Tumgik
#पाडलं
Video
youtube
हरामखोराव 50 खोक्यासाठी सरकार पाडलं भास्कर जाधव #bhaskarjadhav
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते बनण्याचा मार्ग मोकळा करतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला अनुसरत वाटचाल केली - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
राज्यात अवकाळी पावसामुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
आणि
जालना, लातूर, धुळे जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद
****
रोजगार मेळावा तरुणांना विकसित भारताचे निर्माते बनण्याचा मार्ग मोकळा करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये नियुक्त झालेल्या ५१ हजारांहून अधिक उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या उमेदवारांनी नागरिकांसाठी जीवन सुलभतेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपलं कर्तव्य पूर्ण बांधिलकीने पार पाडलं पाहिजे, ज्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतला नाही अशा लोकांपर्यंत त्यांनी लाभ पोहोचवले पाहिजे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. देशभरात ३७ ठिकाणी याअंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते.
****
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत पंतप्रधानांनी आज देशभरातल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून, यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं, ते यावेळी म्हणाले.
महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या तीन वर्षांत १५ हजार ड्रोन्स तसंच ड्रोन वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना पुरवण्यात येणार आहे. २५ हजार जनौषधी केंद्र स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झाला.
****
भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम या विचारधारेला अनुसरत वाटचाल केली असून, देशाच्या एकता आणि अखंडतेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळच्या खडकवासला इथं, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी - एन डी ए च्या १४५ व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात आज त्या बोलत होत्या. यावर्षी संचलनात पहिल्यांदाच महिला छात्र सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला.
त्यानंतर राष्ट्रपतींनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शनीशिंगणापूर इथल्या शनैश्वराचं दर्शन घेतलं. यावेळी राज्यपाल रमेश बैस यांची उपस्थिती होती. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.
उद्या, राष्ट्रपती मुर्मू, पुण्यातल्या सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला मानाचा ध्वज अर्थात प्रेसिडेंट्स कलर प्रदान करणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरकडे रवाना होतील.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे - परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेज लिमिटेड कंपनीच्या प्लांटचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. दोन हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभ्या रहात असलेल्या या प्लांटच्या माध्यमातून दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शासनाकडून या कंपनीमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत्या चार तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार्या नौदल दिन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज किल्ल्याची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.
****
राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तीन लाख ९३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ७८३ हेक्टर, हिंगोली ७९ हजार ४०२, परभणी एक हजार, बीड २१५, तर नांदेड जिल्ह्यात ५० हेक्टर क्षेत्रावरच्या शेतजमिनींचं नुकसान झाल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचं आज जालना जिल्ह्यातल्या ढासला, बधापूर, रेवगाव, बेथलम, पिंपळगाव थोटे इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं. यानिमित्त ढासला इथं आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. एलसीडी स्क्रीनवर शासकीय योजनांची चित्रफितही दाखवण्यात आली.
****
लातूर तालुक्यातल्या नागझरी इथं देखील नागरीकांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत केलं. यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब, मधुमेह याची प्राथमिक तपासणी आणि आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. 'आपला संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यावेळी उपस्थित होते.
****
धुळे जिल्ह्यातल्या बोराडी आणि निजामपूर गावात आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली. यावेळी ग्रामस्थांना शासनाच्या कृषी, आरोग्य, शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती एलईडी व्हॅनमार्फत देण्यात आली. तसंच लाभार्थ्यांकडून विविध योजनांचे अर्ज भरुन घेण्यात आले.
****
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीची आज पालकमंत्री अतुल सावे यांनी पाहणी केली. बदनापूर तालुक्यातल्या राजेवाडी इथल्या कचरुसिंग गुसिंगे आणि हरिदास अंभोरे यांच्या शेतातल्या नुकसानग्रस्त मोंसबी आणि डाळिंब फळबागेची सावे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले.
