तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.
****
नागपूर मुंबई समृध्दी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात कारमधील २६ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली तर कार चालवत असलेला तरुण जखमी झाला. जालना जिल्हा हद्दीत कडवंची शिवारात आज सकाळी ही दुर्घटना घडली. आयटी कंपनीत काम करणारी कोलकत्ता इथली रहिवासी असलेली ही तरुणी नागपूरचा मित्र अंशूल टाकळीकर याच्यासोबत पुण्याहून नागपूरकडे परतत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती महामार्ग प���लीस केंद्राच्या सहायक निरीक्षक कल्पना राठोड यांनी दिली.
****
नांदेड इथं आज ज्येष्ठ नागरीक कक्ष आणि निवृत्ती वेतन कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाचं उद्धाटन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या कक्षाचा ज्येष्ठ नागरिक, सेवानिवृत्त अधिकारी यांना लाभ होणार आहे. यावेळी अनुकंपा धारक २६ परिचरांना फेरनियुक्तीच�� आदेश देण्यात आले. तसंच अनुकंपा प्रतिक्षासूचीतील ४६ उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले.
****
भारतीय रेल्वेच्या १३९ या सेवा क्रमांकाचं एकात्मिक भारतीय रेल्वे हेल्पलाइन क्रमांकामध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. आता प्रवाशांना रेल्वे अधिकाऱ्यांकडून मदत मिळवण्यासाठी १३९ या क्रमांकावर फोन करून किंवा संदेश पाठवून माहिती घेणं किंवा तक्रार करणं शक्य होणार आहे. रेल्वे अपघातांशी संबंधित माहिती, वैद्यकीय आणीबाणीसाठी, डब्यांची साफसफाई, दक्षता आणि भ्रष्टाचार तसंच खानपान सेवांसाठी या रेल्वे हेल्पलाइन नंबरचा वापर प्रवाशांना करता येणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान क्रिकेट कसोटी अजिंक्यपदासाठी लंडन इथं सुरू असलेल्या सामन्यात आज चौथ्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या सहा बाद २१२ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत एकूण ३८५ धावांची आघाडी घेतली आहे. ॲलेक कैरी ४७ आणि मिजेल स्टार्क १५ धावांवर खेळत आहेत. भारताकडून रविंद्र जडेजाने तीन तर उमेश यादवनं दोन बळी घेतले आहेत.
****
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज उस्मानाबाद इथं राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दृष्टीदान दिन सप्ताहाचं उद़घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉ.भालचंद्र यांच्या कार्याला उजाळा देत, मरणोत्तर नेत्रदान बाबत माहिती देण्यात आली, तसंच सर्वांना नेत्रदानाची संमतीपत्रं भरुन देण्याबाबत आवाहन करण्यात आलं.
****
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज उस्मानाबाद इथं राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दृष्टीदान दिन सप्ताहाचं उद़घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात डॉ.भालचंद्र यांच्या कार्याला उजाळा देत, मरणोत्तर नेत्रदान बाबत माहिती देण्यात आली, तसंच सर्वांना नेत्रदानाची संमतीपत्रं भरुन देण्याबाबत आवाहन करण्यात आलं.
****
औरंगाबादचे पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी, नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सामाजिक माध्यमातुन तेढ निर्माण करणारे संदेश पाठवू नये असं आवाहन केलं आहे. जाणीवपूर्वक अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींविरुध्द कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावं ज्यामुळं सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
****
अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ आज अजून तीव्र झालं आहे. नऊ किलोमीटर प्रती तास वेगानं हे चक्रीवादळ उत्तरकडे सरकत आहे. येत्या २४ तासांत हे वादळ अधिक तीव्र होवून ईशान्य कडे सरकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह ह��का ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे.
