#म्हणाला-
Explore tagged Tumblr posts
friend-shaped-but · 25 days ago
Text
माळरानावरील गोंधळ ऐकून कान्हा  धावतच पुढे गेला. दादा त्याला हाका मारत त्याच्या मागे जात होता, पण गोंधळाच्या आवाजामुळे त्याला बहुतेक काही ऐकू येत नसावं, म्हणून अजून मोठ्या आवाजात बालरामाने त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला. खरंतर कान्हाला दादाचा आवाज ऐकू येत होता. पण त्याला त्या गोंधळाच्या दिशेने एक आवाज जणू ओढून आणत होता. मोहन त्या भयानक प्राण्याच्या तावडीत सापडला होता, आणि ते दोघे एकमेकांविरुद्व आपली सगळी शक्ती वापरून लढत होते. पण त्याच्या मित्रानी आपली सर्व शक्ती काय, आपले प्राण पणाला लावले, तरी त्या भयानक प्राण्याच्या शक्ती त्याच्यापेक्षा कायम जास्तच असणार होती! 
"मोहन!" तो किंचाळला. "मोहना, हे काय करतोयस तू , सोड त्याला! मी येतोय!" 
कान्हा पुढे पळेल तेवढ्यात त्याच्या दंडावर कोणीतरी हात घट्ट धरला होता. पण मोहनला मृत्यूच्या जबड्यात आकडकलेलं त्याला बघवत नव्हतं. 
"सोड मला!" 
"कान्हा, थांब" जरा दातओठ खातच स्नेह म्हणाला. "घाई करू नकोस!" 
"स्नेह, सोड!" 
स्नेहल बोचकारून त्यानी स्वतःचा हात सोडवून घेतला, आणि पळत सुटला. 
 नखं मारून, लाथा मारत, बोचकारतंच तो मोहनापर्यंत पोचू शकला. धेनुकासुराच्या सापळ्यात सापडलेल्या मोहनमध्ये मदत मागण्याइतका, ओरडण्याइतका पण त्राण राहिला नव्हता. गाढवाच्या रुपातला तो राक्षस जवळजवळ दोन पायांवर उभा राहिला होता, पण घामानी चिंब भिजलेला मोहन त्याच्या लाथा घालणाऱ्या पुढच्या दोन पायांना घट्ट धरून त्याला थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याचे स्नायू ��ाणलेले स्पष्ट दिसत होते, आणि त्या झटापटीत मोहनची शक्ती कमी पडतीये हेही त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. 
9 notes · View notes
pradip-madgaonkar · 2 years ago
Text
Bandya च्या मित्रानं त्याच्या हाताच्या दहाच्या दहा बोटांमध्ये अंगठ्या घातल्या होत्या…
Bandya चकितच झाला! त्याला राहावलं नाही. त्यानं कारण विचारलं…
अरे बाबा, ही कुठली पद्धत दहा बोटांत अंगठ्या घालण्याची?
Pradip म्हणाला, एक अंगठी लग्नातली आहे आणि बाकीच्या ९ अंगठ्या लग्नानंतरच्या संकटाचं निवारण करण्यासाठी आहेत.
