#निवृत्त
Explore tagged Tumblr posts
Text
' मुलांना एक रुपया देणार नाही कारण त्यांना.. ' , निवृत्त वडिलांचा व्हिडीओ व्हायरल
प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचे लाड करतात आणि त्याला जे काही मिळाले नाही ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते मात्र सोशल मीडियावर सध्या एका निवृत्त झालेल्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये वडिलांनी ‘ आयुष्य माझ्यासाठी आहे असे म्हणत मुलाला मी एक छदाम देखील देणार नाही ‘ असे म्हटलेले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…
View On WordPress
#&039; मुलांना एक रुपया देणार नाही कारण त्यांना.. &039;#निवृत्त वडिलांचा व्हिडीओ व्हायरल#निवृत्तीनंतर आयुष्य कसे जगावे#व्हायरल बातम्या
0 notes
Text
पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ? निवृत्त डीवायएसपी यांना मुलाची मारहाण
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून साताऱ्यात समोर आलेली असून निवृत्त असलेले डी वाय एस पी यांना चक्क त्यांच्या मुलाने ‘ पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ..मला का देत नाही ? ‘ असे म्हणत बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शाहूपुरी परिसरातील गुलमोहर कॉलनी ही घटना घडलेली आहे. आरोपी मुलासह त्याच्या आईवर देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध…
View On WordPress
0 notes
Text
पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ? निवृत्त डीवायएसपी यांना मुलाची मारहाण
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून साताऱ्यात समोर आलेली असून निवृत्त असलेले डी वाय एस पी यांना चक्क त्यांच्या मुलाने ‘ पेन्शन तुम्ही एकटेच खाता का ..मला का देत नाही ? ‘ असे म्हणत बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. शाहूपुरी परिसरातील गुलमोहर कॉलनी ही घटना घडलेली आहे. आरोपी मुलासह त्याच्या आईवर देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपलब्ध…
View On WordPress
0 notes
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जा�� असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस ��हे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती ��्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या ��णि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया ��ेवी या अभिनेत्रीने निताचे ��ाम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes
·
View notes
Photo
श्रीमद् भगवद्गीता यथारूप 2.9 https://srimadbhagavadgita.in/2/9 सञ्जय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तपः । न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २.९ ॥ TRANSLATION संजय ने कहा – इस प्रकार कहने के बाद शत्रुओं का दमन करने वाला अर्जुन कृष्ण से बोला, “हे गोविन्द! मैं युद्ध नहीं करूँगा,” और चुप हो गया । PURPORT धृतराष्ट्र को यह जानकर परम प्रसन्नता हुई होगी कि अर्जुन युद्ध न करके युद्धभूमि छोड़कर भिक्षाटन करने जा रहा है । किन्तु संजय ने उसे पुनः यह कह कर निराश कर दिया कि अर्जुन अपने शत्रुओं को मारने में सक्षम है (परन्तपः) । यद्यपि कुछ समय के लिए अर्जुन अपने पारिवारिक स्नेह के प्रति मिथ्या शोक से अभिभूत था, किन्तु उसने शिष्य रूप में अपने गुरु श्रीकृष्ण की शरण ग्रहण कर ली । इससे सूचित होता है कि शीघ्र ही वह इस शोक से निवृत्त हो जायेगा और आत्म-साक्षात्कार या कृष्णभावनामृत के पूर्ण ज्ञान से प्रकाशित होकर पुनः युद्ध करेगा । इस तरह धृतराष्ट्र का हर्ष भंग हो जायेगा । ----- Srimad Bhagavad Gita As It Is 2.9 sañjaya uvāca evam uktvā hṛṣīkeśaṁ guḍākeśaḥ paran-tapaḥ na yotsya iti govindam uktvā tūṣṇīṁ babhūva ha TRANSLATION Sañjaya said: Having spoken thus, Arjuna, chastiser of enemies, told Kṛṣṇa, “Govinda, I shall not fight,” and fell silent. PURPORT Dhṛtarāṣṭra must have been very glad to understand that Arjuna was not going to fight and was instead leaving the battlefield for the begging profession. But Sañjaya disappointed him again in relating that Arjuna was competent to kill his enemies (paran-tapaḥ). Although Arjuna was, for the time being, overwhelmed with false grief due to family affection, he surrendered unto Kṛṣṇa, the supreme spiritual master, as a disciple. This indicated that he would soon be free from the false lamentation resulting from family affection and would be enlightened with perfect knowledge of self-realization, or Kṛṣṇa consciousness, and would then surely fight. Thus Dhṛtarāṣṭra’s joy would be frustrated, since Arjuna would be enlightened by Kṛṣṇa and would fight to the end. ----- #krishna #iskconphotos #motivation #success #love #bhagavatamin #india #creativity #inspiration #life #spdailyquotes #devotion