औरंगाबाद शहर परिसरात आज सायंकाळच्या सुमारास पूर्वमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
****
0 notes
Text
झिम्मा फुगडी
आनंदाचा उत्सव आलाहसू खेळू या चला चला ।झिम्मा फुगडी खेळू चलामाळून गजरा मिरवू चला ।नवी कोरी ही साडी हिरवीपदरावरती ही नक्षी माला ।नटून थटून आल्या सखीचला घेऊ या उंच झुला ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
Viral Video: फु बाई फु… फुगडी फु! पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video: फु बाई फु… फुगडी फु! पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video: फु बाई फु… फुगडी फु! पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल दरम्यान या वारीत एक विशेष गोष्ट पाहायला मिळतीये, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Police Fugadi Viral Video) होतोय. व्हिडीओ आहे पोलीस फुगडी खेळतानाचा… Pandharpur Wari 2022: आषाढी एकादशी सोहळा आनंदात पार पडला. 20 जूनला देहू मधून संत तुकाराम (Sant Tukaram) महाराजांची आणि 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघाली. यंदा…
View On WordPress
#Video#Viral#आ��ची बातमी#आताची बातमी#ठळक बातमी#ताजी बातमी#पोलिसांचा#फु…#फुगडी#बाई#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र स��ाचार#राजकारण#व्हायरल!#व्हिडीओ
0 notes
Text
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत
फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद पंढरपूर, दि. 3 (उ. मा. का.) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका…
View On WordPress
0 notes
Text
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वारकरी मंडळाकडून स्वागत
फुगडी खेळून कार्तिक वारीचा लुटला आनंद पंढरपूर, दि. 3 (उ. मा. का.) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांचा शासकीय विश्रामगृह येथे जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस यांनी जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषावर ठेका…
View On WordPress
0 notes
Text
कुडाळ मच्छीमार्केटमध्ये आज तिरंगी भजनबारी सामना
कुडाळ मच्छीमार्केटमध्ये आज तिरंगी भजनबारी सामना
कुडाळ : ओमसाई मच्छीमार्केट मित्रमंडळ कुडाळच्या वतीने दिवाळीनिमित्त मच्छीमार्केट पटांगण येथे आज आणि उद्या, सोमवार २४ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज, रविवार २३ रोजी रोजी दुपारी ३ वा. गणेश जयंती उत्सव मंडळ खवणे यांचे नृत्य, सायं. ४ वा. गायक समीर चराटकर यांचा हिंदी व मराठी गायन कार्यक्रम, सायं. ५ वा. श्री सिध्दीगणपती महिला मंडळ कविलकाटे यांची फुगडी, ७ वा. चिमणी पाखरं डान्स…
View On WordPress
0 notes
Text
Kanore School | संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेच्या दिंडीने परिसर विठ्ठलमय
#Kanore School | संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेच्या दिंडीने परिसर विठ्ठलमय #Ahmednagar
अहमदनगर (दि ९ जुलै २०२२)- कल्याण रोड, ड्रिेमसिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रशालेपासून ड्रिमसिटीपर्यंत टाळमृदुंग गजर करत विठोबा -रखुमाई, संत तुकाराम महाराज अभंग म्हणत सुरूवात झाली. ‘तो पहा विठ्ठल बरवा.. तो हा माधव बरवा.. संगीतमय वातावरण नाचत फुगडी अशा भक्तिमय वातावरणात दिंडी…
View On WordPress
0 notes
Photo
८ मार्चला रंगणार ओरोसला फुगडी स्पर्धा! http://www.headlinemarathi.com/citizens-news/%e0%a5%ae-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%93%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%ab/?feed_id=47413&_unique_id=6020d59fc1965
0 notes
Text
August 11, 2018 at 11:45PM नाग पंचमीबद्दल माहिती – Naag Panchami Information In Marathi
“आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे”. श्रावण महिना, सणांचा, उत्सवांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा महिना. या महिन्यात निसर्ग सुद्धा हिरवा शालू पांघरून मिरवत असतो. मनुष्य, प्राणी, पक्षी व झाडे सर्वच या महिन्यात आनंदाने बहरून जातात.