Bandya नं मित्राचे पाय धरले…
2 notes · View notes
ashokjagharkar · 1 year ago
Text
ll वानप्रस्थ ll : ५०
अनंतच्या समजावण्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देतां शुभदा डबडबलेल्या डोळ्यांनी नुसतीच त्याच्याकडे बघत राहिली! तिची ती विकल अवस्था पाहून अनंतलाही भरून आल��. तिच्या शेजारी बसून तिचे हात हलकेच हातांत घेत तो म्हणाला, "इतकी वर्षं ठरवून निभावलेला निर्णय जयू-योगेशने सहज मनांत आलं म्हणून बदलला असेल असं खरंच तुला वाटतं कां? कुठल्या परिस्थितीत, कां त्यांनी असं केलं असेल ते जाणून घेऊन आपण त्यांच्यामागे उभं रहायला हवं ना? मग त्यासाठी मी योगेशने पाठवलेली मेल बघूं कां?" शुभदाने मूकपणे मान हलवली तशी अनंत चट्कन उठला आणि त्याने लॅपटॉप चालूं केला. दोन मिनिटे लॅपटॉपशी झटापट केल्यावर त्याने शुभदाला विचारलं, " योगेशने भलीमोठी मेल पाठवली आहे;-- तूं पण येतेस कां ती वाचायला?" अपेक्षेप्रमाणे शुभदाने मानेनेच नकार दिल्यावर हायसं वाटून अनंत लॅपटॉपवर कांहीतरी लक्षपूर्वक वाचीत असल्याचा देखावा करीत असतांना त्याला मनोमन जयू आणि योगेशच्या मनकवडेपणाचं खुप कौतुक वाटत होतं! शुभदाची प्रतिक्रिया काय होईल याबद्दल त्या दोघांचा कयास किती अचूक ठरला होता! १०-१२ मिनिटांच्या अवधीनंतर खुंटा हलवून बळकट करण्यासाठी अनंतने पुन: विचारलं, " शुुभदा,तूं स्वत: वाचून बघणार आहेस कां मी सांगूं तुला योगेशने काय लिहिलं आहे?" "माझ्या अंगांत सगळं वाचून बघण्याचं त्राण नाहींये हो! तुम्हीच थोडक्यांत सांगा काय ते!" शुभदा थकलेल्या आवाजात म्हणाली. लॅपटॉप बंद करून अनंत शुभदापाशी येऊन बसला आणि म्हणाला, "योगेशने शेवटीं काय लिहिलं आहे ते आधी सांगतो! मगाशी बोलतांना जरी तो 'जयू स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे असं म्हणाला असला तरी प्रत्यक्षांत ती तुला सांगायला घाबरत होती' असं त्याचं म्हणणं आहे!" ते ऐकून त्याही परिस्थितीत शुभदाला हंसू आलं आणि ती उद्गारली, " जयू आणि योगेश, दोघंही बदमाष आहेत! असं घाबरण्याचं नाटक क���लं की आई पाघळेल असं वाटलं होय दोघांना!" शुभदाचं अनपेक्षित हंसणं ऐकून अनंतला भरून आलेलं आभाळ, अचानक ढग पांगून उजळून निघावं तसं वाटलं! मोकळेपणाने श्वास घेत तो म्हणाला, "ती दोघं किती बदमाष आहेत ते मागाहून ठरवूं;-- पण त्यापूर्वी योगेशने काय लिहिलं आहे ते तर समजून घे!"
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ च्या सुमारास गॅसवर चहाचं आधण ठेवतांना अनंत मनाशी विचार करीत होता की रात्री शुभदाला शांत झोप लागली असेल की ��ाहीं? तेवढ्यांत पाठीमागे खुर्ची सरकवल्याचा आवाज आला, म्हणून त्याने वळून पाहिलं तर शुभदा रोजच्यासारखी मुखमार्जन आटपून, डायनिंग टेबलाजवळ खुर्ची ओढून घेऊन बसत होती. नजरानजर होतांच सस्मित चेहर्‍याने ती म्हणाली, " अहो, असे भूत बघितल्यासारखे काय बघताय्? मीच आहे,-- शुभदा!" " हो, --तुला बघूनच चकित झालो आहे! कारण तुला रात्रभर शांत झोंप लागली असेल की नाहीं याची काळजी वाटत होती! पण तुझा चेहरा चांगली शांत झोप लागल्याप्रमाणे दिसतो आहे!" "थोडा वेळ लागला झोप लागायला;-- पण