#प्रेग्नन्सी
Explore tagged Tumblr posts
Text
Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नन्सी अफवांवर संतापला अर्जुन कपूर; म्हणाला ‘कर्माचं फळ...’
Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नन्सी अफवांवर संतापला अर्जुन कपूर; म्हणाला ‘कर्माचं फळ…’
Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नन्सी अफवांवर संतापला अर्जुन कपूर; म्हणाला ‘कर्माचं फळ…’ Arjun Kapoor: अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने ‘कर्मा’विषयी लिहिले आहे. Arjun Kapoor: अभिनेता अर्जुन कपूरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे. यात त्याने ‘कर्मा’विषयी लिहिले आहे. Go to Source
View On WordPress
#‘कर्माचं#arjun#kapoor#अफवांवर#अर्जुन#कपूर#प्रेग्नन्सी#फळ&8230;’#मनोरंजन#मलायकाच्या#म्हणाला-#संतापला?
0 notes
Text
अनुपमा: लग्नानंतर लोक रुपाली गांगुलीला वंध्य म्हणत चिडवायचे, बळजबरीने तिला करिअर सोडावे लागले
अनुपमा: लग्नानंतर लोक रुपाली गांगुलीला वंध्य म्हणत चिडवायचे, बळजबरीने तिला करिअर सोडावे लागले
जेव्हा रुपाली गांगुलीने तिची कारकीर्द सोडली: टीव्ही मालिका ‘अनुपमा’ गेल्या अनेक वर्षांपासून टीआरपी बऱ्यापैकी दिसून येत आहे. या शोमध्ये अनुपमा तीन मुलांची आई आहे. काही काळापूर्वी अनुपमाने अनु नावाच्या मुलीलाही दत्तक घेतले आहे. अशा परिस्थितीत अनुपमा यांना चार मुले आहेत. काहीही न करता अनुपमा घरात मुलं गोळा करत आहेत. मात्र वास्तविक जीवनात असे अजिबात होत नाही. अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुली खऱ्या…
View On WordPress
#paras kalnavat news#अनुज अनुपमाला सोडून जात आहे#अनुपमा#अनुपमा कलाकार#अनुपमा हॉटस्टार#गौरव खन्ना#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#नवीनतम टीव्ही गॉसिप्स#पारस कालनावट चरित्र#मनोरंजन बातम्या#रुपाली गांगुली#रुपाली गांगुली प्रेग्नन्सी#सुधांशू पांडे#सुवंश धर#स्टार प्लस
0 notes
Video
youtube
How to Perform HCG Test ? HCG प्रेग्नन्सी टेस्ट कैसे करते है ?
In this video you can learn how to perform HCG Pregnancy Test, By Anamol Laboratories Private Limited
#diagnostics#laboratory#rapidtest#serology#urinestrips#manufacturers#in vitro diagnostics industry#in vitro diagnostics market#clinical laboratory#biochemistry#stain#laboratorychemicals
1 note
·
View note
Link
हमारे इस ब्लॉग में देसी घरेलु नुस्खों के द्वारा इलाज करने के तरीके बताये गए हैं| नुस्खो में वजन कम करना ,बालों की देखभाल, प्रेग्नन्सी में देखभाल, ब्यूटी टिप्स, डाइट और फिटनेस आदि के बारें में बताया गया हैं| इन्हें पढ़ें - https://www.desigharelunuskhe.com/
1 note
·
View note
Text
title :प्रेग्नंन्सी - एक मानसिक आव्हान / Pregnancy a mental challenge
वैदेही...वय वर्षे २८. एक अखंड उत्साहाचा झरा.. सुंदर, लाघवी एका MNC मध्ये टीम लीडर. स्वतः चे निर्णय धडाडीने घेऊन कोणतही काम वेळेच्या आधी पूर्ण करणारी. त्यामुळे तिची अशी एक पॉझिटिव्ह ‘इमेज’ होती कंपनी मध्ये . घरी ती आणि सुशांत दोघेच तो ही तिला अगदी अनुरूप ; प्रत्येक गोष्टीत तिला बरोबर घेऊन चालणारा.
सकाळी उठून वेळेत व्यायाम , डाएट चा ब्रेकफास्ट आणि मग ९ वाजता घर सोडले की रात्री ९ ला च दोघे घरी येत. विकेंड ला मस्त हिंडायचे ट्रेकिंग आणि पार्टीज... आयुष्य मस्त जगत होते.... नवीन पिढीच ही; मग प्रेग्नंन्सी चे प्लॅनींग ही परफेक्ट होते त्यांचे... लग्नानंतर 2 वर्षात स्वतः चे घर घेतले आणि आर्थिकस्थैर्य आल्यावर आत्ता तिसऱ्या वर्षी प्लॅन केल्याप्रमाणे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली सगळं कसं आखीव रेखीव सुरु होते.पण..... जशी टेस्ट पॉझिटिव्ह आली तशी वैदेही ला उलट्या मळमळ सुरू झाली.. काही खाता येईना, अशक्त पणा आला , रात्री सारखे बाथरूम ला उठावे लागे त्यामुळे झोप नीट होईना, पोट नीट साफ होईना चीड चिडेपणा वाढला(ही सगळी प्रेग्नंन्सी ची नॉर्मल लक्षणे असतात आणि तुमचे बाळ नीट वाढत आहे हे दर्शवतात ) तिचे सगळे रुटीन च बिघडले. त्यातच मला दाखवून गेल्यावर मी तिला तपासून काही औषधे लिहून दिली आणि आता काय काय काळजी घ्यायला पाहिजे जसे की ट्रॅव्हलिंग नको, बाहेरचे खाणे टाळावे, रात्री 8 तास झोप घेणे आवश्यक आहे आणि हेवी आणि पोटाचे व्यायाम नको असे सांगितले.