हा महिना सणांचा महिना आहे व त्याची सुरवात सुद्ध पंचमीला नागपंचमीने होते. आपल्या हिंदू संस्कृतीत भूतदया व सहिष्णुता यांना फार महत्व आहे. म्हणून श्रावण महिना शाकाहाराने पाळतात. म्हणून या महिन्यात सणांची सुरवात होते नागपंचमी पासून.आपल्याला लहानपणापसून शिकवण्यात येते कि साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, इतकेच नव्हे तर आपल्या हिंदू संस्कृतीत महादेवाने गळ्यात नाग परिधान केला आहे तर भगवान विष्णू हे नागावरच झोपलेले असतात. या सणामध्ये आपण या नागाच्या जवळ पोहोचतो, त्याची पूजा करतो. शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि साप शेतीच्या कार्यात फारच महत्वाचा कार्यभाग सांभाळतो. शेतातील उंदीर व अन्य हानिकारक जीवावर उदरनिर्वाह करून तो शेताची एका प्रकारे निगा करतो. क्षेत्र (शेत) पाल (रक्षक) असे सापाचे क्षेत्रपाल असेही नाव आहे. नागपंचमी च्या दिवशी काहीही कापू नये, चुलीवर तवा ठेऊ नये असे पथ्य पाळतात. इतर सणांप्रमाणेच सकाळी पहाटे उठून स्नान करून तयार व्हावे लागते. त्यानंतर गंध, हळद कुंकू व इतर पूजेच्या सामाग्रींनी पाटावर ५ फण्यांच्या नागाचे चित्र काढावे व त्याची पूजा, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवावा. हा सन संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, श्रीकृष्ण व कालिया मर्दनची गोष्ट अतिशय प्रसिद्ध आहे. हा स्त्रियांचा सन असून या दिवशी गावातील मुली व स्त्रिया देवळात व वारुळा जवळ जाऊन त्याची पूजा करतात. झिम्मा, फुगडी व झोका असे खेळ खेळतात. यामुळे हा सन स्त्रियांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते. नागपंचमी ला अनेक ठिकाणी गारुड्यांकडून जिवंत नागांना दुध पाजले जाते. आता ते नरेंद्र दाभोळकरांसारख्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे कमी झाले आहे. परंतु सापाला किव्वा नागाला दुध पाजू नये, त्यांची शरीर रचना दुध पचवण्यासाठी योग्य नसते आणि यामुळेच नागपंचमीला अनेक नाग मृत्युमुखी पडतात. ��ेव्हा आपण हा सन आपल्या क्षेत्रपालाला त्रास न देत त्याच्या प्रतिमेसोबतच साजरा केला तर या सनाच महत्य टिकून राहील
from Blogger https://ift.tt/2Ba258e via My Channel on YouTube
0 notes
Link
var betterads_screen_width = document.body.clientWidth;betterads_el = document.getElementById('vyldcqsa-7679-391599056'); if (betterads_el.getBoundingClientRect().width) { betterads_el_width_raw = betterads_el_width = betterads_el.getBoundingClientRect().width; } else { betterads_el_width_raw = betterads_el_width = betterads_el.offsetWidth; } var size = ["125", "125"]; if ( betterads_el_width >= 728 ) betterads_el_width = ["728", "90"]; else if ( betterads_el_width >= 468 ) betterads_el_width = ["468", "60"]; else if ( betterads_el_width >= 336 ) betterads_el_width = ["336", "280"]; else if ( betterads_el_width >= 300 ) betterads_el_width = ["300", "250"]; else if ( betterads_el_width >= 250 ) betterads_el_width = ["250", "250"]; else if ( betterads_el_width >= 200 ) betterads_el_width = ["200", "200"]; else if ( betterads_el_width >= 180 ) betterads_el_width = ["180", "150"]; if ( betterads_screen_width >= 1140 ) { document.getElementById('vyldcqsa-7679-391599056-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width >= 1019 && betterads_screen_width < 1140 ) { document.getElementById('vyldcqsa-7679-391599056-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width >= 768 && betterads_screen_width < 1019 ) { document.getElementById('vyldcqsa-7679-391599056-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width < 768 ) { document.getElementById('vyldcqsa-7679-391599056-place').innerHTML = ''; }
Zimma Ga Pori Lyrics from Dashakriya Movie. Starring Dilip Prabhavalkar, Manoj Joshi, Aditi Deshpande, Anand Karekar, Jayvant Wadkar. Movie: Dashakriya (2017) Music by: Amit Raj Lyrics by: Sanjay Krishnaji Patil Sung by: Kasturi Wavare, Aarti Kelkar, Arohi Mhatre Music Label:
Zimma Ga Pori Lyrics