लागली ती मात्र निवांत! एकदम आत्तां आपोआप जाग आली, रोजच्या वेळेला!" "मनांतलं विचारांचं वादळ शांत झालं असेल तर उत्तमच!" दोघांचे चहाचे कप डायनिंग टेबलावर ठेवीत अनंत म्हणाला. "बेडवर पडल्या-पडल्या मी योगेशने मेलमधे केलेल्या खुलाशावर खुप वेळ विचार करीत होते! शेवटी योगेशच्या तज्ञ डाॅक्टर मित्राने त्या दोघांना जे सांगीतलं ते मलाही पटलं आणि मन एकदम शांत झालं! इतकी वर्षं नियमित काळजी घेत असतांनाही नकळत गफलत होऊन जयूला दिवस गेले असतील आणि झालेली गफलत ध्यानांत येण्यासाठीही मधे दीर्घ काळ गेला असेल तर 'ही परमेश्वराचीच योजना आहे असं समजून तिचा आतां आनंदाने स्वीकार करा' हा डाॅक्टरमित्राचा सल्ला मलाही पटला! मनांत आलं की गेली एवढी वर्षं मी ज्याची वाट बघत होते, ते स्वप्न आतां ऊशीराने कां होईना, प्रत्यक्षांत येत आहे तर मीही आनंदाने त्याचं स्वागत केलं पाहिजे!" "कसं माझ्या मनातलं बोललीस बघ!" शुभदाच्या त्या प्रांजल कबुलीवर अनंत हरखून म्हणाला, "योगेशने मेलमधे खुलासा करण्यापूर्वी त्याच्या तोंडून ही खुशखबर ऐकतांक्षणीं माझ्या मनांत हाच विचार आला होता! त्यामुळे तुझ्या अनपेक्षित चिडचिडीचं मला आश्चर्यच वाटलं होतं!" "मला वाटतं ती चिडचिड म्हणजे 'इतकी वर्षं जयू आणि योगेशने कां वायां घालवली?' या वैफल्याचा उद्रेक होता!! पण परमेश्वराने ऊशीरा कां होईना, त्यांच्या झोळीत आपल्याला हव्या त्या सुखाचं माप टाकलं की!" शुभदा समाधानाने हंसत म्हणाली. "म्हणजे आतां योगेशचा फोन आला की त्याला दोन आठवड्यांनंतरची आपली तिकिटं बुक करायला सांगायची? तेवढा वेळ आपल्याला तयारीला सहज पुरेल! आपला व्हिसा आहेच आणि आपल्याला काय फक्त चार कपडे बरोबर न्यायचे आहेत!" "-- पण योगेशने कशाला तिकिटं बुक करायची?" शुभदाने घुटमळत विचारलं. "मलाही ते एरवी पटलं नसतं! पण मेलमधे योगेशने स्पष्ट बजावलं आहे की आजी-आजोबांचा या ��नंदसोहळ्यासाठी जाण्या-येण्याचा खर्च तोच करणार! त्यामुळे यावेळी त्याच्या आनंदाला मला गालबोट लावायचं नाहींये!" "तसं असेल तर ठीक आहे! फक्त मनांत एक धाकधूक आहे: आतां साठीच्या उंबरठ्यावर जयूचं बाळंतपण निभावणं मला झेपेल ना?" "वेडीच आहेस तूं शुभदा!" अनंत मोकळेपणानं हंसत म्हणाला, "तुला थोडंच तिचं बाळंतपण करायचं आहे? योगेशने काय लिहिलंय् ते विसरलीस कां? डाॅक्टरांनी आवश्यक त्या सर्व तपासण्या करून गर्भाची वाढ उत्तम होत असल्याची हमी दिल्यावरही आपली जयू थोडी हबकली आहे, अस्वस्थही आहे;-- या विचाराने की वयाच्या चाळिशीमधे, ऊशीरा आलेलं हे बाळंतपण नीट पार पडेल ना? त्यामुळे फक्त तिला मानसिक आधार वा बळ देण्यासाठी आपण जाणार आहोंत! शिवाय डिलिव्हरी झाल्यावर नवजात बाळाची आवश्यक ती काळजी घेण्यासाठी आजी-आजोबांपेक्षा अधिक योग्य कोण असणार?" "आतां योगेशचा फोन येऊन गेल्यावर मी रजनीला केव्हां एकदा ही गोड बातमी सांगते असं झालंय मला! तसंच पमाताई आणि सप्रेमॅडमनासुद्धां ही गोड बातमी कळवायला हवी ना!" "रजनीला लगेच सांगायला हरकत नाहीं;-- पण पमाताई वा सप्रेमॅडमना फोनवर सांगण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष भेटूनच त्यांचं तोंड गोड करूयां!"