इतके सगळे शारीरिक बदल आणि घ्यायची काळजी याच्याशी जुळवून घेताना तिची तारांबळ उडाली. ऑफिस मध्ये तिला गरज पडेल तशी रजा आता घ्यावी लागत असे, रात्री उशिरा पर्यंत पूर्वी सारखे काम करणे शक्य होईना, तिच्या परफॉर्मन्स वर परिणाम होऊ लागला तिच्या कलिग्ज आणि सिनियर्स चा ही असता ती गरोदर आहे म्हटल्यावर तिच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.(हे तुमच्या पैकी खूप जणींनी अनुभवले असेल)लवकरच ती सुट्टी वर जाणार म्हटल्यावर मुख्य डिसीजन्स घेताना पूर्वी इतके तिच्या मताला महत्व दिले जाईना, तिला तिच्या कामाची ओव्हर दुसऱ्या कलिग ला देऊन साधे काम करण्याचा सल्ला देण्यात आला.
आधीच शारीरिक बदल आणि प्रेग्नंन्सी मूळे आलेली बंधने ( ट्रेकिंग आणि पार्टीज बंद, बाहेर खाणे बंद ) त्यात च ऑफिस मध्ये कमी झालेले तिचे महत्व, तिने सुट्टी घेतली तरी सुशांत सकाळी ऑफिस ला गेला की पूर्वीसारखा रात्रीच घरी येत असे त्याला आपले काम कमी करणे नेहमी शक्य होत नसे त्यामुळे तिला घरी आलेला एकटे पणा या मुळे ती ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली आणि सुशांत घाबरून तिला माझ्या कडे समुपदेशना साठी घेऊन आला.
दुसरी केस प्रियांका ची . प्रियांका ‘होममेकर’! लग्नानंतर मस्त चालले होते.ती , नितीश सासू सासरे आणि लहान दीर असे एकत्रच राहात. चुणचुणीत प्रियांका ने सर्वाना आपलेसे करून टाकले होते आपल्या वा��ण्याने... रोजची घरची बाहेरची कामे , सणवार,पै पाहुणे, कुळाचार सारे काही ती अगदी धडाडीने सांभाळत असे . त्यामुळे प्रियांकाचे नेहमी गुणगान होत असे घरातील सर्व गोष्टी तिला विचारून च केल्या जात. तीन वर्षे पटापट सरली आणि प्रियांकाने गोड बातमी दिली सगळे खूष!पण या बरोबर चालू झालेल्या उलटी मळमळ आणि इतर लक्षणांनी प्रियांका बेजार झाली तिला पूर्वी सारखी प्रत्येक गोष्ट परफेक्ट आणि वेळच्या वेळी जमेना....त्यातच लहान दिराचे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे नवीन ‘ जाऊ’आता घरातील सर्व गोष्टी सांभाळू लागली . साहजिकच आता तिचे गुणगान होत असे आणि आता तिच्या मताला जास्त किंमत दिली जाई. शारीरिक बदल आणि बदलती परिस्थिती यामुळे प्रियांका ‘नैराश्याच्या गर्तेत’ सापडली .
अशा कितीतरी वैदेही आणि प्रियांका ज्या प्रेग्नंन्सी च्या पहिल्या तीन मह��न्यात ‘नैराश्याच्या गर्तेत’सापडतात त्यांना आम्ही पाहतो. आणि याचे मुख्य कारण म्हणजे ‘प्रेग्नन्सी साठीची मानसिक तयारी आणि मनाची मशागत केलेली नसणे’.
आजकाल सजगतेमुळे नवीन लग्न झालेली जोडपी आर्थिक तयारी पूर्ण झाल्यावरच मुलाचा विचार करतात पण कित्येक वेळा ही जोडपी मानसिक तयारी न करताच प्रेग्नंन्सी ला सामोरी जातात आणि मग परिस्थिती शी जुळवून घेता घेता बेजार होतात.
पूर्वी प्रेग्नंन्सी शी निगडित असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण २०% होते, म्हणजे ८०% स्त्रियांना गरोदरपणात काही अडचण न येता त्या सहज आपले गरोदरपण निभावून नेऊ शकत असत . कुटूंबातून असलेला मानसिक आधार हा त्याचे मुख्य कारण होते.
बदलती जीवनशैली, उशिरा लग्न त्यामुळे उशिरा प्रेग्नंन्सी, विभक्त कुटुंब पद्धती , आहारातील बदल, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा(यामुळे कित्येक धोके आपण आधीच ओळखू शकतो) यामुळे आता प्रेग्नंन्सी कॉम्प्लिकेशन्स चे प्रमाण आता ४०% पर्यंत वाढले आहे. म्हणजे तुम्ही जर ६०% च्या गटात आला तर तुमची प्रेग्नंन्सी सहज पणे पार पडते; पण जर तुम्ही उर्वरित ४०% च्या गटात आला तर मात्र तुमची अशा परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक तयारी हवी.
मानसिक तयारी म्हणजे नक्की काय करायचे?
पहिली पायरी म्हणजे ‘आता मी गरोदर आहे आणि पुढचे ९महिने माझे बाळ हीच माझी पहिली जवाबदारी आहे त्यामुळे त्याच्यासाठी जरुरी असणाऱ्या सर्व गोष्टी मी आनंदाने करणार आहे ‘ हे स्वतः ला पुन्हा पुन्हा सांगायचे.अशी सकारात्मक मानसिकता तयार झाली की बऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलतो आणि मग लहान सहान गोष्टींचा आपल्या ला त्रास होत नाही.
