#नव वर्ष २०२३
Explore tagged Tumblr posts
writerss-blog · 2 years ago
Text
नव वर्ष २०२३
नव वर्ष का आगमन होगा होगा नव आशा और उमंग घड़ी बदलेगी समय बदलेगा वक्त देगा संदेश जहां को २०२३ का नव तरंग, नई सोच से जगमग होगा जीवन का सब रंग, भाई चारा प्रेम बढ़ेगा मानवता खुशहाली का नई सुबह बहुरंग, आओ हम सब मिलकर मनाएं नव वर्ष के नव जागृति की खुशबू फैले फिजाएं हों खुशरंग ।।
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 9 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेसाठी छत्रपती संभाजीनगर प्रशासन सज्ज
संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशाला ६४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी
कथित नक्षलसमर्थक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता
आणि
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानकांदरम्यान 'पॉड टॅक्सी' सेवेला राज्य सरकारची मंजुरी
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आता थोड्या वेळात छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा होणार आहे. सव्वा सहाच्या सुमारास क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शहा यांची ही सभा होणार आहे. रात्री आठच्या सुमारास ते छत्रपती संभाजीनगरहून रवाना होतील. दरम्यान, अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात पोलिस विभागाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात वाहतुकीमध्ये आज रात्री १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. जुनी मल्टिपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉईंट, मिल कॉर्नर ते खडकेश्वरमार्गे महात्मा फुले चौक हे रस्ते बंद राहणार असून, संध्याकाळच्या सुमारास क्रांती चौकातली वाहतूकही तीन तास बंद राहणार आहे.
दरम्यान, आज सकाळी छत्रपती संभाजीनगरइथून शहा यांनी अकोला शहराला भेट दिली. या वेळी त्यांनी सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आढावा बैठक घेतली, या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकतें उपस्थित होते.
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत परवा रविवारी ३ मार्चला राज्यातल्या ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना ��ोलिओचा डोस देण्यात आला. आता यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस आणि ��हरी भागात ५ दिवस तीव्र पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून घरोघरी जाऊन, तीन मार्चला डोस घेऊ न शकलेल्या बालकांचं लसीकरण करण्यात येत आहे. २७ मार्च २०१४ या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेनं भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केलं आहे, मात्र पोलिओग्रस्त असणाऱ्या देशांमधून होणाऱ्या स्थलांतरामुळे देशात पोलिओ रुग्ण आढळण्याच्या धोका उद्भवू शकतो, यासाठी ही मोहीम राबवली जाते.
****
संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेश या दोन देशांना ६४ हजार ४०० टन कांदा निर्यात करण्याला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. बांगलादेशला ५० हजार टन तर संयुक्त अरब अमिरातीला १४ हजार ४०० टन कांदा निर्यात केला जाणार आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती, या निर्णयात आता ही सूट देण्यात आली आहे. याशिवाय, टांझानिया या देशाला ३० हजार मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ आणि गिनी बिसाऊ या देशांना ८० हजार टन तुकडा तांदूळ निर्यात करायलाही केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे.
****
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी भरलेल्या आयकर विवरण पत्रात त्रुटी असलेल्या करदात्यांशी आयकर विभाग संपर्क साधणार आहे. काही ठिकाणी विवरण पत्रात दिलेली माहिती आणि प्रत्यक्षात झालेले आर्थिक व्यवहार यात तफावत असल्याचं, तर काहींनी विवरण पत्रच दाखल केलं नसल्याचं आयकर विभागाला आढळून आलं आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचं सुधारित विवरण पत्र भरण्याची मुदत या महिनाअखेरीस संपणार आहे.
****
नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे विभागप्रमुख, गायक डॉ गणेश चंदनशिवे यांनी केलं आहे.
बाईट - डॉ गणेश चंदनशिवे, मुंबई
धाराशिव लोकसभा मतदारसंघात अठरा वर्षे पूर्ण झालेल्या ८६ हजार नवमतदारांची नावं मतदान यादीत नोंदवली गेली आहेत. या मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून धाराशिव शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात नव मतदारांसाठी खुली भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नवमतदारांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. प्रथमच मतदान करण्यास उत्सुक विद्यार्थिनींनी सर्वांना मतदानाचा संकल्�� करण्याचं आवाहन केलं.