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 07 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
वन रँक-वन पेन्शनच्या अंमलबजावणीला आज दहा वर्षे पूर्ण झाली. वन रँक-वन पेन्शन म्हणजे निवृत्त सैनिकांच्या धैर्य आणि बलिदानाप्रती असलेली कृतज्ञतेची भावना असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दशकभरात लाखो निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या कुटुंबीयांना यामुळं मदत झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सैन्यदलाच्या बळकटीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. तीन नव्या फौजदारी कायद्यांमुळं नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. कर्तव्य निभावत असताना शहीद झालेल्या ३६ हजारांहून अधिक पोलिसांना शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय तपास संस्थेनं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. केंद्रीय तपास संस्थांचे अधिकारी, न्यावैद्यक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची परिषदेला उपस्थिती आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज गोवा भेटीवर आहेत. राष्ट्रपती स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतच्या विविध सरावांची पाहणी करणार आहेत. यामध्ये जमिनीवरील जहाज मोहीम, कॉम्बॅट ऑपरेशन्स, पाणबुडी ऑपरेशन्स आणि बचाव आणि मदतकार्यांचा समावेश आहे. ��ाष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयएनएस विक्रांतची प्रथमच पाहणी करत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना आयोगाकडून टपालाच्या माध्यमातून कळवण्यात आलं आहे. तसंच आयोगाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू केलं जाणार नाही, असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सांगितलं. त्या आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. ३७० कलम लागू करुन सर्वोच्च न्यायालयाच्या न���र्णयाचा अवमान करायचा का, असा सवाल उपस्थित करुन हे कलम हटवल्यामुळे राज्यातील दहशतवादी घटना कमी झाल्याचं इराणी यांनी नमूद केलं. दरम्यान, ३७० कलमाच्या पुनरूज्जीवना संदर्भातील ठरावावरून जम्मू काश्मीर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादामुळे आज सभागृहात गदारोळ झाला.
ग्राहक ओळख पटवणे- केवायसीच्या संदर्भातील काही नियमांमध्ये रिझर्व्ह बँकेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल, तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन अथवा सेवा घेताना पुन्हा ओळखपडताळणीसाठी ग्राहक देय परिश्रम कस्टमर ड्यू डिलिजन्स साठी अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणी केंद्रात सात दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून छटपूजेनिमित्त ११ तारखेपर्यंत रेल्वेच्या १६० विशेष फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. याशिवाय १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान ७ हजार ६०० विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. नांदेड विभागातूही पानिपतसाठी १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान चार जादा फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
भाजपनेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्यात किनवट दौऱ्यावर आहेत. किनवट मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रदिप नाईक यांच्यात लढत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोविंद जेठेवार निवडणूक लढवत आहे. किनवट इथल्या सभेनंतर फडणवीस यांच्या यवतमाळ जिल्ह्यात ती�� जाहीर सभा नियोजीत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दर्यापूर, तिवसा, बडनेरा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दत्तात्रय दगडे पाटील आणि जुन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख आशाताई बुचके यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसंच सर्व पदांचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले.
प्रसिद्ध लोकगीत गायिका शारदा सिन्हा यांच्या पार्थिवावर आज पाटण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिहार कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या शारदा यांचं परवा मंगळवारी दिल्लीत निधन झालं.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन खो खो स्पर्धा उद्यापासून बीड इथं होणार आहेत. विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत ३५ संघ सहभागी झाले आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण दोन हजार ८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी दोन हजार ८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.