1. उलटी मळमळ, रात्री पुन्हा पुन्हा बाथरूम ला जावे लागणे, पोट साफ न होणे, जास्त झोप येणे, चिडचिड होणे इत्यादी गोष्टी या हॉर्मोन्स च्या बदला मुळे होत ��सतात आणि याला प्रेग्नंन्सी च्या ‘वेलकम साईन्स’ असे म्हणतात. म्हणजे या गोष्टी बाळाची वाढ नीट होत आहे हे दर्शवतात. तीन महिन्यांनी यातील बऱ्याच गोष्टी आपोआप कमी होतात.त्यामुळे ह्या गोष्टींशी कसे ऍडजस्ट होता येईल याचा विचार करायला हवा. गरज पडल्यास स्त्री रोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घेणे, पुरेशी विश्रांती घेणे ,आहारातील बदल यांनी या गोष्टींवर मात करता येते. 2. काही वेळेला पहिल्या 3 महिन्यात काहीच पचत नसेल तर पेशंटला ऍडमिट करून सलाईन लावण्याची गरज असते त्यासाठी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सुट्टी ची आवश्यक ता असते. कित्येक वेळा पहिल्या 3 महिन्यात च प्रेग्नंन्सी मुळे सुट्टी घ्यावी लागेल हे पेशंटच्या पचनी पडत नाही आणि त्या साठी ते पटकन तयार होत नाहीत आणि मग परिस्थिती हाता बाहेर जाते. 3. काही वेळेला अचानक उद्भणारे धोके जसे की रक्तस्त्राव होणे आणि त्यामुळे पूर्ण विश्रांती घ्यावी लागणे गरजेचे असते त्यासाठी ही पेशंट मानसिक रित्या तयार नसतात आणि मग एक अश्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांना अवघड जाते. 4. प्रवास आणि हुंदडण्यावर पाहिले 3 महिने बंधने असतात या गोष्टीशी आजच्या तरुणाई ला जुळवून घेणे अवघड जाते. ‘अगदी जवळच जातोय डॉक्टर मग तर चालेल ना?’ असे विचारून त्यांना डॉक्टरांकडून प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी हवी असते. 5. प्रवासाचे जाऊ द्या हल्ली तर मॉल्स मध्ये फिरताना पण काळजी घ्यायला हवी. तिथली गर्दी त्यामुळे होणारे इन्फेक्शन, पार्कींग पासून मॉल पर्यंत आणि नंतर मॉल मध्ये नकळत भरपूर चालले जाते त्यामुळे ज्यांना इतके चालण्याची रोजची सवय नसते त्या गरोदर मुली हल्ली कित्येक वेळा पोट आणि पाठ दुखी घेऊन येतात. 6. विकेंड पार्टी ज आणि त्यामधील ‘सिगारेट आणि अल्कोहोल वर गरोदरपणात पूर्ण बंदी’ हे कित्येक मुलींच्या पचनी पडत नाही. (दुर्देवाने गरोदर असताना ही सिगारेट न सोडू शकणाऱ्या मुली आजकाल बघायला मिळतात)’पॅसिव्ह स्मोकिंग’ सुद्धा नको असे सांगितल्यावर ‘डॉक्टर मी एकटीनेच का स्मोकिंग सोडायचे बाळ दोघांचे आहे तर याने ही स्मोकिंग सोडायला हवे’ या प्रकारचे संवाद आता नवीन नाहीयेत. यातून विसंवाद होऊन मग जोडप्याची मानसिक ओढाताण होते. 7. म्हणायला जरी ‘WE ARE PREGNANT', छान वाटत असले तरी निसर्ग नियमा नुसार कित्येक गोष्टीतून मुलींनाच जावे लागते आणि त्यासाठी मानसिक दृष्टया कणखर व्हावे लागते. 8. नोकरीच्या ठिकाणी एखादी मुलगी गरोदर आहे म्हंटल्यावर तिच्या कडे बघायचा पूर्ण टीम चा दृष्टीकोन एकदम बदलतो. आता काय ही फारशी पूर्वी सारखी ऍक्टिव्ह राहू शकणार नाही आणि ��िलिव्हरी नंतर ची सुट्टी त्यामुळे महत्वाच्या जवाबदारी आणि निर्णय यातून या मुलींना नकळत बाजूला काढले जाते आणि धडाडीने काम करणाऱ्या या मुली एकदम ता बदलाशी जुळवून घेऊ शकत नाहीत व त्यांची चिडचिड वाढते किंवा एकदम त्या डिप्रेशन मध्ये जातात. या बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ‘ बरे झाले आता मी माझ्या प्रेग्नंन्सी कडे आणखी चांगल्या पद्धतीने पाहू शकेन ‘असा विचार करून पुन्हा पुन्हा स्वतः ला समजवायला हवे. 9. ‘होम मेकर ‘ मुली सुद्धा या परिस्थितीतून जातात. गरोदर असताना पूर्वी इतके टापटीप सगळे न जमल्याने त्यांची चिडचिड होते. आतापर्यंत च्या त्यांच्या चटपटीतपणामुळे घरच्यांच्या त्यांच्या कडून अपेक्षा ही वाढलेल्या असतात. अशा वेळी शांतपणाने जे माझ्या आणि बाळासाठी सर्वोत्तम आहे तेच मी आता करणार हे त्यांनी स्वतः ला बजावून सांगायला हवे. 10. गरोदर पणात १० ते १२ किलो वजन वाढणे बाळाच्या योग्य वाढीसाठी गरजेचे असते.ही वजनातील वाढ आणि त्यामुळे होणारे बाह्यरुपतील बदल स्वीकारण्याची मुलींची मानसिक तयारी झालेली नसते. अनेकदा मुली या वाढणाऱ्या वजनाची काळजी करत बसतात आणि पुरेसा आहार घेत नाहीत. त्यामुळे बाळाची वाढ ही नीट होत नाही. तसेच डिलिव्हरी नंतर ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासून च त्यांना वजन कमी करायचे वेध लागतात. योग्य पध्दतीने स्तनपान करण्यासाठी पुरेसा आहार आवश्यक असतो आणि स्तनपान नीट केले की वजन अपोआप कमी होते हे सत्य आहे आणि त्याप्रमाणे मनाची तयारी करणे गरजेचे आहे. 11. प्रेग्नंन्सी मुळे येणाऱ्या ‘स्ट्रेचमार्क्स’ने ही अनेक मुली व्यथित होतात. बाळाच्या वाढीसाठी त्वचा ताणली जाणे गरजेचे असते. त्वचा ताणली गेल्यानेच बाळाला वाढायला जागा मिळते .त्यामुळे कोणत्याही क्रीम ने ‘ स्ट्रेचमार्क्स’ जात नाहीत ही वस्तुस्थिती समजावून घेणे गरजेचे आहे. याबद्दल मी कुठेतरी वाचले होते ‘you call them strech marks; but I see them as first drawing made by my baby' (स्ट्रेचमार्क्स हे माझ्या बाळाने काढलेले पाहिले चित्र आहे) म्हणजे किती सकारात्मक मानसिकतेने एखाद्या गोष्टी कडे आपण बघू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे नाही का? सारांश – आर्थिक तयारी बरोबरच पुरेशी विश्रांती, जीवनशैली तील आवश्यक असे लहान सहान बदल,गरज पडेल तेव्हा राजा घेणे आणि ९महिने बाळासाठी सर्वोत्तम असे बदल करण्याची मानसिक तयारी करून जर आपण प्रेग्नंन्सी ला सामोरे गेलो तर होणारी मानसिक ओढाताण टाळता येईल नाही का?
