#प्रशासनाकडून
Explore tagged Tumblr posts
Text
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन - महासंवाद
पुणे,दि. १: पेरणे येथील विजयस्तंभ हे एक प्रेरणास्थान असून देशातील, राज्यातील लाखो अनुयायी येथे अभिवादनासाठी येत असतात. येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाकडून चांगल्या प्रकारच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, असे विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. मंत्री श्री. भरणे यांनी सकाळी पेरणेफाटा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉक्टर सिंग यांचा पार्थिव देह आज सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी तसंच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी डॉक्टर सिंग यांचं अंत्यदर्शन घेतलं. काहीवेळापूर्वीच डॉ. सिंग यांची अंत्ययात्रा निगमघाटाकडे निघाली असून या अंत्यसंस्काराचं आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारण सुरु आहे. दरम्यान, डॉ सिंग यांचं यथोचित स्मारक बांधण्यासाठी सरकार जागा देऊ करणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. स्मारकासाठी जागा देण्याची विनंती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा यांनी सिंग यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना ही माहिती दिली.
मुंबईत विविध रस्त्यांची निकृष्ट बांधणी करणाऱ्या कंत्राटदारांसह रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या गुणवत्ता व्यवस्थापन संस्थांनाही मुंबई महापालिकेनं ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. काँक्रिटच्या रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मुंबईतले रस्ते आणि त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतलं आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर, असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्त्यांची कामे सुरू आहेत. या रस्त्यांच्या दर्जाबाबत आलेल्या तक्रारीनंतर शहरात आणि उपनगरात ��िविध कामांसाठी पालिकेकडून कंत्राटदारांना दंड ठोठावण्यात आला आहे.
नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या विविध भागात अवैध वाहतूक तसंच अवैध मद्यविक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३१ डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना मद्य उपलब्ध होत असल्यास, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसंच नागरिकांनादेखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातही राज्य उत्पादन शुल्क विभागाची, भरारी पथकं विविध हातभट्टी ठिकाणं, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकून कारवाई करत आहेत. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात अवैध विक्री, मद्यनिर्मीती तसंच वाहतुक प्रकरणी गेल्या १ मार्चपासून आतापर्यंत विशेष मोहीम राबवून २ कोटी २८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून १ हजार २२९ व्यक्तींवर गुन्हे नोंदवले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री तसंच साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस विभाग यांनी स्वतंत्ररित्या पथकं तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी आणि या आदेशाचं पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था शिक्षेस पात्र राहतील, असं जिल्हा दडाधिकाऱ्यांनी याबाबतच्या आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र -सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक -विषमचिकित्सा पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. संबंधित व्यावसायिक, महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणं आवश्यक असणार आहे.
सात लाखाचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यानं गोंदिया पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे. देवा सुमडो मुडाम असं या माओवाद्याचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर इथला आहे. आत्मसमर्पित माओवादी देवा अति नक्षल प्रभावित भागात असल्यानं बालपणापासूनच तो नक्षल चळवळीत सहभागी झाला होता.
