#पोलीस निरीक्षक ठार
Explore tagged Tumblr posts
Text
समृध्दीवर महिला पोलीस निरीक्षक ठार; भरधाव ‘बीएमडब्ल्यू’ दुभाजकावर धडकली; महिला ठार
हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला. त्यात पोलीस निरीक्षक रेखा चव्हाण यांचा मृत्यू तर सहायक पोलीस उप निरीक्षक सुखविंदर्सिंग मिठ्ठू जगड़ा, चालक शम्मी कुमार, आरोपी वैद्यनाथ शिंदे हे जखमी झालेत. जखमींना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फसवणुकीचा गुन्ह्यात आरोपी असलेल्या शिंदे यास नागपूरला नेण्यात येत होते. या पोलीस…
View On WordPress
0 notes
Text
महामार्गावर अपघात, १ ठार
महामार्गावर अपघात, १ ठार
कुडाळमधील घटना कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर रविकमल हॉल लक्ष्मीवाडीनजीकच्या ब्रिजवर रस्त्यावरील डीवायडरला मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. दोघेजण पावशी येथील असल्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले. हा अपघात आज रात्री ८.३० च्या सुमारास झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्री मेंगडे आहेत. रोहन नाईक, कोकण नाऊ, कुडाळ
View On WordPress
0 notes
Text
ईनेव्हा ॲपे रिक्षा अपघातात चार ठार आठ गंभीर जखमी : जखमी पैकी दोघांना लातूरला हलविले
ईनेव्हा ॲपे रिक्षा अपघातात चार ठार आठ गंभीर जखमी : जखमी पैकी दोघांना लातूरला हलविले
वडिलांचे क्रियाकर्म आटोपून जात असताना काळाचा घाला ! केज-अंबाजोगाई रस्त्यावरील होळ जवळ भीषण अपघात घटनास्थळी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार आणि सहायतक पोलीस निरीक्षक यांची भेट गौतम बचुटे/केज :- वडीलांच्या मृत्यू नंतर सावडण्याच्या कार्यक्रम आटोपून आंबेजोगाईकडे जात असलेल्या रिक्षाला एका भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील तीन प्रवासी व…
View On WordPress
0 notes
Text
ट्रकचा अपघात ; मालकासह चार मजूर ठार
ट्रकचा अपघात ; मालकासह चार मजूर ठार
ट्रकचा अपघात ; मालकासह चार मजूर ठार मुक्ताईनगर : प्रतिनिधी बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्या टँकरमध्ये दुध टाकत असतांना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने हे टँकर्स व क्रेनला धडक दिल्याने मालकासह ४ मजूर जागीच ठार झाले आहे. या अपघातासंदर्भांत पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधून सांगतिले असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सविस्तर माहिती अशी की, धुळ्याहून दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 September 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ सप्टेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अहमदाबादमध्ये नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय निरीक्षकांसह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं पक्षाचे राज्य प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितलं. निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि नरेंद्र तोमर गुजरातला भेट देणार आहेत. पक्षाचे सर्व आमदार केंद्रीय निरीक्षकांसह बैठकीला उपस्थित राहतील. नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय बैठकीत घेतला जाईल, असं सांगण्यात येत आहे.
****
राज्य सरकारनं तत्काळ महिला आयोगाच्या सदस्यांची नेमणूक करावी आणि पीडितेच्या नातेवाईकांना निर्भया फंडातून मदत जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी केली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरातील पीडितेच्या नातेवाईकांची भेट घेतल्यानंतर, त्या बोलत होत्या. राज्यातील कायदा सुव्यस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे, दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. पोलिसांच्या उपस्थिती संदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलेलं वक्तव्य द��र्देवी असून या वक्तव्याची दखल घेतली आहे. दिल्लीत जाऊन याप्रकरणी कारवाई संदर्भात चर्चा करू असंही त्या म्हणाल्या.