0 notes
Text
#बाळंतपण ‘शेक शेगडी’ आणि सायन्स.
‘जान्हवी’ ची डिलीव्हरी सुखरूप पार पडली. तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून झाल्यावर आज ती डिस्चार्ज घेऊन घरी जाणार होती. नेहमी प्रमाणे राउंडला गेल्यावर तिला तपासले आणि सर्व काही ठीक आहे म्हणून सांगितल्यावर जान्हवी च्या आईने तक्रार करत म्हटले,
‘ डॉक्टर ही काही शेक शेगडी मालीश करायला तयार नाही, आज काल हे सगळं जूनं झालाय म्हणते तुम्हीच समजावा आता ; मला तीच हे वागणं अजिबात पटत नाहीये ; जुन्या पद्धती कधी चुकीच्या असतील का डॉक्टर?
हा संवाद आज काल आम्हा स्त्री रोग तज्ञा ना नेहमीच झालाय म्हणून आज आपण आपल्या पद्धती आणि त्यामागचे सायन्स समजावून घेऊ या आणि मग त्या पद्धती पाळायचा की नाही हा निर्णय स्वतः चा स्वतः घेऊया.
१. पहिली प्रथा म्हणजे डिलीव्हरी नंतर सव्वा महिना किंवा ४० दिवस बाहेर न पडणे,काम न करणे .
४० दिवस किंवा सव्वा महिना हा काळ म्हणजे गर्भपिशवी पुन्हा पूर्वी सारखी होण्यासाठी लागणारा काळ होय. गर्भधारणे मुळे झालेले शारीरिक बदल पूर्वस्थितीत येण्यासाठी बरोबर इतकाच वेळ हवा असतो म्हणून ही प्रथा पूर्वजांनी पाडली असावी. प्रेग्नन्सी मध्ये स्त्रीची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते
( pregnanacy is an immunosuppressive state) ती वाढण्यासाठी हा काळ महत्वाचा असतो . कोणतेही इन्फेक्शन या काळात पटकन होतात . हे टाळण्यासाठी घराबाहेर पडणे टाळण्याची प्रथा आहे.
आपल्या भारतात हवे द्वारे पसरणारा सगळ्यात कॉमन आजार म्हणजे टी. बी.! भारत या या आजारा मध्ये अनेक वर्षे पहिल्या नंबर वर आहे.याआणि प्रतिकार शक्ती कमी झाली की तो होण्याचे चान्सेस वाढतात.मग ती रिस्क कमी करण्यासाठी साठी लोकांच्या मध्ये मिसळणे टाळण्यासाठी साठी बाळंतिणी ला घराबाहेर पडणे आपल्या पूर्वजांनी मना केले असावे हे त्यामागचे सायन्स आहे.
पाश्चात्य देशात टी.बी.अगदी दुर्मिळ आहे म्हणून तिथल्या ओल्या
‘बाळंतिणी’ लगेच बाहेर पडतात ड्राईव्ह करतात.
दुसरे कारण म्हणजे हा काळ आई आणि बाळाला एकमेका बरोबर ऍडजस्ट करायला मिळावा आणि बाळंतिणी ला विश्रांती मिळावी हा ही हेतू या मागे असतो. हे ही सायन्स च्या दृष्टीने बरोबर आहे
२. गार पाण्यात हात न घालणे...
नवीन आईला पुरेशी झोप मिळत नाही,
स्तनपान करण्या मध्ये बाळाचे आवरण्या मध्ये बराच वेळ जातो व त्याकरता बरीच एनर्जी पण लागते. त्यामुळे हे करत असताना तिला घरकामाचे टेन्शन नको म्हणून तिला गार पाण्यात हात घालू नको म्हणतात. (कपडे धुणे भांडी घासणे, फारशी पुसणे ही कामे गार पाण्याने करतात आणि अशी कष्टा ची कामे ओल्या बाळंतिणीने करू नयेत हे त्या मागचे सायन्स आहे, म्हणजे तिची ��नर्जी बाळासाठी आणि तिच्यासाठी राखली जाईल)
३.मालीश ---- डिलीव्हरी नंतर चे मालीश हा एक ‘सोहळा’ असतो. रोज तेल लावून मसाज करून बाळ
बाळंतिणीला आंघोळ घालणे आणि मग मस्त शेक देणे यात वेळ कसा निघून जातो कळत नाही.
मालीश करण्याचे फायदे
१. अंग आणि पाठदुखी कमी होते डिलीव्हरी आणि नंतर सतत स्तनपाना साठी बसून बसून अंग आणि पाठ दुखायला लागते .मालीश हा त्यावर उत्तर उपाय आहे
२. मसल्स रिलॅक्स होतात
३. स्ट्रेस आणि टेन्शन कमी होण्यास मदत होते.
जागरण आणि एकदम बदलेले टाईम टेबल , प्रत्येक बाबतीत आत्ता पर्यंत मोकळे जगायची सवय असते आणि आता एकदम सगळे बदलून बाळा प्रमाणे सगळे सतत ऍडजस्ट करावे लागते त्यामुळे नवीन आई ला हा बदल स्ट्रेस आणि टेन्शन देणारा असतो. ‘मालीश’ मुळे स्ट्रेस कमी होतो हे सायंटिफिकली समोर आले आहे.
४. योग्य पद्धतीने स्तनाचा मसाज केल्यास दुधाच्या गाठी होत नाहीत.
५. हार्मोन्स मुळे त्वचेमध्ये जे बदल झालेले असतात ते जाऊन कांती नितळ आणि मऊ होते.
असे अनेक फायदे मालीश मुळे होतात.
मालीश करताना घ्यायची काळजी
१. मालीश करणारी बाई अनुभवी असावी
२. सीझर नंतर टाके काढले की मालीश करावे
३. सीझर असेल तर पोटाचे मालीश टाळावे.
आज काल तुम्ही गुगल वर सर्च केल्यास ‘डीलीव्हरी नंतर च्या मालीश’ चे स्पेशल कोर्स उपलब्द्ध आहेत आणि स्पेशल पॅकेजेस पण!