****
मराठा आरक्षणासाठी लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिलेले यवतमाळचे खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींकडून समन्स पाठवण्यात आलं आहे. त्यांना चार डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासदार हेमंत पाटील हे लोकसभेतल्या अनेक समित्यांवर सदस्य आहेत. मात्र २९ ऑक्टोबर रोजी त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ते एकाही बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे आता चार तारखेला हजर राहून मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडू, आपण राजीनाम्यावर ठाम आहोत, राजीनामा मंजूर झाला नाही तर संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं हेमंत पाटील यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीप्रवर्गात समावेश करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धाराशिव इथं धनगर समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढला. शहरातल्या आर्य समाज लेडीज क्लब पासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाच्या सुरुवातीला धनगर समाजाने आपल्या पारंपारिक व्यवसायाचं साधन असलेल्या मेंढ्या सोबत आणल्या होत्या. तसंच खांद्यावर घोंगडी आणि धनगर समाजाचा पारंपारिक पोशाख घालून ढोल वाजवत मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
****
हिरडा आणि दुधाला रास्त भाव द्या या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज भव्य मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढवण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला. हिरड्याची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, यासाठी आवश्यक असलेल्या १०६ पेसा गावांचे ठराव आंदोलकांना गेल्या तीन दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त करून देण्यात आले. राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणं २० डिसेंबर पर्यंत तपासण्यात येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ एस टी बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आला. मात्र स्वत:ला सावरत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना घडली. मारोती नेमाणे असं या चालकाचं नाव असून, त्यांच्या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे प्राण वाचले.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं काचीगुडा-लालगढ-काचीगुडा, हैदराबाद-जयपुर- हैदराबाद आणि नांदेड ते इरोड दरम्यान सुरू असलेल्या विशेष गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला मार्गे धावतात. काचीगुडा - लालगड ही गाडी २७ जानेवारी पर्यंत, लालगढ-काचीगुडा ३० जानेवारी पर्यंत, हैदराबाद - जयपूर गाडी २६ जानेवारी पर्यंत, तर जयपूर - हैद्राबाद आणि नांदेड - इरोड गाडीला २८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, लाईन ब्लॉकमुळे दौंड ते निझामाबाद जलदगती गाडी ३ ते १६ जानेवारी दरम्यान तर निझामाबाद - पंढरपूर गाडी ४ ते १७ जानेवारी दरम्यान निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
Text
वळसे पाटलांनी उमेदवारी नाकारली,देवदत्त निकमांचं बंड; विजय मिळवत इतिहास रचला,राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच पाडलं
https://bharatlive.news/?p=95500 वळसे पाटलांनी उमेदवारी नाकारली,देवदत्त निकमांचं बंड; विजय मिळवत इतिहास ...
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
एका नामांतर शाहिदाची अस्वस्थ कहाणी..!
चाळीस वर्षांपूर्वी घडलेली घटना नांदेड शहरातल्या गोविंद नगरात राहणाऱ्या धोंड्याबाईला आजही ठळक आठवते... नजर पैलतीरी लागलेल्या 80 वर्षाच्या धोंड्याबाई पोचिराम कांबळे सगळं काही अगदी काल घडलंय इतक्या सहज सांगू लागतात... "त्यावेळी नामांतराचं आंदोलन सुरू झालं होतं साहेब, 4 ऑगस्ट 1978 चा दिवस होता, अजून नीट उजडलं सुद्धा नव्हतं, गावातल्या लोकांच्या आरोळ्या ऐकू येऊ लागल्या, रात्रभर त्यांची दादाराव पाटलाच्या वाड्यावर मिटिंग झाली होती. हळूहळू गावातले लोक आमच्या वस्तीवर चालून येऊ लागले, आमच्या वस्तीतले लोक घाबरले माझा नवरा गावच्या नजरवर आला होता. गावाचा रंग बघून मीच त्याला 'आमचं होईल कस बी' म्हणून रात्रीच घराबाहेर काढून दिलं होतं, येडापिसा झालेला जमाव वस्तीवर चालून आमच्या घरावर चढला, सबली घुसे घालून आमचं घर पाडलं त्याईनी राकेल संगच आणलं होतं घरात वतलं नी घर पेटवून दिलं असं करत करत त्याईनी सगळ्या बौद्ध वस्तीतले घरं पेटीवली... आम्ही लेकरं बाळ घेऊन रानात पळून गेलो तवा आम्हाला अंगावर जी कापडं होती तीच काय शिल्लक राहिली, मूठभर धान्य सुद्धा घरात शिल्लक ठिवलं नव्हतं, सगळं जळून गेलं," सुरकूतलेल्या चेहऱ्यान आणि म्हतारपणामुळे जड झालेल्या आवाजात धोंड्याबाई हे सगळं सांगत होत्या... धोंड्याबाई सध्या त्यांच्या लहान मुलाकडं राहतात, त्यांच्या मुलाला अण्णाभाऊ साठे महामंडळात शिपायाची नोकरी मिळाली आहे. आणि नांदेडच्या गोविंद नगरात एक कच्च घर..! स्वतःच्या आयुष्यात नवरा आणि मुलाची जातीयवादातून क्रूर हत्या झालेलं पाहणारी ही बाई आता शेवटच्या घटका मोजत आहे.