0 notes
Text
Jamshedpur devotees started chhath mahaparv : श्रद्धालुओं ने नहाय-खाय के साथ की छठ महापर्व की शुरुआत, व्रतियों ने कद्दू-भात एवं चने की दाल खाकर शुरू किया व्रत, व्रतियों के परिजन-प्रियजनों ने भी पाया कद्दू भात का प्रसाद
जमशेदपुर : आज मंगलवार, 05 नवंबर को नहाय खाय के साथ छठ महापर्व की विधिवत शुरुआत हो गई. भगवान सूर्य के प्रति अटूट आस्था एवं पवित्रता के प्रतीक इस चार दिवसीय पर्व के पहले दिन आज व्रतियों ने प्रातः स्नानादि से निवृत्त होने के पश्चात अत्यंत पवित्रता के साथ कद्दू की सब्जी, चने की दाल एवं अरवा चावल का भोग तैयार किया एवं नियम पूर्वक उसे ग्रहण कर नहाय खाय की विधि पूरी कर व्रत की शुरुआत की. व्रतियों के भोग…
0 notes
Text
Pune : ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास मनपा’ची टाळाटाळ का? काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल
Pune : ‘निवृत्त सेवकांना’ वेतन फरकादी रक्कम देण्यास मनपा’ची टाळाटाळ का? काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचा संतप्त सवाल – MPC…
0 notes
Text
*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक - 6 सितम्बर 2024*
*⛅दिन - शुक्रवार*
*⛅विक्रम संवत् - 2081*
*⛅अयन - दक्षिणायन*
*⛅ऋतु - शरद*
*⛅मास - भाद्रपद*
*⛅पक्ष - शुक्ल*
*⛅तिथि - तृतीया दोपहर 03:01 तक तत्पश्चात चतुर्थी*
*⛅नक्षत्र - हस्त प्रातः 09:25 तक तत्पश्चात चित्रा*
*⛅योग - शुक्ल रात्रि 10:15 तक तत्पश्चात ब्रह्म*
*⛅राहु काल - प्रातः 11:04 से दोपहर 12:38 तक*
*⛅सूर्योदय - 06:27*
*⛅सूर्यास्त - 06:49*
*⛅दिशा शूल - पश्चिम दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 04:51 से 05:37 तक*
*⛅ अभिजीत मुहूर्त - दोपहर 12:13 से दोपहर 01:03 तक*
*⛅निशिता मुहूर्त- रात्रि 12:15 सितम्बर 07 से रात्रि 01:01 सितम्बर 07 तक*
*⛅ व्रत पर्व विवरण - श्री वराह जयंती, हरितालिका तृतीया, स्वर्ण गौरी व्रत, चतुर्थी (चंद्र दर्शन निषिद्ध, चन्द्रास्त - रात्रि 08:56 तक),रूद्र सावर्णि मन्वादि*
*⛅विशेष - तृतीया को परवल खाना शत्रु वृद्धि करता है व चतुर्थी को मूली खाने से धन-नाश होता है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🔹प्रायश्चित जप🔹*
*🔸पूर्वजन्म या इस जन्म का जो भी कुछ पाप-ताप है, उसे निवृत्त करने के लिए अथवा संचित नित्य दोष के प्रभाव को दूर करने के लिए प्रायश्चितरूप जो जप किया जाता है उसे प्रायश्चित जप कहते हैं ।*
*🔸कोई पाप हो गया, कुछ गल्तियाँ हो गयीं, इससे कुल-खानदान में कुछ समस्याएँ हैं अथवा अपने से गल्ती हो गयी और आत्म-अशांति है अथवा भविष्य में उस पाप का दंड न मिले इसलिए प्रायश्चित – संबंधी जप किया जाता है ।*
*🔸ॐ ऋतं च सत्यं चाभिद्धात्तपसोऽध्यजायत ।*
*त��ो रात्र्यजायत तत: समुद्रो अर्णव: ।।*
*समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत ।*
*अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी ।।*
*सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् ।*
*दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो स्व: ।। (ऋग्वेद :मंडल १०, सूक्त १९०, मंत्र १ - ३ )*
*🔸इन वेदमंत्रों को पढ़कर त्रिकाल संध्या करें तो किया हुआ पाप माफ हो जाता है, उसके बदले में दूसरी नीच योनियाँ नहीं मिलतीं । इस प्रकार की विधि है ।*
*🔹लक्ष्मी कहाँ विराजती हैं ?🔹*
*🔸जहाँ भगवान व उनके भक्तों का यश गाया जाता है वहीँ भगवान की प्राणप्रिया भगवती लक्ष्मी सदा विराजती है । (श्रीमद् देवी भागवत )*
*🔹घृतकुमारी (ग्वारपाठा) रस 🔹*
*🔸घृतकुमारी शरीर गत दोषों व मल के उत्सर्जन के द्वारा शरीर को शुद्ध व सप्तधातुओं को पुष्ट कर रसायन का कार्य करती है I*
*🔸विविध त्वचा विकार, पीलिया, रक्ताल्पता, कफजन्य ज्वर, हड्डियों का बुखार, नेत्ररोग, स्त्रीरोग, जलोदर, घुटनों व अन्य जोड़ों का दर्द, जलन, बालों का झड़ना, आदि में उपयोगी है I*
*🔸पेट के पुराने रोग, चर्मरोग, गठियाव व मधुमेह (डायाबिटीज) में यह विशेष लाभप्रद है I*