var betterads_screen_width = document.body.clientWidth;betterads_el = document.getElementById('vyldcqsa-7680-478419924'); if (betterads_el.getBoundingClientRect().width) { betterads_el_width_raw = betterads_el_width = betterads_el.getBoundingClientRect().width; } else { betterads_el_width_raw = betterads_el_width = betterads_el.offsetWidth; } var size = ["125", "125"]; if ( betterads_el_width >= 728 ) betterads_el_width = ["728", "90"]; else if ( betterads_el_width >= 468 ) betterads_el_width = ["468", "60"]; else if ( betterads_el_width >= 336 ) betterads_el_width = ["336", "280"]; else if ( betterads_el_width >= 300 ) betterads_el_width = ["300", "250"]; else if ( betterads_el_width >= 250 ) betterads_el_width = ["250", "250"]; else if ( betterads_el_width >= 200 ) betterads_el_width = ["200", "200"]; else if ( betterads_el_width >= 180 ) betterads_el_width = ["180", "150"]; if ( betterads_screen_width >= 1140 ) { document.getElementById('vyldcqsa-7680-478419924-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width >= 1019 && betterads_screen_width < 1140 ) { document.getElementById('vyldcqsa-7680-478419924-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width >= 768 && betterads_screen_width < 1019 ) { document.getElementById('vyldcqsa-7680-478419924-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width < 768 ) { document.getElementById('vyldcqsa-7680-478419924-place').innerHTML = ''; }
झिम्मा गं पोरी फुगडी गं पैंजण गं पोरी बुगडी गं सांगवा जरा धाडीत जा आठवण गं पोरी काढीत जा कौतुक करताना मन हे भरलंय गं हळदीच्या अंगाला बाशींग धरलंय गं गवत चाऱ्याच्या खुपित गं चिमणा-चिमणीच्या चोचीत गं सांगवा जरा धाडीत जा आठवण गं पोरी काढीत जा झिम्मा गं पोरी फुगडी गं पैंजण गं पोरी बुगडी गं काळजाच्या काठावर चांदण फुललंय गं पापणीच्या टोकावर आभाळ झुललंय गं पैंजण फुगडीच्या तालात गं हसत राहशील गालात गं सांगवा जरा धाडीत जा आठवण गं पोरी काढीत जा झिम्मा गं पोरी फुगडी गं पैंजण गं पोरी बुगडी गं Zimma Ga Pori Lyrics Zimma Ga Pori Fugadi Ga Painjan Ga Pori Bugdi Ga Sangava Jara Dhadit Ja Aathvan Ga Pori Kadhit Ja Kautuk Karatana Man He Bharalay Ga Haladichya Angala Bashing Dharlay Ga Gavat Charyachya Khupit Ga Chimana Chimanichya Chochit Ga Sangava Jara Dhadit Ja Aathvan Ga Pori Kadhit Ja Zimma Ga Pori Fugadi Ga Painjan Ga Pori Bugdi Ga Kalajachya Kathavar Chandan Phulalay Ga Papanichya Tokavar Abhal Jhulalay Ga Painjan Fugadichya Talaat Ga Hasat Rahshil Galaat Ga Sangava Jara Dhadit Ja Aathvan Ga Pori Kadhit Ja Zimma Ga Pori Fugadi Ga Painjan Ga Pori Bugdi Ga
Zimma Ga Pori Video
var betterads_screen_width = document.body.clientWidth;betterads_el = document.getElementById('vyldcqsa-6746-1013747198'); if (betterads_el.getBoundingClientRect().width) { betterads_el_width_raw = betterads_el_width = betterads_el.getBoundingClientRect().width; } else { betterads_el_width_raw = betterads_el_width = betterads_el.offsetWidth; } var size = ["125", "125"]; if ( betterads_el_width >= 728 ) betterads_el_width = ["728", "90"]; else if ( betterads_el_width >= 468 ) betterads_el_width = ["468", "60"]; else if ( betterads_el_width >= 336 ) betterads_el_width = ["336", "280"]; else if ( betterads_el_width >= 300 ) betterads_el_width = ["300", "250"]; else if ( betterads_el_width >= 250 ) betterads_el_width = ["250", "250"]; else if ( betterads_el_width >= 200 ) betterads_el_width = ["200", "200"]; else if ( betterads_el_width >= 180 ) betterads_el_width = ["180", "150"]; if ( betterads_screen_width >= 1140 ) { document.getElementById('vyldcqsa-6746-1013747198-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width >= 1019 && betterads_screen_width < 1140 ) { document.getElementById('vyldcqsa-6746-1013747198-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width >= 768 && betterads_screen_width < 1019 ) { document.getElementById('vyldcqsa-6746-1013747198-place').innerHTML = ''; }else if ( betterads_screen_width < 768 ) { document.getElementById('vyldcqsa-6746-1013747198-place').innerHTML = ''; }
The post Zimma Ga Pori Lyrics | Dashakriya | Amitraj appeared first on Lyrics Ocean.
