#परकीय चलन आरबीआय
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१० वा.
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात भव्य दीपोत्सव
निवडणूक आचारसंहिता काळात राज्यात १८७ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
आणि
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरच्या नयना खेडकरला रौप्यपदक
****
दीपावली पर्वानिमित्त अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या दीपोत्सवात, पणत्या उजळण्याचे सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी २८ लाख दिवे उजळले जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. एक हजार १०० हून अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दीपोत्सवात सहभागी होत आहेत.
अमेरिकेचं राष्ट्रपती भवन- व्हाईट हाऊसमध्येही दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. अमेरिकेचे भारतातले राजदूत एरिक गार्सेटी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून याबद्दल माहिती देत, दिवाळीचं महत्त्व आणि भारतीय अमेरिकन लोकांचं अमेरिकेसाठीचं योगदान या बाबींचा उल्लेख केला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातल्या शाळांना प्रथमच दिवाळीनिमित्त परवा एक तारखेला सुटी जाहीर करण्यात आली आहे. अमेरिकेतली सर्वात उंच इमारत वन वर्ल्ड ट्रेड सेंटरसुद्धा रोषणाईनं सजली आहे.
****
दीपावली सणात मानाचं स्थान असलेला नरक चतुर्दशीचा अभ्यंगस्नान सोहळा उद���या पहाटे घरोघरी साजरा होईल. या दिवशी पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत सुवासिक तेल आणि उटण्याने शरीराची मर्दन अर्थात मालिश करून ऊन पाण्याने स्नान करण्याचा, आणि औक्षण करण्याचा प्रघात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी असा संदेशही त्यांनी दिला आहे. नागरिकांनी निरोगी आणि समृद्ध समाज निर्माण करण्याचा संकल्प करावा, असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतीय रिझर्व्ह बँक-आरबीआयनं इंग्लंडच्या बँकेमध्ये ठेवलेल्या भारताच्या सोन्यापैकी १०२ टन सोनं परत आणलं आहे. यापूर्वी मे महिन्यात आरबीआयनं १०० टन सोनं परत आणलं होतं. परकीय चलन साठा व्यवस्थापनाच्या अहवालानुसार यावर्षाच्या सप्टेंबरपर्यंत आरबीआयकडे ८५५ टन सोनं आहे.यापैकी सुमारे ५१० टन सोनं भारतात असून उर्वरित परदेशात ठेवलेलं आहे. वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआय परदेशात ठेवलेलं सोनं सुरक्षेच्या दृष्टीनं भारतात परत आणत आहे. भारतानं सप्टेंबर २०२२ पासून परदेशात ठेवलेलं २१४ टन सोनं परत आणलं आहे. आरबीआयची ही कृती म्हणजे देशाच्या संपत्तीचं रक्षण करण्याच्या सक्रिय धोरणाचा एक भाग आहे.
****
विधानसभा निवडणूक-२०२४ साठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य तसंच केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत १५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू या स्वरूपातली ही मालमत्ता विविध अंमलबजावणी यंत्रणांच्या दक्षतेमुळे पकडली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात एका घरावर छापा टाकून ३६ लाख २१ हजार ६०० रुपये किंमतीचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
संभाजी ब्रिगेड या पक्षानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतची युती तोडत राज्यात स्वबळावर पस्तीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. राज्यामध्ये शिवसेना फुटीनंतर संभाजी ब्रिगेडनं ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडला काही जागा सोडाव्यात, अशी या पक्षाची मागणी मान्य न झाल्यानं स्वबळावर उमेदवार उभे केल��याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज जालना आणि बीड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
विधानसभा निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघात दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण झाली असून ११५ उमेदवारांपैकी १३ उमेदवारांचे अर्ज अवैध तर १०२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात महाविकास आघाडी, महायुती, तसंच इतर राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचे अर्जही वैध ठरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व ९ विधानसभा मतदार संघ मिळून ४३७ उमेदवारांनी ६१३ अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी पूर्ण झाली, यामध्ये ३९८ उमेदवारांचे ५२२ अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली.
