Tumgik
#नंदुरबार बातमी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Child marriage Nandurbar | कोरोनाच्या अडीच वर्षात 9 हजार 983 मुलींचा नंदुरबार जिल्हात बालविवाह, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे…
Child marriage Nandurbar | कोरोनाच्या अडीच वर्षात 9 हजार 983 मुलींचा नंदुरबार जिल्हात बालविवाह, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे…
Child marriage Nandurbar | कोरोनाच्या अडीच वर्षात 9 हजार 983 मुलींचा नंदुरबार जिल्हात बालविवाह, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती पुढे… कोरोनाच्या अडीच वर्षानंतर 52 हजार 773 मुलींचा विवाह झाला. यातील 18.96 टक्के मुलींचा बालविवाह झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा आकडा 9 हजार 983 इतका असून राज्यात आतापर्यतच्या बालविवाहाची ही सर्वात मोठी नोंद असेल. नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून एक…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years
Text
भीषण अपघात! दुचाकी आणि बोलेरोची धडक: तरुणाचा जागीच मृत्यू; ६ जखमी
भीषण अपघात! दुचाकी आणि बोलेरोची धडक: तरुणाचा जागीच मृत्यू; ६ जखमी
हायलाइट्स: मोटारसायकल आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक तरुण जागीच ठार ६ जण जखमी, उपचार सुरू नंदुरबार : शहादा लोणखेडा बायपासवर एका मोटारसायकलची आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार तरुण जागीच ठार झाला आहे. तसंच ६ जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Nandurbar Accident)मिळालेल्या माहितीनुसार,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 May 2020 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ मे २०२० सायंकाळी ६.०० ****  मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित नऊ सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ  सीबीएसईकडून बारावीच्या उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर  नंदूरबार जिल्ह्यातले १७ तर अहमदनगर जिल्ह्यातले सात रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त आणि  शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार - लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन **** मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश ���राड, प्रविण दटके, गोपिचंद पडळकर, अमोल मिटकरी, आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचं विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल अभिनंदन केलं. **** केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईने बारावीच्या उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परीक्षा आता १ ते १५ जुलै दरम्यान होणार आहेत. परीक्षार्थींनी मास्क वापरणं तसंच सॅनिटायझर सोबत ठेवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. आपल्या पाल्याला कोणताही आजार होणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यावी, असंही मंडळानं म्हटलं आहे. **** भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरने कोविड - १९च्या चाचण्यासंदर्भात सुधारित धोरण जारी केलं आहे. गेल्या चौदा दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या व्यक्ती, संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, संसर्गाची लक्षणं दिसत असलेले डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचारी, तसंच श्वसनाच्या गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांचीही आता कोरोना विषाणू संसर्ग चाचणी केली जाणार आहे. एखादी व्यक्ती कोरोना विषाणू बाधित झाल्यानंतर पाचव्या दिवसापासून चौदाव्या दिवसापर्यंत रुग्णाच्या संपर्कात आलेले आणि अतिजोखीम असलेल्या व्यक्तीं��ध्ये कोणतीही लक्षणं दिसत नसतील, तरीही कोरोना संसर्ग चाचणी केली जाणार आहे. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधले श्वसनाचे गंभीर आजार असलेले रुग्ण, शंभर फॅरेनहाईटपेक्षा तीव्र तापाचे रुग्ण, तसंच खोकला असलेल्या रुग्णांचीही तपासणी करण्याचे निर्देश आयसीएमआरने दिले आहेत. **** अमरावती इथं कोविड 19 आजारासंबंधी चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा आठवडाभरात कार्यान्वित होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत संपूर्ण यंत्रणा उभारण्यात आली असल्याचं, अधिष्ठाता डॉ. पी. आर. सोमवंशी यांनी सांगितलं. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा प्रशासनाकडून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना संसर्ग चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी ५० लाख रुपये निधी जिल्हा नियोजनातून देण्यात आला आहे. **** नंदुरबार जिल्ह्यात रुग्णालयात उपचार घेणारे १७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, उर्वरित दोन रुग्णांना आज सुटी दिली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण २१ रुग्ण कोरोना विषाणू बाधित होते. यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. **** अहमदनगर जिल्ह्यातले ०७ रुग्ण आज कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. या सर्वांना आज बूथ हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४९ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १० जणांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. **** औरंगाबाद इथं आतापर्यंत ३२२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यानं घरी परतले आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या आज १ हजार २१ वर पोहोचली, यापैकी ३२ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे **** गडचिरोली जिल्ह्यात संस्थात्मक विलगीकरण केलेल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची संख्या आता ५ झाली आहे. ***** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. ***** ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या निधनाची बातमी मनाला वेदना देणारी असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मतकरी यांनी लहानांचं भावविश्व साकारलं, महाराष्ट्राचे साहित्य- नाट्य क्षेत्र समृद्ध केलं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मतकरी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मतकरी यांना श्रद्धांजली अर्पण करताना, साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक, चित्रकार, आस्वादक, अशा एका चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्र मुकला, अशी भावना व्यक्त केली. मतकरी यांच्या निधनाने साहित्य आणि रंगभूमी क्षेत्रात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचं, देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. मतकरी यांचं काल रात्री निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. **** शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वास, राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्या��े पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिलं आहे. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात पानगाव इथं व्यंकटेश जिनिंग प्रेसिंग मध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ देशमुख यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातल्या अहमदपूर, जळकोट आणि उदगीर तालुक्यातल्या ४ हजार ३१४ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पानगाव इथं कापूस खरेदी केंद्रात नोंद केली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी बी-बियाणे आणि खताची टंचाई भासणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी, ग्रामीण भागात रोजगार हमी योजनांची कामं तत्काळ सुरु करावीत, पाणी टंचाई आणि शेतीच्या कामास प्रथम प्राधान्य देण्यात यावं, अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी केल्या. **** मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ‘पीएम केयर्स निधी’ ५१ लाख रुपये मदत जमा केली आहे. संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी आज या निधीचं पत्र औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सुपूर्द केलं. यावेळी आमदार संजय शिरसाठ, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ.अविनाश येळीकर उपस्थित होते. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री सहायता निधीतही ५१ लाख रुपये मदत जमा केल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं **** जालना जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र असं असूनही या भागातले नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहावं. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्क वापरावा, तसंच शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे. **** संचारबंदीच्या काळात तरुणांना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे लातूरचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे. केंद्र सरकारने यासाठी ४० हजार कोटीचे पॅकेजही जाहीर केलं असून याअंतर्गत शेतकऱ्यांना आणि मजुरांना काम मिळवून द्यावं अशी मागणी सस्तापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. **** नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालूक्यातील पिंपळगाव महादेव इथल्या यशोदाबाई खंडागळे यांना अर्धापूर तालुक्यातील मालेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवा कांबळे यांनी अन्नधान्याची मदत केली आहे. यशोदाबाई ह्या सैन्य दलातील हुतात्मा सैनिक शंकर खंडागळे यांच्या आई असून, संचारबंदीच्या काळात अडचण निर्माण झाल्यानं, त्यांना ही मदत करण्यात आली. **** परभणी इथं संचारबंदी काळात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची जप्त केलेली वाहनं, २०० रुपये दंड आका��ून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित वाहनधारकांनी उद्यापासून आपली वाहनं योग्य कागदपत्रे दाखवू�� सामाजिक अंतराच्या नियमाचं पालन करत सोडवून न्यावीत, असं आवाहन करण्यात आलं आहे. यानंतरही रस्त्यांवर विनाकारण फिरतांना आढळल्यास मोटार वाहन कायद्या प्रमाणे संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनानं दिला आहे. पोलिस प्रशासनानं एकूण १ हजार ७५८ दुचाकी, तर १५७ चारचाकी वाहनं जप्त केलेली आहेत. **** जालना इथं बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या तसंच जिल्ह्याबाहेर जाण्यास इच्छुक नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी करून आरोग्य प्रमाणपात्र दिलं जात आहे. यासाठी नागरिकांनी या रुग्णालयाबाहेर आज रांगा लावल्याचं दिसून आलं. **** नाशिक जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात नियमांच पालन करुन पाच हजाराहून आधिक औद्योगिक आस्थापन आणि कारखाने सुरू करण्यात आले आहेत. यामुळे ६० हजाराहून अधिक कामगारांचा रोजगार सुरू झाला आहे. २० एप्रिल नंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ४४६ कंपन्याना आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून पाच हजार औद्योगिक आस्थापनांना काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. **** सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर तालुक्यातील पुळूज इथले जवान धनाजी होनमाने यांच्या पार्थिव देहावर जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. होनमाने यांना गडचिरोली इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात वीरमरण आलं होतं. ***** ***
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Nandurbar | धक्कादायक! नंदुरबार जिल्हात सहा महिन्यात 86 नवजात बालकं दगावली, 10 मातांचाही प्रसुतीच्या वेळी मृत्यू…
Nandurbar | धक्कादायक! नंदुरबार जिल्हात सहा महिन्यात 86 नवजात बालकं दगावली, 10 मातांचाही प्रसुतीच्या वेळी मृत्यू…
Nandurbar | धक्कादायक! नंदुरबार जिल्हात सहा महिन्यात 86 नवजात बालकं दगावली, 10 मातांचाही प्रसुतीच्या वेळी मृत्यू… जिल्ह्यातील माता मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब असून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकूणच ही आकडेवारी जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना दगावलेल्या माता आणि नवजात बालकांची आहे. शासनाने बाळंतपणातील मृत्यू रोखण्यासाठी अनेक योजना…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे नंदुरबार शिवसेनेतील गृहकलह विकोपाला
जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे नंदुरबार शिवसेनेतील गृहकलह विकोपाला
जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे नंदुरबार शिवसेनेतील गृहकलह विकोपाला नीलेश पवार जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून जम बसविण्याच्या प्रय��्नात असलेल्या शिवसेनेत अंतर्गत नाराजी नाट्याचा वाद चांगलाच उफाळला असून डॉ. विक्रांत मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा पाठविल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 April 2019 Time 20.00 to 20.05 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ एप्रिल २०१९ - २०.०० **** लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्यासाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून प्रत्येकी २-२ उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता दक्षिण मुंबईतून १३ तर दक्षिण मध्य मुंबईतून १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उत्तर मुंबई मतदार संघात १८ उमेदवार, ईशान्य मुंबई २७, वायव्य मुंबई २१ तर उत्तर मध्य मुंबई मतदार संघात २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. ठाणे इथं दोन जणांनी माघार घेतल्यानं २३ उमेदवार, कल्याण इथं चार जणांनी माघार घेतल्यानं २८, नाशिक इथं पाच जणांनी माघार घेतल्यानं १८, दिंडोरी इथं एकानं माघार घेतल्यानं आठ, तर शिर्डी मतदार संघातून आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं, या मतदारसंघामध्ये आता २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धुळे मतदार संघातून चार तर, नंदुरबार मतदार संघात दोन जणांनी माघार घेतल्यामुळे या मतदार संघांमध्ये अनुक्रमे २८ आणि अकरा उमेदवारांमध्ये निवडणूक होईल. **** मराठवाड्यातल्या सहा मतदार संघात येत्या १८ तारखेला मतदान होत आहे, या पार्श्वभूमीवर या सर्व मतदार संघात प्रचारानं वेग घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातून गरिबी हटावचा जुना राग पुन्हा आळवला जात असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आज झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारनं गरिबीवर मात करणाऱ्या अनेक योजना प्रत्यक्षरीत्या राबवल्याचं, त्यांनी सांगितलं. **** लातूर लोकसभा मतदार संघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते विनोद तावडे यांची आज लातूर इथं सभा झाली. यावेळी केलेल्या भाषणात तावडे यांनी, काँग्रेस पक्षानं, अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, आदी नेत्यांवर यंदाची निवडणूक लादल्याची टीका केली. खोटी आश्वासनं देऊन काँग्रेस पक्ष जनतेला फसवत असल्याचा आरोप ही तावडे यांनी केला. **** २०१४ च्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते या वेळी काहीही बोलत नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं, पत्रकार परिषदेत बोलत होते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आदी मुद्यांवरून, मलिक यांनी भाजप सरकारवर टीका केली. काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही आज उस्मानाबाद इथे पत्रकार परिषद घेतली. मागच्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या सुमारे सव्वाशे आश्वासनांपैकी, भाजपने एकाही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, असा आरोप पाटील यांनी केला. राज्यातल्या भीषण दुष्काळाकडेही, सरकार गांभीर्याने पाहत नसल्याची टीका त्यांनी केली. **** महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्षावर टीका कडाडून टीका केली. भाजपचं सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, रोजगारासाठी तरूणांचे तांडे बाहेर पडत आहेत, पण सरकार याबाबत काहीही बोलत नसल्याचं ते म्हणाले. नोटबंदीमुळे साडेचार ते पाच कोटी लोकांचे रोजगार गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. *** उस्मानाबाद मतदार संघातले भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ ��ळंब इथं, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. केंद्र तसंच राज्य शासनानं गेल्या पाच वर्षांत राबवलेल्या विविध विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी मतदारांसमोर मांडला. **** परभणी मतदार संघातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमदेवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा झाली, पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत केलेल्या आरोपांसंदर्भात बोलताना, धनंजय मुंडे यांनी, कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं. **** अहमदनगर इथले भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीने नोटीस बजावली आहे. ��िर्डी इथल्या एका स्थानिक केबल नेटवर्कवर सुजय विखे यांना अनुकूल अशी बातमी प्रसारित झाल्याप्रकरणी, ही नोटीस बजावण्यात आली आहे. **** विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारी निवासस्थानी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचं, मुंबई शहर जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर निवडणूक संदर्भात बैठक झाल्याची तोंडी तक्रार आली होती, मात्र त्यात तथ्य आढळलं नसल्याचंही जोंधळे यांनी स्पष्ट केलं. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. ****  गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत  कर्जमाफीसाठी खुल्या बाजारातून २० हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारणीस अनुमती देण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी  मुंबईत एका फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा भाजून मृत्यु आणि  नंदुरबार आणि नवापूर नगरपालिका काँग्रेसकडे, तळोदा आणि डहाणू नगरपालिका भाजपच्या ताब्यात. **** गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. काल झालेल्या मतमोजणीत गुजरातमध्ये भाजपला सलग सहाव्यांदा सत्ता कायम राखण्यात यश आलं आहे. इथं भाजपनं १८२ जागांपैकी ९९ जागा मिळवत बहुमत प्राप्त केलं. काँग्रेसला ७७ आणि त्यांच्या मित्र पक्षांना ३ जागा मिळाल्या असून अन्य अपक्ष तीन उमेदवार विजयी झाले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता बदल होऊन भाजपला बहुमत मिळालं आहे. एकूण ६८ जागांपैकी भाजपला ४४, तर काँग्रेसला २१ जागा मिळाल्या. तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले. मात्र या निवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. हा विजय असामान्य असल्याचं सांगून, बदलासाठी देश तयार असल्याचं, या निकालावरून दिसून येतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर, विकासाच्या मुद्यावर भाजपला हा विजय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी जनतेचा कौल मान्य असल्याचं सांगत जनतेचे आभार मानले आहेत. विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेनं पाठिंबा दिला असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. **** छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत, कर्जमाफीसाठी ३४ हजार, २२ कोटी इतका निधी तातडीनं द्यायचा असून, खुल्या बाजारातून २० हजार कोटी रुपयांचं कर्ज उभारणीस अनुमती देण्याची मागणी, केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. अर्थ राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत काल एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. राज्यात कर्जमाफी जाहीर केल्यामुळे होणारी आर्थिक तूट दूर करण्याबाबत केलेल्या उपाय योजनांर्गत सदस्य आनंदराव पाटील यांनी प्रश्न विचारला ह���ता. **** राज्यातल्या शाळांना पुरवण्यात येणाऱ्या, शालेय पोषक आहाराच्या धान्य खरेदीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून, या प्रकरणाची विशेष तपास पथका मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी, भाजपचे ज्येष्ठ नेते, एकनाथ खडसे यांनी केली आहे. विधानसभेत यासंदर्भात एका लक्षवेधी सूचने मार्फत त्यांनी काल ही मागणी केली. **** हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामात बनावट नावे टाकून मजुरी घेतल्याबद्दल ग्रामरोजगार सेवकास निलंबित करण्यात आल्याचं रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य रामराव वडकुते यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. गरज