#नियुक्ती!;
Explore tagged Tumblr posts
mhlivenews · 9 months ago
Text
बदल्यांत सावळा गोंधळ; कार्यरत शिक्षकांच्या बदलीपूर्वी नवीन नियुक्ती, संघटनेचे प्रशासनाला निवेदन
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या नियुक्ती देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र या निर्देशांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कार्यरत शिक्षकांची बदलीप्रक्रिया राबविण्यापूर्वीच जिल्ह्यात नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्याचा प्रकार जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राम मंदिर, तीन तलाक प्रकरणातील माजी न्यायाधीशालाही राज्यपाल पदाची लॉटरी; आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती
नवी दिल्ली: ���ेंद्र सरकारने देशभरातील 13 राज्यातील राज्यपाल आणि उपराज्यपाल बदलले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जस्टिज नजीर सर्वोच्च न्यायालयात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 hours ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December 2024 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी • हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील-सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त • मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही-अंबादास दानवे यांची टीका • येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आणि • वेस्ट इंडीजचा ११५ धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाची मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी
देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होत आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते केन बेतवा नदी जोड प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. या निमित्तानं देशभरात एक हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी पंतप्रधान आज करतील. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प द��न अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले… शेतकऱ्यांना एकूण १६ हजार मेगावॅट एवढी वीज आपल्याला द्यावी लागते, ती आपल्याला सात रुपये, आठ रुपये पडायची आणि शेतकऱ्यांकडून आपण सव्वा रुपये, दीड रुपये वसूल करायचो. पण आता ही आठ रुपयाची वीज सौरऊर्जेमुळे तीन रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून भविष्यात शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना सरकारवर बोजा बनणार नाही. आणि दिवसा वीज शेतकऱ्यांना सस्टेनेबली आपल्याला देता येईल आणि भविष्यामध्ये या हरित ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हरितक्रांती आणाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
राज्य मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासाचे विविध निर्णय घेतले होते, त्यावर अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले… १६ नोव्हेंबर २०२३ ला राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहेत. आणि सरकार तसं नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं अशातला काही भाग नाही.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीही काल करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री व्ही के सिंह आता मिझोरामचे राज्यपाल असतील.
राष्ट्रीय ग्राहक दिन काल पाळण्यात आला. ग्राहक व्यवहार विभागानं आज सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' ला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या ॲप तसंच डॅशबोर्डचं अनावरण करण्यात आलं. ऑनलाईन व्यवहारात कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर जागो ग्राहक जागो ॲप ग्राहक���ंना सतर्क करतं. बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची ��क्रार करण्यास जागृती ॲप ग्राहकांना सक्षम करतं तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेतं, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना खबरदारी बाळगावी आणि खरेदीची पावती आवर्जून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी केलं आहे. तुम्ही जेव्हा पण कुठे वस्तू खरेदी करताल, कोणतीही सेवा घेताल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची पावती घेणं, प्रत्येक गोष्टीचे प्रॉपर दस्त- डॉक्युमेंट जमा करणे हे जरूर यायला याबाबत तुमचे जर कुठे फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक आयोगात येऊन तुमची तक्रार दाखल करू शकतात.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अहल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबईतल्या स्पंदन आर्ट संस्थेचे १९ वे मोहम्मद रफी पुरस्कार काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दिवंगत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना जाहीर झालेला मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार, त्यांचे पुत्र अंदलिब सुलतानपुरी यांनी स्वीकारला. गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अनुक्रमे एक लाख रुपये तसंच ५१ हजार रुपये तसंच सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. १९ फेब्रुवारीला कराचीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत तर २३ फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. उपांत्य फेरीचा पहिला सामना चार मार्चला दुबईत तर पाच मार्चला लाहोर इथं होणार आहे. अंतिम सामना नऊ मार्चला लाहोर इथं होणार आहे. मात्र उपांत्य तसंच अंतिम फेरी�� भारत दाखल झाल्यास, हे सामने दुबईत होतील, असं आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी सांगितले आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारतानं काल वेस्ट इंडीजचा ११५ धावांनी पराभव करत मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल वडोदरा इथं झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं ३५९ धावाचं लक्ष्य गाठतांना, वेस्ट इंडीजचा संघ ४७ व्या षटकांत २४३ धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेतला अखरेचा तिसरा सामना परवा खेळवला जाणार आहे.