*🔸रस की मात्रा : बच्चों के लिए ५ से १५ मी.ली. तथा बड़ों के लिए १५ से २५ मी.ली. रस सुबह खाली पेट लें I*
#motivational motivational jyotishwithakshayg#tumblr milestone#akshayjamdagni#mahakal#panchang#hanumanji#rashifal#nature#astrovastukosh
0 notes
Text
मध्यप्रदेश शिक्षक ने बनायी सेवानिवृत शिक्षकों के सम्मान कार्यक्रम की रूपरेखा
इटारसी। मध्य प्रदेश शिक्षक संघ विकासखंड सोहागपुर की बैठक में इस वर्ष भी सेवा निवृत्त शिक्षकों के सम्मान कार्यक्रम के संबंध में विस्तृत कार्य योजना तैयार की एवं वार्षिक सदस्यता के संबंध में चर्चा करते हुए योजनाबद्ध तरीके से सदस्यता अभियान करवाने पर चर्चा की गई। बैठक में महेश कुमार रघुवंशी तहसील अध्यक्ष मालकजी पटेल, जिला कोषाध्यक्ष राजेंद्र कुमार मालवीय, रघुनंदन पाली, नगर अध्यक्ष हाकम सिंह मेहरा,…
0 notes
Text
गुप्त नवरात्रि दस देवियों के नाम | Gupt Navratri 2024 date
Gupt Navratri 2024 date
Gupt Navratri – गुप्त नवरात्रि वर्ष में दो बार मनाई जाती है - एक बार माघ (जनवरी-फरवरी) महीने में और दूसरी बार आषाढ़ (जून-जुलाई) महीने में। गुप्त नवरात्रि विशेष रूप से तंत्र साधना और गुप्त साधना के लिए जानी जाती है।
गुप्त नवरात्रि 2024 gupt navratri 2024 date
गुप्त नवरात्री 2024 में 6 जुलाई शनिवार 2024 को पर्व प्रारंभ होकर दिन 16 जुलाई, मंगलवार 2024 तक जारी रहेगा |
नवरात्रि हिंदुओं का एक मुख्य त्यौहार है | साल में चार नवरात्रि मनाई जाती है जो - चैत्र, माघ, आषाढ़, आश्विन माह में मनाई जाती हैं | गुप्��� नवरात्रि की पूजा प्रत्यक्ष नवरात्रि से अलग होती है | प्रत्यक्ष नवरात्री में नो देवियो की पूजा की जाती है | और गुप्त नवरात्रि में दस महाविद्याओं की साधना की जाती है |
गुप्त नवरात्रि दस देवियों के नाम
दस देवियों के नाम क्रम से इस प्रकार है - (1) काली, (2) तारा, (3) त्रिपुर-सुंदरी (सोदासी), (4) भुवनेस्वरी, (5) छिन्नमस्ता, ( 6) भैरवी, (7) धूमावती, (8) बगलामुखी, (9) मातंगी, और (10) कमला। अधिकांश स्रोतों में दस देवियो का वर्णन इस प्रकार किया गया है |
पूजन विधि -
गुप्त नवरात्रि पर्व के दिनों में सुबह जल्द उठकर दैनिक कार्यों से निवृत्त होकर स्नान करने के बाद स्वच्छ कपड़े पहनें।
देवी पूजन की सभी सामग्री को एकत्रित करें। पूजा की थाल सजाएं।
मां दुर्गा की प्रतिमा को लाल रंग के वस्त्र में सजाएं।
मिट्टी के बर्तन में जौ के बीज बोएं और नवमी तक प्रति दिन पानी का छिड़काव करें।
पूर्ण विधि के अनुसार शुभ मुहूर्त में कलश को स्थापित करें
इसमें पहले कलश को गंगा जल से भरें, उसके मुख पर आम की पत्तियां लगाएं और उस पर नारियल रखें।
फिर कलश को लाल कपड़े से लपेटें और कलावा के माध्यम से उसे बांधें
अब इसे मिट्टी के बर्तन के पास रख दें
फूल, कपूर, अगरबत्ती, ज्योत के साथ पंचोपचार पूजा करें
पूरे परिवार सहित माता का स्वागत करें, उनका पूजन, आरती करके भोग लगाएं और उनसे सुख-समृद्धि की कामना करें।
नौ दिनों तक मां दुर्गा के मंत्रों का जाप करें।
अष्टमी या नवमी को दुर्गा पूजा के बाद नौ कन्याओं का पूजन करें और उन्हें तरह-तरह के व्यंजनों (पूड़ी, चना, हलवा) का भोग लगाएं।
गुप्त नवरात्रि अंतिम दिन दुर्गा पूजा के बाद घट विसर्जन करें।
मां की आरती गाएं, उन्हें फूल, अक्षत चढ़ाएं और बेदी से कलश को उठाएं।
इस तरह नवरात्रि के पूरे दिनों में मां की आराधना करें।
#गुप्त नवरात्रि#gupt navratri 2024#gupt navratri#गुप्त नवरात्रि दस देवियों के नाम#gupt navratri puja vidhi#gupt navratri das deviyo ke nam
1 note
·
View note
Text
सहरमा बास, गाउँकै खान्कीमा चाख
भारतीय सेनाबाट निवृत्त भएपछि पोखराको अमरसिंह चोकमा बस्दै आउनुभएका म्याग्दीको मालिका गाउँपालिका–५ देवीस्थानका तोपबहादुर बूढालाई रातो च्याउ, सिमी, टुसा र निगुरोको तरकारी नभई खानै रुच्दैन । पोखरा पठाउन गाउँबाट ल्याएको अर्गानिक उत्पादनको पोको देवीस्थानबाट दरबाङ आएको बोलेरो जिपबाट निकाल्दै गर्दा दरबाङ बसपार्कमा भेटिनुभएकी बूढाकी आफन्त पर्ने ४२ वर्षीया लालकुमारी बूढाले भन्नुभयो, “सहरको बास भए पनि…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, देशी गाईला राज्यमाता दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सु��ुवात
विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती, तसंच परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यात येणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात
आणि
भारत-बांगलादेश कानपूर कसोटी रंगतदार वळणावर
****
राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, तसंच विशेष शिक्षकांच्या पावणे पाच हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्ष��ेखाली काल ही बैठक झाली.
होमगार्डला मिळणारा कर्तव्य भत्ता ५७० रुपयांवरुन एक हजार ८३ रुपये होईल. कोतवालांना मानधनात १० टक्के वाढ आणि अनुकंपा धोरण, तर ग्राम रोजगार सेवकांना आता सात हजार रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याशिवाय विशेष शिक्षकांच्या ४ हजार ८६० पदांची निर्मिती, तसंच राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख होणार आहे.
****
देशी गाईला राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. गोशाळांना देशी वंशाच्या गायीसाठी प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सदर योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे गोशाळांवरचा आर्थिकभार कमी होईल, असा विश्वास पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
**
२०२३ च्या खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला काल या बैठकीतून प्रारंभ करण्यात आला. पाच हजार रुपये प्रति हेक्टर, याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा करण्यात येत आहेत.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या तीन लाख ७१ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, ई-पीक पाहणी न केलेले आणि सातबारा उताऱ्यावर पिकाची नोंद नसलेले साधारणपणे पाच टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत, त्यांनाही अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
**
लातूर जिल्ह्यातल्या हासाळा, उंबडगा, पेठ आणि कव्हा, इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. बीड ��िल्ह्याच्या परळी तालुक्यात तीस हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यात मालेगाव जवळ सुमारे सहा हेक्टर क्षेत्रात डा��िंब इस्टेट उभारण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी ९८ कोटी रुपये निधीची तरतूद केल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं काल स्वीकारला.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या सात ऑक्टोबरला नांदेडमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. हे नेते एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि १० ऑक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.
****
शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणार्या ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला. देशातल्या तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येवुन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला. कौशल्य विकास मंत्री मंलग प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचं शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला.
****
भारत-बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे. पहिल्या सुमारे तीन दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर, काल चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. भारतीय संघानं जलद धावा करत ३५ षटकांत ९ बाद २८५ धावांवर डाव घोषीत केला. यशस्वी जयस्वालनं ७२, तर के एल रा��ुलनं ६८ धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात दोन बाद २६ धावा झाल्या होत्या. बांगलादेश अजूनही २६ धावांनी पिछाडीवर आहे.
