#नागपूरच्या
Explore tagged Tumblr posts
Text
महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना झाले. ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. दोन्ही देश केवळ मजबूत व्यापार आणि ऊर्जेबाबतच भागीदार नाहीत तर पश्चिम आशिया क्षेत्रातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी तसंच समान हितसंबंधातही भागीदार आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
संसद भवनात झालेल्या निदर्शनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कथित हल्ला आणि भारतीय जनता पक्षाच्या दोन खासदारांना दुखापत झाल्याच्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. भाजपच्या तक्रारीवरून राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप खासदार अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह खासदार बन्सुरी स्वराज आणि हेमांग जोशी यांनी गुरुवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानेही नागालँडच्या महिला खासदार फांगनॉन कोन्याक यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कथित गैरवर्तनाची स्वत:हून दखल घेतली आहे.
जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास समिती स्थापन केली आहे. काल सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर हा अपघात झाला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. दीक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी आमच्यासाठी महत्वाचं स्थान आहे, इथं आल्यानंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं त्यांनी यावेळी म्हटलं. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही देशाचा कारभार चालवत आहोत, राज्य शासनाच्या वतीनं तालुकानिहाय संविधान भवन बांधण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या जालना बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहराल्या मुख्य बाजारातली बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानं बंद असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी पक्षाचे नेते राजेश टोपे उपस्थित होते.
दरम्यान, बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर इथं उपायुक्त असुन त्यांची पोलिस अधिक्षक म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलिस अधिक्षक म्हणून शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
राज्यात ४२ मंत्री आहेत, पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आ���ेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत आज ते बोलत होते. विदर्भात गेल्या अकरा महिन्यात २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, गेल्या तीन वर्षांत सात हजार आत्महत्या झाल्या. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही, कृषी विमा योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सत्ताधारी सदस्यच करीत आहे, ही गंभीर परिस्थिती असून याची उत्तरं सरकारनं द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ कोटी ३२ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली. या प्रकरणी बँकॉकहून येणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
शिक्षकांना शैक्षणिक कामांतून मुक्त करा, अशी आग्रही मागणी ��ागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधा��र अडबाले यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे. सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी आणि इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात असल्यानं राज्यातील शिक्षकांत तीव्र असंतोष असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं.
आज पहिला जागतिक ध्यान दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. लोकांना शांती आणि कल्याणाच्या भावनेनं जीवन जगण्याची प्रेरणा देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं आहे. संयुक्त महासभेनं या संदर्भात भारतानं सहप्रायोजित केलेला ठराव नुकताच एकमतानं मंजूर केला होता. आज या निमित्तानं न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भारताच्या स्थायी मिशनचे प्रतिनिधी पार्वतनेनी हरीश यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. लक्षावधी लोक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात, प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी ध्यान अभ्यासाचं नेतृत्व केलं.
0 notes
Text
0 notes
Link
0 notes
Text
खेलो इंडिया महाराष्ट्र अपडेट
चिमुकल्या कुश, यज्ञेशने मारली बाजी
महाराष्ट्रासाठी जिंकले पहिले पदक
नागपूरच्या 11वर्षीय खेळाडूंची मुलाखत पहाण्यासाठी क्लिक करा
.
.
.
.
#amitschools#bestconventinnagpur#amitgroupofschools#conventschooldighorinagpurmaharashtra#conventschoolnagpur#kheloindia#1st prize
0 notes
Text
पृथ्वीराजबाबांच्या जागी विखे मुख्यमंत्री होणार होते, पण राहुल गांधी यांची भेट झाली अन्...
नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांचा राजीनामा घेत तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री करण्याचा झालेला निर्णय ऐनवेळी फिरला आणि २०१४ ला शेवटच्या वर्षात मुख्यमंत्री बननण्याच्या विखे पाटील यांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची खमंग चर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात रंगली आहे.राज्यातील एका वरिष्ठ नेत्याने मंगळवारी सकाळी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना २०१४…
View On WordPress
#harshwardhan patil#Maharashtra Assembly Winter Session 2023#Prithviraj Chavan#radhakrishna vikhe#vidhansabha winter session#नागपूर हिवाळी अधिवेशन २०२३#पृथ्वीराज चव्हाण#राधाकृष्ण विखे
0 notes
Text
नागपूरच्या व्हीआयडीसी मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी भारती झाडे
https://bharatlive.news/?p=186767 नागपूरच्या व्हीआयडीसी मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी भारती ...
0 notes
Text
नागपूरच्या अट्टल चोरट्यास गोंदिया पोलिसांनी केली अटक
0 notes
Text
भाजप नेत्याला अघोरी बाबाचा ' असाही ' विचित्र अनुभव की..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर येथे समोर आलेली असून सकाळी सायकलवर फिरण्यासाठी निघालेल्या एका भाजप नेत्याला आरोपींनी आपण आघोरी बाबा आहोत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून सोन्याची चैन, माणिक खडा असलेली अंगठी असा तब्बल साडेचार लाख रुपयांचा माल घेऊन या भोंदूबाबांनी पलायन केले. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हद्दीत शनिवारी सकाळी सहाच्या…
View On WordPress
0 notes
Text
��िदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासह समतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा मांडला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
नागपूर, दि. २१ : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 December 2024 Time: 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य सरकारच्या आज सायंकाळी होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून ज्येष्ठ आमदार चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गरीश महाजन, आशिष शेलार यांच्यासह मराठवाड्यातील पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर आदी १९ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अनिल पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांच्यासह ९ जणांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. तसंच शिवसेना पक्षाकडून आमदार उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाठ यांच्यासह १२ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांचं आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमान तळावर आगमन झालं. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. विमानतळापासून धरमपेठ येथील त्यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत रॅली काढण्यात आली आहे. विमानतळावर वार्ताहारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा संविधानानं निर्माण केलेल्या संस्थांवर विश्वास नसल्यांची टीका केली. दरम्यान, सायंकाळी मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी होणार अस���न, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत.