नवऱ्याला लोक मारतील म्हणून धोंड्याबाईने पोचिराम कांबळेला घरातून काढून दिलं खरं पण मरणातून त्याची काही सुटका होऊ शकली नाही. पोचिराम रात्री घरातून बाहेर पडला आणि एका मुस्लिम मित्राच्या घरी जाऊन थांबला, पण सकाळी जेंव्हा जमाव बेभान झाल्याचं पाहिलं तेंव्हा मुस्लिम मित्रानं पोचिरामच्या हातात एक जांबिया दिला आणि त्याला आपलं घर सोडायला सांगितलं, पोचिरामाने त्याचं घर सोडलं आणि गावाशेजारी असलेल्या मुस्लिमाच्या कडब्याच्या गंजीत दबा धरून बसला पण तिथेही त्याला कुणीतरी पाहिलं आणि बोंब ठोकली, पोचिराम तिथून पळाला चौकी, धानोरा, असं करत गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या राउतखेडा परिसरात आला इतका वेळ तो नुसता धावत होता.
ऑगस्ट महिना असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आणि पाणी साचलेलं, इतका वेळ दीडशे ते दोनशे लोकांचा जमाव पोचिराम कांबळेचा भीषण पाठलाग करत होता. शेवटी दम लागल्यामुळे राउतखेडा गावाच्या परिसरात एक पाण्याने भरलेल्या आणि बेसरमाणे वेढलेल्या उकांड्यात पोचिरामाने आश्रय घेतला... इकडे आसपास लोक शोधत होते पण पोचिराम सापडत नव्हता... पण तेवढ्यात त्या उकांड्याच्या परिसरात काही महिला प्राप्तविधीसाठी आल्या. आपल्या इथं असण्यामुळे त्या महिलांची अपमान होईल म्हणून पोचिराम हळूहळू हळूहळू आपली जागा बदलू लागला पण जागा बदलत असताना पाण्याबर बुरबुडे आले त्याचा आवाज झाला आणि महिलांनी निरखून पाहिलं तर कुणीतरी माणूस निघून जात असल्याचं त्यांना दिसलं त्या महिलांनी आरडा ओरडा केला आणि राउतखेड्याच्या शिवारात जमलेला शेकडो जमाव उकिरड्याच्या दिशेने धावला... पोचिराम कांबळे हा आयता जमावाच्या तावडीत सापडला...