****
जागतिक तीरंदाजी महासंघातर्फे चायनीज तैपेई इथं घेण्यात आलेल्या आशियाई तीरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा धनुर्धर रैयान सिद्दिकी यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. यामुळे तो आशियाई धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारा मराठवाड्यातला पहिला धनुर्धर ठरला आहे. काल ज्युनियर रिकर्व्ह प्रकाराच्या अंतिम सामन्यात यजमान चायनीज तैपेई संघाला नमवत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं.
****
जालना इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करता १०० जागेची मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय कला जारी करण्यात आला. जालना जिल्ह्यातल्या सर्वांसाठी आरोग्य सेवेतली महत्वाची बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरेल, असं मत जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातल्या नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर या चार जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा काल नांदेडमध्ये घेण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढवणं हे निवडणूक आयोगाचं पहिलं उद्दीष्ट असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याकार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या भूकंपाला काल ३० वर्ष पूर्ण झाली. धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर चौरस्ता इथं काल या भूकंपात प्राण गमावलेल्या नागरीकांना सामुहिक आदरांजली अर्पण करण्यात आली. आमदार ज्ञानराज चौगुले यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
****
तारांगण, ही संकल्पना प्रत्यक्षात येण्याला या वर्षी शंभर वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं जागतिक स्तरावर ‘शंभर तास खगोलशास्त्र-तारांगणाची शंभर वर्षं‘ हा उपक्रम आयोजित केला आहे. यात जगभरातल्या चार हजार तारांगणांचा सहभाग राहणार असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनच्या डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम खगोल अंतराळविज्ञान केंद्राचा समावेश आहे. या उपक्रमानिमित्त या केंद्रात येत्या दोन ते सहा ऑक्टोबर या कालावधीत अंतराळ विज्ञान विषयक माहितीपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर, हिमायतनगर आणि धर्माबाद इथं आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या तालुक्यांमधल्या पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यांना उपस्थित रहावं, असं आवाहन नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
हनुमदष्टादशाक्षर मन्त्र प्रयोग
‘मन्त्र महोदधि‘ में यह मन्त्र इस प्रकार उल्लिखित है- ‘ॐ नमो भगवते आञ्जनेयाय महाबलाय स्वाहा।’ इस अष्टादशाक्षर मन्त्र का प्रयोग स्नान एवं सन्ध्यादि नित्य क्रिया से निवृत्त होकर करना चाहिए। विनियोग ॐ अस्य मन्त्रस्य ईश्वर ऋषिः, अनुष्टुप् छन्दः, हनुमान् देवता, हुं बीजम्, स्वाहा शक्तिः, सर्वेष्टसिद्धये जपे विनियोगः । श्री सिद्धबली हनुमान मंदिर, गोरखनाथ और बजरंगबली की कहानी (Story of Shri Siddhabali…
View On WordPress
#बजरंगबली#रूद्र_अवतार#वीर_हनुमान#शुभ_प्रभात🙏#हनुमान अष्टोत्तर शतनाम स्तोत्र#हनुमान चालीसा आरती#हनुमान चालीसा हनुमान अष्टक और बजरंग बाण#हनुमान जी के 108 नाम#हनुमान जी के 108 नाम संस्कृत में#हनुमान जी के 108 नाम हिंदी में#हनुमान जी के नाम पर बच्चों के नाम#हनुमान सहस्त्र नामावली
0 notes
Text
jamshedpur rural-चाकुलिया के शाकाभांगा निवासी बीएसएफ जवान हुए सेवानिवृत्त,गांव पहुंचने पर हुआ भव्य स्वागत
चाकुलिया: चाकुलिया प्रखंड के शाकाभांगा गांव निवासी बीएसएफ जवान नरसिंग हेम्ब्रम सेवा निवृत्त होकर मंगलवार की शाम को अपने गांव पहुंचे. जवान का गांव में ग्रामीणों ने गाजे बाजे के साथ पारंपरिक तरीके से भव्य स्वागत किया. मौके पर सेवानिवृत्त जवान नरसिंग हेम्ब्रम ने बताया कि वे 1988 में बीएसएफ में योगदान दिया था और 31 अगस्त 2024 को असिस्टेंट सब इंस्पेक्टर के पद से सेवानिवृत्त हुए हैं. उनकी अंतिम…
0 notes