0 notes
Text
Zimma Ga Pori Lyrics | Dashakriya | Amitraj
Zimma Ga Pori Lyrics | Dashakriya | Amitraj
Zimma Ga Pori Lyrics
झिम्मा गं पोरी फुगडी गं पैंजण गं पोरी बुगडी गं सांगवा जरा धाडीत जा आठवण गं पोरी काढीत जा कौतुक करताना मन हे भरलंय गं हळदीच्या अंगाला बाशींग धरलंय गं गवत चाऱ्याच्या खुपित गं चिमणा-चिमणीच्या चोचीत गं सांगवा जरा धाडीत जा आठवण गं पोरी काढीत जा झिम्मा गं पोरी फुगडी गं पैंजण गं पोरी बुगडी गं काळजाच्या काठावर चांदण फुललंय गं पापणीच्या टोकावर आभाळ झुललंय गं पैंजण फुगडीच्या तालात गं हस…
View On WordPress
0 notes
Text
Mangalagaur 2022 Wishes मंगळागौरी निमित्त खास शुभेच्छा
Mangalagaur 2022 Wishes मंगळागौरी निमित्त खास शुभेच्छा
Mangalagaur 2022 Wishes मंगळागौरी निमित्त खास शुभेच्छा श्रावणाच्या आगमनाने बहरली कांती.. मंगळागौर पुजनाने मिळो सर्वांना सुखशांती.. सोनपावलांनी गौरी आली घरी मनोभावे करूयात तिचे पूजन मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा श्रावणामुळे पसरली हिरवळ सुंदर दिसे निसर्गाची किमया मंगळागौरच खेळायची ना मग चला जमुयात सर्व सख्या. मंगळागौरी व्रताच्या सर्व सख्यांना शुभेच्छा झिम्मा फुगडी चा खेळ…
View On WordPress
0 notes
Photo
Book Your Service On http://khfm.co.in on This #HARTALIKA महाराष्ट्रातील तमाम महिला भाविकांना #हरतालिकेच्या हार्द्दिक शुभेच्छा #गणेशचतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "#हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी पार्वती मातेची पूजा महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत मनापासून मनोभावे करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यानंतर ही करतात कारण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात. हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणीं��रोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.` पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला. तिचा दृढनिश्चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले. इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत. रात्री 12 वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्र���र्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवास��नी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.
Book Your Service On http://khfm.co.in on This #HARTALIKA
#HaltalikaUstav2017#HartalikaMumbaiUstav2017#HartalikaUstavPics2017#HartalikaForMumbai#KHFMCleanigSolution#CleaningServices#HomeCleaningServicesMumbai#OfficeCleaningServices#DeepCleaningServicesMumbai#HomeCleaningServicesMarol#OfficecleaningServicesAtAndheri#HartalikaForWomans#MumbaiCleaningServices#BestHomeCleaningServices#ProffessionalCleaningServices
0 notes
Text
तळवडे येथील श्री पूर्वी देवी मंदिर येथील नवरात्र उत्सव कार्यक्रमास खासदार विनायक राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली भेट
तळवडे येथील श्री पूर्वी देवी मंदिर येथील नवरात्र उत्सव कार्यक्रमास खासदार विनायक राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली भेट
राजाराम गावडे मित्र मंडळ व श्री पूर्वी देवी भक्तगण मंडळामार्फत उपस्थित मान्यवरांचे करण्यात आले स्वागत सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातील राजाराम गावडे मित्र मंडळ व पूर्वी देवी भक्तजन मंडळ गेली अनेक वर्ष सांस्कृतिक दशावतार महोत्सव, दांडिया महोत्सव, फुगडी किंवा विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. तळवडे गावातील राजाराम गावडे मित्र मंडळाचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे. तसेच जिल्ह्यातील इतर…
View On WordPress
0 notes
Text
सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील भवानी मंदिरात नवरात्री निमित्त विविध कार्यक्रम
सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील भवानी मंदिरात नवरात्री निमित्त विविध कार्यक्रम
सावंतवाडी सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त दशावतार नाट्यप्रयोग, भजन, फुगडी तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यावेळी 26 नोव्हेबर रोजी वालावलकर दशावतार मंडळ याचा नाट्य प्रयोग होणार आहे.29 नोव्हेंबर रोजी श्री स्वामी समर्थ श्री देवी माऊली दशावतार नाटय मंडळ याचा नाटय प्रयोग होणारं आहे. याचा…
View On WordPress
0 notes
Text
तळवडे येथील श्री पूर्वी देवी मंदिर येथे नवरात्र उत्सव
तळवडे येथील श्री पूर्वी देवी मंदिर येथे नवरात्र उत्सव
दशावतार नाट्य प्रयोग .भजन कार्यक्रम, फुगडी कार्यक्रम तसेच विवध कार्यक्रम याचे आयोजन सावंतवाडी तळवडे येथील श्री पूर्वी देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी मंगळवार दिनांक 27 नोव्हे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता भजन कार्यक्रम व रात्री दांडिया कार्यक्रम व फुगडी कार्यक्रम होणारं आहे.बुधवार दिनांक 28 नो्हेंबर 2022 रोजी भजन कार्यक्रम व फुगडी कार्यक्रम…
View On WordPress
0 notes