सुरुवातीला हातात जांबिया असल्यामुळे त्याला पकडण्याचं धाडस कुणी करेना, जमावाने पोचिरामला जांबिया टाकायला सांगितला, पोचिरामाने जांबिया टाकला आणि नंतर जमावाने पोचिरामला ताब्यात घेतलं त्याच्याच डोक्याचं पटकर काढलं आणि त्याचे हात बांधले आणि त्याला चालवत सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चौकीच्या शिवारात भागवत वाघमारे यांच्या शेतात आणलं, या सहा किलोमीटर अंतरावर त्याला भीषण मारहाण आणि अमानवीय छळ सुरू होता. वैतागलेला पोचिराम माझं मुंडकं छाटा पण माझा छळ करू नका असं सांगत होता. पण बेभान झालेला जमाव याचकाचं ऐकतो कुठे... लोक पोचिरामला सारखं जय भीम म्हणायचं नाही आणि आमच्या पाया पड असं सांगत होते पण पोचिराम मात्र भीषण छळ होत असताना सुद्धा जयभीम म्हणायचं सोडत नव्हता आणि मी कुणाच्याच पाया पडणार नाही असं सांगत होता. चौकीच्या शिवारात आल्यानंतर पुन्हा पोचिराम कांबळे याला गावकऱ्यांच्या पाया पडण्याची आणि जय म्हणायचं नाही आम्ही तुला सोडुन देऊ अशी सवलत देण्यात आली... पण पुन्हा पोचिराम याने कुणाच्याही पाया पडायचं नाकारून जय भीमचा नारा दिला. संतापलेल्या गावकऱ्यांनी शेजारीच लकडांवर पोचिराम कांबळे याला झोपवलं त्याच्या उरावर काही जाडजूड लाकडं ठेवली आणि राकेल ओतून जीवंत देह पेटवून दिला...
या घटनेवेळी पोचिराम कांबळे यांचे हातपाय तोडले होते किंवा त्यांना विष्टा पाजवली होती या प्रकाराला दोन्ही बाजूकडून कुणीही दुजोरा दिला नाही. घटना साडेआठ वाजता घडली आणि 9 वाजता पोचिराम कंबळेच्या बायकोला हा सगळं प्रकार कळला आणि जिवाच्या आकांताने आक्रोश करत धोंड्याबाईने गावशिवरातून पळ काढला. पुढे पोलीस आले चौकशी सुरू झाली तेंव्हा धोंड्याबाई गावात गेल्या पण त्यांना पोचिरामाचं साधं हडुक सुद्धा भेटलं नाही...
मृत्यू समोर असताना सुद्धा हा माणूस झुकत नाही की साधं जय भीम म्हणायचं सोडत नाही यामागची प्रेरणा काय असावी आणि त्याला मारणाऱ्या उचवर्गीय समाजची आजची मानसिकता काय आहे हे समजून घेण्यासाठी मी पोचिराम कांबळे यांच्या गावात गेलो.
टेम्भुर्णी... नांदेड पासून 50 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव, गावात पोचिराम कांबळेचं बेवारस असलेलं घर उदास दिसतंय, घरावर धूळ चढलीय आणि पोपडे उडालेत अंगणात सगळीकडे कचरा पसरलाय, तिथेच पोचिराम कांबळे यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. ते पूर्ण कसं होत नाही असा अनेकांना पडलेला प्रश्न, मलाही पडला. गावात पोचिराम कांबळेचा भाचा मला भेटला गणपत लक्ष्मण दुबिले... त्यांनीही आता वयाची सत्तरी ओलांडलीय, पोचिराम कंबळेच्या खांद्याला खांदा लावून गणपत दुबिले यांनी काम केलं होतं, पोचिराम कंबळे यांच्या स्मारकाच्या ओट्यावर बसून मी त्यांना जेंव्हा विचारलं की, जीव जाईपर्यंत लढलात तुम्ही काय कारण होतं.? हा प्रश्न विचारताच गणपत दुबिले यांच्या आसवांचा बांध सुटला आणि डोळ्यातून पाणी काढत पण करारी आवाजात गणपत दुबिले म्हणाले माझ्या बाबासाहेबांनी माझ्या हातात इद्रोहाची काठी दिलीय आन मी ती गरागरा फिरवितो...गणपत दुबिले आणि पोचिराम कंबळे हे दोघेही अशिक्षित विचारांचं त्यांना फार काही कळत नाही पण कुणाचा अन्याय खपवून घ्यायचा नाही, हा बाबासाहेबांचा विद्रोही विचार मात्र त्यांना समजला होता आणि त्यासाठीच ते झगडले होते. गणपत दुबिले यांच्या हाताला आता कंप सुटतोय, वय थकलय पण आवाजातला निडरपणा अजूनही जशास तसा आहे. पूर्वी आम्ही बैलगाडीत जयंती काढायचो लोक आमच्यावर दगडं घालायचे पण आम्ही घाबरलो नाही. आता आमची पोरं डीजे लावून जयंती काढतात अडवायची कुणाची टाप नाही साहेब..! महारवाड्यातून उठता उठता गणपत दुबिले यांनी सांगितलेलं हे वाक्य मनात घर करून गेलं..!