४.शेक देणे--- कोळशाची शेगडी पेटवून त्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधी टाकून ती शेगडी पूर्वी बाळ बाळंतिणीच्या कॉट खाली शेक देण्यासाठी ठेवत असत .
शेक घेण्याचा उपयोग हा inflamation कमी करण्यासाठी होतो. इतर वेळी ही काही दुखत असेल तर आपण शेकायची पिशवी घेतो च की... तसेच नॉर्मल डिलीव्हरी नंतर चे टाके शेकून त्याच्या भोवतीचे inflamation कमी करणे हा या शेकाचा हेतू असतो तो बरोबरच आहे. तसेच पाठदुखी कमी होण्यासाठी ही शेकाचा उपयोग होतो.
आयुर्वेदिक औषधे घालून केलेला धूर हा बाळंतिणीची खोली निर्जंतुक होण्यासाठी उपयुक्त ठरतो.
इथे मला हे ही सांगायचे आहे की शेक शेगडी साठी लागणारी कॉट तात्पुराती भाड्याने मिळते त्यामुळे तो ही फार मोठा प्रश्न नाही.
४. आहार – डिलीव्हरी नंतर चा भारतीय आहार हा अगदी योग्य आहार आहे. या मध्ये परंपरेने चालत आलेले काही पदार्थ समाविष्ट असतात. मेथी लाडू , डिंक लाडू , हाळीव लाडू आणि खीर, खसखसी ची खीर इत्यादी. याचा उपयोग हा रक्त वाढणे , कॅल्शियम वाढणे, दूध चांगले येणे या साठी होतो. म्हणजे ही पध्दत ही सायन्स च्या दृष्टीने बरोबरच आहे .
बाळं तिणी च्या आहारात पालेभाज्या, म��ग आणि तूर डाळ, खोबरं लसूण चटणी याचा समावेश असतो . हे सर्व पदार्थ पचायला हलके, आणि प्रोटीन युक्त असतात त्याची शरीराला झीज भरून येण्यासाठी गरज असते आणि बाळाला ही पचायला हे पदार्थ हलके पडतात .
काही पदार्थ खाऊ नका म्हणतात जसे बटाटा , वांगे, हरभरा डाळ , तेलकट तिखट मसालेदार पदार्थ कारण हे पदार्थ ‘वातूळ’ असतात आणि आईच्या दुधातून ते बाळाला गेले की बाळाला पचायला जड जातात.
५.कानात कापूस घालणे--- वर म्हटल्याप्रमाणे ही प्रथा ही इन्फेक्शन होऊ नये म्हणून आहे. भारतात हवे द्वारे पसरणारे आजार जसे की सर्दी ,खोकला ,टी बी हे कॉमन आहेत आणि कानातले इन्फेक्शन घशात जायला वेळ लागत नाही म्हणून एक्स्ट्रा काळजी म्हणून कानात बोळे घालतात.प��� आज काल चांगल्या अँटिबायोटिक मुळे जर तुम्हाला नको वाटत असेल तर ही प्रथा पाळली नाही तरी ठीक आहे असे वाटते.
६. बाळाचे बारसे – १२ किंवा १३ व्या दिवशी करण्याची पद्धत ही सायंटिफिक दृष्टीने योग्य आहे. तुम्हाला माहीतच असेल की परदेशात तर जन्मा आधीच बाळाचे नाव ठरवलेले असते.
बाळाला जितक्या लवकर नाव मिळते तितक्या लवकर त्याची स्वतः ची ओळख त्याला मिळते. त्याच्या नावाची त्याला सवय लवकर होते आणि मग आपण त्या नावाने हाक मारल्यावर बाळ नॉर्मल रिस्पॉन्स देते का हे ही समजते जसे की नावाने हाक मारली की डोळे वळवणे, मान वळवणे, हसून प्रतिसाद देणे इत्यादि नॉर्मल वाढीची लक्षणे आहेत.
जर लवकर नाव च ठेवले नाही आणि बबड्या, सोन्या, मन्या अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्याला बोलवत राहिलो तर ते बाळ ही गोंधळून जाते .
थोडक्यात बाळाच्या ‘ब्रेन स्टीम्युलेशन’ साठी बाळाला लवकरात लवकर नाव ठेवणे योग्य आहे.
कोणतीही गोष्ट पिढ्या न पिढया अनेक वर्षे तग धरून उभी आहे म्हणजे तिला नक्की काहीतरी भक्कम पाया ( strong base)आहे नाहीतर ती इतके वर्ष टिकली च नसती नाही का? कदाचित आपल्याला हा पाया माहीत नसेल . त्यामुळे आपल्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धती पडताळून घेऊन फॉलो करायला काहीच हरकत नाही.
खरोखरच आनंदाने सव्वा महिना आपण फक्त आपल्या बाळा साठी आणि आपल्यासाठी दिला तर त्यातून दोघांना ही फायदाच आहे की ! बाळ आणि आई यांच्या मध्ये त्यामुळे सुंदर भावबंध तयार होईल तसेच आरोग्याच्या दृष्टीने ही पुढच्या अनेक बारीक सारीक तक्रारी टळतील नाही का ?