****
देशात आतापर्यंत ७३ कोटी ८२ लाख सात हजार ३७८ नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. कालच्या दिवशी लसीच्या जवळपास साडेचौसष्ट लाख मात्रा देण्यात आल्या. देशात काल २८ हजार, ५९१ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून ३३८ नागरिकांचा मृत्य झाला. तर ३४ हजार ८४८ जण कोरोना विषाणू मुक्त झाले. भारतात ��ध्या एकूण सक्रीय रुग्ण संख्या तीन लाख, ८४ हजार, ९२१ झाली आहे. देशात मृतांची संख्या आता चार लाख ४२ हजार ६५५ झाली आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीत देशातल्या कोरोना विषाणू संसर्ग स्थितीचा आढावा काल घेण्यात आला. यामध्ये, जगात काही देशांसह भारतातल्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चर्चा झाली.
****
इतर मागासवर्गीय- ओ.बी.सी. आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय धक्कादायक असून हा निर्णय म्हणजे कायदाच आहे. तो देशाला लागू असल्यानं ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याची प्रतिक्रिया राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, आरक्षण कुठल्याही स्थितीत टीकवण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी एम्पिरिकल डेटा मिळवून आरक्षण टीकवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दरम्यान केंद्र सरकारनं केलेली जनगणना आणि त्याची आकडेवारी, तातडीनं राज्याला द्यावी, अशी राज्य सरकारची मागणी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण ९९ टक्के भरलं आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणातून तीन ते चार हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या दिग्रस बंधारा आणि नांदेड नजिकचा विष्णुपुरी प्रकल्प काल पुन्हा शंभर टक्के भरला. त्यामुळे पुन्हा गोदावरी नदीत कधीही पाणी सोडल्या जाऊ शकते, असं पाटबंधारे विभागानं सूचित केलं आहे. परिणामी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.
****
परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील केकरजवळा इथं पहाटे फिरण्यासाठी गेलेल्या चार जणांना एका वाहनानं धडक दिली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. धडक दिल्यानंतर सदरील वाहन घटनास्थळावरुन पसार झाले. उत्तमराव लाडाने आणि आत्माराम लाडाने अशी मृतांची नावे आहेत. जखमींना परभणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात जिंतूर-सेनगाव राज्य महामार्गावर पुलाच्या अर्धवट बांधकामात भरधाव दुचाकी घुसून झालेल्या अपघातात दोन ��ुवक जागीच ठार झाले. मध्यरात्री ही दुर्घटना घडली. मृत दोघे खानापूर चित्ता इथले रहिवासी आहेत.
****
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. संघटनेच्या उर्वरित २१ जागांसाठी येत्या २४ सप्टेंबरला पुणे इथं निवडणूक होणार असून ६४ उमेदवार रिंगणात आहेत.
****
इंग्लंडच्या १८ वर्षीय एम्मा रादुकानू हिनं खुल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेचं महिला एकेरीचे विजेतेपद जिंकून इतिहास घडवला आहे. गेल्या ५३ वर्षात ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली ब्रिटिश महिला ठरली आहे. एम्मा रादुकानूने कॅनडाच्या लीलाह फर्नांडिजचा ६-४, ६-३ असा पराभव करून या ग्रँड स्लॅड स्पर्धेचे विजेतेपद मिळवलं. या दोन्हीही खेळाडू प्रथमच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 April 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० एप्रिल २०२१ सायंकाळी ०६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, वेळोवेळी साबणाने हात धुवावेत. हात आणि तोंड स्वच्छ ठेवावं. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
** कोविडच्या सौम्य लक्षणांसाठी केंद्र सरकारच्या शास्त्रीय सल्लागार कार्यालयाकडून उपाय योजना जारी
** माजी महाधिवक्ता सोली सोराबजी, ज्येष्ठ पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन
** जालना जिल्ह्यात १० तर औरंगाबाद जिल्ह्यात आज १४ कोविडग्रस्तांचा मृत्यू
आणि
** राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन कोटी रुपये मदत
****
कोविडची सौम्य लक्षणं असल्यास घरीच योग्य खबरदारी घेऊन संसर्गावर मात करणं सहज शक्य असल्याचं, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या शास्त्रीय सल्लागार कार्यालयाकडून कोविड व्यवस्थापनाबाबत उपाय योजना जारी केल्या आहेत, त्यात सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणासाठी या कार्यालयानं आवश्यक उपाय सांगितले आहेत. कोविडची प्राथमिक लक्षणं आढळताच, रुग्णांनी विलगीकरण करून घ्यावं, आराम करावा, पाणी तसंच पेय पदार्थांचं सेवन करत राहावं, खोलीमध्ये हवा खेळती ठेवावी, रक्तातलं प्राणवायूचं प्रमाण तसंच शरीराचं तापमान सतत तपासत राहावं, मात्र प्राणवायूचं प्रमाण ९२ टक्क्यांपेक्षा कमी झाल्या���, किंवा ताप उतरत नसल्यास, तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं यात म्हटलं आहे.