माती आणि पाणी यांचा विकास झाला तरच शेतकऱ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असं प्रतिपादन राजस्थानातले पाणी आंदोलनातले ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रसिंह राणा यांनी केलं आहे. काल अंबाजोगाई इथं डॉ.द्वारकादास लोहिया लोकसहभाग पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिभूषण तथा जलतज्ज्ञ विजय अण्णा बोराडे यांना डॉ.द्वारकादास लोहिया लोकसहभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि ५१ हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सत्काराच्या उत्तरात बोराडे यांनी, सेंद्रीय शेती वाढवण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात तीन जानेवारी पर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली.. या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये ९९ पथक तयार करण्यात आलेली आहेत. हे पथक अति जोखीमग्रस्त भागांमध्ये टीबी सदृश्य रुग्णांचा सर्वे करत आहे, की ज्यांना टीबी सदृश्य लक्षणे आहेत, जसा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळच्या वेळी ताप येणे, भूक मंदावणे किंवा थुकीमध्ये रक्त येणे.
‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’-कुसुम मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९५२ संशयितांची तपासणी करण्यात आली, त्यात ५५ नवे रुग्ण आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. यापैकी २१ जण सांसर्गिक तर ३४ जण असांसर्गिक असून, या सर्व रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती धानोरकर यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसेच लातूरसह अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. परभणी, बीड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल भूकंपसदृष्य धक्के जाणवले. हरसूल परिसरासह पे�� तालुक्यातील अनेक गावांना काल रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होऊन दोन धक्के जाणवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. काल दुपारी इगतपुरी नजिक हा अपघात घडला.
हवामान राज्यात छत्रपती संभाजीनगर, अनेक जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
0 notes
krantinewsin · 8 days ago
Text
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
नागपूर, दि. १७ : विधानसभा का��काजासाठी तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका सभाध्यक्षपदी सदस्य सर्वश्री विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम, दिलीप सोपल यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी जाहीर केले.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३९
"तुम्ही तिघीजणी पुढील १५ मिनिटांत इथून नि��ाला नाहीत ना, तर मी खरंच खुप रागावेन!" पमाताईच्या शांत स्वरांतला निग्रह शुभदाला चांगलाच जाणवला. तणाव कमी करण्यासाठी ती हंसत हंसत म्हणाली, "उगाच किती चिडचिड कराल, पमाताई! आम्ही निघायचीच तयारी करीत आहोंत हे तुम्हीसुद्धां बघताय् ना!" "हो, बघतेय् ना!-- आणि अर्ध्या तासापासून तेंच ते पालुपदही ऐकतेय्!" पमाताई मनोरमा आणि रजनीकडे कटाक्ष टाकीत म्हणाली. "तसं नाहीं,पमाताई!" मनोरमा समजूत काढीत म्हणाली, "पण आम्ही गेल्यावर रात्रभर तुम्ही एकट्याच इथे असाल;-- त्यामुळे कांही करायचं राहूं नये याची जरा अधिकच खबरदारी घेत आहोंत एवढंच!" "पण राहिलंय् काय? पोटं भरल्यावर सगळी मुलं केव्हांची झोपीं गेली आहेत! भांडी घासून उरल्या-सुरल्याची झाकपाकही तुम्ही केली आहे." आपल्या प्रतिपादनाला चिकटून रहात पमाताईने शांतपणे विचारलं, "मग आतां संध्याकाळपासून इथे खपत असलेल्या तुम्हांला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यावी असं वाटत नाहीं कां?" "चला ग, आतां निघुयां! उद्यां सकाळी वेळेवर यायचं आहे ना, पमाताईंना मोकळं करायला? नाहींतर, सकाळी उशीर कराल आणि मग पमाताईंना तोंड देणं मुष्कील होईल!" रजनीने सगळ्या विषयावर पडदा टाकायचा प्रयत्न केला. स्वयंपाकघरात नाईट-लॅम्प लावून ठेवून सगळ्याजणी बाहेर आल्या तेव्हां जणूं त्यांचीच वाट बघत असल्यागत मनोहर भोसले म्हणाले, "तुम्हांला बोलावण्यासाठी आतां मी आंतच येणार होतो! प्रभाकरराव आणि पमाताई, तुम्ही रात्रभर इथे थांबणार असल्याने मोठीच काळजी मिटली आहे! सकाळी आमच्यापैकी कुणीतरी येईलच ७\७-३० पर्यंत. मध्यंतरी क���ंही लागलं तर वाॅचमनला सांगा किंवा आमच्यापैकी कुणालाही फोन करा!"