पोचिराम कंबळे यांना मारलं म्हणून त्यांचा मुलगा चंदर कंबळे याने बापाचा बदला घेण्यासाठी शेषराव पाटील यांचा खून केला. बापाचा खून केला म्हणून पुन्हा शेषराव पाटलाचा मुलगा बालू पाटील यांनी चंदर कंबळे यांचा खून केला. याच बालू पाटलांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. गावाच्या मधोमध उजव्या बाजूला बालू पाटलांच घर आहे. घर जुनंच माळवदाचं, चारी बाजूला मातीच्या भिंती त्याही ढासळू लागलेल्या... पण बालू पाटलाचा चेहरा मोठा करारी, चेहऱ्यावर दाढी वाढलेली अंगापिंडाने मजबूत देह करारी डोळे. पहिल्या पहिल्या मलाही भीती वाटली... बोलावं की नाही मनात शंका आली पण अचानक दारात थांबलेलं त्यांनी पाहिलं... आणि जाडशीळ आवाजात विचारलं कोण पाहिजे.? मी म्हटलं बालू पाटलांना बोलायचं, मी दारात थांबलेला ते तिथूनच म्हणाले हं बोला की... न राहवून मी म्हटलं आता येऊ का बसून बोलतो त्यांनी या म्हटल्यावर आत गेलो. बालू पाटील हे सध्या घरी शेतीच करतात, जुनाट माळवदाच्या दोन खोल्या आहेत. बाहेर अंगणात सात आठ पत्र घातले आहेत हीच काय ती बालू पाटलांची त्यांच्या आयुष्यातली कामगिरी... बोलायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या बोलण्यात पश्चाताप जाणवला पण काय करावं पर्याय नव्हता अशीही भावना दिसली. " वडील आमचे चांगले होते, त्यांना मारलं तेंव्हा माझे मामा खांद्यावर बसवून घेऊन आले इतका मी लहान होतो. वडिलांना खूप वाटायचं आम्हाला शिकवावं चांगलं ठेवावं पण अशी घटना घडली. आमचा वनवास झाला साहेब." पुढे बालू पाटलांनी चंदर कांबळेचा खून केला असा आरोप आहे. या आरोपाखाली बालू पाटील हे तीन महिने जेल मध्ये राहून आले. आणि 2003 मध्ये ते या केसमधून निर्दोष सुटले. आता निर्दोष सुटलेत म्हटल्यावर मलाही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून प्रश्न विचारणं कठीण झालं. तरीही मी बोलत गेलो. आणि बालू पाटील सांगत गेले की, लई तरास झाला साहेब ह्या प्रकरणाचा, लई पैसे गेले आता पोराबळांना शिकवायचं म्हटलं तर पैसे राहिले नाहीत. कुनतीच गोष्ट टायमावर मिळेना, या सगळ्या भानगडीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून मी त्यांनाही बाहेर शिकायला ठेवलं आहे. माझा लहान मुलगा बाबासाहेबांच्या वसतिगृहात शिकायला आहे असं त्यांनी सांगितलं. तुम्ही बाबासाहेबांना मानता का असं विचारलं तेंव्हा गळ्याला हात लावून गळ्याशपथ खूप मानतो, त्यांचे विचार आपल्याला पुढं नेणारे आहेत. त्यांच्यासारखं आपण चाललं पाहिजे, मी बघा दर आंबेडकर जयंतीला आणि भीमजयंतील दोनशे दोनशे रुपयांची पट्टी सुद्धा देतो साहेब. असं म्हणत बालू पाटील घरात गेले आणि दोन तीन वर्षाच्या पावत्या घेऊन आले. ते खरंच पट्टी देतात याचा विश्वास पटला. आता काही भानगडी नको साहेब असं म्हणत मी दर जयंतीला मिरवणूक आली की बाबासाहेबांना हार घालतो असं सांगितलं. मन मारून मुटकून का असेना पण बालू पाटील यांच्यात झालेलं परिवर्तन विचारात घेण्यासारखं आहे.