भासल्यास उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत या संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असं ते म्हणाले. **** मुंबईत साकीनाका भागात काल पहाटे एका फरसाणाच्या दुकानाला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा भाजून मृत्यु झाला तर एक जण जखमी झाला. शॉक सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी कामगार दुकानात झोपलेले होते. **** भ्रष्टाचार आणि बेनामी संपत्ती बाळगल्याच्या आरोपावरून तुरूंगात असलेले माजी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ या दोघांनाही काल मुंबईच्या स्थानिक न्यायालयानं जामीन नाकारला. यापूर्वी माजी मंत्री भुजबळ यांनी वैद्यकीय कारणावरून जामिन देण्यासाठी केलेला अर्जदेखील न्यायालयानं फेटाळून लावला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी, तर नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदीही काँग्रेसच्या हेमलता पाटील विजयी झाल्या. तर तळोदा नगरपालिकेत सत्तांतर झालं असून, नगराध्यक्षपदी भाजपचे अजय परदेशी विजयी झाले. पालघर जिल्ह्यातल्या वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर विजयी झाल्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निशा सावरा यांचा पराभव केला. शिवसेनेनं सहा, भाजपनं सहा, काँग्रेसनं दोन, बहुजन विकास आघाडीनं दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक जागा जिंकली. डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे भरत राजपूत विजयी झाले. राजपूत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मिहीर शहा यांचा पराभव केला. तर जव्हार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे चंद्रकांत पटेल विजयी झाले आहेत. **** राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी काल तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. **** जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या घाणेगाव इथल्या ४० ग्रामस्थांनी काल जांबसमर्थ तलावात उतरून चार तास जलसमाधी आंदोलन केलं. स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, विक्रेत्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांनीही सहभाग घेतला. तहसीलदार आश्विनी डमरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन, संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं. **** आणि आता ऐकू या पॉझिटीव्ह इंडिया मोहिमे अंतर्गत एक सकारात्मक बातमी….. मुख्यमंत्री ग्राम सहाय्यता निधीअंतर्गत मिळालेल्या निधीतून गावाचा कसा कायापालट केला, सांगताहेत वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातल्या भामदेवी गावचे सरपंच सुभाष मोहकार ........... आमचं भामदेवी गाव हे मुख्यमंत्र्यांनी ग्राम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दत्तक घेतलं. आणि इथं दोन कोटी रूपये विकास कामासाठी दिले.आणि त्या दोन कोटीतून आम्ही जलसिंचनाची कामं आणि कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ५६ लाभार्थ्यांना १७२ म्हशी दिल्या आणि त्या दुधाचं संकलन आणि पॅकिंग सेंटर सुध्दा इथं उघडलं आहे. आणि वऱ्हाड दुध नावानं आम्ही पॅकींग करून ब्रँड करून आम्ही ते दुध मार्केट मध्ये विकतो.तसंच इथं साडेसहा हजार झाडे सुध्दा लावली आहेत.तसंच नेटशेट, मछीपालन असे विविध उपक्रम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भामदेवी इथं झाली. तसंच विधवा महिलांना कुटीर उद्योगाची कामे प्रस्तावित आहेत.आणि इथं मुख्यमंत्री साहेबांनी निधी दिल्यामुळे गावचा भरपूर विकास झाला आणि शेतकऱ्यांना बेराजगार मुलांना कामं मिळाली.आणि कमी पैशांमध्ये चांगला विकास इथं साधला आहे. **** येत्या ३ फेब्रुवारी पासून लातूर पर्यंत येणाऱ्या बेंगलूर - बिदर या विस्तारीत रेल��वेगाडीला उदगीर आणि भालकी इथ थांबा देण्यात यावा अशी मागणी ग्राहक पंचायतीचे मराठवाडा सहसंघटक शामसुंदर मानधना यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. काल या संदर्भातलं निवेदन त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे पाठवलं. **** ग्राहकांनी जागरुक राहून ग्राहक चळवळ गतीमान करावी असं आवाहन राज्य ग्राहक संरक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी केलं आहे. परभणी इथ ते वार्ताहरांशी बोलत होते. येणाऱ्या काळात राज्यातल्या ३५० तालुक्यात ग्राहक चळवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असं ते म्हणाले. **** समाजातल्या विविध तक्रारी असणाऱ्या महिलांना, आपल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या मुंबईच्या कार्यालयात जावं लागू नये, यासाठी, राज्य महिला आयोग आज औरंगाबाद इथं सुनावणी घेणार आहे. सकाळी ११ वाजता सुभेदारी विश्रामगृहात ही सुनावणी होईल. **** जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्याची पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ साठी निवड झाली आहे. या माध्यमातून तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या जलसंधारणाच��या उपक्रमांची माहिती देण्यासाठी काल उपविभागीय कार्यालयात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. *****
0 notes