अनाथाश्रमाच्या इमारतीबाहेर आवारांत उभ्या केलेल्या आपापल्या वाहनांकडे सर्व वळण्यापूर्वी मनोहर भोसले सर्वांना उद्देशून म्हणाले, "आपण सर्व इथे आपुलकीने काम करतो, त्यामुळे कुणीही कुणाला धन्यवाद देण्याची आवश्यकता नाहीं! आज दुपारपासून अचानक अंगावर पडलेली जबाबदारी आपण समर्थपणे निभावून नेली;-- तथापि उद्यांपासून तांतडीने पर्यायी व्यवस्था करण्याबद्दल मी ट्रस्टच्या अध्यक्षांना, संध्याकाळी ते एकुण परिस्थिती पहायला आले होते तेव्हां स्पष्टपणे सांगीतलं आहे. त्यांनी त्यासाठी उद्यां सकाळी सर्व संबंधितांची बैठक तांतडीने बोलावली आहे. त्या बैठकीत पर्यायी व्यवस्थेचा निर्णय होईल!" "पण पर्यायी व्यवस्था म्हणजे काय?" शुभदाने कांहीसं अस्वस्थ होऊन विचारलं, "आतां होत्या तशाच दुसऱ्या आया वा परिचारिका नेमणार?" तिला थांबवायचा अनंतने प्रयत्न केला तेव्हां भोसले म्हणाले, "अनंतराव, वहिनींनी उपस्थित केलेल्या प्रश्नामधे तथ्य आहे! मी स्वत: गेली १२ वर्षं या 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करीत असलो तरी ट्रस्टच्या अंतर्गत कारभाराशी माझा कांहीच संबंध नव्हता! त्यामुळेच आज जे घडलं ते मलाही खुप धक्कादायक आहे! क्षणभर वाटलं की आपण इतकी वर्षं ट्रस्टच्या एकुण कारभारातही थोडं तरी लक्ष घालायला हवं होतं!" "जे घडलं ते तुमच्याप्रमाणेच, ट्रस्टशी संबधित इतर सर्वांनाही धक्कादायक असेल ना?" अनंतने सावधपणे विचारलं.
"नक्की सांगणं कठीण आहे!" भोसले घुटमळत म्हणाले, "जे काय असेल ते असो;-- पण मी मात्र उद्यां होणाऱ्या बैठकीत याबद्दल अनेक प्रश्न बेधडक विचारणार आहे! ट्रस्टच्या दैनंदिन कारभाराशी संबंधित नसलो, तरी माझ्यावर विश्वास ठेवून देणग्या देणाऱ्यांच्या वतीने रोखठोक प्रश्न विचारण्याचा पुरेपूर अधिकार मला आहे हे समजून अध्यक्षांनी मला उद्यां होणाऱ्या सभेमधे भाग घेण्यासाठी खास आमंत्रित म्हणून बोलावलं आहे!" "ते तुमच्या सभेमधे काय होईल, मला कांही कळत नाहीं! पण आम्ही तिघींनी आज जी अव्यवस्था सगळीकडे बघितली त्यावरून एवढं नक्की वाटतं की यापुढे तरी सुशिक्षित आणि अनुभवी परिचारिकांची नियुक्ती करावी लागेल!" मनोरमाने व्यथित स्वरांत सुचना केली. "ज्या कुणा नवीन परिचारिकांची निवड होईल त्यांना ट्रस्टने पुरेसा पगार दिला पाहिजे, म्हणजे त्यांना अशी चोरी-मारीची दुर्बुद्धी होणार नाहीं!" रजनीने आपलं मत मांडलं. "या अनाथाश्रमांतल्या बऱ्याच अपंग, आजारी मुलांना धड तक्रारही करतां येत नाही!" शुभदा हळहळत म्हणाली, "पण ज्या कांही चार-सहा मुलांशी आमचा संवाद होऊ शकला, त्यावरून असं जाणवलं की इथे काम करणाऱ्या परिचारिका इथल्या मुलांना व्यवस्थित खाऊं-पिऊं घालण्यापेक्षा स्वत:च्या छानछोकीमधेच दंग होत्या!" "तुम्ही तिघींनी जे कांही अनुभवलं त्याचा सविस्तर गोषवारा मनोरमा मला आतां घरी गेल्यावर सांंगेलच! त्या आधारे मी उद्यां होणाऱ्या ट्रस्टींच्या बैठकीत काय मुद्दे उपस्थित करायचे त्याची यादी तयार करीन!" भोसले म्हणाले, "त्याबाबत आपण उद्यां सकाळी बैठकीपूर्वी, एकत्र जमून बोलुयां!"