****
देशाचे माजी महाधिवक्ता पद्मविभूषण सोली सोराबजी यांचं आज कोविड संसर्गानं निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. सोराबजी यांनी अनेक प्रतिष्ठीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या महत्त्व���ूर्ण पदांवर काम केलं होतं. १९९७ साली सोराबजी यांची नायजेरियासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
आजतक या हिंदी वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ पत्रकार आणि वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज हृदय विकाराच्या झटक्यानं दिल्ली इथं निधन झालं. ते ४२ वर्षांचे होते. गेल्या २४ तारखेपासून ते कोविड संसर्गानं आजारी होते. उपचारादरम्यान, आज त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन, त्यात त्यांचं निधन झालं. २०१८ साली सरदाना यांना पत्रकारितेतल्या मानाच्या गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
सोराबजी, तसंच सरदाना यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसा��ण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मिस्टर इंडिया किताब पटकवलेले शरीरसौष्ठवपटू जगदीश लाड यांचं आज बडोद्यात कोविड संसर्गानं निधन झालं, ते ३४ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथले रहिवासी असलेले जगदीश लाड हे नुकतेच नवी मुंबईतून बडोदा इथं स्थायिक झाले होते. मुंबई बॉडीबिल्डिंग असोसिएशन, तसंच महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनने लाड यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
उस्मानाबाद इथंले ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार तिलोकचंद बेदमुथा यांचं हैदराबाद इथं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. कोविडची लागण झाल्याने त्यांच्यावर हैद्राबाद इथं उपचार सुरू होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.
****
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकशे बाराव्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून गावांना स्वयंपूर्ण होण्याचा उपदेश केला असून समाजाला एकसंध ठेवण्याचे त्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत असं ठाकरे यांनी म्हटलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तुकडोजी महाराजांना अभिवादन करताना, स्वातंत्र्य संग्रामात आणि स्वातंत्र्योतर काळात त्यांचं योगदान महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही तुकडोजी महाराजांना आदरांजली वाहिली.
****
नांदेड इथं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर उद्धव भोस��े यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १० कोविड बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या आता ७५८ झाली आहे. दरम्यान, आज ६८३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ४६ हजार ४८८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या ७५२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ३८ हजार ८८१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या ६८४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या चौदा कोविड बाधितांचा आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यत दोन हजार ४९८ रुग्ण दगावले आहेत. आजच्या मृतांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या आठ, जालना जिल्ह्यातल्या दोन, तर बीड आणि नाशिक इथल्या प्रत्येकी एका कोविड बाधित रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, घाटीचा बाह्यरुग्ण विभाग उद्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त बंद राहणार असून रविवारी नेहमी प्रमाणे विभाग सुरु राहणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज एक हजार ५२० नवे कोविड बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये सर्वाधिक २९८ रुग्ण हे बीड तालुक्यातील असून अंबाजोगाई २३६, केज १९८, आष्टी १८७, गेवराई १५५, परळी ११६, धारुर ८६, शिरुर ८०, माजलगाव आणि पाटोदा प्रत्येकी ६५ आणि वडवणी इथल्या ३४ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या उपकारागृहातल्या ३८ पैकी १३ कैद्यांना कोविडची लागण झाली आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी या बाबतची माहिती दिली. या बाधित कैद्यांवर मंगळवेढा तहसील उपकारागृहात उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोविड उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन कोटी रुपये मदत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये तर राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य आणि संसद सदस्यांचं एक महिन्याचं वेतन असे एकूण दोन कोटी रुपये मदत देत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. राज्यातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असल्याने राज्याच्या तिजोरीवर अधिक भार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्राला सहाय्य करण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
****
ठाणे महानगर पालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपले तीन महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे, पालिकेतले विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये १५ लाख रुपये जमा होणार असल्याचं, पठाण यांनी सांगितलं आहे.