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ
#Ayurveda#doctor#treatment#medicine#pure herbs#Dombivli#india#United States#ukraine#netherlands#germany#Russia#poland#france#united kingdom#indonesia#canada#Egypt#singapore#spain#azerbaijan#south korea#australia#immunity#health#wellness
0 notes
Text
प्रेग्नन्सी रोकने के लिए कंडोम में लाल मिर्च की चटनी (Red Sauce In Condoms) भर इस्तेमाल कर रहे हैं लोग
प्रेग्नन्सी रोकने के लिए कंडोम में लाल मिर्च की चटनी (Red Sauce In Condoms) भर इस्तेमाल कर रहे हैं लोग
सोशल मीडिया (Social Media) एक ऐसा प्लाट्फ़ोर्म है जिसे आज हर छोटे बच्चे से बड़े लोग चलाते है और इस पर हर वक्त कुछ न कुछ ट्रेंड (trend) में चलता रहता है। इस ट्रेंडिंग चीजों के लिए कई ज्ञानी होते है जो अलग अलग चीजों को वायरल करते है और ज्ञान बाटने के चक्कर में सोशल मीडिया पर कुछ भी शेयर कर देते है।लोग इसी ट्रेंड को फॉलो करने के लिए किसी भी हद तक जाने को तैयार हो जाते हैं इन दिनों एक नया social…
View On WordPress
0 notes
Text
*डायबेटीस*– काही गोड गैरसमज
डायबेटीस (मधुमेह) तसा वैदिक काळापासून माहित असलेला आजार आहे. चरक संहितेत ह्या बद्दल माहिती आढळते. पण आजच्या काळात ह्याचा प्रादुर्भाव प्रचंड वाढलेला आहे. 🙏बहुतेक प्रत्येकाच्या घरी एक ना एक डायबेटीस असलेली व्यक्ती आज आहे. भारतात *मधुमेहाचे प्रमाण जवळ जवळ 8 %* आहे. आज आपल्या देशात अंधत्व, किडनी चे विकार, हृदय रोग, पायाच्या जखमा व विच्छेदन ह्याचे प्रमुख कारण अनियंत्रित ब्लडशुगर आहे. शिवाय Whatsapp युनिव्हर्सिटी मुळे प्रचलित गैर समजांमुळे ह्या कॉम्प्लीकॅशंस च्या प्रमाणात भर पडली आहे.
*त्यामुळे काही ❌गैर समजाचे ❌ निरसन करण्याचा प्रयत्न आज करू या*.
*१* ) " *माझ्या घरी कोणाला* *डायबेटीस नाही, त्यामुळे मला होणे शक्य नाही*."❌
✅अनुवांशिकता हे मधुमेह होण्या मागील केवळ एक कारण आहे. बदललेली जीवन शैली, दैनंदिन ताण-तणाव, अनियमित आहार, शारीरिक श्रमाचा अभाव, स्त्रियांमध्ये गर्भ धारणेचे वाढत चाललेले वय ही बाकिची कारणे कमी जास्ती प्रमाणात प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे. शिवाय भारतीय वंशाच्या लोकांमध्ये शरीरात body fat चे प्रमाण हे पाश्चात्यांपेक्षा अधिक आढळते, त्यामुळे डायबेटीस हा अधिक प्रमाणात, कमी वयात व तीव्र स्वरुपात आढळतो.
*��*) " *मला सध्या काही त्रास नाही, तर मी ब्लडशुगर का तपासू* ?"❌
✅थकवा, वजन कमी होणे, सतत लघवी ला जाणे, सतत तहान लागणे, सतत भूक लागणे, सतत इन्फेक्शन होणे ही माहिती असलेली लक्षणे केवळ २५% डायबेटीस पेशंट्स मध्ये दिसतात.*७५% पेशंट्स मध्ये शुगर वाढलेली असून देखील कोणतीच लक्षणे नसतात*. पण ह्या ७५% लोकांना कॉम्लीकेशंस व्हायची तितकीच शक्यता असते. ते टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे वेळेत डायबेटीसचे निदान होणे व जास्तीत जास्त वेळ शुगर नॉर्मल ठेवणे. म्हणून *चाळीशीनंतर* प्रत्येकाने दर वर्षी किमान एकदा अथवा गरज असल्यास शुगर तपासणी करणे आवश्यक आहे.
३) " *मी गोड खात नाही, व्यायाम करतो, म्हणून मला औषधाची गरज नाही*."❌
✅जेव्हा एखाद्याला डायबेटीस होतो, तेव्हा त्याच्या शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची क्षमता ५०% नी कमी झालेली असते , शिवाय इन्सुलिन ची कार्य क्षमता देखील कमी झालेली असते (Insulin Resistance). त्यामुळे Life Style Modification (व्यायाम, आहारातील गोड पदार्थ, कार्बोहायड्रेट उदा. भात, बटाटे कमी करणे) हे औषधा सोबत आवश्यक असते पण औषधाला पर्याय होऊ शकत नाही. केवळ प्रि-डायबेटीस स्टेज मध्ये जीवन शैलीत बदल आणून बिना औषधाने शुगर नॉर्मल राहू शकते.
४) *मी डायबेटीस चे औषधे घेतो, म्हणजे मी खूप आजारी आहे*.❌
✅हा सर्वात मोठा गैर समज. डायबेटीस हा आजार नसून शरीरातील एक अनियंत्रित प्रक्रिया आहे. औषधाने व जीवन शैलीत बदल आणून त्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता आहात. आज ब्लड शुगर नॉर्मल ठेवून (डायबेटीस असलेल्यांसाठी " *fasting* -*उपाशी पोटी १३० mg/dl पेक्षा कमी*,
*जेवणा नंतर* २ तासांनी १८० mg/dl पेक्षा कमी व
*तीन महिन्यांचे एवरेज* HbA1C ७% किंवा त्याहून कमी) ठेवल्यास पुढे होणारे डायबेटीस चे कोम्प्लीकेशंस टाळता येतात.
👉🏻लक्षात ठेवा, आज औषधे घेऊन तुम्ही उद्या होणारे मोठे आजार टाळता आहात.
५) *माझी शुगर नॉर्मल आहे, मी औषधे बंद करू शकतो*❌
✅तुम्ही नियमित व योग्य औषधे घेत आहात, तुम्ही जीवन शैलीत योग्य बदल आणले आहेत, म्हणून शुगर नॉर्मल आहे. काही अपवाद वगळता, ते बंद केल्यास, शुगर पुन्हा वाढू शकते. वजन कमी केल्याने काही पेशंट्स मध्ये जरूर औषधे बंद होऊ शकतात, पण ते देखील डॉक्टर च्या सल्ल्याने. शिवाय काही परिस्थितींमध्ये उदा. Steroid Induced Diabetes मध्ये डॉक्टर च्या सल्ल्यानेच औषधे घ्यावे.
६) *डायबेटीस चे औषधे नेहमी घेतल्याने किडनी खराब होतील*❌
✅डायबेटीसची औषधे घेतल्याने किडनीला इजा होत नाही. त्याउलट औषधे न घेतल्याने ब्लड शुगर वाढलेली राहिली तर नक्कीच किडनी फ���ल्युअर, हार्ट अटेक व इतर कॉम्प्लीकेशंस होऊ शकतात.