बालू पाटलांच्या घरातून बाहेर निघून मी दुसऱ्या शेषराव पाटलांच्या घरी गेलो, या पाटलांवर गावातील दलितांची घरं जाळल्याचा आरोप आहे. गावाच्या थोडं बाहेर कॅनॉलला लागून शेषराव पाटलांचा वाडा आहे. वाडा चांगला मोठा, वाड्याच्या सुरुवातीला ढाळज आहे. पुढे भरपूर मोकळी जागा आणि त्यानंतर इतर काही खोल्या. घरी 45 एकर जमीन दहा पंधरा गाई, दोनचार बैल जोड्या गड्यामाणसांचा राबता अजूनही या पाटलाच्या घरी आहे. पण शेषराव पाटील हा मोठा चाणाक्ष माणूस... त्यादिवशीच्या हल्ल्याचा कट यांच्याच घरात शिजला असं पीडित लोक सांगतात, पण शेषराव पाटील मात्र हा आरोप सपशेल नाकारतात, हे असलं काहीच घडलं नाही असा त्यांचा पहिला पवित्रा आणि नंतर ते पहिल्या पासून घटना सांगू लागतात. शेषराव पाटील म्हणाले की हा पोचिराम लहान असताना माझ्या घरी ढोरं राखायचा पण अंगापिंडानं मजबूत, आणि लई आवचिंद होता. जसा जसा मोठा होत गेला तसा तो गावाला लईच त्रास करू लागला. नंतर आमची नोकरी सोडली अन ठोक्यानं शेती करू लागला. पण तिथंही तो नीट काम करत नव्हता. तुम्ही पाटलांनी आम्हाला असं केलं तसं केलं म्हणून आम्हाला शिव्या घालायचा, माणूस वडील म्हणू नको थोर म्हणू नको कुणालाही श्या द्यायचा. भांडणं तर रोजच पार ईट येऊन गेलाता सगळं गाव वैतागलं होतं साहेब. मग विद्यापीठाच आंदोलन आलं जळकोटला एक पोलीस लोकांनी मारला. त्याची प्रतिक्रिया गावात उमटली अन गावातल्या काय येड्या पोरांनी घरं जाळली, न तिकडं लांब शिवारात पोचिरामला मारलं. ही घटना गावात धुमसून धुमसून घडली साहेब. अचानक घडलं नाही. ही त्यांची बाजू पाटलांनी सांगितली पण आता गावात कसं आहे विचारलं तेंव्हा "अहो आता काय आधी बी आमच्या गावात काही नव्हतं सगळे चांगले आहेत. ती घटना घडून गेल्यावर आम्ही अन बौद्धवाड्यातली लोक गळ्यात पडून रडलो तर... ते फक्त पोचिरामच तेवढं आवचिंद होतं, पुन्हा कैबि न��ही आमच्या गावात" पुढे याच शेषराव पाटलांनी बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असंही सांगितलं आणि दर जयंतीला मी मिरवणुकीत जातो त्यांच्यासोबत राहतो असं सांगितलं. जयंती निघाली तर आम्हाला काहिबी वाटत नाही उलट चांगलं वाटतं आम्ही कसलाच विरोध करत नाही असंही सांगितलं. शेषराव पाटलांच्या बोलण्यात थोडा चाणाक्ष पणा होता. पण नाविलाजनाने झालेला बदल हा पोचिराम कांबळे यांचं हौतात्म्य आणि गावातल्या दलितांनी आपला ताठ ठेवलेला बाणा याचा परिपाक होता.