३ ऑगस्ट २०२३
0 notes
nagarchaufer · 16 days ago
Text
राहुरीतील वकील दांपत्याच्या खून प्रकरणात माफीचा साक्षीदार म्हणाला की.. 
राहुरी येथील वकील दांपत्याच्या खून प्रकरणात अहिल्यानगर येथील न्यायालयात आता सुनावणी सुरू झालेली असून घटनेतील माफीच्या साक्षीदाराची न्यायालयासमोर तपासणी झालेली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्याची तपासणी घेतली.  राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे आढाव दांपत्य यांचा अत्यंत अमानुषपणे खून झालेला होता. त्यांचा मृतदेह राहुरी तालुक्यातील उंबरे येथील एका विहिरीत आढळला…
0 notes
bandya-mama · 2 months ago
Text
Bandya aani बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती.. बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं... तितक्यात Bandya नं ब्रह्मास्त्र काढलं... तो लगेच म्हणाला...
Bandya : सॉरी... बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...
😀😀😀😁😁😁🤣🤣🤣😆😆😆
0 notes
shrikrishna-jug · 4 months ago
Text
मानवासाठी, इतर प्राण्यांवरची चाचणी
काल संध्याकाळी मी तळ्यावर इतर लोकांना भेटायला आणि तळ्यावर फेऱ्या घालण्यासाठी म्हणून जात असताना रस्त्यावर एका माणसाच्या हातात पिंजरे पाहिले त्यामध्ये काही घुशी, उंदीर आणि ससे होते. मी त्याला विचारल्यावर की तू हे कुठे घेऊन चाललायस त्यावर तो मला म्हणाला जवळच असलेल्या एका शोध शाळेत घेऊन जात आहे. त्यावरून मला असं कळतं की बहुतेक ते प्राणी गिनीपिग म्हणून वापरले जाणार आणि मानवाला जे रोग होतात,त्याची…
0 notes
nirannjan17 · 8 months ago
Text
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय पहिला
🌟 श्लोक २७, २८ आणि २९
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥ कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
��ुद्धासाठी समोर उभे असलेले आपलेच नातेवाईक बघून अर्जुन गोंधळून गेला आहे.
अर्जुनाचे मन युद्धाच्या भविष्यातील परिणामाबद्दल चिंताग्रस्त, दुःखी आहे. ती चिंता, दुःख अर्जुनाच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करत आहे. त्याच परिणामात अर्जुन स्पष्ट शब्दात सांगत आहे की बोलणे सुद्धा कठीण होत आहे! संपूर्ण शरीर थरथरत आहे!
#भगवदगीता #BhagavadGita
💫अध्याय दुसरा : सांख्ययोग
🌟 श्लोक ३
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
आत्मज्ञानाच्या मार्गावर यशस्वीपणे पाऊल टाकण्यासाठी उच्च आत्मविश्वास आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. ज्यासाठी माणसाने आशावादी आणि उत्साही बनणे आणि आळशीपणा, अज्ञान आणि आसक्ती यांसारख्या सांसारिक मानसिकतेवर मात करणे आवश्यक आहे.
श्री कृष्ण हे एक सक्षम गुरू आहेत आणि म्हणून अर्जुनाला फटकारताना ते आता त्याला परिस्थितीला तोंड देण्यास प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास वाढवताना हा श्लोक उच्चारला आहे.