बाईट - गायत्री मोर, धाराशिव
****
पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असून, यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. आज मंत्रालयात यासंदर्भात शिखर समितीची बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
दरम्यान, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी शासनानं संपादित केलेल्या जमिनीसाठी अजूनपर्यंत मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा, असे निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकासकामांचा आढावा आज भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
****
दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक आणि कथित नक्षलसमर्थक जीएन साईबाबा आणि इतर पाच जणांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी सप्टेंबर २०२३ मध्ये सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. मार्च २०१७ मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयानं साईबाबा आणि इतर आरोपींना नक्षलवाद आणि देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयानं ऑक्टोबर २०२२ मध्ये या आरोपींची निर्दोष सुटका केली होती. महाराष्ट्र सरकारनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयानं साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे.
****
मुंबईत वांद्रे ते कुर्ला स्थानकांदरम्यान वांद्रे कुर्ला संकुलामधून 'पॉड टॅक्सी' धावणार असून या टॅक्सीच्या एकूण सुमारे पावणेनऊ किलोमीटरच्या मार्गामध्ये ३८ स्थानकं असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवाशांची क्षमता असलेल्या या टॅक्सी कमाल ४० किमी प्रति तास वेगानं धावतील. हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्याला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते वांद्रे कुर्ला संकुल हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
मुंबईतल्या सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करारही आज करण्यात आला.
****
लेक लाडकी योजनेसाठी १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. प���वळया तसंच केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात एक एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींना हे अनुदान देण्यात येणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत ३६ जिल्ह्यात १९ कोटी ७० लाख रुपये निधी वितरीत करण्यात आला असून जिल्हा तसंच तालुका स्तरावर शिबीरं भरवून हा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचं मंत्री तटकरे यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज येत्या १२ मार्चपर्यंत सीएसएन आरएनयू डॉट ॲडमिन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
0 notes
dilbagdas · 2 years ago
Text
#HappyNewYear धमाका 💥
पाक मुस्लिम मजहब के लिए खुदा कबीर शुभानवताला का नव वर्ष २०२३ के लिए पैगामे किताब निशुल्क मंगवाए (मुसलमान नही समझे ज्ञान कुरआन) अधिक जानकारी के लिए पाक पुस्तक निःशुल्क प्राप्त करें। अपना पूरा नाम, पता व मोबाइल नं. हमें whatsApp करें... 👇
Tumblr media
0 notes
zafarsahab · 2 years ago
Photo
Tumblr media
Season's Greetings! सभी को नए साल २०२३ की दिली मुबारकबाद! आप सब को आने वाला नव वर्ष २०२३ मंगलमय हो। #zafarsahab #hussainfamilyindia (at Delhi NCR & Meerut) https://www.instagram.com/p/Cm0gvSrqbkI/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशातल्या तरुणांसाठी मेरा युवा भारत ही स्वायत्त संस्था उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्यातल्या नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक समिती गठीत
दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेची देशभरात छापेमारी
आणि
राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या आठ बारवांचे पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिकेचं प्रकाशन-परभणी जिल्ह्यातल्या चार बारवांचा समावेश
****
देशातल्या तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' ही स्वायत्त संस्था उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकार आणि नागरिक यांच्यात सेतु म्हणून काम करण्यासाठी युवकांना सक्षम करणं आणि राष्ट्र उभारणीत युवा ऊर्जेचा योग्य वापर करणं, हा या मागचा उद्देश असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. देशातल्या ���५ ते २९ वर्ष वयोगटातल्या सुमारे ४० कोटी युवकांसाठी उभारल्या जात असलेल्या या स्वायत्त संस्थेचं येत्या ३१ ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी लोकार्पण केलं जाणार आहे.
****
देशभरात जनधन खात्यांची संख्या वाढण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपूर इथं राज्यस्तरीय बँकर्स समिती-एसएलबीसीच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. जनधन खाते, आधार आणि मोबाईल या जॅम त्रिसुत्रीच्या आधारे केंद्र सरकारच्या योजना आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत असल्याचं डॉ कराड यांनी नमूद केलं. नव मतदारांना जनधन योजनेत जोडण्यासाठी बँकांनी नव मतदार याद्या तपासून जनधन खाते उघडण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं आवाहन डॉ कराड यांनी केलं.
****
राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज संदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या समितीने बँकांच्या अडचणींचा अभ्यास करून आपला अभ्यास अहवाल शासनाला लवकरात लवकर सादर करण्याची सूचना सहकार मंत्र्यांनी केली आहे.