७) *मला डॉक्टरांनी इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यायला सांगितले, इन्सुलिन इंजेक्शन घेणे वाईट असते*❌
✅Type 1 Diabetes जो प्रामुख्याने लहान मुले, किशोरवयीन मुले व क्वचित मोठ्यांमध्ये आढळतो , ह्यात इन्सुलिन ला पर्याय नाही, ते जीवनावश्यक असते.
👉🏻Type 2 Diabetes जो प्रामुख्याने मोठ्यांमध्ये आढळतो, कधी कधी शुगर नॉर्मल ठेवण्या साठी इन्सुलिन च्या इंजेक्शनची गरज भासते. अशा वेळेस डॉक्टर च्या सल्ल्या नुसार इन्सुलिन इंजेक्शन घेणे यथोचित असते कारण तुम्ही गोळ्या घेता कि इन्सुलिन घेता ह्या पेक्षा तुमची शुगर नॉर्मल आहे कि नाही ह्यावर तुम्हाला कॉम्प्लीकेशंस होतील कि नाही हे अवलंबून असते. इन्सुलिन ची सवय लागण्यापेक्षा ती त्या व्यक्ती च्या शरीराची गरज असते.
8) *मी डायबेटीस सोबत दिलेले बीपी, कोलेस्टेरॉल चे औषध बंद केलेले चालेल*❌
✅काही पेशंट्स ला सोबत बीपी कोलेस्टेरॉल चे औषध दिलेले असते. डायबेटीस पेशंट्स मध्ये हृदय रोगाचे प्रमाण अधिक असते, शुगर सोबत बीपी व कोलेस्टेरॉल नॉर्मल ठेवल्याने ही शक्यता आपण कमी करू शकतो, म्हणून ही औषधे घेणे गरजेचे असते.
९) *उपासाच्या दिवशी, प्रवासात औषधे बंद ठेवावी लागतात*❌
✅सीवियर डायबेटीस असल्यास, वय वाढलेले असल्यास उपास करणे टाळावे. बाकी पेशंट्स नि उपासाच्या दिवशी जेवणाच्या वेळे नुसार औषधी घ्यावी, शक्यतो जेवायच्या वेळेस उपासाचे खावे, कडकडीत उपास करणे टाळावे. प्रवासात व बाहेर गावी जेवायच्या व औषधाच्या वेळा पाळाव्यात.
१०) *मुलाला/ मुलीला डायबेटीस आहे हे सांगितले तर लग्न जमणार नाही, नोकरी मिळणार नाही*❌
✅शुगर नियंत्रणात ठेवली तर वैवाहिक जीवनात, प्रेग्नन्सी आधी व मध्ये शुगर नॉर्मल ठेवल्यास अपत्य होण्यास काहीही प्रॉब्लेम जात नाही. पण ते लपवल्याने शारीरिक त्रास तर वाढतोच पण मानसिक गुंतागुंती देखील वाढते. आवशक आहे ते योग्य उपचार करून शुगर नॉर्मल ठेवणे. शुगर ची योग्य उपाय योजना केल्यास व आवश्यक ती काळजी घेतल्यास जॉब मिळण्यास व करियर मध्ये देखील काही प्रॉब्लेम जात नाही.
अशा रीतीने मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करून आपण आपले आयुष्य मधुमेहासोबत देखील गोड करू शकता.
🙏🏻
🩺 *डॉ अमेय बीडकर
हृदयरोग तज्ञ
किंग्जवे हॉस्पीटल
नागपूर
0 notes
Text
How To Use Prega News In Marathi | Prega News Kit Use In Marathi | Prega News Pregnancy Test Kit
How To Use Prega News In Marathi | Prega News Kit Use In Marathi | Prega News Pregnancy Test Kit
How to Use Prega News Kit in Marathi | Prega News Kit Use In Marathi – Pregnancy Test: How To Use Prega News In Marathi | Prega News Kit Use In Marathi — How To Use Prega News In Marathi या लेखात आम्ही प्रेगा न्यूजसह गर्भधारणा कशी तपासायची हे सांगितले आहे? आपल्याकडे प्रेग्नन्सी टेस्ट किटशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतील – गर्भधारणा चाचणी किट कसे वापरावे? (How to use pregnancy test kit in…
View On WordPress
0 notes
Text
अगर आप कोविद से उबर रहे हैं, तो पुरानी ताकत वापस पाने के लिए रोजाना ये 5 व्यायाम करें,साथ ही ध्यान रखना जरूरी है।
अगर आप कोविद से उबर रहे हैं, तो पुरानी ताकत वापस पाने के लिए रोजाना ये 5 व्यायाम करें,साथ ही ध्यान रखना जरूरी है।
व्यायामकोरोना से उबरने वाले मरीजों में कई ��िनों तक सुस्ती और कमजोरी की शिकायत बनी रहती है। वे रोजमर्रा के कार्यों को चलाने या संभालने में जल्दी से हांफते हैं। इसका प्रभाव मानसिक तनाव के रूप में भी आ सकता है, जो प्रतिरक्षा के लिए बेहद घातक है। कोरोना में प्रेग्नन्सी टिप्स,क्या बच्चे भी संक्रमित हो सकते हैं? गर्भवती महिलाओं को संक्रमण के बाद क्या करना.. इसे देखते हुए जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी के…
View On WordPress
0 notes
Photo
Is Video me bataya hai ki Pregnant Kaise Hote Hai aur pregnant develop ka tarika kya hai. aapko पिरीयड के कितने दिन बाद सेक्स करने से प्रेग्नन्सी रूकती है aur ovulation kab hota hai. Female Reproductive system and Menstruation has actually been quickly explained.Agar aap pregnancy strategy kar rahe hai to aapko ye samajhna zaroori…
0 notes
Text
New Parents in Bollywood: २०२२ मध्ये 'या' कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन
New Parents in Bollywood: २०२२ मध्ये ‘या’ कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन
New Parents in Bollywood: २०२२ मध्ये ‘या’ कलाकारांच्या घरी चिमुकल्या पावलांच आगमन Bollywood Couples Who Became Parents in 2022 : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आलिया भट्ट प्रेग्नन्सी आणि त्यानंतर मुलगी राहा कपूरचा जन्म ही 2022 सालातील सर्वात मोठी बातमी होती. आलिया आणि रणबीर यांनी या वर्षी मुलीचे स्वागत अतिशय आनंदात केले. तर काही इतर बॉलीवूड जोडप्यांच्या घरेही या वर्षी गुंजली. काहींना…
View On WordPress
0 notes
Text
दिव्यांका त्रिपाठी: गरोदरपणाची अफवा पसरताच दिव्यांका त्रिपाठीचे रक्त उकळले, तिने 'फॅट' म्हणून ट्रोल्सला फटकारले.