अर्जुनाला पृथपुत्र (कुंतीचे दुसरे नाव) म्हणून संबोधून, श्रीकृष्णाने त्याला त्याची आई कुंतीचे स्मरण करण्याचे आवाहन करतात. कुंतीने स्वर्गीय देवतांचा राजा इंद्राची पूजा केली होती आणि अर्जुनाचा जन्म इंद्राच्या आशीर्वादाने झाला होता, म्हणून त्याला इंद्रासारखे विलक्षण सामर्थ्य आणि शौर्य लाभले होते. श्रीकृष्ण त्यांना या सर्व गोष्टींची आठवण करून देत आहेत आणि त्यांना अशा दुर्बलतेचा स्वीकार करू नकोस असे सांगत आहेत. श्रीकृष्ण पुन्हा अर्जुनला परंतप म्हणजेच 'शत्रूंवर विजय मिळवणारा' संबोधित करतात आणि क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे आव्हाहन करत आहेत.
N_D_P_24
0 notes
mhadalottery2023 · 8 months ago
Text
Girni Kamgar: गिरणी कामगार ‘संप’ला की संपवला गेला? कुणामुळे देशोधडीला लागला? 82 च्या संपावेळीच्या मागण्या होत्या तरी काय?
Girni Kamgar त्या काळात गिरणी कामगार असणे हे स्टेटस सिम्बॉल होते. मी एक गिरणी कामगार आहे, कर्मचारी कुरवाळत म्हणाला. पण, त्यांची प्रतिष्ठाही संपली आणि गिरणी कामगारांचीही… ती का संपली? आंदोलनाच्या अवास्तव मागण्या की संघटनेत नेत्यांचा वाढता हस्तक्षेप? गिरणी कामगार संपले की संपले? 1982 च्या संपात नेमकं काय झालं होतं? अखेर या आंदोलनाची ठिणगी कुठे पडली? Girni Kamgar मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kalakrutimedia · 9 months ago
Text
Celebrity Insights: How Salman Khan Became Dabangg
Embark on a cinematic journey with Kalakruti Media as they uncover the secrets behind Salman Khan's legendary 'Dabangg' persona. Indulge in a flavorful blend of entertainment mix masala and Bollywood tadka, served fresh on this captivating platform. Don't miss out on exclusive celebrity interviews. Read now!
0 notes
gitaacharaninmarathi · 11 months ago
Text
2. लक्ष्य एक मार्ग अनेक
“सगळे रस्ते रोमकडेच जातात” या उक्तीप्रमाणे गीतेमध्ये सांगितलेले सगळे रस्ते हे आपल्या अंतरात्म्याकडेच जातात. यातील काही मार्ग हे विरोधाभासी असल्याचे आपल्याला वाटत राहते. मात्र, हे एक चक्र आहे ज्यानुसार कोणत्याही मार्गावरील प्रवास हा आपल्याला एकाच गंतव्याकडे घेऊन जातो.
श्रीमदभगवद्गीता ही वेगवेगळ्या पातळीवर कार्य करीत असते. कधीकधी श्रीकृष्ण अर्जुनाच्या पातळीवर येतो तर कधी तो परमात्म्याचे रुप धारण करतो. या दोन्ही पातळ्या भिन्न वाटत असल्याने सुरुवातीला गीतेचा अर्थ लावण्यात आणि समजून घेण्यात अडचणी येतात.
मागील शतकाच्या प्रारंभी वैज्ञानिकांना ��्रकाशाला समजून घेतानाही अशाच अडचणी आल्या होत्या. सुरुवातीला हे सिद्ध झाले की प्रकाश हा तरंगाप्रमाणे आहे आणि पुढील काळात समोर आले की त्यामध्ये कणांचेही गुणधर्म आहेत. या दोन्ही बाबी एकमेकांच्या विरुद्ध असल्याचे भासते. मात्र, ज्या प्रकाशाला आपण इतके चांगल्या प्रकारे सरावलो आहे तो अंतर्विरोधाने भरलेला आहे. आयुष्याचेही तसेच आहे.