१८ मे २०२३
0 notes
darshanpolicetime1 · 16 days ago
Text
सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक; जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर - महासंवाद
मुंबई, दि. ९ : सभागृहातील सदस्य राज्यातील जनतेचे प्रतीक असून जनतेच्या आशा आकांक्षा व्यक्त करणारे हे सभागृह आहे. सभागृहाच्या वेळेचा  राज्यातील जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी उपयोग करून, जनतेला न्याय देण्यासाठी कार्य करणार असल्याचे  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात सांगितले. विधानसभेत 15 व्या विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल सर्वां��े आभार मानत श्री. नार्वेकर म्हणाले, सदस्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश साठे यांची नियुक्ती , वंचितही होतेय निवडणुकीसाठी सज्ज
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश साठे यांची नियुक्ती , वंचितही होतेय निवडणुकीसाठी सज्ज
वंचित बहुजन आघाडीची अहमदनगर दक्षिण जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये योगेश साठे यांची अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित असे यश मिळालेले नव्हते त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पदाधिकारी यांची तात्काळ नेमणूक करत त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत.  योगेश साठे हे पूर्वी भारिप बहुजन…
0 notes
dakshadev · 3 months ago
Text
Tumblr media
श्रीरामपूर तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी संगीता सुनील शिरसाठ सिद्धार्थ नगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचे पत्र आमदार लहू कानडे साहेब यांच्या हस्ते संगीता शिरसाठ यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 notes
news-34 · 3 months ago
Text
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
PCMC : महापालिकेच्या 'दिव्यांग भवन फाउंडेशन' मध्ये 43 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
PCMC : महापालिकेच्या ‘दिव्यांग भवन फाउंडेशन’ मध्ये 43 कर्मचाऱ्यांची नियुक्ती – MPC…
0 notes
marmikmaharashtra · 5 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/revenue-fortnight-34-persons-appointed-to-the-post-of-talathi/
0 notes
airnews-arngbad · 24 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील-सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त
मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही-अंबादास दानवे यांची टीका
येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण
आणि
राज्यात येत्या २६ तारखेपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
****
हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना १६ हजार मेगावॅट इतकी वीज देण्यात येते. हे सर्व फीडर सौरऊर्जेवर आणण्याचं काम दोन वर्षापासून सुरू असून, टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासून वर्ग होणार आहे. ३१ डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात द���ली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशात दिली होती.
****
राज्य मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासाचे विविध निर्णय घेतले होते, त्यावर अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परि���देत बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले –
१६ नोव्हेंबर २०२३ ला राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहेत. आणि सरकार तसं नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं अशातला काही भाग नाही.
****
चालू आर्थिक वर्षात पहिल्या आठ महिन्यांत देशातून स्मार्टफोन निर्यातीनं एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. सरकारच्या उत्पादन प्रोत्साहन योजनेमुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत स्मार्टफोनची निर्यात ४५ टक्क्यांनी वाढल्याचं वैष्णव म्हणाले.
****
‘एक देश एक निवडणूक’ साठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक ८ जानेवारी रोजी होणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही समिती आपला अहवाल सादर करेल. या समितीमध्ये लोकसभेचे २७ आणि राज्यसभेचे १२ असे एकूण ३९ सदस्य आहेत.
****
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. प्रियांक कानुनगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ. विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
****
ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईच्या शिवाजीपार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेनेगल यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या कामाला पुढील पिढ्यांचीही प्रशंसा मिळत राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण करत, वास्तववादी चित्रपट निर्मितीचे समांतर पर्व आणणारे बेनेगल अजरामर राहतील, असं म्हटलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला सोनेरी अध्याय संपला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
****
ख्रिस्ती बांधवांचं आराध्य असलेल्या भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ उद्या साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.
अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
****
राष्ट्रीय ग्राहक दिन आज पाळण्यात येत आहे. ग्राहक व्यवहार विभागानं आज सार्वजनिक वापरासाठी ‘जागो ग्राहक जागो ॲप’, ‘जागृती ॲप’ आणि ‘जागृती डॅशबोर्ड’ ला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या ॲप तसंच डॅशबोर्डचं अनावरण करण्यात आलं. ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक रोखणे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे हा या ॲपचा उद्देश आहे. ऑनलाईन व्यवहारात कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना सतर्क करते. तर बेकायदेशीर असलेल्या अनेक ��िंक संबधीची तक्रार करण्यास जागृती ॲप ग्राहकांना सक्षम करते तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेते, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना खबरदारी बाळगावी आणि खरेदीची पावती आवर्जुन घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी केलं आहे.
तुम्ही जेव्हा पण कुठे वस्तू खरेदी करताल, कोणतीही सेवा घेताल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची पावती घेणं, प्रत्येक गोष्टीचे प्रॉपर दस्त- डॉक्युमेंट जमा करणे हे जरूर यायला याबाबत तुमचे जर कुठे फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक आयोगात येऊन तुमची तक्रार दाखल करू शकतात.