****
परभणी शहरात सर्व स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसवण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरासह जिल्ह्यात कोविडबाधित रुग्ण तसंच मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचं म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात एका महिलेस डांबून ठेवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शेख शौकत शेख शरीफोद्दिन या आरोपीस तिसरे सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये ही घटना घडली होती
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन-केदारखेडा रोडवर आज दुपारी विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार १७ वर्षीय तरुणी जागीच ठार झाली.
//**********//
0 notes
Text
करुळ घाटात आयशर टेम्पोला अपघात; एक जण जागीच ठार
करुळ घाटात आयशर टेम्पोला अपघात; एक जण जागीच ठार
खारेपाटण : कोल्हापूरहून कणकवलीकडे अंडी वाहतूक करणारा आयशर टेम्पो करूळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल ३०० फुट दरीत कोसळला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव टीमसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच करुळ सह्याद्री जीवरक्षक टीमही मदतीसाठी घाटात दाखल झाली आहे.अंडी…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला; ५ जण ठार
पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर दहशतवादी हल्ला; ५ जण ठार
कराची : पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस उप-निरीक्षक आणि चार सुरक्षारक्षक ठार झाले आहेत. तर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पाकिस्तानमधील जिओ न्यूज या वृत्तवाहिनेने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी मुख्य गेटवर ग्रेनेड हल्ला केला आणि नंतर गोळीबार करत इमारतीत घुसले. दहशतवाद्यांनी केलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 March 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्य�� दिनांक ०४ मार्च २०१९ सकाळी ७.१० मि. **** बहुजन वंचित आघाडीला चार जागा देण्याची महाआघाडीची तयारी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षाची राज्यभर विजय संकल्प वाहन रॅली भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर आणि अवैध व्यावसायिकांना सहकार्य करणाऱ्या जालना पोलीस दलातल्या दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी निलंबित **** बहुजन वंचित आघाडी ही काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत सामिल झाल्यास त्यांना चार जागा देण्याची तयारी असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़सदार अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याच्या अटीबाबत बोलतांना चव्हाण यांनी सांगितलं की, काँग्रेसची भूमि��ा ही कायम संघ विरोधात राहिली आहे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना नेमके काय अपेक्षित आहे, याचा मसुदा दिल्यास काँग्रेस तो मान्य करील असं ते म्हणाले. **** राज्यात काल भारतीय जनता पक्षानं ठिकठिकाणी विजय संकल्प वाहन रॅली काढली. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मराठवाड्यातही विविध ठिकाणी ही रॅली काढण्यात आली. औरंगाबाद शहरातल्या तिन्ही मतदारसंघातून तसंच जालना जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदार संघातून ही रॅली काढण्यात आली. यात खासदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकंत्री बबनराव लोणीकर यांनी सहभाग घेतला. लातूर इथं पालकमंत्री संभाजीराव पाटील निलं��ेकर यांच्या नेतृत्वाखाली तर नांदेड इथं पक्षाचे महासचिव विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. **** शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांचं वितरण काल नाशिक इथं झालं. यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे दिला जाणाऱ्या समाजभूषण पुरस्कारासह, महात्मा जोतीबा फुले तसंच राजर्षी शाहू महाराज आणि संत रविदास यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचा समावेश होता. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. यावेळी बोलतांना बडोले यांनी, राज्य सरकारनं कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृती योजनेंतर्गत जमीन खरेदीसाठीच्या वित्त सहाय्यात आठ लाख रुपयांची वाढ केल्याचं सांगून मुंबईत रविदास भवन उभारण्यासाठी निधी मंजूर केल्याचं सांगितलं. **** आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांद्वारे राज्यातल्या ९० टक्के लोकांना आरोग्य विम्याचं संरक्षण मिळालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पालघर इथं काल अटल आरोग्य महाशिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अटल आरोग्य शिबीर खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहचवणारं शिबिर आहे, असंही ते म्हणाले. **** धनगर समाजाला आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमुळं घेतल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. यासंदर्भात काल नंदुरबार इथं माजी मंत्री पदमाकर वळवी यांच्या नेतृत्वाखाली या संघटनांनी वार्ताहर परिषद घेतली. या राजकीय निर्णयामुळे आदिवासींची कुचंबणा करत, आदिवासी संस्कृतीवरच आघात करण्याचं काम भाजपा सरकारनं केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. चार दिवसात सरकारनं हा न���र्णय मागं घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. प्रत्येक पक्षातल्या आदिवासी लोकप्रतिनीधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल, असंही या संघटनांचं मत आहे. **** गोपीनाथ मुंडे यांनी वाचिंतांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला, तसंच शेतकरी आणि ऊस तोड कामगारांचे प्रश्न सोडवले, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल पवार यांच्या हस्ते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि एका महाविद्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. **** यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा २०१८ सालचा राष्ट्रीय पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांना जाहीर झाला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंती निमित्त येत्या १२ मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राजन यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणच्या शिव मंदीरांमध्ये दर्शनासाठी भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्हात औंढा नागनाथ आणि बीड जिह्यात परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे. **** जालना पोलीस दलातल्या दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी काल तडकाफडकी निलंबित केलं, तर एका पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना सहकार्यच केल्याचं चौकशी अहवालात निष्पन्न झालं होतं. या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सांगितलं. सहायक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, हवालदार रामेश्वर जाधव, कपील जाधव, इंद्रजित काळेबाग, संतोष सावंत, सदाशिव राठोड, रामप्रसाद पहुरे अशी निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावं आहेत. लातूर जिल्ह्यात उमरगा पोलिस ठाण्यात हाणामारी करणाऱ्या चार पोलिसांना पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी निलंबित केलं आहे. **** औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा बाजार तळासमोर दुचाकी दुभाजकाला धडकून काल झालेल्या अपघातात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. मोहसीन युसूफ अत्तार असं मृताचं नावं असून, साहिल सुभान अत्तार गंभीर जखमी झाला आहे. चिकलठाणा एम.आय.डी.सी. पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली. **** लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ होणार आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं काल पशु प्रदर्शन मेळावा घेण्यात आला. यात शेतकरी आणि पशुपालकांना पशुसंवर्धन, विज्ञानावर आधारित आधुनिक शेती आणि शेतीपुरक उद्योग याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. ***** ***
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 March 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३ मार्च २०१९ सायंकाळी ६.०० ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारच्या पाटणा शहरातून लोकसभा निवडणुकीसा��ीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराला सुरवात केली. तिथल्या गांधी मैदानात घेण्यात आलेल्या संकल्प रॅलीत बोलताना ते म्हणाले, की केंद्र सरकार आणि बिहार सरकार रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक क्षेत्रासह कित्येक बाबतीत एकत्रितरित्या काम करत आहे.