लातूर महानगरपालिकेच्या कर संकलन आणि ��र आकारणी विभागानं २५ डिसेबंर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ पर्यंत व्याज-शास्तीमध्ये ७५ टक्के सुट दिली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन मालमत्ताधारकांनी देय असलेल्या मालमत्ताकराचा भरणा करावा आणि जप्ती सारखी कारवाई टाळावी असं आवाहन लातूर महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. पालघर जिल्ह्यात सध्या धुक्याची चादर पसरली असून, हवेत गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. काही भागात तुरळक सरी कोसळल्या, तर धडगाव तालुक्यातल्या काकर्दे इथं अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका जिल्ह्यातल्या पिकांना, तसंच आंबा उत्पादनावर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नांदेड मार्गे जाणाऱ्या हैदराबाद-जयपूर-हैदराबाद आणि काचीगुडा-बिकानेर-काचीगुडा या विशेष रेल्वेगाड्यांना मुदत वाढ देण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतला आहे. हैदराबाद-जयपूर - हैदराबाद या विशेष रेल्वेगाडीला येत्या तीन जानेवारी पासून, जयपूर-हैदराबाद - जयपूर या विशेष रेल्वेगाडीला येत्या पाच तारखेपासून तर काचीगुडा-बिकानेर-काचिगुडा आणि बिकानेर-काचीगुडा बिकानेर या विशेष रेल्वेगाडीला अनुक्रमे येत्या चार आणि सात तारखेपासून पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
0 notes
Text
जालना विधानसभा मतदार संघात 63.63 % (प्रा.अंदाजे)एकूण :- 221692
*जालना विधानसभा मतदार संघात आज बुधवारी सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत आज रात्री ८ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार झालेले एकूण मतदान पुरुष :- 180629स्त्री :- 163587इतर :- 0036एकूण 344252 पैकीझालेले मतदान 👇🏻पुरुष :- 117070स्त्री :- 104613इतर :- 09एकूण :- 221692झालेली टक्केवारी :-63.63 % (प्रा.अंदाजे) अंतिम आकडेवारी येण्याअगोदरची आकडेवारी Jalna Assembly Constituency 63.63%…
0 notes
Text
आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू , मनपा प्रशासनाकडून जाहिरातबाजांना ब्रेक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील कथित कार्यसम्राटांच्या कथित विकास कामांची चर्चा व्हावी म्हणून नगर शहरात सर्वत्र रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली जाहिरातबाजी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच हटवण्यात आलेली आहे. संपूर्ण नगर शहरात सातत्याने एकच चेहरा नगरकरांच्या समोर राहावा या उद्देशाने दिसेल तिथे ही जाहिरातबाजी करण्यात आलेली होती.…
0 notes
Text
Pune : अन्न व औषध प्रशासनाकडून 14 लाखांचा दुध, खवा, पनीर जप्त
Pune : अन्न व औषध प्रशासनाकडून 14 लाखांचा दुध, खवा, पनीर जप्त – MPC…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/santatadhar-in-mumbai-water-entered-many-societies-school-holidays/
0 notes
Text
बदल्यांत सावळा गोंधळ; कार्यरत शिक्षकांच्या बदलीपूर्वी नवीन नियुक्ती, संघटनेचे प्रशासनाला निवेदन
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या नियुक्ती देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कार्यरत शिक्षकांची बदलीप्रक्रिया राबविण्यापूर्वीच जिल्ह्यात नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक…
View On WordPress
#education department#nashik education department#Nashik news#nashik ZP#primary teachers#ग्रामविकास विभागाअंतर्गत भरती#शालेय शिक्षण विभाग#शिक्षक नियुक्ती
0 notes
Text
नाशिकमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास सुरूवात
नाशिक : बऱ्याच वाद आणि गोंधळानंतर अखेर नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. २४) रात्री ११ वाजेच्या सुमारास दारणा धरणातून १०० क्यूसेकने विसर्ग करण्यात आला. मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या पथकाच्या उपस्थितीत पाणी सोडण्यात आले. लवकरच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून हळूहळू विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले…
View On WordPress
0 notes
Text
PM Kisan | पीएम किसान योजनेच्या १४ व्या हप्त्यासाठी 'ही' अट करा पूर्ण
PM Kisan | पीएम किसान योजना (PM kisan Yojana) ही केंद्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना अर्थसहाय्य केले जाते. देशातले बहुसंख्य शेतकरी सध्या या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही हप्त्यांमध्ये पीएम किसान सन्मान निधी मिळतो. दोन हजार प्रति हप्ता या प्रमाणे शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार मिळतात. 14 th Installment | १४ व्या हप्त्यासाठी ही अट बंधनकारक पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. मात्र शेतकरी आता पुढच्या म्हणजेच १४ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागणार आहे. इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास (Aadhar Number) जोडणे बंधनकारक केले आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडावे लागणार यामुळे बँक खाते ( Bank Account) आधार क्रमांकास जोडण्याची सुविधा आता प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सुविधा गावातील पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध असणार आहे. तेथील पोस्ट मास्टर शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडून देण्यासाठी मदत करणार आहेत. IPPB | इंडिया पोस्ट पेमेंट बँक देणार सुविधा यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसला भेट द्यावी. यानंतर पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी अवघ्या ४८ तासात जोडले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गावपातळीवर मोहीम राबवणार महत्त्वाची बाब म्हणजे आयपीपीबी मार्फत १ ते १५ मे या कालावधीत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहान करण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. Read the full article
0 notes
Text
सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, प्रशासनाकडून अलर्ट जारी
https://bharatlive.news/?p=88545 सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, ...