****
सर्व जिल्ह्यांच्या नियोजन आराखड्यातला तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मंत्रालयात क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही पवार यांनी यावेळी दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा राज्य सरकारच्यावतीने उचित सन्मान करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
****
दहशतवाद्यांना निधी पुरवल्याप्रकरणी 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' - पीएफआयशी संबंधित प्रकरणात महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आज छापेमारी केली. राज्यात मुंबई, नवी मुंबई, आणि ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये एनआयएनं कारवाई केली. मुंबईत विक्रोळी परिसरात वाहिद शेख याच्या घरावर धाड टाकण्यात आली, तो ७/११ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी होता, मात्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडलं होतं. उत्तरप्रदेश, मदुराई, दिल्ली एनसीआर, राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेश इथं देखील एनआयएनं आज छापेमारी करून सात ते दहा जणांना ��ाब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयास्पद कारवाया आणि PFI साठी निधी उभारणीत सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.
****
आज आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जात आहे.मुलींचं सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांना प्रोत्साहन देणं, त्यांच्या गरजा तसंच त्यांच्यासमोरील आव्हानं लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना करणं, हा यामागचा उद्देश आहे. 'मुलींच्या अधिकारात गुंतवणूक - आमचं नेतृत्व आमचं कल्याण' ही यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाची संकल्पना आहे.
****
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना वर्ष २०२३-२४ पासून राज्यात लागू करण्‍याला मान्यता देण्यात आली असून, ही योजना केंद्र आणि राज्‍याच्‍या सहभागानं राबवण्‍यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. या योजनेत आठ लाख रुपयांहून कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या पात्र लाभार्थी महिलेला, पहिल्‍या अपत्‍यासाठी पाच हजार रुपयांची रक्‍कम दोन हप्‍त्‍यांमध्‍ये, तर दुसरे अपत्‍य मुलगी झाल्‍यास, एकाच टप्प्यात सहा हजार रुपयांचा लाभ थेट बँकेत जमा होणार आहे.
****
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज KTB-भारत हैं हम या अॅनिमेशन मालिकेला प्रारंभ करण्यात आला. ही मालिका या महिन्याच्या १५ तारखेपासून दूरदर्शन, अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्सवर सुरु होणार आहे. संपूर्ण जगाला आपल्या शूर वीरांची माहिती व्हावी, यासाठी ही मालिका १२ भारतीय आणि सात आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. नवी दिल्लीत झालेल्या या मालिकेच्या उद्‌घाटन सोहळ्यात बोलताना अनुराग ठाकूर यांनी, स्वातंत्र्यलढ्यातल्या विस्मृतीत गेलेल्या वीरांचे स्मरण करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. या मालिकेतली क्रिश, त्रिश आणि बॉटलीबॉय ही अॅनिमेटेड पात्रं स्वातंत्र्यसैनिक आणि स्वातंत्र्यलढा यांची माहिती अनोख्या पद्धतीने मांडणार आहेत.
****
'मेरी माटी, मेरा देश' या अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागांमधील घरांघरामधून संकलित मातीची आज अमृत कलश यात्रा काढण्यात आली. मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून सुरू झालेल्या या यात्रेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले.
दरम्यान, लातूर इथं या अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेच्या निमित्ताने आज सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे.
****
राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या आठ बारवांचे पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिकेचं आज मुंबईत मुख्य पोस्टमा��्टर जनरल यांच्यावतीनं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तिकेत परभणी जिल्ह्यातल्या आर्वी, चारठाणा, पिंगळी आणि वालूर इथल्या बारवांचा समावेश आहे. याशिवाय अमरावती जिल्ह्यातली महिमापूर, सातारा जिल्ह्यातली बाजीराव विहीर, पुणे जिल्ह्यातली मंचर तर नाशिक जिल्ह्यात गिरनारे इथल्या बारवेचा समावेश आहे. या बारवांची छायाचित्रं महाराष्ट्र बारव मोहिमेचे संस्थापक आणि समन्वयक रोहन काळे यांनी उपलब्ध करून दिले आहेत. टपाल खात्याच्या या निर्णयामुळे या बारवांच्या लोकसहभागातून होणाऱ्या जतन, संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मराठवाडा प्राचीन वास्तु संवर्धन समितीचे संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केला आहे.
****
धुळे तालुक्यातील निमगुळ इथं आज राष्ट्रीय टपाल सप्ताहा निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळ्याहून आलेले सहाय्यक अधीक्षक टपाल विभाग प्रमुख संजय शर्मा यांनी शेतकऱ्यांना टपाल विभागातील अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांसह नवनवीन योजनांची माहिती दिली.