एकदा एक हत्ती गावात शिरला आणि काही अंध व्यक्तींनी त्या हत्तीला ओळखण्यास किंवा समजून घेण्यास प्रारंभ केला. हत्तीच्या जा भागाला त्यांनी स्पर्श केला, हत्ती अगदी तसाच दिसत असेल अशी ते कल्पना करू लागले. ज्याने सोंडेला स्पर्श केला त्याला वाटले हत्ती हा लांबलचक आणि खडबडीत प्राणी आहे. ज्याने त्याच्या दातांना स्पर्श केला तो म्हणाला हत्ती हा दगडासारखा टणक आहे. दुसर्‍या एकाचा हात हत्तीच्या पोटाला लागला आणि तो म्हणाला हत्ती हा प्रचंड मोठा आणि मऊ आहे. मात्र, त्यांना हत्तीचे पूर्ण रुप काही गवसले नाही.
एकाच सत्याचे विविधांगी आकलन होणे याच कारणामुळे आपण जगात अनेक भेद असल्याचे बघतो. प्रत्यक्षात, विविध भेद म्हणजे हत्ती नाही तर हे सगळे मिळून हत्ती आकारास येतो.
आपल्या मनाची स्थितीही या तीन अंधांपेक्षा वेगळी नाही. माणसे, वस्तू आणि नाती यांच्या बाबतीत आपली गत हत्तीचे स्वरुप ओळखण्यासारखीच होते. अपूर्ण आकलनामुळे आपल्या वाट्याला द��:ख येते.
गीतेचा प्रवास हा अपूर्ण आकलनाकडून पूर्ण समज येण्याचा प्रवास आहे. 80-20 तत्त्वाप्रमाणे, हे समजून घेण्याच्या दृष्टीने पुढे टाकलेली काही पावलेदेखील आपल्या जीवनात आनंद निर्माण करू शकतात.
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
महेंद्रसिंह धोनीच्या जागेवर हा खेळाडू सांभाळणार धुरा! आर. अश्विन म्हणाला..
0 notes
pradip-madgaonkar · 2 months ago
Text
Pradip aani बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती.. बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं... तितक्यात Pradip नं ब्रह्मास्त्र काढलं... तो लगेच म्हणाला...
Pradip : सॉरी...
बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...
😀😀😀😁😁😁🤣🤣🤣😆😆😆
0 notes
ashokjagharkar · 1 year ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४९
सकाळीं पायीं फिरण्याचा फेरफटका आटपून अनंत घरी परतला, तेव्हां नाश्ता तयारच होता. नाश्ता संपवून त्याने बाल्कनीच्या दारासमोर खुर्ची ओढून घेतली आणि एकीकडे गरमागरम चहाचे घुटके घेत तो वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या हेडलाईन्स पाहूं लागला. तेवढ्यांत बाजूलाच ठेवलेला मोबाईल वाजला. येत असलेला काॅल कुणाचा पाहून तो घेत, कीचनमधे चहा-नाश्त्याची भांडी हातासरशी धुुवीत असलेल्या शुभदाला त्याने आवाज दिला, "शुभदा, लौकर बाहेर ये. योगेशचा फोन आला आहे, तो मी स्पीकरवर टाकतोय्!" "गुड माॅर्निंग, बाबा!" पलीकडून अभिवादन करीत योगेशने विचारलं, "आई जवळपास नाहींत कां?" "अरे ती कीचनमधे आहे! येईलच इतक्यात. तुझा फोन आल्याचं मी तिला सांगीतलं आहे" "तर मग आधी स्पीकर बंद करा, प्लीज!" योगेश घाईघाईने म्हणाला, "मला जे कांही सांगायचं आहे ते बोलून झाल्यावर स्पीकर पुन: ऑन करा!" योगेशला आपल्या एकट्याशी काहीतरी महत्वाचं ���ोलायचं आहे हे ओळखून अनंतने चट्कन स्पीकर बंद केला आणि मोबाईल कानाच्या अगदी जवळ नेऊन हलकेच म्हणाला , "केला बंद स्पीकर! आतां तूं सरळ बोलत रहा योगेश! शुभदा मधेच बाहेर आली तरी मी सांभाळून घेईन. आज जयूऐवजी तूं काॅल केलेला बघितल्यावरच वाटलं होतं की तुला तसंच महत्वाचं कांही बोलायचं असणार! काय विशेष?" त्यानंतर जवळ-जवळ ५-७ मिनिटे योगेश अनंतशी दबत्या आवाजांत बोलत राहिला! त्या��त खंड पडला तो फक्त शुभदाच्या बाहेर येण्याने. ती आली तशी अनंत निर्विकार मुद्रेनं चुकचुकत तिला म्हणाला, "कट झाला बहुतेक! पण योगेश पुन: लगेच करीलच. तोपर्यंत तूं कीचनमधे जे काय काम राहिलं आहे ते उरकून लगेच बाहेर येऊन बस;--म्हणजे पुन्हां ये-जा करायला नको!" जे महत्वाचं सांगायचं होतं ते बोलून झाल्यावर योगेश म्हणाला, "आतां हा काॅल कट करून मी पुन्हां नव्याने करतो, तेव्हां तुम्ही स्पीकर ऑन करा. म्हणजे चौघांनाही एकत्र बोलतां येईल! हो, जयश्रीही बाजूलाच आहे!"