नागरिकांनी, दीपावलीसोबतच लोकशाहीतला महत्त्वाचा असलेला निवडणूक आणि मतदानाचा महोत्सव शांततेत साजरा करण्याचं आवाहन दिलीप स्वामी यांनी केलं.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतांना माझी सर्व नागरिकांना विनंती असणार आहे की दिवाळी साजरी करा. त्याचबरोबर लोकशाहीचा महोत्सव साजरा करा. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, कुणालाही अडचण होणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नागरिक, राजकीय पक्ष, पदाधिकारी सुजाण नागरिक आहेत. ते निश्चितपणे निवडणूक विभागाला सहकार्य करतील. आणि आपल्या जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक ही शांततेत पार पाडतील असा मला विश्वास आहे.
****
मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये आज जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते विविध विभागप्रमुखांच्या वाहनांवर मतदान करण्याबाबत आवाहन असलेली स्टिकर्स लावण्यात आली. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, भाजपा नेते सुधाकर श्रृंगारे यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लातूरच्या विकासाला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं श्रृंगारे यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस नेते अमित देशमुख, दिलीपराव देशमुख उपस्थित होते.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणार असलेल्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. मंडळानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
****
सर्व निवृत्तीवेतन धारकांना आर्थिक वर्ष २०२४-२५साठी केंद्रशासनाच्या निर्देशानुसार नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार सात लाख पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत आयकर लागणार नाही. आयकर परिगणना जुन्या करप्रणालीनंच करण्याकरता निवृत्तीवेतन धारकांनी त्याबाबतचा विनंती अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं कोषागार कार्यालयात दाखल करणं आवश्यक आहे. असा अर्ज प्राप्त न झाल्यास नवीन कर प्रणालीद्वारे परिगणना करून आयकर कपात करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या निवृत्तीवेतनधारकांनी आयकर बचतीचा तपशील येत्या वीस डिसेंबरपर्यंत सादर करावा, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात अहिल्यानगरची खेळाडू नयना खेडकर हिनं भारताचं प्रतिनिधित्व करत कुंग फू मध्ये रौप्य पदक पटकावलं आहे. चीनच्या हेनान प्रांतातल्या झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या या स्पर्धेत छप्पन्न देशातल्या विविध वयोगटातल्या अडीच हजारहून जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
****
निवडणूक काळात चोख बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीनं नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी एकोणचाळीस नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहेत. जिल्हा नियोजन समितीनं ही वाहनं खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यापैकी बावीस वाहनांना आज नांदेडच्या पोलीस मुख्यालयातून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस कर्तव्याकरता रवाना करण्यात आलं.
****
0 notes
Text
रिझव्र्ह बँकेने रुपयाला ८० च्या खाली ठेवल्याने परकीय चलन साठा २ वर्षांच्या नीचांकावर आला आहे.
रिझव्र्ह बँकेने रुपयाला ८० च्या खाली ठेवल्याने परकीय चलन साठा २ वर्षांच्या नीचांकावर आला आहे.
परकीय चलन साठा $564.053 अब्ज पर्यंत घसरला भारताचा परकीय चलन गंगाजळी दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरली, सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण नोंदवली, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या शब्दावर खरे उतरून, एका आठवड्यात रुपयाला 80 प्रति डॉलरच्या पुढे कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी हस्तक्षेप केला. दोन दशकांहून अधिक उच्चांक. RBI च्या साप्ताहिक सांख्यिकीय आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की 19 ऑगस्ट रोजी…
View On WordPress
#RBI#परकीय चलन#परकीय चलन आरबीआय#परकीय चलन राखीव#परकीय चलन राखीव गुंतवणूक#परकीय चलन राखीव डेटा#परकीय चलन साठा#परकीय चलन साठा घसरला#परकीय चलन साठा बातम्या#परकीय चलन साठा भारत#फॉरेक्स राखीव बातम्या#फॉरेक्स रिझर्व्ह भारत#भारताचा परकीय चलन साठा#भारताचा विदेशी चलन राखीव#रुपया#रुपया डॉलर#रुपया डॉलर चलन विनिमय#रुपया डॉलर चलन विनिमय दर#रुपया डॉलर रूपांतरण दर#रुपया डोल#रुपयाचे डॉलर रूपांतरण
0 notes