****
बीड जिल्ह्यातील केज येथे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ऊस परिषद झाली. यावर्षीच्या गळीत हंगामाला ऊस प्रती टन पाच हजार रुपयांची पहिली उचल देण्याचा ठराव घेण्यात आला. केज येथे आयोजित करण्यात आलेल्या या ऊस परिषदेमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
****
३०व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांची निवड करण्यात आली आहे. सर्वानुमते ही निवड केली असल्याचे या संमेलनाचे निमंत्रक शरद गोरे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर पोलिसांनी एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसासह एकाला अटक केली. महेश काळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरूद्ध १४ गुन्हे दाखल आहेत.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २७३ धावाचं लक्ष्य दिलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 April 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ एप्रिल २०२२ दुपारी १.०० वा. ****
राज्यात भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत बांधण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनच्या इमारतीचं भूमीपूजन त्यांच्या हस्ते आज मराठी नव वर्षाच्या प्रारंभाच्या मुहुर्तावर झालं, त्यावेळी ठाकरे बोलत होते. भाषा ही संस्कृतीची ओळख आहे तसंच मराठी भाषेची सक्ती करावी लागते, हे दुर्दैव असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या कामाचं भूमीपूजनही आज मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून केलं. सरकारमध्ये कुठेही रुसवे-फुगवे नाहीत, आपल्या सरकारचं नाव महाविकास आघाडी आहे. ही आघाडी जमिनीवर राहून राज्य विकासाचं नियोजनबद्ध काम करत आहे असं ठाकरे यावेळी म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल��या आहेत.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद आणि उत्तम आरोग्याचं जावो अशी आपण प्रार्थना करतो. आगामी वर्षात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असं मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. चैत्र शुक्लादी, उगादी, गुढी पाडवा, चेतीचंद, नवरेह तसंच साजिबू चेराओबाच्या निमित्तानं देशवासियांना शुभेच्छा, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १८४ कोटी ५२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल १८ लाख ३८ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं.  दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या १ हजार २६० रुग्णांची नोंद झाली, ४ हजार ४०० हून अधिक रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या १३ हजार ४४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७६ शतांश टक्के आहे. या संसर्गातून आता पर्यंत ४ कोटी २४ लाख ९२ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशात या संसर्गासाठी ७९ कोटीहून अधिक चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात ५ लाख २८ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.  
****
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण `म्हाडा`चा वर्ष २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प आणि वर्ष २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प प्राधिकरणाला नुकताच सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या वर्ष २०२२-२०२३ च्या दहा हजार ७६४ कोटी ९९ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला आणि वर्ष २०२१-२०२२ च्या सुधारित सात हजार ९७६ कोटी ७४ लाख रुपयांच्या रुपयांच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्राधिकरणाच्या औरंगाबाद तसंच मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोंकण या प्रादेशिक मंडळांतर्फे एकूण १५ हजार ७८१ सदनिकांचं बांधकाम करण्याचं प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात सात हजार एकोणीस कोटी ३९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
दौलताबादजवळ आज सकाळी रेल्वे रुळावरुन मालगाडीचे आठ डब्बे घसरल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. या अपघातामुळं रोटेगाव- काचीगुडा प्रवासी रेल्वे पोटूळ रेल्वे स्थानकावर तर जालना -दादर जनशताब्दी औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती. निजामाबाद- पुणे प्रवासी रेल्वेही औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आली होती. अमृतसर -नांदेड सचखंड जलद रेल्वेला लासुर स्थानकावर थांबवण्यात आलं होतं. रेल्वे वाहतूक आता सुरळित होईल, असं प्रशासनानं म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या अल्पसंख्याक बहुल भागाच्या विकासासाठी राज्य शासनानं अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण क��षेत्र विकास योजनेतून ५ कोटी ६० लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी भोकर मतदारसंघासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच झालेल्या बैठकीत परिषदेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहेत.  