दोनच मिनिटांत योगेशचा नव्याने फोन आला तेव्हां लगबगीने बाहेर येत शुभदा म्हणाली, "आज योगेश फोन करतोय् म्हणजे नक्कीच कांहीतरी खास असणार!" "योगेश, शुभदा आली आहे आणि फोनही स्पीकरवर आहे! तूं बोल आतां!" "आई आणि बाबा, जयश्री माझ्या बाजूलाच बसली आहे! पण ती स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे, म्हणून मीच सांगतो! तुम्ही लौकरच आजी-आजोबा होणार आहांत!!" अनंत आणि शुभदा चकीत झाल्यागत एकमेकांकडे बघतच राहिले! पण स्वत:ला चट्कन सांवरीत अनंतने दोघांचं उत्साहाने अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या तर शुभदा थरथरत्या आवाजांत उद्गारली, "अग्गोबाई! खरंच की काय!" आनंदाच्या आवेगात तिला कांंही क्षण पुढे बोलायला सुधरेचना! आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पुसत शुभदा मग म्हणाली, "जयू, तूं आणि योगेश खोटं सांगणार नाहीं याची खात्री असली तरी, अजूनही जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नाहीं ग!" "तसं होणं साहजिक असलं तरी योगेशने सांगीतलं ते १०० % खरं आहे, आई! आम्ही दोघांनीही डॉक्टरांकडून पक्की खात्री करून घेतल्यावरच तुम्हांला आज ही हवीहवीशी बातमी कळवली आहे!" एकीकडे स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवायचे आटोकाट प्रयत्न करीत, पण तरीही भरल्या गळ्याने आईला आश्वस्त करीत जयश्री म्हणाली. यावर काय बोलावं ते अनंत वा शुभदा दोघांनाही न सुचल्याने आणखी कांही क्षण अवघडल्या शांततेत गेल्यावर योगेश समजूतदारपणे म्हणाला, "आई आणि बाबा, तुमच्यासाठी हा धक्का कितीही सुखद असला तरी आकस्मिक आणि अनपेक्षित आहे! त्यामुळे तुमच्या मनांत काय काय प्रश्न उपस्थित होतील याचा विचार करून मी तुमच्या विविध संभाव्य प्रश्नांची उत्तरे देणारी एक खुलासेवार मेल तयार केली आहे! बाबा, मी तुम्हांला ती लगेच पाठवतो. तुम्ही दोघांनी ती शांतपणे वाचा, समजून घ्या आणि विचार करा! मग आपण उद्यां सकाळी याच सुमारास त्याबद्दल शांत चित्ताने पुन: बोलुयां!"