0 notes
Text
निवडणूक प्रचारासाठी कोल्हापुरात १ हजार ४०६ अर्जांना परवानग्या - महासंवाद
कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : विधानसभा निवडणूक 2024 लढविणाऱ्या उमेदवारांना प्रचाराच्या अनुषंगाने लाऊडस्पीकर, हेलिकॉप्टर आणि हेलिपॅड, पक्षाचे तात्पुरते कार्यालय उघडणे, पॅम्प्लेट वाटप, व्हिडिओ व्हॅन, सभा, रॅली, मिरवणूक, बॅनर, पोस्टर, होर्डिंग, वाहन तसेच अन्य आवश्यक त्या परवानग्यांची आवश्यकता असते. त्याअनुषंगाने विविध परवानग्या देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून एक खिडकी कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाकडे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०६ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भूवनेश्वर इथं आंबेडकर यां��ा आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात देखील आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. समता आणि माणसांच्या सन्मानासाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत असल्याचं, पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केलं. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी, भारताची लोकशाही बळकट करण्याचं काम राज्यघटनेनं केलं असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपला देश उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचं नमूद केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्यतेचं उच्चाटनं करणं हीच आंबेडकरांना आपण वाहिलेली खरी श्रद्धांजली असेल, असंही राज्यपाल म्हणाले. भारत संविधानच्या मार्गानंच जगातली महाशक्ती बनू शकतो, भारताच्या संविधानानुरुप आपलं आचरण असेल आणि कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा महत्वाचं भारताचं संविधान असेल, असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. आंबेडकरांचे विचार जागृत ठेवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं, तर महायुतीचं सरकार आंबेडकरांचे विचार आणि संविधानाला आदर्श मानून कारभार करेल आणि व्यापक जनहिताचेच निर्णय घेईल, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सभा आणि कार्यक्रम होत आहेत. हिंगोली इथल्या डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरात अनुयायांची मोठी गर्दी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दर सहा पूर्णांक पाच इतका कायम ठेवला आहे. बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज ही माहिती दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. भारत मंडपम इथं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारतातल्या आठही राज्यांची सं��्कृती, वस्त्रोद्योग, कलाकुसर, पर्यटनाच्या संधी आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या प्रदर्शनाचा समावेश असेल. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांमधले अडीचशे कारागीर या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून काल दुपारी प्रोबा-3 या उपग्रह वाहून नेणाऱ्या पी एस एल व्ही सी - 59 या प्रक्षेपकाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. युरोपीय अंतराळ संस्थेच्या प्रोबा 3 उपग्रहांना यशस्वीरीत्या कक्षेत स्थापित करण्यासाठी पीएसएलव्ही सी 59 चं प्रक्षेपण करण्यात आलं असल्याची माहिती इस्रोनं दिली आहे. प्रोबा 3 ही युरोपियन अंतराळ संस्थेची महत्त्वाची मोहीम असून त्याअंतर्गत आणखी दोन उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत.