भारताचे पहिले गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. सरदार पटेल यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य देशाची एकता आणि अखंडता तसचं विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रेरणास्थान असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. तसंच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहत पाचशे पेक्षा अधिक संस्थानांचे विलनीकरण करून आधुनिक भारताच्या निर्मितीची पायाभरणी केली असल्याचं आपल्या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्हज २०२५ येत्या ५ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं होणार आहे. भारताला माध्यम आणि मनोरंजनाचं जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणं, विविध प्रकारच्या सहकार्यासाठी संधी प्रदान करणं आणि भारतीय प्रतिभेला प्रदर्शित करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. ही परिषद प्रतिनिधींसाठी तीन दिवस खुली असणार आहे. तर शेवटचे दोन दिवस सामान्य जनतेला या परिषदेत उपस्थित राहता येईल.
राज्यात थंडीची लाट कायम आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात घाट झाली आहे. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर शहराचं तापमान ८ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस एवढं नोंदवल. त्याचवेळी परभणी जिल्ह्यात ४ पूर्णांक ६ दशांश, धुळे जिल्ह्यात ४ पूर्णांक १ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तसंच येत्या २४ तासांत राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून राज्यभरात टंकलेखन परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजी हायस्कूल इंथल्या परीक्षा केंद्रात तीन बनावट परीक्षार्थी आढळुन आले आहेत. भरारी पथकांनी या परीक्षा केंद्राला भेट दिल्यानंतर काल हा प्रकार उघडकीस आला आहे. तीन बनावट, तीन मुळ परीक्षार्थी आणि दोन टंकलेखन संस्थाचालकांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींमध्ये संदीप शिंदे, विशाल भिल्लारे, परमेश्वर जोगदंड या बनावटसह मूळ परीक्षार्थी अभिजित सूर्यवंशी, अमित सुपेकर आणि श्रीराम प्रधान यांचा समावेश आहे. त���ंच टंकलेखन संस्थाचालक उषा तुपविहरे आणि महावीर चांदीवाल यांचाही आरोपींमध्ये समावेश करण���यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात काल राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती, जिल्ह्यातील ११ हजार ९७७ प्रकरणे या लोकअदालतीत सामोपचाराने निकाली काढून विविध प्रकरणात ४७ कोटी २९ लाख 33 हजार रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघानं ९४ षटकात ६ बाद ३६० अशी आश्वासक सुरुवात केली आहे. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर यजमानांचे तीन गडी ७५ धावांवर बाद झाले होते. सामन्याचा पहिला दिवस तेरा षटके वगळता पावसामुळे वाया गेला. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
0 notes
Text
0 notes
Text
भाजप नेत्याला अघोरी बाबाचा ' असाही ' विचित्र अनुभव की..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर येथे समोर आलेली असून सकाळी सायकलवर फिरण्यासाठी निघालेल्या एका भाजप नेत्याला आरोपींनी आपण आघोरी बाबा आहोत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले आणि बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून सोन्याची चैन, माणिक खडा असलेली अंगठी असा तब्बल साडेचार लाख रुपयांचा माल घेऊन या भोंदूबाबांनी पलायन केले. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हद्दीत शनिवारी सकाळी सहाच्या…
View On WordPress
0 notes
Text
नागपूरच्या ' त्या ' बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाचा अभूतपूर्व निर्णय
नागपूरच्या ‘ त्या ‘ बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाचा अभूतपूर्व निर्णय
एक वेगळेच प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आले असून या प्रकरणात मुंब�� उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. न्यायालयाने आपला निर्णय देताना फार काळ सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नव्हे, असे महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवलेले आहे आणि या प्रकरणात असलेल्या अभियंत्याच्या विरोधात दाखल असलेला खटला फेटाळून लावलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर अभियंता…
View On WordPress
0 notes
Text
नागपूरच्या ' त्या ' बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाचा अभूतपूर्व निर्णय
नागपूरच्या ‘ त्या ‘ बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाचा अभूतपूर्व निर्णय
एक वेगळेच प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आले असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. न्यायालयाने आपला निर्णय देताना फार काळ सहमतीने शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे बलात्कार नव्हे, असे महत्वपूर्ण निरिक्षण नोंदवलेले आहे आणि या प्रकरणात असलेल्या अभियंत्याच्या विरोधात दाखल असलेला खटला फेटाळून लावलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, सदर अभियंता…
View On WordPress
0 notes
Text
‘वज्रमूठ’ : नागपूरच्या सभेआधी काँग्रेसमध्ये मतभेद, आधी नितीन राऊत आणि आता चतुर्वेदी गायब
https://bharatlive.news/?p=86819 ‘वज्रमूठ’ : नागपूरच्या सभेआधी काँग्रेसमध्ये मतभेद, आधी नितीन राऊत आणि आता ...
0 notes