****
राज्यात येत्या २६ तारखेपासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. २६ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा, आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज वडोदरा इथं खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाने पाच बाद ३५८ धावा करत, वेस्ट इंडीजसमोर ३५९ धावाचं आव्हान ठेवलं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं, तेव्हा वेस्ट इंडीज संघाच्या सहा षटकात बिनबाद वीस धावा झाल्या आहेत.
****
राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात तीन जानेवारी २०२५ पर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली.
या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये ९९ पथक तयार करण्यात आलेली आहेत. हे पथक अति जोखीमग्रस्त भागांमध्ये टीबी सदृश्य रुग्णांचा सर्वे करत आहे, की ज्यांना टीबी सदृश्य लक्षणे आहेत, जसा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळच्या वेळी ताप येणे, भूक मंदावणे किंवा थुकीमध्ये रक्त येणे.
****
जालना जिल्ह्यातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर एसटी बस अपघातात चालक-वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. आज सकाळी कोळेगाव घाट चढत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस वीस फूट खोल खड्ड्यात कोसळली. अपघातातल्या जखमी प्रवाशांना चिखली इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महावितरणच्या अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ५ हजार १६८ लघु आणि उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तसच ४ हजार ४३५ वीजग्राहकांनी ७ कोटी २८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
बीड पोलिसांनी काल एकाच दिवसात सुम��रे ६३ अवैध धंद्यांवर कारवाई केली. जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नवनित काँवत यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातल्या २८ पोलिस ठाण्यांनी एकाच दिवसात ही कारवाई केली. जुगार, अवैध मद्य विक्री प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज नांदेड इथं मोर्चा काढण्यात आला. परभणी, बीड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लातूर इथंही काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी फेरी काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
****
बांगलादेशात भारतीय आणि हिंदुसह अन्य अल्पसंख्याक समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज नाशिक इथं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने एका मॉलमधील बांगलादेशात उत्पादीत झालेल्या कपड्यांची होळी करण्यात आली.
****
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
पुरुषोत्तम जयपुरिया बने बहुप्रांतीय जीएसटी समन्वयक
*जालना लायंस परि��ार के विभिन्न पदाधिकारियों की बहुप्रांतीय और प्रांतीय समितियों पर नियुक्ती Purushottam Jaipuria appointed as Multi Provincial GST Coordinator जालना: लायंस क्लब के पूर्व राज्यपाल पुरुषोत्तम जयपुरिया को उनके उल्लेखनीय कार्यकाल और सेवा परियोजनाओं के चलते अब 3234 बहु-प्रांतों के जीएसटी समन्वयक के रूप में नियुक्त किया गया है. इसके साथ ही जालना लायंस परिवार के कई पदाधिकारियों को…
0 notes
darshanpolicetime1 · 23 days ago
Text
‘नीरी’चे अतुल वैद्य यांची एलआयटी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती - महासंवाद
मुंबई, दि. २ : सीएसआयआर ‘नीरी’चे संचालक डॉ अतुल नारायण वैद्य यांची नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी डॉ अतुल वैद्य यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल त्या तारखेपर्यंत) करण्यात आली आहे. डॉ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sharpbharat · 6 months ago
Text
Jamshedpur rural mla met cm - झारखंड के मुख्यमंत्री चांपई सोरेन से मिले बहरागोड़ा विधायक, पुनः सर्वे कराकर शिक्षकों की नियुक्ती कराने की मांग
चाकुलिया : झारखंड के रांची मोराबादी स्थित राज्य के मुख्यमंत्री चंपाई सोरेन से उनके आवास पर बहरागोड़ा के विधायक समीर मोहंती ने मुलाक़ात कर बहरागोड़ा विधानसभा क्षेत्र के विभिन्न विकास योजनाओं को लेकर एवं वर्तमान राजनीतिक और पार्टी के सांगठनिक स्थिति को लेकर चर्चा की. विधायक ने मुख्य रूप से जिला के विभिन्न विद्यालयों में क्षेत्रीय भाषा में शिक्षकों के पदस्थापन को लेकर की गयी. सर्वे में विसंगति बताते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 7 months ago
Text
जिल्हाभरातील मतदान केंद्रे सज्ज!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२०) मतदान होत असून, या मतदानासाठी केंद्रांवर पोहोचण्यासाठी ५७० बसेस व १२५२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार (दि.१९) प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मतदानासाठीच्या साहित्याचे वितरण करण्यात आल्यानंतर बसेस, जीप मतदान केंद्रांकडे रवाना झाल्या. या मतदान प्रक्रियेसाठी १७ हजार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली असून, सात हजार…
Tumblr media
View On WordPress
0 notes