आज गावात पोचिराम कांबळे यांच्या हौतात्म्याच्या जखमा ओल्या आहेत, मात्र भीम जयंतीचा विरोध मावळला आहे तरी, गावातल्या दलितांची आर्थिक परिस्थिती आजही बिकट आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे तर मराठा समाजही शेतीच्या असंख्य प्रश्नांनी गांगरून गेला आहे. जुने प्रश्न बाजूला पडलेत आणि आता जगण्याच्या नव्या वाटा इथे प्रत्येकाला शोधाव्या लागत आहेत. गावासमोर नव्या प्रश्नाचं एक भीषण कोंडाळ उभं राहिलं आहे. गावातून परतीला निघालो तेंव्हा कधीकाळी भरून वाहणारा कॅनॉल कोरडा ठाक पडला होता. आणि शेतात रानभर पसरलेला दुष्काळ पाठ धरून नाचत होता.
-वैभव वैद्य....
0 notes
kokannow · 2 years
Text
बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
विद्यार्थ्यांना दिली ग्रंथांची भेट कुडाळ : मिसाईल मॅन म्हणून ज्यांचा गौरव केला जातो आणि ज्यांनी फावल्या वेळेत वाचन करून स्वतःच व्यक्तिमत्व घडवलं आणि त्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वातून भारत देश हा एक अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून जगाला नोंद घ्यायला भाग पाडलं. असे आदरणीय माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बॅ नाथ पै…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ' चेक माय फोन '
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ‘ चेक माय फोन ‘
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ' चेक माय फोन '
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ‘ चेक माय फोन ‘
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ' चेक माय फोन '
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ‘ चेक माय फोन ‘
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ' चेक माय फोन '
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ‘ चेक माय फोन ‘
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ' चेक माय फोन '
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ‘ चेक माय फोन ‘
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years
Text
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ' चेक माय फोन '
.. त्याने जग सोडायला भाग पाडलं , पोलीस कन्या म्हणतेय ‘ चेक माय फोन ‘
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईत समोर आलेली असून पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले मात्र सासरच्या मंडळींनी हे लग्न नाकारले त्यानंतर त्यांनी भाड्याच्या घरात काही दिवस संसार थाटला मात्र पतीने मारहाण केल्याने या मुलीने अखेर स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रकार चेंबूर येथे उघडकीला आलेला आहे. सदर प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंचा भाजपलाच जोर का झटका!
Tumblr media Tumblr media
Picture Credit/Facebook/Eknath shinde मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेला खिंडार पाडलं. शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं. आता मुंबईमधल्या 100 पेक्षा जास्त महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. दहिसरमध्ये शिंदे गटाने भाजपला गळती लावली आहे. शिवसेनेनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपलाच जोर का झटका दिला आहे. शिंदे गटाने भाजपमधले पदाधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या पक्षात घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा हा सोहळा पार पडला. प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले पण आता याच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश दिला आहे. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ जून २०२३ सकाळी ११.०० वाजता****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ल�� रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाराज शिवभक्तांना उद्देशून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेची चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीनंतर ��रवा गुरुवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाईल. 
****
अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातल्या समूह विकास योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. सुमारे पंधराशे हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.
****
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त रिपब्लिकन पक्षानं आज नागपुरात, विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघटनेत काम केलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
//*************//
0 notes
Text
शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं हादरवणारं कृत्य
https://bharatlive.news/?p=85090 शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं ...
0 notes
marathinewslive · 2 years
Text
shivsena leader aaditya thackeray attacks cm eknath shinde over vedanta foxconn project mover gujrat ssa 97
shivsena leader aaditya thackeray attacks cm eknath shinde over vedanta foxconn project mover gujrat ssa 97
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन माध्यमातून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. मात्र, वेदांत समूहाने गुजरातमध्ये आपला प्रकल्प उभा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. “चाळीस गद्दारांनी सरकार पाडलं, त्यामुळे फॉक्सकॉन प्रकल्प रखडला. एक लाख रोजगार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
0 notes