सैन्याचं मनोबल खच्ची होईल आणि शत्रूचा फायदा होईल, अशी विधानं विरोधक का करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. यावेळी संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, लोक जनशक्ति पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही विरोधकांवर टीका केली. यानंतर पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या अमेठी इथं ५३८ कोटी रुपये निधीच्या विकासकामांचा प्रारंभ केला. त्यानंतर गौरीगंज इथं आयोजित सभेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
****
उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं महाशिवरात्री निमित्त उद्या कुंभमेळ्यातलं शेवटचं शाही स्नान होणार आहे. यात्रेकरू भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेत, प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आतापर्यंत सुमारे २२ कोटी भाविकांनी इथं भेट देऊन त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. १५ जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कुंभमेळ्याच्या पवित्र पर्वाला सुरवात झाली होती.
****
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मंगळवारी पॅराग्वे आणि कोस्टा रिका या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅराग्वेचे राष्ट्रपती मारियो आब्दो बेनिटेज, उपराष्ट्रपती ह्यूगो वेलाजक्वेज, कोस्टारिकाचे राष्ट्रपती कारलोस अल्वारैडो क्वेसाडा, उपराष्ट्रपती एप्सी कैंपबेल बर्र यांच्यासह व्यावसायिकांच्या आणि तिथं स्थायिक भारतीयांच्या भेटी घेतील. दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक, माहिती आणि दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि नवीकरणीय उर्जेशी संबंधित बाबींवर यावेळी चर्चा केली जाईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं सुरू केलेल्या आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांद्वारे राज्यातल्या ९० टक्के लोकांना आरोग्य विम्याचं संरक्षण मिळालं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पालघर इथं आज अटल आरोग्य महाशिबिराचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. अटल आरोग्य शिबीर खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आरोग्य सेवा पोहचवणारं शिबिर आहे, असंही ते म्हणाले.
****
जालना पोलीस दलातल्या दोन अधिकाऱ्यांसह सहा कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी आज तडकाफडकी निलंबित केलं, तर एका पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी सहकार्य केल्याचं चौकशी अहवालात निष्पन्न झालं होतं. या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सांगितलं. सहायक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, कॉन्स्टेबल रामेश्वर जाधव, कपील जाधव, इंद्रजित काळेबाग, संतोष सावंत, सदाशिव राठोड, रामप्रसाद पहुरे अशी निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा बाजारतळासमोर दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. मोहसीन युसूफ अत्तार असं मृताचं नावं असून, त्याच्या सोबत असलेला साहिल सुभान अत्तार गंभीर जखमी झाला आहे. चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली.
****
लातूर इथल्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बल्गेरियातील रूस इथं झालेल्या डॅन कोलोव्ह-निकोल पेट्रोव्ह स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दोन सु��र्णपदकांसह चार पदकं जिंकली आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. **** एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह सांस्कृतिक तसंच देशभक्ती पर कार्यक्रमांचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यात काल दोन अपघातात दहा जण ठार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपन्ना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत आणि १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक **** एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभरात उत्साहात साजरा झाला. दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केल्यानंतर सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्यांनी दिल��ली मानवंदना स्वीकारली. भारतीय वायू सेनेचे गरुड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं. या समारंभाला सर्व, दहा आशियान देशांचे प्रमुख विशेष प��हुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सैन्य दलं, अनेक राज्यं, तसंच विविध विभागांसह आकाशवाणीचा चित्ररथ प्रथमच संचलनात सहभागी झाला. शिवराज्याभिषेक संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्षवेधी ठरला. प्रजासत्ताक दिनानिमित्त काल राज्यभरात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शिवाजी पार्क इथं मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं. विधानभवनात विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. औरंगाबाद इथं पालकमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं, यावेळी केलेल्या भाषणात सावंत यांनी, औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासात दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेची भूमिका महत्त्वाची असल्याचं नमूद केलं, ते म्हणाले .. देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि औद्योगिक या सर्व क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. या वाटचालीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. जिल्ह्याच्या आणि पर्यायाने राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या समृध्दी महामार्गामुळे देशाच्या आणि राज्याच्या विकासात आज भर पडणार आहे. औद्योगिक, आर्थिक दळणवळण विकासाला गतिमान करणारा आणि मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जिह्यातील ६२ गावातून जाणाऱ्या प्रकल्पातील एक हजार ८४ खरेदी खते पूर्ण झालेली असून . सातशे चौदा हेक्टर जमिनीचे भूसंपादन देखील झालेले आहे. यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांना राष्ट्रपती पदक देऊन, तर पोलिस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना विशेष सेवा पदक देऊन गौरवण्यात आलं. चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्यात औरंगाबाद जिल्ह्यास प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्या हस्ते तर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी वंदे मातरम या गीतावर एक हजार विद्यार्थ्यांनी सामुहिक न��त्य सादर केलं. नांदेड इथं जिल्हा पोलिस कवायत मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. सर्व जाती, धर्म एक असून भारत देश एक आहे हे आपण वेळोवेळी सिध्द केल्याचं पालकमंत्री कदम म्हणाले. परभणी इथं क्रीडा संकुलावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तर हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, भारतीय जनता पक्षाच्या तिरंगा फेरीला पालकमंत्री निलंगेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. नीती आयोगानं जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते, यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहणानंतर ते बोलत होते. बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं, जिल्ह्यात मुलींच्या जन्माचं दर हजारी आठशे अट्ठ्याण्णव, इतकं खाली गेलेलं प्रमाण, आता नऊशे सत्तावीस पर्यंत पोचल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत पालकमंत्रीही सहभागी झाल्या. मराठवाड्यात विविध शैक्षणिक संस्था, राजकीय पक्ष संघटना, औद्योगिक आस्थापनांमधूनही ध्वजारोहणासह सांस्कृतिक तसंच देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** कोल्हापूर जिल्ह्यात काल दोन अपघातात दहा जण ठार झाले. काल सकाळी पुण्याहून गणपती पुळ्याला जाणारी ही कार शाहुवाडी इथं झाडावर धडकून झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दुसरा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला. गणपती पुळ्याहून पुण्याकडे जाणारी मिनी बस पंचगंगा नदीत कोसळली. या अपघातात चार जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती आले असून, वाचवण्यात आलेल्या सात जणांपैकी चार जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बसमधले सहा जण अद्याप बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. **** जालना इथं ध्वजवंदना नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गात जाणाऱ्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा, या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी, प्रशासनाला निवेदन दिल होतं. मात्र याबाबत निर्णय न झाल्यानं, शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी ११ शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. **** विरोधी पक्षांच्या वतीनं काल मुंबईत संविधान बचाव फेरी काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी खासदार शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्��ुल्ला, पाटीदार नेता हार्दिक पटेल, यांच्यासह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षानंही काल मुंबईत तिरंगा यात्रा काढली. या यात्रेमध्ये भाजपचे मंत्री, आमदार आणि खासदार सहभागी झाले. **** ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपन्ना मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोचला आहे. बोपन्ना-बाबोस जोडीनं डिमोलिनर-सांचेझ जोडीचा ७-५, ५-७, १०-६, असा पराभव केला. इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये सायना नेहवालनं पी. वी. सिंधूचा २१-१३, २१-१९ असा सरळ सेट्स मध्ये पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. **** न्युझीलंड इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल बांगलादेशचा १३१ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना येत्या मंगळवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. **** भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत काल तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात एक बाद १७ धावा झाल्या. त्यापूर्वी भारतानं, दुसऱ्या डावात २४७ धावा केल्या. भारतानं सामन्यात २२३ धावांची आघाडी घेतली आहे. **** सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाची सुरवात हे औरंगाबाद महानगर पालिकेचं स्मार्ट सिटीच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद महापालिका इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पामुळे मनपाच्या वीजखर्चात बचत होऊन, हा पैसा इतर विकास कामांसाठी उपयोगात आणणं शक्य होणार असल्याचं, डॉ सावंत म्हणाले. **** नांदेड जिल्ह्याच्या २०१८-१९ साठीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या ४६९ कोटी १ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ***** ***
0 notes