खरं तर मेल वगैरे न पाठवत���ं योगेशने फोनवरच आवश्यक ते सर्व तपशील अनंतला समजावून सांगीतले होते! पण शुभदासमोर तर ठरल्यानुसार मेलचं लटकं नाटक करणं भाग होतं! त्यासाठी अनंत बेडरूममधून आपला लॅपटॉप घेऊन आला आणि तो चार्जिगसाठी लावला. अजूनही किंकर्तव्यमूढ अवस्थेत असलेल्या शुभदाच्या जवळ बसत तिला ऐकूं जावं इतपत मोठ्या आवाजांत अनंत म्हणाला, " १५-२० मिनिटांनी मेल चेक करून बघुयां योगेशने एवढा कसला खुलासा केला आहे!" त्याच्या आवाजाने शुभदा खाडकन् भानावर आली! दोन्हीं भुंवयावरचा कपाळाचा भाग गच्च दाबून धरीत, खेदाने मान हलवीत ती म्हणाली, " मला तर कांहीच सुधरत नाहींये! लग्नानंतर म्हणे दोघांनी विचारपूर्वक ठरवलं होतं की आपल्याला मूलच नको! पहिली ५-७ वर्षें मी दातांच्या कण्या केल्या की बाबांनो वेळच्या वेळी मूल व्हायला हवं! पण जयू म्हणजे मुलुखाची हट्टी, 'एकदां ठरवलं ते पक्कं' बाण्याची!! भरीस भर म्हणजे तिला योगेशची साथ! मग काय, एवढी वर्षं वायां घालवली आणि आतां चाळिशीच्या उंबरठ्यावर दोघे आई-बाबा व्हायला निघालेत! -- आणि वरातीमागून घोडी नाचायला हवीत तसे आपण आजी आणि आजोबा!" शुभदाच्या अस्वस्थ मनाची घालमेल आणि चिडचिड लक्षांत येऊन तिला समजवायचा प्रयत्न करीत अनंत म्हणाला, "शुभदा, आपण त्रागा करण्यांत काय अर्थ आहे? योगेश आणि जयू दोघेही चांगले शिकलेले आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रांत झोकून देऊन काम करताहेत! म्हणजे दोघेही साधक-बाधक विचार करण्याएवढे सुजाण आणि सक्षम आहेत ना? मग त्यांनी एकमताने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आपण विरोध कां करायचा? लग्नानंतर त्यांनी मुलांबद्दल घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील मग भले ती आपल्याला पटोत वा न पटोत! -- आणि आतां जर तो निर्णय त्यांनी बदलला असेल तर त्याची कारणं आपण समजून तरी घ्यायला हवीत ना?"
२७ जुलै २०२३
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
हरियाणात प्रचारापासून मोदी गायब पण बलात्कारी गुरमीत राम रहीम म्हणाला ‘ वोट फॉर बीजेपी ‘ 
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी येणार असून दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांपासून पंतप्रधान मोदी यांनी अक्षरशः पलायन करत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. नेहमीप्रमाणे मोदी यांच्या प्रचाराची दिशा ही काँग्रेस विरोधीच असून तब्बल दहा वर्षांपासून अधिक काळ झाला तरी देखील काँग्रेसवर टीका  सोडून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात विशेष काही आढळून येत नाही.  वाशिम इथे…
0 notes
bandya-mama · 8 months ago
Text
Bandya ने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं.
कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले.
यावर Bandya म्हणाला, “मला माहीत नव्हतं,
नाहीतर, मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं.”
भोळा स्वभाव, दुसरं काय!
😅😅😅😀😀😀🤣🤣🤣😂😂😂
0 notes
shrikrishna-jug · 9 months ago
Text
“आई”म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलीजन्स
आज खूप दिवसांनी आम्ही तिघं, म्हणजे मी,प्रो.देसाई आणि प्रो.पोंक्षे एकत्र तळ्यावर जमलो होतो.आज प्रो.पोंक्षे आम्हाला त्यांच्या अलीकडेच्या सायन्स मेळाव्याच्या गप्पागोष्टी आणि त्यांना आवडलेलं सर्वात उत्तम भाषणाचा आढावा वजा मनोरंजक माहिती सांगणार होते. सुरवात करताना ते हसत हसत म्हणाले,“ह्या तरूण प्रोफेसरचं भाषण मला प्रभावशाली वाटलं.तो सुरवात करताना म्हणाला,महाराष्ट्रात मातेला “आई” म्हणतात. प्रत्येक…
View On WordPress
0 notes