दिव्यांका त्रिपाठी: गरोदरपणाची अफवा पसरताच दिव्यांका त्रिपाठीचे रक्त उकळले, तिने ‘फॅट’ म्हणून ट्रोल्सला फटकारले.
दिव्यांका त्रिपाठीने प्रेग्नंसी मागणाऱ्या ट्रोलची टीका केली. ,
View On WordPress
#खतरों के खिलाडी 11#टीव्ही#टीव्ही गप्पाटप्पा#टीव्ही गॉसिप#टीव्ही बातम्या#टीव्ही मालिका#ताज्या टीव्ही बातम्या#त्रिपाठी#दिव्यांका त्रिपाठी#दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया बातम्या#दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा#दिव्यांका त्रिपाठी गरोदर आहे#दिव्यांका त्रिपाठी ट्रोल करत आहे#दिव्यांका त्रिपाठी प्रेग्नन्सी#दिव्यांका त्रिपाठी फॅट शेमिंग#दिव्यांका त्रिपाठी बातम्या#दिव्यांका त्रिपाठी-विवेक दहिया#दिव्यांका त्रिपाठीने ट्रोल्सला फटकारले#दिव्यांका त्रिपाठीला वाढदिवसाच्या शुभेच्छा#दिव्यांका दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा लव्हस्टोरी#धोक्याचे खेळाडू#विवेक दहिया
0 notes
Link
गायनकॉलजी / महिला रोग
महिलाओं में सेक्स समस्या एक अति कॉमन प्रॉब्लम हे। अनेक प्रकार की प्राब्लम्ज़ जैसे वैजिनल डिस्चार्ज अथवा सफ़ेद पानी का गिरना , प्रेग्नन्सी और प्रसव से सम्बंधित सेक्स समस्या , रजो��िवृत्ति के बाद के वेवाहिक जीवन के प्रश्न काफ़ी अहम होते हे। हेल्थकेयर बेहतर होने से औसत आयु बढ़ रही हे इसलिए अब पचास -साठ के बाद की महिलायें भी अपना सामान्य सेक्स सुख प्राप्त करने को तत्पर हे। परंतु इन की समस्याओं के बारे में आम जनता और डाक्टर्ज़ में भी जानकारी न के बराबर हे । इसलिए इस बारे में सही जानकारी होना अति आवश्यक हे । यदि आप को लगता है कि कोई सेक्स समस्या है तो अभी तुरंत डॉक्टर से मिलने का अपॉइंटमेंट् ले सकते है। ये बहुत ही सरल है – बस नीचे के लिंक पे क्लिक करे , अपने डॉक्टर को सलेक्ट करे, तारीख़ एवं समय अपनी सुविधा से तय करे और लीजिए, आप आपको कन्फ़र्म अपॉइंटमेंट् का sms आपके मोबाइल में मिल जाएगा. रजोनिवृत्ति के बाद सेक्स प्राब्लम्ज़- मानसिक रूप से पचास के बाद का समय सेक्स लाइफ़ के लिए सर्वोत्तम होता हे । आप को ये बात बचकानी लग सकती हे परंतु यही सत्य हे। इसके कई कारण हो सकते हे – बच्चे सेटल हो जाते हे, आप को गर्भ ठहरने की चिंता नहीं होती, जीवन में ठहराव आ जाता हे और एक दूसरे को समय भी दे सकते हे । फिर भी इस समय शरीर में कुछ बदलाव आते हे जिनको समझना ज़रूरी हे। 1- कामेच्छा की कमी– उम्र के साथ इसने कमी आती हे परंतु ये कमी काफ़ी हद तक आपके जीवन मूल्य, सेक्स संबंधो के प्रति दृष्टिकोण , आपके शारीरिक स्वास्थ्य और आपके पार्ट्नर के सेक्शूअल स्वास्थ्य पर निर्भर करता हे। कई महिलायें इसी नकारात्मक दृष्टिकोण से ग्रसित होती हे कि सेक्स केवल संतान प्राप्ति या पुरुषों के सुख के लिए हे । अनेक स्वयं को अलग थलग कर लेती हे और धर्म में ही लीन रहने का प्रयास करती हे। ये सब उचित नहीं हे। सेक्स का मतलब अपने जीवन साथी से निकटता हे और सेक्स एक प्रकार से आपके प्रेम की अभिव्यक्ति हे। 2- कामोत्तेजना की कमी – एस्ट्रजेन की कमी से प्राइवट पार्ट्स में सेक्स के समय रक्त संचार कम हो जाता हे जिस से पर्याप्त गीलापन नहीं आता। इसके कारण सेक्स करने में दर्द होता हे । ऐसे में उपयुक्त लोकल हॉर्मोन थेरपी या वॉटर बेस लूबरीकेंट इस्तेमाल कर सकते हे।
0 notes
Text
बड़े लंड वाले लड़के ने चूत का मैल साफ कर दिया
बड़े लंड वाले लड़के ने चूत का मैल साफ कर दिया
मेरी उम्र 30 साल हे, मैं बंगलौर सिटी में रहती हूँ. मैं अपने से उम्र में दो साल बड़े आदमी के साथ मेरिड हूँ. मेरा हसबंड एक बिजनेसमेन हे और उसके शहर में अच्छे कनेक्शन हे. मैं अक्सर सेक्स कहानियाँ पढ़ के अपनी चूत में ऊँगली करती हूँ. मेरे पति को सेक्स में उतना इंटरेस्ट नहीं हे, मैं एक चुदासी हाउसवाइफ हूँ . मेरा बच्चा 3 साल का हे. मेर�� प्रेग्नन्सी के बाद से ही जैसे मेरे पति ने सेक्स करना बंद कर दिया हे.…
View On WordPress
0 notes