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      प्रधानमंत्री गती शक्ती, सर्वांगिण विकास, उत्पादकतेत वाढ आणि गुंतवणुकीवर विशेष भर असलेला अर्थसंकल्प संसदेत सादर
·      डिजिटल रुपया जारी होणार, इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रसारासाठी बॅटरी स्वपिंग धोरण प्रस्तावित तसंच २५ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणार  
·      अगामी तीन वर्षांत ४०० वंदे भारत रेल्वे तर १०० प्रधानमंत्री गतीशक्ती कार्गो टर्मिनल विकसित करणार
·      प्रादेशिक भाषेत शिक्षणासाठी पीएम ई विद्या कार्यक्रमाअंतर्गत २०० टी व्ही चॅनल सुरु करण्याचा मानस
·      उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत १४ क्षेत्रांमध्ये ६० लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट
·      आयकर रचनेत कोणताही बदल नाही
·      अर्थसंकल्पाबाबत राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया- विरोधी पक्षांडून टीका  
·      इतर मागासवर्गीयांना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची स्वाक्षरी
आणि
·      राज्यात कोविड संसर्गाचे १४ हजार ३७२ नवे रुग्ण, मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर एक हजार ३४३ बाधित
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. प्रधानमंत्री गती शक्ती, सर्वांगिण विकास, उत्पादकतेत वाढ आणि गुंतवणुकीवर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला असल्याचं सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं.
डिजिटल रुपया, फाईव्ह जी नेटवर्क, संरक्षण क्षेत्रात खासगी सहभाग, इलेक्ट्रिक वाहन धोरण, कृषी तसंच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर, आणि पाच नदीजोड प्रकल्पांच्या विस्तृत अहवाल मसुद्याला मंजुरी, ही या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्यं सांगता येतील.
 ब्लॉक चेन तसंच अन्य तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय रिजर्व्ह बँक आगामी आर्थिक वर्षात डिजिटल रुपया जारी करेल, असं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणातून झालेल्या उत्पन्नावर ३०टक्के कर आकारण्याचा प्रस्ताव आहे.
 येत्या आर्थिक वर्षात फाईव्ह जी मोबाईल सेवेसाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल. पुढच्या तीन वर्षांत गावांमध्ये ऑप्टिकल फायबर जोडणीचं काम पूर्ण होणार असून, दुर्गम भागात परवडणाऱ्या ब्रॉडबॅण्ड तसंच मोबाईल सेवेसाठी संशोधन आणि विकासाला प्राधान्य असेल, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
 संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनासाठी खासगी क्षेत्र विशेषत: स्टार्टअप्सचा सहभाग घेण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. संशोधन आणि विकासाअंतर्गत मेक इन इंडियासाठी खरेदीची मर्यादा ५८ टक्क्यांवरून ६८ टक्के करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे.
 सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश केला जाणार आहे. या अनुषंगाने बॅटरी चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवली जाणार आहे, तसंच बॅटरी स्वपिंग धोरण अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.
 इथेनॉल मिश्रित नसलेल्या वाहनाच्या इंधनावर एक ऑक्टोबर २०२२ पासून प्रतिलीटर दोन रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारलं जाणार आहे. संमिश्रण इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 पायाभूत सुविधांवर अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आला असून, येत्या वर्षभरात २५ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जातील. महामार्ग विकासासाठी २० हजार कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे
 देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी आयटी बेस सपोर्ट मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. सरकारनं किमान हमी भावांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात २ लाख ३७ हजार कोटी रुपये पाठवल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
 सुक्ष्म, लघु तसंच मध्यम उद्योग - एमएसएमईच्या आकस्मिक कर्ज योजनेला मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, कर्ज हमीचा ५० हजार कोटी रुपयांवरून पाच लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तार करणं अर्थसंकल्पातून प्रस्तावित करण्यात आलं आहे.
 देशभरातली दीड लाख टपाल कार्यालयं १०० टक्के कोअर बँकिंग प्रणालींतर्गत येणार असून, आर्थिक समावेशनासाठी नेटबँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम्स, टपाल कार्यालय खाती आणि बँक खात्यांदरम्यान रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फरसाठी हाताळणी सुविधेचा प्रस्ताव आहे.
 या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सुमारे ५ लाख २५ हजार १६६ कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे. कृषी क्षेत्रासाठी सुमारे १ लाख ३२ हजार ५१३ कोटी, रेल्वे १ लाख ४० हजार ३६७ कोटी, ग्रामविकास १ लाख ३८ हजार २०३ कोटी, पीएम किसान योजना ६८ हजार कोटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान ३७ हजार ८०० कोटी, जलजीवन मिशन ६० हजार कोटी, राष्ट्रीय शिक्षण अभियान ३९ हजार ५५३ कोटी, पंतप्रधान ग्रामसडक योजना १९ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटी रुपये तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
 पुढच्या तीन वर्षांत ४०० वंदे भारत रेल्वेंची बांधणी करण्यात येणार असून, १०० पी एम गतीशक्ती कार्गो टर्मिनल विकसित केली जाणार आहेत.