राज्यसभेत काल भारतीय वायुयान विधेयक २०२४ मंजूर झालं. लोकसभेत हे विधेयक पावसाळी सत्रात मंजूर झालं आहे. या विधेयकात विमानाचं उत्पादन, देखरेख, दुरुस्ती, आयात तसंच अपघात झाल्यास त्याची चौकशी याबद्दलचे नियम आहेत. गेल्या १० वर्षात देशभरात साडेदहाहजाराहून अधिक नवीन टपाल कार्यालयं उघडली असून, त्यातली ९० टक्के कार्यालयं ग्रामीण भागात, तर पाच हजाराहून अधिक कार्यालयं नक्षलवादी चळवळीने प्रभावित क्षेत्रात आहेत, अशी माहिती, केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी राज्यसभेत दिली.
लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या किल्लारी इथल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादकांच्या हस्ते काल करण्यात आला. कारखान्याचा गळीत हंगाम सुरु झाला असल्यामुळे ऊस उत्पादकांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्यास पुरवठा करुन सहकार्य करावं, असं आवाहन कारखाना प्रशासनाकडून यावेळी करण्यात आलं.
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना ॲडलेड इथं सुरु झाला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत एक - शून्यनं आघाडीवर आहे.
येत्या दोन दिवसात, राज्याच्या बहु��ांश भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात पहाटेपासून ढगाळ वातावरण असून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
0 notes
Text
जालना विधानसभा मतदार संघात 63.63 % (प्रा.अंदाजे)
*जालना विधानसभा मतदार संघात आज बुधवारी सकाळी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत आज रात्री ८ वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार झालेले एकूण मतदान पुरुष :- 180629स्त्री :- 163587इतर :- 0036एकूण 344252 पैकीझालेले मतदान 👇🏻पुरुष :- 117070स्त्री :- 104613इतर :- 09एकूण :- 221692झालेली टक्केवारी :-63.63 % (प्रा.अंदाजे) अंतिम आकडेवारी येण्याअगोदरची आकडेवारी Jalna Assembly Constituency 63.63%…
0 notes
Text
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा !
रिक्षामध्ये विसरलेली बॅग आणि सोन्याचा हार केला परत, पोलीस प्रशास���ाकडून रिक्षाचालकाचे होतेय कौतुक कुडाळ : मुंबईस्थित असलेल्या सुनीता दिनकर परब (वय-७८ वर्षे) आणि जान्हवी जगन्नाथ परब (वय-४० वर्षे, सध्या काळसे, धामापूर-पिंपळवाडी) या काळसे-धामापूर येथून कुडाळला रिक्षाने कुडाळ बसस्थानक येथे आल्या. पण सुनीता परब आपली बॅग रिक्षात विसरल्या. त्यांनी बराच वेळ रिक्षाचा शोध घेतला. परंतु, रिक्षा मिळून न…
View On WordPress
0 notes
Text
Pimpri : शहरातील 27 घाटांवर गणेश विसर्जनाची तयारी
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील इंद्रायणी, मुळा आणि पवना नदीवरील 27 घाटांवर गणेश विसर्जनाची तयारी करण्यात ( Pimpri) आली आहे. पालिकेकडून प्रत्येक घाटावर जीव रक्षक तसेच लाईफ जॅकेट, रिंग, बोट, मेगाफोन, दोरी अशी आवश्यक सर्व साधने पुरविण्यात आली आहेत. शहरात उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून नदीकिनारी असलेले घाट…
0 notes
Text
सरपंचांच्या हातून शिल्लक कालावधीत अधिकाधिक लोकपयोगी कामे व्हावीत ;अजित पवार
सरपंचांच्या हातून शिल्लक कालावधीत अधिकाधिक लोकपयोगी कामे व्हावीत ;अजित पवार
केज : बीड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचा कार्यकाळ संपत आला असून शिल्लक कालावधीतही सरपंचांच्या हातून अधिकाधिक लोकोपयोगी कामे व्हावीत, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. विकासकामांसाठी सरपंचांना जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाकडून सर्वोतपरी सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केज पंचायत…
View On WordPress
0 notes