 गोदावरी कृष्णा, दमणगंगा पिंजाळ, पार तापी नर्मदा यासह पाच नदीजोड प्रकल्पांचा विस्तृत प्रकल्प अहवाल मसुदा मंजूर करण्यात आला असून, संबंधित राज्यांमध्ये सहमती झाल्यावर केंद्राक��ून पाठबळ पुरवलं जाणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
 पीएम ई विद्या कार्यक्रमाअंतर्गत २०० टी व्ही चॅनल सुरु करण्यात येणार असून, प्रादेशिक भाषेत शिक्षणावर भर दिला जाणार असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
 सर्व राज्यांना आर्थिक सहाय्यासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील ५० वर्षांसाठी असेल यावर कुठलंही व्याज आकारलं जाणार नाही.
 उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत १४ क्षेत्रांमध्ये ६० लाख नवीन रोजगार निर्माण होणार असल्याचं अर्थंमंत्र्यांनी सांगितलं.
 आयकराच्या रचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आलेला नाही. मात्र आयकर विवरणपत्र भरण्यात चूक झाल्यास, अद्ययावत आयकर विवरणपत्र दोन वर्षाच्या मुदतीत दाखल करता येणार आहे. करचुकवेगिरी प्रकरणात छापा घालण्याची वेळ आल्यास, संबंधित करदात्याची संपूर्ण संपत्ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या एनपीएस खात्यासाठी नियोक्त्याच्या योगदानासाठीची कर वजावट मर्यादा १० टक्क्यांवरून १४ टक्के प्रस्तावित करण्यात आली आहे.
जानेवारी २०२२ मध्ये १ लाख ४० हजार ९८६ कोटी रुपये जीएसटी संकलन झालं आहे. हे आतापर्यंतचं सर्वाधिक संकलन असून, अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं हे यश असल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.
****
या अर्थसंकल्पाबाबत राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या आधीच्या अर्थसंकल्पांमधून केंद्र सरकारनं सर्वसामान्‍य जनतेपुढे अनेक स्वप्नं उभी करून आशावाद निर्माण केला, प्रत्यक्षात त्यापैकी किती स्वप्नं पूर्ण झाली याची स्पष्टता न करता, आणखी नवीन स्वप्नं कालच्या अर्थसंकल्पातून लोकांसमोर उभी करण्यात आली, परंतु पूर्वीच्या आणि आताच्या स्वप्न���ंच्या उद्दिष्ट पूर्तीची कोणतीच दिशा हा अर्थसंकल्प दाखवत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी, अर्थसंकल्पाबाबत बोलताना, जीएसटीमध्ये राज्यांचा वाटा दोन वर्षांसाठी वाढवणं अपेक्षित होतं, असं मत व्यक्त केलं.
विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प भविष्यातील भारताचा वेध घेणारा तसंच बलशाली राष्ट्राचा आत्मनिर्भर अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे.
****
इतर मागासवर्ग - ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात आलं होतं. यामुळे ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुकीत २७ टक्के आरक्षण देण्याचा कायदा संमत झाला आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार २२१ एवढी झाली असून, यापैकी एक हजार ६८२ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४ हजार ३७२ रुग्ण ��ढळले. त्यामुळे राज्यभरातल्या ��ोविड बाधितांची एकूण संख्या ७७ लाख ३५ हजार ४८१ झाली आहे. काल ९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ७०५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल ३० हजार ९३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७३ लाख ९७ हजार ३५२ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक ६३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख ९१ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल एक हजार ३४३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ४७४ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात १६३, हिंगोली १४८, नांदेड १४४, जालना १३४, बीड १०६, परभणी ९९, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ७९ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
नांदेड जिल्ह्यात पहिली ते चौथीच्या शाळा येत्या सात फेब्रुवारीपासून सुरू करण्यास, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी मान्यता दिली आहे. शासन निर्णयात नमूद असणाऱ्या कोविड नियमावलीचं शाळांनी काटेकोरपणे पालन करावं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व विद्यार्थ्यांचं १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा, असं यासंदर्भातल्या आदेशात म्हटलं आहे. जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यासही त्यांनी मान्यता देण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळा नियमित सुरू राहाव्यात आणि शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य अबाधित राहण्याच्या हेतूनं, लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य विभागानं, विशेष मोहिमा राबवण्याच्या सूचना, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.
****
0 notes